✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

"बौद्ध मूर्तीशास्त्र"

B
Bhakti यांनी
Fri, 01/30/2026 - 15:38  ·  लेख
लेख
सर्वांना वाटेल की मी अतीच सिनेमे पाहते काय(कोणाला आपल्याबद्दल काही वाटलं तरी आपण बदलू नाही ,हा बेसिक नियम मान्यच असेल ..:)) तर मी माझ्या क्षेत्राशिवाय अजूनही काही विशेष पाहत असते.मुळात अज्ञानी राहायला आवडत नाही.३ इडियट मधल्या रांचोचा एक डायलॉग मला फार रिलेट होतो,कायमच... "चारो तरफ ज्ञान बट रहा है, जहाँ से मिले लपेट लो".अशाप्रकारे ज्ञान मिळवणं जीवनाच्या आनंदाचं झाड आहे. तर मी नुकताच "बौद्ध मूर्तीशास्त्र" अभ्यासक्रम झूमद्वारे पाहत होते.भारतीय संतांची ओळख व्हावी त्या आधीपासूनच मला बुद्धाने आकृष्ट केले होते.शांतपणे डोळे मिटून,तो ध्यानस्थ बुद्ध मला आवडायला लागला.पुढे दुःखाचे कारण शोधायला सर्वांचा त्याग केला याचे खूप अप्रूप वाटत गेले.मग मी वैदिक परंपरासंबंधित गोष्टींचे ज्ञान मिळवण्यात खूप जिद्द धरली.याला "वैदिक" म्हटलं जात हे मला त्याला अभ्यासल्यावर समजले. या माहितीचा उहापोह करतानाच रणवीर अल्हाबादियाचे खूप शो पाहिले.तिथे मला पहिल्यांदा 'पालगा रिनपोछे' या तरुण बौद्ध भिक्षूंचे विचार ऐकायला मिळाले अगदी सुरुवातीच्या काळातच पालगा रिनपोछे त्यांना समजले की भौतिकवाद हा दीर्घकालीन आनंदाचा उपाय नाही.कमी वयातच त्यांनी अब्जाधीश होऊन सपंत्तीही उपभोगली पण अखेर अध्यात्माचा खरा उद्देश कळला.मासेराती विकणारा मोन्क अशा विशेषणाने ते प्रसिद्ध आहेत.त्याच भागात मला तारा देवीचा "ॐ तारे तुत्तरे तुरे सोहा" आणि "ओम मणि पद्मे हं" हा बौद्ध धर्मातील सर्वात प्रसिद्ध सहा अक्षरी मंत्र,विशेषतः अवलोकितेश्वर बोधिसत्वयाच्याशी संबंधित आहे.यांची दिक्षा मिळाली .मी सकाळच्या कामात जेव्हा आठवेल तेव्हा हे मंत्र यु ट्यूबवरलावायचे.इतकीच बौद्ध देवतांची ओळख होती. सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्थेचे वर्षभरातले शैव दृश्य संस्कृती,वैष्णव दृश्य संस्कृती,हिंदू लेणी स्थापत्य असे ऑनलाइन अभ्यासक्रम आवडीखातर केले आहेत.यावेळी त्यांनी बौद्ध मूर्तिशास्त्र हा अतिशय कमी शिकवला जाणारा विषय आयोजित केला होता. मी प्रवेश घेतला होता. या अभ्यासक्रमात हीनयान -थेरवाद आणि महायान या दोन्ही बौद्ध मूर्तीशास्त्रातील फरक समजला. सुरुवातीच्या काळात बुद्धाची मानवी रूपात मूर्ती बनवली जात नव्हती.खर म्हणजे बुद्धानी स्वतः त्याची कोणतेही मूर्तीपूजा होऊ नये असे सांगितले होते .परंतु बुद्धांनंतर ४००-५०० वर्षांनंतर अनुयायींना त्यांच्या प्रतीकांची गरज वाटली. तेव्हा प्रारंभी बुद्धाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बुद्धपाद,धर्मचक्र, बोधीवृक्ष, स्तूप यांसारखी प्रतीके वापरली गेली. बुद्धाला महापुरुष,शिक्षक मानले गेले ,देव नाही. त्रिरत्न-ज्यामध्ये बुद्ध हे गुरू,धम्म शिक्षण आणि संघ समुदाय यांचा समावेश होतो. बुद्ध अवशेषांच्या कास्केट ज्यामध्ये बुद्ध किंवा बौद्ध भिक्षूंचे शारीरिक अवशेष हाडे, राख, केस किंवा वैयक्तिक वस्तू ठेवल्या जातात .ज्या स्तुपांमध्ये पूजेसाठी ठेवल्या जातात. 1 पुढे महायानमध्ये बुद्धाला देव मानून त्यांची मानवी रूपात भव्य मूर्ती बनवली गेली. तथागत -पाच बुद्ध म्हणजे एकाच पूर्ण बुद्धत्वाच्या पाच वेगवेगळी रूपे आहेत. प्रत्येक बुद्ध एका विशिष्ट दोषाचे रूपांतर करून ज्ञानात बदलतो. ते मंडळात नेहमी एकत्र दिसतात – मध्यभागी वैरोचन आणि चार दिशांना चार बुद्ध.अक्षोभ्य, अमिताभ, अमोघसिद्धी, रत्नसंभव आणि वैरोचन हे पाच बुद्ध आहेत. ... बौद्ध धर्मात, तीन रत्ने म्हणजे बुद्ध, धर्म आणि संघ आणि रत्नसंभव हे बुद्ध देणारे मानले जातात. पन्चतथागत- 2 3 बोधिसत्त्वचा समावेश त्यानंतर होतो.'बोधी' म्हणजे ज्ञान + 'सत्त्व' म्हणजे जीव = ज्ञानी जीव. बोधिसत्व म्हणजे निर्माण होणारा बुद्ध, जो आपल्या सहकाऱ्यांचे दुःख कमी करण्यासाठी निर्वाण प्राप्ती पुढे ढकलतो.यातही विविध रुपांचा एक क्रम आहे. जो नीटसा समजाला नाही. बोधिसत्व विविध आहेत पण त्यातील काही प्रसिद्ध आहेत . अवलोकितेश्वर - हातात कमळ, जपमाळ, खूप हात असलेले रूप मंजुश्री -उजव्या हातात त्रिशूळासारखा खड्ग , डाव्या हातात प्रज्ञापारमिता ग्रंथ वज्रपाणी - वज्र धारण केलेला, रक्षक रूप क्षितिगर्भ -नरकातील प्राण्यांना सोडवणारा समंतभद्र -घोड्यावर बसलेला अवलोकितेश्वर आणि वज्रपाणी 5 इतर परंपरांनुसार शक्ती /स्त्री बौद्धदेवताहीची प्रचलित झाल्या . तारा देवी- "सर्व बुद्धांची आई" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, त्या करुणा, ज्ञान आणि "आठ महान भयांपासून" संरक्षणाचे प्रतीक आहेत. सर्वात लोकप्रिय "हिरवी तारा -संरक्षण" आणि "पांढरी तारा-उपचार" आहे. इतर प्रमुख बौद्ध देवी महामायुरी-या संस्कृत नावाचा अर्थ 'महान मोरणी' असा होतो.जी 'गुप्त विज्ञानांची राणी आहे. प्रज्ञापारमिता- सर्व बुद्धांची आई, ज्ञानाच्या परिपूर्णतेचे प्रतीक. मारिची- पहाट, प्रकाश आणि सूर्याची देवी, बहुतेकदा संरक्षणाशी संबंधित. भृकुटी -बहुतेकदा ती क्रोधाने संरक्षणाशी संबंधित असते. जांगुली- साप चावणे आणि आजार बरे करण्यात विशेषज्ञ असलेली देवी. हरिती- जिचे आधीचे काम मुले पळवून नेणाऱ्या राक्षसी म्हणून झाला होता जिला बुद्धाने संरक्षक देवतेत रूपांतरित केले.हरितीला अनेकदा मुलांभोवती किंवा मुलांना धरून ठेवणारी एक सुंदर स्त्री म्हणून चित्रित केले जाते.ती डाळिंबाशी संबंधित आहे, जी तिला मुलांऐवजी खाण्यास शिकवली जात असे. हरिती 6 काही बौद्धदेवता अष्टभयापासून संरक्षण करतात,जे बौद्ध ग्रंथांत सांगितले आहेत.सिंह, हत्ती ,अग्नि, सर्प, चोर, जल, राक्षस, राज यांच्यापासून भयमुक्ती देतो. मी काही अभ्यासक नाही.हे माझं या विषयीचे अल्प आकलन आहे.काही चुका अस्तील तर आधीच माफी मागते.माहितीच्या महासागरातील हे ओंजळभर ज्ञान आहे. परंतु सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्था विविध विषयातील तज्ञाचे असे अभ्यासक्रम आयोजित करत असते ,ज्याचा मीही ज्ञानवृद्धीसाठी फायदा घेत असते. संपर्क - डॉ.सुदर्शन बैरागी - -भक्ती
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
आस्वाद
माहिती
संदर्भ

प्रतिक्रिया द्या
3870 वाचन

💬 प्रतिसाद (51)

प्रतिक्रिया

बरीच माहिती गोळा केली आहे.

कंजूस
Fri, 01/30/2026 - 17:24 नवीन
बरीच माहिती गोळा केली आहे. शाळेत असताना ' गौतमाला बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले आणि तो बुद्ध झाला' हे वाचलेले. पण कोणते ज्ञान हे काही कुणी सांगायला तयार नव्हते. बुद्ध आणि त्याचा धम्म - बाबासाहेबांचं हे पुस्तक वाचल्यावर कळलं.
  • Log in or register to post comments

कृपया कृबुसंस्करण उलगडावे

गामा पैलवान
Sat, 01/31/2026 - 00:05 नवीन
भक्ती, कृपया या वाक्यातले कृबुसंस्करण उलगडावे :
ती डाळिंबाशी संबंधित आहे, जी तिला मुलांऐवजी खाण्यास शिकवली जात असे.
याचा अर्थ का होतो ? बाकी, इतके देव प्रचलित असतील तर बौद्ध हा नास्तिक पंथ का मानला जातो? याचं कारण असंय की, तो वेदांचे आधिपत्य नाकारतो. नास्तिक हा शब्द देवांचे अस्तित्व नाकारण्याशी संबंधित नाही. वेदांचे आधिपत्य नाकारले तरी वेद हेच मूळ श्रुती आहेत असं बौद्ध मानतात. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

ती डाळिंबाशी संबंधित आहे, जी

Bhakti
Sat, 01/31/2026 - 11:30 नवीन
ती डाळिंबाशी संबंधित आहे, जी तिला मुलांऐवजी खाण्यास शिकवली जात असे.
हरिती हिची कथा हरिती स्वतःच्या अनेक मुलांच्या उदरनिर्वाहासाठी इतरांची मुले चोरून खात असे .दुखी पालकांनी बुद्धांकडे तक्रार केली. बुद्धांनी हरितीला धडा शिकवण्यासाठी तिच्या सर्वात लाडक्या मुलाला पिंगलला लपवून ठेवले .मूल न सापडल्याने ती व्याकुळ झाली. बुद्धांनी तिला जाणीव करून दिली की, हजारो मुले असूनही एका मुलासाठी तुला इतके दुःख होत आहे, तर ज्यांची एकमेव मुले तू खाल्लीस, त्यांना किती दुःख झाले असेल?आपली चूक लक्षात आल्यावर हरितीने माफी मागितली आणि बुद्धांची अनुयायी बनली. ती मुलांची संरक्षक देवी म्हणून पूजली जाऊ लागली. पण तरीही तिला मांसभक्षणाची आठवण होई.रक्तप्राशन करावे वाटे तेव्हा रक्ताप्रमाणेच लाल रंगाचा ज्याचा रस ते डाळींबाचे दाणे त्याचा रस हे रक्ताचे रूपक होऊन ही तृषा शमवत.
याचं कारण असंय की, तो वेदांचे आधिपत्य नाकारतो.
>ज्याला वेदांत समजले तो कधीच म्हणणार नाही की बुद्धांनी वेदांना नाकारले.बुद्धांनी वेदांभोवती पसरलेल्या अहंकारला नाकारले आहे. वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण जो जाणतो तो अशा अहंकारात कधीच फसणार नाही
.
इतके देव प्रचलित असतील तर बौद्ध हा नास्तिक पंथ का मानला जातो? स्वतः बुद्धांनी याला विरोध केला.पण मनात अनुयायांनी हा पसार वाढवला हे वरती मी स्पष्टच लिहिले आहे की !<
  • Log in or register to post comments

पण मनात अनुयायांनी हा पसार

Bhakti
Sat, 01/31/2026 - 11:36 नवीन
पण मनात अनुयायांनी हा पसार वाढवला ऐवजी असे वाचा... पण मुळात अनुयायांनी हा (मुर्ती,कर्मकाण्ड) पसारा वाढवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

बुद्ध, बौद्ध आणि वेद

गामा पैलवान
Sun, 02/01/2026 - 15:26 नवीन
भक्ती, माझ्या मते गौतमबुद्ध स्वत: वेदांविषयी आदर बाळगून आहे. मात्र त्याच्या अनुयायांच्या बाबतीत असं ठामपणे म्हणता येईल का? मी साशंक आहे. बाकी, बुद्धाने स्वत:हून कसल्याही तत्त्वज्ञानाचा प्रचार वा प्रसार केला नाही. पहिला बौद्ध तत्त्वज्ञ नागार्जुन होऊन गेला. तो बुद्धाच्या नंतर तीनचारशे वर्षांनी जन्मला होता. यावरून बौद्ध हा वेगळा धर्म न मानता पारंपरिक भारतीय पंथ मानला पाहिजे. कुठल्याही पारंपरिक भारतीय पंथात दैवते शिरतात तशीच यांतही शिरली. वैविध्यपूर्ण दैवते हा भारतीय जनमानसाचा अविष्कार आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

गामाजी,

सोत्रि
Sun, 02/01/2026 - 20:54 नवीन
गामाजी,
गौतमबुद्ध स्वत: वेदांविषयी आदर बाळगून आहे.
हे जरा डिटेलमधे एक्सप्लेन कराल का?
बुद्धाने स्वत:हून कसल्याही तत्त्वज्ञानाचा प्रचार वा प्रसार केला नाही. बौद्ध हा वेगळा धर्म न मानता पारंपरिक भारतीय पंथ मानला पाहिजे
बुद्धाने वयाच्या ३५ -८० वर्षांपर्यंत त्याच्या शिकवणीचा त्याच्या प्रवचनांमधून (discourses) तो जिथे जिथे गेला तिथे तिथे प्रसार केला. त्याच प्रवचनांचं डॅाक्युमेंटेशन पुढे त्रिपीटकात केलं गेलं, त्याचा पश्चात. बुद्धाने कोणताही धर्म स्थापन केला नाही, धर्म (धम्म) ह्या शब्दाची योग्य व्याख्या त्याने विषद केली त्याच्या शिकवणूकीतून (प्रवचनांमधून), तसेच कोणताही पंथही त्याने स्थापन केली नाही. त्याच्या ध्यानप्रणालीची अनुपासना करणाऱ्या साधकांच्या समूहाला संघ म्हणतात पण त्यात कसलंही कर्मकांड नसल्याने, गुरू आणि गादी (उत्तराधिकारी) नसल्याने, कोणत्याही विशिष्ट जाती, धर्म किंवा विचारसरणीच्या लोकांसाठी मर्यादित नसल्याने तो पंथ नाही. - (अभ्यासू) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

तुम्ही स्वत:च उत्तर दिलंय की ....

गामा पैलवान
Mon, 02/02/2026 - 02:43 नवीन
सोत्रि,
हे जरा डिटेलमधे एक्सप्लेन कराल का?
माझी माहिती मर्यादित आहे. पण तेव्हढ्यावर निष्कर्ष काढता येतो. जर बुद्ध वेदांविषयी आदर बाळगून नसेल तर तसं स्पष्ट म्हंटलं असतं त्यानं. बाकी माझं ढोबळ विधान स्पष्ट करावयास गुग्गुळाचार्य आहेतंच : https://www.google.com/search?q=buddha+respected+vedas खरंतर तुम्हालाच याविषयी सखोल जाण आहे. बौद्ध हा पंथ नसेल तर महायान, हीनयान वगैरे काय म्हणावेत? संप्रदाय म्हणावेत का? माझी माहिती अत्यंत मर्यादित असल्याने मला हा प्रश्न पडला आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

गामाजी,

सोत्रि
Mon, 02/02/2026 - 14:02 नवीन
गामाजी, ते ढोबळ विधान आहे असे म्हणता आहात तर ते तिथेच सोडून देवूयात. महायान, थेरवाद (हीनयान), वज्रयान, नवयान हे सगळे संप्रदाय म्हणता येतील कारण गटांची स्वतःची वेगळी तत्वज्ञानात्मक मांडणी आहे जरी मूळ आधारस्तंभ 'बुद्ध, धम्म आणि संघ' हेच आहेत. - (अभ्यासू) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

ज्याला वेदांत समजले तो कधीच

सोत्रि
Mon, 02/02/2026 - 14:46 नवीन
ज्याला वेदांत समजले तो कधीच म्हणणार नाही की बुद्धांनी वेदांना नाकारले.बुद्धांनी वेदांभोवती पसरलेल्या अहंकारला नाकारले आहे.
काय आहे वेदांत जो समजावतो की बुद्धांनी वेदांना नाकारले नाही? - (जिज्ञासू) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

सुत्त निपत ८४६-

Bhakti
Mon, 02/02/2026 - 16:48 नवीन
सुत्त निपत ८४६- ना वेदगु दिठथिया ना मुतिया सा मनामेति नही तन्मयोसो…. जो वेद जाणतो त्याला खोटा अहंकार येत नाही. तो ऐकीव गोष्टी आणि भ्रमांचा परिणाम करत नाही.
वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण जो जाणतो तो अशा अहंकारात कधीच फसणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

भक्ती,

सोत्रि
Mon, 02/02/2026 - 18:37 नवीन
भक्ती, वेदगु शब्दात वेद आलेलं असलं तरी त्यात अभिप्रेत असलेला अर्थ ४ वेदांचा वेद नाही. त्याची फोड आणि अर्थ पाली भाषेत आणि त्रिपिटकाच्या परिप्रेक्षात खालीलप्रमाणे: वेद म्हणजे सर्वोच्च ज्ञान अणि गु म्हणजे प्राप्त केलेला. बुद्धाला प्राप्त झालेलं ज्ञान ह्याचा बेस वेदना (संवेदना) आहे, सतीपट्ठाण सुत्तात ह्याचे सविस्तर विष्लेषण आहे. त्यानुसार वेदना पर करून सत्यापर्यंत पोहोचलेला म्हणजे वेदगु. वेद जाणणारा म्हणजे वेदगु हे शब्दसाधर्म्यामुळे झालेलं अशुद्ध भाषांतर आहे. मूळ प्रश्न होता, काय आहे वेदांत जो समजावतो की बुद्धांनी वेदांना नाकारले नाही? त्याचं उत्तर मिळालं नाही. तसेच नविन मुद्दा आला ह्या प्रतिसादात, वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण. हे दोन्ही एकच आहे का? आणि त्या दोन्हीच्या परिप्रेक्षात अहंकार म्हणजे तुम्हाला नेमकं काय अभिप्रेत आहे? - (जिज्ञासू) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

मग ते इतर संदर्भ वेदांचेच

कॉमी
Mon, 02/02/2026 - 19:06 नवीन
मग ते इतर संदर्भ वेदांचेच होते हे तरी कसे समजले ? तीन वेद जाणणारा हा हे इतर तीन विद्या जाणणारा नसेल कशावरून ? त्रिपिटक जर तीन आहेत तर इतर विद्या सुद्धा तीन शाखांमध्ये विभागलेल्या असू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

माघार

कॉमी
Mon, 02/02/2026 - 19:07 नवीन
दुर्लक्ष करा. ब्रम्हदेव वैगेरे असेल तर हेच ते वेद असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

ठीक आहे. मला जे अभिप्रेत आहॆ

Bhakti
Mon, 02/02/2026 - 19:27 नवीन
ठीक आहे. मला जे अभिप्रेत आहॆ ते मी नीट शब्दांमध्ये मांडता येत नाहीये.जेव्हा जमेल तेव्हा सांगते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

बुध्दाने वेदाचे अधिपत्य

कॉमी
Sun, 02/01/2026 - 09:44 नवीन
बुध्दाने वेदाचे अधिपत्य नाकारले. बुद्धकाळात किंवा सर्वात जुन्या पाली लिखित साहित्यात वेदांचा उल्लेख आहे का ? बुद्ध वेदांबद्ल स्पष्टपणे बोलताना कुठेही आहे का ?
  • Log in or register to post comments

पाली त्रिपिटकामध्ये (सर्वात

सोत्रि
Sun, 02/01/2026 - 21:20 नवीन
पाली त्रिपिटकामध्ये (सर्वात जुने बौद्ध साहित्य) वेदांचा आणि तत्कालीन वैदिक परंपरेचा अत्यंत स्पष्ट आणि सविस्तर उल्लेख आढळतो. बुद्ध केवळ वेदांबद्दल बोललेच नाहीत, तर त्यांनी त्या काळातील वैदिक कर्मकांडांची आणि तत्त्वज्ञानाची तर्कशुद्ध चिकित्साही केली आहे. पाली साहित्यात वेदांना 'तेविज्ज' (त्रिवेद) असे म्हटले आहे. बुद्धांच्या काळात प्रामुख्याने तीनच वेद प्रचलित होते: ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद. (अथर्ववेदाला नंतरच्या काळात वेदाचा दर्जा मिळाला). अनेक सुत्तांमध्ये बुद्धाने वेदांवर आणि त्यांच्या अधिकारावर भाष्य केले आहे. त्यापैकी काही प्रमुख संदर्भ: तेविज्ज सुत्त (दीघ निकाय): हे सर्वात महत्त्वाचे सुत्त आहे. यात दोन ब्राह्मण बुद्धांकडे येऊन विचारतात की, "कोणता वेद मार्ग खरा आहे?" बुद्ध त्यांना विचारतो की, "ज्या वेदांचे तुम्ही पठण करता, त्या मंत्रांच्या ऋषींनी कधी ब्रह्मदेवाला प्रत्यक्ष पाहिले होते का?" जेव्हा उत्तर 'नाही' येते, तेव्हा बुद्ध सांगतात की, ज्यांनी स्वतः पाहिलेले नाही अशांच्या परंपरेचे आंधळेपणाने पालन करणे म्हणजे "आंधळ्यांच्या रांगेसारखे" (अंधवेणु) आहे, जिथे पुढच्याला दिसत नाही आणि मागच्यालाही नाही. अस्सलायन सुत्त (मज्झिम निकाय): यामध्ये बुद्ध वेदांवर आधारित 'चातुर्वर्ण्य' व्यवस्थेला आव्हान देतो. तो म्हणतो की, निसर्गात सर्व माणसे समान आहेत आणि श्रेष्ठत्व हे जन्मावरून (किंवा वेदांच्या ज्ञानावरून) नसून ते कर्मावरून ठरते. सुत्त निपात (ब्राह्मणधम्म सुत्त): यात बुद्ध सांगतो की, प्राचीन ऋषी हे चारित्र्यसंपन्न होते, पण नंतरच्या काळात वेदांच्या नावाखाली प्राण्यांचे बळी देणे आणि कर्मकांड करणे सुरू झाले, जे चुकीचे आहे. - (अभ्यासू) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

धन्यवाद.

कॉमी
Sun, 02/01/2026 - 23:03 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

लेख खूपच संक्षिप्त वाटला,

प्रचेतस
Sun, 02/01/2026 - 09:57 नवीन
लेख खूपच संक्षिप्त वाटला, नव्हे आहेही. बौद्ध मूर्तीशास्त्र म्हटलं की जरा अधिक उपापोह हवा होता. मूर्ती ओळखण्याची प्रमुख साधने म्हणजे मुद्रा, लांच्छन, वृक्ष. ह्यांचे अधिक वर्णन फोटोसहित हवे होते. गौतम बुद्ध म्हणजे शाक्यमुनी, भविष्यातील बुद्ध मैत्रेय ह्यांचा उल्लेख कुठे दिसला नाही. हे सर्व मानुषी बुद्ध. त्यांच्या आधीचे विपश्यी, शिखी, विश्वभू, क्रकुच्छन्द, कनकमुनी, काश्यप ह्यांचा उल्लेखही आवश्यक होता. परत बौद्ध मूर्तीकलेत गांधारकला अधिक सुप्रसिद्ध आहे. त्याचा आढावा घ्यायला हवा होता. बाकी वेरुळ येथे महायान आणि वज्रयान परंपरेतील अनोखी शिल्पे पाहायला मिळतात. जिज्ञासूंना मानुषी बौद्ध, ध्यानी बुद्ध, स्त्री बोधीसत्व, तारा, महामायुरी, पद्मपाणी, वज्रपाणी, जंभाल, हरिती, रक्तअवलोकितेश्वर, सुजाता, मैत्रेय अशी अनोखी शिल्पे पाहायची असतील तर जरुर तेथे जाऊन ती पाहावीत.
  • Log in or register to post comments

यावर एक यूट्यूबवर मालिकाच

कंजूस
Sun, 02/01/2026 - 20:18 नवीन
यावर एक यूट्यूबवर मालिकाच काढावी. म्हणजे व्हिडिओंची लिंक दिली की झाले काम. वेरुळच्या लेण्यांवरही मालिका असावी. एकदा सगळे फोटो जमा करायचे आणि ते जोडायचे स्लाईडशोमध्ये आणि त्याला मागून नंतर आवाज द्यायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अर्थात हे सर्व अभ्यासक्रमात

Bhakti
Mon, 02/02/2026 - 16:58 नवीन
अर्थात हे सर्व अभ्यासक्रमात सांगितले.पण उणेपुरे सात दिवस(साधारण ११ तास ) त्यात इतकेच आकलन झाले.बाकी बोधिसत्वचा काहीतरी विशिष्ट क्रम आहे ,जो मला नीट समाजाला नाही ...हे मी वरती लिहिलेच आहे.
रक्तअवलोकितेश्वर,
वेरुळंंमधील बौद्ध शिल्प त्याकाळात नैसर्गिक रंगाने रंगवले होते .अगदी बौद्ध पुस्तकांत सांगितल्याप्रमाणे!परंतु कालाच्या प्रवाहात ते रंग नाहीसे झालं.रंगीत शिल्प तेव्हा किती सुंदर दिसत असतील.गांधार ,मथुरा शैली अजून फरक थोडा थोडा समाजात आहे .शैव ,वैष्णव अभ्यासक्रमातही तशा मूर्तीशैली फरक सांगितला जायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

छान लेख. भर घालायची जवाबदारी आपली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 02/03/2026 - 11:35 नवीन
लेखन संक्षीप्त असलं तरी, लेखिकेने सुरुवातीलाच लिहिले होते की, 'चारो तरफ ज्ञान बट रहा है, जहाँ से मिले लपेट लो' आपल्याला जितके उमजले तितके लिहिणे ही चांगली गोष्ट आहे. आता उहापोह म्हटलं की जाणकारांनी लिहिले पाहिजे. जसे की, धाग्याच्या निमित्ताने सोत्रि यांनी अनुषांगिक अशी उत्तम माहिती भरली आहे. आपल्यासारखा जाणकारांनी अशा धाग्यात भर घातली पाहिजे. असे धागे समृद्ध होतात असे वाटते. बौद्ध धर्मातील हिनयान (थेरवाद) आणि महायान या दोन प्रमुख पंथांमध्ये तत्त्वज्ञानासोबतच मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मूलभूत आणि रंजक फरकआहेच. या फरकांचा उगम बुद्धत्वाकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनातून होतो. आणि मग तशी सविस्तर मांडणी केली पाहिजे असे वाटते. हीनयान यात बुद्ध एक मानवी महापुरुष आणि मार्गदर्शक मानले गेले. सुरुवातीच्या काळात बुद्धांना मानवी रूपात दाखवणे वर्ज्य होते. त्यांच्या उपस्थितीसाठी पदकमल, धम्मचक्र, बोधिवृक्ष किंवा रिकामे आसन वापरले जात होते. साधी आणि संयमित कला स्तूप वगैरे. महायान यात, बुद्धांना मानवी रूपात आणि भव्य स्वरूपात पूजले जाते. यामध्ये विविध मुद्रा (उदा. भूस्पर्श, अभय, ध्यान) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. महायानमध्ये अवलोकितेश्वर, मंजुश्री, तारा, वज्रपाणी अशा अनेक बोधिसत्वांच्या अलंकारिक आणि विविध आयुधे धारण केलेल्या मूर्ती आढळतात. अत्यंत सुशोभित, दागिने, मुकुट आणि भव्यता असलेली कला. बुद्धाच्या काळात मूर्ती शक्य नव्हते तर पहिली मूर्ती केव्हा आली त्याबद्दल असे म्हटल्या जाते की, बुद्धाची पहिली मानवी मूर्ती ग्रीक-बौद्ध कलाशैलीतून निर्माण झाली. जेव्हा ग्रीक लोक भारताच्या संपर्कात आले, तेव्हा त्यांच्याकडे त्यांच्या देवांना मानवी रूपात कोरण्याची जुनी परंपरा होती. ग्रीक मूर्तिकारांनी बुद्धाला मानवी शरीर दिले, ज्याला त्यांनी 'अपोलियन बुद्ध ' असे म्हटले. अल्फ्रेड फुशे यांची ही कल्पना आहे, अर्थात ही सर्व गांधार शैली. उदा. केस भारतीय परंपरेत बुद्धाचे केस मुंडण केलेले किंवा कुरळे दाखवले जातात, पण अपोलोनियन बुद्धामध्ये ते ग्रीक शैलीतील लाटांसारखे आणि वरच्या बाजूला बांधलेले असतात. चेहरा अत्यंत रेखीव, सरळ तीक्ष्ण नाक आणि अंडाकृती चेहरा असतो, जो हुबेहूब ग्रीक शिल्पांसारखा दिसतो. बुद्धाने परिधान केलेले 'चीवर' (वस्त्र) हे साध्या कापडासारखे नसून ग्रीक 'टोगा' जाड असे असते. असे असले तरी, बुद्धाची मूर्ती ही गांधार शैलीची 'मथुरा शैली' ची यावर अभ्यासकात वाद आहेत. खालील संदर्भ पुस्तके जाणकारांनी वाचून सविस्तर लिहावे असे वाटले. संदर्भ ः १. अल्फ्रेड फूशेचं 'आर्ट ग्रेको-बौद्धिक दु गांधार' फ्रेंचभाषेतील पुस्तक भाषेत असलं तरी, गांधार कलेतील मूर्तीशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी यातील चित्रे आणि विश्लेषण जागतिक स्तरावर प्रमाण मानले जाते. २, 'बुद्धाची पहिली मानवी मूर्ती' आणि ती तयार होण्यामागची प्रक्रिया यावर सविस्तर निबंध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

+१

Bhakti
Tue, 02/03/2026 - 12:13 नवीन
+१ आणि हो बरोबर+११११
जसे की, धाग्याच्या निमित्ताने सोत्रि यांनी अनुषांगिक अशी उत्तम माहिती भरली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीपूर्ण लेख

श्वेता२४
Mon, 02/02/2026 - 11:10 नवीन
माझ्यासाठी ही सर्वच माहिती नवीन आहे.
  • Log in or register to post comments

एकतर विषय एकदम फालतू...

टर्मीनेटर
Mon, 02/02/2026 - 18:54 नवीन
एकतर विषय एकदम फालतू... म्हणजे काही ठराविक लोकांसाठी रसाचा असू शकेल... त्यात ज्यांना ह्या फालतू विषयात रस असेल त्यांच्या प्रश्नांना नेमके उत्तर देता येत नसेल तर काय उपयोग आहे असल्या फालतू विषयांचा?
अर्थात हे सर्व अभ्यासक्रमात सांगितले.पण उणेपुरे सात दिवस(साधारण ११ तास ) त्यात इतकेच आकलन झाले.
हे उत्तर समाधानकारक ठरेल का? तुमच्या लिखाणाला कमी किंवा निरर्थक ठरवायचा कोणताही हेतू नाही, पण मिपावर खूप व्यासंगी लोकं आहेत, उगाच तुम्हाला उस्फूर्त लेखन करता म्हणुन हरभऱ्याच्या झाडावर चढवणाऱ्या लोकांच्या नादी लागून असले लेखन इथे करू नका असे सांगावेसे वाटत आहे!
  • Log in or register to post comments

:( :(

Bhakti
Mon, 02/02/2026 - 19:39 नवीन
:( :(
प्रश्नांना नेमके उत्तर देता येत नसेल तर काय उपयोग
हॆ मान्यच करते.विचार करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

परफेक्ट

अभ्या..
Mon, 02/02/2026 - 19:41 नवीन
परफेक्ट..... Image removed. .
मिपावर खूप व्यासंगी लोकं आहेत, उगाच तुम्हाला उस्फूर्त लेखन करता म्हणुन हरभऱ्याच्या झाडावर चढवणाऱ्या लोकांच्या नादी लागून असले लेखन इथे करू नका असे सांगावेसे वाटत आहे!
अनुभव काय? ........ ;) बाहुबलीला लै अनुभव आहे त्याला विचारयला पाहिजे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

ह्म्म्म

सोत्रि
Mon, 02/02/2026 - 19:47 नवीन
असले लेखन इथे करू नका असे सांगावेसे वाटत आहे!
टर्मीनेटर, लेखाच्या विस्कळीत मांडणीबद्दल तुमच्याशी १००% सहमत आहे. त्याबद्दल दुमत नाही. (गीतारहस्य ह्या मालिकेतही विस्कळीत मांडणीमुळे चांगला विषय वाया गेला होता हे माझं वैयक्तिक मत आहे.) पण त्यामुळे एकदम लेखन करू नका असं सुचवणं, तेही विषय फालतू आहे असे एकदम जजमेंटल होऊन, ये बात कुछ हजम नही हुइ! - (जजमेंटल नसलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

+१

कॉमी
Mon, 02/02/2026 - 19:50 नवीन
सहमत. अगदी नाउमेद न करता तितक्याच ठामपणे हेच म्हणणे मांडणे शक्य होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

पण त्यामुळे एकदम लेखन करू नका

टर्मीनेटर
Tue, 02/03/2026 - 00:26 नवीन
पण त्यामुळे एकदम लेखन करू नका असं सुचवणं, तेही विषय फालतू आहे असे एकदम जजमेंटल होऊन, ये बात कुछ हजम नही हुइ!
सोकाजीनाना... आपला मिपा परिवार खूप मोठा आहे आणि त्यात आपली काही हक्काची माणसे आहेत. भक्ती ताई त्या हक्काच्या माणसांपैकीच आहेत. माझा प्रतिसाद थोडा (थोडा काय जास्तच) रुड वगैरे वाटला असेल, पण फार काही स्पष्टीकरण न देता एवढेच सांगतो "समझने वाले समझ गये हैं, ना समझे... ना समझे वो 'खिलाडी' हैं" 😀
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

अद्वैत = निर्वाण ?

गामा पैलवान
Mon, 02/02/2026 - 21:19 नवीन
सोत्रि,
वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण. हे दोन्ही एकच आहे का?
प्रश्न अतिशय रोचक आहे. निर्वाणाची अद्वैतासोबत तुलना होऊ शकते का असाही एक उपप्रश्न पडतो. शिवाय पुनर्जन्माचाही प्रश्न आहेच. अद्वैत साधेपर्यंत आत्मा पुनर्जन्म घेत राहतो ( वा मायेमुळे घ्यावा लागतो ). तर मग निर्वाण साधेपर्यंत पुनर्जन्म कोण घेतं? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

आता याच विषयावर एक संशोधन

Bhakti
Mon, 02/02/2026 - 21:59 नवीन
आता याच विषयावर एक संशोधन पेपर वाचतेय, पण मी अजिबात यात काय लिहिलंय ते सांगणार नाही... कारण मी अभ्यासक नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

मी नाही त्यातला.

कंजूस
Mon, 02/02/2026 - 21:41 नवीन
मी नाही त्यातला. लेख आवडला म्हणतो. नवअभ्यासकांना नवीन विषयात प्रश्न पडतात. त्यांना हुरुप येतो. त्याची उत्तरे देण्याचा कुणी प्रयत्न करतो. मलाही बुद्ध समजला नाही आणि गीताही नाही. पुस्तके वाचतो. त्यात कुणी काय लिहिले ते सांगतो. दोन्ही विषय गहन आहेत. पण श्रद्धा अती थोर आहे. त्यावर जग चालते. ख्रिश्चन लोक ( फादर) तुकारामाच्या साहित्याचा अभ्यास करतात. कारण तुकाराम अतिशय सोप्या भाषेत लोकांना मर्म सांगतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले.... पंडीत लोक फुटपट्टी घेऊन जातात अनुनयी श्रद्धा.
  • Log in or register to post comments

हो ना कंकाका,

Bhakti
Mon, 02/02/2026 - 21:57 नवीन
हो ना कंकाका, माझा हेतू कायमच स्वछ असतो.मिपावर लेख द्यायला आवडयचं, फार " व्यासंगी " लोकांचे मत समजतात. पण पूर्ण अभ्यासू असल्याशिवाय लेख कशाला इथे द्यायचे.?? मी जर अभ्यासक असते तर कशाला लेख लिहिले असते?? "पुस्तकच लिहिले नसते का??" पण एकंदरीत अभ्यासक नसल्यास इथे लिहू नये, हा मोठा धडा आज इथे मिळाला. आपलं चेपूच बरं, नॉन अभ्यासाकांना! उरलो आता वाचनापुरते!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

लिवा बिनधास्त

गामा पैलवान
Mon, 02/02/2026 - 23:57 नवीन
भक्ती, पांघरा गेंड्याची कातडी आणि लिहा हो बेधडक. एक ठेच लागली तर वाचनमात्र होताय! काय म्हणावं तुम्हांस. उघडं पडायची वेळ आली तेव्हा मी कसा बघा ढोबळमानाने मोघम मार्ग पत्करला. मध्यममार्ग म्हणतात तो हाच तर नव्हे? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

एक ठेच लागली तर वाचनमात्र

टर्मीनेटर
Tue, 02/03/2026 - 00:32 नवीन
एक ठेच लागली तर वाचनमात्र होताय!
अरे वाचनमात्र होंगे उनके दुश्मन... गा पै... जास्ती लोड नका घेऊ 😀
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

कालच्या प्रतिसादात एक वाक्य

कंजूस
Tue, 02/03/2026 - 04:22 नवीन
कालच्या प्रतिसादात एक वाक्य मी लिहिलं होतं पण ते नंतर गाळलं होतं. आणि तसंच झालं. यापुढे " Bhakti लेखन करणार नाही." आणि तेच तिने लिहिलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

थंडी सरून गर्मी वाढत आहे.

कंजूस
Mon, 02/02/2026 - 21:42 नवीन
थंडी सरून गर्मी वाढत आहे. या सर्वांवर उतारा.. एक आइस्क्रीमची पाककृती देऊन टाका.
  • Log in or register to post comments

लिहीत राहा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 02/03/2026 - 08:25 नवीन
लेखन करीत राहा. लोक टीका करीत राहतात. लेखनात यंव नाही, लेखनात त्यंव नाही, हे असं सगळं चालायचंचं. आपल्याला वाटतं लिहायचं तरी नक्की लिहा. कोणताही प्रस्थापित अभ्यासक-लेखक हा पहिल्यांदा नवलेखकच असतो, तेव्हा आपण नवलेखक आहोत असे समजून लिहीत राहावे. शुभेच्छा. -दिलीप बिरुटे.
  • Log in or register to post comments

त्या 'स्ट्रॉंग वुमन' आहेत. आणि

टर्मीनेटर
Tue, 02/03/2026 - 10:17 नवीन
भक्तीताई टिकेला घाबरून पळ काढणाऱ्यांतल्या नाहीत हो सर, त्या 'स्ट्रॉंग वुमन' आहेत. आणि 'त्या' प्रतिसादाचा रोख नक्की कशाकडे आहे हे समजण्या एवढ्या 'स्मार्ट' देखील आहेत. त्यामुळे चिंता नसावी, त्या लिहित्या रहातील ह्याची खात्री बाळगा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चुक्याच

अभ्या..
Tue, 02/03/2026 - 19:18 नवीन
तुमचे पर्सनल व्हॅल्युएशन तुमच्यापाशी, इथे मिपावर लिहू नका असे सुचवणेच चुकीचे आहे. लेखकाने कीती स्मार्ट आणि स्ट्राँग राहायचे ते लेखकाने स्वतः ठरवायचे, कुणी लिहू नका म्हणले तर त्यातून काय अर्थ निघतो हे बघण्याआधी "तू कोण सांगणार?" हे विचारावे अशीच माझीतर अपेक्षा आहे. अर्थात कित्येक पटाईत लेखकांनी काहीही लिहिण्यापेक्क्षा काही लिहूच नये अशी सर्वसामान्य अपेक्षा असताना तिकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष्य करुन भक्तीताईसारख्या मिपाधर्म सांभाळणार्‍या अस्सल मिपाकर लेखिकेला इथे लिहू नको असे सांगणे खरेच दुर्दैवी आहे. टर्मीभाऊंची मनातली सच्छील इच्छा समजत असली आणि त्यांचा प्रांजळ स्वभाव कळत असला तरी......... टर्मीनेटर तुम्हारा इधर चुक्याच....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

टीका केल्याने / झाल्याने बरेच

कंजूस
Tue, 02/03/2026 - 10:38 नवीन
टीका केल्याने / झाल्याने बरेच नवलेखक येथून पळाले आहेत. आपलं लेखन डायरीत लिहून ठेवलं तर कुणीच वाचणार नाहीये, त्यापेक्षा इकडे चार राडपाण्याचे शिंतोडे उडवून घेतल्याने बरे वाटते .[ दाग अच्छे हैं. किंवा कार्यक्रम पाहा साडे माडे शिंतोडे.]
  • Log in or register to post comments

आपलं लेखन डायरीत लिहून ठेवलं

Bhakti
Tue, 02/03/2026 - 11:50 नवीन
आपलं लेखन डायरीत लिहून ठेवलं तर कुणीच वाचणार नाहीये, त्यापेक्षा इकडे चार राडपाण्याचे शिंतोडे उडवून घेतल्याने बरे वाटते .[ दाग अच्छे हैं. किंवा कार्यक्रम पाहा साडे माडे शिंतोडे.]
एकदम बरोब्बर काका, हाच सरळ स्वच्छ हेतू असतो सोशल मीडियावर लिहिताना. पण दरवेळी आपल्यालाच आत्मपरीक्षण करायची वेळ येत असेल तर... जरा थांबलंच पाहिजे,बदलायला पाहिजे हॆ जाणवत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

वर सगळ्यांनी सांगितलेच आहे

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 02/03/2026 - 12:27 नवीन
तरी पुन्हा सांगतो. मिपावर(किवा कुठल्याही सोमिवर) व्यक्त होण्याआधी "फाट्यावर मारणे" हा मुख्य गुण अंगी बाणवुन घ्यावा लागतो. ज्ञानोबांनी सांगितलेच आहे " जे की राजहंसाचे चालणे........" पूर्ण ओवी आठवत नाही पण म्हणुन कावळ्याने चालुच नये की काय? असे काहीसे.
  • Log in or register to post comments

राजहंसाचे चालणे, जगी जालिया

भागो
Tue, 02/03/2026 - 13:11 नवीन
राजहंसाचे चालणे, जगी जालिया शहाणे, म्हणोनि काय कवणे, चालोचि नये ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

अरेच्या

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 02/03/2026 - 12:27 नवीन
लेख आवडला हे सांगायचे राहीलेच. आणि जाणकारांच्या प्रतिक्रियांवर लक्ष ठेवुन आहे.
  • Log in or register to post comments

लिहिते रहा

गोरगावलेकर
Tue, 02/03/2026 - 13:24 नवीन
भक्ती ताई, मिपावर सल्ला देण्या इतका माझा अभ्यास नाही . तरीही सांगते, निराश होऊ नका. टर्मीनेटर यांनी पूर्वी कोणाच्या तरी काश्मीर भटकंतीबद्दल असाच एक संक्षिप्त प्रतिसाद दिला होता तो बऱ्याच जणांना रुचला नव्हता. पण नंतर त्यांनी त्यामागचा हेतू स्पष्ट केला तेव्हा तो बहुतेकांना आणि मुख्य म्हणजे ज्याला उद्देशून लिहिला होता त्यालाही पटला. असाच एक प्रतिसाद माझ्या लेखातील फोटोंबद्दलही होता. नंतर माझ्या पुढील लेखात सुधारणा झाल्याबद्दल त्यांनी कौतुकही केले. तेव्हा त्यांच्या स्पष्ट बोलण्यात निश्चितच काही चांगला हेतू असेल. लिहिते रहा.
  • Log in or register to post comments

लिहीत रहा पण रँडम असंख्य

गवि
Tue, 02/03/2026 - 13:37 नवीन
लिहीत रहा पण रँडम असंख्य विषयांवर वरवर लिहिण्याऐवजी आपल्याला आतून प्रचंड उर्मी येईल तेव्हा जे काही मनातून येईल ते लिहा. ते नेहमीच चांगलं असेल. लोकांना ते आवडेल आणि एखाद दुसऱ्याला नाही आवडलं तरी ते पटलं नाही या स्वरूपात असेल. जर आत्मपरीक्षण करण्याची गरज जाणवली असेल तर ते मोठं यश आहे. तुटक किंवा कडवट होऊन आता लेखनच थांबवते असं म्हणण्यात अर्थ नाही. याची कारणे दोन: १. मनातून ते पटत नसतं. नुसतं म्हणायला म्हटलेलं असतं. २. खरंच लिहिणं बंद केलं तर जगाला काही फारसा फरक पडत नसतो. आपण विस्मरणात विलीन होऊन जातो. तर लिहिण्याची गरज आपल्याला आहे हे मान्य करून "आता थांबले पाहिजे" वगैरे असे कोणतेही जाहीरनामे करणे आवश्यक नाही. लोकांसाठी आपण लिहीतो. पूर्ण स्वांत सुखाय लिहिणे हा भ्रम आहे. लोकांपुढे आपण ठेवतो तेच मुळात त्यांना आवडेल अशा अपेक्षेने. त्यांना त्यातून आनंद मिळाला पाहिजे. जशी रेसिपी तसंच हे. मग ते चेक न करता, अशुद्ध (भाषा अशुद्ध नव्हे, लेखन टंकन), शब्दांची आगगाडी, सुरुवात कुठून झाली आणि शेवट कुठे होतोय त्याचे भान टाळून असे लिहीले तर लोकांना ते वाचताना आनंद कसा मिळेल ! ? अर्थ, भावार्थ हे पुढचे पुढे राहिले. तेव्हा लिहिणे थांबवू नका. विचार करा. आणि अभ्यासोनि प्रकटा. प्रचू, लिहित बरोबर की लिहीत?
  • Log in or register to post comments

'लिहीत' बरोबर.

प्रचेतस
Tue, 02/03/2026 - 14:47 नवीन
'लिहीत' बरोबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

लिहिणे थांबवण्याचे काहीच कारण

प्रचेतस
Tue, 02/03/2026 - 14:46 नवीन
लिहिणे थांबवण्याचे काहीच कारण नाही, उलट आपण वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करता, त्यावर लिहिण्याचा प्रयत्न करता हे कौतुकास्पदच आहे. मुळात असे विषय जरा अवघड. मूर्तीशास्त्र किंवा तत्त्वज्ञान अशा विषयांवर लिहिणे सोपे नव्हेच. एकवेळ हिंदू मूर्तीशास्त्र तुलनेने सोपे आहे, लक्षणे स्पष्ट असतात, तत्त्वज्ञान समजणेही बऱ्याच साधनांमुळे काहीसे साध्य होते मात्र बुद्ध किंवा जैन तत्त्वज्ञाने अथवा मूर्तीतील फरक समजणे सोपे नाही, अतिशय कमी किंवा अस्पष्ट लक्षणे असतात, साधनेही अत्यंत मर्यादित असतात. लिहिताना काही गडबड होणे किंवा सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देता न येणे हे साहजिक आहे पण म्हणून अभ्यास सोडायचा नाही किंवा लिहिणेही सोडायचे नाही. उलट प्रतिसादांतून अधिकाधिक माहिती मिळत जाते हा फायदाच.
  • Log in or register to post comments

सर्वात उत्तम म्हणजे निरीक्षणं

कंजूस
Tue, 02/03/2026 - 14:56 नवीन
सर्वात उत्तम म्हणजे निरीक्षणं नोंदवणे किंवा फोटो देणे. मग अभ्यासक त्यामागचे रहस्य सांगत जातात. माझ्याकडे बुद्धाच्या भारतातील लेणी लेख इमारती स्तूप किंवा संबंधित गोष्टींवर पर्यटन माहिती आहे ती मी इथे एका वेगळ्या लेखात देईन म्हणतो. माहिती मला विविध प्रदर्शनातील पत्रकांतून मिळाली आहे. काॅपिराईटचा प्रश्न नाहीये. फक्त अडचण काय की काही माहिती पत्रके फार मोठ्या साईजची आहेत. त्यांचा एक मोठा फोटो काढून पाहतो. कुणाला उत्साह आणि आवड असल्यास उपयोगी पडेल.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा