✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मगं ! आज काय वाचताय ?

ध
धर्मराजमुटके यांनी
Wed, 07/17/2019 - 21:45  ·  लेख
लेख
नमस्कार, आज काय वाचताय ? हा प्रश्न जरी इतरांना उद्देशून असला तरी तो तितकाच स्वतःला देखील आहे. तर मग ! आज काय वाचलं ?  पुस्तकाचे नाव : द लास्ट माईल मुळ लेखक : डेव्हिड बॅल्डासी मराठी अनुवाद : सायली गोडसे प्रकाशक : श्रीराम बुक एजन्सी पुणे किंमत : मी वाचत असलेल्या प्रथम आवृत्तीची किंमत रु. ४५०.०० फक्त ---------------- द लास्ट माईल्स ही एका उदयोन्मुख फुटबॉलपटूची जीवन कहाणी आहे. मेलविन रॉय मार्स वयाच्या विसाव्या वर्षाच्या आतच अमेरिकेतील एक प्रसिद्ध फुटबॉलपटू बनतो. मात्र त्याच्या व्यावसायिक कारकिर्दिच्या सुरुवातीलाच त्याला आपल्या आई-वडीलांच्या हत्येप्रकरणी देहांताची शिक्षा होते. वीस वर्षे तुरुंगात घालविल्यावर जेव्हा त्याच्या देहांताची शिक्षा अंमलात आणण्याची वेळ येऊन ठेपते, त्याच्या काही सेकंद अगोदर कोणीतरी दुसराच ते खुन आपण केल्याची कबुली देतो आणि मेलविनची मृत्युच्या दारातून सुटका होते. मात्र टेक्सास राज्य आपल्याला तुरुंगाबाहेर जाऊ देणार नाही, काही ना काही कारण शोधून आपल्याला परत अटक करतील ह्या भितीच्या छायेखाली तो सतत जगत असतो. त्याच्या सुटकेची बातमी जेव्हा रेडीओवर ऐकवली जात असते तेव्हा ती नेमकी स्पेशल एजंट अ‍ॅमास डेकर याच्या कानावर पडते. तो या प्रकरणातील सत्य शोधण्याच्या कामी लागतो आणि तेथून पुढे ही कादंबरी वेगवेगळी वळणे घेत शेवटाला पोहोचते. मेलविन निरपराध असतो काय ? जर तो निरपराध असेल तर त्याला यात कोणी गोवले ? अगदी शेवटच्या क्षणी मेलविनने केलेल्या खुनाची जबाबदारी दुसराच कोणीतरी घेतो पण तोही खरा गुन्हेगार नसतो. मेलविनच्या आईवडीलांचा भुतकाळ रहस्यमय असतो, तो कशामुळे ? शेवटी अशा काही गोष्टी उजेडात येतात ज्याची मेलविन आणि तपास अधिकारी डेकर ने कल्पना देखील केलेली नसते. हे सगळे र हस्य जाणून घेण्यासाठी कादंबरी एक वेळा वाचण्याची शिफारस करतो. धन्यवाद !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
48881 वाचन

💬 प्रतिसाद (135)

प्रतिक्रिया

एक वेगळं पुस्तक सुचवू का?

मायमराठी
Sun, 08/18/2019 - 00:39 नवीन
एक वेगळं पुस्तक सुचवू का? "पाप्याचं पितर" - हर्षद सरपोतदार, श्रीविद्या प्रकाशन, पुणे. खूपच ताजा, खुमासदार विनोद. विषय सांगून चव घालवत नाही. एकदा तरी हसता हसता डोळ्यातून पाणी येईल वगैरे असं काहीतरी आहे.
  • Log in or register to post comments

हे नुकतंच वाचून संपवलं.

मनो
Sun, 08/18/2019 - 04:11 नवीन
हे नुकतंच वाचून संपवलं. Image removed. गोविंद सखाराम सरदेसाई आणि जदुनाथ सरकार यांच्या पत्रव्यवहार यावर ते आधारित आहे. एक दोन प्रकरणं थोडी जड आहेत वाचायला, पण बाकी सुरेख.
  • Log in or register to post comments

द व्हाईट टायगर

धर्मराजमुटके
Tue, 08/20/2019 - 08:57 नवीन
'द व्हाईट टायगर' हे अरविंद अडिगा लिखित, लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. वाराणसीतील एक गरीब मुलगा चीनच्या राष्ट्राधक्षांना आपली कहाणी सांगतोय अशा स्वरुपात लिखाण आहे. बलराम हलवाई हा मुलगा एका मोठ्या उद्योगपतीकडे ड्रायव्हर म्हणून कामाला लागतो. एके दिवशी मालकाचा खुन करुन त्याचे पैसे घेऊन पळून जातो आणि नंतर मोठा उद्योगपती बनतो अशी साधारण कहाणी आहे. पुस्तक नाही वाचले तरी चालण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments

या पुस्तकाला पुरस्कार मिळाला...

mayu4u
Tue, 08/20/2019 - 11:21 नवीन
... तेव्हा मूळ इन्ग्रजी मिळवून वाचलेलं... बंडल आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

मारियो पुझोचं 'द गॉडफादर' परत

प्रचेतस
Tue, 08/20/2019 - 17:13 नवीन
मारियो पुझोचं 'द गॉडफादर' परत एकदा वाचायला सुरुवात केलीय. मार्क वाइनगार्डनर ह्याने 'द गॉडफादर' चा सिक्वेल 'द गॉडफादर रिटर्न्स' ह्या कादंबरीद्वारे आणला होता. तो वाचण्याआधी द गॉडफादर पुन्हा एकदा वाचून स्वत:ला रिफ्रेश करुन घेतोय.
  • Log in or register to post comments

Marathi ki इंग्रजी ?

जॉनविक्क
Tue, 08/20/2019 - 17:30 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मराठी अनुवाद

प्रचेतस
Tue, 08/20/2019 - 17:34 नवीन
मराठी अनुवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

'द गॉडफादर रिटर्न्स'

धर्मराजमुटके
Tue, 08/20/2019 - 20:40 नवीन
"द गॉडफादर" मस्त आहे. पण 'द गॉडफादर रिटर्न्स' फारच रटाळ वाटले मला. परत त्याच्या वाटेला जाणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मस्तच.

जॉनविक्क
Tue, 08/20/2019 - 21:31 नवीन
इनकेस मूड आला तर आमिर खान, रजनीकांत अभिनित आतंक ही आतंक तुनळी वर बघू शकता. बॉलीवूड ने त्याची भ्रष्ट नक्कल केली आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सध्या...

mayu4u
Tue, 08/20/2019 - 17:55 नवीन
वि स वाळिंबे यांचं "वॉर्सा ते हिरोशिमा" वाचतोय. गेल्या आठवड्यात शेहान करुनतिलका चं "चायनामन" (दुसर्‍यांदा) संपवलं. त्या आधी अ‍ॅंडी वीर (वियर?) चं "द मार्शियन". आधी चित्रपट पाहिला. पुस्तक (अर्थातच) सरस आहे!
  • Log in or register to post comments

शोध

धर्मराजमुटके
गुरुवार, 08/29/2019 - 19:56 नवीन
पुस्तकाचे नाव : शोध लेखक : मुरलीधर खैरनार प्रकाशक : राजहंस प्रकाशन किंमत : रु. ५०० फक्त १६७० साली शिवाजी महाराजांनी दुसर्‍यांदा सुरत लुटली मात्र तो खजिना स्वराज्यात आणताना त्यातला बराचसा मोठा भाग गडप होता. थोडे सत्य, बरेचसे काल्पनिक मुद्दे वापरुन लिहिलेली ही रोचक कादंबरी आहे. वाचताना मजा आली. कुठेही कंटाळा आला नाही. एकदा वाचावी आणि संग्रही ठेवावी अशी कादंबरी आहे हे नक्की.
  • Log in or register to post comments

परिचया बद्दल आभार!

mayu4u
Fri, 08/30/2019 - 10:29 नवीन
ही डौन्लोडवली आहे. लिष्टीत अ‍ॅडवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

मोफत उपलब्ध असेल तर दुवा

सतिश गावडे
गुरुवार, 09/12/2019 - 11:22 नवीन
मोफत उपलब्ध असेल तर दुवा मिळेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u

टेलिग्राम वर...

mayu4u
Sat, 09/14/2019 - 17:48 नवीन
... भरपूर पुस्तकं मिळतिल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

मस्त पुस्तक

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 08/30/2019 - 11:57 नवीन
काही दिवसांपूर्वी एका पुस्तक प्रदर्शनात सहज चाळले आणि बरे वाटले म्हणून विकत घेतले. इतिहास वगेरे काही डोक्यात न ठेवता एक कादंबरी म्हणून वाचले तर जबराट पुस्तक आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

लेखकाने दिलेल्या क्रेडीट्स

प्रचेतस
गुरुवार, 09/12/2019 - 11:43 नवीन
लेखकाने दिलेल्या क्रेडीट्स मध्ये बॅटमॅनचे नाव आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

रिचर्ड डॉकिन्स लिखीत द गॉड डील्युजन

जॉनविक्क
गुरुवार, 09/12/2019 - 10:50 नवीन
Image removed. या पुस्तकाचा मुग्धा कर्णिक यांनी केलेला अनुवाद वाचतोय. देव नाकारताना निव्वळ एकाच धर्माला टार्गेट केले जाते अशी ओरड करणाऱ्या लोकांनी तर अवश्य वाचावे असे पुस्तक आहे.
  • Log in or register to post comments

माझ्याकडे इंग्रजी प्रत आहे.

सतिश गावडे
गुरुवार, 09/12/2019 - 11:20 नवीन
माझ्याकडे इंग्रजी प्रत आहे. मराठी प्रतीतील भाषांतर कसे आहे? किंमत किती आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

₹ 499/- फक्त.(विदाउट डिस्काउंट)

जॉनविक्क
गुरुवार, 09/12/2019 - 12:09 नवीन
भाषांतर चांगलेच आहे. फक्त (बायबलचे आणि इतर ग्रंथांचे) संदर्भ उतारे वाचताना विषयाची आवड अपेक्षित आहे. अन्यथा दीर्घ वाचन करून आपण नक्की नवीन असे काय समजून घ्यायचा प्रयत्न करतोय असे वाटू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

होय होय आवड आहे. अशीच जवळपास

सतिश गावडे
गुरुवार, 09/12/2019 - 15:32 नवीन
होय होय आवड आहे. अशीच जवळपास सोळाशे पुस्तकं संग्रही आहेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

बापरे बाप सोळाशे म्हणजे एक सहा शून्य शुन्य ?

जॉनविक्क
Sat, 09/14/2019 - 03:39 नवीन
आम्हाला सहा पुस्तके वाचता वाचता डोक्यावरुन पाणी जाते अन तुम्ही अशी जवळपास सोळाशे बुक्स पालथी घातली ? कमाल आहे. त्यातील टॉप 61-62 पुस्तके सांगू शकाल का ? तुमच्या नजरेतुन ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

त्यातील टॉप 61-62 पुस्तके

सतिश गावडे
Sun, 09/15/2019 - 08:47 नवीन
त्यातील टॉप 61-62 पुस्तके सांगू शकाल का ?
लोक शक्यतो ५०-६० अशा संख्या वापरतात. तुम्ही उल्लेख केलेल्या ६१-६२ या जादूई संख्या रोचक आहेत. जर त्या त्याच कुत्सित हेतूने वापरल्या असतील तर अवघड आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

हेतू कुत्सित नाही

जॉनविक्क
Sun, 09/15/2019 - 14:34 नवीन
खरे तर 75 पुरेसे होते. पण एखादी राउंड फिगर सोडून (कुत्सित अर्थाने न्हवे बरेका) मुद्दाम ऑड संख्या दिली की सोर्टइंग करणाऱ्याचा खरा कस लागतो व चोख सोनेच निर्माण होते असा अनुभव आहे. पण पुन्हा संख्या ऑड असावी की इव्हन हा निर्णयही तुम्ही घ्यावा ज्यातून अपेक्षित Search Result मिळेल म्हणून 61 की 62 हे तुमच्यावर सोडले. खरे तर कुत्सितपणे जरी विचारले असते तरी तुम्हाला योग्य उत्तर देणे अजिबात अवघड नाही पण ते सोडून तुम्ही... असो अचानक उपटलेला हा कुत्सितपणा मनातून बाजूला जाऊदे आणी आपली लिस्ट येऊदे. अतिशय उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

मूळ इंग्रजि...

mayu4u
Sat, 09/14/2019 - 17:49 नवीन
... वाचलं आणि आवडलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

गुलाम

हेमंतकुमार
Fri, 09/20/2019 - 16:02 नवीन
अच्युत गोडबोलेंचे 'गुलाम' वाचतोय. त्यात स्पार्टाकस ते ओबामा हा पूर्ण इतिहास आहे. सगळे तपशील वाचवणार नाहीत. भयानक. आधी शेवटचे ओबामा प्रकरण वाचले. त्यांच्या आईचा तरुण फोटो काय देखणा आहे.
  • Log in or register to post comments

शोधितो मार्ग स्वप्नाचा

धर्मराजमुटके
Fri, 09/20/2019 - 20:57 नवीन
पुस्तकाचे नाव : शोधितो मार्ग स्वप्नाचा मुळ मल्याळी लेखक : सी. राधाकृष्णन् मराठी अनुवाद : धनश्री हळबे प्रकाशक : साहित्य अकादमी एकाच दिवशी ठिकठिकाणी प्रचंड स्फोट घडवून आणून सारी वैज्ञानिक केंद्रे उध्वस्त करुन पुन्हा नव्याने सुरुवात करायची आणी सर्व सत्ताकेंद्रे वैज्ञानिकांच्या हाती आणायची असा साधारण कादंबरीचा विषय आहे. कादंबरीस साहित्य अकादमी चा पुरस्कार प्राप्त झाला आहे. गणेशोत्सवाच्या अगोदर हे पुस्तक आणले होते, त्यानंतर १० दिवस धावपळीत गेले आणि पुस्तकास हात लावायसास जमले नाही. ५३२ पानांची कादंबरी मी जेमतेम ७०-७५ पानांपर्यंत वाचून हार मानली. कदाचित माझ्या चित्तवृत्ती थार्‍यावर नसतील. पुस्तकाची समीक्षा करणे उचित होणार नाही. उद्या ही कादंबरी बदलून आणायचे ठरवले आहे. कोणी ही कादंबरी वाचली आहे काय ? असेल तर आपले अभिप्राय लिहा…
  • Log in or register to post comments

सेपिअन्स

हेमंतकुमार
Tue, 09/24/2019 - 18:25 नवीन
पुस्तकाचे नाव : सेपिअन्स मुळ लेखक : युव्हाल हरारी मराठी अनुवाद : वासंती फडके पाने ४४५ प्र. : डायमंड पब्लिकेशन्स किंमत : रु ५००. हे पुस्तक मानवजातीचा अनोखा इतिहास वर्णन करते. इतिहासात डॉक्टरेट केलेल्या या लेखकाचे हे अभ्यासपूर्ण पुस्तक. या विषयावरील एकूण ३ खंड प्रकाशित झालेले आहेत. त्यातला हा पहिला. संशोधनात्मक पुस्तक असल्याने दिवसाला ६ पाने या गतीनेच वाचणार आहे. एकदम जास्त झेपत नाही !
  • Log in or register to post comments

कोल्ड स्टील

धर्मराजमुटके
गुरुवार, 09/26/2019 - 14:57 नवीन
२००६ ची जगभरातील वर्तमानपत्रे पाहता त्यात भारतीय वंशाचे आणि ब्रिटनमधे स्थायिक असलेल्या लक्ष्मी मित्तल यांची मित्तल स्टील आणी लक्सेम्बर्ग या छोट्याश्या देशातील आर्सेलर ही बलाढ्य पोलाद कंपनी यांच्या विलीनीकरणाच्या सुरस कथा आपल्यापैकी बर्‍याच जणांनी वाचल्या असतील. आर्सेलर वर ताबा मिळविण्यासाठी तब्बल सहा देश, खुद्द आर्सेलर, आपल्या क्षेत्रातील इतर प्रतिस्पर्धी यांच्याशी लढून यश पदरात पाडून घेणार्‍या मित्तल यांची ही अद्वितीय कहाणी आहे. पुस्तक उत्कंठावर्धक आहे. पुस्तकाचे नाव : कोल्ड स्टील मुळ लेखक : बायरॉन उसी मराठी अनुवाद : सुभाष जोशी प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस किंमत : रुपये ३००.०० (मी वाचलेल्या आवृत्तीची किंमत)
  • Log in or register to post comments

श्री कृष्ण अक्षरी

धर्मराजमुटके
गुरुवार, 04/02/2020 - 12:58 नवीन
श्री कृष्ण अक्षरी - वर्णमालेतील अक्षरे अ ते ज्ञ पर्यंत क्रमाने घेऊन त्यातून दोहे लिहायचे ही आणी त्यातून वर्णन केलेली कृष्णलिला मोठी सरस आहे. हा दुवा :
  • Log in or register to post comments

लॉकडाऊन काळात पु. ल.

तेजस आठवले
गुरुवार, 04/02/2020 - 16:56 नवीन
लॉकडाऊन काळात पु. ल. देशपान्डे लिखित "गोळाबेरीज" हे पुस्तक वाचून झाले. ठीकठाक आहे. आता 'माझा साक्षात्कारी ह्रुदयरोग' वाचणे चालू आहे.
  • Log in or register to post comments

व्वा!

जेम्स वांड
Mon, 04/13/2020 - 12:54 नवीन
माझा साक्षात्कारी हृदयरोग वाचताना डॉ.नितु मांडकेंचे बीजे मेडिकलमधील कॉलेजजीवन वाचू लागलो की हमखास हल्लीच सुप्रसिद्ध झालेल्या कबीर सिंग किंवा अर्जुन रेड्डीमधील नायक आठवतात एकदम, विलक्षण टॅलेंटेड, विलक्षण तिरसट, विलक्षण तापट पण सर्जरीमध्ये बाप माणूस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले

लोकसत्तामधील हा वाचनीय लेख

धर्मराजमुटके
Sat, 04/04/2020 - 20:02 नवीन
लोकसत्तामधील हा वाचनीय लेख
  • Log in or register to post comments

लोकसत्तामधील हा वाचनीय लेख

धर्मराजमुटके
Sat, 04/04/2020 - 20:03 नवीन
लोकसत्तामधील हा वाचनीय लेख
  • Log in or register to post comments

यांचे सगळ्यांशीच का भांडण?

चौकस२१२
Sat, 04/11/2020 - 18:38 नवीन
"आपला स्वतःचा समाज कसा सुधारता आहोत हे दृश्य स्वरूपामध्ये दाखवण्याची जबाबदारी लिबरल मुस्लिमांनी उचलावी. यातून हिंदूंचे हळूहळू मन परिवर्तन होणे शक्य आहे. आधी आत्मपरीक्षण करून आपल्या चुका स्वीकाराव्यात आणि नंतर त्याप्रमाणे सुधारणा कराव्यात. " इथपर्यंत ठीक हा घरचा आहेर पण लगेच पुढील.. दोष परत हिंदूंवरच " मात्र सध्या समाजामध्ये एकूणच वाढत असलेल्या मुस्लिम समाजाबाबतच्या विद्वेषामुळे समाजाला आत्मपरीक्षण करणे मुश्कील होऊन बसले आहे" आज जगभरात बघा का ईसमोफोबिया वाढलं आहे ते? केवळ भारतात नव्हे, यांचे सगळ्यांशीच का भांडण? बुद्ध, शीख , ख्रिस्ती धर्माशी तर शतकानुशतके ..आणि जु न याबरोबर तर काय ... याचा पण विचार हे शेख करतील का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

नामदेवराव जाधव यांचे 'गनिमी

सूक्ष्मजीव
Sat, 04/11/2020 - 17:29 नवीन
नामदेवराव जाधव यांचे 'गनिमी कावा' हे पुस्तक आताच संपवले. राम गुहा यांचे 'मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया चालू आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा