अहिंसावाद हिंसावाद ह्यांचा नको तितका उहापोह सध्या मिपावर चाललेला दिसतो हे मान्य असुनही काही गोष्टींचा खुलास करणे आवश्यक वाटल्याने हा प्रपंच. हिंसा/अहिंसा ह्यापैकी कुठल्याही तत्त्वाचा मी अभ्यासक नाही. मला ह्या दोन्हीविषयी जे अर्थ अभिप्रेत आहेत त्यातुन इथे लिहित आहे.
गालावार डास बसलेला जाणवत असताना तो एका फटक्यात मारुन न टाकता उडुन जायची वाट बघणे असा काहीसा अहिंसावादाचा जो नेभळट अर्थ लावला जातो आहे तो मलातरी हास्यास्पद वाटतो. हिंसावादी असो अहिंसावादी असो कुणीही पटकन तो डास मारुनच टाकणार. असल्या शुल्लक घटनांमधुन कसल्याही तत्त्वाचा/विचारसरणीचा शिक्का कुणावरही लावता येणे शक्य नाही. गालावरचा डास मारलात मग तुम्ही अहिंसावादी कसे काय? असा युक्तिवाद करणार्यांना मी एव्हढेच विचारु शकतो तुम्ही जर स्वतःला हिंसावादी म्हणवता तर जगातील सर्व हिंसा तुम्हाला मान्य आहे का? उदा. एखाद्याने रागाच्या भरात आपल्या मित्राचा जीवानीशी खून पाडला ही गोष्ट तुम्हाला योग्य वाटते का? फक्त होय किंवा नाही असे उत्तर द्या असा हट्ट धरला आणि तुम्ही 'नाही बुवा हे योग्य नाही वाटले कसल्याही पाठपुरावा न करता निव्वळ रागाच्या भरात त्याने मित्राचा जीव घ्यायला नको होता' असे (माझ्या मते) सुज्ञ उत्तर दिलेत तर तुम्ही अहिंसावादी ठरलात असे अनुमान काढून मोकळे व्हायचे का? होय तुम्ही इथे हिंसेला विरोध केलात तुम्ही कसले हिंसावादी तुम्ही तर अहिंसावादी तुमची तत्वे भोंगळ आहेत असा युक्तिवाद केलेला योग्य ठरेल का?
जर एखाद्या व्यक्तिच्या हिंसक प्रवृत्तीला विरोध केल्याने तुम्ही लगेच अहिंसक बनत नसाल, तर एखाद्या गुंडाची पिटाई केल्याचे समर्थन केल्याने एखादा हिंसक कसा काय बनतो? थोडक्यात एखाद्या गुंडाची पिटाई केली गेली आणि मला ती कृती योग्य वाटली म्हणून निव्वळ ह्या एकाच निकषावर तुम्ही माझ्यावर 'हा कसला अहिंसावादी ?'असा आरोप करु शकत का?
माझ्यामते अहिंसावादी म्हणजे शक्य तितक्या ठिकाणी हिंसे ऐवजी इतर पर्याय शोधणारा. त्यासाठीच मी तात्या अभ्यकरांना पान खाउन थुंकण्याचे उदाहरण दिले होते. एखादा पान खाउन रस्त्यात थुंकला म्हणुन त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करणे मला तरी ते योग्य वाटले नाही. (ह्याविषयी प्रश्न उपस्थित करण्याचे हे एकमेव कारण, त्यामध्ये मी ताकाला जावुन भांडे लपवण्याचा प्रश्नच नाही, प्रश्न सरळ सरळ तात्यांना उद्देशुन विचारले होते इनडायरेक्ट काहीही नव्हते) थुंकणार्या व्यक्तिला आधी समजावुन सांगणे प्रसंगी आवाज चढवणे असा पर्याय मी निवडला असता. ह्या कुठल्याही पर्यांयांचा वापर न करता लगेचच मी हातापायीवर उतरलो असतो तर माझ्या अहिंसावादावर प्रश्नचिन्ह ठेवायचा हक्क आहे. म्हणूनच अतिरेकी ताजमध्ये घुसलेले असताना कमांडोजनी त्यांना ठार मारुन बाहेर काढणे मला अहिंसेच्या तत्त्वांचे उल्लघन करणे वाटत नाही. माझ्यामते गांधीजींना देखिल तसे वाटत नसावे. अन्यथा स्वतंत्र भारतात सशस्त्र पोलीस, सशस्त्र सैनिक कधी होउच दिले नसते. अतिरेक्यांना कंठस्नान घालुन संपवणे हा तात्काळ उपाय आणि पहिली पायरी होती ज्यात काहीही चूक नाही. पण म्हणून इथुन पुढे आणखी हिंसा करुन हा प्रश्न समुळ निकालात काढता येईल का? असे एक अहिंसेचा पुरस्कर्ता म्हणून मला वाटत नाही. (इथेही शक्य तिथे शस्त्र उचलावेच लागेल पण ते कमीत कमी ठिकाणी आणि विचारपुर्वकच उचलावे हे माझे मत. त्याचवेळेस सरळ सरळ पाकिस्तानावर अणुबाँब टाकावा आणि हा प्रश्न कायमचा सोडवावा असेही कुणाचे मत ठरु शकते जे मला मान्य नाही) कदाचीत इथेच हिंसावादी आणि अहिंसावादी ह्यांचे मार्ग वेगवगळे होत असावेत. पण म्हणून अतिरेक्यांना मारण्याचे समर्थन केल्याने कुणीही लगेच 'हिंसावादी' बनत नाही की अतिरेक्यांनी मारलेल्यांचा जीवांचा निषेध नोंदवला म्हणून 'अहिंसावादी' बनत नाही इतकेच. हीच गोष्ट छेड काढणार्या गुंडाच्या उदाहरणात लागू पडते.
-कोलबेर
टीप: हेच उत्तर मी वरील प्रश्न (पान खाण्याबाबतीत) जिथे उपस्थित केले तिथेही देऊ शकलो असतो पण ह्या प्रश्नांमागील माझी भूमिका लक्षात घ्यायचा प्रयत्न न करता हा पोरकटपणा आहे आणि मला विशीष्ठ लोकांना टारगेट करायच्या छंद आहे असले वैयक्तिक आरोप उपस्थित केल्याने इथे स्वतंत्र रुपात देत आहे. असो हा विषय माझ्याकडून संपला हे तिकडे लिहुनही तात्यांचा प्रतिसाद आल्याने हे स्पष्टीकरण देणे गरजेचे वाटले.अनावश्यक वाटल्यास ही तळटीप उडवुन टाकायला हरकत नाही. पण माझ्याकडून हा विषय संपलेला आहे.
वाचने
3377
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रकटन
आड ना बुड
थुंकणार्
In reply to आड ना बुड by वेताळ
कृती करा
++१
In reply to कृती करा by ऋषिकेश
सहजरावांप
In reply to ++१ by सहज
+१
In reply to सहजरावांप by ३_१४ विक्षिप्त अदिती
सावरकर
In reply to कृती करा by ऋषिकेश
या
In reply to कृती करा by ऋषिकेश
इतरही २-४
In reply to या by विसोबा खेचर
परंतु
In reply to या by विसोबा खेचर
तात्या,
In reply to या by विसोबा खेचर
मुंबईवर
In reply to या by विसोबा खेचर
हम्म्म्म्म्म
In reply to कृती करा by ऋषिकेश
विनोदनिर्मिती..
अबब !! अवघड
असेच म्हणतो