कशाचेही शेपुट कशालातरी लावण्याचा अट्टाहास चालवला आहे.पान खाऊन थुंकणे व बहिणीचा अपमान ह्या गोष्टीची तुलना तुम्ही कशी काय करता.दोन्ही ही घटना एकमेकापेक्षा खुप भिन्न आहेत. त्याची बरोबरी किंवा तुलना करणे हे एकदम चुक आहे.थुंकणार्याला तुम्ही समजाऊन सांगु शकता की हे चुक आहे बाबा.परंतु त्याला जर तुम्ही मारायला सुरुवात कराल तेव्हा बाकीचे लोक तुम्हालाच झोडपतील. परंतु बहिणीची छेड काढणार्यास तुम्ही धक्काबुक्की कराल त्यावेळी इतर लोक ही तुमच्या समर्थनार्थ उतरतील हा फरक लक्षात ठेवा.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे चुकच आहे त्याला मी समर्थन देत नाही.
वेताळ
दोन्ही ही घटना एकमेकापेक्षा खुप भिन्न आहेत. थुंकणार्याला तुम्ही समजाऊन सांगु शकता की हे चुक आहे बाबा.परंतु त्याला जर तुम्ही मारायला सुरुवात कराल तेव्हा बाकीचे लोक तुम्हालाच झोडपतील.
माझाही हाच मुद्दा आहे. एकदा का हिंसेची चटक लागली की असा सुक्ष्म फरक कळणे अवघड होउन बसते.
इथे ह्याच प्रश्नावर मला मिळालेले उत्तर पाहा.
१) त्या थुंकणार्या असभ्य व्यक्तिला तिथल्या तिथे लाथा बुक्क्याने बडवणे ही कृती आपल्याला योग्य वाटते का?
हो, योग्य वाटते!
अहिंसावाद हिंसावाद ह्यांचा नको तितका उहापोह सध्या मिपावर चाललेला दिसतो
+१
एक विचार मनात आला (खरे तर गेलो २-३ दिवस सतत येतो आहे) सावरकर काय, टिळक काय, गांधीजी काय अथवा आंबेडकर काय.. अश्या लोकांनी कोणता वाद-विचारसरणी योग्य / अयोग्य असले वाद न घालता स्वतःला जे जमलं -पटलं ते केलं... या सर्वांची सामायिक शिकवण असेल तर ती एकच की "कृती करा" तुम्हाला जशी आवडेल-जमेल पटेल तशी कृती करा.
अश्या कृतीप्रधान व्यक्तींच्या कृतीला केवळ "वाद" (इझम्स) असे संबोधून त्यांच्यावरून केवळ शाब्दिक वाद घालणे यापेक्षा त्या पुण्यात्म्यांचा पराभव तो कोणता?
-(स्वयंवादी) ऋषिकेश
सहजरावांप्रमाणेच
कोलबेर +१
ऋषिकेश ++१
अवांतरः अहिंसावाद, गांधीवाद, सावरकरवाद, फक्त व्यक्तिगत वादावादीवर येऊन थांबल्याचं अधून मधून दिसतंय, त्याबद्दल खेद वाटतो.
सावरकर काय, टिळक काय, गांधीजी काय अथवा आंबेडकर काय.. अश्या लोकांनी कोणता वाद-विचारसरणी योग्य / अयोग्य असले वाद न घालता स्वतःला जे जमलं -पटलं ते केलं... अश्या कृतीप्रधान व्यक्तींच्या कृतीला केवळ "वाद" (इझम्स) असे संबोधून त्यांच्यावरून केवळ शाब्दिक वाद घालणे यापेक्षा त्या पुण्यात्म्यांचा पराभव तो कोणता?
+१
या सर्वांची सामायिक शिकवण असेल तर ती एकच की "कृती करा" तुम्हाला जशी आवडेल-जमेल पटेल तशी कृती करा.
अगदी खरं! मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यावर काही तासातच आम्ही ५-६ मित्र रक्तदान करायला गेलो, इतरही २-४ जणांना आग्रह करून प्रवृत्त केले..आम्हाला जे करता येणं शक्य होतं ते आम्ही केलं, अजूनही करत राहू...
परंतु आम्ही वादही घालू, त्यात काही गैर आहे असं आम्हाला वाटत नाही.. त्यामुळे काही लोकांचे थोर विचार समजायला आम्हाला मदत होते! ;)
आपला,
(नुसते लंबे लंबे लेख न लिहिता कृती करणारा!) तात्या.
इतरही २-४ जणांना आग्रह करून प्रवृत्त केले.
इतकेच नव्हे, तर आमची कृती पाहून मिपावरीलही एका व्यक्तिला रक्तदान करावेसे वाटले आणि तिने ते केले याचेही आम्हाला समाधान आहे!
एरवी, काहितरी असंबद्ध लिहित रहाणे, नेळभटवादाचा पुरस्कार करत राहणे अगदी सोपे आहे! :)
तात्या.
>>या सर्वांची सामायिक शिकवण असेल तर ती एकच की "कृती करा" तुम्हाला जशी आवडेल-जमेल पटेल तशी कृती करा.
हा उपदेश हिटलर ने मात्र अगदी चांगला अमलात आणलेला दिसतो. त्याने तेच केले.
पुण्याचे पेशवे
विपर्यासाची अतिशयोक्ती हा विनोदनिर्मितीचा एक प्रकार आहे.
सावरकरांची भाषाशुद्धी मोहीम कशी फोल आहे हे दाखवण्यासाठी, "अग्निरथपथ....." ह्या शब्दाचा दाखला देण्याविषयीचा विनोद सर्वांच्या परिचयाचा आहेच.
आता हा विवक्षित शब्द सावरकरांनी रचला असल्याची शक्यता फारच धूसर, किंबहुना नाहीच. तरीही, तो शब्द सावरकरांनी रचला असे भासवण्याचे एकमेव प्रयोजन म्हणजे, त्या मोहिमेतील फोलपणा दाखवणे. आणि त्यासाठीच ही विपर्यासाची अतिशयोक्ती!
अशा वेळेस सावरकरांनी योजलेले कित्येक शब्द आज रूढ झाले आहेत, याकडे हेतुपुरःसर दुर्लक्ष करायचे असते!
तीच गोष्ट गांधीवादाची.
ज्या गोष्टी गांधींजींनी सांगितल्या नव्हत्या अथवा सांगितल्या असल्या तरी त्यांचा संदर्भविरहीत उपयोग करून, विनोद निर्मिती करण्याचा प्रयत्न येथे (मिपावर) काही मंडळींनी केला असल्याचे जाणवते.
अर्थातच अशा वेळी, दुसर्या महायुद्धात गांधींनी ब्रिटीशांना पाठिंबा दिला होता (हिटलरला गुलाबाचे फूल देण्याचा सल्ला नव्हे), तसेच कायदा जर अन्याय्य असेल तर प्रसंगी कायदेभंग करायलाही सांगितले होते, हे हेतुपुरःसर विसराचे असते!!
शेवटी विनोदनिर्मिती ही महत्वाची!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
आता लेख टाकताना, त्यात कुठे गांधीवाद, अहिंसावाद, हिंसेचे समर्थन, हल्ला, असे काही शब्द असल्यास तो लेख आधी संपादकांकडे जाइल असे काहितरी करा बुवा.
सध्या मिपा सदस्य भलतेच एक्टीव्ह होवून लेखन करतायत ( मी ही आहे त्यात!), कौल टाकतायत.
पण त्यामुळे धड काही वाचलेच जात नाही.
तेव्हा जरा काहीतरी विवेक व्हावा. असे वाटते.
प्रतिक्रिया
प्रकटन
आड ना बुड
थुंकणार्
कृती करा
++१
सहजरावांप
+१
सावरकर
या
इतरही २-४
परंतु
तात्या,
मुंबईवर
हम्म्म्म्म्म
विनोदनिर्मिती..
अबब !! अवघड
असेच म्हणतो