तरीही....(विडंबन)

श्वेता२४'s picture
श्वेता२४ in जे न देखे रवी...
7 Feb 2026 - 7:17 pm

प्रेरणा असलेली मूळ गझल इथे वाचून शकता...

तरीही....

नाजूक उंड्याचा सावरते मी तोल, तरीही
का होईना पोळी माझी गोल तरीही....

पिठी घातली घट्ट कराया पूरण थोडे..
अजून का ही पूरणामध्ये ओल तरीही....

काठाकाठाने लाटतसे, यत्न न सोडी...
तव्यावरी जाता, मी मारी शीळ तरीही....

भेटत नाहीत सख्या मला या 'कीटी' शिवाय
म्हणूनी खास हा त्यांच्यासाठी घोळ तरीही....

कोरीव भृकूटी मम सखीची पाहून ती पोळी
का मज वाटे अधिकच झाली खोल तरीही....

ग्रास आग्रही भरवी सखीला तो गोडूला
करी डोळे मोठे..अन आली भोवळ!!!!
तरीही...!!

gajhalgazalgholपाककृतीमाझी कविताविडम्बनविडंबनगझल

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Feb 2026 - 9:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विडंबनाची पोळी चांगली गोल झाली आहे.

-दिलीप बिरुटे

श्वेता२४'s picture

9 Feb 2026 - 2:04 pm | श्वेता२४

मनापासून धन्यवाद सर. आपले प्रोत्साहन माझ्यासाठी मोलाचे आहे _/\_

गझले चे विडंबन कवितेत केले एकदम..
आवडले..

श्वेता२४'s picture

11 Feb 2026 - 11:32 am | श्वेता२४

मूळच्या इतक्या सुंदर गझलचे पुन्हा गझलमध्ये विडंबन करावे इतकी प्रतिभा नाही हो माझ्याजवळ....
तरी आपणास हे विडंबन आवडले हे वाचून आनंद झाला....धन्यवाद