Skip to main content

खरडफळा (क्रमांक २) वेलकम बॅक..

लेखक गवि यांनी सोमवार, 13/04/2026 01:45 या दिवशी प्रकाशित केले.

मिसळपाव बराच मोठा काळ विश्रांती अवस्थेत राहून पुन्हा एकदा नव्या रूपात उभं आहे. 

 

सर्वांना पुन्हा एकदा एकत्र येऊन आता लेखन वाचन आणि मुख्य म्हणजे गप्पा टप्पा करता येतील. 

 

आशाताई आपल्याला सोडून गेल्या. त्यांची गाणी आपल्याला कधीच सोडणार नाहीत. आणि त्यांचा सदैव हसरा चेहरा हीच त्यांची आठवण म्हणून नेहमीच लक्षात राहील. 

 

युद्धात देखील दर दिवसागणिक खूप घडामोडी घडत होत्या. 

 

त्या काळात सर्वांनीच मिपाला मिस केलं असेल. 

 

तर या गप्पांच्या खरडफळा क्रमांक २ वर सर्वांचं स्वागत आहे.

 

मिपा समोरून पाहताना फक्त विश्रांती अवस्थेत दिसत होतं पण मागे सतत खूप मोठ्या घडामोडी आणि तांत्रिक आव्हानं येत होती.  

 

नीलकांतच्या दिवसरात्र अथक परिश्रमाचं कौतुक आणि कृतज्ञता..

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 685
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

प्रतिसाद संपादन चांगली गोष्ट..

सुवेळ सुदिन मिपाईने गोंधळ मांडिला वो ।

 ज्ञान साहित्य,रजंनाचा फुलवरा बांधिला वो । 

चंद्र सूर्य जववरी याचा पोत पाजळू दे वो । 

घालुनी गोंधळ माय  म्हराटिच वैभव वाढू दे  वो ॥ १ ॥

उदो बोला उदो उदो मिपा माउलीचा वो ॥ध्रु०॥


मोबाईलहुन लॉग इन होत नाहिये :(
मी लॅपटॉप ,सिस्टीम जास्त वापरत नाही..
टायप करणे खुप सोपे झालय....
लवकर सगळे परत येतिल ही सदिच्छा ;)
एमोजि टाकता येत होत्या ना??
हमको हमरा जुना खरडफळा वापस कर दो ...अध्यक्ष महोदय :) ;)


नीलकांत, प्रशांत आणि सार्या चमूचे हार्दिक अभिनंदन


नविन वातावरणात रुळायचा प्रयत्न करत आहे.
लेखांवर आवर्जुन प्रतिसाद देत आहे.
माझे जुने लेख दिसले याचा आनंद झालाय.