मगं ! आज काय वाचताय ?
लेखनप्रकार
नमस्कार,
आज काय वाचताय ? हा प्रश्न जरी इतरांना उद्देशून असला तरी तो तितकाच स्वतःला देखील आहे.
तर मग ! आज काय वाचलं ?
पुस्तकाचे नाव : द लास्ट माईल
मुळ लेखक : डेव्हिड बॅल्डासी
मराठी अनुवाद : सायली गोडसे
प्रकाशक : श्रीराम बुक एजन्सी पुणे
किंमत : मी वाचत असलेल्या प्रथम आवृत्तीची किंमत रु. ४५०.०० फक्त
----------------
द लास्ट माईल्स ही एका उदयोन्मुख फुटबॉलपटूची जीवन कहाणी आहे. मेलविन रॉय मार्स वयाच्या विसाव्या वर्षाच्या आतच अमेरिकेतील एक प्रसिद्ध फुटबॉलपटू बनतो. मात्र त्याच्या व्यावसायिक कारकिर्दिच्या सुरुवातीलाच त्याला आपल्या आई-वडीलांच्या हत्येप्रकरणी देहांताची शिक्षा होते. वीस वर्षे तुरुंगात घालविल्यावर जेव्हा त्याच्या देहांताची शिक्षा अंमलात आणण्याची वेळ येऊन ठेपते, त्याच्या काही सेकंद अगोदर कोणीतरी दुसराच ते खुन आपण केल्याची कबुली देतो आणि मेलविनची मृत्युच्या दारातून सुटका होते. मात्र टेक्सास राज्य आपल्याला तुरुंगाबाहेर जाऊ देणार नाही, काही ना काही कारण शोधून आपल्याला परत अटक करतील ह्या भितीच्या छायेखाली तो सतत जगत असतो. त्याच्या सुटकेची बातमी जेव्हा रेडीओवर ऐकवली जात असते तेव्हा ती नेमकी स्पेशल एजंट अॅमास डेकर याच्या कानावर पडते. तो या प्रकरणातील सत्य शोधण्याच्या कामी लागतो आणि तेथून पुढे ही कादंबरी वेगवेगळी वळणे घेत शेवटाला पोहोचते.
मेलविन निरपराध असतो काय ? जर तो निरपराध असेल तर त्याला यात कोणी गोवले ? अगदी शेवटच्या क्षणी मेलविनने केलेल्या खुनाची जबाबदारी दुसराच कोणीतरी घेतो पण तोही खरा गुन्हेगार नसतो. मेलविनच्या आईवडीलांचा भुतकाळ रहस्यमय असतो, तो कशामुळे ? शेवटी अशा काही गोष्टी उजेडात येतात ज्याची मेलविन आणि तपास अधिकारी डेकर ने कल्पना देखील केलेली नसते.
हे सगळे र हस्य जाणून घेण्यासाठी कादंबरी एक वेळा वाचण्याची शिफारस करतो.
धन्यवाद !
वाचने
49087
वाचनखूण
प्रतिक्रिया
135
In reply to मग तीच कादंबरी असणार. भा.रां by प्रचेतस
हम्म, शक्यता आहे
In reply to डॉ. नो by धर्मराजमुटके
माझ्या दृष्टीने. ...
In reply to डॉ. नो by धर्मराजमुटके
माझ्या दृष्टीने. ...
In reply to माझ्या दृष्टीने. ... by मुक्त विहारि
पसंद अपनी अपनी. ....
In reply to माझ्या दृष्टीने. ... by मुक्त विहारि
:)
मी
सध्या...
In reply to सध्या... by समीरसूर
विश्वस्त खूपच रटाळ वाटले.
मंद्र
In reply to मंद्र by धर्मराजमुटके
मलाही खूप आवडली होती ही
एक वेगळं पुस्तक सुचवू का?
हे नुकतंच वाचून संपवलं.
द व्हाईट टायगर
In reply to द व्हाईट टायगर by धर्मराजमुटके
या पुस्तकाला पुरस्कार मिळाला...
मारियो पुझोचं 'द गॉडफादर' परत
In reply to मारियो पुझोचं 'द गॉडफादर' परत by प्रचेतस
Marathi ki इंग्रजी ?
In reply to Marathi ki इंग्रजी ? by जॉनविक्क
मराठी अनुवाद
In reply to मराठी अनुवाद by प्रचेतस
'द गॉडफादर रिटर्न्स'
In reply to मराठी अनुवाद by प्रचेतस
मस्तच.
सध्या...
शोध
In reply to शोध by धर्मराजमुटके
परिचया बद्दल आभार!
In reply to परिचया बद्दल आभार! by mayu4u
मोफत उपलब्ध असेल तर दुवा
In reply to मोफत उपलब्ध असेल तर दुवा by सतिश गावडे
टेलिग्राम वर...
In reply to शोध by धर्मराजमुटके
मस्त पुस्तक
In reply to शोध by धर्मराजमुटके
लेखकाने दिलेल्या क्रेडीट्स
रिचर्ड डॉकिन्स लिखीत द गॉड डील्युजन
In reply to रिचर्ड डॉकिन्स लिखीत द गॉड डील्युजन by जॉनविक्क
माझ्याकडे इंग्रजी प्रत आहे.
In reply to माझ्याकडे इंग्रजी प्रत आहे. by सतिश गावडे
₹ 499/- फक्त.(विदाउट डिस्काउंट)
In reply to ₹ 499/- फक्त.(विदाउट डिस्काउंट) by जॉनविक्क
होय होय आवड आहे. अशीच जवळपास
In reply to होय होय आवड आहे. अशीच जवळपास by सतिश गावडे
बापरे बाप सोळाशे म्हणजे एक सहा शून्य शुन्य ?
In reply to बापरे बाप सोळाशे म्हणजे एक सहा शून्य शुन्य ? by जॉनविक्क
त्यातील टॉप 61-62 पुस्तके
In reply to त्यातील टॉप 61-62 पुस्तके by सतिश गावडे
हेतू कुत्सित नाही
In reply to रिचर्ड डॉकिन्स लिखीत द गॉड डील्युजन by जॉनविक्क
मूळ इंग्रजि...
गुलाम
शोधितो मार्ग स्वप्नाचा
सेपिअन्स
कोल्ड स्टील
श्री कृष्ण अक्षरी
लॉकडाऊन काळात पु. ल.
In reply to लॉकडाऊन काळात पु. ल. by तेजस आठवले
व्वा!
लोकसत्तामधील हा वाचनीय लेख
लोकसत्तामधील हा वाचनीय लेख
In reply to लोकसत्तामधील हा वाचनीय लेख by धर्मराजमुटके
यांचे सगळ्यांशीच का भांडण?
नामदेवराव जाधव यांचे 'गनिमी