Skip to main content

विरूपिका (२) : भविष्य

लेखक ॐकार यांनी बुधवार, 26/12/2007 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
विरूपिका - २ : भविष्य छत्रीप्रमाणे अवकाशाची उघडझाप करणार्‍या तुझ्या हातावर हे परमेश्वरा! आकाशगंगेची दिगंत धनरेषा, शुक्राचा उंचवटा, सर्व ठीक. पण तुला परदेशगमनाचा योग नाही. -विंदा करंदीकर

वाचने 4331
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

तुमचे पुन्हा एकदा आभार ! करंदीकरांची यापेक्षाही एक अगदी छोटी , २ ओळींची विरुपिका अंधुकशी आठवते . कुठल्या एका कवितेमुळे क्षुद्रपणा, कोतेपणा, संकुचितपणा यांच्यापासून दूर रहायला शिकवले असेल तर ती ही विरूपिका : "त्याने मागे एकदा कधीतरी समुद्रात लघवी केली. आणि मग राहिलेले आयुष्य त्यामुळे समुद्राची खोली किती वाढली याचे गणित करण्यात घालविले." (शब्द अचूक नाहीत.)