✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पी.जे. (अतिशय फालतू जोक)

प
प्राजु यांनी
Sat, 01/05/2008 - 03:11  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19151 वाचन

💬 प्रतिसाद (125)

प्रतिक्रिया

हा हा हा

ऋषिकेश
Sat, 01/05/2008 - 05:55 नवीन
:))) अजुन एक आठवला: एक बाई दुकानातजाते. दुकानदारला म्हणते "तुम्ही तुमच्या दुकानात सगळं काही मिळेल अशी जाहिरात केली आहे.. मला म्हशीचा चारा मिळेल का?" दुकानदार शांतपणे विचारतो... "इथेच खाणार का बांधुन देऊ?" :)
  • Log in or register to post comments

अजून १....

ब्रिटिश टिंग्या
Sat, 01/05/2008 - 06:16 नवीन
गुरूजी : अकबराचा जन्म आणि मृत्यू केव्हा झाला? चिंटू : माहित नाही गुरूजी. गुरूजी : अरे असे काय करतोस? पुस्तकात लिहीले आहे की.....१५४२-१६०५. चिंटू : अरे मला वाटलं की तो अकबराचा मोबाईल नंबर आहे....!!!!! आपला, (खी खी खी) छोटी टिंगी
  • Log in or register to post comments

प्राजू..

विसोबा खेचर
Sat, 01/05/2008 - 08:56 नवीन
ऐ शाबास! :) और भी लिख्खो... आपला, (फालतू) तात्या.
  • Log in or register to post comments

जन्म आणी मृत्यू

इनोबा म्हणे
Sat, 01/05/2008 - 11:06 नवीन
आपल्या छोटी टिंगीची शालेय परीक्षा चालू होती. इतिहासाच्या पेपरला एक प्रश्न्न आला होता,'अकबर कुणाचा मुलगा होता आणी तो केव्हा मृत्यू पावला?' टिंग्याने लिहीले...'अकबर त्याच्या बापाचा मुलगा होता आणी त्याचे मरण आल्यावर तो मेला.' यापेक्षा अधिक फालतू स्मरणात नाही.आठवला तर सांगेन.
  • Log in or register to post comments

यात खोटं काय?

ब्रिटिश टिंग्या
Sat, 01/05/2008 - 14:44 नवीन
अकबर हा त्याच्याच बापाचा मुलगा होता आणि तो मरण आल्यावरच मेला. कोणाला काही शंका? यात फालतूपणा कुठे आला? कळत नाही इतिहासाच्या गुरूजींनी मला नापास का केलं :( -छोटी टिंगी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

मान्य

इनोबा म्हणे
Sat, 01/05/2008 - 15:03 नवीन
अकबर हा त्याच्याच बापाचा मुलगा होता आणि तो मरण आल्यावरच मेला. कोणाला काही शंका? मान्य!म्हणून तर गुरुजींनी 'अकबराच्या बापाला' आणी 'यमराजाला' पुर्ण गुण दिले,तुला नाही. (इतिहास प्रेमी)-इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

त्याच्या म्हणजे कुणाच्या बापाचा? आणि कुणाला ......

सुधीर कांदळकर
Sun, 01/06/2008 - 14:17 नवीन
मरण आल्यावर मेला? जरा सविस्तर लिहा राव आम्हा पामरांना कळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

दोन पुणेकर

प्राजु
Sat, 01/05/2008 - 11:09 नवीन
एक पुणेकर फोन लावतो.. " हेलो, देशपांडे आहेत का?" फोने घेणाराही पुणेरिच...टिप्पिकल पुणेरी उध्दट्पणाने :" देशपांडे ना... लढाईला गेले आहेत पावन खिंडित" पहिला पुणेरी : "हो का? मग त्याना निरोप द्या की महाराज गडावर सुखरूप पोहोचले आहेत आता मेलात तरी चालेल.." फुस्स्स्स्स्स्स्स................ - प्राजु
  • Log in or register to post comments

निषेध!

इनोबा म्हणे
Sat, 01/05/2008 - 12:47 नवीन
पुणेकरांच्या सडेतोड उत्तर देण्याच्या प्रवृत्तीला तुम्ही 'उद्धट' म्हणण्याचा जो उद्धटपणा केला आहात त्याचा आम्ही निषेध करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

सॉरी. आपल्या कॉल ..

सुधीर कांदळकर
Sun, 01/06/2008 - 14:21 नवीन
ला फोर्वर्डिंग सुविधा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

अजुन एक!

किशोरी
Sat, 01/05/2008 - 13:13 नवीन
एकदा एक बाई दुकानात जाऊन मुंग्यांची पावडर मागते, शेजारी उभी असनारी बाई तिला म्हनते "अहो मुंग्यांचे एवढे लाड करु नका, आज पावडर मागितली उद्या लिपस्टीक मागतील!"
  • Log in or register to post comments

वाह!अतिफालतू

इनोबा म्हणे
Sat, 01/05/2008 - 14:52 नवीन
किशोरी...हा विनोद अतिफालतू होता.वाह!वाह!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किशोरी

मुंगी आणि स्कूटर

सुनील
Sat, 01/05/2008 - 20:19 नवीन
एक मुंगी स्कूटरवरून जात असते. मध्येच ती पडते. का????? कारण स्कूटर संपते !!!!!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

स्कूटर

देवदत्त
Sat, 01/05/2008 - 20:37 नवीन
स्कूटर संपते ? भन्नाट पी जे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

स्कूटर संपते !!

संदीप चित्रे
Tue, 07/29/2008 - 21:39 नवीन
जब्बरी पी जे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

(विषय दिलेला नाही)

सुबक ठेन्गनी
गुरुवार, 07/31/2008 - 15:26 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

घडलेला किस्सा..

प्राजु
Sat, 01/05/2008 - 20:35 नवीन
नावे न लिहिता देत आहे हा किस्सा.. एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत, मराठीच्या पेपर मध्ये काहीतरी शिवाजी महराजांसंदर्भात धडा होता. परिक्षेत त्या धड्या वर प्रश्न आला.. " शिवाजी महारांचे गुरू कोण होते?" एका महा "ढ" मुलाने.. लिहिले " दादा कोंडके"...... शिवाजी महाराजांना वरती स्वर्गात आत्महत्या करावी वाटली असेल हे वाचून...... - प्राजु.
  • Log in or register to post comments

शिवाजी

इनोबा म्हणे
Sat, 01/05/2008 - 20:50 नवीन
शिवाजी महाराजांना वरती स्वर्गात आत्महत्या करावी वाटली असेल हे वाचून...... एकदा मृत्यू आलेली व्यक्ती पुन्हा आत्महत्या करते..?अगदीच फालतू... अवांतरः कृपया महापुरुषांवर आधारीत विनोद(?) नको. (तुकोबाचा वारकरी आणि शिवबाचा धारकरी)-इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

वजन...

देवदत्त
Sat, 01/05/2008 - 20:44 नवीन
एक मुलगा शाळेतून आल्यावर आईला म्हणाला, "मी उद्यापासून शाळेत जाणार नाही" आई: का काय झाले? मुलगा: आज आमचे वजन केले शाळेत. आई: त्याचा शाळेत न जाण्याशी काय संबंध? मुलगा: आज वजन केले. काय सांगावे? उद्या विकूनही टाकतील.
  • Log in or register to post comments

वाह!

इनोबा म्हणे
Sat, 01/05/2008 - 20:52 नवीन
देवा! विनोद उत्तम होता,पण फालतू नव्हता बरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त

ही ही

देवदत्त
Sat, 01/05/2008 - 20:55 नवीन
ही ही चुकलेच. पुढील वेळी फालतूच विनोद टाकेन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

असाच अजून एक..

प्राजु
Sat, 01/05/2008 - 20:51 नवीन
एक मुलगा त्याच्या बाबांना म्हणतो.. " बाबा, मी आजीशी लग्न करणार.." बाबा मोठ्याने हसून म्हणतात , " अरे..... असं का बरं?" मुलगा.. " हो.. मी आजीशीच लग्न करणार.." बाबा .." अरे.. पण का ते तरी सांग." मुलगा.. " वा रे वा...! तुम्ही का माझ्या आईशी लग्न केलं? मी पण तुमच्या आईशी लग्न करणार..."
  • Log in or register to post comments

उपर १

ब्रिटिश टिंग्या
Sat, 01/05/2008 - 21:07 नवीन
एकदा मास्तर इनायकभौंना वर्गात उभं करतात आणि सांगतात, " मी कुठला ही प्रश्न विचारला की त्याचं पटकन उत्तर दे". मास्तर विचारतात," अमेरिकेचे अध्यक्ष कोण?" इनायकभौ म्हणतात," पटकन."
  • Log in or register to post comments

गणित

इनोबा म्हणे
Sat, 01/05/2008 - 21:22 नवीन
टिंग्याला एकदा गणिताच्या मास्तरानं इचारलं,"टिंग्या,समज तुझ्याकडे चार आंबे आहेत्,त्यातले दोन तु विनायकला दिलेस तर तुझ्याकडे किती राहतील?". टिंग्या इचारात पडला आणि मास्तरला म्हणाला"पर मास्तर माझ्याकडं आंबं न्हाईत,मग देऊ कुठून?". मास्तर वैतागत म्हणालं"अरे!गाढवा,समजायला काय जातंय?" टिंग्या म्हणाला"मास्तर तीन आंबं राहतील." मास्तर परत वैतागला आणि टिंग्याला म्हणाला,"मुर्खा,चारमधले दोन दिल्यानंतर तिन कसे राहतील?" टिंग्या शांतपणे म्हणाला,"पर मास्तर,समजायला काय जातंय?"
  • Log in or register to post comments

एक पोपट

चतुरंग
Sun, 01/06/2008 - 04:12 नवीन
एका किराणा दुकानात जाऊन विचारतो "अहो, तुमच्याकडे पेरु आहे का?" दुकानदार : "नाही , आम्ही पेरु ठेवत नाही." दुसर्‍या दिवशी पुन्हा पोपट : "पेरु आहे?" दुकानदार : "अरे एकदा सांगितलं ना, आम्ही पेरु ठेवत नाही." तिसर्‍या दिवशी पुन्हा पोपट : "अहो पेरु देता का?" दुकानदार चिडून: "पुन्हा आलास तर हातोडा मारीन!" चौथ्या दिवशी पोपट : "अहो हातोडा आहे?" दुकानदार : "नाही." पोपट : "मग पेरु आहे!!!" ????????????? चतुरंग
  • Log in or register to post comments

नाव

इनोबा म्हणे
Sun, 01/06/2008 - 11:21 नवीन
शाळेत इन्सपेक्शनसाठी शिक्षण मंडळाचे अधिकारी आले होते. अधिकारी नारायण या विद्यार्थ्याला म्हणाले "बाळ्!तुझे नाव काय?" नारायण म्हणाला"नार्‍या". अधिकारी म्हणाले"असं नाही सांगायचे, नारायण .व्यवस्थीत पुर्ण नाव घ्यायचे. नंतर अधिकार्‍यांनी राम या विद्यार्थ्याला विचारले "बाळ्!तुझे नाव काय?व्यवस्थीत सांगायचे हं. राम म्हणाला "रामायण". (हनुमान) -इनोबा
  • Log in or register to post comments

अजून एक आठवला

खडूस
Tue, 08/05/2008 - 19:13 नवीन
शाळेत इन्सपेक्शनसाठी शिक्षण मंडळाचे अधिकारी आले होते. अधिकारी एका विद्यार्थ्याला म्हणाले "बाळ, तुझे नाव काय?" तो विद्यार्थी म्हणाला"पांडू". अधिकारी म्हणाले "अरे, असं नाही सांगायचे . व्यवस्थीत पुर्ण नाव घ्यायचे. म्हणायचे "पांडूरंग" " नंतर अधिकार्‍यांनी दुसर्‍या एका विद्यार्थ्याला विचारले "बाळ, तुझे नाव काय? व्यवस्थीत सांगायचे हं." तर तो म्हणाला "बंडूरंग". =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

अजून एक फालतू जोक

नंदन
Sun, 01/06/2008 - 12:20 नवीन
एका सुसरीचा एका मगरावर जीव जडतो. प्रेमाच्या आणा-भाका होतात. पण दोघांच्याही नदीतून (घरून) विरोध होत असल्याने ते पौर्णिमेच्या रात्री नदीच्या काठी भेटायचं ठरवतात. सुसर वेळेच्या आधीच येते. वाट पाहते. मगराचा काहीच पत्ता नसतो. अशा वेळी ती कुठलं गाणं म्हणेल? -- चांद फिर निकला, 'मगर' तुम ना आये नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments

गाण्यांवरचे पी.जे. --- प्रेरणास्थान नंदन

बिपिन कार्यकर्ते
Wed, 01/09/2008 - 01:49 नवीन
एका शाळेत एका मुलीचे एका मुलाबरोबर प्रेम जमते. पण तिच्यावर प्रेम करणारा अजून एक मुलगा असतो. तो जळत असतो. ती त्याला अजिबात भाव देत नाही म्हणून तो मुख्याध्यापकांकडे तक्रार करतो. त्यांना येतो राग की शाळेत ही मुले हे काय धंदे करतात. म्हणून ते त्या दोन्ही मुलांना दोन वेगवेगळ्या डिव्हीजन मधे टाकतात. 'हीरो' जातो बी डिव्हीजन मधे तर 'व्हिलन' जातो 'जी' डिव्हीजन मधे. तर ती मुलगी कुठले गाणे म्हणेल... मेरा सुंदर सपना 'बी'त गया, मैं प्रेम मे सब कुछ हार गयी, बेदर्द जमाना 'जी'त गया.... बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

डॉक्टर डॉक्टर

देवदत्त
Sun, 01/06/2008 - 12:45 नवीन
एक माणूस डॉक्टरकडे जातो. डॉ: काय तक्रार आहे? मा: सर्वजण माझ्याकडे दुर्लक्ष करतात. डॉ: नेक्स्ट.
  • Log in or register to post comments

अद्रक..

देवदत्त
Sun, 01/06/2008 - 12:55 नवीन
एक माणूस एका लग्नाला आल्याचा तुकडा (अद्रक) घेउन जातो. का बरे? ...... लग्नाच्या पत्रिकेवर लिहीलेले असते की लग्नाला आलंच पाहिजे..
  • Log in or register to post comments

एक मुंगी

अवलिया
Sun, 01/06/2008 - 16:26 नवीन
एक मुंगी ह्त्तीच्या कानात हळुच म्हणते ... "मी तुमच्या बाळाची आई होणार आहे......"
  • Log in or register to post comments

परत इनायकभौ.......

ब्रिटिश टिंग्या
Sun, 01/06/2008 - 17:12 नवीन
एकदा इनायकभौ जोरात टाळ्या वाजवत होते. मी विचारलं मी : काय हो असे टाळ्या का वाजवत आहात? इनायकभौ : टाळ्या वाजवल्या तर वाघ जवळ येत नाही. मी : पण इथे वाघ कुठे आहे? इनायकभौ : येइलच कसा? मी टाळ्या वाजवतोय ना!
  • Log in or register to post comments

हनीमून

सागर सुभाष राणे
Sun, 01/06/2008 - 23:51 नवीन
एकदा संतिन (संता ची बायको) तिच्या मैत्रिनिला फ़ोन करते संतिन: काय ग सट्वे कसा जाला तुमचा हनीमून, कुठे कुठे गेला होता फिरायला? तिची मैत्रिण (सट्वी) : आम्हीं ना सिमला, कुलु - मनाली सगाला फिरूंन आलो !!! संतिन : काय काय पहिलास ग ? तिची मैत्रिण (सट्वी): सीलिंग फेँन सागर राणे
  • Log in or register to post comments

मस्त! :)

विसोबा खेचर
Mon, 01/07/2008 - 10:42 नवीन
:) आपला, (सिलिंग फ्यॅनप्रेमी!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर सुभाष राणे

कावळा...

तात्या विंचू
Mon, 01/07/2008 - 10:41 नवीन
कावळा नेह्मी सरळ रेषेत का उडतो??? .. कारण की तो म्हणतो की उगीच "का" वळा ??
  • Log in or register to post comments

पोपट

मोहन
Mon, 01/07/2008 - 12:45 नवीन
एक सरदारजी पोपटाला खांद्यावर बसवून बाजारातून जात होता. एकाने विचारले "कहांसे लाया ?" पोपट म्हणाला - " पंजाबसे !"
  • Log in or register to post comments

आंबे

जुना अभिजित
Mon, 01/07/2008 - 13:02 नवीन
शिक्षकः राजू, वर्गात २५ मुले आणि२० बेंच आहेत तर पेरूच्या झाडाला आंबे किती? राजू: ५० शिक्षकः कसे? राजू: कारण मी आज डब्यात पोहे आणलेत. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
  • Log in or register to post comments

टकला....

तात्या विंचू
Mon, 01/07/2008 - 15:55 नवीन
एकदा एक टकला माणुस न्हाव्याच्या दुकानात जातो....का?? कारण की त्याला दाढी करायची असते.... पुन्हा दुसरा टकला माणुस न्हाव्याच्या दुकानात जातो....का??? कारण ते दुकान त्याचे असते.....
  • Log in or register to post comments

कावळा

मनस्वी
Mon, 01/07/2008 - 16:41 नवीन
एका माणसाजवळ एक मऊ मऊ कावळा असतो, तो त्याचे नाव काय ठेवेल? | | मायक्रोसॉफ्ट (my crow soft)
  • Log in or register to post comments

बिस्कीटे

मनस्वी
Mon, 01/07/2008 - 16:57 नवीन
एकदा पाकिस्तानी संघ भारतामध्ये friendship series खेळायला येतो. शेवटी पाकिस्तानात परतायच्या आधी त्यांना भारताच्या संघाबरोबर party चे निमंत्रण मिळते. त्यात सर्वजण एकत्र येउन चहाचा आस्वाद घेत असतात. तेवढ्यात, पाकिस्तानी opener शाहिद अफ्रिदीला biscuits हवे असतात. तर waiter ला विचारयच्या ऐवजी तो ईंझमामला biscuits मागतो................... का?? | | | | कारण ती प्रियागोल्ड biscuits असतात.... हक से मांगो.
  • Log in or register to post comments

डॉक्टर-डॉक्टर

ब्रिटिश टिंग्या
Mon, 01/07/2008 - 16:58 नवीन
कार दुर्घटना में एक महिला को अस्पताल पहुंचाया गया। टांग और पीठ पर काफी चोटें आई थीं। शीघ्र ही पट्टी-वट्टी की गई। अंत में डॉक्टर ने कहा- कल सवेरे आप घर जा सकती हैं। दूसरे दिन प्रात: डॉक्टर आया तो उसने कहा- मैडम मेरे विचार में आपको दो दिन और अस्पताल में रहना चाहिए। मुझे नहीं पता था कि आप इतनी बुरी तरह से दुर्घटनाग्रस्त हुई हैं। यह तो मुझे तब पता चला जब मैंने आज समाचार पत्र में इस दुर्घटना की खबर पढ़ी। आपला, (हिंदी भाषिक) छोटी टिंगी
  • Log in or register to post comments

एक उत्तम पीजे ;)

नंदन
Mon, 01/07/2008 - 19:00 नवीन
आमचे वकीलसाहेब नसते तर मी तुरुंगातच खितपत पडलो असतो. दोन माणसं असल्यानं लवकर खणून झालं. ;) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments

सह्हि..

प्राजु
Tue, 01/08/2008 - 01:17 नवीन
नंदन.. सह्हिये पी.जे.
  • Log in or register to post comments

गाढव आणि दारू

सुनील
Tue, 01/08/2008 - 01:26 नवीन
शिक्षक : गाढवासमोर दोन पिंपे ठेवली - एकात दारू आणि दुसर्‍यात पाणी, तर ते काय पिईल? मुले (एकासुरात) : पाणी. शिक्षक (विजयी मुद्रेत) : का मुलांनो? मुले (एकासुरात) : कारण ते गाढव आहे!!!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

गुरु़जी

चतुरंग
Tue, 01/08/2008 - 01:45 नवीन
बंड्याला : पुल्लिंग, स्त्रीलिंग व नपुंसकलिंगी शब्दाचे एकेक उदाहरण दे. बंड्या : तो फळा, ती शाळा, ते गुरुजी! चतुरंग
  • Log in or register to post comments

एक मग

टिउ
Tue, 01/08/2008 - 02:25 नवीन
एक मग दुसर्या मगाला भेटल्यावर काय म्हणेल? "काय मग, कसा आहेस"?
  • Log in or register to post comments

आफ्रिकन..

प्राजु
Tue, 01/08/2008 - 02:35 नवीन
आफ्रिकन माणसाने स्विमिंग्पूल सुरू केला तर तो त्याला नाव काय देईल...? -...... ......... ......... ......... ......... ......... ......... ......... या डुम्बा डुंबा....!
  • Log in or register to post comments

हत्ती आणि मुंगी...

इनोबा म्हणे
Tue, 01/08/2008 - 02:49 नवीन
एकदा एक हत्ती पाण्यात पोहत असताना एका मुंगीने त्याला शिव्या घालत बाहेर यायला सांगीतले.... हत्ती बाहेर येताच मुंगी म्हणाली"सॉरी..सॉरी...मला वाटलं,तू माझीच चड्डी घालून आला आहेस... (मुंगीएवढा हत्ती) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

स्टोव दुरुस्ती

सुनील
Tue, 01/08/2008 - 03:16 नवीन
चीनमधील स्टोव दुरुस्ती करणार्‍या माणसाचे नाव काय ? स्टोव ची पिन Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा