✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ४)

च
चंद्रसूर्यकुमार यांनी
गुरुवार, 03/11/2021 - 09:35  ·  लेख
लेख
आधीच्या भागात १५० पेक्षा जास्त प्रतिसाद झाले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते. महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरवातीला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थकबाकीदारांचे वीजेचे कनेक्शन तोडले जाणार नाही असे म्हटले होते पण काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने थकबाकीदारांचे कनेक्शन तोडणार असे जाहीर करून आपली आधीचीच भूमिका बदलली आहे. अनेकांना नेहमीपेक्षा ८-१०-१२ पटींनी जास्त वीजेची बिले आली आहेत. म्हणजे वीजेच्या बिलांच्या बाबतीत नक्कीच काहीतरी गफलत झाली आहे हे स्पष्ट आहे. असे असताना कोरोना काळात लोकांच्या अडचणी वाढलेल्या असताना १०-१२ पटींनी जास्त बिले देऊन, नक्की काय गफलत झाली आहे याचा तपास न करता आणि सुधारित बिले पाठवून लोकांना दिलासा न देता वर कनेक्शन तोडणे हा निर्लज्जपणाचा कळस झाला. सरकारला सामान्यांचे श्राप भोवणार आहेत.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
54845 वाचन

💬 प्रतिसाद (166)

प्रतिक्रिया

1990-91

मुक्त विहारि
Sun, 03/14/2021 - 22:09 नवीन
मध्ये, 2-3 दिवस वाचला .... पुढे स्वप्ने पडायला लागली आणि झोपेत, कोथळा, खंजीर, मावळे, इत्यादी शब्द बडबडायला लागलो.... वायफळ बडबडीला कंटाळून, घरच्यांनी तंबी दिली आणि पेपर बंदच केला... पुढे, Enron, एक रूपयांत झुणका भाकर, संजय दत्त, प्रकरणामुळे, मीच एकटा वायफळ बडबड करत न्हवतो, हे जाणवले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मला हे कळत नाहीं .

Rajesh188
Sun, 03/14/2021 - 09:34 नवीन
मदत करता येत नाही तर विरोध तरी का करायचा..समजा ते दलाल आहेत असे समजले तरी त्यांना समस्या नाहीत का? त्यांना त्यांच्या प्रश्न साठी आंदोलन करण्याचा हक्क नाही का. की हक्क फक्त पांढरपेशा लोकांना आणि bjp समर्थक लोकांनाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

वाह.. काय प्रतिसाद आहे..

बापूसाहेब
Sun, 03/14/2021 - 11:44 नवीन
वाह.. काय प्रतिसाद आहे..
मदत करता येत नाही तर विरोध तरी का करायचा
. मस्तच.. उद्या आतंकवादी बॉम्ब फोडायला आले किंवा ISI वाले देश तोडायला आले तरी पण खात्री आहे कि तुम्ही हेच वाक्य बोलणार.. मदत करता येत नाही तर विरोध तरी का करायचा..??
समजा ते दलाल आहेत असे समजले तरी त्यांना समस्या नाहीत का? त्यांना त्यांच्या प्रश्न साठी आंदोलन करण्याचा हक्क नाही का.
म्हणजे आता मान्य करताय का कि ते दलालच आहेत शेतकरी नाहीत.. हे ही नसे थोडके. कारण आजवर तुम्ही आंदोलन करणारे हे कसे शेतकरीच आहेत असं पटवून देत होता.. आज ते दलाल आहेत हे मान्य करताय.. माझी खात्री आहे अजुन थोडा काळ जाऊद्या.. ते खलिस्तानी आहेत हे पण मान्य कराल.
की हक्क फक्त पांढरपेशा लोकांना आणि bjp समर्थक लोकांनाच आहे.
असे काही नाही. पण आंदोलन करताना मागण्या स्पष्ट असाव्यात. देशहिताच्या असाव्यात. उगाच आंदोलन च्या नावाखाली काहीही चाळे करून आपला देशविरोधी छुपा अजेंडा रेटू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

काही माणसांना "मोदीळ" झालेली असते

मुक्त विहारि
Sun, 03/14/2021 - 12:55 नवीन
तर काहींना, भाजपचे कट्टर हिंदूत्व मान्य नसते... अशा लोकांच्या प्रतिसादांना जास्त मनावर घेण्यात अर्थ नाही... व्यक्तीपूजा आणि घराणेशाहीच्या उमेदवारांना, पाठिंबा देणार्या, सुशिक्षित लोकांना, समजवायला जाऊ नये... हा प्रतिसाद बापूसाहेब, यांनाच आहे, कृपया इतर लोकांनी, प्रतिसाद देऊ नये....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

अखेर सचिन वाझेंना अटक,

मदनबाण
Sun, 03/14/2021 - 11:02 नवीन
अखेर सचिन वाझेंना अटक, आतापर्यंत नेमकं काय घडलं, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण? 13 तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना अटक बादवे :- मनसुख हिरेंन की मनसुख हिरण ? एबीपी वाले हिरण असा उलेख करत आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- I'm a Peaky Blinder ( Official Video )
  • Log in or register to post comments

कुठे एबीपी बघण्यात वेळ

सौंदाळा
Sun, 03/14/2021 - 12:28 नवीन
कुठे एबीपी बघण्यात वेळ घालवताय, सावरकर नायक की खलनायक कार्यक्रम केला तेंव्हाच एबीपी बंद करून टाकला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

सामायिक बुरखाबंदी व क्रुसेड

गामा पैलवान
Sun, 03/14/2021 - 15:49 नवीन
मुक्तविहारी, एकाच वेळी सगळे देश बुरखा विरोधी कसे काय झाले? Clash of Civilisations ही युरोपीय विचारवंतांत एक लोकप्रिय कल्पना आहे. ती मूर्तावस्थेत यावी म्हणून इस्लाम व ख्रिस्ती देशांत लढाई व्हायला पाहिजे. ती नुसती लढाई नसून क्रुसेड म्हणजे धर्मयुद्ध असायला हवं. म्हणून हे प्रयत्न चाललेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

माहिती बद्दल धन्यवाद

मुक्त विहारि
Sun, 03/14/2021 - 15:53 नवीन
माहिती बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

ती कार नक्की कुणाची?

