कुत्रत्वाचं नातं
लेखनप्रकार (Writing Type)
काही समस्या या धाग्यावर माझ्या एका प्रतिसादाला एक संतापयुक्त प्रतिक्रिया व्यक्त केली गेली आहे.
प्रतिसाद लिहिणाऱ्यांचा (श्री. बाप्पू) राग मला समजू शकतो आणि त्यांचं मत चुकीचं आहे असंही मी म्हणणार नाही. तसंच आपल्या प्रतिक्रियेबद्दल माझ्या मनात थोडाही राग नाही कारण आपली प्रतिक्रिया प्रामाणिक आहे हे दिसून येतंय.
परंतु त्यावरून एक गोष्ट जाणवली की कुत्र्यांबाबत, विशेषतः भटक्या कुत्र्यांबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत आणि त्या गैरसमजांमुळे भटके कुत्रे आणि माणूस यांच्या सह-अस्तित्वात संघर्षांचं प्रमाण वाढू लागलं आहे.
माझ्या भटक्या कुत्र्यांसोबतच्या अनुभवावरून काही गोष्टी इथे सांगत आहे.
१. कुत्रे हिंस्र होतात या गोष्टीला बरेचदा माणसं (किंवा कधीकधी परिस्थिती) जबाबदार असतात.
त्यांच्या क्रोधाने गाड्यांच्या मागून भुंकत येण्यामागे त्यांची काही दुःखद आठवणही असू शकते. माझ्या डोळ्यासमोर एका कुत्रीची दोन पिल्लं एका स्कुटर चालकाने उडवली होती. स्कुटर चालक न थांबता निघून गेला. ती कुत्री तिच्या मृत पिल्लांना चाटत तिथेच पूर्ण दिवस बसून राहिली. त्यानंतर बरेच महिने गल्लीतील सगळे कुत्रे तशी दिसणारी स्कुटर आली की तिच्यावर भुंकत तिचा पाठलाग करत असत.
त्यामुळे गाडीच्या पाठी लागलेल्या कुत्र्यांकडे, किंवा चिडून भुंकत असलेल्या कुत्र्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करणंच योग्य. ते थोडावेळ धावून/भुंकून थांबतील.
तुम्ही तिथे रेंगाळत राहू नका किंवा पायी चालत असलात तर घाबरून जाऊन तुमच्या चालण्याचा वेगही वाढवू नका.
२. भटके कुत्रे instinctive असतात. ती त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. त्यांच्याकडे मानवी शिक्षणातून मिळालेली नैतिक बुद्धी नसते. त्यामुळे साधारण तश्याच दिसणाऱ्या वाहनांच्या पाठी धावून आपला राग व्यक्त करणं ही त्यांची सहजप्रवृत्ती असते.
३. भटके कुत्रे हे pattern analysis मध्ये, माणसांच्या चेहऱ्यांंवर किंवा हालचालींंतून दिसून येणाऱ्या भावभावना टिपण्यामध्ये उपजतच वाकबगार असतात.
तुम्ही एक प्रयोग करून पहा. शांत बसलेल्या कुत्र्याच्या बाजूने चालत जाताना एकदम दचकल्यासारखं करा आणि चालण्याचा वेग एकदम कमी (किंवा जास्त) करा. तो शांत बसलेला कुत्रा तुमच्याकडे संशयाने बघायला लागेल. आणि हे असं तुम्ही लागोपाठ दोनतीनदा केलंत तर तो तुमच्यावर भुंकायला लागेल.
३. चिडलेल्या भटक्या कुत्र्याला शांत कसं कराल? कुत्र्याचं वागणं हे बरंचसं चिडून रडारड करणाऱ्या लहान मुलासारखं असतं. जर शक्य असेल तर त्याच्याशी प्रेमाने संभाषण करत परंतु त्याच्या थोडंसुद्धा जवळ न जाता त्याच्यासाठी एका भांड्यात दूध आणि थोडी बिस्किटं ठेवा आणि त्याच्याशी संभाषण सुरू ठेवतच तिथून सरळ निघून जा.
दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच्यासाठी खाऊ घेऊन जा. असं दोन तीनदा केल्यावर तो तुमच्यावर चिडचिड करणारा कुत्राच तुमच्याशी खूप प्रेमाने वागायला लागेल, रात्री अपरात्री तुम्हाला रस्याने जाताना स्वतःहून सोबत देईल.
४. काही कुत्रे दादागिरी करतात. इतर कुत्र्यांवर अन्याय करत त्यांच्या वाट्याचं अन्न स्वतःच संपवताना दिसतात. यामागे दोन कारणं दिसून येतात. एक , त्यांची स्वतःची भूक प्रचंड असते आणि दादागिरी करणं हा त्यांचा स्वभाव असतो.
अगदी तुमच्या कडून लाड करून घेताना / खाऊ मिळवतानासुद्धा ते हक्काने मिळवतात. अश्या कुत्र्यांना वेळीच सौम्य शिक्षा करणं आणि त्यांना इतर कुत्र्यांवर अन्याय करण्यावाचून प्रवृत्त करणं हे सगळ्यात चांगलं.
परंतु आधीच उशीर झाला असेल तर नव्या सवयी लावणं शक्य होत नाही. अश्या वेळी त्यांना जाणवून द्यावं लागतं इथे खरा "दादा (किंवा खरी ताई)" कोण आहे ते.
धन्यवाद!
प्रतिक्रिया
+1
कुत्रामागे भुंकत यायला लागला
खरं म्हणजे. ....
प्रत्येकच प्राणी स्वार्थी
मेड माय डे
खरं म्हणजे. ....
...
भटके कुत्रे आणि माणूस यांच्या सह-अस्तित्वात संघर्षांचं प्रमाण वाढू लागलं आहे.+ 1लोकसंख्या वाढल्यामुळे माणसा
माणसा-माणसातील सहास्तित्वातील
सायनोफोबिया नावाचा प्रकार
भयातून राग व रागातून द्वेष
जर आपल्याला एकदा समजलं की
एकदा झोपडपट्टीत माझ्या
अनाकलनीय तर्क की वहावलेली श्वानप्रेम भावना ?
म्हणूनच म्हणतो अनाकलनीय तर्क
म्हणूनच म्हणतो अनाकलनीय तर्क की वहावलेली श्वानप्रेम भावनातुमचा उपरोक्त विषयाचा मागोवा घेणारा कुठला धागा येऊन गेला नाहीये काय ?कुत्रा शिकारी प्राणी आहे,
कुत्रत्वाचे नाते (?) नाण्याची दुसरी बाजू
कुत्रत्वाचे नाते (?) नाण्याची दुसरी बाजू
वैताग आहे नुसता...
श्वानप्रेमींनी भटक्या
आणि ह्या सगळ्यांत रस्त्यांवर
पैबुवा, आगे बढोच! बाप्पू काका
एखादा बिबट्या
१०० टक्के सहमत
आपल्या सर्व प्रतिसादांचा आणि
साशंकीत तर्कजाल
तुमचे प्रतिसाद वाचण्यापेक्षा
पुन्हा तेच.. पहिले पाढे
परिसरातील
सगळेच बदलले ...
एक मार्ग आहे
पण त्यांचे कौतुक करावे तेवढे
पण त्यांचे कौतुक करावे तेवढे
पण त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे . त्या नेहमी स्वतःकडे प्लास्टिक पिशवी ठेवायच्या आणि हातात ग्लोव्हज कुत्रा रस्त्यावर हागला तर स्वतः chya हातांनी प्लास्टिक chya पिशवीत जमा करायच्या .सद्या आपल्या सामाजिक भानाच्या व जबाबदारीच्या कल्पना इतक्या खालच्या पातळीवर गेल्या आहेत की, "सर्वसामान्य प्रतिचे सामाजिक कर्तव्य (उदा : आपल्या कुत्र्याने सार्वजनिक ठिकाणी केलेली घाण साफ करणे आपली स्वतःचीच जबाबदारी आहे हे मानणे)" केले तरी त्याचे कौतुक करण्याच्या मनःस्थितीत आपण गेलेलो आहोत. हे इतर बाबतीतही सहजपणे दिसते... उदा : नोकरीला रोज वेळेवर येणार्या कर्मचार्याचा सत्कार केला जातो. त्यावेळेस, हे सहज विसरले जाते की... (अ) नोकरीत वेळेवर येणे ही कर्मचार्याची शून्य स्तराची जबाबदारी असते आणि (आ) नोकरीच्या मुलाखतीत सर्व कर्मचार्यांनी ती जबाबदारी इमाने इतबारे पाळण्याचे उघड अथवा गृहीत वचन दिलेले असते. म्हणजे, नोकरीची वेळ न पाळणे ही सर्वमान्य/सामान्य गोष्ट झाली आणि वेळ पाळली तर उत्तम कार्यक्षमता दाखवली असे होते, नाही का?!भटकी कुत्री आणि भटकी माणसं काय फरक आहे
पण कुत्र्यांची येते ना बऱ्याच
मला कुत्री आवडत असून आणि
कुत्री soda
बेवारस कुत्रा आणि बेवारस माणूस फरक स्पष्ट होणार नाही
चांगलं काम करत आहात ...
अहो एकच सांगतो
एकाच विषयावर प्रो आणि अँटी असे धागे
भटके कुत्री
अनुभव
खुनी हल्ला झाला तर
श्वानप्रेमीचा त्याच्या १८ पाळीव कुत्र्यांनीच पाडला फडशा
डॉ समीर कुलकर्णी यांची गोष्ट
तसेच डॉ अभय बंग यांचा अनुभव
कथा छान आहे, पण लेखकाला
१.
आपली खिलाडूवृत्ती आवडली इरामयी!
Pagination