✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

देवाचं नांव कुणी ठेवलं ?

स
संजय क्षीरसागर यांनी
Tue, 06/16/2020 - 12:34  ·  लेख
लेख
देवाचं नांव कुणी ठेवलं ? या एका प्रष्णासरशी देवाच्या सार्‍या संकल्पनेचा डोलारा कोसळतो. तुमचं जीवन निर्भार होतं; सुरुवातीला थोडी धाकधूक वाटते, पण अवलंबित्व हाच भीतीचा आधार आहे, एकदा निरावलंब झालो की सगळी भीती संपली ! कुठली पूजा-अर्चा नाही; कसलं नामस्मरण नाही, कोणताही जप नाही, कुठलंही व्रतवैकल्य नाही. कुठल्याही कुलदैवताला जाण्याचा त्रास नाही, कोणतंही तिर्थाटन नाही, की निर्बुद्ध परिक्रमा नाही. कोणतीही अपवित्रता नाही, सोवळं-ओवळं नाही, कसले विधी नाहीत, कुठे डोकं टेकायला नको, की शेवटी पुजार्‍याचं धन होणारी दानपेटी नाही. कुठे दिवे लावायला नको, धूप जाळायला नको, कोणतेही यज्ञ-याग नाही. कुठले नवस बोलायला नको की फेडायला नको, कोणत्याही समस्येला वस्तुनिष्ठपणे आणि वैज्ञानिकदृष्टीनं, निर्भिडपणे सामोरं जायला आपण सज्ज. घरातल्या सगळ्या भींती क्लिअर, सगळे कोपरे स्वच्छ; सगळे ग्रंथ, पोथ्या, चरित्र रद्दीत, बुकशेल्फ निम्मी रिकामी. स्वतःला रमायला, स्वतःचा विकास साधायला, व्यासंग आणि छंद जोपासायला, भरपूर मोकळा वेळ आणि निर्बुद्धपणावर खर्च न झाल्यानं वाचलेला, तुमच्या कष्टाचा पैसा ! आणखी काय हवं आयुष्य मोकळं व्हायला ? _____________________________________ देवाचं नांव कुणी ठेवलं ? इतका साधा, सोपा, वरकरणी बाळबोध वाटणारा पण लक्ष्याचा नेमका वेध घेणारा तीर ! प्रष्ण सुद्धा फक्त एकदाच विचारायचा, तोही स्वतःला; आणि मग हसून सगळ्यातून मोकळं व्हायचं ! कुठल्या गुरुकडे जायला नको, 'मी कोण' असं स्वतःलाच विचारुन, स्वतःचा छळ नाही, आणि चेहेर्‍यावर कायम प्रष्णचिन्ह घेऊन करायचा वेडगळ शोध नाही. वर्षानुवर्ष करायची नामसाधना नाही, जरा लक्ष विचलीत झालं की भंगणारा जप नाही, की भ्रमिष्टावस्थेत नेणारा अजपा नाही. एका प्रष्णात काम तमाम ! _____________________________ एक गोष्ट मात्र नक्की, स्वतःला बावळट समजायचं नाही ! इतकी वर्ष काय झक मारलीस का ? या मनाच्या उपहासाला, एकदाच हसून`हो !' म्हटलं की झालं. मग मेलेल्याला जीवंत करणारे तुमचा पिच्छा सोडतील, पोट दुखायला लागल्यावर तुम्ही कालीचा धावा करण्याऐवजी सरळ डॉक्टरकडे जाल, वाघावर बसून आकाशमार्गे येणार्‍यांच्या आणि भींत चालवणार्‍यांच्या सिद्धींपेक्षा; तुमचं आयुष्य सहज आणि सुलभ करणार्‍या वाहनांचे शोध लावणारे शास्त्रज्ञ, तुम्हाला जवळचे वाटतील. पाण्यात दिवे पेटवणार्‍यांऐवजी, रात्रंदिवस खपून आपल्याला अखंड विजपुरवठा करणार्‍या कामगारांप्रती, तुमचा मैत्रभाव जागेल. चमत्कार, सिद्धी, असामान्यत्व असल्या भाकड कल्पनांमुळे, आपण त्यांच्यापुढे छपरी, हा नाहक खोल गेलेला न्यूनगंड संपेल. एक सामान्य, वस्तुनिष्ठ, विज्ञानवादी, व्यासंगी, छंदप्रिय, संतुलित मनाचा पण कुशाग्र आणि हजरजवाबी, अस्तित्वाप्रती कायम कृतज्ञ असलेला, साधा, सरळ माणूस म्हणून तुम्ही निर्भ्रांत जगायला लागाल ! अगदी आजपासून !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
90706 वाचन

💬 प्रतिसाद (379)

प्रतिक्रिया

तुम्ही चुकीच्या ट्रॅक वर जात आहात.

Rajesh188
Mon, 06/22/2020 - 21:14 नवीन
फक्त देव सिद्ध होत नाही म्हणून नाकारणे एवढे सोपे नाही. कारण अस्तिकाता ही नास्तिक ते पेक्षा अधिक तर्कसंगत आहे. नस्तिकाता नैतिकता धोक्यात आणू शकते अशी लोकांची तीव्र भावना आहे. आणि ते समाजस्वास्थ्य साठी चांगले लक्षण नाही. माणूस हा इतर प्राण्यांना पेक्षा वेगळा आहे कारण काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे तो जाणतो आणि हा विकास वादी परिणाम आहे. एकदा व्यक्ती बुडत असेल आणि मला पोहता येत नसेल तरी त्या व्यक्ती ला वाचवलं पाहिजे अशी भावना माझ्या मनात निर्माण होईल पण जर मी नास्तिक विज्ञान वादी असेन तर माझ्या मनात उत्क्रांती वादी विचार येतील त्याला बुडू ध्या तो कमजोर आहे दुर्बल माणसाची काळजी करू नका आपला dna japun thevha to sashakt आहे म्हणून तो टिकेल. कारण उत्क्रांती वाद चांगले किंवा वाईट सांगत नाही. गूढ विश्वाचे रूप बघून आपण प्रथम आश्चर्य चकित झालो त्या मुळे मी कोण आपण कोठून आलो हे प्रश्न आपल्याला पडले आणि म्हणूनच हे प्रश्न विज्ञान चे भाग झाले. देव अस्तित्वात नाही ह्याचा नास्तिक लोकाकडे पुरावा नाही आणि तो अस्तित्वात असल्याचा पण पुरावा नाही . ह्या वर नास्तिक व्यक्ती असे बोलेल की माझा देवा वर विश्वास नाही आणि विश्वास नाही हा शब्द विज्ञान च्या विरूद्ध आहे. ह्याच बाबतीत विज्ञान वादी व्यक्ती विश्वास नाही असा घोषा लावणार नाही तो म्हणेल ठीक आहे आपण गृहितक बनवू,पुरावे गोळा करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

एकदा व्यक्ती बुडत असेल आणि

सतिश गावडे
Mon, 06/22/2020 - 21:53 नवीन
एकदा व्यक्ती बुडत असेल आणि मला पोहता येत नसेल तरी त्या व्यक्ती ला वाचवलं पाहिजे अशी भावना माझ्या मनात निर्माण होईल पण जर मी नास्तिक विज्ञान वादी असेन तर माझ्या मनात उत्क्रांती वादी विचार येतील त्याला बुडू ध्या तो कमजोर आहे दुर्बल माणसाची काळजी करू नका आपला dna japun thevha to sashakt आहे म्हणून तो टिकेल.
फारच विनोदी लिहिलंय तुम्ही. नास्तिक लोकांना तुम्ही राक्षसांचे अवतार वगैरे तर मानत नाही ना :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

नस्तिकाता नैतिकता धोक्यात आणू

सतिश गावडे
Mon, 06/22/2020 - 22:02 नवीन
नस्तिकाता नैतिकता धोक्यात आणू शकते अशी लोकांची तीव्र भावना आहे.
हा एक मोठा गैरसमज आहे, म्हणजे देवाच्या, पाप पुण्याच्या भीतीने आस्तिक माणूस नैतिकतेने वागतो आणि नास्तिक ।माणसाला अशी भीतीच नसल्याने त्याच्याकडे नैतिकता नसते. लक्षात घ्या नितीमत्तेचा आणि आस्तिक किंवा नास्तिक असण्याशी काही संबंध नसतो. सतत देवाचे नाव घेणाऱ्या, लोकांना देवाचे भजन कीर्तन सांगणाऱ्या बाबा लोकांना का बरे तुरुंगात जावे लागते विविध गुन्ह्यांची शिक्षा म्हणून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

अगदी बरोबर

शा वि कु
Mon, 06/22/2020 - 22:32 नवीन
लक्षात घ्या नितीमत्तेचा आणि आस्तिक किंवा नास्तिक असण्याशी काही संबंध नसतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

नाही कसा आहे

Rajesh188
Mon, 06/22/2020 - 22:57 नवीन
त्यांची पूर्ण मस्त तुम्ही वाचली असतील च. पहिला देवा वरचा विश्वास डळमळीत करायचा त्या मध्ये यश मिळाले की धर्माला टार्गेट करायचे त्या मध्ये पण यश मिळाले की रिती रीवाज,परंपरा,कुटुंब व्यवस्था. आणि शेवटी नैतिकता. असा पूर्ण समाज रचना नष्ट करण्याची ही चढती पायरी आहे. स्त्री आणि पुरुष ही दोनच नाती आहेत . आई,बहीण सेक्स ला वर्ज्य नाहीत इथ पर्यंत मत मांडली आहेत नास्तिक मंडळी नी. आणि तुम्ही म्हणताय नास्तिकता आणि नैतिकता ह्याचा काही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

राजेश188 तुमचं गोलगोल होत आहे

शा वि कु
Mon, 06/22/2020 - 23:18 नवीन
तुम्ही इतरांनी दिलेले प्रश्न अनुत्तरित ठेवता. तो प्रश्न मुळातच तुमच्या येणाऱ्या पुढील प्रश्नाला उत्तर असतो. (मला असे कोणी नास्तिक माहित नाहीयेत. पण मर्फीज लॉ.असा नास्तिक असू शकतो म्हणून उत्तर देत आहे.)तुम्ही चटकन कोण्या नास्तिकाचे मत मांडून नास्तिकता आणि अनैतिकतेचे नाते जोडले. धर्मातल्या अनैतिकतेचे मात्र तुम्ही नावही नाही काढत ! वर काही बाबांबद्दल सतीश गावडे यांनी एक विधान केले आहे, त्याकडे तुम्ही मस्तपैकी दुर्लक्ष केले.बरं चला ते राहु द्या. तुम्हाला धार्मिक लोकांच्या घाणेरड्या किळसवाण्या कृत्यांची यादी पाहिजे काय ? Because happy to oblige :) लक्षात घ्या तुम्हीच पुन्हापुन्हा बहुसंख्य कसे आस्तिक आहेत सांगत असता. मग बहुसंख्य गुन्हेगार पण आस्तिकच आहेत. याचा अर्थ आस्तिकता नैतिकता सोडून आहे असं अनुमान मी काढलं तर ते तुम्हाला चालेल काय ? त्यामुळे थोडा तर्काचा फिल्टर तुम्हीही लावून चर्चा करावी ही विनंती, नाहीतर ह्यात काही अर्थ राहत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

अरेरे

अभ्या..
Tue, 06/23/2020 - 00:25 नवीन
तुम्ही इतरांनी दिलेले प्रश्न अनुत्तरित ठेवता. त्यात नवीन ते काय. तर्क शून्य काहीतरी गोल गोल लिहायचं. त्यात अभ्यासाचा अभाव. वर कुणी काही प्रश्न विचारले तरी सोयीस्कर दुर्लक्ष करून अजून काहीतरी गोल गोल सतत लिहित राहायचं हीच तर त्यांची खासियत आहे. सगळा संस्थळावर उच्छाद मांडून त्याबद्दल सगळ्यांकडून थपडा खाऊनही असल्या आयादिसोबत लोक चर्चा करतात हीच नवलाची गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

अभ्या अती शाहने

Rajesh188
Tue, 06/23/2020 - 00:53 नवीन
पाहिले पूर्ण वाचत जा त्याचा अर्थ समजून घेत जा आणि नंतर मत मांडत जा. फक्त समविचारी कंपूत आयुष्य गेल्या मुळे आणि समविचारी असल्या मुळे कोणी विरोध करत नसल्या मुळे स्वतला तुम्ही सर्व ज्ञानी समजायला लागला आहात. नस्तिक्त विचारानं मुळे नैतिकता धोक्यात येईल असे मी मत व्यक्त केले होते. आता का ते समजवायला वेळ नाही तरी एका वाक्यात सांगतो. त्यांना वाईट काम आणि गैर कृत्य ह्यांची भीती,लाज वाटणार नाही ह्या ला प्रत्युत्तर म्हणून बाबा महाराज तुरुंगात का आहेत असा त्यांनी प्रश्न केला त्याचे मी उत्तर दिले नाही. कारण त्या बाबा चा गुन्हा वैयक्तिक लेवलचा आहे आस्तिक लोकांनी मिळून केलेला नाही. आणि त्यांचे गुन्हेगारी वर्तन योग्य आहे असे कोणी म्हटलं पण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अस असतय होय :)

शा वि कु
Tue, 06/23/2020 - 08:35 नवीन
अच्छा. नास्तिक व्यक्तीने देव धर्म सोडून इतर गोष्टीवरचे व्यक्त केलेले मत हे सगळ्या नास्तिक कंपूचे असते पण बाबा इत्यादींनी केलेले मात्र "व्यक्तिगत पातळीवरचे" गुन्हे असतात काय ? मानलं बघा राजेशभौ :)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

हाहाहा

शाम भागवत
Mon, 06/22/2020 - 22:42 नवीन
हाहाहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

तुम्ही तुमची मांडणी चुकीच्या

सतिश गावडे
Mon, 06/22/2020 - 19:10 नवीन
तुम्ही तुमची मांडणी चुकीच्या आधारावर करत आहात असे वाटते. देव मानणारे लोक मानणारे हे लोक न मानणार्‍या लोकांपेक्षा संख्येने कैक पटीने जास्त आहेत म्हणून नास्तिकांचा दावा केवळ या एका मुद्द्यावर निकालात निघू शकत नाही. बाकी तुमचा निष्कर्ष योग्य आहे, नास्तिक विचार समाजात फारसे रुजले नाहीत हे मात्र खरे. मी जे काही डॉ दाभोलकरांचे साहित्य वाचले आहे, व्हिडीओज पाहीले आहेत त्यावरुन डॉ दाभोलकरांचा देव संकल्पनेला विरोध नव्हता असे वाटते. त्यांनी बुवाबाजी, देवतांना पशू बळी देणे इत्यादी चुकीच्या गोष्टींच्या बाबतीत समाज प्रबोधन केले. किंबहूना अशा गोष्टींसाठी त्यांनी "अंधश्रद्धा" असा शब्द वापरला आहे. तसे पाहता अंधश्रद्धा हा शब्दच चुकीचा आहे. अंध श्रद्धा किंवा डोळस श्रद्धा असे काही नसते. श्रद्धा असते किंवा नसते. पण तरीही अंधश्रद्धा शब्दामुळे त्यांना काही देवविषयक घातक नसणार्‍या श्रद्धा या इतर शोषण करणार्‍या घातक श्रद्धांपासून वेगळ्या करता आल्या.
त्यांच्या you tube video 2 lakh lok सुद्धा बघत नाहीत.
युट्युबवरील व्हिडीओला मिळणारे व्ह्युज हे काही एखाद्याच्या कार्याचं मोजमाप करण्याचं परीमाण होऊ शकत नाही.
आणि पुढे पण कोणी स्वीकारतील असे वाटत नाही.
हे असं होतंय खरं. एकंदरीतच काळ जसजसा पुढे सरकतोय, विज्ञानाने नवनविन गोष्टी कळत आहेत नविन तंत्रज्ञान उपयोगात येत आहे, तितका माणूस अधिकाधिक देव संकल्पनेकडे, बुवा, बाबा, महाराजांकडे वळतोय हे मात्र खरं. असं का होतंय हा ही आता एक संशोधनाचा विषय होऊ शकेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

@ सतिश गावडे : एक संशोधनाचा विषय होऊ शकेल !

संजय क्षीरसागर
Mon, 06/22/2020 - 19:28 नवीन
तुम्हीच तर याचं प्रामाणिक उत्तर दिलंय : > > भक्तीने प्रसन्न होणारा, नवस-उपास यांना पावणारा, दुष्टांचे निर्दाळन करणारा देव ! अशी धारणा असेल तर मग भक्तीभोळे, लोकसंख्येबरोबर बेसुमार वाढणार नाहीत तर काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

Rajesh188

शा वि कु
Mon, 06/22/2020 - 20:13 नवीन
बहुसंख्य लोकांचे विचार बरोबरच असतीलच असं असत काय? आणि एक गमतीशीर आकडेवारी- 2009 ते 2018 मध्ये स्वतःला नास्तिक मानणाऱ्या अमेरिकन्स च्या आकड्यात लोखंसंख्येच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली आहे. 2009-2% 2018-4% टक्केवारी दुपटीने वाढली आहे :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

संक्षी साहेब आपल्या मते

मामाजी
Wed, 06/17/2020 - 17:30 नवीन
संक्षी साहेब आपल्या मते वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नक्की काय? हे जरा स्पष्ट करून सांगावे ही विनंती..
  • Log in or register to post comments

@ मामाजी : वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नक्की काय?

संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/18/2020 - 00:32 नवीन
या धाग्यावरचा सर्वात विधायक प्रश्न ! सर्व विज्ञान हा कार्यकारणाचा शोध आहे. थोडक्यात, कोणतीही घटना घडायला नक्की काय कारणीभूत झालं याचा शोध म्हणजे विज्ञान वैज्ञानिक सत्य म्हणजे शास्त्रज्ञांनी शोधलेला नेमका कार्यकारणभाव किंवा सिद्धांत ! प्रत्येक सिद्धांत कायम ३ अटी पूर्ण करतो : १. निर्वयैक्तिकता २. स्थल- काल निरपेक्षितता आणि ३. वारंवारिता उदा. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत > कुणीही, कुठेही आणि केंव्हाही वस्तू सोडली तर ती नेहेमी खालीच येईल वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे कोणतीही गोष्ट मान्य करण्यापूर्वी या ३ नियमांवर तपासून घेणं ______________________________________ देवभोळयांचा कायदा नेमका उलटा आहे ! ते त्याला 'चमत्कार' म्हणतात. तिथे पुरावा मागणं म्हणजे 'स्वतःला शहाणा समजणं' > पाहा : भक्त : शंकराचार्य असामान्य प्रश्न : कशापायी ? भक्त : त्यांनी मेलेल्या व्यक्तीला जीवंत करून स्वतःचा ग्रंथ लिहून घेतला ! प्रश्न : कशावरुन ? भक्त : त्या ग्रंथातच म्हटलंय ! (हा यांचा पुरावा. आणि त्या ग्रंथातलं ते पान इथे डकवलं की `बघा, तुम्हाला तोंडावर पाडलं !) प्रश्न : कुठे आहे तो फॉर्म्युला ? भक्त : (ज्याम पिसाटून) तुम्ही स्वतःला शंकराचार्यांपेक्षा भारी समजता का ? प्रश्न : मी फक्त फॉर्म्युला विचारला. भक्त : मीच एकटा सर्वज्ञ कसा ? मग तिथे सगळे देवभोळे एकत्र जमून टाळ कुटतात ! ____________________________________ बरं हे इथेच थांबत नाही. हे लोक स्वतःचा पंतप्रधान निवडतांना तोच भक्तीभाव वापरतात ! प्रश्न : देशात रोजगार कसा निर्माण होईल ? मोदी : त्यात काय अवघड आहे ? तुम्हाला फक्त संधी दिसायला हवी. मी पेपरात वाचलंय एक चहावाला गटारातल्या गॅसवर चहाचा धंदा करत होता ! नाली गॅसप्रणाली (भक्तांचा टाळ्यांचा कडकडाट !) प्रश्न : सर जरा डेमो दाखवाल का ? भक्त : हा अजेंडावाला आहे. पाठवा पाकिस्तानला ! _________________________________ थोडक्यात, काय एकदा चमत्कार म्हटलं की पुढे बोलायचं नाही आणि भक्ती म्हटली की विरोध करणारा `स्वतःला शहाणा समजतो!' तर असा हा सगळा दिव्य प्रकार यत्रतत्र सर्वत्र चालू आहे. तस्मात, लोकात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा म्हणून हा लेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मामाजी

दुटप्पी आणि अहंकारी संक्षी:

कोहंसोहं१०
गुरुवार, 06/18/2020 - 01:43 नवीन
दुटप्पी आणि अहंकारी संक्षी: "नॉर्मली माणूस गेल्यावर देहासमेत त्याचा मेंदूपण फुल्ली फॉरमॅट होतो > थोडक्यात सर्व स्मृती, कौशल्य, विव्दत्ता.... सर्व शून्य होते. या प्रोसेसमधे काही वेळा चुकून, स्मृतीच्या काही स्ट्रिंग्ज फॉरमॅट न होता अंतराळात रिलीज होतात. अशा स्ट्रींग्ज नवजात अभ्रकाच्या मेंदूत डायरेक्ट कॉपी / पेस्ट होतात > त्याला तो डेटा सक्रीय झाला की मृत व्यक्तीच्या जीवनपटाचा काही भाग दिसायला लागतो " दुटप्पी आणि अहंकारी संक्षी: लोकात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा म्हणून हा लेख वाचक: मेमरी स्ट्रींग्जचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने, किती साली, कोणत्या प्रयोगशाळेत लावला? त्याने मेमरी स्ट्रींग्ज कोणत्या उपकरणाने पाहील्या? दुटप्पी आणि अहंकारी संक्षी: हा देवभोळा आहे. देव अस्तित्वातच नाही. ------------------------------------- दुटप्पी आणि अहंकारी संक्षी: जपामुळे साधक भ्रमिष्ठ होण्याची शक्यता असते दुटप्पी आणि अहंकारी संक्षी: आयडी ब्लॉक झाला नसता तर सत्तांतर होण्याची शक्यता होती वाचक: हसून हसून जमिनीवर लोळले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

@ कोहंसोहं१० : साधा प्रश्रे !

संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/18/2020 - 02:04 नवीन
देवाचं नांव कुणी ठेवलं ? तुम्ही कितीही आवांतर करा, काहीही उपयोग नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०

मेमरी स्ट्रींग्जचा शोध

कोहंसोहं१०
गुरुवार, 06/18/2020 - 02:10 नवीन
मेमरी स्ट्रींग्जचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने, किती साली, कोणत्या प्रयोगशाळेत लावला? त्याने मेमरी स्ट्रींग्ज कोणत्या उपकरणाने पाहील्या? ----> हे अजूनही बाकीचं आहे. अवांतर तुमचे होतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

दुसरया पानवर उत्तर दिले आहे

कोहंसोहं१०
गुरुवार, 06/18/2020 - 18:24 नवीन
दुसरया पानवर उत्तर दिले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

धन्यवाद संक्षी सर

मामाजी
गुरुवार, 06/18/2020 - 09:28 नवीन
धन्यवाद संक्षी सर प्रत्येक सिद्धांत कायम ३ अटी पूर्ण करतो : १. निर्वयैक्तिकता २. स्थल- काल निरपेक्षितता आणि ३. वारंवारिता उदा. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत > कुणीही, कुठेही आणि केंव्हाही वस्तू सोडली तर ती नेहेमी खालीच येईल वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे कोणतीही गोष्ट मान्य करण्यापूर्वी या ३ नियमांवर तपासून घेणं आपल्याला अभिप्रेत असलेला वैज्ञानिक दृष्टीकोन समोर ठेउन मी एक उदाहरण देतो.. कोणालाही, पृथ्वीच्या पाठीवर कुठेही आणि दररोज दिसते की आपण व सभोवतालचा परिसर आपल्या जागी स्थिर असतो व सकाळी उगवणारा सूर्य सरकत सरकत विरूद्ध दिशेला जातो.. या वरून मी हा सिद्धांत मांडतो की पृथ्वी स्थिर, अचल आहे व सूर्य पृथ्वी भोवती फिरतो. आपल्या 3 नियमांवर तपासलेला हा सिद्धांत आपल्याल मान्य आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

@ मामाजी : सार्वजनिक भ्रम

संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/18/2020 - 10:41 नवीन
काही काळ वैज्ञानिक सत्य वाटू शकतो. पण एखादा कुशाग्र बुद्धिमत्तेचा अशा भ्रमांना आव्हान देतो, मग संशोधन सुरु होतं आणि अंतीमतः निर्विवाद वस्तुस्थिती समोर येते. देवभोळयांच्या चमत्कारांना अशीच आव्हानं दिली जातात, तेंव्हा ते फेल होतात. मग भक्तजन 'ते सामान्यांना शक्य नाही' वगैरे भाबडे युक्तीवाद कतात. > पाहा : प्रश्र : काली पोटदुखी बरी करते तर इतकं वैद्यकीय संशोधन कशापायी ? उत्तर : ते सामान्यांसाठी आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मामाजी

संक्षि, मेमरी स्ट्रिंग्ज वैज्ञानिक सत्य आहे का?

संगणकनंद
गुरुवार, 06/18/2020 - 10:52 नवीन
काही काळ वैज्ञानिक सत्य वाटू शकतो.
मेमरी स्ट्रिंग्ज वैज्ञानिक सत्य आहे का? स्वतःच्या भल्या मोठ्या वैज्ञानिक असत्यावर तोंड उघडत नाही तुम्ही आणि लोकांसमोर वैज्ञानिक सत्याच्या बाता मारताय. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

धन्यवाद संक्षी सर,काही काळ

मामाजी
गुरुवार, 06/18/2020 - 11:45 नवीन
धन्यवाद संक्षी सर, काही काळ वैज्ञानिक सत्य वाटू शकतो. पण एखादा कुशाग्र बुद्धिमत्तेचा अशा भ्रमांना आव्हान देतो, मग संशोधन सुरु होतं आणि अंतीमतः निर्विवाद वस्तुस्थिती समोर येते. बरोबर मग आता सांगा एखादा कुशाग्र बुद्धिमत्तेचा अशा भ्रमांना आव्हान देतो म्हणजे नक्की काय करतो. माझ्या मते आपण वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी आवश्यक असे जे 3 नियम सांगीतले आहेत त्यांच्या मर्यादा/त्रृटी लक्षात घेउन नित्यनेमाने घडणार्या घटनांचे योग्य ते स्पष्टिकरण देणयासाठी त्या नियमांत आवश्यक ते बदल करून सुधारित नियम सांगतो.. आपले मत यापेक्षा वेगळे असल्यास सांगावे. . त्या नंतर मी पुढचा मुद्दा मांडतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

हे त्यांना नाही सांगता येणार...

संगणकनंद
गुरुवार, 06/18/2020 - 11:54 नवीन
बरोबर मग आता सांगा एखादा कुशाग्र बुद्धिमत्तेचा अशा भ्रमांना आव्हान देतो म्हणजे नक्की काय करतो.
हे त्यांना नाही सांगता येणार. कारण त्यांचा स्वतःचा "मेमरी स्ट्रिंग्ज" नावाचा भला मोठा भ्रम आहे. स्वतः भ्रम बाळगणारा काय भ्रमाना आव्हान देण्याबद्दल बोलणार =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मामाजी

@ मामाजी : तुमची गल्लत होते आहे !

संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/18/2020 - 12:05 नवीन
> माझ्या मते आपण वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी आवश्यक असे जे 3 नियम सांगीतले आहेत त्यांच्या मर्यादा/त्रृटी लक्षात घेउन नित्यनेमाने घडणार्या घटनांचे योग्य ते स्पष्टिकरण देणयासाठी त्या नियमांत आवश्यक ते बदल करून सुधारित नियम सांगतो. एखादा सिद्धांत या ३ नियमांनी सिद्ध झाला की मर्यादा आणि त्रुटी हा प्रष्णच येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मामाजी

तुमच्या मेमरी स्ट्रिंग्ज

संगणकनंद
गुरुवार, 06/18/2020 - 12:19 नवीन
तुमच्या मेमरी स्ट्रिंग्ज झाल्यात का हो विज्ञानाने सिद्ध? इतरांना पकडून पकडून विज्ञान शिकवताय तर माझ्या प्रतिसादाच्या बाबतीत वाळूत तोंड खुपसून का बसताय? बाकी तुमच्या धाडसाचे कौतुक केले पाहिजे. स्वतः अशास्त्रीय विधाने करुन लोकांना विज्ञान काय असतं ते शिकवताय =)) तुम्ही वाळूत तोंड लपवत असलात तरी पाठीमागे तुमचं अज्ञान उघडं पडलंय हे दिसतंय लोकांना =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

हे वाचून मला एका नाटकातील

कोहंसोहं१०
Sat, 06/20/2020 - 02:34 नवीन
हे वाचून मला एका नाटकातील संवाद आठवला- मोर आनंदाने आपल्याच धुंदीत पिसारा फुलवून नाचत असतो. त्याला वाटतं आपण आपल्या सौंदर्याचं प्रदर्शन करतोय पण असे करताना मात्र त्याला हे कळतंच नाही की हे करताना आपला पार्श्वभाग उघड पडलाय :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संगणकनंद

संक्षी सर,एखादा सिद्धांत या ३

मामाजी
गुरुवार, 06/18/2020 - 13:42 नवीन
संक्षी सर, एखादा सिद्धांत या ३ नियमांनी सिद्ध झाला की मर्यादा आणि त्रुटी हा प्रष्णच येत नाही. हीच जर आपली ठाम भूमिका असेल तर मग पृथ्वी स्थिर आहे व सूर्य पृथ्वी भोवती फिरतो हा सिद्धांत पण आपल्याला स्विकारावाच लागेल कारण तो आपल्या याच 3 नियमांनी सिद्ध केलेला आहे आणि त्या नियमांत कोणत्याही मर्यादा व त्रृटी नाहीत. . . तात्पर्य संक्षी सरांच्या कोणत्याही मर्यादा व त्रृटी नसलेल्या अशा 3 नियमांवर आधारित विज्ञाननिष्ठ भूमिकेनूसार मी हे सिद्ध केले की पृथ्वी स्थिर आहे व सूर्य पृथ्वी भोवती फिरतो.. आता यात माझी गल्लत कुठे होते ते पण जरा स्पष्ट करा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

@मामाजी

शा वि कु
गुरुवार, 06/18/2020 - 14:05 नवीन
तुम्ही दिलेल्या महितीवरून तुम्ही काढलेला निष्कर्ष योग्य आहे. पण आपल्याकडे कोपर्निकसच्या काळापासून यापेक्षा खूप जास्तीची माहिती अस्तित्वात आहे. त्यामुळे आत्ता तुम्ही काढलेला निष्कर्ष योग्य नाही, कारण तुम्ही तो अर्धवट माहितीवर काढला आहे. सं. क्षी. यांचे वरील तीन नियम अपुरे आहेत अस दिसतंय खरं. तर्काच्या सर्व पायऱ्या शब्दात उतरवणे फारच अवघड काम. पण असे काम रॅशनलिस्टसनी केले आहे. सॉक्रेटिस,नॉर्मन लेविस हे उदाहरणे आहेत. नॉर्मन लेविस यांचे "गेम ऑफ लॉजिक" त्यासंबंधात आहे. त्यामुळे हि चर्चा जर constructive व्हायची असेल, तर तुम्हीच तुमचे उदाहरण तपासा आणि नियमांमध्ये भर घाला. उदा- 4)अस्तित्वात असलेला सर्व विदा/ज्ञान या सिद्धांतामध्ये विचारात घेतला असावा. रॅशनॅलिटी बद्दल उत्सुकता असल्यास - Less Wrong
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मामाजी

@ मामाजी : यात माझी गल्लत कुठे होते ?

संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/18/2020 - 14:26 नवीन
सार्वजनिक दृष्टीभ्रम म्हणजे सिद्धांत नाही. सध्या तुमचं काय मत आहे ? कोण कुणाभोवती फिरतंय ? ________________________ आणि इतकं गोलगोल फिरवण्यापेक्षा तुम्ही तुमचा जो काय सिद्धांत असेल तो मांडून या तीन निकषांवर सिद्ध केलात तर बोलता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मामाजी

संक्षी सर,सार्वजनिक

मामाजी
गुरुवार, 06/18/2020 - 15:47 नवीन
संक्षी सर, सार्वजनिक दृष्टीभ्रम म्हणजे सिद्धांत नाही. आपले उदा. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत > कुणीही, कुठेही आणि केंव्हाही वस्तू सोडली तर ती नेहेमी खालीच येईल माझे उदा..कुणीही, कुठेही आणि केव्हाही बघीतले तरी सूर्यच सरकताना दिसतो. या दोन उदाहरणात माझ्या दृष्टीने काहीच फरक नाही पण आपल्या मते मात्र माझे उदाहरण म्हणजे सार्वजनिक दृष्टीभ्रम आहे. . ठीक आहे जर तसे असेल तर माझे उदाहरण हा सार्वजनिक दृष्टीभ्रम कसाआहे हे आपणच समजाउन सांगावे अन्यथा पृथ्वी सूर्याभोवती फिरते ही वस्तुस्थिती सिद्ध करायला आपले 3 विज्ञाननिष्ठ नियम तोकडे पडतात हे मान्य करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

@ मामाजी : गुरुत्वाकर्षण हा दृष्टीभ्रम

संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/18/2020 - 16:05 नवीन
वाटत असेल तर जमेल तितक्या उंचीवरुन उडी मारुन पाहा. आणि सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असं (अजूनही वाटत) असेल तर अवकाशयानातून घेतलेले विडिओज पाहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मामाजी

संक्षी सर,

मामाजी
गुरुवार, 06/18/2020 - 18:34 नवीन
संक्षी सर, मी गुरुत्वाकर्षण हा दृष्टीभ्रम आहे असे कुठेही म्हणालो नाही उलट ते उदाहरण स्वीकारून त्याला लावलेल्या विज्ञाननिष्ठ निकषांवरच समांतर असे माझे वेगळे उदाहरण दिले. मात्र त्याचे स्पष्टीकरण न देता त्याला सार्वजनिक दृष्टीभ्रम म्हणून आपण पळवाट काढलीत. त्यावर कडी म्हणजे मला जास्तीत जास्त उंचीवरून उडी मारायचा तसेच अवकाशयानातून काढलेले व्हीडीओ बघायचा सल्ला दिलात. परंतू ही माझया प्रश्नांची उत्तरे नाहीत. असो या वरून मी हा निष्कर्ष काढला की 3 नियमांवर आधारीत आपण मांडलेला विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन हा अपूर्ण आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

या विश्वात वारंवरीता अशक्य आहे

अर्धवटराव
गुरुवार, 06/18/2020 - 19:54 नवीन
सो कॉल्ड ३ नियमांवर आधारीत अशी कुठलिही अट विज्ञानात नाहि.. कारण त्या ३ कंडीशन इंपॉसीबल आहेत. कुठल्याही प्रयोगात एक भलंमोठं '*' मार्क असतं जे 'इन गिव्ह्न कंडीशन्स' डिफाइन करतं. साधं गुरुत्वाकर्ष्ण प्रत्येक ठिकाणि सारखं नाहि, नॉर्थ-साउथ पोल्स बदलत असतात, अशा वेळी कुठला प्रयोग त्या ३ कंडीशन पूर्ण करणार ? या विश्वात वारंवरीता अशक्य आहे. कुठल्याही प्रयोगाची वारंवारीता तपासताना एक्सपेक्टेड एरर मार्जीन दिफाईन केलीच असते. किंवा तेव्हढी एरर मार्जीन पकडायला आपले प्रयोग सक्षम नसतात. संक्षी साहेबांना एव्हढं सगळं झेपणार नाहि. त्यांना तसंही विज्ञानाशे काहि घेणं देणं नाहि. त्यांचा मुद्दा विज्ञानात बसत नसेल तर ते विज्ञानाला देखील केराची टोपली दाखवतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मामाजी

संक्षि, हे म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण

संगणकनंद
गुरुवार, 06/18/2020 - 10:34 नवीन
सर्व विज्ञान हा कार्यकारणाचा शोध आहे. थोडक्यात, कोणतीही घटना घडायला नक्की काय कारणीभूत झालं याचा शोध म्हणजे विज्ञान वैज्ञानिक सत्य म्हणजे शास्त्रज्ञांनी शोधलेला नेमका कार्यकारणभाव किंवा सिद्धांत ! प्रत्येक सिद्धांत कायम ३ अटी पूर्ण करतो : १. निर्वयैक्तिकता २. स्थल- काल निरपेक्षितता आणि ३. वारंवारिता
तुम्ही लिहीताना काही थोडा फार विचार करता की जे आलं मनात ते टाईप करता? हे सारं तुम्ही फार मोठा विज्ञाननिष्ठ असल्याचा आव आणून लोकांना शिकवत आहात. मात्र स्वतः एक अचाट अशास्त्रीय दावा केला आहे तो कुठल्या शास्त्रज्ञाने शोध लावला हे सांगत नाही. आता तुम्हीच लिहीलेल्या प्रतिसादाला आणि तुम्ही केलेल्या अचाट अशास्त्रीय दाव्याला अनुसरुन द्या बरं या प्रश्नांची उत्तरे:
मेमरी स्ट्रींग्जचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने, किती साली, कोणत्या प्रयोगशाळेत लावला? त्याने मेमरी स्ट्रींग्ज कोणत्या उपकरणाने पाहील्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अजुन पण प्रश्न आहेत

Rajesh188
Wed, 06/17/2020 - 18:42 नवीन
देवळात जावून लोकांना मानसिक समाधान मिळत असेल तर त्या मध्ये आक्षेप घेण्यासारखे काय आहे. रस्त्यात सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्यास आक्षेप घेणे समजू शकतो पण स्वतःच्या घरात गणेश उत्सव साजरा करण्याला आक्षेप का असावा. ग्रंथाचे वाचन करून जर एकाध्या व्यक्तीचे नैराश्य नष्ट होत असेल आणि सकारात्मक दृष्टिकोन तयार होत असेल तर त्या वर आक्षेप का असावा. अंत विधी च्या आडून योग्य रित्या मृत शरीराची विल्हेवाट लावली जात असेल तर आक्षेप का असावा. विविध अंत विधी च्या नावाखाली सर्व नातेवाईकंकडून मृत व्यक्तीच्या जवळच्या लोकांचे सांत्वन केले जात असेल काही दिवस अन्न पुरवले जात असेल तर त्या मध्ये आक्षेप का असावा. विविध सण च्या निमित्ताने लोक एकत्र येत असतील ,एकमेकात मिसळून जात असतील तर आक्षेप का असावा(नवरात्री उत्सव) कोणाचा द्वेष करू नका, हत्या करू नका,कोणाला त्रास देवू नका,कोणाला फसवू नका नाही तर पाप लागेल देव शिक्षा देईल ह्या मध्ये आक्षेप घेण्यासारखे काय आहे
  • Log in or register to post comments

प्रथा आनंद देत असतील आणि हानिकारक नसतील

शा वि कु
Wed, 06/17/2020 - 18:46 नवीन
प्रथा आनंद देत असतील आणि हानिकारक नसतील तर बेलाशक पाळाव्यात. कोणत्याही देवाच्या अस्तित्वाची फोडणी देण्याची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

@ शा वि कु : हे भारीच !

संजय क्षीरसागर
Wed, 06/17/2020 - 18:52 नवीन
' कोणत्याही देवाच्या अस्तित्वाची फोडणी देण्याची गरज नाही '
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

@ Rajesh188 : अजुन पण प्रश्न आहेत ?

संजय क्षीरसागर
Wed, 06/17/2020 - 18:50 नवीन
त्यापेक्षा एकच प्रष्ण स्वतःला विचारा : देवाचं नांव कुणी ठेवलं ? आणि सगळी उत्तरं तुमची तुम्हाला मिळतील !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

तो प्रश्न फक्त तुम्हाला पडलाय

Rajesh188
गुरुवार, 08/20/2020 - 22:13 नवीन
देव ,सृष्टी निर्माता,सृष्टी चे नियम हे समजणे कोणत्या ऐर्या गैर्या चे काम नाही.. खूप गहन विषय आहे. जगातील सर्वात हुशार माणसे थकली शोध घेवून काही धांगपत्ता नाही लागला. रोज नवीन प्रश्न पडत आहेत एक प्रश्न पण सुटला नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सहमत आहे

नीलस्वप्निल
गुरुवार, 08/20/2020 - 22:06 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

देवाचे नाव कोणी ठेवलं हा प्रश्न चुकीचं आहे

Rajesh188
Wed, 06/17/2020 - 18:58 नवीन
हा प्रश्न च चुकीचं आहे. त्या मुळे त्याचे उत्तर शोधण्याची गरज नाही. देव म्हणजे कोण ह्या विषयी माझी मत मी वर मांडलेली आहेत . त्या मताशी तुम्ही सहमत नाही हा तुमचा प्रश्न आहे. माझी मस्त ठाम आहेत. माझ्या व्याखेतील देवाला नाव देण्याची गरज नाही. तो स्वयं भू आहे.
  • Log in or register to post comments

Rajesh188 : माझ्या व्याखेतील देवाला नाव देण्याची गरज नाही ?

संजय क्षीरसागर
Wed, 06/17/2020 - 19:18 नवीन
> तो स्वयं भू आहे. ? आहो, देवच नाही ! तुम्ही काय वाचतायं इतका वेळ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

माणसाचे विचार म्हणजे नैसर्गिक ?

Rajesh188
Wed, 06/17/2020 - 19:09 नवीन
कोणत्याही साजिवाची किंवा वस्तू ची एक नैसर्गिक प्रवृत्ती असते असे मी म्हटले आहे. आणि ही नैसर्गिक प्रवृत्ती मुळे च ते एकमेका पासून वेगळे असतात. जसे सिंह हिंस्त्र असतो तर ससा भित्रा असतो ही प्रवूर्ती जी नैसर्गिक आहे ती कधीच exchange hot nahi. Ti kayam एकसारखीच असते. सिंह भित्रा आणि ससा हिंस्त्र कधीच असू शकत नाही. तश्या वस्तू पण त्यांचे गुणधर्म ,प्रवृत्ती बदलत नाहीत. जशी प्रवृत्ती तसेच विचार करण्याची पद्धत असते . प्रवृत्ती च्या विरोधी कोणतेच विचार करण्याची कोणालाच मुभा नाही
  • Log in or register to post comments

Rajesh188

शा वि कु
Wed, 06/17/2020 - 19:19 नवीन
तुमचे विचार उत्क्रांतीच्या सिद्धांताशी जुळत नाहीत. या सिद्धांतानुसार अनेक पिढ्यांमध्ये प्राण्यांच्या जेनेटिक्स मध्ये अनेक बदल होतात. हे बदल अत्यंत कमी वेगाने होतात, माणसाच्या गतीच्या कल्पनेप्रमाणे. पण बऱ्याचश्या जीवांमध्ये (काही micro-orgasm ज्यांचे आयुष्य 20 मिनिटांपेक्षा कमी असते) त्यांच्यामध्ये होणारे बदल/म्युटेशन माणसाला पाहण्याइतक्या वेगाने होतात. फार लांब कशाला जावा. कोरोनासारखे विषाणू सुद्धा बदलतात आणि प्रतिकारशक्ती कमावतात हे तुम्ही ऐकल असेलच. एकूणच- जीवाची प्रवृत्ती वगैरे लॉंग रन मध्ये काही नसतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

तुमच्या सोयीचा अर्थ तुम्ही काढत आहात

Rajesh188
Wed, 06/17/2020 - 20:00 नवीन
मुळात उत्क्रांती वाद हा सिद्धांत नाही गृहितक आहे. तो विषय बाजूला ठेवूया नाही तर विषयांतर होईल. स्वतः मध्ये बदल कोणताच प्राणी स्वतः ठरवून करू शकत नाही. स्वतः मध्ये स्वतःच्या इच्छे नी बदल करण्याची क्षमता कोणत्याच प्राण्या मध्ये नाही असे मी माझ्या पूर्वीच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. तुम्ही उत्क्रांती वाद आणि विषाणू च जीवनक्रम हा संबंधित नसलेला विषय पुढे आणलात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

प्रवृत्ती वैगेरे

शा वि कु
Wed, 06/17/2020 - 20:11 नवीन
बदल इच्छेविरुद्ध होतात का ? जे बदल होतात ते ठरवून होत नाहीत, नॅचरल सिलेक्शन ने होतात. प्राण्यांची प्रवृत्ती वगैरे काही नसते हा मुद्दा होता. एक उदाहरण- इओहिप्पस नावाच्या 2-3 फुटी प्राण्यापासून घोडा हा अजस्त्र प्राणी उत्क्रांत झाला आहे. इओहीप्पस आणि घोडा यांच्यामध्ये सामाजिक आणि मानसशास्त्रीय फरक आहेतच. इओहिप्पस हा गवतात लपून राहायचा, आणि घोडे कळपाने कुरणांवर राहायचे. माणसाचं घिसं पिटं उदाहरण नको म्हणून घोड्याचं. इओहिप्पस प्राण्यांची प्रवृत्ती तीच राहिली नाही. उत्क्रांती कुठल्याही देवाच्या सुपरव्हीजन खाली झालेली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

उत्क्रांती

शा वि कु
गुरुवार, 06/18/2020 - 07:50 नवीन
उत्क्रांती हे गृहीतक अजिबात नाही आहे. उत्क्रांती well established scientific fact आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

Rajesh188

शा वि कु
Wed, 06/17/2020 - 20:04 नवीन
एक उदाहरण- इओहिप्पस नावाच्या 2-3 फुटी प्राण्यापासून घोडा हा अजस्त्र प्राणी उत्क्रांत झाला आहे. इओहीप्पस आणि घोडा यांच्यामध्ये सामाजिक आणि मानसशास्त्रीय फरक आहेतच. इओहिप्पस हा गवतात लपून राहायचा, आणि घोडे कळपाने कुरणांवर राहायचे. माणसाचं घिसं पिटं उदाहरण नको म्हणून घोड्याचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

स्वतःच्या इच्छे नी

Rajesh188
Wed, 06/17/2020 - 20:07 नवीन
स्वतःच्या इच्छे नी त्या प्राण्याने स्वतः मध्ये बदल केला का? हाच प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा