Skip to main content

मोबाईलची शेजआरती

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 23/12/2018 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
*मोबाईलची शेजआरती* उत्तररात्र रात्र झाली तुम्ही झोपावे आता थकलो मी दिसभराचा व्हावे आता त्राता || धृ|| दया दाखवा मज पामरासी केले मनोरंजन तुम्हासी दिला आनंद केला माझा नाश बॅटरी उतरवली दोन वेळा ||१|| घरी लपविले आई बापापासून मला ऑफीसात केले कामाच्यावेळी खेळ असा टाईमपास किती करावा? ||२|| असतात महत्वाची कामे घरी हापीसात न वापरावे कधी कितीही व्हाटसअप जरी आता मिळे फ्री डेटा ||३|| वर्षभरातच मज वापरून टाकूनी देसी नवे मॉडेल मोबाईलचे घेवूनी येसी जरी मी असे चांगला ||४|| काही मर्यादा सेल्फी फोटो किती काढावे? काढले ते काढले, का फेसबुकी अपलोडावे? व्यर्थ व्यापार हा फुकाचा ||५|| आवरा आता बास करा जास्त वापर मोबाईलसाठी नाही आपण बोले पाषाण अती तेथे माती हे जाणा ||६|| - पाषाणभेद २३/१२/२०१८

वाचने 1604
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया