✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सेव्हन इयर्स इन तिबेट-seven years in Tibet

B
Bhakti यांनी
गुरुवार, 01/08/2026 - 15:42  ·  लेख
लेख
पुस्तक प्रदर्शनाला गेलो होतो तेव्हा लेक एका कोकरासारखे स्वछंद बागडत होती. तेवढ्यात ती एक पुस्तक घेऊन आली ,"हे पुस्तक मला पाहिजे आहे ". पुस्तकाचे पूर्ण नाव आठवत नाही पण 'माओ झेडाँग' या चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा संस्थापक यांच्या आयुष्यावरचे ते पुस्तक होते. "तुला माहितेय का,कि हा कोण आहे?"मी विचारले ."चीनचा कम्युनिस्ट माओ "मला माहिती आहे ती म्हणाली. आज तू नळीची कृपा म्हणावी कि काय तिला पहिले महायुद्ध ,दुसरे महायुद्ध ,हिटलर ,रशिया ,चीन,जपान ,अमेरिका यांची बरीच माहिती आहे . त्यातलाच एक हा 'माओ' याबद्दल तिला माहिती आहे. मला तर अजूनही कोणते युद्ध ,कोणामध्ये झाले हे समाजत नाही .तिला म्हटलं "हे पुस्तका वाचायला तू अजून लहान आहेस .आपण हे पुस्तक नंतर घेऊ." तेव्हा आठवला 'तिबेट' ! 1 तिबेट-दलाई लामा यांच्या आयुष्यावरची मागच्या वर्षी पाहिलेली डोक्यमेंटरी,आता नाव आठवत नाही . पण चीनच्या अत्याचारांनी शेकडो बौद्ध,monk मारले गेले ,विस्थापित झाले .तिथली प्राथर्ना स्थळे नष्ट झाली.त्या डॉक्युमेंटरीची पहिल्यांदाच दलाई लामा-बौद्ध धर्मगुरू निवडण्याचीही पद्धत ,चीनचे अतिक्रमण,तेथील लोकांचा विरोध मला समजला होते . त्या याआधी हिमालयाच्या कुशीत वसलेले टूमुकदार शांत ठिकाण म्हणजे तिबेट अशी मनात प्रतिमा होती.डॉक्युमेंटरीचे काही क्षण आजही लक्षात आहेत. १९३७ साली, तिबेटमध्ये एका गावात दोन वर्षांचा मुलगा दलाई लामांचा १४वा अवतार म्हणून ओळखला जातो.त्याला ते कुंडून म्हणायचे "कुंडून" म्हणजे तिबेटी भाषेत "द प्रेझेन्स" – म्हणजे बुद्धाची उपस्थिती!तो फक्त दोन वर्षांचा असतानाच, तिबेटी परंपरेनुसार त्याला १३व्या दलाई लामांचा पुनर्जन्म (अवतार) म्हणून ओळखले गेले. अनेक चाचण्या घेऊन (जसे की पूर्वीच्या दलाई लामांच्या वस्तू ओळखणे) त्याची निवड झाली. चार वर्षांचा असतानाच त्याला ल्हासाला नेले आणि टेंझिन ग्यात्सो हे नाव दिले. तिथे त्याला कठोर आध्यात्मिक आणि राजकीय शिक्षण दिले गेले.– बौद्ध धर्म, राज्यकारभार आणि जगाची रहस्ये! तो हळूहळू मोठा होतो, आणि तिबेटची संस्कृती, रंगीबेरंगी उत्सव, मंत्र आणि नृत्य यात बुडतो. पण शांतता जास्त काळ टिकत नाही... दुसऱ्या महायुद्धानंतर चीनची कम्युनिस्ट फौज तिबेटवर हल्ला करते. १४ वर्षांचा दलाई लामा राजकीय संकटात सापडतो. तो माओ झेडाँगला भेटतो (ते प्रसिद्ध वाक्य – माओ म्हणतो, "धर्म हा अफू आहे!"), पण चीनची दडपशाही वाढते. पण १९५९ साली ल्हासामध्ये मोठा उठाव झाला. जीव वाचवण्यासाठी त्यांना रातोरात हिमालय ओलांडून भारतात निर्वासित होणे भाग पडले. लाखो तिबेटी अनुयायांसह ते धरमशाला (हिमाचल प्रदेश) येथे स्थायिक झाले. तिथून त्यांनी तिबेटी निर्वासित सरकार चालवले. तर दोन आठवड्यांपूर्वी शोधतांना मला सेव्हन इयर्स इन तिबेट-#sevenyearsintibet हा सिनेमा(1997) दिसला. सिनेमाचे नाव तिबेट आणि हिरो ब्रॅड पीट ! 2 डोळेच चमकले आणि सिनेमा लेकींच्यासोबत पाहायचा ठरवलं.खर तर सिनेमातील कलाकार अभिनय करत आहेत की नाही ,इतका रॉ पण हळूहळू यातली खोली ,भावनांची आंदोलन मनाला स्पशून जाऊ लागली. हा सिनेमा खऱ्या घटनांवर आधारित आहे, त्याची मूळ कथा हाइन्रिख हारर यांच्या "Seven Years in Tibet" या पुस्तकात आहे! हे पुस्तक १९५२ साली जर्मनमध्ये ("Sieben Jahre in Tibet") प्रकाशित झाले. 3 हा सिनेमा तयार करण्याची कहाणीही खूप रोचक आहे . हा सिनेमा तिबेटच्या रहस्यमयी जगात घेऊन जातो, पण प्रत्यक्षात तिबेटमध्ये फारसे शूटिंग झाले नाही! कारण चीनने तिबेटवर कब्जा केला आहे आणि हा सिनेमा तिबेटच्या बाजूने असल्याने चीनला आवडला नाही. त्यामुळे दिग्दर्शक जीन-जॅक अन्नॉदना खूप अडचणी आल्या.त्यामुळे सिनेमातील हिमालय आणि तिबेटचे दृश्ये बहुतेक अर्जेंटिनाच्या अँडीज पर्वतरांगांमध्ये शूट झाले!सुरुवातीला भारतात (लडाख) शूटिंग प्लॅन होते, पण चीनच्या दबावामुळे भारत सरकारने परवानगी नाकारली – वीज कापण्याची धमकी दिली! मग सगळे अर्जेंटिनाला शिफ्ट झाले.हिमालयातील क्लायंबिंग सीन आणि बर्फाळ भाग कॅनडात शूट झाले. फक्त गुप्तपणे २० मिनिटांचे फुटेज! दिग्दर्शकाने दोन टीम्स पाठवल्या, ज्यांनी माउंट कैलाश आणि पोटाला पॅलेस जवळ शूट केले. हे रहस्य १९९९ पर्यंत लपलेले होते!दलाई लामांच्या खऱ्या बहिणी जेटसुन पेमाने त्यांच्या आईची भूमिका केली! आणि खरे तिबेटी निर्वासित monk सेटवर होते, ज्यामुळे वातावरण खरे वाटले.सिनेमामुळे ब्रॅड पिट, डेव्हिड थेव्लिस आणि दिग्दर्शकांना चीनात प्रवेश बंदी होती ! (आता कदाचित नसावी .)८ वर्षांचे दलाई लामा यांची भूमिका सोनम वांगचुक यांनी केले मला वाटलं हे लद्दाख मधलेच सोनम पण हे सोनम वांगचुक यांच्यापेक्षा वेगळे कोणीतरी व्यक्ती आहेत हे शोधल्यावर समजले :)या हॉलिवूड सिनेम्यात एक प्रमुख भारतीय कलाकार होता – डॅनी डेन्झोंगपा! ते तिबेटचे रेजेंट (रिगेंट) म्हणजे तत्कालीन प्रशासकीय प्रमुखाची भूमिका साकारतात. डॅनी सिक्कीममधील आहेत तर आता या सिनेमाची गोष्ट सांगते , 4 हा चित्रपट ऑस्ट्रियन गिर्यारोहक हाइन्रिख हारर (ब्रॅड पिट) च्या जीवनावर आधारित आहे. १९३९ साली, दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला, हाइन्रिख आपली गरोदर पत्नी सोडून हिमालयात नंगा पर्वत डोंगर सर करण्यासाठी निघतो. तो स्वार्थी आणि महत्वाकांक्षी आहे .फक्त नाव कमवायचं! पण नियतीच्या खेळात, त्याला ब्रिटिशांनी युद्धकैदी बनवतात.हारार अनेकदा आपल्या पत्नीला पात्र पाठवत असतो. पण एका दिवस त्याला घटस्फोटाचेच पत्र पत्नी पाठवते . कैदीतून सुटका करण्यासाठी हारर शेकडो वेळा अयशस्वी प्रयत्न करतो त्याला दुसऱ्यांची साथ नकोच असते. पण शेवटी तो इतर लोकांच्या मदतीनेच सुटतो इथेच त्याचा हेकेखोरपणा दिसतो. पीटरबरोबरचे घड्याळाचे आधीचे आणि नंतरचे दृश्य कमाल बदल जाणवतो,मन सुखी होते. कैदेतून सुटका करून तो आणि त्याचा मित्र पीटर तिबेटमध्ये पोहोचतात . ते रहस्यमयी, शांततामय जग! तिबेट विदेशी लोकांसाठी बंद होते, पण ते ल्हासा शहरात पोहोचतात,तिथे नशिबाने त्यांना राहायची परवानगी मिळते. ल्हासात पोहोचल्यावर तिबेटी डिप्लोमॅट कुंगो त्यांना आपल्या घरी राहायला देतात.नंतर तिबेटी वरिष्ठ अधिकारी वाँग त्यांना मित्र म्हणून भेट देतात आणि कस्टम-मेड वेस्टर्न सूट्स भेट देतात.हे सूट पेमा ल्हाकी नावाच्या एका तिबेटी टेलर बनवते. ती कलकत्ताला गेली आहे म्हणून तिला पाश्चिमात्य कपडे बनवता येतात.हा सीन खूप मजेदार आहे,हाररच्या एक सुंदर स्त्री घरी येते आणि म्हणते "कपडे काढा!" .तो घाबरतो, पण ती फक्त मोजमाप घेण्यासाठी आली आहे! पुढे हारर तिला पटवण्याचा प्रयत्न करतो पण ती त्याचा मित्र पीटरला निवडते आणि त्याच्याबरोबर लग्न करते. तिथे हाइन्रिखची भेट होते युवा दलाई लामा सोबत! छोटे दलाई लामा हारारच्या विदेशी रंगांच्या केसांना हात लावतात आणि म्हणतात "Yellow Head!" :). हाररला दलाई लामा याना Western जग शिकवायला सांगितले जाते . भूगोल, विज्ञान, सिनेमा! इथून मैत्री सुरू होते. खूप क्यूट आणि मजेदार! दलाई लामा फक्त १४ वर्षांचे असतात, पण त्यांची बुद्धिमत्ता आणि करुणा अप्रतिम! हाइन्रिख त्यांना पाश्चिमात्य जगाची माहिती शिकवतो – भूगोल, विज्ञान, अगदी सिनेमा थिएटरही बांधतो! हाररला थिएटर बांधायला सांगतात. पण कामगार खड्डा खोदताना earthworms मारण्यास नकार देतात .कारण तिबेटी धर्मात सर्व प्राणी मागील जन्मातील आई असू शकतात! हारर चिडतो, पण दलाई लामा शांतपणे सांगतात "कधीही जीव मारू नका." हारर earthworm वाचवतो आणि थिएटर पूर्ण करतो. इथे हाररला करुणेची पहिली शिकवण मिळते पत्नीशी घटस्फोट झाल्यावर हारर मुलाला पत्रे पाठवत राहतो . पण एक दिवस मुलाचे उत्तर धडकते "मी तुम्हाला ओळखत नाही,मला पत्रे पाठवणे बंद करा ..." दलाई लामा त्याला बौद्ध धर्माच्या शिकवणी देतात .करुणा, विनम्रता आणि जीवनाचा खरा अर्थ. हा स्वार्थी माणूस हळूहळू बदलतो, आणि दोघांमध्ये खोल मैत्री निर्माण होते. 5 पण शांतता फार काळ टिकत नाही... १९५० साली चीनची फौज तिबेटवर चालून येते, आणि सर्व काही उधळून लावते.हारर दलाई लामांना पळून जायला सांगतात. दलाई लामा नकार देतात. लोक सोडून जाणार नाहीत. हारर म्हणतो "तू माझा मुक्तीचा मार्ग आहेस!" दलाई लामा शांतपणे सांगतात "मुक्ती स्वतःच्या मेहनतीने येते." हाररला आपल्या मुलाकडे परत जायला प्रोत्साहन देतात. ते हाररला एक खास भेट देतात .एक संगीत बॉक्स (music box) जो हारार तिबेट सोडून ऑस्ट्रियाला परत गेल्यावर मुलाला भेट म्हूणन देतो. पण मुलगा त्याला ओळखत नाही आणि दूर राहतो. शेवटच्या सीनमध्ये हारर आपल्या मुलाला घेऊन डोंगर चढायला जातो त्याचे स्वप्न तो मुलाबरोबर पूर्ण करतो. तो मुलाला पत्र लिहितो आणि सांगतो की तिबेटमध्ये त्याला खरा अर्थ सापडला. मुलगा हळूहळू जवळ येतो, आणि दोघे बाप-लेक म्हणून एकत्र होतात. हा प्रसंग दाखवतो की दलाई लामांच्या शिकवणीमुळे हारर चांगला बाप बनला! पुढे २००६ पर्यंत आयुष्यभर हाइन्रिख हारर आणि दलाई लामा यांची मैत्री निरंतर होती. २००६ साली हाररचे निधन झाले. हारर म्हणायचे, "ल्हासात मी शिक्षक होतो, पण आता ते माझे गुरू आहेत .ते मला धैर्य आणि सहनशीलता शिकवतात." 7 हा प्रवास हृदय पिळवटून टाकतो! -भक्ती
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
1253 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

छान, सिनेमा परिचय आवडला!

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 01/08/2026 - 18:32 नवीन
छान, सिनेमा परिचय आवडला!
  • Log in or register to post comments

मस्त परीचय!!

राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 01/08/2026 - 19:26 नवीन
मागे एकदा डिस्कवरी वाहीनीवर द ग्रे द एस्केप की काहीतरी डॉक्युमेंट्री बघितली होती ते आठवले.
  • Log in or register to post comments

द ग्रेट एस्केप

Bhakti
गुरुवार, 01/08/2026 - 21:23 नवीन
दलाई लामा यांच्या सुटकेची हि मालिका होती. बरोबर हीच डॉक्युमेंटरी मी पहिली होती.पण नाव आठवत नव्हत गुगल केलं तरी नाव सापडत नव्हतं. धन्यवाद ! द ग्रेट एस्केप -अफगाणिस्तान याच सिरीजमधली सुश्मिता बॅनर्जीची (real story) अंगावर काटा आणणारी आणखीन एक मालिका होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

छान माहिती गोळा केली आहे.

कंजूस
गुरुवार, 01/08/2026 - 19:26 नवीन
छान माहिती गोळा केली आहे. लेकीची आवड आणि अभ्यास चांगला चालला आहे.
  • Log in or register to post comments

छान परिचय

स्वधर्म
Fri, 01/09/2026 - 01:58 नवीन
छान परिचय. आवडला. हा माहितीपट व सिनेमा आता कुठे बघता येईल?
  • Log in or register to post comments

माहितीपट डिस्कोव्हरीवर असावा

Bhakti
Fri, 01/09/2026 - 14:03 नवीन
माहितीपट डिस्कोव्हरीवर असावा.सिनेमा नेटफ्लिक्सवर आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

मस्त...

किल्लेदार
Fri, 01/09/2026 - 09:21 नवीन
दोन तीनदा तुकड्या तुकड्यात पहिला हा सिनेमा. एकदा स्वस्थ बसून पूर्ण बघावा लागेल आता. अर्जेंटिना मधे शूटिंग झालं माहित नव्हतं. अर्जेंटिनाच्या उत्तर पश्चिम भागात लडाख सदृश प्रदेश आहे. खुदा गवाहचं बरंच शूट नेपाळच्या जोमसोम मधे झालंय तिथेही एकदा जायचं आहे. भन्नाट प्रदेश आहे तो. हा चित्रपट पाहून ल्हासाला जायची प्रबळ इच्छा होते पण प्रकरण कठीण आहे.
  • Log in or register to post comments

कटु सत्य !

Bhakti
Fri, 01/09/2026 - 14:04 नवीन
हा चित्रपट पाहून ल्हासाला जायची प्रबळ इच्छा होते पण प्रकरण कठीण आहे.
  • Log in or register to post comments

वा!!

मार्गी
Fri, 01/09/2026 - 18:43 नवीन
खूप वेगळा विषय. हारर खूप अचाट माणूस होता. इतर डिटेल्स नवे मिळाले. मागे मिपा दिवाळी अंक २०१७ मध्ये त्यावर लिहीलं होतं: हेईनरिश हारर : पराक्रमाची आश्चर्यकारक गाथा.
  • Log in or register to post comments

खुप छान लेख!

Bhakti
Fri, 01/09/2026 - 19:46 नवीन
खुप छान लेख!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्गी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा