✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ताज्या घडामोडी- मे २०२५

च
चंद्रसूर्यकुमार यांनी
Wed, 04/30/2025 - 19:30  ·  लेख
लेख
आधीच्या भागात ४००+ प्रतिसाद झाले म्हणून आणि मे २०२५ चा महिना सुरू व्हायला आणखी साडेचार तासच (मोजून २७० मिनिटे) बाकी आहेत तेव्हा ताज्या घडामोडींचा नवा धागा सुरू करत आहे. लोकप्रिय गायक अभिजीत सावंत २ मे रोजी 'जिची चाल तुरू तुरू' हे लोकप्रिय गाणे म्हटलेला अल्बम रिलीज करणार आहे. ते गाणे जुन्याच चालीत असेल की रिमिक्स असेल ही चर्चा अभिजीत सावंतच्या चाहत्यांमध्ये रंगली आहे. https://marathi.indiatimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/bigg-boss-marathi-season-5-fame-abhijeet-sawant-new-marathi-song-chal-turu-turu-releasing-soon/articleshow/120764486.cms
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
31590 वाचन

💬 प्रतिसाद (140)

प्रतिक्रिया

हा एक माणूस जन्माला आला नसता

वामन देशमुख
Mon, 05/05/2025 - 11:40 नवीन
हा एक माणूस जन्माला आला नसता तर कोट्यावधी लोकांचे प्राण वाचले असते.
मार्क्स आणि शांतिदूत यांच्यात स्पर्धा आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

१९ व्या व २० व्या शतकात

श्रीगुरुजी
Mon, 05/05/2025 - 13:28 नवीन
१९ व्या व २० व्या शतकात जन्मलेली आणि आता हयात नसलेली काही तथाकथित भारतीय माणसे जन्माला आली नसती तर भारतावर अनंत उपकार झाले असते व भारताची इतकी वाट लागली नसती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

शोषण

युयुत्सु
Mon, 05/05/2025 - 11:30 नवीन
<भांडवलदार कामगारांच्या श्रमाची कशी चोरी करतात त्यावर लिहून-बोलून भांडवलशाहीच्या उरात धडकी भरवली. > किंचित अवांतर - अनेकवेळा कामगार पण मालकाचे शोषण करतात. विशेषतः सरकार जेव्हा मालक असते तेव्हा हे जास्त प्रकर्षाने जाणवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१

अमरेंद्र बाहुबली
Mon, 05/05/2025 - 11:36 नवीन
+१ बरेच सरकारी कर्मचारी काम न करून सरकारचे नी लाच घेऊन जनतेचे शोषण करतात, भारतात तर हा प्रकार खूप आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

टेक-वारी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/05/2025 - 11:47 नवीन
प्रशासनात सुधारणा होण्यासाठी आता 'टेक-वारी' उपक्रम राबविण्यात येणार आहे. नवे तंत्रज्ञान नवे बदल झाले पाहिजेत. पण, आज काय परिस्थिती आहे. ( राम राज्य आलेलं आहे, या भोळ्या भाबड्या अडाणी लोकांचे मते तो भाग वेगळा ) पण, सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे. अगदी भ्रष्टाचार अधिकृत झाला आहे. चिरीमिरी शिवाय आता कोणतेच काम होत नाही हे आपल्या मनात ठसले आहे. कोणतेही क्षेत्र असो अगदी न्यायपालिकडे सुद्धा संशयाने बघितल्या जात आहे, यात सुधारणा करण्यासाठी किती पावले उचलल्या गेली ? ते दिसत नाही. उलट मंत्री, अधिकारी वसुली नाक्यावर उभे असल्यासारखे सर्वच क्षेत्रात शोषण करतात. अधिका-यांकडे वाढणारी संपती पाहता त्यांचं शोषणाचं काम प्रचंड वाढलेले दिसत आहे. कडक कायदे आणि उपाययोजना करण्याऐवजी नेते, मंत्री, सरकारही लोकांना वाढत्या धार्मिकतेकडे घेवून जातात, बुवाबाजी-सत्संग यात गुंतवून ठेवतात. समाजाला- देशाला कुठे घेऊन जायचं हे धोरण ठरत नाही तोपर्यंत हे असे व्हायचेच. नवे तंत्रज्ञान जनतेच्या फायद्याचे ठरो अशी भाबडी अपेक्षा ठेवतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

(No subject)

श्रीगुरुजी
Mon, 05/05/2025 - 12:58 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

मार्क्ससोबत जन्मोत्सव आणि महाभंडारा

वामन देशमुख
Mon, 05/05/2025 - 13:22 नवीन
मार्क्ससोबत जन्मोत्सव आणि महाभंडारा हे वाचून आधी मौज वाटली पण नंतर लक्षात आले कि त्यात वावगे काही नाही. उजव्यांचे विश्वगुरु अमुक आणि डाव्यांचे विश्वगुरु तमुक; यांच्या जन्मोत्सवानिमित्त हे महाभंडारा करतात, त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त ते महाभंडारा करतात. म्हटले तर दोन्हीही शेणपट्ट्यात वळवळणारे गोबरवादी, म्हटले तर दोन्हीही समर्थक अनुयायी! फरक असेल तर एवढाच की मार्क्सच्या मानवताविरोधी विचारसरणीने कोट्यवधी लोक मरण पावले; उजव्या विचारसरणीने मात्र अब्जावधी लोकांना ताठ मानेने जगण्याची प्रेरणा, दिशा आणि साधने मिळाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कार्ल मार्क्सच्या

श्रीगुरुजी
Tue, 05/06/2025 - 00:24 नवीन
कार्ल मार्क्सच्या जयंतीनिमित्त महाभंडारा कार्ल मार्क्सची काही वचने मला खूप आवडतात. The rich will do anything for the poor but get off their backs. The production of too many useful things results in too many useless people. Reason has always existed, but not always in a reasonable form. माझे सर्वाधिक आवडते वाक्य - History repeats itself, first as tragedy, then as farce. मूळ वाक्य हेगेलने History repeats itself एवढेच लिहिले होते. कार्ल मार्क्सने त्यात थोडी भर टाकली. कार्ल मार्क्सने बूझ्वा (bourgeois) या शब्दाला एक वेगळाच अर्थ दिला. त्याच्या म्हणण्यानुसार बूझ्वा (बुर्झ्वा हा चुकीचा उच्चार आहे व या शब्दाचा प्रतिगामी, कर्मठ, पुराणमतवादी असा चुकीचा अर्थ घेतला जातो) म्हणजे ढोंगी मध्यमवर्गीय जे कायम नीतिमत्तेची प्रवचने देत असतात, परंतु धनसंपत्ती मिळविण्यासाठी नैतिक अनैतिक अश्या सर्व मार्गांचा अवलंब करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बागलीहार धरणापाठोपाठ चिनाब

श्रीगुरुजी
Mon, 05/05/2025 - 14:09 नवीन
बागलीहार धरणापाठोपाठ चिनाब नदीवरील सलाल धरणाचे दरवाजेही भारताने बंद केले. झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचेही दरवाजे भारत बंद करण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments

ही नाटके काही दिवस चालतील,

अमरेंद्र बाहुबली
Mon, 05/05/2025 - 15:39 नवीन
ही नाटके काही दिवस चालतील, आपल्या कळण्याधीच पाणी औरू केले जाईल (कारण मग पडलेल्या पावसाचे पाणी जमा करून ठेवणार कुठे?) मग पुढील हल्ल्यापर्यंत पाणी सुरूच राहील! ५६ इंची छाती दाखवून हल्ला करा म्हणावे, नुसती नाटके नको!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

शंकराचार्य

चंद्रसूर्यकुमार
Mon, 05/05/2025 - 15:41 नवीन
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी राहुल गांधींना हिंदू धर्मातून बहिष्कृत केल्याची घोषणा केली. याच शंकराचार्यांनी २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राममंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्यावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. तेव्हा विरोधकांना अगदी उकळ्या फुटल्या होत्या अगदी मिपावरही तेव्हा वाचल्याचे आठवते की- बघा शंकराचार्य पण विरोध करत आहेत. स्वतः राहुल गांधी म्हणाले होते- शंकराचार्य या हिंदू धर्मातील सगळ्यात मोठ्या अधिकारी व्यक्तीने असे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. हिंदू धर्मात सगळ्यात मोठा अधिकारी वगैरे असा कोणी नसतो हेच मुळात राहुल गांधींना माहित नसावे. असो. पण आता झाले असे आहे की शंकराचार्यांनी राहुल गांधींना असे हिंदू धर्मातून बहिष्कृत केल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत- "याच प्रवृत्तीच्या लोकांनी महात्मा गांधी यांना गोळ्या घातल्या आणि आता ते राहुल गांधी यांना टार्गेट करत आहेत" https://marathi.indiatimes.com/maharashtra/parbhani/harshwardhan-sapkal-reacted-on-avimukteshwaranand-remark-over-rahul-gandhi-manusmruti-statement/articleshow/120878805.cms आहे की नाही मज्जा? या मंडळींच्या मनासारखे शंकराचार्य बोलल्यावर- बघा शंकराचार्य पण तेच म्हणत आहेत असे म्हणायचे. आणि त्याविरूध्द बोलल्यावर लगेच नथुराम प्रवृत्ती म्हणायचे. अमक्याला पाकिस्तानात पाठवा, तमक्याला पाकिस्तानात पाठवा (कोणतेकोणते धर्मनिरपेक्षतावाले डापु लोक) अशी मागणी मधूनमधून होते असते. अशा मागण्यांमध्ये काहीही दम नसला तरी अशा मागण्या हे लोक जे काही बरळत असतात त्यामुळे उद्वेगातून होत असतात. मिपावर मागे एक विद्वान होते. ते अशी मागणी करणार्‍यांना 'पाकिस्तान पर्यटन विभागाचे ब्रँड अ‍ॅम्बॅसॅडर' म्हणायचे. त्याच धर्तीवर काँग्रेस आणि इन जनरल सगळी डापु जमात नथुराम, मनू वगैरेंचे पर्सनल सेक्रेटरी असावेत. कोण नथुरामवादी, कोण मनूवादी वगैरे त्यांना अचूक कळते :) बाकी हे शंकराचार्य (आणि सुब्रमण्यम स्वामी, यशवंत सिन्हा सुध्दा) वगैरे लोक भरकटलेल्या क्षेपणास्त्रांप्रमाणे असतात. आपल्याला येनकेनप्रकारेण प्रसिध्दी मिळायला हवी असे वाटत असले पण पाहिजे ती प्रसिध्दी मिळत नाही असे दिसले की काहीही बोलून कधी कोणावर जाऊन आदळतील याचा काहीही भरवसा नसतो. आज आपल्या विरोधकावर जाऊन आदळले म्हणून टाळ्या पिटणार्‍यांना तेच भरकटलेले क्षेपणास्त्र भविष्यात आपल्यावरही कधीतरी येऊन आदळेल याची कल्पनाही नसते. अशा लोकांच्या नादी लागण्यात अर्थ नाही हे जरी लक्षात आले तरी ते चांगलेच होईल :)
  • Log in or register to post comments

राहुल गांधी तसेही मनुवादी

अमरेंद्र बाहुबली
Mon, 05/05/2025 - 15:45 नवीन
राहुल गांधी तसेही मनुवादी नाहीत त्याना हिंदू धर्मात घेतल्याचा आनंद नाही नी धर्मातून काढल्याचे दुःख नाही, पण जे मनुवादी वृत्तीचे लोक मनुवाद मानतात, ते आपसूक शंकराचार्याना मानतात, त्यांनी राममंदिर उदघाटनाला शंकराचार्यांचा विरोध पाहून स्वतःही विरोध करायला हवा होता ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

शंकराचार्य नक्की काय योगदान देतात?

स्वधर्म
Tue, 05/06/2025 - 01:47 नवीन
त्यांना भरकटलेले क्षेपणास्त्र असे आपण म्हणत आहात, याची नोंद घेतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

<शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद

युयुत्सु
Tue, 05/06/2025 - 08:10 नवीन
<शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी राहुल गांधींना हिंदू धर्मातून बहिष्कृत केल्याची घोषणा केली.> रागाबद्दल मला अजिबात प्रेम / उमाळा नाही. पण शंकराचार्यांना "हिंदू धर्मातून बहिष्कृत" करण्याचे अधिकार आहेत का? हे शंकराचार्य फेस्बुक्वर "विचारा तुम्ही सांगतो आम्ही" स्टाईलचे एक सदर चालवतात, त्या सदरात एकाने प्रश्न विचारला - जाट क्षत्रिय की शूद्र? त्यावर यांचा निवाडा ऐकून मला अंमळ मौज वाटली. ते म्हणाले - तुम्हाला कशाचा अभिमान वाटतो? तुम्हाला क्षत्रिय असण्याचा अभिमान वाटत असेल तर तुम्ही क्षत्रिय आणी जर तुम्हाला तुमच्या शूद्रत्वाचा अभिमान असेल तर तुम्ही शूद्र.
  • Log in or register to post comments

नसावेत

चंद्रसूर्यकुमार
Tue, 05/06/2025 - 09:27 नवीन
पण शंकराचार्यांना "हिंदू धर्मातून बहिष्कृत" करण्याचे अधिकार आहेत का?
नसावेत. कारण हिंदूंमध्ये एक कोणीतरी अधिकारी आणि तो फतवे काढणार त्याचे पालन सगळ्यांनी निमूटपणे करावे ही मुळात पध्दतच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

<बाकी हे शंकराचार्य (आणि

युयुत्सु
Tue, 05/06/2025 - 09:04 नवीन
<बाकी हे शंकराचार्य (आणि सुब्रमण्यम स्वामी, यशवंत सिन्हा सुध्दा) वगैरे लोक भरकटलेल्या क्षेपणास्त्रांप्रमाणे असतात.> शंकराचार्य आणि सुब्रमण्यम स्वामी यांना एका पंक्तीला बसवल्याने दोघांना पण ठसके लागल्याचा भास झाला.
  • Log in or register to post comments

स्वामी

चंद्रसूर्यकुमार
Tue, 05/06/2025 - 09:47 नवीन
शंकराचार्य आणि सुब्रमण्यम स्वामी यांना एका पंक्तीला बसवल्याने दोघांना पण ठसके लागल्याचा भास झाला.
सुब्रमण्यम स्वामी या मनुष्याचा पूर्वेतिहास माहित आहे ना? दिनदयाळ उपाध्याय यांच्या मृत्यूमागे अटलबिहारी वाजपेयींचा हात होता असा आरोप त्यांनी दिनदयाळ गेल्यानंतर ४-५ वर्षांनी केला होता. तेव्हापासून त्यांचे आणि वाजपेयींचे अजिबात जमायचे नाही. अगदी वाजपेयींचे निधन झाल्यावर लाजेकाजेस्तव पण त्यांनी श्रध्दांजली वाहिली नाही. वास्तविकपणे माजी पंतप्रधानांचे निधन झाल्यावर खासदारांनी निदान दोन शब्दात तरी श्रध्दांजली वाहिली पाहिजे अशी अपेक्षा करणे फार अप्रस्तुत नसावे. चंद्रशेखर सरकारमध्ये कायदामंत्री असताना समाजवादी जनता दलाच्या पाच खासदारांना (भागेय गोवर्धन, विद्याचरण शुक्ला आणि इतर तीन) पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवायच्या प्रकरणात जर त्या खासदारांना अपात्र ठरविलेत तर मी तुम्हाला अटक करेन अशी धमकी स्वामींनी लोकसभा अध्यक्ष रवी रे यांना दिली होती. लोकसभा अध्यक्ष हे उतरंडीमध्ये चौथ्या क्रमांकाचे पद असते- राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनंतर. लोकसभा अध्यक्ष हे प्रोटोकॉलप्रमाणे पंतप्रधान सोडून इतर कोणत्याही मंत्र्याला वरीष्ठ असतात. त्यांना अटक करू- आणि ते पण कोणता गुन्हा केला (खून, भ्रष्टाचार वगैरे) म्हणून नाही तर राजकीय कारणाने अशी धमकी मंत्र्याने देणे कितपत योग्य आहे? त्यानंतर पंतप्रधान चंद्रशेखर यांना लोकसभेत सरकारच्या वतीने लोकसभा अध्यक्षांची माफी मागावी लागली होती. जयललितांविरूध्द भ्रष्टाचाराचे आरोप करून खटला स्वामींनीच दाखल केला होता. पण त्यानंतर वर्ष-दीड वर्षात १९९८ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळेस जयललितांच्याच अण्णा द्रमुक आघाडीत त्यांचा पक्ष सामील झाला. त्यावेळेस पंतप्रधान पदाचे उमेदवार वाजपेयी असतील हे अलम दुनियेला ठाऊक होते. यांचे वाजपेयींशी जमायचे नाही- ठीक आहे. पण मग आधी त्यांच्या सरकारला पाठिंबा दिलाच का? आणि त्यानंतर तीन महिन्यात वाजपेयी सरकार धर्मांध असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला आणि मग तो पाठिंबा काढून घेतला. ३० मार्च १९९९ रोजी ज्या चहा पार्टीत वाजपेयींचे सरकार खाली खेचायचा निर्णय सोनिया आणि जयललिता यांच्या भेटीत झाला ती पार्टी कोणी आयोजित केली होती? तर सुब्रमण्यम स्वामींनी. नंतरच्या काळात हे गृहस्थ सोनिया-राहुलच्या मागे लागले. त्या मायलेकरांविषयी काडीचेही ममत्व मला नाही. त्यांच्या मागे लागले हे वाईट केले असे म्हणत नाही मात्र या सगळ्या कारकिर्दीत किती कोलांट्या उड्या त्यांनी मारल्या हे बघितले तर थक्क व्हायला होईल. सोनिया-राहुलच्या मागे लागले म्हणजे त्यांचा राजकीय दृष्ट्या उपयोग करून घेता येईल म्हणून त्यांना भाजपने पक्षात घेतले, राज्यसभेवर पण पाठवले. सुरवातीला मोदींचे कौतुक करणारे स्वामी आता मात्र मोदींना शिव्या घालत आहेत. असल्या बेभरवशाच्या माणसाचा पाहिजे तेवढा वापर करून घ्यावा आणि मग फेकून द्यावे असे मोदींना वाटले असेल तर त्यात फार काही चूक नसावे. हे भरकटलेले क्षेपणास्त्र नाही तर काय आहे? कधी कोणावर जाऊन आदळेल सांगता येणार नाही. अन्यथा मोदींविरोधात एक शब्दही कोणी बोलला तरी पूर्वेतिहास विसरून काँग्रेस आणि समस्त डापु गँग त्या व्यक्तीला आपलेसे करते पण स्वामींना मात्र काँग्रेसनेही चार हात दूरच ठेवले आहे. बादवे, तुम्हाला स्वामी आणि रघुराम राजन या दोघांविषयीही त्यांच्या विद्वत्तेमुळे आदर आहे असे मिपावरच वाचल्याचे आठवते. पण स्वामी आणि राजन यांचेही जमत नाही त्याचे काय? कार्ती चिदंबरमच्या सिंगापूरमधील बँक खात्यांची माहिती रघुराम राजन यांनी रिझर्व बँकेचे गव्हर्नर असताना दडवून ठेवली म्हणून स्वामी रघुराम राजनवर खार खाऊन आहेत. रघुराम राजन मुळात अर्थशास्त्रज्ञ नाहीतच असा त्यांचा दावा आहे. मग एकाच वेळेस या दोघांविषयी आदर असलेले बघून इतरांनाही ठसका लागावा का? :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

आपल्याला अर्थमंत्री करावे ही

श्रीगुरुजी
Tue, 05/06/2025 - 10:14 नवीन
आपल्याला अर्थमंत्री करावे ही स्वामींची मागणी वाजपेयी व मोदी या दोघांनीही धुडकावल्याने ते दोघांच्याही विरोधात गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

<पण स्वामी आणि राजन यांचेही

युयुत्सु
Tue, 05/06/2025 - 10:27 नवीन
<पण स्वामी आणि राजन यांचेही जमत नाही त्याचे काय?> दोन विद्वानांचे पटले नाही तर त्यात नवल काय? पटले तरच नवल म्हणायचे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

हो ना

सुबोध खरे
Tue, 05/06/2025 - 11:46 नवीन
हो ना आपणच सर्वज्ञ म्हटल्यावर दुसऱ्याच्या ज्ञानाबद्दल शंका येणारच. आणि दोघे अशाच संस्थात काम करत होते नागुणी गुणिनं वेत्ति गुणी गुणिषु मत्सरी। गुणी च गुणरागी च विरलः सरलो जनः। गुणहीन लोक गुणवान माणसांचे गुण जाणू शकत नाहीत. गुणी माणसे इतर गुणी माणसांचा द्वेष करतात स्वतः; गुणी असून इतर माणसांच्या गुणांचा आदर करणारे सज्जन फारच दुर्मिळ असतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

बाकी ह्याच सुब्रह्मण्यम

अमरेंद्र बाहुबली
Tue, 05/06/2025 - 13:12 नवीन
बाकी ह्याच सुब्रह्मण्यम स्वामीनी चीनने केलेला हल्ला नी काबीज केलेली भारताची जमीन पुराव्यानीशी दाखवून मोदी सरकारला उघडे पाडले होते ना? ससुब्रह्मण्यम स्वामींचे देशप्रेम वादातीत आहे!
  • Log in or register to post comments

काय तेच तेच खोटं बोलता नेहमी?

टीपीके
Tue, 05/06/2025 - 16:06 नवीन
काय तेच तेच खोटं बोलता नेहमी? जरा नवीन तरी खोटं बोला. इतके वेळा उघडे पडलात तरी तेच. कोणता पुरावा? तो कोणी, तुम्ही आणि राऊतांनी मान्य केला की झाले का? निदान तुमच्या राजमाता आणि राजपुत्रांवरची केस कोर्टात तरी उभी आहे, हो ह्याच स्वामींनी टाकलेली, त्याबद्दल काय मत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

इतके वेळा उघडे पडलात तरी तेच.

श्रीगुरुजी
Tue, 05/06/2025 - 16:17 नवीन
इतके वेळा उघडे पडलात तरी तेच. जो मुळातच कायम वस्त्रहीन अवस्थेत असतो, त्यास उघडे पडण्याची भीति नसते. बघणाऱ्यांनाच किळस वाटून ते दूर पळतात. यातच त्याचा विजय असतो. सातत्याने खोटे आरोप करणे, मुर्खासारखे असंबद्ध बरळणे, आपले अज्ञान दाखवून गाढवपणा करणे, स्वत:चे वारंवार हसू करून घेणे यावर कोणतेही उपचार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके

फक्त सुभ्रमण्यम स्वामी china

अमरेंद्र बाहुबली
Tue, 05/06/2025 - 16:57 नवीन
फक्त सुभ्रमण्यम स्वामी china असे गुगलवर लिहिले तरीही बक्कळ लिंक आहेत. पण तुम्ही, गुर्जी आणी मोदी मान्य करत नाही म्हणजे चीनने भूमी बळकावली नाही असे होत नाही! सत्याचा साथ द्या आपल्या लाडक्या नेत्याचा आदर्श ठेऊ नका, त्याच्या डिग्रीपासून भिक मागण्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीवर वाद आहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

महाराष्ट्रात ४ महिन्यांच्या

श्रीगुरुजी
Tue, 05/06/2025 - 15:25 नवीन
महाराष्ट्रात ४ महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांची (महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती इ.) निवडणूक घेण्याची आज्ञा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. अर्थात पूर्वीही अशीच आज्ञा उच्च न्यायालयाने देऊनही सरकारने ती आज्ञा धुडकावली होती. महाराष्ट्रातील सर्व महापालिकांची मुदत संपून तीन वर्षांहून अधिक काळ लोटलाय. जिल्हा परिषद, पंचायत समिती इ. मुदत संपून त्याहून जास्त काळ लोटलाय. परंतु पराभवाच्या भीतीने मविआ व युती सरकारने आजतागायत वेगवेगळी कारणे पुढे करून निवडणूक आजवर टाळली आहे. आतासुद्धा काहीतरी वेगळी कारणे पुढे आणून निवडणूक घेतली जाणार नाही.
  • Log in or register to post comments

सुब्रमण्यम स्वामी आसाराम बापूंना आजही निर्दोष मानतात

मारवा
Tue, 05/06/2025 - 19:02 नवीन
किमान एका न्यायालयाने सर्व पुरावे साक्ष तपासून न्यायालयीन कार्यवाही रीतसर पूर्ण करून आसारामबापू ला दोषी मान्य करून बलात्कारासारख्या अत्यंत गंभीर गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे. याच आसारामबापूचे वकीलपत्र स्वामी यांनी घेतलेले होते. अर्थातच हा त्यांचा अधिकार मान्य आहेच. पण ते घेऊनही स्वामी आसारामबापूला शिक्षा होण्यापासून पासून वाचवू शकले नाहीत हे देखील सत्य आहे. माझ्या अल्प माहितीप्रमाणे ते आजही आसाराम बापूंना निर्दोष मानतात ते एक षडयंत्राचा बळी आहेत वगैरे सुद्धा ते बोलत असतात. स्वामी हे निःसंदिग्ध विद्वान गृहस्थ आहेत. चीन ने बळकावलेल्या भारतीय जमिनी संदर्भातही त्यांनी माहिती कायद्या द्वारे माहिती .उलट नाही यासाठी केस दाखल केलेली आहे. अजून मात्र माझ्या माहितीप्रमाणे ते हा दावा सिद्ध करू शकलेले नाहीत. यामध्ये सरकार माहितीच्या कायद्या अंतर्गत त्यांना माहिती देत नाही असा त्यांचा दावा प्रलंबित आहे. सरकार आले apyash लपविण्याचा प्रयत्न करत आहे व माहिती रोखत आहे असे प्रथमदर्शनी मत आहे. पुढे जसे जसे सत्य बाहेर येईल तेव्हा त्यांच्या दाव्यातील साऱ्या बाहेर येईलच. एकंदरी स्वामी चे आजपर्यंतचे वर्तन बघितल्यास मला ते अत्यंत विद्वान, प्रवाहा विरोधात जाणारे धाडसी, परखड व unapologetic असे व्यक्त्ती आहेत.च बरोबर अतिशय विक्षिप्त ,अस्थिर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सहसा मुद्द्यांना त्यांच्या logical conclusion पर्यंत नेण्याअगोदर सोडून देणारे , बेभरवशाचे misguided missile वाटता. ज्यांनी आपले उपद्रव मूल्य नक्कीच सिद्ध केलेले आहे. पण समाजाला फायदा होण्यासारखे भरीव कार्य न होता त्यांचा ऊठवलेला मुद्दा हा फक्त या किंवा त्या राजकीय पक्षाला मात्र उपयुक्त किंवा उपद्रवी वेळोवेळी ठरत असतो. त्याव्यतिरिक्त substantial असे काही ते करत नाही. कारण तो पर्यंत त्यांचा लाडका त्यांचा शत्रू झालेला असतो ,mood swing झालेला हा गाडी मग नवा मुद्दा नवा भिडू नवा राज खेळून स्वतःची पोळी भाजायला पुढे सरकतो. त्यामुळे ते एक sensational trolling पेक्षा जात काही साध्य करत नाहीत.
  • Log in or register to post comments

सरकार आले apyash लपविण्याचा

अमरेंद्र बाहुबली
Tue, 05/06/2025 - 19:19 नवीन
सरकार आले apyash लपविण्याचा प्रयत्न करत आहे नालायक देशद्रोही लोक चीनने बळकावलेल्या जमिनीची माहिती देत नाहीयेत ह्याचा अर्थ स्पष्ट आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

अमरेंद्र सरकारचा माहिती देण्यास टाळाटाळ हा नक्कीच गंभीर.आहे.

मारवा
Tue, 05/06/2025 - 19:36 नवीन
सरकार चीन संदर्भातील जमिनीची माहिती देण्यास विलंब / टाळाटाळ करीत आहे. असे स्वामी यांच्या याचिकेवरून दिसत आहे. आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे असे प्रथमदर्शनी तरी.माझे.मत आहे. संशयाला जागा आहे आहे योग्य वाक्य आहे. मात्र अजून जोपर्यंत याचा अंतिम निर्णय येत नाही किंवा court या संदर्भात आदेश देत नाही तो पर्यंत यापुढील निष्कर्षावर अगोदरच jump घ्यावी यात काही तथ्य नाही. कारण माझ्या अल्प माहिती प्रमाणे डिफेन्स संदर्भातील आणि राष्ट्रीय सुरक्षा संदर्भातील माहिती मागण्याचा अधिकारी हा कायद्याने दिला नाही..मात्र.मला याची सखोल.माहिती नाही म्हणून.मी ठोस निकाल येई पर्यंत वाट बघणे पसंत करेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

असत्य आरोप केल्याचे स्वामींनी

श्रीगुरुजी
Tue, 05/06/2025 - 20:07 नवीन
असत्य आरोप केल्याचे स्वामींनी मान्य केले. शेवटपर्यंत वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

सुब्रह्मण्यम् स्वामी - “Today

श्रीगुरुजी
Tue, 05/06/2025 - 20:50 नवीन
सुब्रह्मण्यम् स्वामी - “Today I met Tapir Gao BJP LS MP of Arunachal. He told me AP people wanted that I also focus on Arunachal. He told me that China PLA has already crossed McMahon Line in three parallel columns halfway down south of the State. Early next year I will go to AP.” टापिर गाओ - “I met @Swamy39 in Central Hall, Parliament on 2 Dec at 10:35 AM, when he asked about Chinese intrusion I told him that during 1962 war China occupied 2-3 locations during Congress regime but no fresh incursion has taken place during Modi regime; unfortunately he has misquoted me,” No sooner was Swamy reprimanded by the Arunachal MP for misquoting him, the former gave an extremely lame reply to justify his actions. He Tweeted that “did not state any date except to say that China had already occupied territory.” He further wrote: “Even if China had occupied it in 1962 and had built pucca villages thereafter why were we sleeping since 2014 and 18 one to one meetings? Was it ever raised with Xi?” Swamy offered no explanation as to why he had misquoted the Arunachal Pradesh MP. While defending himself, he said that Gao had not mentioned a “date” which seems like an untenable explanation given that Gao said specifically that he mentioned “Congress regime”. Even if we consider this as miscommunication, it does not explain why Swamy lied and claimed that Gao had told him that the people of Arunachal Pradesh want him to personally get involved.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सुब्रह्मण्यम् स्वामी - “Today

श्रीगुरुजी
Tue, 05/06/2025 - 20:50 नवीन
सुब्रह्मण्यम् स्वामी - “Today I met Tapir Gao BJP LS MP of Arunachal. He told me AP people wanted that I also focus on Arunachal. He told me that China PLA has already crossed McMahon Line in three parallel columns halfway down south of the State. Early next year I will go to AP.” टापिर गाओ - “I met @Swamy39 in Central Hall, Parliament on 2 Dec at 10:35 AM, when he asked about Chinese intrusion I told him that during 1962 war China occupied 2-3 locations during Congress regime but no fresh incursion has taken place during Modi regime; unfortunately he has misquoted me,” No sooner was Swamy reprimanded by the Arunachal MP for misquoting him, the former gave an extremely lame reply to justify his actions. He Tweeted that “did not state any date except to say that China had already occupied territory.” He further wrote: “Even if China had occupied it in 1962 and had built pucca villages thereafter why were we sleeping since 2014 and 18 one to one meetings? Was it ever raised with Xi?” Swamy offered no explanation as to why he had misquoted the Arunachal Pradesh MP. While defending himself, he said that Gao had not mentioned a “date” which seems like an untenable explanation given that Gao said specifically that he mentioned “Congress regime”. Even if we consider this as miscommunication, it does not explain why Swamy lied and claimed that Gao had told him that the people of Arunachal Pradesh want him to personally get involved.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

एस-४००

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 05/08/2025 - 16:57 नवीन
पाकड्यांनी काल रात्रीपासून भूज, श्रीनगर, अवंतीपूर, पठाणकोट, अमृतसर वगैरे १५ शहरांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करायचा प्रयत्न केला त्यापैकी एकही क्षेपणास्त्र जमिनीवर पोचू शकले नाही. आपण रशियाकडून घेतलेल्या एस-४०० यंत्रणेने ती सगळी क्षेपणास्त्रे हवेतच उडवली. आणि हो... त्याच तथाकथित विद्वान सुब्रमण्यम स्वामींनी मोदी सरकारने एस-४०० विकत घ्यायच्या निर्णयाला विरोध केला होता. https://www.jansatta.com/national/subramanian-swamy-hits-out-modi-govt-asked-except-handing-out-generous-commissions-does-s400-have-any-other-advantage/2387090/ हे असले विद्वान. काय उपयोग असल्या विद्वानांच्या विद्वत्तेच्या? की मोदी आपल्याला विचारत नाहीत, आपल्याला पाहिजे होते ते अर्थमंत्रीपद दिले नाही या रागातून उगीच काहीतरी बडबडायचे म्हणून ते बडबडत होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

श्रीगुरुजी तुम्ही दिलेली लिंक शेवटपर्यंत पुर्ण वाचली.

मारवा
Tue, 05/06/2025 - 21:18 नवीन
तुम्ही दिलेल्या लिंक वरून तापीर यांच्या विधानाचा पुर्ण विपर्यास स्वामी यांनी केला असे स्पष्ट आहे. मात्र इथे च प्रकरण स्वामींनी संपलेले आहे असे नाही. तुम्ही दिलेली माहिती 2021 च्या कालातील.आहे. यानंतर स्वामिनिन्हे चायनीज land. acquisition चे प्रकरण (तरी) नेटाने लावून धरलेले दिसते आहे . यानंतरच स्वामी यांनी माहिती अधिकाराचा वापर करून सरकार कडून चीन ने आपली नेमकी किती जमीन विशेषतः 2014 नंतर बळकावली याची माहिती मागण्याचा जोरदार प्रयत्न केलेले दिसत आहे. अनेक सरकारी खात्यांनी त्यांना माहिती देण्यास टाळाटाळ केलेली आहे. त्यावर स्वामी यांनी पुन्हा माहिती आयोग कडे अपील सुद्धा केले. त्यानंतर मला या संदर्भात जी सर्वात ताजी अलीकडील माहिती मिळाली ती इथे आहे. त्यानुसार ऑगस्ट 2024 मध्ये ही माहिती स्वामी यांना पुरविण्याचे आदेश देण्यात आले होते. The contentious issue of the amount of Indian land ceded to China, which is guarded like a top secret but strongly taken up by veteran politician Dr Subramanian Swamy, led to the central information commissioner (CIC), last week, ordering the public information officer (CPIO) of the ministry of external affairs (MEA) to furnish complete information by the third week of August. यासाठी स्वामी यांनी दोन अपील केले होते Dr Swamy also got vague replies when he filed his first appeal with the first appellate authority (FAA). त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी दुसऱ्यांदा अपील केले या संदर्भात अजून एक खुलासा मला झाला तो असा की ही माहिती देण्यात कायद्याप्रमाणे अडसर नाही. म्हणजे ही देण्यायोग्य असलेली माहिती आहे. शिवाय अमुक.माहिती जर दिली नाही तर तसे का याचे स्पष्टीकरण सुद्धा द्यावं लागते. हे स्वतः आयोगाने CIC नेच आदेशात म्हटलेले आहे ते असे Aggrieved and dissatisfied, Dr Swamy filed a second appeal. CIC Samariya observed in his order that the contention of Dr Swamy was that “The information sought is not barred from disclosure under section 8(1) of the RTI Act and even if the information sought falls within any of the exceptions, the PIO was obliged to furnish a clear rationale for rejection as per section 7(8)(i) of the Act. He averred that information had been denied to him in violation of the provisions of the RTI Act.” आता CIC ने हा सुस्पष्ट आदेश की ही हवी असलेली माहिती स्वामी यांना द्या असा मंत्रालयाला दिलेला होता आणि हा आदेश ऑगस्ट 2024 मध्ये दिलेला होता. ही सर्व लिंक वाचून मोठ्या प्रमाणात सरकारने माहिती देण्यास टाळाटाळ केली असे स्पष्ट दिसून येत आहे . ही लिंक पूर्ण वाचा यात उत्तम.माहिती आहे. https://www.moneylife.in/article/cic-orders-ministry-of-external-affairs-to-provide-information-to-subramanian-swamy-on-extent-of-land-ceded-to-china/74790.html आता ऑगस्ट 24 ते आज मे 25 या पुढील.9 महिन्यात या आदेशाचे काय झाले ?माहिती मिळाली का नाही ? या बद्दल मला काहीही माहिती नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

तुम्ही दिलेल्या लिंक वरून

श्रीगुरुजी
Tue, 05/06/2025 - 21:29 नवीन
तुम्ही दिलेल्या लिंक वरून तापीर यांच्या विधानाचा पुर्ण विपर्यास स्वामी यांनी केला असे स्पष्ट आहे. मात्र इथे च प्रकरण स्वामींनी संपलेले आहे असे नाही. तुम्ही दिलेली माहिती 2021 च्या कालातील.आहे. लडाख आरोपही असेच खोटे आहेत हे सिद्ध होईल. ज्याने एकदा खोटे आरोप केले होते, त्याच माणसाच्या नवीन आरोपांना खूप महत्त्व देण्याची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

मिपावर २-३ जण अत्यंत

श्रीगुरुजी
Tue, 05/06/2025 - 22:06 नवीन
मिपावर २-३ जण अत्यंत मुर्खासारखे रोज २५-३० प्रतिसाद देत असतात. जवळपास सर्व मिपाकर त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करतात. स्वामींचं तसंच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

योगायोग?

चंद्रसूर्यकुमार
Tue, 05/06/2025 - 23:00 नवीन
त्या तिघांचेही (त्यातील एक उडाला) सदस्यनाम 'अ' च्या बाराखडीतील अक्षरांपासून सुरू होते हा योगायोग का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हहपुवा.

श्रीगुरुजी
Tue, 05/06/2025 - 23:19 नवीन
हहपुवा. योगायोग नाही. नियतीची योजना तशीच आहे. तिघेही 'अ'डाणी व 'अ'कलेचा भाग नाही आणि तिघांनीही 'अ'दानी, 'अं'बानी आणि 'अ'मितवर डूख धरलाय. त्यामुळे तिघांनाही मिपाकर 'अ'नुल्लेखाने मारतात. 'अ'ज्ञान, 'अ'शुद्ध व 'अ'र्वाच्य लेखन, 'अ'सत्य आरोप, 'आ' अक्षराने नाव सुरू होणारा नेता मूर्ख असला तरी त्याचे 'अं'धानुकरण हे यांचे व्यवच्छेदक लक्षण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

:) :)

चंद्रसूर्यकुमार
Tue, 05/06/2025 - 23:21 नवीन
:) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

CIC च्या.आदेशाची मूळ कॉपी आणि स्वामी ने मागितलेली माहिती

मारवा
Tue, 05/06/2025 - 21:31 नवीन
CIC च्या आदेशाची प्रत या लिंक.मध्ये दिलेली आहे. 4 आठवड्यात स्वामी यांना pointwise माहिती देण्याचे आदेश माहिती आयोगाने मंत्रालयाला दिलेले आहेत शिवाय compliance केला याचा अहवाल सुद्धा सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. यानंतर काय आले ते माहिती मजकडे नाही पण इथपर्यंतचा स्वामी यांचा माहिती घेण्याचा प्रवास बघितला ते सरकारने जमीन गमावली तर नाही ना याची शंका अधिकच बळावली आणि म्हणूनच तर सरकार नामुष्की टाळण्यासाठी ही माहिती देण्यास विलंब करत आहे ? असा प्रश्न पडल्यास काही चूक. नाही. https://judicialquest.com/chinese-incursion-cic-directs-centre-to-furnish-rti-queries-on-chinese-incursions-filed-by-subramanian-swamy/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

आपल्याला अर्थमंत्री न

श्रीगुरुजी
Tue, 05/06/2025 - 22:03 नवीन
आपल्याला अर्थमंत्री न केल्याने स्वामी मोदींना त्रास देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. एकदा त्यांचा खोटेपणा उघडा पडला होता. त्यामुळे केंद्र सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. १९९१-९६ या काळात स्वामी तत्कालीन मुख्यमंत्री जयललिताच्या मागे हात धुवून लागले होते. एकदा ते मद्रासमध्ये असताना आज जयललिता आपल्याला अटक करणार ही बातमी समजल्याने ते घाईघाईने विमानतळावर जाऊन दिल्लीच्या विमानात जाऊन बसले. पोलिस विमानतळावर आले तेव्हा विमानोड्डाण झाले होते. त्यांच्या पाठोपाठ तामिळनाडू पोलिस दुसऱ्या विमानाने दिल्लीत गेले. स्वामी आधी पोहोचले व घाईघाईने सभापतींना भेटून आपल्या अटकेपासून संरक्षण मिळविले व जयललिता संतापाने हात चोळत बसली. याच जयललिताला बरोबर घेऊन सोनिया गांधी व मायावतीच्या मदतीने स्वामींनी वाजपेयी सरकार पाडले कारण वाजपेयींनी त्यांना अर्थमंत्री केले नसल्याचा राग मनात होता. सोनिया गांधींनी पवारांप्रमाणे स्वामींनाही योग्य अंतरावर ठेवल्याने ते गांधी घराण्याच्या मागे हात धुवून लागले. मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनीही त्यांना अर्थमंत्री न केल्याने आता ते मोदींच्या मागे लागले आहेत. अश्यांना मोदी दुर्लक्ष करून मारतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

म्हणून चीनने भारतीय जमीन

अमरेंद्र बाहुबली
Tue, 05/06/2025 - 22:11 नवीन
म्हणून चीनने भारतीय जमीन बळकावली की नहाई ही माहिती देण्यास टाळाटाळ करणारे सरकार बरोबर ठरते का? जमीन बळकावली असल तर तसे ह्या खोटारड्या सरकारने स्पष्ट करावे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मॉक ड्रील

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/06/2025 - 19:05 नवीन
पहलगाम घटनेमुळे भारत पाकिस्तान संबंध ताणल्या गेले आहेत. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने सर्व राज्य व केंद्रशासीत प्रदेशांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी नागरिकांची सजगता आणि शहानपण वाढविण्यासाठी उद्या मॉकड्रीलचं नियोजन केलं आहे. देशभरात एकूण २४४ जिल्ह्यात हा युद्धसराव केला जाणार आहे. हवाई हल्ला झाल्यास इशारा देणारा भोंग्यांची चाचणी, नागरिकांनी बचाव कसा करावा, मोठ्या शहरात प्रदेशात एकाच वेळी अंधार ब्लॅक आउट करणे, अस्थापना स्थलांतर करणे, वगैरे करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यानंतर, आता मिपावर जी पिढी आहे ( अपवाद असतीलही ) त्या आपल्या सर्वांसाठी हा एक नवीन अनुभव आहे. युद्ध होईल ना होईल कसे होईल ते आज माहिती नाही, पण युद्धाची नांदी सुरु झाली असे वातावरण झालेले दिसत आहे. आंतरराष्ट्री परिस्थिती आणि देशाच्या निर्णयाची कसोटी लागणार आहे. मॉकड्रीलच्या निमित्ताने आठवण होते ती करोना काळात भारतीय लोकांनी जो अफाट कल्पना लढवल्या होत्या तसे काही होणार नाही अशी अपेक्षा. उद्या सायंकाळपर्यंत अनेक अनुभव आपल्याला समलेले असतील. पाहिलेल्या अनुभवलेल्या गोष्टींचं आदानप्रदान करुया असे वाटले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

"युद्धाची तयारी चालू आहे"

कंजूस
Tue, 05/06/2025 - 21:05 नवीन
"युद्धाची तयारी चालू आहे" १.अशी कुठेही गांभिर्याने चर्चा करत नाहीत. २. शेअर मार्केटवर काही परिणाम? ३. चानेलवर बातम्या आहेत की मंत्री मंडळाच्या बैठका सुरू आहेत. ४. सावधान राहण्याचे आदेश आलेत आणि उद्या तालीम होणार असं टीव्हीवरून कळतंय. ५. मुख्य म्हणजे कोणत्या भारत सरकारच्या साईटवर याबद्दल लिहिलं आहे? गृह मंत्रालयच्या साइटवर ? कुणाला सापडले का? Ministry of Home affairs किंवा pib.gov.in?
  • Log in or register to post comments

युद्धाच्या फक्त वल्गना आहेत

अमरेंद्र बाहुबली
Tue, 05/06/2025 - 21:19 नवीन
युद्धाच्या फक्त वल्गना आहेत काहीही होणार नाहीये, युद्ध झाले तर अदाणीचे शेअर्स पडतील त्यामुळे अदाणी काही युद्धासाठी हिरवा कंदील दाखवणार नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

+१.

कानडाऊ योगेशु
Tue, 05/06/2025 - 23:09 नवीन
+१. आय.पी.एल जोरात सुरु आहे. ते सामने पाहताना देशात अशी काही युध्दजन्य परिस्थिती असेल अशी पुसटशीही शंका येत नाही. केवळ वातावरण निर्मिती करण्याचा हेतु दिसतो आहे सरकारचा. मागे मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्री असताना त्यांनी एक विधान केले होते कि बर्याच दिवसात युध्द न झाल्याने सैन्याची क्रयशक्ती कमी झाली आहे. कुणा एका सामाजिक विचारवंतानेही युध्दे ही एकुण प्रगतीसाठी आवश्यक आहेत असे विधान ही केल्याचे वाचल्याचे आठवते. माझ्या मते युध्द हे काही होणार नाही पण त्यानिमित्ताने खुंटा हलवुन बळक्ट केला जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

-१

चंद्रसूर्यकुमार
Tue, 05/06/2025 - 23:15 नवीन
युध्द होईलच असे खात्रीने कोणीच बोलू शकणार नाही. मात्र आय.पी.एल जोरात चालू आहे म्हणजे युध्दजन्य परिस्थिती नाही आणि त्यामुळे युध्द होणार नाही असे म्हणता येणार नाही. दुसरे महायुध्द सुरू झाले १ सप्टेंबर १९३९ रोजी जर्मनीने पोलंडवर हल्ला केल्यापासून. त्याच्या चारच दिवस आधी- म्हणजे २७ ऑगस्टला वॉर्सामध्ये पोलंड विरूध्द हंगेरी असा फुटबॉलचा सामना झाला होता आणि त्यात पोलंडने ४-२ असा विजय मिळविल्यानंतर पोलिश लोकांनी आनंदही व्यक्त केला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

इंदिरा गांधी असत्या तर

अमरेंद्र बाहुबली
Tue, 05/06/2025 - 21:54 नवीन
इंदिरा गांधी असत्या तर आतापर्यंत पाकिस्तान बेचिराख असता, मिस यू इंदिराजी! _/\_
  • Log in or register to post comments

ऑपरेशन सिंंदुर !!

सुक्या
Wed, 05/07/2025 - 04:56 नवीन
ऑपरेशन सिंंदुर !! भारत माता की जय!!!
  • Log in or register to post comments

(No subject)

वामन देशमुख
Wed, 05/07/2025 - 07:05 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

इस्लामाबादहून सीएनएन

श्रीगुरुजी
Wed, 05/07/2025 - 07:39 नवीन
इस्लामाबादहून सीएनएन प्रतिनिधीकडून प्रत्यक्ष वृत्तांत - https://edition.cnn.com/2025/05/06/world/video/india-military-operation-against-pakistan-breaking-vrtc
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा