चालू घडामोडी - जून २०२१ (भाग 3)

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
10 Jun 2021 - 1:17 pm
गाभा: 

पावसात यंदा मुंबई तुंबणार नाही; पालकमंत्री आदित्य ठाकरे

(https://www.google.com/amp/s/www.mymahanagar.com/mumbai/guardian-ministe...)
-------

Mumbai Rains : मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केला नाही, करणारही नाही : महापौर किशोरी पेडणेकर

"Mumbai Rains : मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केला नाही, करणारही नाही : महापौर किशोरी पेडणेकर | Mumbai rains update we never claimed that mumbai will not be flooded said mayor kishori pednekar | TV9 Marathi" https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/mumbai-rains-update-we-nev...
----------

बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात....

प्रतिक्रिया

कॉमी's picture

19 Jun 2021 - 10:02 am | कॉमी

सेनेने आणी भाजपाने पब्लिक मध्ये तरी आपल्या बोलण्याने परतीचे पूल जाळून टाकले आहेत. त्यामुळे युती व्हावीच. सगळ्यांचा व्यवस्थित भ्रमनिरास होऊ दे, (अजुनएकदा, आय मीन. एकदा सकाळच्यापारी शपथ घेऊन झालाच आहे.) आता हिंदू विरोधी वैगेरे टिकेच्या मागे काही सब्स्टन्स असतो का कळू दे सगळ्यांना.

श्रीगुरुजी's picture

19 Jun 2021 - 10:21 am | श्रीगुरुजी

महाराष्ट्र भाजप, विशेषतः फडणवीस या व्यक्तीच्या बाबतीत, २०१४-२०१९ या ५ वर्षातच माझा भ्रमनिरास झाला. अर्थात महाराष्ट्रातील इतर पक्षसुद्धा वाईटच आहेत. त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मी मतकेंद्राकडे फिरकलोच नव्हतो.

एका गोष्टीची खात्री आहे. जर भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेबरोबर सरकार/युती केली (अगदी भाजपचा मुख्यमंत्री झाला तरीही), तर महाराष्ट्रात भाजपची उरलीसुरली अब्रू जाऊन महाराष्ट्रातून भाजप संपेल.

प्रदीप's picture

19 Jun 2021 - 11:15 am | प्रदीप

आतापर्यंत 'लोकमत' सोडून इतरस्त्र कोठेही ही बातमी मी तरी पाहिलेली नाही. सोशल मीडियावरील भाजपचे एक मोठे हँडल अशा युतिविषयी थोडी वेगळी पण सावध टिपण्णी करत आहे-- ती अशी की, युती झालीच तर गडकरी मुख्यमंत्री व्हावेत व फडणवीसांना दिल्लीत न्यावे अशी काहीतरी व्यवस्था आहे, की काय? (ह्या हँडललाही हे नक्की माहिती नाही). हे दोन अगदी भिन्न प्रवाह आहेत, पुढे प्रत्यक्ष काय होईल ते दिसेलच.

पण मला वेगळीच 'गम्मत' ह्यासाठी वाटली की, 'असे झाले तर'आपली स्वतःची भूमिका काय असेल ह्याविषयी येथील भाजप समर्थक नि:शंक लिहीत आहेत, 'तसे झाले तर' भाजपला आपला पाठिंबा अजिबात रहाणार नाही, वगैरे जाहीर करीत आहेत.

पण त्याविरूद्ध येथील सोशलिस्टांचे पहा. आतापर्यंतच्या त्यांच्या वेगवेगळ्या पक्षांच्या तर्‍हेतर्‍हेच्या कोलांट्याउड्यांबद्दल (व त्या पुढेही तशाच ते पक्ष मारत राहतील) त्यांचे काय म्हणणे आहे? कधी पूर्वी कॉंग्रेसवर तुटून पडणारे, आता कॉंग्रेसच्याच वळचणीत केविलवाणे उभे असतात, त्याचे काय? त्याविषयी त्यांनी कधी जाहीर वाच्यता केली आहे? पुढे कधी करतील ते?

दोन विचारसरणींच्या समर्थकांतील हा फरक ही एक लक्षणीय 'गम्मत' आहे, नाही?

चंद्रसूर्यकुमार's picture

19 Jun 2021 - 11:32 am | चंद्रसूर्यकुमार

त्याविरूद्ध येथील सोशलिस्टांचे पहा. आतापर्यंतच्या त्यांच्या वेगवेगळ्या पक्षांच्या तर्‍हेतर्‍हेच्या कोलांट्याउड्यांबद्दल (व त्या पुढेही तशाच ते पक्ष मारत राहतील) त्यांचे काय म्हणणे आहे? कधी पूर्वी कॉंग्रेसवर तुटून पडणारे, आता कॉंग्रेसच्याच वळचणीत केविलवाणे उभे असतात, त्याचे काय? त्याविषयी त्यांनी कधी जाहीर वाच्यता केली आहे? पुढे कधी करतील ते?

सोशालिस्टांना स्वतःची भूमिका कधीच नसते तर त्यांच्या मते सध्याचा जो मोठा शत्रू आहे त्याच्या विरोधात ते नेहमी भूमिका घेत असतात. स्वातंत्र्य मिळाल्यापासून १९८९ च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत काँग्रेस हा त्यांचा मोठा शत्रू होता म्हणून आपल्या समाजवादी विचारांशी फारसे घेणेदेणे नसलेल्या जनसंघ-भाजपबरोबर त्यांनी हातमिळवणी केली होती. १९६७ मध्ये राममनोहर लोहियांनी काँग्रेसविरोधी आघाडीत जनसंघाला समाविष्ट करून घेतले होते. १९७४ मध्ये जयप्रकाश नारायणांनी तेच केले. जनसंघ फासिस्ट असेल तर मी पण फासिस्ट आहे असे त्यांनी जाहिरपणे म्हटले होते. पण १९९० मध्ये वि.प्र.सिंगांचे सरकार अयोध्या प्रश्नावरून पडल्यानंतर ते लोक भाजपला आपला मोठा शत्रू मानायला लागले. मग भाजपला रोखायला म्हणून काँग्रेसशी हातमिळवणी करण्यात त्यांना काहीही गैर वाटले नव्हते.

देशात भाजप हा इतका मोठा पक्ष झाला त्यामागे या समाजवादी लोकांनी केलेले हे प्रकार अधिक जबाबदार आहेत. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे काँग्रेसविरोधी जवळपास सगळी जागा समाजवादी आणि डाव्या पक्षांनी व्यापली होती. जनसंघ विरोधी पक्षांच्या स्पेसमध्ये अगदी कोपर्‍यातला पक्ष होता. पण जनसंघ-भाजपला आपल्याबरोबर घेऊन समाजवाद्यांनी या पक्षाला सामावून घेतले आणि सतत आपापसात भांडून भूस पाडत राहिल्याने लोकांपुढे चित्र उभे राहिले की हे समाजवादी लोक सतत भांडत राहणार त्यापेक्षा केडर बेस्ड आणि एकसंध जनसंघ-भाजप बरा. स्वातंत्र्यलढ्यातील मूल्यांचा परिणाम म्हणून स्वातंत्र्यानंतर समाजवादी विचारांच्या पक्षांना अनेक वर्षे चांगल्यापैकी मते मिळत होती. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे यापुढील काळात जी काही उरलीसुरली जागा या समाजवादी विचारांच्या पक्षांनी सध्या व्यापली आहे ती त्यांच्या स्थानिक नेत्यांनंतर काँग्रेसला आणि काँग्रेस तितकी सक्षम न राहिल्यास भाजपलाच मिळेल.

कॉमी's picture

19 Jun 2021 - 11:53 am | कॉमी

माझ्या बद्दल आहे का प्रतिसाद ?

चंद्रसूर्यकुमार's picture

19 Jun 2021 - 11:55 am | चंद्रसूर्यकुमार

हो...

जर तुम्ही राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण वगैरे असाल तर.

कॉमी's picture

19 Jun 2021 - 11:58 am | कॉमी

प्रतिसाद प्रदीप यांच्या प्रतिसादाला होता, काहीतरी गडबड झाली. इग्नोअर.

माझ्या बद्दल असेल तर सांगतो. माझे कोणतेही 'वेगवेगळे पक्ष' नाहीत. भाजपा बद्दल मला कसलाही राग नाही, खासकरुन महाराष्ट्रात. महाराष्ट्रातले भाजप नेते हिन्दू मुस्लिम वादात फार पडत नाहीत हे मला आवडते. मला कोणत्याही पक्षाबद्दल प्रेम नाही. काम काय करतात ते जास्त महत्वाचे. कोणी का करेना मग. मी कोणत्या पक्षाचा उदोउदो करत नाही. मी अमुकपक्षाचे समर्थन करतो असे म्हणलेच नाही असल्याने पलटी मारल्यावर आता मी अमुकपक्षाचे समर्थन करणार नाही असे म्हणायचे कारण नाही.

स्वत:च्या आवडत्या पक्षावर काहीही बालंट आले की इकडे तिकडे पाहायची सवय मात्र मोठी गमतीशीर आहे. सोशलिस्ट काय म्हणतात आणि त्यांव काय म्हणतात.

आणि युती होण्याची गरजच काय मी म्हणतो ? चन्द्रकांत पाटील ऑल्रेडी म्हणाले आहेत की मोदींनी सांगितलं तर वाघाशी युती करु म्हणुन. इथे तयारीच दिसते. जर ही तयारी असणे प्रिन्सीपली चूक वाटत असेल तर इथेच भाजपाला लांब करायला हवे.

जर भाजपाची धोरणे चांगली आहेत खात्री असती, आणि युतीने त्या धोरणांमध्ये काही फरक पडणार नसेल तर मी भाजपाचे समर्थन कायमच ठेवले असते. कोण कुठल्या पक्षाशी युती करतय असल्या बाष्कळ इगो फाइट मध्ये मी पडलोच नसतो. देअर, जर मी (कुठल्याही) पक्षाचा समर्थक असतो तर हे धोरण ठेवले असते.

नेस्टिंग गडबडले आहे काय ? प्रदीप यांना दिलेले उपप्रतिसाद खालीच येत आहेत.

प्रदीप's picture

19 Jun 2021 - 1:00 pm | प्रदीप

तुम्ही येथील सोशलिस्टांपैकी एक आहात तेव्हा हा तुम्हालाही उद्देशून होता.

स्वत:च्या आवडत्या पक्षावर काहीही बालंट आले की इकडे तिकडे पाहायची सवय मात्र मोठी गमतीशीर आहे. सोशलिस्ट काय म्हणतात आणि त्यांव काय म्हणतात.

इथे तुम्ही गडबडला आहात! मी कुठे, कधी व केव्हा म्हटले आहे की मी भाजपचा आहे म्हणून. (एके ठिकाणी तर अलिकडेच साहना ह्यांच्या एका झणझणीत प्रतिसादावर 'तुम्ही भाजपावाल्यांची हवाच काढलीत' असे काहीसे लिहील्याचेही आठवते).

पण ही खासियत मी सोशल मीडियावरही बघतो. उजव्या बाजूचे बहुधा अगदी प्रत्येक बाबतींत स्वतःचे बरेवाईट विश्लेषण करून, वेळप्रसंगी स्वतःच्या प़क्षाच्या धोरणाची, त्यांच्या नेत्यांच्या वर्तनाची जाहीर चिरफाड करणार. पण डाव्या बाजूस मात्र तसे काही झाले की 'शांतं, पापं' असते. तेव्हढेच मी इथे गमतीने नमूद केले.

आपापल्या सोशल मिडिया बबल मध्ये तसेच वाटते. मला पण तसेच, पण उलट वाटते.

प्रदीप's picture

19 Jun 2021 - 1:13 pm | प्रदीप

.

चौकस२१२'s picture

21 Jun 2021 - 7:09 am | चौकस२१२

उजव्या बाजूचे बहुधा अगदी प्रत्येक बाबतींत स्वतःचे बरेवाईट विश्लेषण करून, वेळप्रसंगी स्वतःच्या प़क्षाच्या धोरणाची, त्यांच्या नेत्यांच्या वर्तनाची जाहीर चिरफाड करणार. पण डाव्या बाजूस मात्र तसे काही झाले की 'शांतं, पापं' असते. तेव्हढेच मी इथे गमतीने नमूद केले.

प्रदीप बरोबर ... मनातलं बोललात ...

Rajesh188's picture

19 Jun 2021 - 10:04 am | Rajesh188

भारताच्या राजकीय इतिहासात असे प्रसंग खूप वेळा घडले आहेत.
ताजे उदाहरण
मेहबूबा मुफ्ती सोबत bjp गेली च होती ना.
दोन्ही पक्षांचे विचार एकदम विरोधी असताना.
जी ममता आज bjp ची कट्टर विरोधक आहे तीच TMC BJP बरोबर सत्तेत सहभागी होती.
ज्या सेनेचा पूर्ण जन्म काँग्रेस वर टीका करण्यात गेला तीच सेना सत्तेत काँग्रेस बरोबर सहभागी आहे ना.
समाजवादी पार्टी नी सुद्धा bjp ला समर्थन दिले होते केंद्रात.
राजकीय पक्षांना सत्ता मिळवणे हेच महत्वाचे असते बाकी तत्व वैगेरे काही नसते हे सत्य पाठीराखे लोक समजून घेत नाहीत.
त्या मुळे त्यांचा भ्रमनिरास होतो.
राणे
सर्व पक्षात प्रवेश करून झाला.
किती तरी आमदार ,खासदार आहेत ते प्रतेक पंचवार्षिक ला वेगळ्याच पक्षात असतात.
एवढे सर्व दिसतंय तरी लोक सुधारत नाहीत.

२५ वर्षे युतीत सडली वगैरे काहीतरी जाहीर सभांमधून मारे म्हणत होते, मग आता त्याच युतीची वाट हुंगायची गरजच काय?

कंपोस्ट खत व्हायची वाट बघतायत का?

श्रीगुरुजी's picture

20 Jun 2021 - 5:08 pm | श्रीगुरुजी

https://www.loksatta.com/mumbai-news/shivsena-mla-pratap-sarnaik-letter-...

वरील बातमी खरी ठरण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल पडले. आधी वातावरणनिर्मिती करायची, नंतर आमदारांकडून मागणी पुढे आणायची आणि शेवटी आमदारांच्या इच्छेनुसार भाजप बरोबर पुन्हा जायचे, अशी योजना दिसते.

श्रीगुरुजी's picture

20 Jun 2021 - 5:44 pm | श्रीगुरुजी

प्रताप सरनाईकांच्या पत्रावर विचार करण्यासाठी सेनेने आमदारांची बैठक बोलाविली आहे म्हणे. एकंदरीत लोकमतची बातमी खरी ठरण्याच्या दृष्टीने पावले पडताना दिसताहेत.

श्रीगुरुजी's picture

20 Jun 2021 - 5:45 pm | श्रीगुरुजी

२०१७ मधील बिहार फॉर्म्युलाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होण्याची शक्यता दिसते.

श्रीगुरुजी's picture

18 Jun 2021 - 11:11 pm | श्रीगुरुजी

आपल्यापेक्षा कमी आमदार असलेल्या पक्षाला मुख्यमंत्रीपद द्यायचा मूर्खपणा भाजपने उत्तर प्रदेशात दोन वेळा, कर्नाटकात एकदा व बिहारमध्ये एकदा करून प्रत्येक वेळी हात पोळून घेतले आहेत.

आपल्यापेक्षा कमी मते मिळविणाऱ्या पक्षाशी युती करून त्या पक्षाला जास्त जागा व पर्यायाने मुख्यमंत्रीपद व जास्त मंत्रीपदे देण्याचा मूर्खपणा भाजपने बिहार व महाराष्ट्रात प्रत्यकी ५ वेळा करून या दोन्ही राज्यात स्वत:चे प्रचंड नुकसान करून घेतले आहे.

एवढे भीषण अनुभव घेऊनसुद्धा पुन्हा तोच मूर्खपणा भाजप करणार असेल तर पुढील कोणत्याही निवडणुकीत भाजपला मत देणार नाही.

चौकस२१२'s picture

21 Jun 2021 - 7:05 am | चौकस२१२

एवढे भीषण अनुभव घेऊनसुद्धा पुन्हा तोच मूर्खपणा भाजप करणार असेल तर पुढील कोणत्याही निवडणुकीत भाजपला मत देणार नाही.

श्रीगुरुजी, उद्वेग समजण्यासारखा आहे .. भाजप जर काँग्रेस सारखीच वागू लागली तर त्यात मग फरक काय आणि कशाला मत द्यायचे ... बरोबर
१) १.५ वर्षांपूर्वी राज्याची निवडणूक झाल्यावर सर्वात जास्त सभासद निवडून येऊन सुद्धा आणि लोकांनी आधीच ठरलेलया युतीचा विचार करून मते दिली होती आणि ऐनवेळी सेनेचं हट्टामुळे सत्ता मिळू शकली नाही तेव्हा भाजपबद्दल निशिचित सहानुभूती वाटली असेल / होती
२) त्यानंतर जी पहाटेची अमंगल युति केली त्यामुळे राज्य भाजप बदल चा आदर कमीच झाला प्रश्न नाही ..
३) आणि आता परत सेने बरोबर युति केली तर अजूनही आदर कमी होईल ... हे हि पटतय
पण २-३ मुद्दे विचारात घेण्यासारखे आहेत
विचार करूयात
- ज्या राज्यात आपल्याला अतिशय कमी लेखले जाते आणि ज्या राज्यात पाया नाही किंवा महाराष्ट्राबद्दल बोलायचं तर जिथे पाया होऊ शकतो पण केवळ जातीचे राजकारण करून विरोधक असा पाया / जम बसवू देत नाहीत आश्या राज्यात "कधीतरी सत्ता " आपली पाहिजे म्हणजे जनतेला आपण दाखवून देऊ कि आपण पण राज्य करू शकतो ... असा विचार साहजिक आहे \
(महाराष्टार्त भाजपाला "भटांचा पक्ष म्हणून " नेहमीच हिणवले गेले ... जरी भट फक्त ३.५% असले तरी आणि उत्तर प्रदेशात "भट"फक्त ९-१०% आहेत तरी तिथे भाजप पहिलया पासून जोरात आहे हे दाखवते कि भाजप हा भट आणि सेठ यांचा पक्ष आहे असे आता फारसे म्हणता येणार नाही .. तरी पण भीती आहेच महाराष्ट्रात कधी पुकारा केला जाईल कि बघा आले मनुवादी , संघी भट, राष्ट्रपित्याचे मारेकरी .. आणि १०५ चे ५ सुद्धा होतील ... )

बर असा हाता तोंडाशी आलेला घास काढलं जावा .. काय वाटलअसेल त्यांना ?

महाराष्ट्रात आता भाजपने स्वबळावर लढावे असे अनेकांना वाटतंय .. पण परत तीच भीती ... आणि आता "मोदी" रतहाचा वेग हि कमी हळू होतोय .. त्यात सेनेवर भरवसा नाही मग करायाच काय ?
असो तेवहा जर अजूनही भाजपचं मूळ प्रणालीवर विश्वास असले तर विनंती कि पाठ फिरवू नका.. हवे तर "मत देईन स्व बळावर लढलात तर अशी काहीतरी अट घाला " अर्थात एका मतदाराने काय होते म्हणा ...

श्रीगुरुजी's picture

21 Jun 2021 - 10:16 am | श्रीगुरुजी

- ज्या राज्यात आपल्याला अतिशय कमी लेखले जाते आणि ज्या राज्यात पाया नाही किंवा महाराष्ट्राबद्दल बोलायचं तर जिथे पाया होऊ शकतो पण केवळ जातीचे राजकारण करून विरोधक असा पाया / जम बसवू देत नाहीत आश्या राज्यात "कधीतरी सत्ता " आपली पाहिजे म्हणजे जनतेला आपण दाखवून देऊ कि आपण पण राज्य करू शकतो ... असा विचार साहजिक आहे \

भाजप महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा पक्ष आहे. २०१४ मध्ये भाजपला स्वबळावर २८.५% मते होती व इतरांना १८% हून कमी मते होती. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपचा पाया २०१४ पर्यंत मजबूत होता. यामागे इतर मागासवर्गीय व ब्राम्हणांच्या मतांचा प्रमुख वाटा होता. मायावतीचा पाया दलित आहेत व मायावती कधीही दलितविरोधी निर्णय घेऊन आपला पाया डळमळीत करीत नाही. समाजवादी पक्षाचा पाया यादव व मुस्लिम आहेत व ते कधीही या दोन गटांना दुखवत नाहीत. आपल्या मतदारांना न दुखवता ते पक्षविस्तार करण्याचा प्रयत्न करतात.

भाजपने सुद्धा इतर मागासवर्गीय व ब्राह्मणांना न दुखवता आपला विस्तार करायला हवा होता. परंतु मराठ्यांच्या मतांसाठी व पक्षातील प्रतिस्पर्ध्यांना संपविण्यासाठी फडणवीसांनी या दोन्ही गटांना दुखावल्यामुळे भाजपचे समर्थक मतदार कमी होत आहेत.

परत सत्ता मिळवण्यासाठी या दोन गटांकडे लक्ष केंद्रीत केले पाहिजे. परंतु त्याऐवजी भाजप तात्पुरत्या फायद्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना अशा अत्यंत बेभरवशाच्या व विश्वासघातकी पक्षांपुढे शेपूट हलवित आहे. हे दोन्ही पक्ष भाजपकडून स्वत:चा फायदा करून घेतील व संधी मिळाली की भाजपच्या पेकाटात लाथ हाणून भाजपला हाकलून देतील.

ममता, जगनमोहन रेड्डी इ. नी कोणाच्या नादी न लागता संयमाने वाट पाहून शेवटी सत्ता मिळविली. भाजपने असाच संयम दाखविला पाहिजे.

बर असा हाता तोंडाशी आलेला घास काढलं जावा .. काय वाटलअसेल त्यांना ?

गरज नसताना शिवसेनेच्या अटी मान्य करून शिवसेनेशी अभद्र युती करण्याची ती शिक्षा होती. दुर्दैवाने भाजप तीच चूक परत करायला निघालाय. यावेळी या चुकीची पूर्वीपेक्षा जास्त कठोर शिक्षा मिळेल.

भाजप महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा पक्ष आहे. २०१४ मध्ये भाजपला स्वबळावर २८.५% मते होती व इतरांना १८% हून कमी मते होती. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपचा पाया २०१४ पर्यंत मजबूत होता.
खुलासा : मी अनेक वर्षांची "महाराष्ट्राची परंपरा " कि ज्यात भाजपाल असे वागव्ले गेले आहे या अर्थाने म्हणत होतो फक्त २०१४ पासून नाही ..

- यामागे इतर मागासवर्गीय व ब्राम्हणांच्या मतांचा प्रमुख वाटा होता.
परत सत्ता मिळवण्यासाठी या दोन गटांकडे लक्ष केंद्रीत केले पाहिजे
यात ब्राम्हणांच्या मतांचा वाट्याने काय फरक पडणार जरी सर्व ३.५% नि दिले मत तरी ?

भाजपचे समर्थक मतदार कमी होत आहेत.
हो

या व्यथेमुळे बहुतेक "वाघची शेपूट कोणतया दिशेला जाईल सांगता येत नाही " अश्या सेनेबरोबर अमंगल युती करावी लागली बहुतेक अनेक वर्षे
उत्तर प्रदेश मध्ये मग कोणाचं मतावर आले? भट शेठ पक्ष? परत १०% मुळे तर नाही

श्रीगुरुजी's picture

21 Jun 2021 - 11:53 am | श्रीगुरुजी

यात ब्राम्हणांच्या मतांचा वाट्याने काय फरक पडणार जरी सर्व ३.५% नि दिले मत तरी ?

२०१९ मध्ये फक्त २.७५ % मते कमी मिळाली, पण सत्ता गेली. मुळात काठावरचे बहुमत असताना १% मतांनीही निर्णायक फरक पडतो.

उत्तर प्रदेश मध्ये मग कोणाचं मतावर आले? भट शेठ पक्ष? परत १०% मुळे तर नाही

उत्तर प्रदेशात १६% ब्राह्मण आहेत. तसेच ठाकूर, बनिया, जाट व इतर मागासवर्गीय बरेच आहेत. यातील बरीचशी मते भाजपकडे आहेत. उर्वरीत मते बसप, सप व कॉंग्रेसमध्ये विभागली जातात.

श्रीगुरुजी's picture

21 Jun 2021 - 11:53 am | श्रीगुरुजी

यात ब्राम्हणांच्या मतांचा वाट्याने काय फरक पडणार जरी सर्व ३.५% नि दिले मत तरी ?

२०१९ मध्ये फक्त २.७५ % मते कमी मिळाली, पण सत्ता गेली. मुळात काठावरचे बहुमत असताना १% मतांनीही निर्णायक फरक पडतो.

उत्तर प्रदेश मध्ये मग कोणाचं मतावर आले? भट शेठ पक्ष? परत १०% मुळे तर नाही

उत्तर प्रदेशात १६% ब्राह्मण आहेत. तसेच ठाकूर, बनिया, जाट व इतर मागासवर्गीय बरेच आहेत. यातील बरीचशी मते भाजपकडे आहेत. उर्वरीत मते बसप, सप व कॉंग्रेसमध्ये विभागली जातात.

ठाकरे मुख्यमंत्री पदावर कायम राहतील. युती झाली तरी.
असे लोकमत म्हणत आहे.
चांगली गोष्ट आहे.
सकाळच्या शपथ विधी सारखी bjp ची अजुन एकदा अवस्था होणार असे दिसतेय.

रात्रीचे चांदणे's picture

19 Jun 2021 - 10:55 am | रात्रीचे चांदणे

सेना भाजपा युती झाली तरी मुख्यमंत्री सेनेचाच असणार आहे. सध्या सेनेत तरी मुख्यमंत्र्याच्या दर्जाचा एक ही आमदार नाही हे गेल्या दोन वर्षात दिसून आलेलें आहे. समजा युती होऊन सरकार पुढचे 3 वर्षे टिकले तरी राज्याची जनता परत ह्यांना निवडून देईल का? मुख्यमंत्री काय आपले घर सोडणार नाहीत. म्हणजे 2024 ला मोदी शहांनी किती ही सभा घेतल्या तरी राज्यात आघाडी सरकारच येईल. फारफार तर भाजपा ईडी CBI ची भीती दाखवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी चे आमदार फोडेल पण युती ला परत सत्ता मिळण्याची शक्यता फारच कमी असणार आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

19 Jun 2021 - 11:11 am | चंद्रसूर्यकुमार

समजा युती होऊन सरकार पुढचे 3 वर्षे टिकले तरी राज्याची जनता परत ह्यांना निवडून देईल का?

जनता निवडून देईल की नाही हे सांगता येणार नाही. १९९९ ते २०१४ या काळात आघाडीचे सरकार तीन टर्म होते. त्या काळात त्यांनी नक्की काय दिवे लावले होते म्हणून लोकांनी त्यांना दोनदा परत निवडून दिले? जनता कदाचित परत निवडून देईलही. सांगता येत नाही. पण परत युती केली तर भाजप आपल्या अनेक पारंपारिक समर्थकांना दुखावेल हे नक्की. माझ्यासारखा कोणी अन्यथा विधानसभेत राष्ट्रवादीला मत द्यायचा विचारही करू शकला नसता पण लोचटपणा दाखवून परत युती करायला गेले तर भाजपवाल्यांच्या कंबरड्यात सणसणीत लाथ घालायलाच हवी आणि त्यासाठी मतदान न करणे किंवा नोटा दाबणे पुरेसे नाही असे मला वाटते.

श्रीगुरुजी's picture

19 Jun 2021 - 11:32 am | श्रीगुरुजी

२०१९ मध्ये अत्यंत अनुकूल वातावरण असूनही युतीची मजल फक्त १६१ पर्यंत गेली होती. ते सुद्धा फडणवीस परत मुख्यमंत्री होणार हे गृहीत धरून काही भाजप समर्थकांनी युती मान्य नसतानाही भाजपला मत दिले होते.

आता युती होऊन दोन्ही पक्ष १४४ जागा लढविणार असेल व मुख्यमंत्री कोण हे ठरले नसेल तर हे दोघे एकमेकांचे उमेदवार पाडतीलच पण काही भाजप समर्थकही मते देणार नाहीत. त्यामुळे युती १०० चा आकडा पार करू शकणार नाही . म्हणजेच राष्ट्रवादी-कॉंग्रेस पुन्हा २-३ टर्म्स सत्तेवर येतील. समजा युतीला बहुमत मिळून भाजपला जास्त जागा मिळाल्या तरीही शिवसेना आयत्यावेळी राष्ट्रवादी-कॉंग्रेसशी हातमिळवणी करून पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळवेल.

शिवसेनेचा मुख्यमंत्री असण्यापेक्षा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री मला चालेल.

रात्रीचे चांदणे's picture

19 Jun 2021 - 11:52 am | रात्रीचे चांदणे

शिवसेनेचा मुख्यमंत्री असण्यापेक्षा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री मला चालेल.
सहमत..

सुरिया's picture

19 Jun 2021 - 12:57 pm | सुरिया

सध्याचे दै सकाळमधील लेख आणि लेखक पाहता भाजपाचे सेनेसोबत युती नव्हे तर राष्ट्रवादीला भाजपाने पाठिंबा देऊन सरकार उभारायची तयारी चालू आहे हे स्पष्ट कळते. वरील चर्चेचा रोख अंतीमत: त्याच चित्राकडे अंगुलीनिर्देश करत आहे हे भाजपा समर्थकांचे प्रतिसाद पाहता स्पष्ट दिसते.

श्रीगुरुजी's picture

19 Jun 2021 - 5:13 pm | श्रीगुरुजी

भाजप+राष्ट्रवादी किंवा भाजप+शिवसेना हे दोन्ही प्रकार माझ्या साठी समान संतापजनक आहेत.

चौकस२१२'s picture

21 Jun 2021 - 7:31 am | चौकस२१२

अवघड झालाय खरं ... पहाटेची ती अमंगल खेळी केली आणि जमवलेली सगळी पत घालवली... मूर्ख ( उमुंम मात्र कॅडबरी घेऊन सन्मानाने काकांकडे परतले )
(पण एकूण फडणवीसांनी दुर्दैवाने पत घालवली ... मग शहा काय करत होते त्यावेळी ?)

भेळ अशी हि बनू शकते
-भाजपने जयंत पाटील मुखमंत्री होऊन राष्ट्रवादी ला पाठिंबा ( केंद्रात काही तरी सुप्रिया ताईंना देणं) २०२४ पर्यंत चान्स ठेवणे
- गडकरी मुख्यमंत्री झाले तर कदाचित "सगळ्यांचा मान राखला जाईल " पण गडकरी कदाचित मान करणार नाहीत २०२४ साली त्यांना पंतप्रधान पदासाठी म्हणून आपला विचार व्हावा असे कदाचित वाटत असेल
किंवा गडकरी घेतील हि जबाबदारी आणि २०२४ पर्यंत वेळ काढतील निदान सत्तेत तरी असतील केंद्रीय मंत्री कि एक प्रगत राज्याचा मुखमंत्री म्हणून ची संधी !

त्यापेक्षा सरळ निवडणूक .. होऊन जाऊदे दे राडा
मग असे होईल का
राष्ट्रवादी १००
भाजप ८०
काँग्रेस ५०
सेना उरलेले

अजून एक किडा वळवळतोय बरेच वर्ष
शरद पवर किंवा सोनिया गांधी जेव्हा " निवृत्त " होतील त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये विलीन होणार का?

सुबोध खरे's picture

21 Jun 2021 - 12:32 pm | सुबोध खरे

राष्ट्रवादी १००

ज्या पक्षाला युती करूनहि कधीही ७५ गाठता आलेली नाही त्यांना १००.

फारच अतिशयोक्ती आहे

श्रीगुरुजी's picture

21 Jun 2021 - 2:09 pm | श्रीगुरुजी

पुढील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी ८०+ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष असेल.

श्रीगुरुजी's picture

21 Jun 2021 - 2:11 pm | श्रीगुरुजी

पुढील निवडणुकीत भाजप एकटा लढला किंवा सेनेबरोबर युती केली तरी ५० चा आकडा पार करणे अवघड जाईल. फडणवीस-चंपा भाजपला संपवित आहेत.

चंद्रसूर्यकुमार's picture

21 Jun 2021 - 2:26 pm | चंद्रसूर्यकुमार

मागे मांडलेलाच मुद्दा परत मांडत आहे.

या भाकितात आकड्यांचा मेळ लागत नाहीये. राष्ट्रवादी ८०+ म्हणजे समजा ८५ आणि भाजपला ५० चा आकडा पार करणे अवघड जाणार असेल तर भाजपला समजा ५० जागा मिळाल्या असे धरू. म्हणजे राष्ट्रवादी आणि भाजप या दोन पक्षांना मिळून १३५ जागांचा हिशेब लागला. उरल्या जागा १५३- समजा १५०. त्यात काँग्रेस आणि शिवसेना हे मोठे पक्ष आणि इतर लहान पक्ष आणि अपक्ष. मागे तुम्हीच कुठेतरी प्रतिसादात लिहिल्याचे आठवते की शिवसेनेला २०-२५ पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. अपक्ष आणि इतर लहान पक्षांना समजा आणखी २५ जागा दिल्या. तरी १०० जागांचा हिशेब लागत नाही. त्या सगळ्या जागा काँग्रेसला मिळतील? म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादीला १८५ जागा मिळतील? यापूर्वी कोणत्याही पक्षाला/आघाडीला १८०+ जागा मिळाल्या होत्या १९८० मध्ये. त्यावेळी काँग्रेसला १८६ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर ४० वर्षात कोणाही पक्षाला/आघाडीला १८० चा आकडा ओलांडले शक्य झाले नव्हते. तो विक्रम पुढील निवडणुकीत मोडला जाईल?

श्रीगुरुजी's picture

21 Jun 2021 - 2:49 pm | श्रीगुरुजी

१९९५ मध्ये ३ प्रमुख पक्षांना एकत्रित २१८ जागा होत्या. उर्वरीत ७० म्हणजे जवळपास २४% जागा अपक्ष व इतर लहान पक्षात विभागल्या गेल्या होत्या. आता भाजप ५०, राष्ट्रवादी ८०, कॉंग्रेस ६० व सेना २५ जागा असे धरले तरी त्यांची एकत्रित बेरीज २१५ म्हणजे जवळपास १९९५ एवढी होते. पुढील निवडणुकीत साधारण असेच चित्र असेल असा माझा अंदाज आहे. यात मी राष्ट्रवादी-कॉंग्रेस युती गृहीत धरली आहे. भाजप व सेना एकत्र लढले किंवा युती केली तरी फारसा फरक पडणार नाही. मनसे-सेना युती झाली तर सेनेच्या थोड्या जागा वाढू शकतील.

चंद्रसूर्यकुमार's picture

21 Jun 2021 - 3:09 pm | चंद्रसूर्यकुमार

आता भाजप ५०, राष्ट्रवादी ८०, कॉंग्रेस ६० व सेना २५ जागा असे धरले तरी त्यांची एकत्रित बेरीज २१५ म्हणजे जवळपास १९९५ एवढी होते.

१९९५ मध्ये सुमारे ४५ अपक्ष उमेदवार निवडून आले होते. त्यामागे एक कारण होते. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने शरद पवारांचे महत्व वाढायला नको म्हणून त्यांच्या अनेक समर्थकांना उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे त्यापैकी अनेकांनी बंडखोरी केली आणि त्याला स्वत: पवारांचा आशीर्वाद होता हे वेगळे सांगायलाच नको. निवडून आलेल्या ४५ अपक्ष आमदारांपैकी सगळेच्या सगळे पवार समर्थक नव्हते पण त्यातले किमान ३५ तरी नक्कीच होते. हे सगळे लोक १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर त्या पक्षात गेले होते. ही बंडखोरी झाली नसती तर १९९५ मध्येही युतीचे सरकार येणे खूप कठिण होते. १९९० मध्ये युतीला २८८ पैकी ९४ जागा मिळाल्या होत्या त्या फार तर १९९५ मध्ये १०५-११० पर्यंत गेल्या असत्या पण या बंडखोरीमुळे युती १३८ पर्यंत म्हणजे बहुमतापेक्षा थोडीच कमी इतक्या अंतरापर्यंत गेली.

तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे १९९५ हा अपवाद होता. त्यापूर्वी आणि त्यानंतरही तितक्या जागा अपक्षांना कधीच मिळाल्या नाहीत. तसेच १९९५ मध्ये जनता दल, शेकाप वगैरे लहान पक्षांचे थोडेफार स्थानिक पातळीवर बळ होते. त्या जोरावर जनता दलाने ११, शेकापने ६ जागा जिंकल्या होत्या. समाजवादी पक्ष आणि माकप यांना देखील प्रत्येकी ३ जागा होत्या. म्हणजेच त्यावेळी लहान पक्ष २५-३० पर्यंत आमदार विधानसभेवर निवडून आणू शकत होते. तो आकडा आता अर्ध्यावर खाली आला आहे.

तेव्हा अपक्ष आणि इतरांना एकदम ७० जागा म्हणजे विधानसभेतील एकूण जागांपैकी जवळपास पाव जागा मिळतील या आकड्यांशी मी तरी सहमत नाही.

श्रीगुरुजी's picture

21 Jun 2021 - 3:38 pm | श्रीगुरुजी

२००९ मध्ये सुद्धा प्रमुख पक्षांना एकत्रित २३४ जागा होत्या. १९९० मध्ये २३५ होत्या. म्हणजे ५०+ जागांवर अपक्ष व इतर लहान पक्ष असणे ३ वेळा घडले आहे.

असो. निवडणुक इतक्यात होण्याची शक्यता कमी आहे. जेव्हा जाहीर होईल तेव्हा बघू काय होऊ शकेल ते.

पंतप्रधान श्री मोदी जी ह्यांनी सर्व पक्षीय मीटिंग बोलावली आहे.
राज्याचे विभाजन करून काय साध्य केले.

नावातकायआहे's picture

19 Jun 2021 - 12:08 pm | नावातकायआहे

सर, तुम्हाला मिटिंगचा अजेंडा कळाला असेलच, किंबहुना असलाच पाहिजे.
प्लिज शेअर कराल का?

Rajesh188's picture

20 Jun 2021 - 11:35 pm | Rajesh188

आज मीडिया मध्ये कुजबुज होती.जम्मू काश्मीर ला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे केंद्रीय सरकार च्या मनात आहे.
तुम्ही कुजबुज ऐकली असेल.
तर्कशुद्ध अंदाज माझे थोडेफार बरोबर असतात!!!!!!

श्रीगुरुजी's picture

20 Jun 2021 - 11:50 pm | श्रीगुरुजी

पूर्ण राज्य असू दे वा केंद्रशासित प्रदेश असू दे, ३७० कलम आता परत मिळणे नाही. त्यामुळे आता पूर्वीचे फाजिल लाड परत होणे नाही.

राज्यांना अनेक अधिकार आहेत ते पूर्णपणे वापरले तर ते ३७० कलम नी मिळणाऱ्या अधिकार पेक्षा कमी नाहीत.
अगदी दुसऱ्या राज्यातील नागरिकांना प्रवेश करण्यावर सुद्धा राज्य निर्बंध आणू शकतात .
तसे अधिकार आहेत त्यांना.
आणि जम्मू काश्मीर ला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला की तेथील स्थानिक पक्ष च राज्यात सत्तेवर असेल.
राष्ट्रीय पक्षांची लुडबुड नाही होणार

प्रदीप's picture

21 Jun 2021 - 10:12 am | प्रदीप

अगदी दुसऱ्या राज्यातील नागरिकांना प्रवेश करण्यावर सुद्धा राज्य निर्बंध आणू शकतात .

तुम्हाला असे म्हणायचे आहे, की भारतांतील कुठलेही राज्य, इतर राज्यांतून येण्यास जनतेवर निर्बंध घालू शकते? तशी माहिती असल्यास त्याबद्दलचा काही दुवा द्यावा.

कॉमी's picture

19 Jun 2021 - 2:07 pm | कॉमी

हे आशिष जाधव थापा लावत असतील तर स्किल वाखाणण्यासारखे आहे ब्वा

श्रीगुरुजी's picture

19 Jun 2021 - 5:15 pm | श्रीगुरुजी

भाजपच्या पाठिंब्यावर सेनेचा मुख्यमंत्री होण्याऐवजी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री मला चालेल.

कपिलमुनी's picture

19 Jun 2021 - 3:25 pm | कपिलमुनी

ही बातमी १००% फेक आहे. झोपलेला टीआरपी आणि नोकरीवरची येणारी गदा वाचवायला त्या जाधवने सोडलेली पुडी आहे.
शून्य आधार आहे.

पालिका ईलेक्शननंतर पॉलीसी ठरेल.
एकत्र येणारच नाही असे नाही, पण आता सध्या नाही.
2024 ला मोदी बाबा ला सीट कमी येतील असे वाटले तर ते मुमं पद वाटून घेतील पण आता सध्या नाही.

सेना + राष्ट्रवादी / राष्ट्रवादी +भाजप / भाजप +राष्ट्रवादी असे 3 पर्याय असणार आहेत

संपादित

त्या जाधवने सोडलेली पुडी आहे.
हो पाहून तरी तसेच वाटतंय .. गम्मत म्हणजे आजकाल यु टब वर कोणीही असा आव अनु शकतो कि ते जणू अनेक दशके देशभर वार्ताहर असलेलया मोठ्या वृतपत्र किंवा टीव्ही आहेत .. हा हाः पु वा

नावातकायआहे's picture

19 Jun 2021 - 7:37 pm | नावातकायआहे

सत्तेसाठी लाचारी स्विकारली नाही!!
अरेरे.....

कोणत्याच राजकीय पक्षांना वेळ नाही.सत्ता मिळवण्यासाठी काय करता येईल ह्याचाच राजकीय पक्ष विचार करतात.
हे झाले तर मी ह्या पक्षाला मत देणार नाही ह्याला काही किंमत नसते .
तीन वर्षानंतर निवडणुका असतील तर आजपासूनच वातावरण निर्मिती केली जाते.
विविध घटनांची साखळी निर्माण केली जाते.
आणि नाही नाही म्हणणारे सुद्धा त्यांच्या जाळ्यात फसून मतदान करतात.
म्हणून तर एवढ्या वर्ष नंतर सुद्धा भारत गरिबी
मुक्त झाला नाही.
भ्रष्ट चार मुक्त झाला नाही.
बेरोजगारी आहे तशीच आहे.
शेतकरी,कामगार आहे त्याच स्थिती मध्ये आहेत.
Bjp सेने बरोबर गेली की आम्ही bjp ला मत देणार नाही कारण आम्हाला ते आवडले नाही.
हा निर्णय क्षण भंगुर आहे.

प्रदीप's picture

19 Jun 2021 - 8:08 pm | प्रदीप

हा निर्णय क्षण भंगुर आहे. चालायचंच हो. सगळं आयुष्यच क्षणभंगुर का काय ते, असतं म्हणे. निर्णयाचं काय घेऊन बसलात?

म्हणुनच तो आत्ममग्न नाही परीणामी राजकिय खेळ्या खेळल्या गेल्या तर त्याचे आश्चर्य कशाला ?

बहुसंख्य हिंदू असणारा हा देश आहे.भले विविध जाती मध्ये विभागला आहे.पण अन्यायग्रस्त आहे.
म्हणून श्री मोदी जी ह्यांना बहुमत देवून सत्तेवर त्यांनी बसवले आहे.
पण त्यांच्या पण काही इच्छा आहेत.
साफ प्रशासन,कामगार ना योग्य न्याय(कोणाची हिम्मत झाली नाही पाहिजे पिळवणूक करण्याची).
शेतकऱ्यांना त्यांच्या शेता पर्यंत रस्ता,त्यांना संरक्षण, मध्यम वर्गीय नोकरदार लोकांचा टॅक्स चा बोजा कमी करणे.
शेती,पिण्यासाठी ,कारखान्यासाठी गरज असेल तेवढे पाणी.
सर्वांस वीज.
आणि कठोर कायदे.
ह्याची पूर्तता श्री मोदी नी करावी.
बहुसंख्य हिंदू त्यांना त्यांची पूर्ण हयात पूर्ण होई पर्यंत देशाच्या सर्वोच्च स्थानी बसवतील.
पण नेमके उलटे घडत आहे.
शेतकरी,कामगार,मध्यम वर्ग ह्यांची पिळवणूक होत आहे बिन्धास्त.
चोर,गुंड,लबाड,घोटाळे बाज,अतिरेकी,लाचखोर,
सुखात आहेत.
काँग्रेस आणि bjp हया मध्ये फरक करायचा झाला तर काँग्रेस चे parde जड वाटत आहे.
फक्त मुस्लिम द्वेष करून हिंदू सुखी होणार नाहीत.

सुबोध खरे's picture

25 Jun 2021 - 9:36 am | सुबोध खरे

प्रत्येकाला १५ लाख रुपये,
पेट्रोल ५० रुपये लिटर,
दुध २५ रुपये लिटर,
इतर मागासवर्गीयांना २५ % आरक्षण,
मराठा समाजासाठी २५ % आरक्षण,
शेतकऱ्यांना निवृत्तिवेतन,
नेहरूंच्या नावाने सर्वाना १ कोटी रुपयांचा विमा,
तीन तलाक आणि ३७० कायदे मागे घेणे,
राफेल विकून त्या ऐवजी दुसरी विमाने घेण्याची प्रक्रिया चालू करणे

इ गोष्टी राहिल्याच की हो.

प्रदीप's picture

25 Jun 2021 - 9:59 am | प्रदीप

तुम्हाला सगळी करमणूक एका हप्त्यांत हवी आहे. हे कसे चालेल? १८८ ती हप्त्याहप्त्याने करतच असतात. तुम्ही नमूद केलेल्या मुद्द्यांव्यतिरीक्त इतरही काही भन्नाट मुद्दे (मग ते महाराष्ट्रपुरते असोत, किंवा भारतापुरते असोत, किंवा बेलारूस व ई. यू. च्या बेबनावासंबंधी असोत) १८८ मांडत रहातीलच ह्याची खात्री बाळगा. ते इथे आपली करमणूक करण्यासाठीच केवळ येत असतात.

न जाणो, उद्या न्यूयॉर्क टाईम्स त्यांनाही ऑप- एड लिहीण्यासाठी पाचारण करेल?