✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पी.जे. (अतिशय फालतू जोक)

प
प्राजु यांनी
Sat, 01/05/2008 - 03:11  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19151 वाचन

💬 प्रतिसाद (125)

प्रतिक्रिया

चीन मधे

चतुरंग
Tue, 01/08/2008 - 03:25 नवीन
कुत्र्याला काय म्हणतात? हे हुंग ते हुंग! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

रशियन

ऋषिकेश
Tue, 01/08/2008 - 03:30 नवीन
रशियन माणूस आपल्या मित्राला नावाने बोलावून जाऊ नको हे सांगायला काय बोलतो? - जातोस्का बस्की -ऋषिकेशस्की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

रशियात...

ध्रुव
Tue, 01/08/2008 - 11:08 नवीन
रडणार्‍या मुलीला काय म्हणतील... ओक्साबोक्शी रडलीस्की :) -- ध्रुव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

असेच काही....

भाग्यश्री
गुरुवार, 01/10/2008 - 03:28 नवीन
जपानी खानावळीचे नाव ? ............ ताकाशी भातखा! जपानी डीवोर्स झालेली बाई नवर्याला काय म्हणेल?... आताकामी नकोशी? रशीयन डोअरकीपर ? ...... उभाका बस्की रशियन चिडका माणूस... वस्कन ओरडलास्की.. जपानी आजोबा नातवांना कुठली गोष्ट सांगतील? .... हिताची! जपानी शाळेचे नाव ... याशिका :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ध्रुव

एकदा

प्राजु
Tue, 01/08/2008 - 09:55 नवीन
एकदा हत्तीचं आणि मुंगीचं भांडण होतं. हत्ती मुंगीला मारतो भरपूर. मुंगी रडत रडत मुंग्यांच्या राणीकडे जाते. तिला घडलेलं सगळं सांगते. राणी म्हणते. "चल बदला घेऊ आपण". दोघी निघतात. हत्तीला शोधत शोधत एका तळ्यापाशी येतात. तिथे हत्ती निवांत चार खात उभा असतो. त्या दोघी लपतछपत हत्तीच्या मागच्या बाजूस येतात. राणी मुंगीला म्हणते ,"हळूच त्या हत्तीच्या पाठी मागच्या पायावरून त्याच्या पाठीवर चढ." मुंगी चढते. कशीबशी कुंथत ती हत्तीच्या पाठीवर जाऊन उभी राहते. तिथून राणीला विचारते... "राणी, आता काय करू?" राणी म्हणते "कुचल डाल साले को..." :))))) - प्राजु.
  • Log in or register to post comments

अकेला

ठणठणपाळ
Fri, 03/28/2008 - 20:29 नवीन
त्यावर ती मुंगी पुन्हा खाली उतरते आणि राणीला म्हणते, " जाने दो, बेचारा अकेला है!".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

अजुन एक मुंगी!!

किशोरी
Tue, 01/08/2008 - 19:16 नवीन
एक मुंगी झाडामागे लपलेली असते,समोरुन हत्ती येत असतो दुसरी मुंगी - का लपली आहेस्? पहिली मुंगी- हत्तीला भॉ करायचे आहे!!
  • Log in or register to post comments

निरोप समारंभ.

सुनील
Tue, 01/08/2008 - 19:22 नवीन
(प्रसंग - निवृत्त साहेबांचा निरोप समारंभ) बाई (सद्गदित होऊन) : साहेबांच्या हाताखाली काम करताना दिवस कसे गेले कळलेच नाही!!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

एकदा एक सिंह

चतुरंग
Tue, 01/08/2008 - 19:30 नवीन
जंगलात हिंडून प्रत्येक प्राण्याला जंगलाचा राजा कोण आहे असे विचारत चाललेला असतो. अर्थातच सर्व प्राणी घाबरुन "तुम्हीच महाराज, तुम्हीच." असे म्हणत असतात. अचानक सिंह एका हत्तीसमोर येतो. सिंह (गुरकावत): "काय रे, जंगलाचा राजा कोण आहे "? सिंहाचा प्रश्न ऐकून हत्ती दुर्लक्ष करतो. पुन्हा एकदा सिंह गुरकावतो तेंव्हा मात्र हत्ती त्याला सोंडेत पकडून लांब भिरकावून देतो. धडपडत उठून सिंह म्हणतो : "अरे माहीत नाही तर नाही म्हणून सांग ना, रागावतोस कशाला?" चतुरंग
  • Log in or register to post comments

दोन मित्र...

किशोरी
Tue, 01/08/2008 - 19:47 नवीन
दोन मित्र जंगलातुन जात असतात्,समोरुन सिंह येतो, एकाने माती घेउन सिंहाच्या डोळ्यामध्ये टाकली,आणी पळाला दुसरा तिथेच उभा पहिला मित्र- अरे पळ्!! दुसरा मित्र- मी का पळु माती तर तु टाकलीस्!!
  • Log in or register to post comments

हाहाहा..

प्राजु
Tue, 01/08/2008 - 21:31 नवीन
किशोरी, मस्त आहे हा जोक.., सह्हि... भन्न्न्न्न्न्न्न्नाट... प्राजु.
  • Log in or register to post comments

३ पुरूष

सागर सुभाष राणे
Tue, 01/08/2008 - 22:20 नवीन
३ पुरूष पेन्सिल अणि १ स्त्री पेन्सिल असते. स्त्री पेन्सिल गर्भवती होते!! सांगा बर कोना मुले होते ते? उतर : पेन्सिल रबर शिवाय असते तिच्या मुले :) सागर राणे
  • Log in or register to post comments

बैल...

बिपिन कार्यकर्ते
Wed, 01/09/2008 - 01:51 नवीन
बैल रात्री काय करतात? . . . गाई गाई.... बिपिन.
  • Log in or register to post comments

++१

ब्रिटिश टिंग्या
Wed, 01/09/2008 - 01:53 नवीन
लयी भारी...... (भारलेला) छोटी टिंगी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हा हा हा

ध्रुव
Wed, 01/09/2008 - 17:17 नवीन
काहीही भारी आहे हा.... -- ध्रुव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हाहाहा..

प्राजु
Wed, 01/09/2008 - 02:08 नवीन
सह्ह्ही.. भाऊ.. गाई--- गाई.... - प्राजु.
  • Log in or register to post comments

विंग्रजी.......

ब्रिटिश टिंग्या
Wed, 01/09/2008 - 02:23 नवीन
इनायकभौंच इंग्रजी जाम कच्चं होतं. टीचर त्यांना शिकवून शिकवून थकल्या होत्या. एक दिवस त्या वर्गात म्हणाल्या, "एखाद्या भाषेत तुम्ही पारंगत झालात, हे कसं ओळखायचं. अगदी सोपं आहे. जेव्हा तुम्हाला एखादं स्वप्न पडेल आणि त्या स्वप्नातली माणसं त्या भाषेत बोलताहेत, असं दिसेल, तेव्हा समजायचं की ती भाषा आपल्याला आत्मसात झाली." दोनच दिवसांनी इनायकभौ अतिशय आनंदी मुद्रेनं वर्गात टीचरना म्हणतात, "टीचर, काल मला इंग्रजी स्वप्न पडलं. स्वप्नात खूप माणसं एकमेकांशी इंग्रजीत बोलत होती." " व्हेरी गुड," टीचर खूष होऊन म्हणाल्या, "काय बोलत होती ती माणसं?" " माहिती नाही. ते काय बोलत होते, मला समजत कुठे होतं?!!!!"
  • Log in or register to post comments

हे हे हे हे हे

झकासराव
Wed, 01/09/2008 - 08:30 नवीन
बरेच विनोद खुपच छान आहेत. का'वळा,गायी गायी , हक से मांगो आवडल :) काही आचरट आहेत ते नसते तरी चालले असते. असो एक माझ्याकडुन ऐकिव विनोद. रशियन माणसाला कुत्रा चावला तर तो काय म्हणेल ?? वस्कन चाव्लास्की :)
  • Log in or register to post comments

आणि...

बिपिन कार्यकर्ते
Wed, 01/09/2008 - 12:26 नवीन
आणि कुत्रा चावल्या नंतर त्या माणसाचे नाव बदलले.... वस्कन ओरडलास्की... अवांतर... थोडा आचरटपणा बरा असतो हो कधीकधी... बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव

मी कोण???

तात्या विंचू
Wed, 01/09/2008 - 10:51 नवीन
एकदा शिवाजी महाराज आणि जिजामाता पत्ते खेळत असतात. शिवाजी महाराजाना पाणी प्यावेसे वाटते, म्हणुन ते टाळी वाजवुन म्हणतात,"कोण आहे रे तिकडे?" दरवाजावरचा सेवक म्हणतो "मी महाराज". मग महाराज म्हणतात,"तू महाराज!!! मग मी कोण???"
  • Log in or register to post comments

हुकुम

छोट्या
गुरुवार, 07/31/2008 - 19:20 नवीन
एकदा शिवाजी महाराज आणि जिजामाता पत्ते खेळत असतात. शिवाजी महाराजाना पाणी प्यावेसे वाटते, म्हणुन ते टाळी वाजवुन म्हणतात,"कोण आहे रे तिकडे?" दरवाजावरचा सेवक म्हणतो "हुकुम महाराज". मग महाराज म्हणतात,"इसपिक"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तात्या विंचू

बाप पीजे

मनस्वी
Wed, 01/09/2008 - 11:23 नवीन
एकदा मिकी माऊस डोनाल्ड डकला रामायण सांगायची विनंती करतो. डोनाल्ड डक खूश होउन रामायण वाचायला सुरुवात करतो. मिकी माऊस लक्ष देउन ऐकू लागतो. सर्व रामायण वाचून झाल्यावर डोनाल्ड डक एक मोठठा आळस देतो आणि मिकी माऊसला विचारतो, "मिकी माऊस, मला सांग, श्रीरामाच्या वडिलांचे नाव काय?" मिकी माऊसला काही सांगता येत नाही. डोनाल्ड डक चिडतो आणि परत विचारतो, "मिकी माऊस, रामराज्याची राजधानी कोणती!!!!!!!!" मिकी माऊसला काही सांगता येत नाही. डोनाल्ड डक चवताळतो आणि मिकी माऊसला जोरात लाथ मारतो. मिकी माऊस जोरात भिंतीवर जाउन आपटतो. आपटल्या आपटल्या तो उठून बसतो आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत रामायण म्हणून दाखवतो...... कसे काय....??? | | | | | भिंतीवर आपटल्यावर मिकी माऊसचा Wall-Mickey (वाल्मिकी) होतो. बोलो जय श्रीराम!
  • Log in or register to post comments

विसावा....

बिपिन कार्यकर्ते
Wed, 01/09/2008 - 12:22 नवीन
एकदा पेशवे रस्त्यावरुन चाललेले असतात. तेवढ्यात त्यांना एक नविन वाडा दिसतो. ते कुतूहलाने त्या वाड्याची चौकशी करायला म्हणून आत शिरतात. तर एक नौकर समोर येतो. पेशवे : "कोणाचा रे वाडा?" नौकर : "आमच्या बाईसाहेबांचा..." पेशवे : "कुठे आहेत त्या? आम्हाला त्यांना भेटायचे आहे." नौकर : "श्रीमंत, त्या विसावा घेत आहेत." पेशवे : "मग त्यांना म्हणावं, एकविसावा आला आहे." बिपिन.
  • Log in or register to post comments

राखी साव॑त

धमाल मुलगा
Wed, 01/09/2008 - 13:21 नवीन
एकदा राखी साव॑त एका skin specialist कडे गेली, रा.सा. :डॉक्टर, मी अ॑घोळ करताना काय लाऊ ? स्कि.स्पे. : बाई गsss दार लाव दार......!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

अजुन एक !

भाग्यश्री
गुरुवार, 01/10/2008 - 03:23 नवीन
मल्लिका शेरावत एका शिंप्याकडे जाते.. एक हातरुमाल देते आणि म्हणते की मला याचा एक छान स्कर्ट शिवून द्या! शिंपी विचारतो, "उरलेल्या कापडाचे काय शिवू ताई??" :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

उरलेले कापड

सुनील
गुरुवार, 01/10/2008 - 08:26 नवीन
"उरलेल्या कापडाचे काय शिवू ताई??" :) राखी सावंतला टॉप !!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

सांगू का?

ठणठणपाळ
Fri, 03/28/2008 - 20:23 नवीन
सांगू का हे राखी सावंतला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

असाच एक टुकार...

धमाल मुलगा
Wed, 01/09/2008 - 13:26 नवीन
एकदा एक लाकुड्तोड्या ज॑गलातून तडक शहरात जातो. तो दिसताच सगळ्या मुली हातातली काम॑-धाम॑ सोडुन त्याच्या मागे पळत सुटतात.... का ???? सोप्पय राव..."The Axe Effect" - धमाल.
  • Log in or register to post comments

रींग!!

किशोरी
Wed, 01/09/2008 - 13:31 नवीन
प्रेयसी- आपला साखरपुडा होईल तेव्हा तु मला 'रींग' देशील ना? प्रियकर - हो देईन ना,कोनत्या नंबर वर देवु लँड-लाईन वरती की मोबाईल वरती??
  • Log in or register to post comments

तीन िमत्र

स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 01/09/2008 - 17:24 नवीन
तीन िमत्र होटेल मधे जतात. वेटर येतो पहीला: एक मसाला डोसा दुसरा: अजुन एक मसाला डोसा तीसरा: अजुन एक मसाला डोसा वेटरः चॅलेंज
  • Log in or register to post comments

जिंदगी एक पहेली !!!!

छोटा डॉन
Fri, 01/11/2008 - 13:04 नवीन
अर्ज है ............... जिंदगी एक पहेली है !!! * * जिंदगी एक पहेली है !!! * * * * * * * * * * * * * जो निचे जाने से सोल्व नही होगी, तुम्हे खुद उसे सोल्व करना पडेगा ............. मराठमोळा [ छोटा डॉन ]
  • Log in or register to post comments

क्या बात है!

पिवळा डांबिस
गुरुवार, 01/24/2008 - 00:02 नवीन
माशाल्ला! आपने तो कमाल कर दिया!! जियो! (लखनवी) पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

घरी कोणी नाही...

बिपिन कार्यकर्ते
Fri, 01/11/2008 - 20:27 नवीन
एकदा एका सरदारजीची प्रेयसी (ती पण सरदारीण) त्याला फोन करते.... सरदारीण : घरी कोणी नाहीये.... लवकर ये.... सरदार खूश, आता मजा येणार, तो धावतपळत धडपडत तिच्या घरी पोचतो. आणि पाहतो तो काय........... तिच्या घराला खरोखरच कुलूप असतं. बिपिन.
  • Log in or register to post comments

प्रेम

सुनील
Fri, 01/11/2008 - 20:33 नवीन
प्रेमाला उपमा नाही ।। उपम्यात साखर नाही । साखरेला ऊस नाही । ऊसाला पाणी नाही । पाण्याला पंप नाही । पंपाला वीज नाही । वीजेला पैसा नाही । पैशाला काम नाही । कामाला नोकरी नाही । नोकरीला पदवी नाही । पदवीला कॉलेज नाही । कॉलेजला पोरी नाही । पोरीला प्रेम नाही । प्रेमाला उपमा नाही ।। (इ-मेलने आलेली कविता) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

कुठेतरी वाचलेला

स्वाती राजेश
Sat, 01/12/2008 - 00:31 नवीन
बंडू बावळे सुखनिदेत निमग्न होता. अचानक बिछान्यावर प्रकाश पसरल्यानं दचकून तो जागा झाला. पाहतो तो रेड्यावर स्वार झालेले यमराज बेडरूममध्ये उभे. भयानं त्याची बोबडीच वळली. प्रसन्न हसून यमराज म्हणाले, ''घाबरू नकोस बंडू. मी तुला गुड न्यूज द्यायला आलो आहे. आणखी २० वषेर् तू ठणठणीत राहणार आहेस. मृत्यू तुझ्या केसालाही स्पर्श करणार नाही. अरे झोपलायस काय इथे? जा, बाहेर जा. मजा कर. ही आनंदाची बातमी मस्तपैकी सेलिब्रेट कर.'' यमराज अदृश्य झाले. बंडूनं तात्काळ कपडे बदलून बाहेर धाव घेतली. आनंदानं वेडा होऊन तो रस्त्यातून नाचतच चालला असताना एक ट्रक सुसाट वेगानं आला आणि बंडूला चिरडून गेला... ... स्वर्गनरकाच्या प्रवेशद्वारावर यमराजाशी गाठ पडताच बंडूनं कळवळून विचारलं, ''का खोटं बोललात माझ्याशी? का?'' यमराज ओशाळून म्हणाले, ''सॉरी यार! मंथ एन्डचं प्रेशर असतं... काही करून टार्गेट पूर्ण करायचं असतं!!!!
  • Log in or register to post comments

फालतू न॑बर १...

धमाल मुलगा
Mon, 01/14/2008 - 14:40 नवीन
एक दूधवाला रस्त्याच्या मधून सायकलवर चाललेला असतो, मागून एक गाडी येते आणि हॉर्न वाजवते... हा दूधवाला सरळ सायकल रस्त्याकडेला घेऊन दूध प्यायला लागतो....का???? हॉर्न "पी॑ पी॑" असा वाजतो ना !!!! ***स्त्रोत : माझा ६ वर्षा॑चा पुतण्या !!! धन्य आहेत ही कार्टी.
  • Log in or register to post comments

इनोद

वेडा
Sun, 01/20/2008 - 20:17 नवीन
दोन सरदारजी बुध्दीबळ खेळ्त होते... तिकडुन अजुन दोघे सरदार आले आणि त्यांना म्हणाले चला आपण Doubles खेळु...
  • Log in or register to post comments

तिकडुन आणखि एक सरदार आला

नेत्रेश
Fri, 03/28/2008 - 03:27 नवीन
आणी म्हणाला 'मी अम्पायर'.........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेडा

असं ते बराच वेळ खेळतात...

एक
Sat, 03/29/2008 - 02:47 नवीन
मग अम्पायर मॅच ड्रॉ करतो कारण दोन्ही टीमकडे १-१ प्यादंच उरलं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

अजुन एक सरदार

लेले
Mon, 01/21/2008 - 16:19 नवीन
एकदा नर्स एक नुकताच जन्मलेला बाळ सरदाराच्या हातात देते तेव्हा सरदार ओरडायला लागतो की , "ओये पुत्तर हुवा" "ओये पुत्तर हुवा" मग नर्स म्हणते अबे बेवकूफ मेरी उ॑गली छोड "लड्की हुइ है॑" !!!!!!!
  • Log in or register to post comments

:))

विसोबा खेचर
गुरुवार, 01/24/2008 - 22:30 नवीन
मग नर्स म्हणते अबे बेवकूफ मेरी उ॑गली छोड "लड्की हुइ है॑" !!!!!!! क्लास! :)) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लेले

आणखी एक

अन्या दातार
Wed, 01/23/2008 - 23:02 नवीन
फोनवरचे एक संभाषणः व्यक्ति १: हॅलो, प्रकाश आहे का? व्यक्ति २: नाही. व्यक्ति १: जरा नीट बघा प्रकाश आहे का ते! व्यक्ति २: अहो नाही हो. व्यक्ति १: नक्की? अगदी नक्की? व्यक्ति २: अहो किती वेळा सांगायचं तुम्हाला? व्यक्ति १: ओ जास्त ओरडू नका. खिडकी उघडा, प्रकाश येईल. घाटपांडे साहेब, मनाला लाऊन घेऊ नका. व्यक्ति खर्‍या नाहीत्;काल्पनिक आहेत. आपला, (आगाऊ) अनिरुद्ध दातार
  • Log in or register to post comments

कृतज्ञता !!!

छोटा डॉन
गुरुवार, 01/24/2008 - 23:04 नवीन
एक महाल बांधायचा, तर हजारो कामगार लागतात... देशाचे संरक्षण करायला लाखो सैनिक लागतात... पण, एक घर सुखी करण्यासाठी एक स्त्री पुरेशी असते... म्हणूनच मोलकरणीप्रती नेहमी कृतज्ञ राहा!!!
  • Log in or register to post comments

एकदा एक

मीनल
Fri, 03/28/2008 - 03:50 नवीन
एकदा एक माणूस हॉटेल मधे जातो. वेटरला ऑर्डर देतो--एक पालक पनिर ,एक पराठा वेटर डिशेस घेऊन येतो. तो माणूस पाहतो तर काय ? नुसतेच पालक आणि बाजूला पराठा. ``वेटर इधर आव`` रागानेच बोलावतो. ``ये क्या?ये तो पालक है सिर्फ.पनिर कहा है?`` वेटर शांतपणे उत्तर देतो-- क्या आपने कभी गुलाब जामुन में गुलाब देखे है? नहि ना? बस.वैसे ही! . . . . . . . अहो संपला जोक आता हसा.(कळला असेल तर)!
  • Log in or register to post comments

मधुमेह !!!!!

मदनबाण
Fri, 03/28/2008 - 05:01 नवीन
एकदा हत्ती मुंगीला एक मोठा साखरेचा खडा गिफ्ट म्हणुन देतो, मुंगी ते गिफ्ट त्याला परत करते, कारण..... तिला मधुमेह असतो................
  • Log in or register to post comments

भरताच- - - - - -

केशवराव
Fri, 03/28/2008 - 22:42 नवीन
रामाच ------ रामफळ . सितेच ------- सिताफळ. तर भरताच काय ? - - - वांग !
  • Log in or register to post comments

महात्मा

लम्पन
Sat, 03/29/2008 - 11:47 नवीन
महात्मा गान्धी मध्ये जर हवा भरली तर काय होईल? महात्मा फुले.
  • Log in or register to post comments

म्हातारी

आशिष
Sat, 06/07/2008 - 21:13 नवीन
एक म्हातारी लहानपनीच मेली
  • Log in or register to post comments

ऋषिकेशस्क

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 06/24/2008 - 14:13 नवीन
ऋषिकेशस्की आणि ध्रुव, रडणार्‍या मुलीला काय विचरतील, ओक्साबोक्शी रडलीस्का. पण पोलंडमधे! रशियात नाही, पुरुषांची आडनावं ....स्की असतात आणि मुलींची .....स्का!!
  • Log in or register to post comments

दोन वेडे

ऋचा
Tue, 06/24/2008 - 15:05 नवीन
दोन वेडे झाडावर बसलेले असतात. त्यातला १ खाली पडतो. दुसरा विचारतो का रे पडलास का? पहीला म्हणतो "मी पिकलो".. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा