जपानी खानावळीचे नाव ? ............ ताकाशी भातखा!
जपानी डीवोर्स झालेली बाई नवर्याला काय म्हणेल?... आताकामी नकोशी?
रशीयन डोअरकीपर ? ...... उभाका बस्की
रशियन चिडका माणूस... वस्कन ओरडलास्की..
जपानी आजोबा नातवांना कुठली गोष्ट सांगतील? .... हिताची!
जपानी शाळेचे नाव ... याशिका
:)
एकदा हत्तीचं आणि मुंगीचं भांडण होतं. हत्ती मुंगीला मारतो भरपूर. मुंगी रडत रडत मुंग्यांच्या राणीकडे जाते. तिला घडलेलं सगळं सांगते. राणी म्हणते. "चल बदला घेऊ आपण". दोघी निघतात. हत्तीला शोधत शोधत एका तळ्यापाशी येतात. तिथे हत्ती निवांत चार खात उभा असतो. त्या दोघी लपतछपत हत्तीच्या मागच्या बाजूस येतात.
राणी मुंगीला म्हणते ,"हळूच त्या हत्तीच्या पाठी मागच्या पायावरून त्याच्या पाठीवर चढ."
मुंगी चढते. कशीबशी कुंथत ती हत्तीच्या पाठीवर जाऊन उभी राहते. तिथून राणीला विचारते... "राणी, आता काय करू?"
राणी म्हणते "कुचल डाल साले को..."
:)))))
- प्राजु.
(प्रसंग - निवृत्त साहेबांचा निरोप समारंभ)
बाई (सद्गदित होऊन) : साहेबांच्या हाताखाली काम करताना दिवस कसे गेले कळलेच नाही!!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
जंगलात हिंडून प्रत्येक प्राण्याला जंगलाचा राजा कोण आहे असे विचारत चाललेला असतो.
अर्थातच सर्व प्राणी घाबरुन "तुम्हीच महाराज, तुम्हीच." असे म्हणत असतात.
अचानक सिंह एका हत्तीसमोर येतो.
सिंह (गुरकावत): "काय रे, जंगलाचा राजा कोण आहे "?
सिंहाचा प्रश्न ऐकून हत्ती दुर्लक्ष करतो.
पुन्हा एकदा सिंह गुरकावतो तेंव्हा मात्र हत्ती त्याला सोंडेत पकडून लांब भिरकावून देतो.
धडपडत उठून सिंह म्हणतो : "अरे माहीत नाही तर नाही म्हणून सांग ना, रागावतोस कशाला?"
चतुरंग
दोन मित्र जंगलातुन जात असतात्,समोरुन सिंह येतो,
एकाने माती घेउन सिंहाच्या डोळ्यामध्ये टाकली,आणी पळाला
दुसरा तिथेच उभा
पहिला मित्र- अरे पळ्!!
दुसरा मित्र- मी का पळु माती तर तु टाकलीस्!!
३ पुरूष पेन्सिल अणि १ स्त्री पेन्सिल असते.
स्त्री पेन्सिल गर्भवती होते!! सांगा बर कोना मुले होते ते?
उतर : पेन्सिल रबर शिवाय असते तिच्या मुले :)
सागर राणे
इनायकभौंच इंग्रजी जाम कच्चं होतं. टीचर त्यांना शिकवून शिकवून थकल्या होत्या.
एक दिवस त्या वर्गात म्हणाल्या, "एखाद्या भाषेत तुम्ही पारंगत झालात, हे कसं ओळखायचं. अगदी सोपं आहे. जेव्हा तुम्हाला एखादं स्वप्न पडेल आणि त्या स्वप्नातली माणसं त्या भाषेत बोलताहेत, असं दिसेल, तेव्हा समजायचं की ती भाषा आपल्याला आत्मसात झाली."
दोनच दिवसांनी इनायकभौ अतिशय आनंदी मुद्रेनं वर्गात टीचरना म्हणतात, "टीचर, काल मला इंग्रजी स्वप्न पडलं. स्वप्नात खूप माणसं एकमेकांशी इंग्रजीत बोलत होती."
" व्हेरी गुड," टीचर खूष होऊन म्हणाल्या, "काय बोलत होती ती माणसं?"
" माहिती नाही. ते काय बोलत होते, मला समजत कुठे होतं?!!!!"
बरेच विनोद खुपच छान आहेत.
का'वळा,गायी गायी , हक से मांगो आवडल :)
काही आचरट आहेत ते नसते तरी चालले असते.
असो
एक माझ्याकडुन ऐकिव विनोद.
रशियन माणसाला कुत्रा चावला तर तो काय म्हणेल ??
वस्कन चाव्लास्की :)
एकदा शिवाजी महाराज आणि जिजामाता पत्ते खेळत असतात. शिवाजी महाराजाना पाणी प्यावेसे वाटते, म्हणुन ते टाळी वाजवुन म्हणतात,"कोण आहे रे तिकडे?"
दरवाजावरचा सेवक म्हणतो "मी महाराज".
मग महाराज म्हणतात,"तू महाराज!!! मग मी कोण???"
एकदा शिवाजी महाराज आणि जिजामाता पत्ते खेळत असतात. शिवाजी महाराजाना पाणी प्यावेसे वाटते, म्हणुन ते टाळी वाजवुन म्हणतात,"कोण आहे रे तिकडे?"
दरवाजावरचा सेवक म्हणतो "हुकुम महाराज".
मग महाराज म्हणतात,"इसपिक"
एकदा मिकी माऊस डोनाल्ड डकला रामायण सांगायची विनंती करतो.
डोनाल्ड डक खूश होउन रामायण वाचायला सुरुवात करतो.
मिकी माऊस लक्ष देउन ऐकू लागतो.
सर्व रामायण वाचून झाल्यावर डोनाल्ड डक एक मोठठा आळस देतो आणि मिकी माऊसला विचारतो, "मिकी माऊस, मला सांग, श्रीरामाच्या वडिलांचे नाव काय?"
मिकी माऊसला काही सांगता येत नाही.
डोनाल्ड डक चिडतो आणि परत विचारतो, "मिकी माऊस, रामराज्याची राजधानी कोणती!!!!!!!!"
मिकी माऊसला काही सांगता येत नाही.
डोनाल्ड डक चवताळतो आणि मिकी माऊसला जोरात लाथ मारतो.
मिकी माऊस जोरात भिंतीवर जाउन आपटतो.
आपटल्या आपटल्या तो उठून बसतो आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत रामायण म्हणून दाखवतो...... कसे काय....???
|
|
|
|
|
भिंतीवर आपटल्यावर मिकी माऊसचा Wall-Mickey (वाल्मिकी) होतो.
बोलो जय श्रीराम!
एकदा पेशवे रस्त्यावरुन चाललेले असतात. तेवढ्यात त्यांना एक नविन वाडा दिसतो. ते कुतूहलाने त्या वाड्याची चौकशी करायला म्हणून आत शिरतात. तर एक नौकर समोर येतो.
पेशवे : "कोणाचा रे वाडा?"
नौकर : "आमच्या बाईसाहेबांचा..."
पेशवे : "कुठे आहेत त्या? आम्हाला त्यांना भेटायचे आहे."
नौकर : "श्रीमंत, त्या विसावा घेत आहेत."
पेशवे : "मग त्यांना म्हणावं, एकविसावा आला आहे."
बिपिन.
मल्लिका शेरावत एका शिंप्याकडे जाते.. एक हातरुमाल देते आणि म्हणते की मला याचा एक छान स्कर्ट शिवून द्या!
शिंपी विचारतो,
"उरलेल्या कापडाचे काय शिवू ताई??" :)
एकदा एक लाकुड्तोड्या ज॑गलातून तडक शहरात जातो.
तो दिसताच सगळ्या मुली हातातली काम॑-धाम॑ सोडुन त्याच्या मागे पळत सुटतात....
का ????
सोप्पय राव..."The Axe Effect"
- धमाल.
अर्ज है ...............
जिंदगी एक पहेली है !!!
*
*
जिंदगी एक पहेली है !!!
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
जो निचे जाने से सोल्व नही होगी,
तुम्हे खुद उसे सोल्व करना पडेगा .............
मराठमोळा [ छोटा डॉन ]
एकदा एका सरदारजीची प्रेयसी (ती पण सरदारीण) त्याला फोन करते....
सरदारीण : घरी कोणी नाहीये.... लवकर ये....
सरदार खूश, आता मजा येणार, तो धावतपळत धडपडत तिच्या घरी पोचतो. आणि पाहतो तो काय........... तिच्या घराला खरोखरच कुलूप असतं.
बिपिन.
प्रेमाला उपमा नाही ।।
उपम्यात साखर नाही ।
साखरेला ऊस नाही ।
ऊसाला पाणी नाही ।
पाण्याला पंप नाही ।
पंपाला वीज नाही ।
वीजेला पैसा नाही ।
पैशाला काम नाही ।
कामाला नोकरी नाही ।
नोकरीला पदवी नाही ।
पदवीला कॉलेज नाही ।
कॉलेजला पोरी नाही ।
पोरीला प्रेम नाही ।
प्रेमाला उपमा नाही ।।
(इ-मेलने आलेली कविता)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
बंडू बावळे सुखनिदेत निमग्न होता. अचानक बिछान्यावर प्रकाश पसरल्यानं दचकून तो जागा झाला. पाहतो तो रेड्यावर स्वार झालेले यमराज बेडरूममध्ये उभे. भयानं त्याची बोबडीच वळली. प्रसन्न हसून यमराज म्हणाले, ''घाबरू नकोस बंडू. मी तुला गुड न्यूज द्यायला आलो आहे. आणखी २० वषेर् तू ठणठणीत राहणार आहेस. मृत्यू तुझ्या केसालाही स्पर्श करणार नाही. अरे झोपलायस काय इथे? जा, बाहेर जा. मजा कर. ही आनंदाची बातमी मस्तपैकी सेलिब्रेट कर.''
यमराज अदृश्य झाले. बंडूनं तात्काळ कपडे बदलून बाहेर धाव घेतली. आनंदानं वेडा होऊन तो रस्त्यातून नाचतच चालला असताना एक ट्रक सुसाट वेगानं आला आणि बंडूला चिरडून गेला...
... स्वर्गनरकाच्या प्रवेशद्वारावर यमराजाशी गाठ पडताच बंडूनं कळवळून विचारलं, ''का खोटं बोललात माझ्याशी? का?''
यमराज ओशाळून म्हणाले, ''सॉरी यार! मंथ एन्डचं प्रेशर असतं... काही करून टार्गेट पूर्ण करायचं असतं!!!!
एक दूधवाला रस्त्याच्या मधून सायकलवर चाललेला असतो,
मागून एक गाडी येते आणि हॉर्न वाजवते...
हा दूधवाला सरळ सायकल रस्त्याकडेला घेऊन दूध प्यायला लागतो....का????
हॉर्न "पी॑ पी॑" असा वाजतो ना !!!!
***स्त्रोत : माझा ६ वर्षा॑चा पुतण्या !!! धन्य आहेत ही कार्टी.
एकदा नर्स एक नुकताच जन्मलेला बाळ सरदाराच्या हातात देते तेव्हा सरदार ओरडायला लागतो की ,
"ओये पुत्तर हुवा"
"ओये पुत्तर हुवा"
मग नर्स म्हणते अबे बेवकूफ मेरी उ॑गली छोड "लड्की हुइ है॑" !!!!!!!
फोनवरचे एक संभाषणः
व्यक्ति १: हॅलो, प्रकाश आहे का?
व्यक्ति २: नाही.
व्यक्ति १: जरा नीट बघा प्रकाश आहे का ते!
व्यक्ति २: अहो नाही हो.
व्यक्ति १: नक्की? अगदी नक्की?
व्यक्ति २: अहो किती वेळा सांगायचं तुम्हाला?
व्यक्ति १: ओ जास्त ओरडू नका. खिडकी उघडा, प्रकाश येईल.
घाटपांडे साहेब, मनाला लाऊन घेऊ नका. व्यक्ति खर्या नाहीत्;काल्पनिक आहेत.
आपला,
(आगाऊ) अनिरुद्ध दातार
एक महाल बांधायचा, तर हजारो कामगार लागतात...
देशाचे संरक्षण करायला लाखो सैनिक लागतात...
पण, एक घर सुखी करण्यासाठी एक स्त्री पुरेशी असते...
म्हणूनच मोलकरणीप्रती नेहमी कृतज्ञ राहा!!!
एकदा एक माणूस हॉटेल मधे जातो.
वेटरला ऑर्डर देतो--एक पालक पनिर ,एक पराठा
वेटर डिशेस घेऊन येतो.
तो माणूस पाहतो तर काय ?
नुसतेच पालक आणि बाजूला पराठा.
``वेटर इधर आव`` रागानेच बोलावतो.
``ये क्या?ये तो पालक है सिर्फ.पनिर कहा है?``
वेटर शांतपणे उत्तर देतो--
क्या आपने कभी गुलाब जामुन में गुलाब देखे है?
नहि ना?
बस.वैसे ही!
.
.
.
.
.
.
.
अहो संपला जोक
आता हसा.(कळला असेल तर)!
ऋषिकेशस्की आणि ध्रुव,
रडणार्या मुलीला काय विचरतील,
ओक्साबोक्शी रडलीस्का.
पण पोलंडमधे! रशियात नाही, पुरुषांची आडनावं ....स्की असतात आणि मुलींची .....स्का!!
दोन वेडे झाडावर बसलेले असतात.
त्यातला १ खाली पडतो.
दुसरा विचारतो का रे पडलास का?
पहीला म्हणतो "मी पिकलो"..
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
प्रतिक्रिया
चीन मधे
रशियन
रशियात...
असेच काही....
एकदा
अकेला
अजुन एक मुंगी!!
निरोप समारंभ.
एकदा एक सिंह
दोन मित्र...
हाहाहा..
३ पुरूष
बैल...
++१
हा हा हा
हाहाहा..
विंग्रजी.......
हे हे हे हे हे
आणि...
मी कोण???
हुकुम
बाप पीजे
विसावा....
राखी साव॑त
अजुन एक !
उरलेले कापड
सांगू का?
असाच एक टुकार...
रींग!!
तीन िमत्र
जिंदगी एक पहेली !!!!
क्या बात है!
घरी कोणी नाही...
प्रेम
कुठेतरी वाचलेला
फालतू न॑बर १...
इनोद
तिकडुन आणखि एक सरदार आला
असं ते बराच वेळ खेळतात...
अजुन एक सरदार
:))
आणखी एक
कृतज्ञता !!!
एकदा एक
मधुमेह !!!!!
भरताच- - - - - -
महात्मा
म्हातारी
ऋषिकेशस्क
दोन वेडे