Skip to main content

चालू घडामोडी - जून २०२१ (भाग 3)

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 10/06/2021 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
पावसात यंदा मुंबई तुंबणार नाही; पालकमंत्री आदित्य ठाकरे (https://www.google.com/amp/s/www.mymahanagar.com/mumbai/guardian-minist…) ------- Mumbai Rains : मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केला नाही, करणारही नाही : महापौर किशोरी पेडणेकर "Mumbai Rains : मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केला नाही, करणारही नाही : महापौर किशोरी पेडणेकर | Mumbai rains update we never claimed that mumbai will not be flooded said mayor kishori pednekar | TV9 Marathi" https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/mumbai-rains-update-we-ne… ---------- बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात....

वाचने 61755
प्रतिक्रिया 206

प्रतिक्रिया

In reply to by कॉमी

https://twitter.com/pbhushan1/status/1402955524455370758?s=19 इतिहासात टीकाकारांना गप्प करण्याचे प्रयत्न झाले ते फक्त ऐतिहासिक विवेचनापुरतेच मर्यादित ठेवायचे बरका. आताच्या परिस्थितीशी अजिबात संबंध जोडू नये.

In reply to by कॉमी

मोदी सरकार ला टीकाकारांची एवढी भीती का वाटतेय ते कळायला मार्ग नाही. देशद्रोही कायद्याचा तर अतिरेक झालाय. देशद्रोही कायदा लावून शिक्षा झाली आस ऐकण्यात पण येत नाही. फक्त देशद्रोही कायदा लावायचा आणि समोरच्याला काही महिने तुरुंगात ठेवायचे हेच धोरण आहे. आरोपी ने वरच्या कोर्टात अपील केले की देशद्रोहासाठी लावलेलं कलम निघणार. वरच्या कार्टून मध्ये काहिही अपेक्षार्य नाही. उलट जेवढे चुकीचे आरोप किंवा चांगल्या कामाला विरोध होईल तेव्हढाच जास्त फायदा मोदी सरकार ला होईल.

In reply to by रात्रीचे चांदणे

त्या मुळे. सर्व पक्षीय नेते,विधी तज्ञ,देशातील खरी विचारवंत वंत मंडळी ह्यांची समिती बनवून देशद्रोह म्हणजे नक्की काय ह्याची व्याख्या स्पष्ट करावी स्पष्ट शब्दात नवीन कायदा समंत करावा. जनतेची मत पण मागवली जावीत. जो पर्यंत कोणताही व्यक्ती देशद्रोही काम कृती मधून करत नाही. स्वतः कोणत्याच गैर कृत्यात सक्रिय सहभागी नाही अशा कोणत्याच व्यक्ती विरूद्ध देशद्रोही कायद्या अंतर्गत fir सुध्दा नोंदवता आल नाही पाहिजे.

In reply to by रात्रीचे चांदणे

तेव्हढाच जास्त फायदा मोदी सरकार ला होईल.
हे सरकार लोकांनी बदल म्हणुन निवडुन दिलेले सरकार आहे. यांच्यावर लोकांंचा विश्वास अन अपेक्षा दोन्ही आहेत, म्हणुनच हे सरकार जेंव्हा एखादी बोल्ड मुव अथवा निर्णय घेते तेंव्हा लोक त्याचे एक बदल म्हणुन स्वागत करतात प्रसंगी नियोजनात आलेल्या अपयशाला ही मोकळ्या मनाने पदरातही घेतात पण जर याचा त्रास लोकांना वरचेवर होउ लागला तर लोकांचा उत्साह कमी कमी होत... संपु शकतो.

In reply to by रात्रीचे चांदणे

कंगना राणावतवर देशद्रोहाची कलमे लावून गुन्हा दाखल केला असल्याने तिच्या पारपत्राचे नूतनीकरण करण्यास संबंधित अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

यावरून समजते कि उगाचच उठल्यासुटल्या देशद्रोहाचा आरोप कुठल्याच पक्षाने कुणावरच करू नये. त्याचे गंभीर परिणाम समोरच्या व्यक्तीवर होऊ शकतात.

https://indianexpress.com/article/cities/delhi/with-ac-fridge-singhu-fa… गरीब बिच्चारे गांजलेले शेतकरी आंदोलनासाठी सीमेवर जी (बेकायदेशीर) घरे बांधून हलाखीच्या स्थितीत राहताहेत त्यात फक्त एअर कंडीशनर्स, फ्रीज, एअर कूलर्स, वॉटर कूलर्स, आर ओ वॉटर फिल्टर्स अशा अगदी साध्या जेमतेम गरज भागेल इतक्याच गोष्टी आहेत. दिवसभर तहानभूक भागवायला लस्सी, रोट्या सारखे अगदी साधा निकृष्ट पदार्थ आहेत. त्यांच्या tractor trolley मध्ये सुद्धा जेमतेम एअर कंडीशनर्स, एअर कूलर्स अशा अगदी साध्या गोष्टी आहेत. तेथे ६ महिने डेरा टाकलेल्या एका कुटुंबाने तेथे राहण्यासाठी आतापर्यंत फक्त ५ लाख रूपये खर्च केले असून त्यांच्याकडे खर्चासाठी अजून फक्त ४ लाख शिल्लक आहेत. एकंदरीत हे अत्यंत गरीब शेतकरी अतिशय भीषण अवस्थेत रहात आहेत. एकच प्रश्न पडलाय. या ठिकाणी वीज कोण पुरवित असेल व वापरलेल्या विजेचा खर्च कोण उचलत असेल?

In reply to by श्रीगुरुजी

एक तर ज्यांचे पूर्ण जीवन शेतीवर अवलंबून नाही त्यांना त्या क्षेत्रातील काही ही ज्ञान नाही. जे आयुष्भर नोकरी करून tp म्हणून शेती करत आहेत त्यांना कोणतीच झळ पोचत नाही. जे आंदोलन करत आहेत त्यांना पूर्ण अधिकार आहे आंदोलन करण्याचा. भारतीय संविधान त्यास मान्यता देत आहे. फक्त मोदी सत्तेवर असल्या मुळे आणि आंदोलन त्यांच्या सरकार विरूद्ध असल्या मुळे आंदोलक लोकांना बदनाम करणे अतिशय अयोग्य आहे. जेवढे त्यांना बदनाम कराल तेवढे सरकार बदनाम होईल.

In reply to by Rajesh188

एक तर ज्यांचे पूर्ण जीवन शेतीवर अवलंबून नाही त्यांना त्या क्षेत्रातील काही ही ज्ञान नाही. हायला एवढे उच्च ज्ञान तुम्ही कुठून मिळवलंय? आपण स्त्री नसलात तर आपल्याला स्त्री रोग तज्ज्ञ होताच येणार नाही. किंवा आपण शेतकी विषयात पी एच डी जरी केली असली तरी आपल्या ला शेतीत काहीही कळत नाही. अर्थात तुम्ही इतका उच्च दावा केला आहे म्हणजे तुम्हाला शेतीतील सर्व काही कळत असेलच म्हणा.

In reply to by Rajesh188

जे आंदोलन करत आहेत त्यांना पूर्ण अधिकार आहे आंदोलन करण्याचा व्हय बरोबर पण त्याबरोबर " जबाबदारी" नावाचा पण एक शब्द आहे शब्दकोशात अर्थात मूळ मुद्दा नीट मांडून हे कायदे नक्की कसे अन्यायकारक आहेत हे समजावून देणे ... असल्या फालतू गोष्टींबद्दल चरचा करण्यात अर्थ नाही, नाही का! ग्रेटाकुमारी (सतत चेहऱयावर रागावलेले भाव ) नि दिलेल्या टूलकिटात काय म्हणलय .. हा चला सुरु सब एक साथ... "हे गुजराथी बनिये अडाणी अंबानी च्या घशात सर्व शेती फुकटात घालायला निघाले आहेत " मोदी जरी चहा बनवण्यात पटाईत असतील आणि चहा हा जरी शेतीतून निर्माण होणारा पदार्थ असला तरी त्यानं यातील काह्ही कळत नाही ...

केंद्राच्या तीन कृषी कायद्याविरोधात गेली सात महिन्यांपासून दिल्ली सीमेवर आंदोलन सुरु आहे, दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणा-या शेतक-यांनी सरकारवर दबाव वाढविण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने २६ जून २०२१ ला देशभरातील राजभवनांवर निदर्शने करण्याची घोषणा केली आहे, सोबतच राष्ट्रपतींना निवेदन देणे. एकुणच आंदोलनाची आक्रमकता वाढविणे, जनतेचं, आंदोलनात जोश भरणे, त्याचबरोबर ’शेती वाचवा लोकशाही वाचवा” असाही दिवस पाळल्या जाईल असे संघटनांनी म्हटले आहे. एकूणच शेतकरी आंदोलन हळुहळु वेग घेईल असे दिसत आहे. सरकारने जरी शेतक-यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले तरी शेतकरी आंदोलकांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी नवनव्या योजना आखायला सुरुवात केलेली दिसते. -दिलीप बिरुटे

In reply to by श्रीगुरुजी

COVID नसता तर आंदोलन किती तीव्र झाले असते ह्याची झलक नक्कीच बघायला मिळाली असती. एक कडे साथ रोग नियंत्रण कायदा लागू करून प्रशासन ला जादा अधिकार द्यायचे आणि दुसरीकडे विवाद स्पद् कायदे मंजूर करून घ्यायचे . हा प्रकार लक्षात येणार नाही इतके कोणी दूध खुळे नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संयुक्त किसान मोर्चाने २६ जून २०२१ ला देशभरातील राजभवनांवर निदर्शने करण्याची घोषणा केली आहे मग या वेळी पण निळा "निशाण साहिब झेंडा" असणार कि काय ... असलाच पाहिजे कारण अख्या देशातील शेतकरी निशाण साहिब धर्माचेच आहेत नाही का... म्हणे शेतकरी आंदोलन... चक्क त्याला शीख धार्मिकी आंदोलनाचे स्वरूप दिले गेले होते... भारत तेरे तुकडे तुकडे २६ जुन ला परत एकदा ... अजूनही काही भरकटलेले शीख बंधू जगभर हे जणू काही शिखांचे आंदोलन अश्या पाट्या लावत आहेत ... कोणाला येडं बनवायला निघालेत !

शेती वाचवा लोकशाही वाचवा हि घोषणा फार्र फार्र आवड्ल्या गेली आहे! शेतकर्यांच्या (?) आंदोलनाला शुभेछा!!

In reply to by नावातकायआहे

तुम्हाला ना लोकशाही ची किंमतच माहीत नाही. तिकडे सौदी अरेबिया बघा ... आहे का तिथे शेती ? नाही म्हणुन तिथे लोकशाही नाही ... त्यामुळे जर लोकशाही वाचवायची असेल तर शेती खुप गरजेची आहे ... शेतकर्यांच्या (?) आंदोलनाला विरोध केल्यामुळे शिक्षा म्हणुन "शेती - लोकशाहीची रक्षक" या विषयावर निबंध लिहा बघु आता.

In reply to by नावातकायआहे

Tmc जर खरोखर पोलिसांचा वापर करून असे कार्यकर्त्यांचे हिणकस गुन्हे दाबत असेल तर नक्की केंद्राने याबाबत ठोस पावले उचलायला हवीत. TMC चा निषेध करावा तितका कमी आहे!

In reply to by कॉमी

भारत हे युनियन ऑफ स्टेटस आहे.इथे राज्यांना अधिकार आहेत.राज्य केंद्राची गुलाम नाहीत. राज्यात चुकीचे काही घडलं असेल तर न्याय व्यवस्था आहे,न्यायालय आहे तिथे पाहिले जा. प्रतेक गोष्टी मध्ये केंद्र हस्तक्षेप करू शकत नाही.

In reply to by Rajesh188

राज्यांना अधिकार आहेत तश्या जबाबदाऱ्या पण आहेत. पोलीस आणि एखादी पार्टी संगनमत करून राजरोसपणे लोकांवर अन्याय करत असेल तर युनियन ऑफ स्टेट मध्ये सुद्धा फेडरल संस्था अगदी याच परिस्थितीसाठी ठेवली असते. लोकांवर अन्याय होत असतील तर युनियन ऑफ स्टेट्स वैगेरे गप्पांचे काय लोणचे घालणार काय ? किमान या घटनांमध्ये पोलिसांचा सहभाग कितपत आहे याचा तपास केंद्राच्या संस्थेने जरूर करायला पाहिजे ! त्यात राज्यावर कसला अन्याय दिसंत नाही. आणि अर्थातच बंगाल पोलिसांचा सहभाग काय हा तपास बंगाल पोलिसांनी करून चालणार नाही. तिथे सरळ सरळ काँफ्लिक्ट ऑफ इंट्रेस्ट आहे.

In reply to by Rajesh188

एक सूक्ष्म मुद्दा... भारताचं बाबतीत बोलायचं तर आधी देश निर्माण झाला आणि त्यावेळी ब्रिटिश भारत + संस्थाने असे होते आणि मग राज्य, निर्माण "देशाने" केली .. असा क्रम आहे ना? अमेरिकआ किंवा ऑस्ट्रेलिया सारखा नाहाये जिथे आधी राजय हि इंग्लंड चाय स्वतंत्र आशय "कॉलनी" होत्या आणि मग त्यांचे फेडरेशन झाले खुट्ट झाले कि "केंद्र हस्तक्षेप करू शकत नाही" कारण केंद्रात नावडतीचे सरकार आहे म्हणून! अजब न्याय आहे हा ! हे म्हणजे शाह मोदींवर टिळक कार्याची तर ती त्यांचं धोरणांवर नाही करणार .. सोयीस्कर रित्या ते गुजराथी असण्यावर करणार.. समजा उदय केंद्रात गडकरी आणि शाह अशी जोडी असेल तर? तेव्हा काय मग जैन आणि बामन म्हणून ओरडणार ! एकूण काय केंद्राचं नावाने खडे फोडायचे ! धन्य

In reply to by चौकस२१२

एकदम खर.. या लोकान्ना कहिहि क्रुन .. कामात अडथळे आणायचे आहेत आणि .. सन्घ, भाजपा च्या विरोधात बोलायचे आहे.. स्वतःला काहिहि करता नसेल येत तर जो करतोय त्याला पण काम करु द्यायच नाही.. गडकरी साहेबान्च कौतुक करायचा शुद्ध हेतु फूट पाडणे आहे त्यान्च काम आवडत अस नाही.. एकदा ते पदावर बसले कि त्यान्ना जातीवरून हेच लोक बोलणार

In reply to by रामदास२९

गडकरी साहेबान्च कौतुक करायचा शुद्ध हेतु फूट पाडणे आहे त्यान्च काम आवडत अस नाही.. एकदा ते पदावर बसले कि त्यान्ना जातीवरून हेच लोक बोलणार
+१११११११११ गडकरी जेव्हा भाजप अध्यक्ष होते, तेव्हा त्यांना पण त्रास दिला होताच की. आता त्यांच्या आडून मोदींना शिव्या देता येतात म्हणून त्यांचा उदो उदो.

गरिबी हटवा योजने अंतर्गत 2 कोटीचे 15 मिनिटात 18 कोटी झाले आहेत.

In reply to by प्रदीप

अरेरे.. श्री.रा.रा.मा. रा.गां. कधी नव्हे ते चुकले.

In reply to by प्रदीप

तसे तुम्ही स्वतः कसल्याच उत्तराच्या अपेक्षेत नसता. तरीही इथे ते टाकतोय, सर्वांसाठी. (ऑप-इंडियाचे रीपोर्ट्स वाचणे एक प्रचंड त्रास आहे, ह्यांना कुणीतरी बातमी कशी लिहायची, ते एकदा शिकवा रे!)

In reply to by प्रदीप

ही जमीन २ कोटीत विकण्याचा मूळ करार मार्च २०११ मध्ये झाला होता. त्याला आता १० वर्षे उलटून गेली. https://www.lokmat.com/national/ayodhya-ram-mandir-land-10-years-ago-ag…

गरिबी हटवा योजने अंतर्गत 2 कोटीचे 15 मिनिटात 18 कोटी झाले आहेत.

घटनाक्रम- १. पंजाब मध्ये असणार्‍या एका व्यक्तीला कोव्हिड निगेटिव्ह रिपोर्ट असल्याचा हरीद्वार हेल्थ डिपार्ट्मेंट कडून मेसेज आला, जी टेस्ट त्याने कधी केलीच नव्हती. त्या व्यक्तीने आयसीएमआर कडे तक्रार केली, ज्यांनी राज्य सरकारला कळवले. २.त्यांमुळे रिपोर्ट इश्यू करणार्‍या प्रायव्हेट एजन्सीचा उत्तराखंड आरोग्य खात्याकडून तपास चालू झाला, त्यात असे आढळून आले आहे की नऊ बिगर सरकारी एजन्सीज कडून एकूण ४,००,००० टेस्ट्स केल्या गेलेल्या, त्यातले एका एजन्सीचे १,००,००० (किमान) टेस्ट्स रिपोर्ट बनावट आहेत. ह्यात काही व्यक्तींचे पत्ते, फोन नंबर, इत्यादी बनावट होते असे आढळून आले आहे. तसेच, सॅम्पल कलेक्ट करण्यासाठी नेमेलेल्या व्यक्ती होत्या, त्यातल्या ५०% व्यक्ती राजस्थानच्या होत्या, आणि त्यातल्या काही कधी हरिद्वारला गेल्याच नव्हत्या. काहे ठिकाणी एका अ‍ॅन्टिजेन टेस्ट किट मधून ७०० सॅम्पल तपासल्याचे दिसले आहे. (एक किट एकदाच वापरायचे असते.) ३. त्या १,००,००० पैकी फक्त १७७ टेस्ट रिपोर्ट कोव्हिड पॉसिटिव्ह होते (०.१८%), जेव्हा की त्या काळात हरिद्वारचा पॉसिटिव्हिटी रेट १०% होता. एजन्सीजना प्रति अ‍ॅन्टिजेन टेस्ट ३५० रुपये दिले गेले होते, तर आरटीपिसीआर साठी आणखी जास्त मोबदला होता. ४. इतर एजन्सीजचे टेस्ट रिसल्ट सुद्धा आता तपासणीखाली आहेत. https://timesofindia.indiatimes.com/india/1-lakh-covid-19-tests-during-…

In reply to by कॉमी

हा जो काही असा काही प्रकार झाला आहे तो खुपच धक्कादायक आहे. कदाचीत टूलकीट चा एक हिस्सा असणार. कोरोनासाठी पद्धतशीर पणे कुंभमेळयाला जवाबदार ठरवण्याचा प्रयत्न झाला व पर्यायाने भारताचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला गेला. या सर्वांवर सरकारने महामारी अ‍ॅक्ट नुसार कठोरात कठोर शिक्षा करावी.

In reply to by कॉमी

COVID test मध्ये इतके घोटाळे,फसवाफसवी झाली असेल तर भारतात कायद्याचे राज्य नाही .असेच म्हणावे लागेल. कायदा सुव्यवस्था राखणे ,घोटाळे रोखणे,गैर व्यवहार रोखणे हे ज्या यंत्रणेची काम आहेत . त्या यंत्रणा सक्षम नाहीत. सर्व यंत्रणांची पुनर्बांधणी करण्याची गरज आहे.

In reply to by Rajesh188

सर्व यंत्रणांची पुनर्बांधणी करण्याची गरज आहे.
चला, निघा ह्या पुनर्बांधणीच्या कामाला. तुम्ही व्हा पुढे, येथे वेळ घालवू नका. नाहीतरी अलिकडेचे एका चर्चेत तुम्ही म्हटले होतेच, की चर्चा करून काय होते म्हणून.

श्री राम मंदिर ट्रस्ट आता या आपटार्ड संजय सिंगवर मानहानीचा खटला दाखल करणार आहे. नेहमीप्रमाणे आपटार्ड विनापुरावे कोणावरही बेछुट आरोप करतात व मानहानीचा खटला दाखल होताच नाक घासून माफी मागतात. मात्र या केसमधे श्री राम मंदिर ट्रस्टने माफी वगैरच्या भानगडीत न पडता या खोटारड्या आपटार्डना चांगलाच धडा शिकवला पाहीजे.

In reply to by प्रसाद_१९८२

भाजप व त्यांच्या अवतीभोवतीच्या संस्थांचा अजिबात भरोसा नाही. सध्या खाका फुगवताहेत खऱ्या. पण वेळ येताच शेपूट घालतील. ट्विटरच्या बाबतीत नुकतेच काय झाले, ते आपण पाहिलेच.

In reply to by प्रसाद_१९८२

राम मंदिर ट्रस्ट स्वच्छ व्यवहार करत आहे हे इथल्या आयडी ना कोणी सांगितले.हे काय त्या ट्रस्ट वर आहेत का? आरोप झाला आहे तर त्याची निःपक्ष चोकशी झालीच पाहिजे आणि दोन महिन्याच्या आत मध्ये.

In reply to by Rajesh188

राम मंदिर ट्रस्ट स्वच्छ व्यवहार करत आहे हे इथल्या आयडी ना कोणी सांगितले.हे काय त्या ट्रस्ट वर आहेत का? राम मंदिर ट्रस्ट स्वच्छ व्यवहार करीत नाही हे इथल्या आयडी ना कोणी सांगितले.हे काय त्या ट्रस्ट वर आहेत का? आरोप झाला आहे तर त्याची निःपक्ष चोकशी झालीच पाहिजे आणि दोन महिन्याच्या आत मध्ये. आरोप झाला आहे तर तो सिद्ध केलाच पाहिजे आणि दोन महिन्याच्या आत मध्ये.

In reply to by प्रसाद_१९८२

संजय सिंग हा अत्यंत खोटारडा आणि गुंड माणूस आहे. ट्विटर सम्राट रागा आणि ट्विटर सम्राज्ञी प्रिव यांनी नेहमीप्रमाणे कोणतीही माहिती न घेता या बिनबुडाच्या आरोपांवर तातडीने ट्विट्स लिहिली आहेत.

In reply to by प्रसाद_१९८२

हा आरोप करणार्‍यांमध्ये आम आदमी पार्टी आणि त्यातही संजय सिंग आहेत म्हटल्यावर कसलाही घोटाळा झाला नाही याची २००% खात्री. आतापर्यंत वेगवेगळे बिनबुडाचे आरोप करायचे आणि मग पळून जायचे म्हणजेच आरोपांच्या बाबतीत 'हिट अ‍ॅन्ड रन' करायचे या हलकटपणात या बदमाषांच्या टोळीचा कोणीच हात धरू शकणार नाही. आतापर्यंत त्या लोकांनी कित्येक जणांविरूध्द असे आरोप केले आहेत. त्यात नितीन गडकरी आणि अरूण जेटलींचा समावेश आहे. दोघांनीही अब्रूनुकसानीचे खटले केजरीवालांविरूध्द ठोकले होते. पण दोघेही भोळे सांबाचे अवतार निघाले. अरूण जेटली पंजाबी असल्याने त्यांच्यापासून जास्त अपेक्षा होत्या कारण दोस्ती आणि शत्रुत्व या दोन्ही गोष्टी अगदी टोकाला जाऊन निभावणार्‍यांमध्ये पंजाबी लोकांचा समावेश होतो. पण त्यांनी पण केजरीवालांना नुसत्या माफीवर सोडून दिले. चार वर्षांपूर्वीच्या घटनेचा कोणाला विसर पडला असल्यास एक गोष्ट लिहितो. या खटल्यासाठी वकील म्हणून केजरीवालांनी राम जेठमलानींना नेमले होते. कोर्टात एका सुनावणीसाठी उभे राहायला राम जेठमलानी कित्येक लाख रूपये घ्यायचे. आपल्यावरील वैयक्तिक खटल्याच्या सुनावणीसाठीचे एक-सव्वा कोटीचे बिल दिल्ली सरकारच्या नावावर लावायचा हलकटपणा याच केजरीवालांनी केला होता. राम जेठमलानी पण तसे धूर्त निघाले. एखाद-सव्वा कोटीने खरं तर त्यांना काहीही फरक पडणार नव्हता. ते बिल त्यांनी माफ करून टाकले. तेव्हा प्रत्यक्षात दिल्ली सरकारच्या खजिन्यातून राम जेठमलानींना मुख्यमंत्र्यांच्या वैयक्तिक खटल्यासाठी पैसे दिले गेले नव्हते पण गरज पडल्यास तसे करायची युगपुरूष मुख्यमंत्र्यांची तयारी होती हे सगळ्यांना समजले. पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुणपत्रिका शोधायला याच टोळीतले काही लोक सगळा कामधंदा सोडून दिल्ली विद्यापीठात चकरा मारत होते. या सगळ्या टोळीचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता यांनी कोणावर आरोप केल्यास तो आरोप निखालस खोटा आहे आणि कसलाही घोटाळा झालेला नाही याची पक्की खूणगाठ बांधावी.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

बिनबुडाचे आरोप करून बदनामी केल्यामुळे युगपुरुष केजरीवाल यांच्यावर बदनामीचे एकूण ३३ खटले सुरू होते. त्यातील ४ खटल्यात यांनी माफी मागितल्याने ते खटले संपले. उर्वरीत २९ खटले अजून न्यायालयात आहेत. खरं तर फक्त एकदाच माफी मागून सुटण्याची कायदेशीर तरतूद असावी. दुसऱ्या खटल्यापासून थेट तुरुंगात रवानगी करावी.

"Special Report | शिवसेना आमदार दिलीप लांडेंची कंत्राटदारावर दादागिरी | Shivsena mla dilip lande humiliates contractor | TV9 Marathi" https://www.tv9marathi.com/videos/shivsena-mla-dilip-lande-humiliates-c… -----------

In reply to by नावातकायआहे

आता पुढच्या वेळी लिहीतो ...

गाझियाबादमध्ये वृद्ध मुस्लीम व्यक्तीवर झालेल्या हल्ल्यावर, राहुल गांधी म्हणाले… "On the attack on an elderly Muslim man in Ghaziabad Rahul Gandhi said srk 94 | गाझियाबादमध्ये वृद्ध मुस्लीम व्यक्तीवर झालेल्या हल्ल्यावर, राहुल गांधी म्हणाले... | Loksatta" https://www.loksatta.com/desh-videsh-news/on-the-attack-on-an-elderly-m… --------- गाझियाबाद : जय श्री राम घोषणा नाही तावीजवरुन मारहाण; UP पोलिसांनी Twitter सहीत ९ जणांविरोधात दाखल केला दंगलीचा गुन्हा https://www.loksatta.com/desh-videsh-news/ghaziabad-police-lodge-fir-ag… -------- काय बोलावं ते सुचेना ....

In reply to by मुक्त विहारि

मार खाणारा किंवा मरणारा मुस्लिम असेल तर जाणूनबुजून त्याला धर्म जोडला जातो. मग कधी रेल्वेत जागेमुळे झालेल्या भांडणात होणारा खून असो किंवा अजून दुसरं काही.

In reply to by श्रीगुरुजी

इतकी ही बातमी महत्वाची नाही. देशात खूप काही घडत आहे जे ह्या बातमी पेक्षा पण किती तरी पटित वाईट आहे. शेतकरी हा घटक हिंदू च आहे आणि शेतकऱ्यांची वाट लावायचा प्रयत्न करणारे हिंदुत्व वादीच सरकार आहे. आणि काहीच माहीत नसताना शेतकऱ्यांना बदनाम करणारे हिंदूच आहेत. आणि बहुसंख्य असणारा हिंदू देशात संकटात आहे असे गळे काढणारे पण हिंदू च आहेत. नक्की हिंदू कोण मुळे संकटात आहे

हृदयद्रावक! मोबाइल नसल्यानं ऑनलाईन शिक्षण थांबलं; नांदेडमधील मजुराच्या मुलीनं केली आत्महत्या.... "हृदयद्रावक! मोबाइल नसल्यानं ऑनलाईन शिक्षण थांबलं; नांदेडमधील मजुराच्या मुलीनं केली आत्महत्या | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News" https://lokmat.news18.com/maharashtra/online-learning-stopped-cause-of-… ----------- आता ही पण चुकी केंद्राचीच बरं का, असेच काही टक्के जनता म्हणणारच की......

In reply to by मुक्त विहारि

कॉम्रेड विहारींशी सहमत. सरकारने गरीब विद्यार्थ्यांना मोबाईल विकत घेऊन देण्याचे समाजवादी/कल्याणकारी धोरण अवलंबावे. तसे न केल्यास एका वर्गाला बेसिकली शिक्षणापासून वंचित ठेवले जाईल.

In reply to by कॉमी

कोम्रेड विहारी काकांनी योग्य विधान केले आहे...

In reply to by कॉमी

कोम्रेड विहारी काकांनी योग्य विधान केले आहे...

सेंट्रम कॅपिटलला पी.एम.सी बँकेला सामावून घ्यायची (अ‍ॅक्विझिशन) परवानगी रिझर्व्ह बँकेने दिली आहे. गेल्या जवळपास दोन वर्षांपासून चालू असलेली पी.एम.सी बँकेच्या खातेदारांची परवड थांबेल अशी आशा आहे. त्यावेळेस आलेली एक बातमी आठवते. एप्रिल २०१९ मध्ये जेट एअरवेज बंद झाल्याने नोकरी गेली आणि त्यानंतर चार-पाच महिन्यात पी.एम.सी बँकेत फिक्स्ड डिपॉझिटला लावलेले ९० लाख रूपये बँक संकटात आल्याने अडकले अशी एकाची अवस्था झाली होती. दुर्दैवाने त्या माणसाने आत्महत्या केली. पी.एम.सी बँक अडचणीत आल्यानंतर काही महिन्यातच येस बँकही अडचणीत आली पण येस बँकेचा आकार मोठा असल्याने ती बँक बुडू देणे अर्थव्यवस्थेसाठी परवडले नसते म्हणून ती बँक वाचवायला सगळ्यांनी धावपळ झाली. पण पी.एम.सी बँकेच्या बाबतीत हे सगळे प्रयत्न झाले नाहीत. पी.एम.सी बँकेच्या प्रश्नानंतर सहकारी बँकांवरही रिझर्व्ह बँकेचे अधिक नियंत्रण ठेवायच्या दृष्टीने बिल संसदेत येत आहे ही चांगली गोष्ट आहे. असेच बिल पतपेढ्यांसाठी पण यावे. अशा किती पतपेढ्या बुडतात आणि त्यांच्या ठेवीदारांचे पुढे काय होते काय माहित. https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/rbi-approve…

In reply to by चंद्रसूर्यकुमार

संसदेत बिल आणले जात आहे की सर्वसामान्य लोकांचे बँकेत ठेवलेले पैसे कसे लुटता येतील आणि मित्र मंडळीत कसे वाटता येतील त्या साठी बिल आणले जात आहे . हे पहिले बघितले पाहिजे. ह्या सरकार चा हेतू हा जन कल्याण हा कधीच नव्हता. लोकांना अनुभव आहे.

In reply to by Rajesh188

संसदेत बिल आणले जात आहे की सर्वसामान्य लोकांचे बँकेत ठेवलेले पैसे कसे लुटता येतील आणि मित्र मंडळीत कसे वाटता येतील त्या साठी बिल आणले जात आहे सर, विदा दिलात तर माहितीत भर पडेल.

In reply to by Rajesh188

तुमच्या अशा धमकीने केंद्र सरकारने घाबरून मात्र हा निर्णय बदलला, तर ती तुमची मोठीच अचिव्हमेंट असेल. तेव्हा, इथे लिहीण्यात वेळ घालवू नका ('चर्चा करण्यांत कसला वेळ घालवताय?"- तुम्हीच इततस्त्र). तेव्हा, व्हा पुढे आणि पहा काय पहायचे ते. चला, चला, पळत सुटा.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सहमत आहे, चांगली गोष्ट.

महाराष्ट्रात लवकरच पुन्हा एकदा युती सरकार https://www.lokmat.com/politics/exclusive-bjp-sena-government-maharasht… असं होऊ नये हीच इच्छा आहे व हे होईल असे वाटत नाही. परंतु हे खरंच झालं तर महाराष्ट्रातून भाजप कायमस्वरूपी संपेल हे नक्की.