मुक्त विहारि
Sun, 03/14/2021 - 16:01 नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/mystery-of-innova-car-bomb-scare-case-antilia-gelatin-sticks-mumbai-police-crime-branch-bmh-90-2420601/ हे नक्की काय चालले आहे?
  • Log in or register to post comments

ह्यांना गुन्हा शोधण्यात रस आहे की गुन्हा कुणी शोधावा ह्यात?

मुक्त विहारि
Sun, 03/14/2021 - 16:10 नवीन
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/central-government-is-destabilising-maharashtra-alleges-shiv-sena-mp-sanjay-raut-over-nia-inquiry-into-mansukh-hiren-case/articleshow/81493169.cms सामान्य माणसाला, गुन्हा उघडकीस आला पाहिजे आणि गुन्हेगाराला शिक्षा व्हायला पाहिजे, ह्यातच रस असतो....
  • Log in or register to post comments

मार्च मधील काही घडामोडी

मुक्त विहारि
Sun, 03/14/2021 - 16:43 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/chandrakant-patil-raised-voice-on-violence-against-women-in-state-of-maharashtra-asked-uddhav-thackeray-anil-deshmukh-bmh-90-2420552/lite/ असामान्य सरकार आहे...
  • Log in or register to post comments

चला

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 03/14/2021 - 17:54 नवीन
सचिन वाझे ह्यांना एन आय ए तर्फे अटक. २५ मार्च पर्यंत कोठडी. सत्य बाहेर येइल अशी अपेक्षा. दहशतवादी जिलेटीनने भरलेली गाडी कशाला ठेवतील? धम्की देउन पैसे तरी उकळतील नाहीतर त्या व्यक्तीला मारतील तरी.. तेव्हा दहशतवादी नाहीत हे उघड होते.
  • Log in or register to post comments

NIA

Rajesh188
Sun, 03/14/2021 - 19:01 नवीन
ह्या संस्थेची स्थापना अतिरेकी ,आणि दहशतवादी ह्यांच्या वर कारवाई करण्यासाठी २००८ मध्ये स्थापना. कार्यक्षेत्र पण अतिरेकी आणि दहशतवादी कार्य पुरतेच मर्यादित आहे. ह्या संस्थेला राज्याची परवानगी घेण्याची गरज नाही. गाडी मध्ये जिलेटीन च्य कांड्या सापडल्या म्हणूनच ह्यांची entry झाली आहे. बाकी कोणत्याच प्रकारच्या गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार ह्या संस्थेला नाही. त्या साठी सीबीआय आणि राज्यातील तपास यंत्रणा आहेत Cbi ल राज्याची परवानगी ची गरज असते. ह्याचा अर्थ साफ आहे बाकी जो काही तपास आहे तो राज्य पोलिस च करणार. म्हणजे सत्य नक्की बाहेर येईल.. नक्की जिलेटीन गाडीत कोणी ठेवलं हा कळीचा मुद्धा आहे ते nia शोधेल. खुनाचा तपास करण्याचा त्यांना अधिकार नाही. काँग्रेस नी कायदा करून ती संस्था स्थापन केलेली आहे पुढे सरकार गेले केंद्रातील तर त्रास देण्यासाठी त्याचा वापर व्हायला नको ह्याची काळजी त्यांनी घेतलेली आहे Nia ल मर्यादा आहे.
  • Log in or register to post comments

इतकी जर सत्याची चाड असेल तर.....

मुक्त विहारि
Sun, 03/14/2021 - 19:07 नवीन
CBI ला नकार का दिला? कर नाही त्याला डर कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

https://www.tv9marathi.com

बापूसाहेब
Sun, 03/14/2021 - 22:15 नवीन
https://www.tv9marathi.com/maharashtra/nagpur/shiv-sena-enters-into-alliance-with-aimim-for-amravati-municipal-corporation-committee-polls-417978.html/amp स्वतः अजान पढून झाली.. अजान स्पर्धा करून झाली. बाळासाहेब ठाकरेंना हिंदुहृदयसम्राट सोडून जनाब म्हणून झाले. आणि आता डायरेक्ट MIM ला पाठिंबा.. आता फक्त लादेन आणि कसाब जयंती साजरी करायची राहिलीये.. म्हणे हिंदुत्ववादी पक्ष.. हिंदुत्वाचा बुरखा ओढलेला लांडगा जणू ...!!
  • Log in or register to post comments

आता डायरेक्ट MIM ला पाठिंबा..

मुक्त विहारि
Sun, 03/14/2021 - 22:20 नवीन
व्यक्तीपुजा आणि घराणेशाही, हा हिंदू धर्माला लागलेला सर्वात मोठा शाप आहे..... हिंदू झोपलेलेच राहणार....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापूसाहेब
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा