मगं ! आज काय वाचताय ?
नमस्कार,
आज काय वाचताय ? हा प्रश्न जरी इतरांना उद्देशून असला तरी तो तितकाच स्वतःला देखील आहे.
तर मग ! आज काय वाचलं ?
पुस्तकाचे नाव : द लास्ट माईल
मुळ लेखक : डेव्हिड बॅल्डासी
मराठी अनुवाद : सायली गोडसे
प्रकाशक : श्रीराम बुक एजन्सी पुणे
किंमत : मी वाचत असलेल्या प्रथम आवृत्तीची किंमत रु. ४५०.०० फक्त
----------------
द लास्ट माईल्स ही एका उदयोन्मुख फुटबॉलपटूची जीवन कहाणी आहे. मेलविन रॉय मार्स वयाच्या विसाव्या वर्षाच्या आतच अमेरिकेतील एक प्रसिद्ध फुटबॉलपटू बनतो. मात्र त्याच्या व्यावसायिक कारकिर्दिच्या सुरुवातीलाच त्याला आपल्या आई-वडीलांच्या हत्येप्रकरणी देहांताची शिक्षा होते. वीस वर्षे तुरुंगात घालविल्यावर जेव्हा त्याच्या देहांताची शिक्षा अंमलात आणण्याची वेळ येऊन ठेपते, त्याच्या काही सेकंद अगोदर कोणीतरी दुसराच ते खुन आपण केल्याची कबुली देतो आणि मेलविनची मृत्युच्या दारातून सुटका होते. मात्र टेक्सास राज्य आपल्याला तुरुंगाबाहेर जाऊ देणार नाही, काही ना काही कारण शोधून आपल्याला परत अटक करतील ह्या भितीच्या छायेखाली तो सतत जगत असतो. त्याच्या सुटकेची बातमी जेव्हा रेडीओवर ऐकवली जात असते तेव्हा ती नेमकी स्पेशल एजंट अॅमास डेकर याच्या कानावर पडते. तो या प्रकरणातील सत्य शोधण्याच्या कामी लागतो आणि तेथून पुढे ही कादंबरी वेगवेगळी वळणे घेत शेवटाला पोहोचते.
मेलविन निरपराध असतो काय ? जर तो निरपराध असेल तर त्याला यात कोणी गोवले ? अगदी शेवटच्या क्षणी मेलविनने केलेल्या खुनाची जबाबदारी दुसराच कोणीतरी घेतो पण तोही खरा गुन्हेगार नसतो. मेलविनच्या आईवडीलांचा भुतकाळ रहस्यमय असतो, तो कशामुळे ? शेवटी अशा काही गोष्टी उजेडात येतात ज्याची मेलविन आणि तपास अधिकारी डेकर ने कल्पना देखील केलेली नसते.
हे सगळे र हस्य जाणून घेण्यासाठी कादंबरी एक वेळा वाचण्याची शिफारस करतो.
धन्यवाद !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
एक वेगळं पुस्तक सुचवू का?
हे नुकतंच वाचून संपवलं.
द व्हाईट टायगर
या पुस्तकाला पुरस्कार मिळाला...
मारियो पुझोचं 'द गॉडफादर' परत
Marathi ki इंग्रजी ?
मराठी अनुवाद
'द गॉडफादर रिटर्न्स'
मस्तच.
सध्या...
शोध
परिचया बद्दल आभार!
मोफत उपलब्ध असेल तर दुवा
टेलिग्राम वर...
मस्त पुस्तक
लेखकाने दिलेल्या क्रेडीट्स
रिचर्ड डॉकिन्स लिखीत द गॉड डील्युजन
माझ्याकडे इंग्रजी प्रत आहे.
₹ 499/- फक्त.(विदाउट डिस्काउंट)
होय होय आवड आहे. अशीच जवळपास
बापरे बाप सोळाशे म्हणजे एक सहा शून्य शुन्य ?
त्यातील टॉप 61-62 पुस्तके
हेतू कुत्सित नाही
मूळ इंग्रजि...
गुलाम
शोधितो मार्ग स्वप्नाचा
सेपिअन्स
कोल्ड स्टील
श्री कृष्ण अक्षरी
लॉकडाऊन काळात पु. ल.
व्वा!
लोकसत्तामधील हा वाचनीय लेख
लोकसत्तामधील हा वाचनीय लेख
यांचे सगळ्यांशीच का भांडण?
नामदेवराव जाधव यांचे 'गनिमी