✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ताज्या घडामोडी- मे २०२५

च
चंद्रसूर्यकुमार यांनी
Wed, 04/30/2025 - 19:30  ·  लेख
लेख
आधीच्या भागात ४००+ प्रतिसाद झाले म्हणून आणि मे २०२५ चा महिना सुरू व्हायला आणखी साडेचार तासच (मोजून २७० मिनिटे) बाकी आहेत तेव्हा ताज्या घडामोडींचा नवा धागा सुरू करत आहे. लोकप्रिय गायक अभिजीत सावंत २ मे रोजी 'जिची चाल तुरू तुरू' हे लोकप्रिय गाणे म्हटलेला अल्बम रिलीज करणार आहे. ते गाणे जुन्याच चालीत असेल की रिमिक्स असेल ही चर्चा अभिजीत सावंतच्या चाहत्यांमध्ये रंगली आहे. https://marathi.indiatimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/bigg-boss-marathi-season-5-fame-abhijeet-sawant-new-marathi-song-chal-turu-turu-releasing-soon/articleshow/120764486.cms
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
31590 वाचन

💬 प्रतिसाद (140)

प्रतिक्रिया

उठा उठा सकाळ झाली इ वी एम

सौंदाळा
Wed, 05/07/2025 - 08:13 नवीन
उठा उठा सकाळ झाली इ वी एम खोटे याप्रमाणे लष्करी कारवाई वर पुरावे मागायची वेळ झाली. हे पुरावे आम्हाला मान्य नाहीत. मेलेल्या अतिरेक्यांनी स्वतःच्या तोंडाने सांगितले पाहिजे की आम्ही मिसाईल हल्ल्यात मेलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

लंडनमध्ये महिनाभर चंगळ करीत

श्रीगुरुजी
Wed, 05/07/2025 - 08:28 नवीन
लंडनमध्ये महिनाभर चंगळ करीत बसलेल्या उठा व कुटुंबाला लंडनमधील वास्तव्य वाढविण्यासाठी कारण मिळाले.
  • Log in or register to post comments

पाकिस्तानवर हल्ला करण्याचा

श्रीगुरुजी
Wed, 05/07/2025 - 08:30 नवीन
पाकिस्तानवर हल्ला करण्याचा सल्ला मीच दिला होता. - आदरणीय वंदनीय सर्वज्ञानी माननीय श्री. शरदचंद्रजी पवारसाहेब
  • Log in or register to post comments

आता भारतीय लष्कराचे अभिनंदन

सौंदाळा
Wed, 05/07/2025 - 10:09 नवीन
आता भारतीय लष्कराचे अभिनंदन करतील सर्व विरोधी पक्ष. कारवाई केली नाही की मोदींना शिव्या आणि कारवाई केली की 'फक्त' लष्कराची तारीफ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

पण मोदीनी तर सगळं काही

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/07/2025 - 10:45 नवीन
पण मोदीनी तर सगळं काही सैन्यावर सोपवले होते ना? मग सैन्याचेच अभिनंदन करू की! मोदींचे का करावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

२२ एप्रिल २०२५,"पहलगाम हल्ला

कंजूस
Wed, 05/07/2025 - 08:46 नवीन
२२ एप्रिल २०२५,"पहलगाम हल्ला झाला अतिरेक्यांकडून ", "अतिरेकी पाकिस्तानचे आहेत याचे पुरावे आहेत" अशा नोंदी भारत सरकारच्या साइटवर असायला हव्या होत्या. एवढं तरी करा.
  • Log in or register to post comments

अगदी बरोबर

आग्या१९९०
Wed, 05/07/2025 - 08:51 नवीन
अगदी बरोबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

काका अश्या इंटेलेक्चुअल

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/07/2025 - 09:07 नवीन
काका अश्या इंटेलेक्चुअल मागण्या करायच्या नसतात हो! मोदीनामाच्या चिपळ्या धरून जप करायचा असतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

(No subject)

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/07/2025 - 09:19 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

अंतरराष्ट्रीय बातम्यात दिसत

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/07/2025 - 10:44 नवीन
अंतरराष्ट्रीय बातम्यात दिसत आहे की भारतीय सैन्याने हल्ला केला आहे, भारतीय सैन्याचे खूप खूप अभिनंदन! चांगले नेतृत्व देशाला असते तर भारतीय सैन्याने २३ एप्रिल रोजी हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानात घुसून पाकड्याना चोपले असते ह्याबाबतीत काहीही शंका नाही! जय हिंद जय भारत!
  • Log in or register to post comments

हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी?

सुबोध खरे
Wed, 05/07/2025 - 19:21 नवीन
हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी? एवढ्या उशिरा ? मी तर म्हणतो कि हल्ला होणार त्याच्या एक दीड वर्ष अगोदरच पाकडुयाना चोपायला पाहजे होतं. म्हणजे मग असं २४० वर लटकत बसायला लागलं नसतं आपलं काय मत भुजबल बुवा?
  • Log in or register to post comments

Act of war

चंद्रसूर्यकुमार
Sat, 05/10/2025 - 17:24 नवीन
यापुढे पाकिस्तानातील दहशतवाद्यांकडून भारतावरील झालेला कोणत्याही हल्ल्याला act of war मानले जाईल आणि त्याप्रमाणे उत्तर दिले जाईल असे केंद्र सरकारने आज जाहीर केले आहे.
  • Log in or register to post comments

स्टॉक मार्केट आज तीन टक्के

वामन देशमुख
Mon, 05/12/2025 - 12:32 नवीन
स्टॉक मार्केट आज तीन टक्के उसळलं आहे. ज्यांनी पुट्स् विकले होते त्यांची चांदी झाली आहे!
  • Log in or register to post comments

मोदीनी भेट दिलेले देश

कपिलमुनी
Mon, 05/12/2025 - 19:46 नवीन
Prime Minister Narendra Modi has made 88 foreign trips, visiting 73 countries since assuming office in May 2014, as of May 2025. ### List of Countries Visited by Narendra Modi (2014–May 2025): 1. Afghanistan 2. Australia 3. Bahrain 4. Bangladesh 5. Belgium 6. Bhutan 7. Brazil 8. Canada 9. China 10. Fiji 11. France 12. Germany 13. Greece 14. Guyana 15. Indonesia 16. Iran 17. Ireland 18. Israel 19. Italy 20. Japan 21. Jordan 22. Kazakhstan 23. Kenya 24. Kuwait 25. Kyrgyzstan 26. Laos 27. Malaysia 28. Maldives 29. Mauritius 30. Mexico 31. Mongolia 32. Mozambique 33. Myanmar 34. Nepal 35. Netherlands 36. Nigeria 37. Pakistan 38. Palestine 39. Papua New Guinea 40. Philippines 41. Poland 42. Qatar 43. Russia 44. Rwanda 45. Saudi Arabia 46. Seychelles 47. Singapore 48. South Africa 49. South Korea 50. Sri Lanka 51. Sweden 52. Switzerland 53. Tajikistan 54. Tanzania 55. Thailand 56. Turkey 57. Turkmenistan 58. Ukraine 59. United Arab Emirates (UAE) 60. United Kingdom (UK) 61. United States (USA) 62. Uzbekistan 63. Vietnam 64. Egypt 65. Ethiopia 66. Finland 67. Hungary 68. Iceland 69. Latvia 70. Lithuania 71. Morocco 72. Portugal 73. Spain
  • Log in or register to post comments

यात ताज्या घडामोडी- मे २०२५ चा संदर्भ काय?

स्वधर्म
Mon, 05/12/2025 - 21:24 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

उद्या ५०% पोर्टफोलिओ विकणार.

आग्या१९९०
Mon, 05/12/2025 - 23:28 नवीन
उद्या ५०% पोर्टफोलिओ विकणार. ट्रम्प बेभरोशाचा आहे
  • Log in or register to post comments

प्रॉफिट बुकिंग केले आणि

आग्या१९९०
Tue, 05/13/2025 - 10:00 नवीन
प्रॉफिट बुकिंग केले आणि मार्केट कोसळले. पुढील सहा महिने खरेदी बंद.
  • Log in or register to post comments

कारवाई केली तर त्याचे श्रेय

विजुभाऊ
Tue, 05/13/2025 - 14:44 नवीन
कारवाई केली तर त्याचे श्रेय सैन्याला. आणि नाही केली तर त्याचे श्रेय पंतप्रधानाना!!!!!! हेच वाक्य जरा थोडे फिरवून लिहूया कोविड ची परिस्थिती नीट हाताळली याचे श्रेय मुंबईतील सफाई कर्मचारी / डॉ़क्टर्स / दवाखाने / महापालीका आरोग्य कर्मचारी याना द्यावे आणि जर त्यात काही कुसूर राहीली त्र त्याचे श्रेय जगातले सर्वात उत्तम मुख्यमंत्री ( *** &&& ) याना द्यावे मुंबईचे रस्ते गटारे आणि मिठी नदी स्वच्छ झाली तर त्याचे श्रेय सफाई कामगाराना द्या आणि नाही झाली तर त्याचे श्रेय उबाठा या ना द्यावे. ही वाक्येही तशीच म्हणा पाहू एकदा अर्थात ते तसे म्हणणार नाहीत कारण त्यांचे गुरुजी महानआचार्य विश्वप्रवक्ते आहेत. रच्याकाने : भारतीय सैन्याचे आणि त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देणार्‍या राजकीय नेतृत्वाचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

१९७१ मध्ये बांगला देशाचे

सुबोध खरे
Tue, 05/13/2025 - 18:58 नवीन
१९७१ मध्ये बांगला देशाचे युद्ध झाले आणि पाकिस्तानचा सपशेल पराभव झाला. तेंव्हा त्याचे श्रेय लष्कराला दिले गेले तसेच श्रीमती इंदिरा गांधी याना पण दिले गेले. एवढा दिलदार पणा मोदी भक्तांना आहे. पण आता झालेल्या युद्धात पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याचे श्रेय लष्कराबरोबरच श्री मोदी याना देण्याचा दिलदारपणा दळभद्री मोदिरुग्णांना कसा येणार? त्यामुळे त्यांची रडारड चालू आहे आणि चालूच रहाणार
  • Log in or register to post comments

आक्षेपार्ह विधान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 05/15/2025 - 08:58 नवीन
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी मध्य प्रदेशचे मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते कुंवर विजय शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिले. शहा यांचे विधान अपमानास्पद आणि देशाच्या एकात्मतेसाठी धोकादायक असल्याचे सांगत मा.न्यायालयाने संताप व्यक्त केला. ''सार्वभौमत्व, शिस्त, त्याग, आत्मसमर्पण, शील, मान आणि अदम्य शौर्य याचं प्रतिबिंब असलेली सैन्यदले ही बहुधा शेवटची यंत्रणा असावी. शहा यांनी कर्नल कुरेशीबाबत बोलतांना अत्यंत घृणास्पद भाषेचा वापर केला आहे. शहा यांनी कुणाचे नाव घेतले नसले तरी, त्यांचे हे अक्षम्य विधान कर्नल कुरेशी यांच्याबद्दलच आहे -मध्यप्रदेश उच्चन्यायालय. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने या विधानाची स्वतःहून दखल घेतली हे विशेष. ( अधिक बातमी ) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने

रात्रीचे चांदणे
गुरुवार, 05/15/2025 - 09:16 नवीन
मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने या विधानाची स्वतःहून दखल घेतली हे विशेष तरी म्हणलं मध्यप्रदेश सरकार एवढं सक्रिय कसं काय? आणि तेही आपल्याच लोकांविरोधात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

(No subject)

अमरेंद्र बाहुबली
Fri, 05/16/2025 - 15:57 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

सोनाली कुलकर्णी

चंद्रसूर्यकुमार
Mon, 05/19/2025 - 14:32 नवीन
सोनाली कुलकर्णीने ती सई ताम्हनकरकडे कधीच जेवायला जाणार नाही असे जाहीर केले आहे. https://marathi.indiatimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/sonalee-kulkarni-decline-to-go-lunch-or-dinner-at-sai-tamhankar-home/articleshow/121264388.cms
  • Log in or register to post comments

तज्ज्ञांकडून माहिती अपेक्षित

कपिलमुनी
Tue, 05/20/2025 - 08:14 नवीन
राफेल आपल्याकडे कोड नसल्याने आपण आपली मिसाईल किंवा इतर मिसाईल लावू शकत नाही असे यात लिहिले आहे. असे असते का ? शिवाय टेक्नोलोजी ट्रान्स्फर झाली नाही का ?
  • Log in or register to post comments

आपण आपल्या ऍपल फोन वर

सुबोध खरे
Mon, 05/26/2025 - 12:42 नवीन
आपण आपल्या ऍपल फोन वर अँड्रॉइड मध्ये असलेली ऍप्स चालवू शकत नाही. कारण दोघांची कार्यप्रणाली ऑपरेटिंग सिस्टीम वेगळी आहे. त्याच प्रमाणे विमानातील क्षेपणास्त्रे आणि रडार चालवण्यासाठी जे सॉफ्टवेअर वापरले जाते ते प्रत्येक विमान क्षेपणास्त्र रडार मध्ये वेगळे आणि पेटंटेड असते. रफाल विमानाच्या सॉफ्टवेअरचे सोर्स कोड आपल्याला दिल्यास आपले संरक्षण तज्ज्ञ त्या विमानावर आपली अस्त्र किंवा निर्भय किंवा ब्रम्होस किंवा रुद्र हि क्षेपणास्त्रे अथवा सुदर्शन किंवा गौरव हे लेसर गाईडेड बॉम्ब बसवू शकेल. आपली भारतात निर्माण झालेली क्षेपणास्त्रे किंवा असे बॉम्ब फ्रान्सच्या तुलनेत एक पंचमांश किमतीत मिळतात. आणि महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्ष युद्ध सुरु झाल्यावर तुम्ही फ्रान्स वर अवलंबून राहत नाही. अमेरिका हा देशयुद्ध झाले कि सर्वप्रथम आपल्या सुट्या भागांवर निर्बंध घालतो त्यामुळे युद्ध कसे करायचे यावर ते नियंत्रण ठेवतात. यामुळेच भारताने शक्य असेलत तिथे अमेरिकैची शस्त्रास्त्रे घेणे नाकारलेले आहे. फ्रान्स असे निर्बंध टाकत नाही परंतु आपल्या मालाचा पुरेपूर पैसे वसूल केल्याशिवाय राहत नाही. युद्ध लांबले तर त्याचा खर्च अफाट वाढत जातो याशिवाय शस्त्रास्त्रे आयात करण्यासाठी लागणार वेळ काही वेळेस तुम्हाला महाग पडू शकतो यासाठी भारताचा आग्रह असतो कि सर्व सोर्स कोड असले कि आपली स्वयंनिर्मित अस्त्रे त्यावर बसवून आपल्याला पाहिजे तसे युद्दाहचे पारडे आपल्या बाजूने झुकवावे. रशिया हा आपला सर्व कालीन मित्र आहे त्यामुळे त्यांनी सुखोई आणि मिग २९ ची सोर्स कोडे आपल्याला दिलेली आहेत त्यामुळे भारत आपली अस्त्र ब्रम्होस त्यावर लावून युदधत वापरू शकतो. कारगिल युद्धात आपण अमेरिकन लेसर बॉम्ब्स मिरज २००० या फ्रेंच विमानां वर बसवून पाकिस्तानी चौक्या नष्ट केल्या होत्या यासाठी लागणारे कोड फ्रान्सने आपल्याला दिले नव्हते कारण त्यांना त्यांचे बॉम्ब विकायचे होते. परंतु इस्रायल या आपल्या दुसऱ्या मित्राने आपले कोड/ पॉड वापरून हे बॉम्ब टाकून युद्ध जिंकण्यासाठी अनमोल मदत केली होती. फ्रांस ला त्यांची मिटीओर क्षेपणास्त्रे स्काल्प बॉम्ब विकायचे आहेत आणि त्याशिवाय भारताला कोड दिले त्तर जगभर इतर राष्ट्रे पण अशी मागणी करतील. याशिवाय हा कोड दिला तर भारत आपले बॉम्ब आणि क्षपणास्त्रे इतर रफाल खरेदी करणाऱ्या राष्ट्रांना विकेल हि पण भीती त्यांना वाटते. यामुळेच आत्मनिर्भर होणे हा युद्धात अग्रेसर राहण्याचं सर्वात उत्तम उपाय आहे. हे आताच्या युदधाने आपण शिकलेला अनमोल धडा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

धन्यवाद

कपिलमुनी
Mon, 05/26/2025 - 20:34 नवीन
भारतात शस्त्र उत्पादन या क्षेत्रात झेप घ्यायला भरपूर स्कोप आहे. आय आय टी च्या धर्तीवर एखादी संस्था शस्त्र निर्मिती साठी चालू करायला हवी.. पोस्ट graduate कोर्स वगैरे ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आय आय टी मध्ये आणि आय आय टी

सुबोध खरे
Tue, 05/27/2025 - 09:45 नवीन
आय आय टी मध्ये आणि आय आय टी शी संलग्न असलेल्या संस्थात (ए आर डी इ , एच इ एम आर एल) असे अनेक अभ्यासक्रम आजही उपलब्ध आहेत. Core Competence of Armament Research & Development Establishment (ARDE) are: Weapon Systems; Aerodynamics and Ballistics; Air Delivered Munitions; Air Pilot Plant; Free Flight Artillery Rockets and Launcher Systems; Fuzes, Sensors and Safety Arming Devices; Ammunition; Piezo - Ceramics Development and Pilot Plant Production; Warheads for Missiles and Rockets; PGMS. High Energy Materials Research Laboratory (HEMRL) is one involved in basic and applied research in the area of high energy materials. HEMRL conducts R&D in formulation, design and development of propellants, high explosives, pyrotechnics, polymeric materials, liners/insulators, and other materials. These include studies on the physiochemical and combustion characteristics of materials, study of detonation phenomena and development of new systems. Explosives Research & Development Laboratory (ERDL), it was appropriately renamed as HEMRL on 1st March 1995 in order to cover entire R & D activities in all the wings of high energy materials like rocket and gun propellants, high explosives, pyrotechnics, pilot plant and instrumentation. Naval Materials Research Laboratory (NMRL)Naval Materials Research Laboratory (NMRL) has been working for providing technological solutions to Indian Navy concerning marine materials, corrosion protection and energy requirements. The focused R&D areas of NMRL are: Development of metallic, polymeric, ceramic and composite materials; sustainable energy technologies based on fuel cell and supercapacitors; hydrogen generation technology; materials for underwater acoustic stealth of submarines and surface warships; protection technologies for marine platforms and structures of Indian navy; functional ceramics and naval alloys; bio-remediation of marine environment; sustainable green technology for marine environment. Naval Science & Technological Laboratory (NSTL)Design, development and evaluation leading to production of Torpedoes, Mines, Targets, Decoys, Fire Control Systems and induction into services and establish test facilities for the same. आणि त्यातच आपले लष्करी शास्त्रज्ञ शिक्षण घेतात आणि तयार होतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

लाज ना शरम

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/20/2025 - 10:38 नवीन
कर्नल सोफीया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणारे भाजपचे मध्यप्रदेश मंत्री शहा यांची सर्वोच्च न्यायालयाने कानउघडणी केली. तुम्ही एक जवाबदार नागरिक असून तुमचे विधान संपूर्ण देशासासाठी लाजीरवाणे आहे, असे म्हणत त्यांचा माफीनामाही फेटाळुन लावला. आता माफी ही नकाश्रु आहेत. चौकशीसाठी विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश दिले. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने दखल घेतल्यानंतर हे महाशय सर्वोच्च न्यायालयात गेले होते. तिथे माफी मागितली पण माफिमधे प्रामाणिकपणाचा अभाव दिसतो, माफिची चित्रफित दाखवा आम्ही तुम्ही जे बोललात त्याची चित्रफित दाखवतो असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावले. मात्र अटक स्थगित राहील असेही सांगितले. पुढे सुनावणी अठ्ठावीस तारखेस आहे. आम्ही तुमच्या विधानाच्या चित्रफिती पाहिल्या आहेत. तुम्ही यापेक्षाही घृणास्पद भाषा वापरण्याच्या मार्गावर होतात पण, तुम्हाला योग्य शब्द सापडले नाहीत. संपूर्ण देशाला आपल्या सैन्याचा अभिमान आहे आणि तुम्ही हे विधान क्ले आहे. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. -सर्वोच्च न्यायालय. खरं म्हणजे, असे अनेक अडाणचोट भाजपमधे भरलेले आहेत. अधुन-मधुन आपलं ज्ञान ते दाखवत राहतात. आपली सत्ता आहे आणि आपण काहीही बोललो तरी चालते असा काहींचा समज झाला आहे. अशा लोकांना लाज ना शरम, ही अपप्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जनता सर्व पाहते वाचते आणि वेळ आली की लोकशाहीच्या माध्यमातून योग्य हिशेबही करते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

कशानेही फरक पडत नाही

स्वधर्म
Tue, 05/20/2025 - 15:46 नवीन
सर, तुंम्ही हे लिहिले आहे, पण भाजप आणि मोदी समर्थकांना कशाने फरक पडेल, हे अजून तरी कुणालाच कळलेले नाही. बोलण्याची, वागण्याची, प्रचारची कितीही खालची पातळी गाठली तरी ९९% समर्थक भाजपचेच बरोबर असे म्हणत राहतात. त्यांच्यावर कोणत्याही नवीन माहितीचा मुळी परिणामच होत नाही. अशी माहिती दिली कि ज्याने ती उघड केली त्या व्यक्तीवर व्यक्तीगत हल्ला करतात. देशद्रोही वगैरे. मोदी व शहा यांनी या बाबतीत जबरदस्त यश मिळवले आहे त्यामुळे त्यांना कसलीही भीती नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फर्क तो पडता है.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 05/25/2025 - 10:01 नवीन
सद्य सरकारला प्रेयसी समजून तिचं काहीही गोड माणून सतत चुंबनं घेणारा बांडगुळ भक्त ही गोबरयुगाची देण आहे, त्याला काही विलाज नाही. आपलं जगणं- आपलं मरणं, आपलं आरोग्य, आपलं शिक्षण, गनीमी मार्गाने वाढणारी जीवघेणी महागाई, वाढता भ्रष्टाचार, भान नसलेले राजकारणी, मंद मिडिया, आधुनिक जगाच्या विज्ञानाच्या सुसाट मार्गावर उभे केलेले नियम बाह्य उंच उंच धार्मिक गतिरोधकं, प्रगतीतील अडथळे पाहता, व्यवस्थेला सामान्य माणसाशी काही घेणे देणे उरलेले नाही. काही वाटूच नये अशी व्यवस्था उभी राहिली आहे. तटस्थ, असलेली माणसं दडपून जातात. आपल्याला करायचं मरु दे. सकाळी दुध घालणा-याने दुधात पाणी जास्त घातलं म्हणून हडकुळ्या दुधवाल्यावर आगपाखड करणारा सामान्य माणूस, सर्वार्थाने दिवसेंदिवस नागडा होत चालला आहे, तरी मुग गीळून गप्प बसून आहे. हे जसे समाजासाठी मारक तसे लोकशाहीलाही मारक आहे. देशभर असंख्य उलथा पालथी चालू आहेत, अशा वेळी खोट्या देशभक्तीच्या बुंदीलाडू मधे रमलेला माणूस कधीतरी जागा होईल हा आपल्याला विश्वास आहे. आपण आपलं लिहिते राहू द्या....फर्क तो पडताही है. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

माणून सतत चुंबनं घेणारा

रात्रीचे चांदणे
Sun, 05/25/2025 - 16:01 नवीन
माणून सतत चुंबनं घेणारा बांडगुळ भक्त ही गोबरयुगाची देण आहे कदाचित दुसरी बाजू पण असेलच की. आजचीच बातमी आहे जपानला मागे टाकत भारत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. स्मृती इरानीना हरवून राहुल गांधीना जिंकवणारे गोबरयुगातले आहेत की ३०२५ चे. समजा ते सध्या नसतील गोबर युगातले पण मग गेल्या पंचवार्षिक ला गोबर युगातच होते की अजून कुठं. बरं हे गोबर युग कस ओळखायचं? जिथं भाजप तिथंच का अजून काय ठोकताळे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जपान आणि भारत

कपिलमुनी
Sun, 05/25/2025 - 23:13 नवीन
जपान चे क्षेत्रफळ किती , लोकसंख्या किती .. आपले किती ? दरडोई उत्पन्न, खर्च, आयुष्यमान बघा हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

सहमत, तरीही इतके वर्ष GDP

रात्रीचे चांदणे
Sun, 05/25/2025 - 23:35 नवीन
सहमत, तरीही इतके वर्ष GDP मध्ये तो आपल्या पुढे होताच की. २०२७ मध्ये आपण जर्मनी ला माघे टाकणार तो पण असाच लहान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

खरी पोटदुखी

चंद्रसूर्यकुमार
Mon, 05/26/2025 - 11:47 नवीन
खरी पोटदुखी कोणती आहे हे कळले आहे ना? भारताने जपानला जीडीपीमध्ये मागे टाकले ते मोदींच्या काळात टाकले ही आहे. म्हणून मग जपानचा आकार किती, लोकसंख्या किती वगैरे प्रश्न सुचतात पण इतकी वर्षे- खरं तर इतकी दशके जपान आपल्यापेक्षा आकाराने आणि लोकसंख्येने तितकाच लहान असूनही जपानचा जीडीपी भारतापेक्षा जास्तच होते याकडे दुर्लक्ष केले जाते. भारताला विकसित देश बनवायचे स्वप्न नेहरूंपासून सगळ्याच पंतप्रधानांचे होते आणि देशाच्या कोणत्याही पंतप्रधानाचे ते स्वप्न असलेच पाहिजे. आपण विकसित वगैरे अजिबात नाही आणि त्या स्वप्नापासून आपण खूप लांब आहोत ही परिस्थिती आहे हे कोणीच नाकारू शकत नाही. मोदींनी त्या स्वप्नाला विश्वगुरू हे नाव दिले. मग काहीही खुट्ट झाले की हाच का तुमचा विश्वगुरू वगैरे प्रश्न विचारले जातात- जसे काही या लोकांना आपला देश विकसित व्हावा, वेगवेगळ्या क्षेत्रात आपला देश जगात पुढे जावा असे वाटतच नाही. आपल्या देशाचे चांगले व्हावे असे या टीकाकारांना वाटत नसावे असे मला तरी वाटत नाही. मात्र देशाचे चांगले मोदींच्या कार्यकाळात झाल्यास त्याचे श्रेय मोदींना मिळणार ही खरी पोटदुखी त्यांची असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

पहिला नंबर आणि मनकी बाते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/27/2025 - 09:13 नवीन
अध्यक्ष महोदय, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार जागतिक क्रमवारीत आपला भारताचा चौथा क्रमांक आला आहे, याचा पहिल्याछूट आनंदच झाला आहे, हे नम्रपणे नमूद करतो. आज उद्या भारत आर्थिक महासत्तेत क्रमांक एकावरही असेल आणि त्याचाही तेव्हा तितकाच आनंद असेल, हेही नम्रपणे नमूद करतो. भारताचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यात काही वाद नाही. प्रत्येक भारतीयाचं ते पहिलं स्वप्न असतं, आहे. सर्वप्रथम सर्वांचे अभिनंदन. अध्यक्ष महोदय, मी आपलं अन्य एका दुसऱ्या मुद्द्याकडे लक्ष वेधू इच्छितो. आपण चौध्या क्रमांकावर आहोत, तेव्हा देशाचा जीडीपी भागिले देशाची लोकसंख्या म्हणजे देशाचे दरडोई उत्पन्न. आज आपले दरडोई उत्पन्न बघितले तर, आपल्या देशाचा क्रमांक पहिल्या शंभरात तरी असेल की नाही याची शंका वाटते. आपण ज्या जपानला मागे टाकले त्या जपानच्या तुलनेत भारताचे प्रति व्यक्ती उत्पन्न बारा पट कमी आहे. देशातील काही दहा वीस टक्के श्रीमंत लोकांच्या जीडीपीमधील वाटा वाढला आणि सत्तर ट्क्केच्या तळातील लोकसंखेचा वाटा, वीस-तीस टक्के उद्योगधंद्यावाले म्हणजे आपले अदानी आणि तत्सम. आणि दुसरीकडे तळागाळातील शेतीसारखं क्षेत्र अजूनही अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे असून त्याचा आणि इतर उत्पन्नाचा परिणाम दिसत नाही, तो कमी आहे. ही जी उत्पन्नातील विषमता आहे आणि लोकसंख्या याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे, ते होत नाही, त्यामुळे तिकडे पहिला नंबर जरी आला तरी, दरडोई उत्पन्नाची स्थिती सुधारणे खुप गरजेचे आहे. अध्यक्ष महोदय, मूळ पोटदुखी जी आहे, त्या आजाराकडे लक्ष दिलं पाहिजे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

आम्ही उत्पन्न कितीही वर नेलं

सुबोध खरे
Tue, 05/27/2025 - 09:26 नवीन
आम्ही उत्पन्न कितीही वर नेलं तरी दर वर्षी "डोई" ची संख्याच इतकी वर नेतो आहोत कि काय बिशाद दर डोई उत्पन्न वर जाईल? समान नागरी कायदा आणायचा नुसता म्हटलं तरी लेफ्टिस्ट लिब्बू लोक आई मेल्यासारखे धाय मोकलून रडायला लागतात. तरी बरं हे घटनेच्या ४२ व्या कलमातच लिहिलेलं आहे. दोन मुलांच्या वर मुले नकोत म्हटलं कि त्यांना सर्वधर्मसमभाव न आठवता धार्मिक स्वातंत्र्य तेवढा आठवतं तळा गाळातील लोकांचा अंत्योदय तेंव्हाच होईल जेंव्हा त्यांच्या कुटुंबाच्या अमर्याद वाढणाऱ्या आकाराचा अंत होईल. सरकारनेच सर्व काही पुरवायचे लोकांनी स्वतः काहीही करायचे नाही या काँग्रेसी मनोवृत्तीचा अंत होईल तेंव्हाच आपल्या सकल उत्पन्ना बरोबर दरडोई उत्पन्नात भरघोस वाढ होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दरडोई उत्पन्न आणी करोना.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/27/2025 - 09:42 नवीन
डॉक्टर, आपण सर्व विषयात तज्ञ आहात त्यामुळे तुमचं जवळ जवलं सगळं बरोबरच असतं. लोकसंख्या वाढीला प.नेहरु आणि दरडोई उत्पन्न न वाढायला काँग्रेस जवाबदार आहेत, हे आता गोबरमान्य झालं आहे. =)) बाय द वे, ते करोना येतोय ठाण्या-मुंबईत रुग्ण वाढताहेत. काळजी कशी घ्यायची ? पण यावेळी तो टाळ्या, थाळ्या, दिवाबंद आणि प्रवासबंद करायचा उपाय नको. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मिपाचा दर्जा खालावत चाललाय का?

कर्नलतपस्वी
Mon, 05/26/2025 - 18:35 नवीन
सद्य सरकारला प्रेयसी समजून तिचं काहीही गोड माणून सतत चुंबनं घेणारा बांडगुळ भक्त ही गोबरयुगाची देण आहे, अती हुच्च शिक्षीत(?)प्रज्ञावंताकडून सटिक अलंकारिक मुक्ताफळं!!!! भाषा श्रीमंतीच? म्हणावी लागेल....... बरेच लोकांना नेमके असेच वाटत असावे पण काय करणार सत्तेपुढे शहाणपण ..... सध्यातरी (हात) चोळत बसण्याशिवाय काही पर्याय नाही.
  • Log in or register to post comments

श्री मोदी तिसऱ्यांदा निवडून

सुबोध खरे
Mon, 05/26/2025 - 18:41 नवीन
श्री मोदी तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत आणि परत चौथ्यांदा येण्याची बरीच शक्यता आहे, कदाचित पाचव्यांदा सुद्धा. त्यामुळे मोदी द्वेष्ट्यान्ची मोठी गोची झालेली आहे. अवघड जागी दुखणं आणि जावई डॉक्टर त्यामुळे सहनही होत नाही आणि सांगता हि येत नाही अशा स्थितीतून आलेलें वैफल्य आहे. त्याला काही इलाज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

१४००० कोटी रुपयांचा ठाणे

आग्या१९९०
Sat, 05/31/2025 - 14:50 नवीन
१४००० कोटी रुपयांचा ठाणे बोरीवली भाईंदर दुहेरी बोगदा आणि उन्नत मार्ग प्रकल्पातील अपारदर्शकतेमुळे L&T ने उच्च न्यायालयात धाव घेतली होती परंतु न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्याने L&T ने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने निविदा प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करीत सर्वोच्च न्यायालयाने इशारा दिल्यानंतर एमएमआरडीएने अखेर काल माघार घेतली व या दोन्ही प्रकल्पांसाठी नव्याने निविदा काढण्यात येणार असल्याचेही एमएमआरडीएने न्यायालयात स्पष्ट केले. विशेष म्हणजे नवीन निविदा ३००० कोटी रुपयांनी कमी असणार आहे. L&T कोर्टात नसती गेली तर हाच प्रकल्प मेघा इंजिनिअरिंग कंपनीला अतिरिक्त ३००० कोटी रुपये नफा देऊन गेला असता.( सत्ताधारी पक्षाला सर्वात जास्त निवडणूक रोखे देणारी कंपनी) आता शक्तिपीठ महामार्ग असाच गरज नसताना सरकार रेटत आहे. असेच प्रकल्प राबवत राहिले तर भारत लवकरच जगातील ' २ नंबरची ' अर्थव्यवस्था असलेला देश जाहीर होईल. कशाला हवी ती पारदर्शिकता? उद्या ह्या मागणीचा अतिरेक होऊन कपडेच काढून फिरावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा