मिसळपाव बराच मोठा काळ विश्रांती अवस्थेत राहून पुन्हा एकदा नव्या रूपात उभं आहे.
सर्वांना पुन्हा एकदा एकत्र येऊन आता लेखन वाचन आणि मुख्य म्हणजे गप्पा टप्पा करता येतील.
आशाताई आपल्याला सोडून गेल्या. त्यांची गाणी आपल्याला कधीच सोडणार नाहीत. आणि त्यांचा सदैव हसरा चेहरा हीच त्यांची आठवण म्हणून नेहमीच लक्षात राहील.
युद्धात देखील दर दिवसागणिक खूप घडामोडी घडत होत्या.
त्या काळात सर्वांनीच मिपाला मिस केलं असेल.
तर या गप्पांच्या खरडफळा क्रमांक २ वर सर्वांचं स्वागत आहे.
मिपा समोरून पाहताना फक्त विश्रांती अवस्थेत दिसत होतं पण मागे सतत खूप मोठ्या घडामोडी आणि तांत्रिक आव्हानं येत होती.
नीलकांतच्या दिवसरात्र अथक परिश्रमाचं कौतुक आणि कृतज्ञता..
वाचने
1478
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
नमस्कार
ही चाचणी आहे.
.
प्रतिसाद देता येतोय. उत्तम.
प्रतिसाद देता येतोय. उत्तम.
निलकांत आणी चमूचे अभिनंदन.
सुवेळ सुदिन मिपाईने गोंधळ मांडिला वो ।
ज्ञान साहित्य,रजंनाचा फुलवरा बांधिला वो ।
चंद्र सूर्य जववरी याचा पोत पाजळू दे वो ।
घालुनी गोंधळ माय म्हराटिच वैभव वाढू दे वो ॥ १ ॥
उदो बोला उदो उदो मिपा माउलीचा वो ॥ध्रु०॥
चान, चान .... चान !
सकाळी प्रतिसाद देता येत…
धन्यवाद निलकांत ; खूप कष्ट…
मोबाईलहुन लॉग इन होत नाहिये …
मोबाईलहुन लॉग इन होत नाहिये :(
मी लॅपटॉप ,सिस्टीम जास्त वापरत नाही..
टायप करणे खुप सोपे झालय....
लवकर सगळे परत येतिल ही सदिच्छा ;)
एमोजि टाकता येत होत्या ना??
हमको हमरा जुना खरडफळा वापस कर दो ...अध्यक्ष महोदय :) ;)
मस्त
नीलकांत, प्रशांत आणि सार्या चमूचे हार्दिक अभिनंदन
बाडिस... रुळायला थोडा वेळ…
In reply to मस्त by सविता००१
बाडिस...
रुळायला थोडा वेळ लागेल पण चालू झाले... धन्यवाद! _/\_
नविन वातावरणात रुळायचा…
नविन वातावरणात रुळायचा प्रयत्न करत आहे.
लेखांवर आवर्जुन प्रतिसाद देत आहे.
माझे जुने लेख दिसले याचा आनंद झालाय.
नवीन रुपड्यानिमित्त धन्यवाद
नीलकांत व चमूचे आभार. सावकाशीने हटमळ साज चढवता ( HTML formatting ) येईल काय?
-गा.पै.
"धुरंधरचे गाणे आणि बायकोचा दंडा"
माझी विनोदी कथा "धुरंधरचे गाणे आणि बायकोचा दंडा" दिसत नाही आहे. कारण काय असावे.
https://www.misalpav.com…
In reply to "धुरंधरचे गाणे आणि बायकोचा दंडा" by विवेकपटाईत
https://www.misalpav.com/story/53605
दिसत आहे
खरडफळा वर काढतोय!
खरडफळा वर काढतोय!
जवळपास १० वर्षांनंतर काल…
जवळपास १० वर्षांनंतर काल कैलासवासी सोन्याबापू हे सदस्य उपस्थितांमध्ये दिसले होते. त्यावेळी मुख्य फळ्यावर त्यांचे काही धागे अचानक वर आलेले दिसले ज्यात एकही नवीन प्रतिसाद नव्ह्ता. प्रत्यक्षात त्यांनी आपल्या त्या धाग्यातील संपूर्ण गाभा पुसून टाकून आभार असा एकच शब्द नव्याने लिहिला होता. नंतर काही वेळाने ते धागे मुख्य फळ्यावरून अदृश्य झाले व त्यांचे सदस्यत्व सुद्धा समाप्त झाल्याचे दिसले.
त्यांच्याच विनंतीवरून प्रशासकांनी त्यांनी निर्मिलेले सर्व लेख अदृश्य करून सदस्यत्व समाप्त केले असावे. हे करताना काही तांत्रिक कारणामुळे खरडफळा अदृश्य झाला असावा.
कैलासवासी सोन्याबापूंना अचानक १० वर्षांनंतर दृश्य स्वरूपात येऊन आपले सर्व लेखन पुसावेसे का वाटले याची कल्पना नाही. ते सैन्यात असल्याने, कदाचित, सर्व समाज माध्यमांपासून अंतर राखण्याची सूचना वरिष्ठांनी केली असावी. आपले पूर्वलेखन कोणाच्या नजरेस येऊ नये असा विचार असू शकतो. अन्यथा १० वर्षांपूर्वी सुद्धा त्यांचे तसे कोणाशीही भांडण नव्हते. वैचारिक मतभेद होते, परंतु ते स्वतः किंवा त्यांच्याविरूद्ध कोणीही हमरीतुमरीवर आल्याचे माझ्या स्मरणात नाही. ते खरडफळ्यावरही बऱ्यापैकी सक्रिय होते. १० वर्षांनंतर अचानक अवतीर्ण होऊन आपले सर्व पूर्वलेखन का पुसले याची अजिबात कल्पना नाही.
+1 काहीतरी तांत्रिक कारणाने…
In reply to जवळपास १० वर्षांनंतर काल… by श्रीगुरुजी
+1 काहीतरी तांत्रिक कारणाने खफ गेला असावा, येईल पुन्हा. तो पर्यंत आपण हा खफ एंजॉय करूयात! पुन्हा पाऊस पडला, पुन्हा घरातले उघड्यावर येऊन बसले.
+१
In reply to जवळपास १० वर्षांनंतर काल… by श्रीगुरुजी
काल दुपारी मी एका मीटिंगसाठी बसलो होतो परत येऊन पाहतो ते सोन्याबापू ह्यांचे धागे वरती अन् कोरे. त्यांचे लेखन त्यातही वऱ्हाडी भाषेतले मी वाचले होते आधी पण कॉमेंट करावी वाटली नाही कधीच कारण त्याकाळी आमचा मराठी टंकनाचा उजेड होता एक आणि वऱ्हाडी कोणी अन् कशी लिहावी हा यक्षप्रश्न. सोन्याबापू पण अकोलेकर असल्याने थोडी आत्मीयता नक्कीच वाटायची पण त्यांच्याशी काही बोलणे झाले नव्हते कधी, कारण ते कधी ऑनलाईन नसत अन् मी पण मिपाचा सभासद नव्हतो. असो !.
खरदफळा चालू करा पुन्हा! 😭
खरदफळा चालू करा पुन्हा! 😭
धीर. श्रद्धा, सबुरी. होईल.
In reply to खरदफळा चालू करा पुन्हा! 😭 by अमरेंद्र बाहुबली
धीर. श्रद्धा, सबुरी.
होईल.
श्रद्धा आणि सबुरी
In reply to धीर. श्रद्धा, सबुरी. होईल. by गवि
आता चेक करा बरे. नीलकांतने…
In reply to श्रद्धा आणि सबुरी by चंद्रसूर्यकुमार
आता चेक करा बरे. नीलकांतने केले आहे काहीतरी सेटिंग.
'मिसळपाव डॉट कॉम' (Misalpav.com) या प्रसिद्ध मराठी संकेतस्थळावर
https://www.misalpav.com…
In reply to 'मिसळपाव डॉट कॉम' (Misalpav.com) या प्रसिद्ध मराठी संकेतस्थळावर by विकास...
https://www.misalpav.com/story/20746
https://www.misalpav.com/discuss/37056?page=1
https://www.misalpav.com/comment/1031192
https://www.misalpav.com/story/18126
राजाराम सीताराम एक, राजाराम सीताराम दो।
In reply to https://www.misalpav.com… by श्रीगुरुजी
https://www.misalpav.com/story/18126
राजाराम सीताराम एक, राजाराम सीताराम दो।
हाच लेख शोधत होतो. श्रीगुरुजी - खूप खूप आभारी आहे तुमचा .
🙏
In reply to राजाराम सीताराम एक, राजाराम सीताराम दो। by विकास...
🙏
@बाहुबली, तुम्ही मिथुन रास…
@बाहुबली, तुम्ही मिथुन रास आहात का हो? अर्थात उत्तर द्यायला तुम्ही बांधील नाही. 🙂
>>>
हो, मला लहनपणासून माझी रास कन्या आहे असे सांगण्यात आले होते पण लग्नाच्या वेळेस एका मीपाकाराकडून कळले की माझी रास मिथुन आहे.
ह्या वर्षी श्रावण पाळायचे…
ह्या वर्षी श्रावण पाळायचे ठरवले आहे. अजून तरी काहीही खाल्ले नाही, थोडे वेगळे बरे नी पवित्र वाटते आहे. नॉनवेज खाऊन वैताग आला होता, आता नॉनवेजचा नोशिया यायला लागलाय.
अहो
In reply to ह्या वर्षी श्रावण पाळायचे… by अमरेंद्र बाहुबली
मांसाहार अन पावित्र्य ह्यांचा काहीही संबंध नाही . मन चांगले हवे, नाहीतर शाकाहारी असून वंशविच्छेदी मानसिकता असणारे हुकूमशहा पण ह्याच जगाने बघितलेत आणि मांसाहारी असून कनवाळू असणारे लोक पण ह्याच जगाने बघितलेत. चालायचेच.
+१
In reply to अहो by वृषभ खोंडे
+१ आवडलं.
-दिलीप बिरूटे
भाऊ,
In reply to अहो by वृषभ खोंडे
ज्यांना पवित्र वाटून घ्यायचंय त्यांना वाटू द्यात की, तेवढंच मनाचं थोडं समाधान. ☺️ कृ ह घ्या
मांसाहारी असून कनवाळू असणारे…
उदा: . बीन लादेन , मोहम्मद युनूस , ओवेसी बंधू,
( जाणकारानी यात अधीकची भर घालावी.)
मांसाहार मला व कुटुंबियांना…
In reply to मांसाहारी असून कनवाळू असणारे… by विजुभाऊ
मांसाहार मला व कुटुंबियांना संपूर्ण त्याज्य आहे. मी काहीवेळा जवळपास २४ तास अर्धपोटी/उपाशी राहिलो होतो, परंतु कोणत्याही प्रकारचा मांसाहार करण्याची इच्छा झाली नाही. परमेश्वरकृपेने एका शाकाहारी कुटुंबात मी जन्मलो व आयुष्यभर शाकाहारीच आहे.
बघा !
In reply to मांसाहार मला व कुटुंबियांना… by श्रीगुरुजी
मी म्हणलो होतो ना गुरुजी तुम्ही इतर लेखन मानावर घ्या, कसलं भारी विनोदी लिहिता तुम्ही !
मग प्रोटीन ची गरज कशी भागवता…
In reply to मांसाहार मला व कुटुंबियांना… by श्रीगुरुजी
मग प्रोटीन ची गरज कशी भागवता? मी ह्या वर्षाच्या सुरुवातीला बॉडी बिल्डिंग सुरू केली होती, त्यावेळी प्रोटीन लोडिंग साठी जबरजस्त मांसाहार केला, सगळं ठीक होत पण रोज मांसाहार होईना. मग बंद केल.
विजुभाऊ
In reply to मांसाहारी असून कनवाळू असणारे… by विजुभाऊ
शाकाहारी ना !?
औसा येथील जिल्हा परिषद…
औसा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची पाहणी करण्यासाठी जेव्हा अभिजित दिपके आपल्या सहकाऱ्यांसह पोहोचले, तेव्हा त्यांना वर्गात विद्यार्थी बसलेले दिसले. मात्र, जेव्हा या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात आला, तेव्हा सत्य ऐकून तपासणी करणाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. वर्गात बसलेली मुले जिल्हा परिषद शाळेची नसून, ती शहरातील 'पीपल्स प्रायमरी स्कूल' या खासगी शाळेतील होती!
https://divyamarathi.bhaskar.com/amp/local/maharashtra/aurangabad/osmanabad/news/abhijit-dipke-school-theek-karo-campaign-latur-ausa-expose-138782534.html
अभिजीत दिपके ह्यांनी एका लहान मुलीला विचारले की तुझी स्कूल बैग कुठेय? तिने सांगितले की बैग तिच्या शाळेत आहे, ह्यावरून बोगस विद्यार्थी आणून बसवण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले! गोबरयुगात अश्या फसवणुकीच्या घटना सर्रास होताहेत.
दीपके हे चांगले काम करत आहे, बॅग विद्यार्थी आणून बसवून त्याना फसवू असा शासनाने विचार केला होता पण तो प्रयत्न फसला!
शाळा तपासणीचा अधिकार दिपकेला कुणी दिला?
In reply to औसा येथील जिल्हा परिषद… by अमरेंद्र बाहुबली
उगाचच काहीतरी.
असा अधिकार कुठे दिला जातो?…
In reply to शाळा तपासणीचा अधिकार दिपकेला कुणी दिला? by कंजूस
असा अधिकार कुठे दिला जातो? भारताचा एक सामान्य माणूस शाळा तपासू शकत नाही का? दिपके हा सामन्य माणूस, एक टॅक्सपेयर आहे, त्याच्या देशातल्या शाळांची अवस्था खराब आहे हे त्याला तपासण्यासाठी कुठला अधिकार हवा? काही मनुस्मृतीतील मंत्र वगैरे म्हणून असा अधिकार बहाल केला जातो का? सांगा काका सांगा!
असे तर
In reply to शाळा तपासणीचा अधिकार दिपकेला कुणी दिला? by कंजूस
भाजप, काँग्रेस, खासकरून सेना/मनसे, बच्चू कडूची प्रहार संघटना, राष्ट्रवादी आणि इतरही राजकीय पक्षांना सरकारी कार्यालयात घुसणे, तोडफोड करणे, अधिकाऱ्यांना बडवणे, त्यांच्या तोंडाला काळे/ शाई इत्यादी फासणे वगैरेंचा हक्क कोणी दिला आहे ? कोणीच नाही ? त्यात राजकारण म्हणले का केसेस पण हलक्या किंवा चक्क प्रतिबंधात्मक इत्यादी स्वरूपाच्या करून कार्यकर्ते संध्याकाळपर्यंत लॉकअप मधून मुक्त होऊन भाऊंच्या खर्चाने ढाब्यावर दारू प्यायला मोकळे होतातच की. तशीच केस दिपके वर पण झाली आहे. (कार्यकर्ता) खोंडे.