देवाचं नांव कुणी ठेवलं ?
देवाचं नांव कुणी ठेवलं ?
या एका प्रष्णासरशी देवाच्या सार्या संकल्पनेचा डोलारा कोसळतो.
तुमचं जीवन निर्भार होतं;
सुरुवातीला थोडी धाकधूक वाटते,
पण अवलंबित्व हाच भीतीचा आधार आहे,
एकदा निरावलंब झालो की सगळी भीती संपली !
कुठली पूजा-अर्चा नाही; कसलं नामस्मरण नाही, कोणताही जप नाही, कुठलंही व्रतवैकल्य नाही.
कुठल्याही कुलदैवताला जाण्याचा त्रास नाही, कोणतंही तिर्थाटन नाही, की निर्बुद्ध परिक्रमा नाही.
कोणतीही अपवित्रता नाही, सोवळं-ओवळं नाही, कसले विधी नाहीत,
कुठे डोकं टेकायला नको, की शेवटी पुजार्याचं धन होणारी दानपेटी नाही.
कुठे दिवे लावायला नको, धूप जाळायला नको, कोणतेही यज्ञ-याग नाही.
कुठले नवस बोलायला नको की फेडायला नको,
कोणत्याही समस्येला वस्तुनिष्ठपणे आणि वैज्ञानिकदृष्टीनं, निर्भिडपणे सामोरं जायला आपण सज्ज.
घरातल्या सगळ्या भींती क्लिअर, सगळे कोपरे स्वच्छ;
सगळे ग्रंथ, पोथ्या, चरित्र रद्दीत, बुकशेल्फ निम्मी रिकामी.
स्वतःला रमायला, स्वतःचा विकास साधायला, व्यासंग आणि छंद जोपासायला, भरपूर मोकळा वेळ आणि
निर्बुद्धपणावर खर्च न झाल्यानं वाचलेला,
तुमच्या कष्टाचा पैसा !
आणखी काय हवं आयुष्य मोकळं व्हायला ?
_____________________________________
देवाचं नांव कुणी ठेवलं ?
इतका साधा, सोपा, वरकरणी बाळबोध वाटणारा पण लक्ष्याचा नेमका वेध घेणारा तीर !
प्रष्ण सुद्धा फक्त एकदाच विचारायचा, तोही स्वतःला;
आणि मग हसून सगळ्यातून मोकळं व्हायचं !
कुठल्या गुरुकडे जायला नको,
'मी कोण' असं स्वतःलाच विचारुन, स्वतःचा छळ नाही,
आणि चेहेर्यावर कायम प्रष्णचिन्ह घेऊन करायचा वेडगळ शोध नाही.
वर्षानुवर्ष करायची नामसाधना नाही,
जरा लक्ष विचलीत झालं की भंगणारा जप नाही,
की भ्रमिष्टावस्थेत नेणारा अजपा नाही.
एका प्रष्णात काम तमाम !
_____________________________
एक गोष्ट मात्र नक्की, स्वतःला बावळट समजायचं नाही !
इतकी वर्ष काय झक मारलीस का ?
या मनाच्या उपहासाला,
एकदाच हसून`हो !' म्हटलं की झालं.
मग मेलेल्याला जीवंत करणारे तुमचा पिच्छा सोडतील,
पोट दुखायला लागल्यावर तुम्ही कालीचा धावा करण्याऐवजी सरळ डॉक्टरकडे जाल,
वाघावर बसून आकाशमार्गे येणार्यांच्या आणि भींत चालवणार्यांच्या सिद्धींपेक्षा;
तुमचं आयुष्य सहज आणि सुलभ करणार्या वाहनांचे शोध लावणारे शास्त्रज्ञ,
तुम्हाला जवळचे वाटतील.
पाण्यात दिवे पेटवणार्यांऐवजी,
रात्रंदिवस खपून आपल्याला अखंड विजपुरवठा करणार्या कामगारांप्रती,
तुमचा मैत्रभाव जागेल.
चमत्कार, सिद्धी, असामान्यत्व असल्या भाकड कल्पनांमुळे,
आपण त्यांच्यापुढे छपरी,
हा नाहक खोल गेलेला न्यूनगंड संपेल.
एक सामान्य,
वस्तुनिष्ठ, विज्ञानवादी, व्यासंगी, छंदप्रिय,
संतुलित मनाचा पण कुशाग्र आणि हजरजवाबी,
अस्तित्वाप्रती कायम कृतज्ञ असलेला,
साधा, सरळ माणूस म्हणून तुम्ही
निर्भ्रांत जगायला लागाल !
अगदी आजपासून !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हे काही समजले नाही
@ नेत्रेश : सुर्याचे नावही माणसानेच ठेवले आहे !
देव आणि जीव
@ गामा पैलवान : माणसाच्या मेंदूपलिकडे जिवालाही अस्तित्व नाही
गल्ली चुकली
@ ढब्ब्या : गल्ली चुकली ?
रूढी परंपरा यांचा आपल्या
@ गणेशा : आपण त्या चाकोरीतून कधी बाहेर पडत नाही...
सगळा घोळ श्रद्धा आणि विज्ञान
@ कोहंसोहं१० : घोळ श्रद्धा आणि विज्ञान हे
माझाच प्रतिसाद क्रीप्टिक होता
कोहंसोहम
@ शा वि कु : जर श्रद्धा म्हणजे bad evidence वर...
कालीला नांवापलिकडे काहीही
@ कोहंसोहं१० :कालीला नांवापलिकडे काहीही
जिएसटीची काँप्लीकेशन्स समजू
Has anything you have ever done made your life better ?
@ शा वि कु : हा प्रश्न लिटरल नाही असं दिसतंय !
हा काय प्रश्न झाला? देवाच्या
@ रातराणी : हा काय प्रश्न झाला? देवाच्या आई पपानी ठेवलं !
हा काय प्रश्न झाला
@ अभ्या.. : त्यांच्या आईपप्पांनी सांगितले ?
हा धागा म्हणजे नवीन बाटलीत
@ बाप्पू : कधीही न संपणारा हा वाद आहे ?
देव ही संकल्पना
@ Rajesh188 : विश्व संचलित करणार्या
त्यांनी तुम्हाला उद्देशून
Rajesh188
@ शा वि कु : देव म्हणजे
शंभर टक्के सहमत
@ गामा पैलवान : ती व्यवस्था जी सतत नवनवीन
संशोधकावरचा विश्वास हा त्या
बापरे
@ शा वि कु : नाही !
@ शा वि कु : नाही !
किती खोटं बोलता हो संक्षी...
बरोबर. मिपामध्ये दिलेल्या
संशोधकावरचा विश्वास हा त्या एका व्यक्तीवरचा विश्वास नसतो कै. संश
मेंदू, अस्तित्व आणि शब्दप्रामाण्य
@ गामा पैलवान : स्वतःच्या बापाच्या अस्तित्वाबद्दल
मेमरी स्ट्रींग्जचा फॅक्ट चेक
देव ऊर्जा आहे
ह्या विश्वात सर्व सजीव निर्जीव साचे बद्ध असतात
Rajesh188
रोचक चर्चा.
_/\_
एक रोचक प्रश्न
आपल्याइथं मुळातच एक प्रॉब्लेम
रामायण काळा पासून
@ Rajesh188 : बहुसंख्य लोकांनी ते नाकारले.