✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एआय आणि उत्पादकता

य
युयुत्सु यांनी
Sun, 09/21/2025 - 07:40  ·  लेख
लेख
 आज म०टा०च्या संवाद या पुरवणीत माझा प्रसिद्ध झालेला नवीन लेख ए०आय० आणि उत्पादकता -- राजीव उपाध्ये माझी कन्या शाळेत असताना बर्‍याचदा मी तिला आणायला जायचो. शाळा सुटायच्या अगोदर सहसा मी तिथे पोचलेला असे. मग मला काही निरीक्षणे करायचा छंद जडला. शाळा सुटली की काही मुले शाळेच्या सूचनांना झुगारून गेटच्या दिशेने धावत सुटायची. मग निरीक्षणे करताना असे लक्षात आले की ठराविक मुलेच शाळा सुटल्यावर धावत सुटतात. मग हळूहळु असं लक्षात आलं की शाळा सुटल्यावर ही मुले (आणि मुली) फक्त शारीरिक दृष्ट्या चपळ नाहीत तर अभ्यासात पण बर्‍यापैकी पुढे होती. बौद्धिक आणि शारीरिक चापल्याचा घनिष्ट संबंध असल्याचे विज्ञानाने आता मान्य केला असल्याने माझ्या या जुजबी निरिक्षणांमध्ये शास्त्रीय तथ्य असल्याचे नंतर लक्षात आले. हा गंमतीदार ’अभ्यास’ सांगायचा उद्देश असा की नवे तंत्रज्ञान आल्यावर जे अगोदर धावत सुटतात, ते त्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त फायदा उठवतात. चॅटजीपीटीचे लोकार्पण झाल्यापासून मी रोज या तंत्रज्ञानाविषयी येणार्‍या बातम्यांवर नजर ठेऊन होतो. जवळजवळ ३ महिने गेल्यानंतर भारतीय ब्लॉगर्सनी ए०आय०ची दखल घ्यायला सुरुवात केली. सांगायचा मुद्दा, आपण याही खेपेला नव्या तंत्रज्ञानाला संगणकाच्या आगमनाच्या वेळी दिला तसा थंडा प्रतिसाद दिला (हे अर्थात माझे वैयक्तिक मत आहे). ए०आय० किंवा कृत्रिम बुद्धीमत्ता हे असे तंत्रज्ञान आहे की ज्याने आजवर निर्माण झालेल्या तंत्रज्ञानापेक्षा सर्वात जास्त गुंतागुंतीचा प्रभाव मानवी जीवनावर टाकला आहे. ’बृह्त्भाषा प्रतिकृती’ (लार्ज लॅंग्वेज मॉडेल) अवतीर्ण होण्यापूर्वीच अनेक जणांनी धोक्याच्या घंटा वाजवायला सुरुवात केली होती. पण "मग सावकाश बघू" या धारणेमुळे बहुसंख्य लोकांनी या इशार्‍यांकडे दूर्लक्ष केले. आज भारतीय माध्यमातून ए०आय० बद्दल जे लिहीले किंवा दाखवले जाते, त्यात मला नकारात्मक सूर जास्त सापडतो. मराठीत पण ए०आय० बद्दल बोलणारे अनेक मातब्बर तज्‍ज्ञ ए०आय० कसा वापरावा याबद्दल अवाक्षर न काढता धोक्यांबद्दलच जास्त बोलताना दिसतात. विशेषत: अलिकडे अमेरीकेतील एम०आय०टी०ने मेंदू निष्क्रिय होण्याबद्दल इशारा देणारा अभ्यास प्रसिद्ध केला आहे. त्याला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिले जात आहे, असे मला वाटते. कारण प्रत्यक्षात अनेक लोकोत्तर तंत्रज्ञानांच्या आगमनावेळी असे इशारे देण्यात आले होते. उदा० इमेल तंत्रज्ञन आले तेव्हा लोकांना हाताने पत्र लिहीणे किती महत्त्वाचे आहे, याचे महत्त्व वाटू लागले होते. तसेच इमेलमध्ये भावनिक ओलावा नाही म्हणून नाक मुरडले जायचे. अनेकजण मी इमेल बघत नाही, इंटरनेट वापरत असे अभिमानाने सांगायचे. पण नंतर इमेलने आणि संदेशनातील नंतरच्या प्रगतीने मानवी आयुष्य किती व्यापले हा इतिहास सर्वज्ञात आहे. त्यामुळे ही नकारात्मता जर अशीच कुरवाळली गेली तर तंत्रज्ञानाचा उपभोक्ता म्हणून पण भारत मागे पडेल अशी मला भीति वाटते. पण एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, की अस्तित्त्वाला धक्का देणार्‍या, सर्व उपकारक आणि अपकारक तंत्रज्ञानांशी शेवटी मनुष्यप्राण्याने असे ना तसे जुळवून घेतले. ज्यांनी जुळवून घेतले नाही त्यांचे अस्तित्व अर्थातच धोक्यात आले. मी ए०आय० कडे कसे बघतो? "उत्पादकता वाढवणारा एक जीवलग सखा" अशी माझी ए०आय० बद्दलची धारणा आहे. असा किंवा अशासारखा सकारात्मक दृष्टीकोन बाळगला तरच ए०आय०चा जास्तीत लाभ मिळवून उत्कर्ष साधता येईल असे माझे स्पष्ट मत आहे. समजा तुम्हाला अल्पमोली, आखुडशिंगी, बहुदुधी अशी गाय एखाद्याने आणून दिली तर ती तशी खरोखर आहे का हे अधूनमधून तपासणे ही किमान जबाबदारी मालक म्हणून तुम्ही पार पडणे आवश्यक आहे. तात्पर्य, नोकर कितीही विश्वासू असला तरी किमान देखरेख ही ठेवावीच लागते. ए०आय० बाबत पण नेमके तसेच आहे. ए० आय० कडून १०० टक्के अचूक उत्तरांची अपेक्षा ठेवणे अयोग्य आहे. ही अपेक्षा पूर्ण न झाल्याने अनेक जण ओशाळताना दिसतात. पण ए०आय०ची थापेबाजी आता खुपच कमी/नगण्य झाली आहे. पण तरीही शंका आल्यास किंवा पुरेशी काळजी घेण्यासाठी एकच प्रश्न एकाच वेळेला, वेगवेगळ्या वेळेला, भाषा बदलून एकापेक्षा अधिक ए०आय० ना विचारल्याने विश्वासार्ह उत्तरे मिळायची शक्यता वाढते. तसेच एका ए०आय०ने दिलेले उत्तर दुसर्‍या ए०आय०कडुन तपासून घेता येते. बर्‍याच ए०आय० सेवा देणार्‍या कंपन्यांनी माफक सेवाशुल्कात भारतात सेवा देणे चालू केले आहे. ज्याना शक्य आहे त्यांनी अशा सशुल्क सेवांचा अवश्य फायदा उठवला पाहिजे. हे पैसे आपली "उत्पादकता" वाढल्याने नंतर लगेच वसूल होतात. एक ताजे उदाहरण- मी शेअर बाजारातला एक छोटा गुंतवणूकदार आहे. मला कुणाचे सल्ले न घेता गुंतवणूक करायला आवडते. पूर्णपणे स्वत:च्या भरवशावर शेअरबाजारात गुंतवणूक करताना दोन गोष्टींचे पथ्य पाळावे पाळावे लागते - एक म्हणजे समभागाचे तांत्रिक विश्लेषण (technical analysis) आणि दुसरे म्हणजे कंपनीच्या उद्योगाचे पायाभूत विश्लेषण (fundamental analysis). नैसर्गिक देणग्यांमुळे (पॅटर्न शोधणे) आणि शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे तांत्रिक विश्लेषणामध्ये मी ए०आय०च्या मदतीने अभ्यास करून बर्‍यापैकी प्रावीण्य मिळवले, पण पायाभूत विश्लेषण करण्यात मी कमी पडत होतो. ही उणीव भरून काढायला मला ए०आय० ची होत असलेली मदत अनन्यसाधारण आहे. वेगाने व्यवसायात प्रगती करणार्‍या कंपन्या ओळखणे हे माझ्यासारख्या अनेकांना आह्वानात्मक असते. सर्वच लोकाना कंपन्यांचे ताळेबंद आणि त्यावरुन योग्य ते निष्कर्ष काढणे किंवा कंपनीच्या भविष्याविषयी अंदाज बांधणे जमत नाही. साहजिकच या समस्येचे उत्तर शोधण्यासाठी मी ए० आय० लाच प्रश्न विचारला - "Help me to find good low valued stocks which have promising future in Indian markets. Suggest some strategies." मला त्याने समभागांचे संख्यात्मक (ऐतिहासिक कामगिरी) आणि गुणात्मक विश्लेषण कसे करायचे याबद्दल काही सूचना केल्या. यातील संख्यात्मक विश्लेषण करण्यासाठी आज असंख्य स्रोत उपलब्ध आहेत. पण समभागाच्या गुणात्मक विश्लेषणात त्याने - व्यवस्थापनाची गुणवत्ता (Management Quality), कंपनीची व्यवसायात स्पर्धात्मक आघाडी (Competitive Advantage), व्यवसायाचे भवितव्य (Growth Prospects) हे निकष तपासण्यास सांगितले. आता मुख्य समस्या अशी की माझ्या वैयक्तीक मर्यादांमुळे मला एखाद्या कंपनीचे असे ’गुणात्मक विश्लेषण’ अजुनही जमत नाही. त्यामुळे मी अर्थातच पुढचा प्रश्न विचारला - "How to find out about management quality of a company?" यावर जेमिनी या ए०आय०ने मला एक लांबलचक निकषांची यादी दिली. ती बघितल्यावर यात थापा नाहीत याची खात्री करण्यासाठी एका दुसर्‍या (डीपसिक) ए०आय०ला ही यादी तपासायला सांगितले आणि आवश्यक असेल तर भर टाकायला सांगितले. मला तात्काळ कंपनी व्यवस्थापनाचा दर्जा ठरवणार्‍या निकषांची सुधारित आणि अंतिम यादी तयार करून मिळाली. मी ग्रोक या ए०आय० ची सशुल्क सेवा वापरतो. वरील यादीतील निकष वापरून कंपनीचे व्यवस्थापन कसे आहे, तसेच व्यवसायाचे भवितव्य यावर पुन:पुन: माहिती मिळावी यासाठी ग्रोकमध्ये कायम स्वरूपी सूचना देता येतात. हा सर्व उद्योग केल्यावर मग प्रत्यक्ष चाचणीसाठी माझ्या पोर्टफोलिओमध्ये दीर्घकाळ गडगडलेले आणि चांगली कामगिरी करत असलेले समभाग तपासले तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. ग्रोकने दिलेली उत्तरे ~१००% अचूक होती. माझ्या ऐकीव माहीतीनुसार प्रसिद्ध तत्त्वज्ञ विट्जेन्स्टाइन असे म्हणत असे - माणसाचे जग किती मोठे तर त्याच्या भाषेच्या वापरा एव्हढे. तसेच कितीही नाही म्हटले तरी माणसाची सुबत्ता त्याच्या घरातील नोकरचाकरांच्या संख्येवर, दारातील गाड्यांच्या संख्येवर ठरते. लवकरच माणसाची उत्पादकता त्याच्या ए०आय०च्या वापरावरून निश्चित केली जाईल याची मला खात्री आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
9296 वाचन

💬 प्रतिसाद (66)

प्रतिक्रिया

श्री० टर्मीनेटर

युयुत्सु
Wed, 09/24/2025 - 16:35 नवीन
श्री० टर्मीनेटर तुमच्या भावना पोचल्या पण मुद्दे समजले नाहीत. सध्या सोने हा माझ्यासाठी सध्या महत्त्वाचा विषय नसल्याने मी हातातले काम टाकून वेळ देऊ शकेन की नाही माहित नाही. पण तुमचे लिखाण, अभ्यास, विचार जर लक्षात घ्यावेसे किंवा प्रतिसाद देण्या योग्य वाटले तर अवश्य देईन. पण अगोदर तुम्ही तुमची बाजू मुद्देसूद मांडा. टीप - तुम्हाला माझा लेख भंपक वाटल्याबद्दल मला अजिबात राग नाही. चिंता नसावी.
  • Log in or register to post comments

ता०क०

युयुत्सु
Wed, 09/24/2025 - 16:42 नवीन
तुमची बाजू मांडताना पूर्ण विचार करा! मला तुमची बाजू भंपक वाटली तर चर्चा होणार नाही.
  • Log in or register to post comments

"विद्या विनयेन शोभते"

धर्मराजमुटके
Wed, 09/24/2025 - 17:01 नवीन
आजकालच्या चर्चा वाचून "विद्या विनयेन शोभते" सुविचार इतिहासजमा झालाय असे वाटत आहे.
  • Log in or register to post comments

हेहे

अभ्या..
Wed, 09/24/2025 - 17:10 नवीन
सध्या विद्या फक्त सिध्दार्थ रॉय कपूरला शोभते. विनय (पाठक) स्ट्रगलिंग अ‍ॅक्टर आहे अजूनही, सिध्दार्थ प्रचंड यशस्वी निर्माता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

विनय (पाठक) स्ट्रगलिंग अ‍ॅक्टर आहे अजूनही ?

धर्मराजमुटके
Wed, 09/24/2025 - 17:50 नवीन
विनय (पाठक) स्ट्रगलिंग अ‍ॅक्टर आहे अजूनही ? माझ्या मते तो "चलो दिल्ली" चित्रपटातनंतर यशस्वी झालाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

"तुमच्या भावना पोचल्या पण

टर्मीनेटर
Wed, 09/24/2025 - 17:57 नवीन
"तुमच्या भावना पोचल्या पण मुद्दे समजले नाहीत"
'कुठला मुद्दा समजला नाही ह्यावर कृपया प्रकाश टाकावा...'
"सध्या सोने हा माझ्यासाठी सध्या महत्त्वाचा विषय नसल्याने मी हातातले काम टाकून वेळ देऊ शकेन की नाही माहित नाही."
सध्याच काय सोने हा तुमच्यासाठी कधीच महत्त्वाचा विषय नव्हता, पण टूल किटचा एक भाग म्हणुन तुम्ही त्यावर लिहिले होते आणि ते किती भंपक होते हे जगजाहीर आहे. आणि असल्या फालतुगिरीवर व्यक्त होण्यासाठी प्रत्येकवेळी मी तरी अजिबात वेळ देऊ शकत नाही Sorry to say! पण ते असो... आता हा भंपक लेख लिहिताना तो फक्त AI विषयी असता तरी हरकत नव्हती पण त्यात तुम्ही शेअर बाजार घुसवलात ही गोष्ट माझ्या दृष्टीने हकरतीस पात्र आहे! असो... खरोखर AI बद्दल कळवळा असेल तर यंदाच्या दिवाळी अंकाची थीम AI आहे तेव्हा त्यात आपण काहीतरी उद्बोधक लिहावेत, ते वाचायला आणि खरोखर ज्ञानवर्धक असेल तर त्याचे मनमोकळेपणाने कौतुक करायला नक्कीच आवडेल! [गेल्या वर्षी 'निवडणूक/राजकारण' ही (एक) थीम होती, पण इथे बाकी वर्षभर राजकारणावर आपले (असलेले - नसलेले) ज्ञान पाजळणाऱ्या सगळ्या महापुरुषांनी सपशेल पळ काढला होता, सगळे अगदी 'रणछोड दास' म्हणतात तसे झाले होते ते सगळे महाभाग] असो, धाग्याच्या शीर्षकातून जे अभिप्रेत होतंय त्या विषयावर (तुमची ईच्छा असल्यास) तुमच्याशी चर्चा करायला मला खरंच आवडेल!
तुम्हाला माझा लेख भंपक वाटल्याबद्दल मला अजिबात राग नाही. चिंता नसावी.
तो तर वाटलाच आहे आणि त्याबद्दल राग किंवा चिंता वाटली काय आणि नाही वाटली काय who cares 😀
  • Log in or register to post comments

इतकंच ना?

युयुत्सु
Wed, 09/24/2025 - 20:16 नवीन
पण त्यात तुम्ही शेअर बाजार घुसवलात ही गोष्ट माझ्या दृष्टीने हकरतीस पात्र आहे! इतकंच ना? कुणाचं काय तर कुणाचं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

इतकंच ना?

टर्मीनेटर
गुरुवार, 09/25/2025 - 01:03 नवीन
इतकंच ना?
'एआय आणि उत्पादकता' ह्या शीर्षकाचा आणि शेअर बाजाराचा काय संबंध आहे? I mean ह्यात नक्की कुठली उत्पादकता तुम्हाला अभिप्रेत आहे?
कुणाचं काय तर कुणाचं काय?
Lol
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

ही चर्चा व्यवस्थित पुढे

युयुत्सु
गुरुवार, 09/25/2025 - 07:27 नवीन
ही चर्चा व्यवस्थित पुढे नेण्यासाठी काही मूलभूत बाबींवर एकमत होणं अपेक्षित आहे. तसेच फक्त तुम्ही प्रश्न विचारणार आणि मग दुगाण्या झाडणार असाल तर ते पण मला मान्य नाही. त्याला मी चर्चा म्हणत नाही. तसेच मला तुमच्या बोद्धिक आणि वैचारिक खोलीचा अंदाज आला तर तुमच्याबद्दलचा डिफॉल्ट/बेसिक आदर टिकायला मदत होईल. ही माझ्यादृष्टीने एक आवश्यक अट (नेसेसरी कंडीशन) आहे. तेव्हा तुम्ही मला प्रथम तुमची उत्पादकतेची व्याख्या सांगावी. ती व्याख्या घेऊन शेअर बाजाराचे उदा०कसे चुकीचे आहे, याचे निरूपण करावे. मला तुमचा मुद्दा पटला तर मी पटला असं जाहिर करेन. नाही पटला तर तुमच्या युक्तीवादातले दोष शक्य तेव्हढ्या सभ्य भाषेत मांडायचा प्रयत्न करेन. ही सभ्यता तुमच्या मध्ये दिसली नाही तर माझ्याकडून चर्चा बंद केल्याचे जाहिर करेन. एकतर्फी तुम्ही प्रश्न विचारायचे आणि मी उत्तरे देणं इतकंच अपेक्षित असेल तर आपण इथेच थांबू... तसेच ही चौकट मान्य असेल तर पुढे जाउ या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

आणखी एक...

युयुत्सु
गुरुवार, 09/25/2025 - 08:34 नवीन
आणखी एक... ही चर्चा चालू झाल्यास प्रथम श्री० टर्मीनेटर यांच्याशी चर्चा करण्यात माझी प्राथमिकता असेल. मध्येच कुणी तोंड खुपसून चर्चा/मुद्दा/युक्तीवाद भरकटवायचा प्रयत्न केल्यास माझ्याकडून सदर व्यक्तींची दखल घेतली जाणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

तेव्हा तुम्ही मला प्रथम तुमची

टर्मीनेटर
Fri, 09/26/2025 - 18:39 नवीन
तेव्हा तुम्ही मला प्रथम तुमची उत्पादकतेची व्याख्या सांगावी.
उत्पादकतेची व्याख्या मी काय करणार? पण जी सर्वमान्य व्याख्या प्रचलित आहे ती खाली इंग्रजी आणि मराठीत देतो (जी मला मान्य आहे त्यात तुम्हाला काही भर घालायची असेल तर अवश्य घालावीत)
Productivity is a measure of efficiency that shows the amount of goods or services produced (output) relative to the resources used (input) over a specific period of time. In simpler terms, it's about accomplishing more with less effort, time, or resources. Productivity can be applied at an individual, organizational, or national level, with higher productivity often leading to better standards of living and economic growth. --- उत्पादकता म्हणजे संसाधने किती कार्यक्षमतेने वापरली जातात आणि त्यातून किती उत्पादन (वस्तू किंवा सेवा) निर्माण होते, याचे मोजमाप . सोप्या भाषेत, कमी संसाधनांमध्ये जास्त उत्पादन करणे किंवा समान उत्पादन करण्यासाठी कमी संसाधने वापरणे म्हणजे उत्पादकता वाढवणे होय. उत्पादकता कशी मोजतात? उत्पादकता मोजण्यासाठी उत्पादन (आउटपुट) आणि वापरलेले इनपुट (उदा. श्रम, वेळ, पैसा) यांचे गुणोत्तर काढले जाते. सूत्र: उत्पादकता = उत्पादन (आउटपुट) / इनपुट उत्पादकतेचे प्रकार आर्थिक उत्पादकता: याचा अर्थ वस्तू किंवा सेवांच्या उत्पादनाची कार्यक्षमता होय. वैयक्तिक उत्पादकता: एखादी व्यक्ती किती सातत्याने आणि कार्यक्षमतेने काम पूर्ण करते किंवा उद्दिष्टे साध्य करते, यावरून ती मोजली जाते. उत्पादकता का महत्त्वाची आहे? कार्यक्षमता: संसाधनांचा प्रभावी वापर होतो.
आता ह्या व्याख्येतुन प्रतीत होणाऱ्या अर्थाने तुम्हाला 'एआय आणि उत्पादकता' ह्या शीर्षकात 'उत्पादकता' अभिप्रेत आहे की 'कार्यक्षमता' ह्या अर्थाने अभिप्रेत आहे ते कृपया स्पष्ट करावेत म्हणजे पुढील चर्चेची दिशा ठरवता येईल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

श्री० टर्मिनेटर

युयुत्सु
Sat, 09/27/2025 - 07:25 नवीन
श्री० टर्मिनेटर ’उत्पादकता’ (प्रॉडक्टीव्हीटी) आणि ’कार्यक्षमता’ (एफिशिअन्सी) या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्या न समजल्याने त्यांचा चुकीचा वापर होऊन गोंधळ निर्माण होतो. त्यात ’उत्पादकतेच्या प्रकारांमध्ये ’वैयक्तीक उत्पादकता’ हा महत्त्वाचा भेद आहे. इथे तुम्हाला या दोन संकल्पनांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करायचे नसेल तर आपल्याला पुढे जाता येणार नाही. एखादी कृती (टास्क) मी पूर्वी करू शकत नव्हतो आणि ती आता करू शकत असेन तर माझी उत्पादकता वाढली असे म्हणता येते. हीच कृती मी पूर्वी करू शकत होतो पण आता जास्त चांगली/परिणामकारक करू शकत असेन, तर माझी कार्यक्षमता वाढली असे म्हणता येते. आता माझ्या लेखातील उदा० विषयी - पूर्वी मी पायाभूत विश्लेषण (फंडामेंटल ॲनालिसिस) करू शकत नव्हतो. मला त्याचा माझ्या गुंतवणूक विषयक निर्णय प्रक्रियेत वापर करता येत नव्हता. आता मला ए०आय० मुळे ते करता येते. त्यामुळे माझी त्यात ’वैयक्तीक उत्पादकता’ वाढली आहे. मी पूर्वी करत होतो त्यापेक्षा चांगले पायाभूत विश्लेषण (फंडामेंटल ॲनालिसिस) आता करू असेन तर माझी कार्यक्षमता वाढली आहे, असे म्हणता येते. पायाभूत विश्लेषण (फंडामेंटल ॲनालिसिस) या जागी खालील कृती वापरून हेच निकष तुम्ही लावू शकता. उदा०- लेखन युक्तीवाद बुद्धीवादळ (ब्रेन्स्टॉर्मिंग) माहिती मिळवणे माहितीचे पृथ:करण करणे इ० इ० मी पायाभूत विश्लेषण (फंडामेंटल ॲनालिसिस) करण्याच्या निमित्ताने ए०आय० चा वापर करताना एक महत्त्वाची गोष्ट शिकलो आणि त्याचा बनविलेला ठोकताळा असा- एखाद्या कंपनीच्या व्यवसायासाठी वातावरण पोषक आहे, पण कंपनीची कामगिरी चांगली नाही (महसूल, विक्री, नफा कमी होणे इ०) तर काही तरी मोठी गडबड आहे. एखाद्या कंपनीच्या व्यवसायासाठी वातावरण पोषक आहे, पण कंपनीची कामगिरी आहे (महसूल, विक्री, नफा वाढणे किंवा गेला बाजार स्थिर इ०) तर कंपनी विचार करण्याजोगी आहे. एखाद्या कंपनीच्या व्यवसायासाठी वातावरण पोषक नाही, पण कंपनीची कामगिरी चांगली/बरी आहे (विशेषत: लाभांशाचे वाटप) तर डोळे मिटून पैसे गुंतवावेत. आता ए०आय० वातावरण पोषक आहे की नाही आणि कंपनीची कामगिरी या प्रश्नांची उत्तरे विश्वासार्ह देऊ शकतो, असे माझे मत बनले आहे. माझ्या उत्तराशी तुम्ही किंवा इतर कुणी सहमत नसतील तर "वुई कॅन अग्री टु डिस-अग्री" या संकेतानुसार इथेच थांबू या... टीप- सुबोध खरे या व्यक्तीच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तरे मिळणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

सुबोध खरे या व्यक्तीच्या

सुबोध खरे
Sat, 09/27/2025 - 09:24 नवीन
सुबोध खरे या व्यक्तीच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तरे मिळणार नाहीत. आपल्या कडून कोणतीही सुसंबद्ध उत्तरे मिळतील अशी माझी मुळात अपेक्षाच नाही. मी आपल्या अनेक लेखातील विसंवाद किंवा दर्पोक्ती दाखवून देतो याबद्दल आपली जळजळ होते याला काही उपाय नाही. मीच बरोबर आणि मलाच सगळ्या विषयातील सगळं कळतं अशा व्यक्ती कडून कोणत्या उत्तराची अपेक्षा असेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

तसेच

युयुत्सु
गुरुवार, 09/25/2025 - 07:32 नवीन
खोडसाळपणे माझ्या तोंडी मी जे कधी बोललोच ते घालणे, मध्येच जुन्या धाग्यांचे संदर्भ घेऊन ओच्यात घेईन नाही तर पदरात घेईन स्टाईलमध्ये भांडत बसायचे असेल तर त्याला मी विकृत मानसिकता समजतो. आपण याची काळजी घ्याल अशी आशा करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

दुरुस्ती

युयुत्सु
गुरुवार, 09/25/2025 - 07:59 नवीन
खोडसाळपणे माझ्या तोंडी मी जे कधी बोललोच ते घालणे, हे वाक्य खोडसाळपणे माझ्या तोंडी मी जे कधी बोललोच नाही ते घालणे, असे वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

ताजी बातमी

युयुत्सु
Fri, 09/26/2025 - 15:46 नवीन
Image removed. Research from NYU has found that frontier models from OpenAI, Google, and Anthropic can now pass all three levels of the CFA (chartered financial analyst) exam, including difficult Level III essay questions that eluded them two years ago. Models completed the exam in minutes versus the 1,000 hours humans typically spend studying across multiple years for all three levels. OpenAI's o4-mini scored highest at 79.1% on the challenging essay portion, with Gemini 2.5 Pro and Claude 4 Opus reaching 75.9% and 74.9%. https://www.prnewswire.com/news-releases/goodfin-and-nyu-stern-professor-srikanth-jagabathula-release-landmark-study-showing-ai-models-perform-at-a-level-above-and-beyond-the-cfa-level-iii-exam-standards-302562278.html
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा