नाना आणि तनुश्री

Primary tabs

फुकनी's picture
फुकनी in काथ्याकूट
8 Oct 2018 - 1:37 am
गाभा: 

आत्ता सध्या तनुश्री दत्ता चे जे काही गरळ ओकणे चालू आहे त्या विषयी तू नळी वरती बऱ्याच काही चर्चा पाहण्यात आल्या. मला स्वतः ला नाना असे काही करेल असे वाटत नाहीं . तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला आवडेल.

https://www.youtube.com/watch?v=EDx1KywLLrQ&t=1969s

प्रतिक्रिया

जयन्त बा शिम्पि's picture

8 Oct 2018 - 7:22 am | जयन्त बा शिम्पि

येथे अमेरिकेत गेल्या महिन्यापासून सुरु असलेले, प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रंम्प पुरस्क्रुत न्यायाधिश पदाचे उमेदवार , त्यांचेवर झालेले ३५ वर्षापूर्वीचे लैंगिक शोषणाचे आरोप, प्रत्यारोप,, टीव्ही व वर्तमानपत्राचे खुलासे-प्रतिखुलासे, हे सर्व तनुश्री ने जवळून पाहिले असण्याची शक्यता वाटते. नाहीतरी आपण भारतीय पाश्चात्यांचे , विशेषतः ,अमेरिकन लोकांचे , अनुकरण करण्यात बरीच धन्यता मानतो. त्यामुळे सध्या जो " नाना-तनुश्री " वाद-विवाद सुरु आहे, तो म्हणजे येथे अमेरिकेत अनुभवत असलेल्या वादाचा ' देशी-अवतार' च वाटतो.

जयन्त बा शिम्पि's picture

8 Oct 2018 - 7:32 am | जयन्त बा शिम्पि

' त्या ' सिनेमाचे दिग्दर्शक यांची मुलाखत सुद्धा ऐकली. सेटवर कलाकार,तंत्रज्ञ,कॅमेरामन,स्पॉट बॉय,व इतर किमान शंभर लोक असतांना, नाना पाटेकरांकडून असे काही घडले असण्याची शक्यता वाटत नाही. आणि मुख्य मुद्दा हा की हे सर्व दहा वर्षापुर्वीचे, आत्ताच नेमके कसे आठवले ? त्याचवेळी बोंबाबोंब करण्यास कोणी रोखले होते काय ?

अनुप ढेरे's picture

8 Oct 2018 - 12:01 pm | अनुप ढेरे

मुख्य मुद्दा हा की हे सर्व दहा वर्षापुर्वीचे, आत्ताच नेमके कसे आठवले ? त्याचवेळी बोंबाबोंब करण्यास कोणी रोखले होते काय ?

आत्ताच आठवले आहे हे तद्दन खोटं आहे. हे असलं खोटं कसं बोलवतं तुम्हाला? तीने अनेक वर्षापूर्वीदेखील याबद्द्ल सांगितलेलं आहे.

In 2008, Tanushree accused Nana Patekar of sexually harassing her on the sets of the movie Horn 'Ok' Pleassss. In March 2008, she filed a complaint with 'CINTAA'(Cine & TV Artists Association) but no action was taken then. This allegation was repeated in 2013 in an interview[6] and then again in 2018.

आणि समजा आधी नाही, केवळ आत्ताच तिने हे सांगितलं तरी ते चूक कस काय. एखाद्या क्षेत्रातल्या प्रस्थापित माणसाविरुद्ध तक्रार करण्याचं करेज लगेच येईलच असं नाही. ही भीती चेपल्यावर तक्रार केली तर काय प्रॉब्लेम आहे?

तीच गोष्ट इतर लोकांबद्दल. प्रत्येकाला आपपल्या करीयरची काळजी असते. सो तंत्रज्ञ वगैरे लोकांनी असल्या घटना घडताना पाहुन याबद्दल तक्रार न करणं नक्की पॉसिबल आहे. (अयोग्य आहे गप्प रहाणं, पण शक्य आहे.)

माहितगार's picture

8 Oct 2018 - 9:47 am | माहितगार

मिडिया किंवा सोशल मिडिया ट्रायलची नव्हे तर वकिली उलट तपासणीस समोर जाव्या लागणार्‍या खर्‍या न्यायालयीन ट्रायलची गरज असावी. खरे म्हणजे खर्‍या न्यायालयीन ट्रायलच्या दृष्टीने दहा वर्षांचा काळ मध्ये जाणे सयुक्तिक नसावे पण न्यायासना समोर न जाता मिडिया ट्रायल करण्या पेक्षा न्यायासनासमोर सोक्ष मोक्ष करणे अधिक उत्तम.

पण त्याही आधी २००८ मध्येच मिडिया समोर जाण्या आधी, तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकरांचा आपापसात संवाद साधून समज गैरसमजांबाबत चर्चेच्या एक राउंड होऊन जावयास हवा होता, आणि त्यानंतर तरीही गरज वाटली तर न्यायालयीन केसचा मार्ग तनुश्री दत्तांसाठी मोकळा होता.

स्वतःच्या फायद्या साठी काही जणी पुरुषांना मोहात पाडण्याचा प्रयत्न करतात , आणि समस्त स्त्री वर्ग बदनाम होतो .
नांना च्या केस मध्ये ती तनुश्री तब्बल 7 वर्ष गप्प बसली , तीन वर्षांपूर्वी सर्वात प्रथम तीने आवाज उठवला , पण नानांचे प्रस्थ मोठं असल्यामुळे ज्यास्त चर्चा झाली नाही .
काल परवा तिने ट्विट करून पुन्हा एकदा मीडियाला साकडे घातले .
पेज 3 मध्ये अशी ही वदंता आहे की तनुश्री बिगबॉस मध्ये भाग घेण्याअगोदर स्वतःचे ब्रँडिंग करत आहे .
काल विकास बहल , चेतन भगत वर सुद्धा असेच आरोप झाले .
जर आपले नाना निर्दोष आहेत तर त्या न्यायाने बहल , भगत आणि ब्रिगेड चे न्यायाधीश कोळसे पाटील सुद्धा निर्दोष आहेत असं म्हणावे लागेल .
कला , क्रीडा , राजकारण आणि व्यवसाय यातील कुठल्याही क्षेत्रात सर्वोच्च स्थानी मार्गक्रमण करताना आजूबाजूला मदनिकांचा वावर असतोच . त्याकडे आकर्षीत न होता पुढे जाणारा पुरुष शोधणे खूप अवघड आहे . देव आणि ऋषींना तो मोह सोडता आला नाही तिथे नाना काय करणार ? .

पिलीयन रायडर's picture

8 Oct 2018 - 3:00 pm | पिलीयन रायडर

अच्छा म्हणजे हे सगळे सत्पुरुष आहेत हे नक्की आणि आजूबाजूला ह्या विश्वामित्रांच्या तपस्या मोडायला मेनका फिरत आहेत हे ही फिक्स.

सेक्शयुल हरासमेंट होत नसतेच हे एकदाचं डिक्लेअर का नाही करून टाकत?

खरं तर कायदा नावाची गोष्ट आहे. आणि सरसकट काही घडत नसतं असं मान्य करून एकेक केसचा स्वतंत्र तपास केला पाहिजे. त्यातून सत्य काय ते कळेलच. पण तेवढा वेळ कुणाला आहे ना..

यशोधरा's picture

8 Oct 2018 - 9:25 pm | यशोधरा

काय सांगता? खरंच की काय?

आपला भाग कर आणि गप्प बस. पण उत्तेजनाच्या नावाखाली इकडे तिकडे हात साफ करून घ्यायचा. बाकी नानाने मनीषा कोईराला पासून , अर्थात तिच्या इछेनेच , कुठे कुठे हात साफ केले आहेत ते लोकांना माहित आहेच. उगाच धुतल्या तांदुळा सारखे आहोत सांगण्यात काही अर्थ नाही. बाकी केवळ नाना मराठी मधला मोठ्ठा नट , बॉलीवूड गाजवलेला , समाजसेवक पण ( नाम फौंडेशन )

केवळ याच कारणा करता त्याला पाठिंबा देणाऱ्या माणसांची किंवा येते. अरे उद्या तुझ्या बायको / बहिणी वर असाच एखाद्या नामवंत नट किंवा समाज सेवकाने हात टाकला तर त्याचे इतर मोठे / सुंदर काम बघून , त्याला माफ करणार का ?

https://www.indiatoday.in/movies/celebrities/story/tanushree-dutta-misju...

Tanushree Dutta misjudged Nana Patekar's encouragement, says director Rakesh Sarang

अभिजित - १'s picture

8 Oct 2018 - 4:40 pm | अभिजित - १

https://www.indiatoday.in/movies/celebrities/story/tanushree-had-filed-f...

Tanushree Dutta had filed an FIR in 2008.
Tanushree-Nana row: FIR filed in 2008 does not mention Patekar or molestation
FIR मध्ये नाव नाही म्हणून नाना स्वच्छ करून उगाच बोंब मारू नका. मुळात FIR दाखल करून घेतली हेच तनुश्रीचे मोठे नशीब.

वर आलेल्या प्रतिक्रिया नां अनुसरून आणि काही माझे वयक्तिक मत दिले होते हो !!!
सेक्सयूएल हरेसमेंट होत असेल तर त्या स्त्री ने लवकरात लवकर आवाज उठवावा ही किमान अपेक्षा आहे .
अमेरिका पासून भारतातील बऱ्याचशा घटना या 10 ते 40 वर्षा पृवीच्या सुद्धा निघाल्या . ज्या अमेरिकेत स्वैराचार अभिमानाने केला जातो तेथे सुद्धा काल सर्वोच्च न्यायाधीश पदी नियुक्त झालेल्या व्यक्तीस कॉलेज काळातील एका मैत्रिण ने लैगिंक अत्याचाराची केस ठोकली .
पेज 3 च्या केसेस मध्ये सुद्धा संशयाला जागा खूप आहे पण कायदा हा ज्यास्त करून महिलांच्या हितासाठी केल्या मूळे चार चार वर्षे एकत्र राहून महिला पुरुषांवर बलात्काराची केस ठोकतात .
'दोन वर्षांपूर्वी गाडीवर बसवून देवदर्शनाला घेऊन जाऊया म्हणून ओळख वाढवली , गेल्या दोन वर्षात वेगवेगळ्या लॉज वर नेले आणि आता लग्नाला नाही म्हणतोय म्हणून बलात्काराची केस लावली ' अशा तथाकथित बलात्कार घडलेल्या पोलीस केस च्या बातम्या दर दोन दिवसांनी पेपर मध्ये येत असतात .
या महिलांना अबला म्हणायचे का ? त्या अनुषंगाने मी ' काही जणी ' हा शब्द वापरला होता .
तनुश्री ने सुद्धा इतक्या दिवस गप्प बसण्याचे कारण काय ? गेली 10 वर्ष स्ट्रगल करून सुद्धा बॉलीवूड च्या फोकस मध्ये न येता आल्यामुळे प्रसिद्धिझोतात राहण्यासाठी किमान ' त्या ' घटनेला पुन्हा एकदा उकळी आणण्याचा ती प्रयत्न करीत असावी असं माझं स्पष्ट म्हणणे आहे .
कोळसे ,बहल,रजत कपूर, भगत , या सगळ्या घटना मध्ये सगळ्या महिला या पत्रकारिता क्षेत्रातील कशा ? हा एक माझ्या बालबुद्धी ला पडलेला प्रश्न !!!
नीरा राडीया ही महिला पत्रकार असून तिची उठबस मंत्री, अधिकारी वर्गात होती . त्या वेळेस तिने केलेली 2 g घोटाळ्यातील स्वच्छ पत्रकारिता सर्वांच्या लक्षात असेलच . तरी बरं आहे त्या वेळचे फक्त आर्थिक घोटाळे बाहेर पडले आहेत आणि नीरा ने # me too वर स्वतःबद्दल काही लिहले नाही , नाहीतर राजकारणातील अजून एक ओंगळ स्वरूप समस्त भारतीय जनतेला दिसले असते .

ट्रम्प भाऊ .. नाव सार्थ केलंत . तुमचे आणि ओरिजिनल ट्रम्प चे विचार एकदम जुळतात !!

". अरे उद्या तुझ्या बायको / बहिणी वर असाच एखाद्या नामवंत नट किंवा समाज सेवकाने हात टाकला तर त्याचे इतर मोठे / सुंदर काम बघून , त्याला माफ करणार का ? "

अशी जळजळीत प्रतिक्रिया देण्यास काही घरगूती कारण आहे का ?
असे मी तुम्हाला तेंव्हाच विचारले का ? नाही विचारले .
कारण वैयक्तिक हल्ले मला आवडत नाही !!!!!

प्रमोद देर्देकर's picture

9 Oct 2018 - 2:02 pm | प्रमोद देर्देकर

tramp भावू तरी नशीब त्यावेळी मोदी सरकार नव्हते ँनाहितर अभिजित यांनी काय काय केलं असतं विचार करा .

मार्मिक गोडसे's picture

8 Oct 2018 - 9:17 pm | मार्मिक गोडसे

तनुश्रीनं नानांवर आरोप केल्यानंतर अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली होती.

https://www.loksatta.com/manoranjan-news/tanushree-dutta-video-akshay-ku...

तनुश्री-नाना पाटेकर वादात विनाकारण नाव गोवलं गेल्यामुळे त्रस्त झालेल्या अक्षयनं सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. या वादात अक्षयनं कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही मात्र तरीही अक्षयचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अक्षय तनुश्री विरोधात बोलताना दिसत आहे. मात्र हा व्हिडिओ जुना असून तो एडिट करून त्यात अक्षयच्या तोंडी तनुश्रीचं नाव टाकण्यात आलं आहे.
या प्रकरणात अक्षयनं शनिवारी सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान हा व्हिडिओ आता युट्यूबवरून काढून टाकण्यात आला आहे. जुन्या पत्रकार परिषदेत अक्षयला एका आघाडीच्या अभिनेत्रीविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातील अक्षयच्या प्रतिक्रियेची एडिटींगद्वारे मोडतोड करून त्यांच्या तोंडी तनुश्रीचं नाव टाकण्यात आलं. मात्र अशी कोणतीही प्रतिक्रिया तनुश्रीच्या विरोधात आपण दिली नसल्याचं अक्षयचं म्हणणं आहे.
त्यामुळे आता सायबर सेल या व्हिडिओ मागे असलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहे. काही दिवसांपूर्वी तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तणुकीचा आरोप केला होता. तसेच अक्षय कुमार सारख्या ब़ड्या कलाकारांनी नाना पाटेकर यांच्यासारख्या कलाकारासोबत काम करणं पूर्णपणे थांबवलं पाहिजे तरच Metoo सारखी मोहिम भारतात यशस्वी होईल असं तनुश्री म्हणाली होती. तनुश्रीनं नानांवर आरोप केल्यानंतर अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली होती.

पिलीयन रायडर's picture

8 Oct 2018 - 6:18 pm | पिलीयन रायडर

ज्यांना बायका खोट्या केसेस टाकून पुरुषांना परेशान करणार असं वाटतंय त्यांनी हा व्हिडीओ नक्की बघा.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10156173013313999&id=578143998

कमिडियन्सचे शोज बघुन राजकिय्/सामाजिक मतं बनवणार्‍यांविषयी मला नेहेमीच आदर वाटलेला आहे. हल्लीच वाचलेलं कोबेअर शोच्या लेखिकेचं ट्विट याबाबतीत खुप बोलकं आहे. या बाई म्हणतात - वॉटेवर हॅपन्स, आयॅम जस्ट ग्लॅड वि रुइन्ड कॅवनॉज लाइफ...

गो फिगर...

पिलीयन रायडर's picture

11 Oct 2018 - 12:43 pm | पिलीयन रायडर

हे माझं राजकीय मत आहे असं म्हणता?! महान आहात!
सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्यांविषयी मलाही फार आदर वाटतो!

तो मनुष्य कॉमेडियन असला तरी म्हणून त्याचा मुद्दा चूक ठरत नाही. एवढे मोठे आरोप झालेल्या सुप्रीम कोर्टाच्या नॉमिनीला ट्रम्प पाठीशी घालतो आणि पुरुषाचं आता काही खरं नाही, कुणीही येऊन तुमचं आयुष्य बरबाद करू शकतं म्हणतो तेव्हा अजून काय वेगळी भूमिका घ्यायची असते? आणि आता आपली मतं एका कॉमेडियन सोबत जुळली तर काय मतं बदलून टाकायची की काय?

सत्ता हातात असणारे पुरुष त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या स्त्रियांचा गैरफायदा घेऊ शकतात हे लोकांना सहज मान्य होत नाहीये पण स्त्रिया मात्र ह्या लोकांची करिअर , आयुष्य उद्ध्वस्त करणार ह्यावर चटकन विश्वास बसतोय! कारण ते सोयीस्कर आहे!

तरी बरं ह्या जगात इन जनरल पुरुषांनी स्त्रियांवर केलेले अत्याचार काही कमी नाहीत. ढळढळीत डोळ्यांना दिसतात ही उदाहरणं. त्याचं प्रमाण सुद्धा प्रचंड आहे. पण तरीही जेव्हा स्त्रिया फायनली बोलत आहेत तर चर्चा कसली? आता पुरुषाचं काही खरं नाही ब्वा!

ह्या # चळवळींनी किती फरक पडणार, मीडिया ट्रायल्स उपयोगी की चळवळीला घातक हे वेगळे मुद्दे झाले. पण किमान चर्चा सुरू होतेय हे कमी आहे?

आणि हे सगळं एक कॉमेडियन मांडतो म्हणून अग्राह्य?? कमाल आहे! स्वतःला इतकं उच्च समजत नाही मी अजून.

पिलीयन रायडर's picture

11 Oct 2018 - 12:44 pm | पिलीयन रायडर

बादवे, झाला हं तो सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश. कुणाचं आयुष्य नक्की "रुईन" झालं?

गो फिगर...

>>स्वतःला इतकं उच्च समजत नाही मी अजून.

माझी वरची कामेंट हे एक जनरल स्टेटमेंट होतं; नोआ, कोबेअर, स्टुअर्ट इ. च्या अनुयायांकरता. तुम्हि स्वतःच्या अंगाला लाउन घेतलंत, वर हा खुलासा दिलात याबद्दल धन्यवाद.

आता कमिडियन्सच्या मुद्द्यांबाबत. मुद्दे सगळेच मांडतात, पण त्या मुद्द्यांमध्ये तथ्य किती, त्याची पार्श्वभूमी काय आहे याचा विचार करणे गरजेचं असते. कमिडियन्स साधारण त्यांच्या शोचा टिआरपी वाढावा याकरता नेहेमी लाइन क्रॉस करतात. एखाद्या घटनेचं सनसनाटी वर्णन करुन टाळ्या खेचणे, संबंधित व्यक्तिचं गुन्हेगारीकरण करणे हा त्यांचा व्यवसाय आहे.

एक उदाहरण देतो, बघा पटतं का - सेकंड अमेंडमेंट हा इथे कंझरवेटिव, लिबरल या दोघांचा अगदि जिव्हाळ्याचा विषय आहे. जेंव्हा जेंव्हा एखादा माथेफिरु सार्वजनिक ठिकाणी शूटिंग करतो, तेंव्हा तेंव्हा गन कंट्रोल हा हॉट टॉपिक हे विनोदवीर ऐरणीवर आणतात. त्यांच्या शोज मधुन गन कंट्रोल कायदे कडक करा, सेकंड अमेंडमेंड रद्द करा वगैरे लिबरल्सच्या कानांना गोड वाटतील अशी विधाने एपिसोड मागुन एपोसोड मध्ये करतात. बट गेस व्हॉट - अमेरिकेत बॅकग्राउंड चेक्सचे नियम कठोर आहेत, ते सगळे नियम जर अंमलात आणले तर गुन्हेगारांना, मानसिक रुग्णांना बंदुका विकल्याच जाणार नाहित. पण इथे इंडिविजुअल स्टेट्सचे कायदे आड येतात. फेडरल गवर्नमेंट जेंव्हा स्टेट गवर्नमेंटकडे ह्या गुन्हेगारांचा/मानसिक रुग्णांचा डेटा शेअर करायला सांगते तेंव्ह्या स्टेट गवर्नमेंट ते करत नाहि. गो फिगर! सँक्च्युअरी सिटीज कडुन फेलन्स्चा डेटा शेअर करायला सांगते तर तिथेहि तोच प्रकार. गो फिगर!!

सांगायचा मुद्दा हा कि, कमिडियन्स हे फॅक्ट्स सोयिस्कर रित्या टाळतात आणि फेडरल सरकारची खिल्ली उडवण्यातच धन्यता मानतात. म्हणुन शहाण्या माणसांनी कमिडियन्सचे मुद्दे आंधळेपणाने मान्य करु नये, हे सांगण्याचा तो एक प्रामाणिक प्रयत्न होता.

शेवटि, "लाइफ रुइन" झालं का या प्रश्नाबाबतीत. सिरियसली? कॅनवॉ निवडुन आले म्हणजे त्या आरोपांमुळे त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची अब्रु चव्हाट्यावर आलीच नाहि, त्यांना मानसिक त्रास झालाच नाहि असं तुमचं म्हणणं आहे का? तसं असेल तर, परत एकदा धन्यवाद...

राजाभाऊ यांचे प्रतिसाद आवडले.

पिलीयन रायडर's picture

12 Oct 2018 - 5:36 pm | पिलीयन रायडर

लाईफ रुईन होण्याची नक्की व्याख्या काय आहे तुमची?

आरोप खोटे सिद्ध झाले तर एकवेळ ते म्हणताही येईल की हकनाक बदनामी झाली, मनस्ताप झाला. किंवा आरोप खोटे असूनही जज बनता आलं नसतं तरीही आयुष्य बरबाद झालं असं म्हणता येईल. पण ज्याची सकृतदर्शनी काही "किंमत" मोजलेली नाही त्याला अगदी लाईफ रुईन झाले असं म्हणता येईल? आणि तसं असेल तर फोर्ड बाईंचं काय? त्यांना त्रास नाही का झाला? त्यांची अब्रू चव्हाट्यावर नाही का आली? त्यांच्या कुटुंबीयांना मनस्ताप नसेल झाला? समजा हे आरोप खरे असले तर तुम्ही त्यांना काय वाटत असेल ह्याची कल्पना करू शकताच. मग फक्त ब्रेट काकांचे आयुष्यच उध्वस्त झाले असे म्हणण्या मागचा उद्देश काय?

कोणीही कुणावरही असे आरोप करेल तेव्हा हे मानसिक त्रास वगैरे दोन्ही बाजूंना होत असतातच. पण जेव्हा सत्य समोर येईल तेव्हाच कुणी कुणाचं आयुष्य नक्की "रुईन" केलं हे कळेल ना? आधीच ह्याचा निवाडा कसा केला?

फोर्ड बैंचा ह्यात काडीचाही फायदा नव्हता. ना आर्थिक, ना मानसिक. कारण statute of limitations मुळे कारवाई तशीही होऊ शकत नाही. प्रसिद्धीसाठी हे करावं अशीही परिस्थिती नाही. इतकं करून तो मनुष्य जज होऊन बसला आहेच. ब्रेट काकांनी अशी आयुष्य बरबाद होण्याइतकी काय किंमत मोजली आहे ब्वा? चुकून पद हातून गेलं असतं तरी असं म्हणता आलं असतं एकवेळ की खरं खोटं माहिती नाही पण किंमत तर मोजली बुवा म्हणून.. इथे ते ही घडलं नाही.

बाकी माझा मुद्दा हा पुरुषांना व्हिकटीम ठरवणे आणि फोकस हलवणे हा आहे. त्यावर तुम्हाला काही बोलायचे असेल तर बोलू.. नोआ तुम्हाला निव्वळ टाकाऊ वाटत असेल, मला वाटत नाही. त्याचा जो व्हिडीओ मी शेअर केलाय त्यातला मुद्दा मला पटला, तुम्हाला त्या मुद्द्याविषयी बोलायचं असेल तर बोलू. पण बाकी कॉमेडियन बद्दलची मतं इथे बोलण्यात मला स्वारस्य नाही कारण TRP वगैरे मला कळत नाहीये हे तुमचं गृहीतक वैयक्तिक होतंय आणि चर्चेचा तो मुद्दाही नाहीये.

आणि हो, आमच्यात उपप्रतिसादाला अंगाला लावून घेतात. नसेल त्या माणसाला उद्देशून तर एक तर तसं लिहितात किंवा स्वतंत्र प्रतिसाद देतात. पळ मात्र काढत नाहीत. :)

>>फोर्ड बैंचा ह्यात काडीचाही फायदा नव्हता.

हे बाकि बरोबर. डॉ. फोर्डला डेम्स्नी वापरलं याचा तिला पत्ताच लागला नाहि. सगळा घटनाक्रम पाहिलात तर यात पद्धतशिरपणे, जाणुनबुजुन जज कॅनवॉ यांचा आणि अजाणतेपणि डॉ. फोर्ड यांचं कॅरेक्टर अ‍ॅसेसिनेशन करण्यात आलेलं आहे. हेतु काय तर जज कॅनवॉचं कांफरमेशन पुढे ढकल्ण्यात यावं, मिडटर्म इलेक्शन्स नंतर. यदाकदाचित सेनेटमध्ये मेजॉरिटी वाढली तर आपला माणुस त्या पदावर नेमता येइल, हि डेम्सची राजकिय खेळी. थोडक्यात त्या सर्कसमागे राजकारण होतं बाकि काहिहि नाहि. पण हे सगळं कमिडियन्स सांगत नाहित, महिलांचं अप्रेशन, बड्या व्यक्तिंची लफडी यावरंच तर त्यांचं दुकान चालत असतं. असो. क्लिपमधला नोआचा हुक (ट्रंप विल्डिंग विक्टिमहुड) अगदि कॅची आहे; बरेच मासे त्याने गळाला लावले असावेत... :)

>>बाकी माझा मुद्दा हा पुरुषांना व्हिकटीम ठरवणे आणि फोकस हलवणे हा आहे.

माझ्या मते या प्रकरणात डॉ. फोर्ड इतकंच जज कॅनवॉ यांचं हि विक्टमायझेशन झालेलं आहे. तुम्हाला पटत नसेल तर कॅनवॉ विरुद्ध मुद्दे मांडा, मी ते खोडायचा प्रयत्न करेन.

शेवटी, #मीटू मुवमेंट मधुन बाहेर येणारी मेल विक्टिम्सची टक्केवारी नेग्लिजीबल असु शकेल पण आहे यावर दूमत नसावं...

पिलीयन रायडर's picture

14 Oct 2018 - 6:56 pm | पिलीयन रायडर

मी कशाला विरोधी मुद्दे मांडू? इथे सत्य कुणालाच ठाऊक नाहीये. तुम्ही म्हणालात की त्याचं आयुष्य रुईन झालं, तर मी इतकंच पॉईंट आउट केलं की त्या लॉजिकने ते फोर्ड बाईंचं पण झालं. नक्की कुणाचं झालं हे बघायला ती केस लढली जकी पाहिजे जे होणार नाहीचे.

उरला मुद्दा पुरुष सर्व्हयव्हरचा. ते नाहीत असं कुठे म्हणलं मी? पण ट्रम्प म्हणतो तसं "दिस इज या व्हेरी स्केअरी टाईम फॉर अस" म्हणतो ते चूक आहे. सांख्यिकी दृष्टीने अशी बोंब ठोकावी असं काही नाहीये. सध्या तरी सत्तेतल्या जास्तीत जास्त जागा पुरुषांनी occupy केलेल्या आहेत. त्यामुळे abuse of power पुरुषांकडून होणार हे नक्की. मग नगण्य केसेस साठी चर्चेचा रोख बदलावा का? त्या असणार हे कुणी नाकारलं? पण पहिली आणि प्रमुख प्रतिक्रिया असावी अशी परिस्थिती अजूनही नाहीये.

पण अर्थात हे नोआने मांडलं आहे म्हणजे तुम्हाला पटण्याचा प्रश्नच नाहीये, हो ना!

असो.. मूलभूत मतभेदावर इतका काथ्याकूट कशाला. तुम्हाला नाही ना नोआ आवडत, सोडा की. तुम्हाला कदाचित ट्रम्पचं पटतही असेल. मग तर ह्या जन्मी आपलं एकमत होणार नाहीये!

आमेरीकेतील केस माहित नाही (खरेच ट्रॅक नाही) पण, ज्या प्रमाणे एकाही स्त्रीला खोट्या आरोपांना सामोरे जावे लागू नये तसे एकाही पुरुषाला खोट्या आरोपांना सामोरे जावे लागणे श्रेयस्कर नसावे किंवा कसे .

https://navbharattimes.indiatimes.com/metro/mumbai/crime/false-rape-case...

https://hindi.firstpost.com/india/false-rape-cases-is-the-feeling-of-bei... खोट्या केस सुध्दा केल्या जाऊ शकतात एव्हढच मला सांगायचे आहे .

सखाराम_गटण्या's picture

8 Oct 2018 - 7:40 pm | सखाराम_गटण्या

हे जे काही प्रकरण चालू आहे ह्यातील महिलेने हा प्रकार झाला त्यानंतर FIR दाखल केली होती का ? केली होती तर त्याचे पुढे काय झाले ? आता तिने परत त्या व्यक्ती विरुद्ध तक्रार केली आहे असे ऐकण्यात आले आहे जर हे खरे असेल तर बघूया पुढे काय होते ते. आणि ह्या इतर नट-नट्यांच्या वक्तव्याकडे लक्ष दयायची काहीही गरज नाही आहे ही काही मोजकी मंडळी ह्या असल्या गोष्टीचा वापर फक्त त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करतात.बाकी जे काही खरे असेल ते लवकरच उजेडात येईल.

सुबोध खरे's picture

8 Oct 2018 - 7:42 pm | सुबोध खरे

१) आपण मिठाई खावी
कारखाना पाहण्याच्या भानगडीत पडू नये
श्री व्यंकटेश माडगूळकर -१९५०

२) अपुऱ्या किंवा वादग्रस्त माहितीवर आणि अधिकार नसताना निवाडा करण्यास बसणे हे "कायद्याच्या दृष्टी"ने अयोग्य आहे.
(SITTING ON JUDGEMENT OF DISPUTED OR INSUFFICIENT FACTS IS BAD IN EYES OF LAW)

धर्मराजमुटके's picture

8 Oct 2018 - 8:19 pm | धर्मराजमुटके

१) आपण मिठाई खावी
कारखाना पाहण्याच्या भानगडीत पडू नये.

१००% सहमती

माहितगार's picture

8 Oct 2018 - 8:22 pm | माहितगार

२) अपुऱ्या किंवा वादग्रस्त माहितीवर आणि अधिकार नसताना निवाडा करण्यास बसणे हे "कायद्याच्या दृष्टी"ने अयोग्य आहे.
(SITTING ON JUDGEMENT OF DISPUTED OR INSUFFICIENT FACTS IS BAD IN EYES OF LAW)

सहमत

१) आपण मिठाई खावी
कारखाना पाहण्याच्या भानगडीत पडू नये
श्री व्यंकटेश माडगूळकर -१९५०

व्यंकटेश माडगूळकरांना __/\__ उपरोक्त वाक्याचे औचित्य केस टू केस अ‍ॅप्लिकेबल होण्याची शक्यता वाटते. आपल्याला या धागा चर्चेत या व्यंकटेश माडगुळक्ररांच्या औचित्य कसे जाणवले ते अद्याप उमगले नाही.

सुबोध खरे's picture

9 Oct 2018 - 10:07 am | सुबोध खरे

श्री व्यंकटेश माडगूळकर यांनी तमाशाच्या बाबतीत हे वाक्य लिहिलेले होते. त्यांच्या गावचा गणा महार तमाशात असतो त्याला ते तमाशाच्या बायकांच्या लफड्यांबद्दल विचारत असताना गणा त्यांना हे बोलुन दाखवतो.
त्याचा सरळ अर्थ असा आहे कि तुम्ही कलाकारांची कला पहा त्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करू नका.
एकंदर सिनेमा नाटक तमाशा( शो बिझनेस) मध्ये स्त्रीपुरुषांचे जवळीक, त्यांची नैतिकता आणि त्यांच्या साधनशुचितेची पातळी पहिली तर त्यांच्यात होणारे एकंदर संबंध यावर भाष्य न करणे हेच श्रेयस्कर ठरेल.
सध्या श्री महेश भट आणि श्री अनुप जलोटा यांच्या बद्दल माध्यमात ज्या बातम्या येत आहेत ते पाहून मी जे म्हणत आहे ते आपल्याला कदाचित पटेल.

माहितगार's picture

9 Oct 2018 - 12:23 pm | माहितगार

अंशतः मान्यय, ऋषीचे कुळ पाहू नये अशी म्हणही याच धर्ती वरची असावी. अर्थात कायद्याची उल्लंघने नसलेली प्रकरणे आणि कायद्यांचे उल्लंघन झालेली प्रकरणे यात फरक करावयास हवा. कायद्यांचे उल्लंघन टाळले जाण्याच्या दृष्टीने समाजाच्या नैतिक दबावाचे महत्व असू शकते अर्थात त्या सोबत आपण म्हणता तसे 'अपुऱ्या किंवा वादग्रस्त माहितीवर आणि अधिकार नसताना निवाडा करण्यास बसणे हे "कायद्याच्या दृष्टी"ने अयोग्य आहे.' हे लक्षात घेणे ही अगदी महत्वाचे असावे.

डॉक्टर , ५० वर्ष पूर्वीच्या काळातून बाहेर या.
नानाने मनीषा कोईराला ची मिठाई खाल्ली. तिची इच्छा. जनतेला काय प्रॉब्लेम ? पण तनुश्री ची इच्छा नसताना तसा प्रयत्न ? तो गुन्हा आहे हे नक्की. बाकी तनुश्री ने कोणाला मिठाई खिलवावी हा तिचा वैयिक्तक मामला आहे. ४ चॉकलेट हिरो ना खिलवली मग माझा पण मिठाई खायचा हक्कच आहे. हे चुकीचे आहे.

सुबोध खरे's picture

12 Oct 2018 - 8:00 pm | सुबोध खरे

डॉक्टर , ५० वर्ष पूर्वीच्या काळातून बाहेर या.

आपल्या घटनेचे मूलभूत तत्व "सत्यमेव जयते" हे उपनिषदातील आहे. म्हणजे इसवी सनापूर्वी ५०० ते ८००वर्षे आहे.

म्हणजे जो माणूस हे वाचन उद्धृत करतो तो इसवीसनाच्या पूर्वीच्या काळात असतो का?

उगाच स्कोअरसेटल करण्याचा असं प्रयत्न कशासाठी करताय?

मी प्रथितयश लेखकाचे वाक्य उद्धृत केले आहे. त्याचा लौकिकार्थाने किंवा व्यंगार्थाने मिठाईशी संबंध नाही.

नानाने मनीषा कोईरालाची मिठाई खाल्ली.याचा आपल्याकडे काही पुरावा आहे का? का इथेपण हवेतच गोळीबार?

मुळात अशी वाक्ये लिहिणे आपली मनोवृत्ती दाखवतो आहे हे लक्षात घ्या अशी आपल्याला नम्र विनंती आहे.

पहा जमतंय का? नाही तर सोडून द्या.

@ अभिजित - १, अर्थाचा अनर्थ करण्यासाठी आपले कौतुक करावे का ?

१) आपण मिठाई खावी
कारखाना पाहण्याच्या भानगडीत पडू नये
श्री व्यंकटेश माडगूळकर -१९५०

या वाक्याच्या औचित्या बद्दल मी सुद्धा डॉ. खरे यांना प्रश्न विचारला. त्यांनी त्यांच्या प्रतिसादातून, " ....तुम्ही कलाकारांची कला पहा त्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करू नका..... " असा अर्थ सांगितला. डॉ. खरे यांनी स्त्री कलाकारांना मिठाई म्हणून संबोधल्याचे दिसत नाही. उलट तशा अर्थावर आपण हकनाक पोहोचताना दिसत आहात. असे करणे इतर स्त्रीवादी तनुश्री समर्थकांना पटते का ? पटत नसेल तर इतर स्त्रीवादी तनुश्री समर्थक अभिजित -१ यांना त्यांची गल्लत कुठे होते आहे हे लक्षात आणून देऊ शकतील का ?

सुबोध खरे's picture

12 Oct 2018 - 8:32 pm | सुबोध खरे

मागा साहेब
याच वाक्याचा संदर्भ मला एका ज्ञानवृद्ध माणसाने भारतरत्न श्री भीमसेन जोशी यांच्याबद्दल बोलताना दिला होता.

त्यांनी दुसरे लग्न केले आणि पहिल्या कुटुंबाची आबाळ झाली त्याबद्दल त्यांच्या मुलाने( श्री राघवेंद्र) लिहिलेल्या पुस्तकाबद्दल बोलताना दिला होता.
त्यां
नी हेच म्हटले होते कि "त्यांनी दुसरे लग्न का आणि कोणत्या परिस्थितीत केले याच्याशी आपल्याला काय घेणे आहे? त्यांनी आपले कान तृप्त केले आणि आपली जाणीव समृद्ध केली हे आपल्यावर काय कमी उपकार आहेत? कलाकारांच्या खाजगी आयुष्यात आपण डोकावून पाहू नये."

माहितगार's picture

12 Oct 2018 - 8:55 pm | माहितगार

तेचना तुम्ही चित्रपट आणि संगित इत्यादीतून मिळणार्‍या मनोरंजन आणि समाधानाला मिठाई म्हणत आहात, आणि अभिजितराव कलाकारांच्या जिवनातील स्त्रीयांना वस्तु प्रमाणे मिठाई असा अर्थाचा अनर्थ करताना दिसताहेत.

प्रत्येक जण प्रतिक्रिया देतो ती स्वतःच्या असलेल्या विचारसरणी आणी पूर्वग्रहावर आधारित असते.

त्याचा आणि सत्याचा संबंध असेलही किंवा नसेलही

मूकवाचक's picture

9 Oct 2018 - 9:15 am | मूकवाचक

+१

पिलीयन रायडर's picture

8 Oct 2018 - 10:47 pm | पिलीयन रायडर

अजून एका विश्वामित्रावर आरोप

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10156499299095560&id=544725559

माहितगार's picture

9 Oct 2018 - 12:16 pm | माहितगार

वाचताना खरे आणि खेदजनक वाटते, (अर्थात हि स्त्री लेखिका दिसते, काल्पनिक घटना मांडणीची क्षमताही लक्षात घ्यावी लागते) स्त्रीयांनी अशा प्रसंगांना धिरोद्दातपणे कलाकार-दिग्द्रशक-निर्मात्यांच्या संस्थेच्या संबंधीता समक्ष आणि न्यायासना समक्ष वाचा नक्कीच फोडली पाहिजे. अर्थात सोशल मिडिया आणि मिडिया वरील वाचा फोडण्यास मिळणारा प्रतिसाद केवळ तात्कालीक प्रभावाचा असतो. (अगदीच निरुपयोगी म्हणायचे नाही जागृती होते त्याच व्यक्तीकडून पिडीत असलेल्या इतर व्यक्ती मोकळेपणाने बोलण्याची शक्यता असते) पण वृत्त माध्यमात काही वेळा बातमी होते बाकी वेळ रोज मरे त्याला कोण रडे अशी स्थिती असते. तेव्हा कोड ऑफ कंडक्ट, कायम स्वरुपी आर्बीट्रेशन मेकॅनीझम, उशिराने व्यक्त होण्या एवजी आर्बीट्रेशन आणि न्यायव्यवस्थेसमोर वेळीच मनमोकळे करणे आणि तात्कालिक मिडिया आश्रयापेक्षा न्यायालयीन प्रक्रीयेचा आधार आणि आदर करणे याचे स्वतःचे महत्व असावे.

प्रमोद देर्देकर's picture

9 Oct 2018 - 8:10 pm | प्रमोद देर्देकर

पिरा हा तर खराखुरा आधुनिक विश्वामित्र म्हणून प्रसिध्द होता की आहे म्हणु.
खरंच काय खरं आणि काय खोटं समजतच नाहीये .

प्रकाश घाटपांडे's picture

9 Oct 2018 - 9:25 am | प्रकाश घाटपांडे

काल न्युज १८ लोकमतवर चर्चा होती . न्यायालय व सत्य याचा प्रत्येकवेळी संबंध असेलच असे नाही. सत्य जे काही असेल ते आपल्या जागी पण तनुश्री ची इतर विधाने, भाषा व देहबोली पाहता ही सकृतदर्शनी स्टंटबाजी वाटते. हे माझ्यापुरते मत आहे दावा नाही.

माहितगार's picture

9 Oct 2018 - 11:59 am | माहितगार

ईतर कॉर्पोरेटपेक्षा सिने आणि टिव्ही इंडस्ट्रीचे लिबरल आर्टचे स्वरुप लक्षात घेऊन , सर्व स्टेक होल्डर्सनी मिळून बनवलेल्या प्रॉपर कोड ऑफ कंडक्टची गरज असावी असे प्रथम दर्शनी वाटते. त्या शिवाय काँट्रॅक्ट ड्राफ्टींग च्या प्रमाण नमुन्यांची गरज असावी. मिडिया ट्रायलला घेण्याच्या आधी इंडस्ट्रीचा स्वतःचा आर्बीट्रेशन मेकॅनीझम हवा. तिथून पुढे आर्बीट्रेशन ने निकाली न निघालेल्या प्रकरणांची न्यायालयीन मार्ग.

मिडिया ट्रायल सुरवातीस प्रभावी वाटतील पण मिडिया प्रसिद्धीची स्थिती एका पॉईंट नंतर रोज मरे त्याला कोण रडे अशी असते. मिडिया ट्रायल हा आदर्श मार्ग नक्कीच नसावा हे मिडियातील लोकांना आधी समजावयास हवे. ह्या गोष्टी भविष्यात होतीलही कदाचित.

नाना तनुश्री प्रकरण लक्षात यावे म्हणून एका काल्पनिक चित्तर कथेचा विचार करु. कथा आणि पात्रे काल्पनिक, उत्तरदायीत्वास नकार लागू.

'एक नवासा प्रोडूसर पैसे लावतोय ज्याची आर्थीक जोखीम घेण्याची क्षमता मर्यादीत असावी. त्यामुळे त्या मुमेंटला सक्सेस मिळणार्‍या एंटरटेनमेंट फॉर्मॅट मधील मुव्हीला गो अहेड देतो, ज्यात बाकी फिल्मशी स्क्रीप्टशी खूप संबंध नसलेले आयटम साँग गल्लाभरुतेच्या दृष्टीने समावेशाचा निर्णय होतो. कमी बजेट मध्ये बसवायचे असल्यामुळे दुसर्‍या फळीतील नाना सारखाच एक जरासा देहाती मोकळा ढाकळा कलाकार मुख्य कलाकार लिड अ‍ॅक्टर म्हणून येतो, ज्याचा दांडगा अनुभवी नैसर्गिक स्वभाव उत्साही गुंतवून घेणारा आहे (किंवा नटी म्हणते तसे. ?) .

गल्लाभरुतेच्या दृष्टीने समावेश करावयाच्या 'एकल /सोलो' आयटम साँगसाठी एका अल्पानुभवी (चित्रपट आणि खास करुन आयटम साँग बद्दल जरासा पुर्वग्रहीत तिटकाराच असलेली) नटीशी नृत्यांगना म्हणून करार केला जातो. ज्या करारात सोलो असल्यामुळे इतर कुणा कलाकारासोबत इंटीमेट रोलचा समावेश नाही. आता हि स्पेशल अ‍ॅपिअरन्स देणार्‍या नृत्यांगनेस आपण भारत सुंदरी असल्याचा इगो आहे, त्या शिवाय आपण गंवार/गावंढळ नसलेल्या एटीकेट पाळणार्‍या सुसंस्कृत कुटूंबातून असल्याचा अभिमान आहे. चित्रपट आणि खास करुन आयटम साँग बद्दल जरासा पुर्वग्रहीत तिटकारा असला तरी करीअर मध्ये पुढे पडण्यासाठी मनातून द्विधा मनस्थिती असताना ती तो आयटम साँग करार स्विकारते.

खेड्यातून स्वानुभवावर मोठा झालेला लिड अ‍ॅक्टर किती लोकप्रीय असला तरी, शहरी नटीच्या दृष्टीने केवळ, एक शहरी एटीकेट माहित नसलेला गावंढळ आहे आणि मुख्य म्हणजे हिंदी चित्रसृष्टीतील पहिल्या फळीतला चॉकलेट हिरो नाही. (पहिल्या फळीतला चॉकलेट हिरो असता आणि इंटीमेट सीनचा करारात उल्लेख असता तर या नटीची मनःस्थिती द्विधा कशाला बरे झाली असती ? पण तसे झाले तर फिल्मच्या स्टोरीला टर्नस आणि ट्विस्ट मिळावयास जागा रहात नाही. )

आता एटीकेट नसलेला गावंढळ हिरो त्याचा अ‍ॅक्टींग आणि अनुभव किती का दांडगा असेना, त्याचे काम नसताना स्टेजवर का रहावे?, स्वतःला तिसमारखाँ समजत दिग्दर्शकाचा रोल स्वतःच्या ताब्यात घेत कॅमेराचा अँगल इथून नव्हे तिथून, तिथून नव्हे इथून अधिक बरोबर दिसतो असा विचार करत नृत्यांगनेस चक्क हाताला धरुन स्टेजवर वेगवेगळ्या स्थळावरुन नृत्य करावयास का लावावे ? सोबत स्वतःस नृत्य येत नसताना नृत्य शिकवण्याचा / शिकण्याचा बहाण्याचा विनोदाचा प्रयत्न शहरी नटीला आवडत नसला तरी का रेटावा ? लिड अ‍ॅक्टर असेल आणि त्याच्यावर चित्रपट अवलंबून असेल तर तो त्याचा दिग्दर्शकाचा आणि निर्मात्याचा प्रश्न , गेस्ट कलाकाराने त्याची चिंता का करावी ?

आता पाहुण्या नटीने निर्माता, दिग्दर्शकांकडे लीड अ‍ॅक्टर च्या गुस्ताखी बद्दल तक्रार करणे सहाजिक आहे . ( त्या लिड कलाकाराशी सरळ संवाद साधून काय खुपतय हे तो शहरी एटीकेट नसलेला गावंढळ कलाकाराला कसे काय सांगणार, मिडियाच्या आधारा शिवाय न पटलेल्या गोष्टींबाबत निराकारण ती कसे काय करुन घेणार ?)

आता निर्माता, दिग्दर्शकांकडे त्याची तक्रार केली तर लीड कलाकाराला तिथून घालवण्या एवजी उलटपक्षी आयटम साँग बाबत तसला सीन दुसर्‍या फळीतील कलाकारा सोबत करण्याची गळ, तेही करारात उल्लेख नसताना घातली जाते हे फारच झाले. दिग्दर्शक आणि सहकलाकार असले म्हणून काय झाले ? आणि हे सर्व करण्या मागे लीड कलाकाराचे उद्देश्य वेगळे असतील तर पाहुण्या नटीने नेमके काय करायचे? न्यायालये काहीच्या काही वेळ लावतात तेव्हा न्यायालयाचा आधार तिने का घ्यायचा हा तिचा प्रश्न रास्त नसतो का ?'

कशी वाटली काल्पनिक कथा ? कथा काल्पनिकच आहे खर्‍या जगातील कोणत्याही व्यक्ती स्थळे प्रसंगांशी उपरोक्त कथेचा काहीही संबंध नाही. सर्व उत्तरदायीत्वास नकार लागू होत आहेत.

सरते शेवटी कोड ऑफ कंडक्ट, आर्बीट्रेशन मेकॅनीझम, आणि तात्कालिक मिडिया आश्रयापेक्षा न्यायालयीन प्रक्रीयेचा आधार आणि आदर करणे हे बॉलीवूड स्टेक होल्डर्सना झेपू शकेल का ?

फुकनी's picture

10 Oct 2018 - 1:30 am | फुकनी

>
ऐन वेळी कॉन्ट्रॅक्ट बदलल्याचे कारण देऊन निर्धारित रक्कम घेऊन निघून जावे. नंतर परत खेडूत हिरो असलेल्या चित्रपटात काम करू नये. कथाकथित पाहुण्या नटी ने तेच केलाय. इथे विषय संपू शकतो.
पण नंतर दहा वर्षांनी येऊन पुन्हा त्या खेडुताला एटीकेटी शिकवायची काय गरज.

अभ्या..'s picture

10 Oct 2018 - 3:28 pm | अभ्या..

वा बाबुजी वाह्ह्ह,
प्रतिमेच्या बाहेर पडायचे धाडस खूप कमीजण दाखवतात.

माहितगार's picture

10 Oct 2018 - 4:46 pm | माहितगार

अलोकनाथ आणि एम जे अकबरचे इन्स्टन्सेस (आरोप) एका पेक्षाअधिक असावेत असे दिसते. अलोकनाथवरचे एम जे अकबर पेक्षा अधिक सिरीअस असावेत असे वाटते. एवढी वर्षे सिने आणि टिव्ही मालिका इंडस्ट्रीत कोड ऑफ कंडक्ट आणि प्रॉपर मॉनीटरींग प्रणालीचा अभाव होता, आणि ज्यांच्या कडे व्यक्त होण्याची न्यायिक प्रक्रीयेतून धसास लावण्याची, इंडस्ट्रीत सुधारणा घडवण्याची ताकद होती अशा स्त्रीयांनीही व्यक्त होण्यास एवढा अवधी घेण्याचे आश्चर्य वाटते.

mrcoolguynice's picture

12 Oct 2018 - 10:08 pm | mrcoolguynice

i did not have sexual relations with that woman......

bc

ब्रेट्या लगा, लैच नशिब्वान तू ....
च्यामारी कुणा ड्रेसवरच्या डागामूळ , म्हायी क्लीन इमेज खराब झाली...
म्हाया तर् लैफ् रूईन जाला ना बाबो... गो फिगर
यौर्स ट्रुली .. बिलीभौ सिगारवाले

mrcoolguynice's picture

13 Oct 2018 - 5:00 pm | mrcoolguynice

I extended my hand to him in gratitude, he shoved his 55-yr-old tongue down my 18-yr-old throat.

https://twitter.com/MajliedePuyKamp

डँबिस००७'s picture

9 Oct 2018 - 9:47 pm | डँबिस००७

ह्या वादामुळे एका नविन ट्रेंड सुरु झाला आहे. त्यामुळे नविन वादाला तोंड फुटले आहे.

आता पर्यंत आवार्ड वापसी करुन देश समाज व सरकार ईंन टॉलेरेंट असल्याचा दावा होत होता पण आता ईतक्या स्त्रीया पुर्वी झालेल्या गुन्हा बद्दल बोलत्या झाले ल्या आहेत की त्या वेळेलाच देश समाज व सरकार ईंन टॉलेरेंट होता आणी आता तोच देश समाज व सरकार झालेल्या घटने बद्दल गंभीर आहे हे प्रकर्शाने पुढे आलेले आहे.

ट्रेड मार्क's picture

10 Oct 2018 - 12:45 am | ट्रेड मार्क

ज्या वेगाने आरोप होत आहेत ते पाहता परिस्थिती अवघड आहे. एक गोष्ट समजली नाही की १०-२० वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेला सिद्ध कसे करणार? जरी अगदी घटना घडली त्यावेळेला प्रत्यक्षदर्शी लोक असले तरी एवढी जुनी घटना जशीच्या तशी आठवणे अवघड नाही का? समजा काही वर्षांपूर्वी तुमची एखाद्या मुलीशी अगदी घट्ट मैत्री आहे, तुम्ही सतत बरोबर असता वगैरे वगैरे. पण नंतर काही कारणामुळे तुमच्यात वितुष्ट आलं आणि आता इतक्या वर्षांनंतर त्या मुलीने तुमच्यावर आरोप केला की तुमची मैत्री होती तेव्हा तुम्ही गैरफायदा घेतला. त्यावेळी उगाच जवळ येणे, खांद्यावर हात ठेवणे, हात पकडणे वगैरे केले आणि हे असभ्य वर्तन आहे असा आरोप केला, तर काय करणार? तुमचे एकमेकांबरोबर असलेले, खांद्यावर हात ठेऊन उभं असलेले आणि इतर पोझमधले मैत्रीमध्ये सामान्य वाटू शकणारे फोटो पुरावे म्हणून दाखल केल्यावर ते मॉरल पोलिसांच्या/ खऱ्या पोलिसांच्या नजरेला चुकीचे वाटू शकतात. मग आता तुम्ही काय करणार? किंवा ४-५ वर्षांपूर्वी ऑफिसच्या पार्टीमध्ये तुमच्या एका स्त्री सहकाऱ्याला थोडी जास्त झाल्याने आधार देत तुम्ही घरी सोडलं. आता ते आठवून ती सहकारी तुमच्यावर परिस्थितीचा फायदा घेतल्याचा आरोप करू लागली तर तुम्ही काय करणार?

नाना पाटेकरांच्या केस मध्ये तनुश्री म्हणतेय की तिने तक्रार दाखल केली होती. मग त्यावेळेला चौकशी झाली का नाही? झाली तर काय निष्पन्न झाले तसेच नसेल झाली तर का नाही झाली? आणि केवळ त्यावेळेला तक्रार केली होती म्हणून आरोप खरेच आहे हे कसं मानायचं? तर अलोकनाथ केस मध्ये तक्रारदार स्वतःच भरपूर नशेत होती हे मान्य करतेय. मग आरोप सिद्ध कसा करणार?

मुख्य म्हणजे स्त्री पुरुष समानतेच्या युगात बहुतेक वेळा आपल्याला एकत्र काम करायला लागते. कुठल्या ना कुठल्या कारणाने वादविवाद असू शकतात त्यामुळे नाराजी, स्पर्धा, ईर्ष्या वगैरे सर्व भाव असू शकतात. जर उद्या कोणी तुमच्या माझ्या सारख्या सामान्य व्यक्तीवर असा (खोटा) आरोप केला तर काय होईल? या प्रथितयश लोकांकडे निदान पॉवर, पैसा आणि सपोर्ट तरी असतो. सतत लोकांना सामोरे जात असल्याने असल्या गोष्टींना कसे तोंड द्यायचे हे सुद्धा माहित असते किंवा दुसऱ्या शब्दात गेंड्याची कातडी असते. पण सर्वसामान्य माणसाने काय करावे?

२०१५ सालची एक केस आठवत असेल तर सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराने आपल्याबरोबर असभ्य वर्तन केले असा आरोप एका मुलीने फेसबुक वर केला. यात त्या मुलाची बाजू कोणी ऐकली नाही व त्याला अटक करण्यात आली. कोर्टात केसही दाखल झाली. जामिनावर तो मुलगा बाहेर आहे पण समाजाने त्याला वाळीत टाकल्यासारखी स्थिती आहे. कोर्टाच्या चकरा मारून वैतागला आहे, नोकरी मिळत नाही. ती मुलगी नंतर कॅनडाला निघून गेली आणि कोर्टाच्या तारखांना हजर रहात नाही किंवा काही उत्तरही देत नाही. जरी कोर्टाने केस डिसमिस केली तरी त्या मुलाची बदनामी झाली, करिअर वाया गेलं याला कोण जबाबदार? कोणती मुलगी त्याच्याबरोबर लग्नासाठी तयार होईल का?

मी स्वतः दोन्ही प्रकारचे लोक बघितले आहेत. आपल्या अधिकाराचा गैरवापर करून हाताखालच्या मुलींना वापरणारे लोक बघितलेत तसेच आपल्या "असेट्स" चा वापर करून हवं ते पदरात पडून घेणाऱ्या मुली पण बघितल्या आहेत. कोण बरोबर आणि कोण चूक हे जुन्या केस मध्ये केवळ परिस्थितीजन्य पुराव्यांवरून ठरवणे अवघडच नव्हे तर चुकीचे पण आहे.

मला कोणाचीच बाजू घ्यायची नाहीये किंवा मुली खोटं सांगतात किंवा मुलं कायम गैरफायदा उठवतात असा दावा करायचा नाहीये. पण काही वर्षांपूर्वी खरंच काय घडलं हे कसं शोधून काढणार? स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील सीमारेषा धूसर असणाऱ्या अमेरिकेमध्ये सुद्धा असे आरोप झालेल्यांची वाताहत झाली आहे. मग भारतासारख्या देशात असं झालं तर काय होईल याची सर्वजीतची केस म्हणजे एक उदाहरण आहे.

प्रत्यक्षात चांगल्या असलेल्या पुरुषांवर खोटे आरोप होणे हे उर्वरीत स्त्रीयांसाठी नुकसानीचे ठरण्याची शक्यता असावी. कारण प्रत्यक्षात चांगले असलेले पुरुष कमी आहेत असे मानले आणि खोट्या आरोपांनी ते बाजूस सारले गेले की स्त्रीयांसाठी उरलेले कोण असणार ? खोट्या आरोपबाजी बद्दल खरेतर स्वतंत्र धागा चर्चेस वाव असावा असे वाटते. आपल्या बर्‍याच मुद्द्यांशी सहमत

प्रकाश घाटपांडे's picture

11 Oct 2018 - 9:54 am | प्रकाश घाटपांडे

इथे प्रत्यक्ष अन्याय सहन करणार्‍यां स्त्रियांची संख्या ही गैरफायदा घेणार्‍यांपेक्षा कितीतरी जास्त आहे असा युक्तिवाद केला जातो. तो खरा देखील आहे. इथे खर तर मुद्दा समाजाच्या लैंगिक व्यवस्थापनेचा आहे. जो लैंगिक वर्तणुकीचे मानसशास्त्र व सामाजिक मानसशास्त्र इत्यादी विषयांशी निगडित आहे. पण त्या दृष्टीने चर्चा माध्यमात होताना दिसत नाही. आता बॅचरल ऑफ सेक्शुअल अ‍ॅडमिन्स्ट्रेशन व मास्टर ऑफ सेक्शुअल अ‍ॅडमिन्स्ट्रेशन अशा अभ्यासक्रमांची गरज आहे
स्त्रीत्वाचे भांडवल विरुद्ध पुरुषत्वाचे वर्चस्व हा लढा कायद्याच्या तांत्रिक पातळीवर चालूच राहील. मी पुर्वीच्या जन्मात गोपी होती व तू कृष्ण होता त्यावेळी तु माझ्याशी गैरवर्तन केले हे आता मला समजतय म्हणून मी तुझ्यावर आता केस टाकते असे सकृतदर्शनी विनोदी वाटणारे मुद्दे भविष्यात आले तर नवल नाही

प्रकाश घाटपांडे's picture

12 Oct 2018 - 12:15 pm | प्रकाश घाटपांडे

मला इथे उत्पल च्या या जगनच काय करायचं? या लेखाची आठवण येते. प्रत्येक क्षेत्रात हे जगन असतात.

माहितगार's picture

12 Oct 2018 - 12:52 pm | माहितगार

उत्पलांचा लेख अधिक्याने पुरुषांच्या दृष्टीकोणातुन लिहिला असला तरी , विचारात घेऊन अधिक चर्चा योग्य आहे. काही प्रश्न मनात आले
आपला आणि इतरांचा दृष्टीकोण मांडला गेल्यास अधिक विचार विमर्श होऊ शकेअ असे वाटते.

१) आपण एम. जे. अकबर यांचे महिलागामी कतृत्व वाचले असल्यास एम.जे. अकबर च्या वागण्याचे विश्लेषण आपण कसे करु शकाल ?

२) अलोकनाथ आणि एम. जे. अकबर या दोघांनीही आपापल्या क्षेत्रातील स्त्रीयांशी प्रेम - विवाह केले असे बातम्यांवरुन दिसते (चुभूदेघे) . हि व्यक्ती कशी वागू शकते (अ‍ॅप्रोच करते) याची अल्पशी तरी त्यांच्या पत्नींना कल्पना असणार. प्रेम विवाह असूनही संबंधीत पत्नींचे यांच्यावर गैरवर्तन होणार नाही असे प्रभाव का पडले नसावेत ? हि माणसे का अशी भरकटत असावीत

ह्या साध्याशा घटनेला खूप सारे पैलू आहेत
१) नाना विरुद्ध तनुश्री
२) बॉलीवूड विरुद्ध मराठी चित्रपट सृष्टी
३) उत्तर भारतीय विरुद्ध मनसे
४) अमेरिकन "मी सुद्धा" आणि त्याची भारतीय अंमलबजावणी
५) स्त्री आणि पुरुष
६) अमेरिकन हिरवे ओळखपत्र
७) सोशल मीडिया
८) डिफामेशन केसेस साठी काही वयोमर्यादा असावी का?
इत्यादी, इत्यादी...

मकरंद अनासपुरे यांची एक बोलकी प्रतिक्रिया
https://www.youtube.com/watch?v=LxEd_mgLVis

शेतकऱ्यांच्या विधवांचा पाठिंबा
https://www.youtube.com/watch?v=3S0AIlACmvk

अनुप ढेरे's picture

10 Oct 2018 - 9:59 am | अनुप ढेरे

मकरंद अनासपुरे खोटारडा आहे. दहा वर्षात तीन वेळा यावर तिने बोलुन झालेलं आहे. तक्रार करुन झाली आहे संघटनेकडे. काही उपयोग झालेला नाही.

मकरंद अनासपुरे नाना पाटेकरला गुरुस्थानी मानतो, मकरंद अनासपुरेची भूमिका उघड उघड नाना पाटेकरची बाजू घेण्याची आहे, आणि इतर अनेक नाना पाटेकर फॅन्सची असेल. तिच्या सुरवातीच्या तक्रारींकडे चित्रपट प्रसिद्धीचे तंत्र म्हणून पाहिले गेले असणे सहज शक्य आहे.

आपण म्हणता तसे, तिने २००८ मध्येच (कोर्ट सोडून उर्वरीत) संबंधीतांसमोर तक्रार केली ह्यात तथ्य असावे. मिडिया समोर किती वेळा बोलली आणि पुढे किती वेळा बोलेले, ह्याला ती स्टेटमेंट बदनामी विषयक कायद्यात मोडतात की नाही एवढेच महत्व असावे चुभूदेघे. कोर्टात का नाही गेली या प्रश्नावर एकदा ती प्रक्रीया काय असते ते माहित नव्हते, तर एकदा कोर्ट प्रक्रीया वेळ खाऊ आहे असे वेगवेगळे बोलताना दिसते. कोर्टात जाण्याचा मार्ग मोकळा आहे हे तिला माहित नव्हते ?(जे वय १८+ पेक्षा मोठ्या प्रत्येक व्यक्तिस -आणि सुसाक्षर नक्कीच- माहित असणे अभिप्रेत असावे) किमान तिच्या वडीलांना ज्येष्ठत्वाच्या नात्याने माहित असणे अभिप्रेत असावे. किमान स्वनियूक्त तज्ञ वकिलाचा सल्ला तिने घ्यावयास हवा होता.

भारतीय कोर्ट प्रक्रीया कितीही वेळ खाऊ म्हटली तरी तिने मिडियाला दिलेल्या मुलाखतींच्या संख्ये पेक्षा कमी तारखांनाच प्रत्यक्ष उपस्थिती नोंदवावी लागली असती. बाकीच्या तारखा पडणे हे वकील मंडळी बघून घेत असतात. बहुधा दहा वर्षात किमान प्रथम स्तरीय न्यायालयांचे निकाल हातात असते. -तसे पहाता २००८ नंतरच्या स्त्री विषयक अनेक खटले न्यायालयीन निकालाचे सर्वोच्च न्यायालया पर्यंतचे स्तर सुद्धा पार करुन झाले असतील -आता नुसतीच आरोपबाजी करण्या पेक्षा ती म्हणते त्यात तथ्य असले तर किमान प्रथम स्तरीय न्यायालयाचा निकाल हातात घेऊन २०१८ मध्ये ती मिडियात बोलू शकली असती असे वाटते.

आपले सर्वांचे आवडते पंतप्रधान , आपल्याला लहानपणी सतत त्यांचे गोजिरवाणे रूप दाखवले गेले .
अशा आदरणीय व्यक्ति ज्या राजकारण नावाच्या क्षेत्रात होत्या त्या राजकारण क्षेत्रात # metoo कधी सुरू होतंय याची वाट बघतोय .
जाऊ द्या कोणाचे नाव नको घ्यायला पण लैंगिक छळवणूक साठी सर्वात उत्तम क्षेत्र आहे ते म्हणजे राजकारण पण या क्षेत्रातील टाळ्या बऱ्यापैकी दोन्ही हाताने वाजतात म्हणून राजकारणातील काळा डोह शांत आहे .
त्या काळ्या डोहातील सहसा बाहेर येत नाहीत , कारण अळीमिळी गुपचिळी !!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

10 Oct 2018 - 5:13 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

वाचतेय. राज कपूर, शम्मि कपूर, ए.आ.र. किर्दार ही मंडळी सुटली म्हणायची.! असो. आता एम.जे.अकबर ह्याण्च्याविरुद्ध सहा महिलानी तक्रार केली आहे. अकबर हे राज्यमंत्री आहेत व सरकारचे धाबे दणाणले असणार हे नक्कि.
तनुश्रीच्या जवळपास सर्व मुलाखती पाहिल्या. २००८ साली ती जे बोलत होती तेच आताही बोलत आहे. ती खरे बोलत आहे असे आम्हाला वाटते. "नाना शेतकर्याना मदत करतो म्हणून नाना तसे करणे शक्य नाही" हा दावा हास्यास्पद वाटतो.

माहितगार's picture

10 Oct 2018 - 5:54 pm | माहितगार

एम.जे अकबर बहुधा परदेश दौर्‍यावर असावेत वापस आले की सोड चिठ्ठी दिली जाण्याची शक्यता असू शकते, निवडणूक काळात सरकार त्यांना जपून ठेवण्याची जोखीम नक्कीच घेऊ शकणार नाही. दुर्दैवाने एन डि ए कडे एम.जे अकबर सारखा दुसरा मुस्लिम चेहराही नाही म्हटल्यावर एम.जे अकबर शिवाय एन. डि. ए. सरकारची काही काळ तरी पंचाईत ठरलेली आहे.

नाना शेतकर्याना मदत करतो, आणि दहा वर्षापुर्वी का तक्रार केली नाही हे मुद्दे कायद्यासमोर टिकणार नाहीत. दुसर्‍या बाजूला तनुश्रीच्या कार वरचा कॅमेरामन आणि पत्रकारांचा हल्ला आणि स्टेजवरील वितुष्ट यांचाही संबंध नसण्याची शक्यता बरीच दिसते.

नाना पाटेकर आणि तनुश्री दत्तात तनुश्री म्हणते तसे बिघडल्याची शक्यता असू शकते. तनुश्रीच्या स्वतःच्या जबानीला निश्चितच किंमत असेल त्याच वेळी तिथे शेकड्याने माणसे असताना हात लावण्याबद्दल एकही प्रत्यक्ष दर्शी विटनेस न देता आल्यास तनुश्रीच्या विरुद्ध पाटेकरांची बाजू मजबूत होण्याची शक्यता असावी त्याच वेळी मकरंद अनासपुरेंनी नाना पाटेकरांची उघड बाजू घेतली तशी त्यांची इतर स्त्री सह-कलाकारांनी बाजू न घेतल्यास नानांच्या बाजूला वेटेज येणार नाही. राखी सावंतने नाना पाटेकरांच्या घेतलेल्या बाजूचे मुल्य मोजले जाण्याची शक्यता कमी असावी.

अंदाजाधारीत विश्लेषण आहे प्रत्यक्षदर्शी माहिती नव्हे म्हणून माहिती आणि विश्लेषणाच्या अचुकतेचा कोणताही दावा नाही, चुभूदेघे उत्तरदायीत्वास नकार लागू

बाकी विश्लेषण चांगले पण खालील भाग:

राखी सावंतने नाना पाटेकरांच्या घेतलेल्या बाजूचे मुल्य मोजले जाण्याची शक्यता कमी असावी.

कोर्टात व्यक्तीनुसार साक्षीचं वेटेज बदलत असेल असं वाटत नाही. अमुक व्यक्तीने दिलेली साक्ष अधिक मजबूत किंवा तमुक व्यक्तीची साक्ष कमी विश्वासार्ह असं करता येत नसावं. भले न्यायाधीशांना व्यक्तिगत तसं इम्प्रेशन असलं तरी.

विरोधाभास दाखवून दिला किंवा खोटेपणा उलटतपासणीत सिद्ध केला तरच साक्षीदार पूर्ण अग्राह्य सिद्ध होऊ शकेल. पण मूल्य / वेटेज असं काही नसावं.

सामान्यनागरिक's picture

10 Oct 2018 - 5:43 pm | सामान्यनागरिक

१. सेटवर अनेक कलाकार, तंत्रज्ञ मंडळी असताना असे काही घडेल असे वाटत नाही.
२. ज्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी स्त्री आणि पुरुशांनासुद्धा सेक्स चा वापर करावा लागतो आणि हे नीट माहिती असूनसुद्धा जे लोक या क्षेत्रात शिरतात त्यांनी असा कांगावा करावा हे आश्चर्य आहे.
३. १० वर्षांपूर्वी घडलेला गुन्हा आज कोण सिद्ध करू शकेल ?
४.एकूणच या मागील हेतूबद्दल शंका घ्यायला जागा आहे.

४.एकूणच या मागील हेतूबद्दल शंका घ्यायला जागा आहे.

सब्जेक्टीव्ह आहे, हेतू बद्दल शंका असूही शकतात पण त्याच वेळी केवळ हेतू वरील शंके मुळे न्याय नाकारला जातो असेही होऊ नये.

३. १० वर्षांपूर्वी घडलेला गुन्हा आज कोण सिद्ध करू शकेल ?

इतर विटनेसेसच्या आठवणी मिळवणे कठीण होऊ शकते म्हणून कठीण होऊ शकते पण अशक्य नव्हे.

२. ज्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी स्त्री आणि पुरुशांनासुद्धा सेक्स चा वापर करावा लागतो आणि हे नीट माहिती असूनसुद्धा जे लोक या क्षेत्रात शिरतात त्यांनी असा कांगावा करावा हे आश्चर्य आहे.

आपले हे वाक्य राज्यघटनेने दिलेल्या आधिकार आणि मुल्यांना अनुसरुन नसावे. मुद्दा 'कंसेंट' म्हणजे परवानगीचा आहे. संबधीत स्त्री/पुरुषाच्या 'कंसेंट' म्हणजे परवानगी ने झाले तर कायदेशीर आणि संबधीत स्त्री/पुरुषाच्या 'कंसेंट' म्हणजे 'परवानगी' शिवाय झाले तर बेकायदेशीर.

तनुश्री सोबत झालेल्या लेखी करारात नाना पाटेकरांना भूमिका नव्हती असे दिसते. लेखी करारातील मर्यादांची जाणीव दिग्दर्शकाने नाना पाटेकरांना दिली की नाही आणि कल्पना नसून नाना पाटेकर इन्व्हॉल्व झाले का कल्पना असूनही इन्व्हॉल्व झाले ? असा प्रश्न कोर्टात उपस्थित होऊ शकतो . म्हणजे दिग्दर्शक आणि नाना पाटेकर दोघांना पूर्णपणे एकमेकांच्या बाजूने बोलणे अवघड होऊ शकते. अर्थात नाना पाटेकर स्टेजवर उपस्थित होते हा गुन्हा होऊ शकत नाही . स्टेजवर कोण कोण असावे हा दिग्दर्शकाचा प्रिरॉगेटीव्ह असावा. नाना पाटेकरांकडून आगळीक झाली का आणि नाना पाटेकरांचा हेतू अयोग्य होता का हे प्रश्न अधिक महत्वाचे आणि प्रत्यक्ष साक्षी पुरावे काय उभे रहातात यावर बरेच काही अवलंबून राहील.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

10 Oct 2018 - 7:47 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

गाडीची तोडफोड होत असताना नाना व दिग्दर्शकाला त्याच परिसरात असून मदतीला जावेसे का वाटले नाही? ते म्हणतात-"आम्हाला माहित नाही बाहेर काय चालले होते ते". हे न पटण्यासारखे आहे. आपल्या सहकलाकारच्या गाडीची तोडफोड चालु आहे, आपण जवळच आहात, आणी आपण मदतीला गेला नाहीत? गेले नाहीत कारण ती गाडीत कोणत्या कारणाने बसली आहे हे नाना व दिग्दर्शक व नृत्य-दिग्दर्शकाला चांगले ठाउक होते.

माहितगार's picture

10 Oct 2018 - 8:30 pm | माहितगार

...गाडीची तोडफोड होत असताना नाना व दिग्दर्शकाला त्याच परिसरात असून मदतीला जावेसे का वाटले नाही?...

हा मुद्दा नानास मिडियासमोर आणि कायद्या समोर नाना पेक्षाही दिग्दर्शकास त्रासदायक होऊ शकावा.

ट्रेड मार्क's picture

11 Oct 2018 - 5:44 am | ट्रेड मार्क

काम मिळवण्यासाठी जर एखाद्या स्त्री समोर शय्यासोबतीची अट ठेवली तर ते 'कंसेंट' आहे म्हणून ग्राह्य धरले जाईल का? म्हणजे एक होतकरू मुलगी ऑडिशनला गेली आणि तिथल्या एखाद्या निवडीचे अधिकार असलेल्या व्यक्तीने तिला सांगितलं की तुला काम देईन पण त्याची इच्छा पूर्ण करायला लागेल. काम मिळवण्यासाठी नाईलाजाने का होईना पण तिला त्याची इच्छा पूर्ण करायला लागली. वर ती राजीखुशीने करत आहे असा अभिनय पण करायला लागला तर तिची 'कंसेंट' होती असं म्हणायचं का? दुसऱ्या बाजूने विचार करता तिला काम नाही मिळालं तरी चालेल पण असल्या तडजोडी करणार नाही असं म्हणायचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे दोष कोणा एकावर ठेवणे योग्य नाही.

तनुश्री प्रकरणात तिचं म्हणणं आहे की नाना सेटवर येऊन तिला हात धरून डान्स स्टेप्स शिकवायला लागले. त्या वेळेच्या नृत्य दिग्दर्शकाचं म्हणणं आहे की तनुश्रीला बराच वेळ झाला तरी स्टेप्स जमत नव्हत्या. त्यामुळे वैतागून नाना सेटवर गेला आणि तिला हात धरून स्टेप्स करून दाखवू लागला. तिचा आक्षेप या कृतीवर आहे. त्या चित्रपटात नाना व तनुश्री मुख्य भूमिकांमध्ये होते, मग तिला नानाची ही कृती अपमानास्पद वाटली असावी का?

हा व्हिडिओ बघा यात नृत्य दिग्दर्शक आणि सिनेमा दिग्दर्शकाचे मत सांगितले आहे. पण त्याच बरोबर जे आरोप केले जातात की स्टुडिओच्या बाहेर पण तिच्या गाडीवर हल्ला झाला त्याबद्दल पण त्या कॅमेरामनचे (पवन भारद्वाज) म्हणणे मांडले आहे. त्या कॅमेरामनच्या सांगण्याप्रमाणे, तो त्याच्या एका स्त्री सहकार्यांबरोबर स्टुडिओच्या बाहेर न्यूज कव्हर करण्यासाठी थांबला होता. न्यूज काय, कोणाबद्दल आहे हे त्याला सांगण्यात आलं नव्हतं. सुमारे ४ तास थांबल्यानंतर तनुश्रीसाठी एक गाडी आली. त्याबरोबर तनुश्री व्हॅनिटी व्हॅन मधून बाहेर आली. म्हणून पवन आणि त्याची सहकारी शूट करण्यासाठी पुढे आले. त्यावेळेला तनुश्रीच्या वडिलांनी पवनचा कॅमेरा तोडला आणि पवनच्या महिला सहकार्याचे केस ओढून बाजूला ढकललं. नंतर गाडी पुढे नेताना ती पवन आणि त्याच्या महिला सहकार्याच्या पायावरून गेली. त्यामुळे दोघेही खाली पडले. पुढच्या गेटवर जमावाने गाडी थांबवली म्हणून पवन पुढे गेला आणि नुकसान भरपाई मागू लागला. ते दाद देत नव्हते म्हणून हवा सोडण्याचा प्रयत्न केला असे दिसते.

अर्थात बाकी जमाव कोण होता हा प्रश्न विचारला जातोय आणि त्यातही एक पांढरा शर्टवाला गाडीवर नाचतोय हे दिसतंय. पण पोलीस आणि बाकीचे त्याला थांबवायचा प्रयत्न करत आहेत हे पण दिसतंय. स्टुडिओ मध्ये बरेच लोक उपस्थित असणं हे काही नवीन नसावं आणि त्या लोकांनी तनुश्रीच्या वडिलांनी केलेलं आणि या दोघांच्या पायावरून गाडी गेलेली बघितलं असावं, म्हणून त्यांनी पुढे गाडी अडवली असावी का? अश्या बऱ्याच शक्यता आहेत, त्यामुळे लगेच मीडिया ट्रायल करून दोषी फिक्स करू नये असं मला वाटतं.

माहितगार's picture

11 Oct 2018 - 2:18 pm | माहितगार

...त्यामुळे लगेच मीडिया ट्रायल करून दोषी फिक्स करू नये..

अगदी सहमत, पण एकदा मिडियात आले कि इतरांनी चर्चा करणे स्वाभाविक होते. अशी चर्चा संयमीत विवेकपूर्ण राहील या साठी तुमच्या माझ्या सारख्या जागरुकांनी आपण मांडणी प्रयत्न करता तसा संयमीत मांडणी प्रयत्न करणे रास्त असावे.

....स्टुडिओ मध्ये बरेच लोक उपस्थित असणं हे काही नवीन नसावं आणि त्या लोकांनी तनुश्रीच्या वडिलांनी केलेलं आणि या दोघांच्या पायावरून गाडी गेलेली बघितलं असावं, म्हणून त्यांनी पुढे गाडी अडवली असावी का? ....

असायला काय अगदी सही मागण्यासाठी थांबलेले फॅन सुद्धा असू शकतात ;) (वकिली उपहास ह. घ्या.) अगदीच फॅन मंडळी नसली तरी मुलाखतेच्छु पत्रकार किंवा अनेकविध व्यक्तिगत कारणांनी एकाच वेळी पोहोचलेल्या व्यक्ति किंवा तनुश्री आक्षेप घेते तसा ठरवून पाठवलेला जमाव हा चौकशीचा विषय असावा. पोलीस चौकशी या विषयावर पुढे गेली नसेल तर तोही कदाचित वेगळ्या चौकशीचा विषय असू शकेल. आणि न्यायालये आपली मते मांडतील निर्णय घेतील.

वर माईंनी मांडलेल्या मुद्द्यातले तथ्य असे की तो जमाव स्टुडीओच्या आवारात असेल तर स्टुडिओच्या आवारातून अगदी काम सोडलेला व्यक्तीसुद्धा सुखरुप बाहेर पडेल हे बघण्याची दिग्दर्शकाची आणि प्रोड्यूसरची अप्रत्यक्ष जबाबदारी असू शकते. - बॉलीवूड फिल्म फेडरेशनने स्त्री कलाकार घरी पोहोचे पर्यंतच्या सुरक्षीततेची बाब या गाजावाजानंतर मनावर घेतल्या सारखे दिसते आहे- नाना पाटेकरांनाही समजा जमावा विरोधात लगेच मदत करता आली नाही तरी कळल्या नंतर सहकलाकार घरी सुखरुप पोहोचला का आणि आता कसा आहे हे चौकशी चिंता आणि कळकळ व्यक्त केली असल्यास कल्पना नाही .

माहितगार's picture

11 Oct 2018 - 2:39 pm | माहितगार

...तनुश्री प्रकरणात तिचं म्हणणं आहे की नाना सेटवर येऊन तिला हात धरून डान्स स्टेप्स शिकवायला लागले. त्या वेळेच्या नृत्य दिग्दर्शकाचं म्हणणं आहे की तनुश्रीला बराच वेळ झाला तरी स्टेप्स जमत नव्हत्या. त्यामुळे वैतागून नाना सेटवर गेला आणि तिला हात धरून स्टेप्स करून दाखवू लागला....

आधी, स्टेजवर हात धरला की नाही धरला ? , धरला या बाजूने कोण कोण विटनेस आहे , नाही धरला या बाजूने कोण कोण विटनेस आहे आणि त्यांची साक्ष साक्षीची उलट तपासणी या नंतर नेमके तथ्य पुढे येईल. हात धरला गेला असेल तर उद्देश्य आणि हेतूंच्या योग्या योग्यतेचा समज गैरसमजांबद्दल कोर्टापुढे बाबी मांडाव्या लागतील आणि कोर्ट उद्देश्य आणि हेतूंची निर्मळता स्विकारते का पहावे लागेल.

नानांना अशी कोणती स्टेप माहित होती की जी नृत्य दिग्दर्शका कडून प्रशिक्षीत करुन घेता आली नाही हा तनुश्रीचा मोठा प्रश्न असावा. कारण द्यायचेच तर कॅमेराचा अँगल समजावण्याचे द्यावे स्वतःलाच नृत्य येत नसताना नृत्य शिकवण्यास निघाले हे अगदी निखळ विनोदाचा प्रयत्न म्हणूनही सांगता येईल पण नृत्य न येणारी व्यक्ती नृत्याच्या स्टेप सिरीयसली सांगत होती हे नेमके कसे स्विकारले जाऊ शकेल याची कल्पना नाही. नाना तिथे थांबलेच का ? हा तनुश्रीचा प्रश्न / भूमिका मात्र सहसा रास्त धरली जाऊ नये कारण स्टेजवर कुणि कुणि थांबावे हा दिग्दर्शकाचा प्रिरॉगेटीव्ह असावा. नृत्य करताना अभिनय सुद्धा करावा लागतो आणि तो अभिनय कसा असावा हे सांगण्याचा नानाचा अधिकार मोठा असू शकतो. किंवा नृत्याच्ता वेळी नाना प्रेक्षकात अथवा स्टेजवर आहे हे दिग्दर्शकास दाखवायचे असू शकते. अर्थात नानां किंवा अजून कुणाकडून कराराचा भंग अथवा गैर वर्तन झाल्याच्या नंतर अमुक एक व्यक्ती स्टेजवर नको असे कलाकारास सांगता यावे असे वाटते .

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 Oct 2018 - 2:57 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"तनुश्री प्रकरणात तिचं म्हणणं आहे की नाना सेटवर येऊन तिला हात धरून डान्स स्टेप्स शिकवायला लागले. त्या वेळेच्या नृत्य दिग्दर्शकाचं म्हणणं आहे की तनुश्रीला बराच वेळ झाला तरी स्टेप्स जमत नव्हत्या. त्यामुळे वैतागून नाना सेटवर गेला आणि तिला हात धरून स्टेप्स करून दाखवू लागला. तिचा आक्षेप या कृतीवर आहे. त्या चित्रपटात नाना व तनुश्री मुख्य भूमिकांमध्ये होते, मग तिला नानाची ही कृती अपमानास्पद वाटली असावी का?"

नाना त्याच्या अभिनयाबद्दल माहित आहे. त्याने तिला नृत्य शिकवावे ईतपत त्याच्याकडे नृत्यकला अवगत आहे का? तिने दिलेल्या मुलाखतीनुसार-नानाला हे सगळे करण्याची गरजच काय ?तो एक दिवस आधीच येउन तिच्याकडे रोखून बघत होता असे ती म्हणते. सुरुवातीला तिने आक्षेप घेतल्यावर "नाना ज्येष्ठ अभिनेता आहे. आम्ही काहीच करू शकत नाही. जरा सहन कर" असे दिग्दर्शक्/नृत्यदिग्दर्शक तिला म्हणाले.
"मी मनात येइल ते बोलतो.. पटेल तेच करतो" असे म्हणणार्या लोकांबद्दल लोकाना एक आकर्षण असते. त्यामुळे नानाचे लोकाना तसे कौतुक वाटते. पण येथे त्याने मर्यादा ओलांडली . कुणी दुसरी अभिनेत्री असती तर सहन केले असते. पण कितीही नाके मुरडली तरी ती माजी मिस. इंडिया आहे.
"माझी परवानगी न घेता मला स्पर्ष करून मला नाच शिकवणारा हा कोण?" असा प्रश्न तिला नक्किच पडला असणार.
नाना तुमच्या घरी अभिनय शिकवायला आला आणी तुमच्या स्त्री सदस्याना सारखे स्पर्श करून नाच शिकवू लागला तर येथील पुरूष सदस्य काय करतील? हाकलून देतील की नाना तसा नाही म्हणून सहन करत राहतील?

माहितगार's picture

11 Oct 2018 - 3:11 pm | माहितगार

माईसाहेब आपण उपप्रतिसाद नक्की माझ्या प्रतिसादाला दिला आहे का ? की अनवधानाने ? माझ्या प्रतिसादात नेमके काय राहून गेले की आपण शेवटच्या परिच्छेदातील भावना माझ्या प्रतिसादाचा उपप्रतिसादात आली ? कुठे चुकले ते कळावे म्हणजे अधिक नेमके पणाने संवाद साधता येईल .

कळावे संवाद साधावा हि नम्र विनंती.

माहितगार's picture

11 Oct 2018 - 3:21 pm | माहितगार

...नाना तुमच्या घरी अभिनय शिकवायला आला आणी तुमच्या स्त्री सदस्याना सारखे स्पर्श करून नाच शिकवू लागला तर येथील पुरूष सदस्य काय करतील? हाकलून देतील की नाना तसा नाही म्हणून सहन करत राहतील?...

माईसाहेब मुद्दा कंसेंट कंसेंट आणि कंसेंटचाच आहे. पहिली कंसेंट ज्या व्यक्तीला नृत्य शिकवले जात आहे त्याची/तिची दुसरी कंटेंट घर/जागा मालक अथवा भाडेकरुची. कंसेट असेल तर रहावे नसेल हाकलावे , अर्थात घर या वास्तुच्या मालकाला वास्तुचा मालक या नात्याने ठेवण्याचे अथवा हाकलण्याचे अधिकचे आधिकार अंशतः असू शकतात.

गुरु शिष्य नात्यात शुचितेचे दृष्टीकोण शिष्यांच्या व्यक्तिगत दृश्टीनुसार बदलते असू शकतात आणि त्यानुसार कंसेंट बदलू शकते. शिष्याची परवानगी असून गुरु स्पर्ष करत असेल तर आभाळ कोसळ्ले म्हणणारे नैतिक सुभेदारी करणारे काझी कोण ? कंसेंट नसेल तर अशा गुरुंना टाटा अगत्याने करावे.

मायनर्स साठी कंसेंटचा ऑप्शन उपलब्ध नसण्याची मोठी शक्यता असू शकते.

ट्रम्प's picture

12 Oct 2018 - 10:34 am | ट्रम्प

" नाना तुमच्या घरी अभिनय शिकवायला आला आणी तुमच्या स्त्री सदस्याना सारखे स्पर्श करून नाच शिकवू लागला तर येथील पुरूष सदस्य काय करतील? हाकलून देतील की नाना तसा नाही म्हणून सहन करत राहतील? "
माई , स्रियांवर होणाऱ्या अन्यायबद्दल तुमचा सात्विक संताप समजू शकतो पण आपले मुद्दे ' योग्यच ' आहेत हे सिद्ध करण्यासाठी या धाग्यावर चर्चा करणाऱ्या पुरुषांचा उद्धार करून काय फायदा ?

वरील तुमचे वाक्य वाचून चाळीतील नळावर एकमेकांची धुणी धुणाऱ्या बायकांची आठवण झाली .

भविष्यात सनी ताईवर असा धागा निघाल्यावर वरील वाक्य तुम्हाला उद्देशून कोणी वापरले तर चालेल का ? विचार करून च त्रास होतो ना ? तुमच्या श्रेष्ठत्वचा आब तुम्हीच ठेवला पाहिजे .

रस्त्यावर चालताना एखादया मुलाने डोळा मारला तर त्याच्या कानफटात लावतील अशा स्वाभिमानी मुली आपल्याला पूर्वी आणि आताही भरपूर दिसतील , रस्यावरची मुलगी कानाखाली लावू शकते मग या महिलांनी त्याच वेळी अन्याय करणाऱ्याच्या कानाखाली का नाही लावली ? नाही लावली कारण बऱ्याचजनींनी स्वाभिमान गहाण ठेऊनच त्या क्षेत्रात प्रवेश केलेला असतो

त्यामुळे तारकांची लाफडेबाजी व त्यावर शेरे मारताना विनाकारण इतर मिपासदस्यांना कस्पटासमान लेखू नका ही विनंती .

माहितगार's picture

11 Oct 2018 - 3:05 pm | माहितगार

...दुसऱ्या बाजूने विचार करता तिला काम नाही मिळालं तरी चालेल पण असल्या तडजोडी करणार नाही असं म्हणायचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे दोष कोणा एकावर ठेवणे योग्य नाही....

आपल्याला '...त्यामुळे दोष कोणा एकावर ठेवणे योग्य नाही....' या वाक्यातून नेमके काय म्हणायचे आहे ते निटसे उमगले नाही.

....म्हणजे एक होतकरू मुलगी ऑडिशनला गेली आणि तिथल्या एखाद्या निवडीचे अधिकार असलेल्या व्यक्तीने तिला सांगितलं की तुला काम देईन पण त्याची इच्छा पूर्ण करायला लागेल. काम मिळवण्यासाठी नाईलाजाने का होईना पण तिला त्याची इच्छा पूर्ण करायला लागली. वर ती राजीखुशीने करत आहे असा अभिनय पण करायला लागला तर तिची 'कंसेंट' होती असं म्हणायचं का? ...

या बाबत नेमके कायद्यांचे बारकावे माहित नाहीत पण इंडियन काँट्रॅक्ट अ‍ॅक्ट नुसार इतर कायद्यानुसार बेकायदेशीर असलेले काँट्रॅक्ट अ‍ॅक्ट नुसारही सहसा अग्राह्य होते , आणि स्त्री पिळवणूक विरुद्ध कायद्यांनुसार आपण म्हणता तशी अट अधिकृतपणे घालणे बहुधा बेकायदेशीर ठरावे.

आता एखाद्या स्त्रीने काम मिळवण्यासाठी स्वतःहून स्वतःस अर्पण केले तर त्यास कायद्याचा नाईलाज असेल कायद्यास तिथे प्रोटेक्ट करणे अवघड जाईल.

उदाहरणार्थ सध्याच्या मीटू मध्ये एका लेखिकेचे मनोगत आले आहे ज्यात काही वेळा नटाने विदाउअट कंसेंट कृत्य केल्याचे म्हटले आहे , कंसेंट नसलेले नटाचे कृत्य बेकायदेशीर असेल. पण त्याच नटाकडे सध्या इतर काम नाही काम तर पाहीजे म्हणून लेखिका स्वतंहूनही एकदा गेली असे म्हणते, अशा वेळी तिने स्वतःहून कंसेंट दिली असे होते. कारण कायद्याच्या भूमिकेतून तो काम देत नसेल तर कायद्याचा मार्ग त्या स्त्रीने स्विकारावयास हवा होता अथवा दुसरे काही काम दुसरीकडे तिला शोधता आले असते.

(आधीच्या एका मिपासदस्य सामान्य नागरीक या प्रतिसादकाचा हा दृष्टीकोण की चित्रपटात काम केलेल्या जवळपास सर्वच नट स्टेज बाह्य कंसेंटच्या मार्गाने चित्रपटसृष्टीत पोहोचत असणार हा अनावश्यक सरसकट दोषारोपणाचा आणि अस्पृहणीय आहे हे आधीच्या त्यांना दिलेल्या प्रतिसादातून नोंदवायचे राहीले आहे . चर्चा चालू आहे तर येथे नोंदवून ठेवतो)

अर्थात पडद्या मागच्या कंसेंटची आपण हकनाक चर्चा करत आहोत असे वाटते. तनुश्री प्रकरणात स्टेज बाह्य कंसेंटचा प्रश्न नाही , स्टेजवरील कंसेंट बाबतच्या करारात काय होते आणि काय नव्हते हा प्रश्न असावा .

चुभूदेघे . कायदे विषयक अचूकतेचा दावा आणि सल्ला नाही उत्तरदायीत्वास नकार लागू.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 Oct 2018 - 4:11 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

नाच न येणार्या पुरूष अभिनेत्याने अभिनेत्रीला सारखा हात लावावा, ज्या नाचात त्या स्टेप्स नव्हत्या त्या घुसडवाव्यात.... कसला कन्सेण्ट घेऊन बसलात ? डोके ठिकाणावर असणारा दिग्दर्शक असता तर चार कान्फटात मारून नानाला हाकलून दिला असता . पण तो सारंग नानाचा जुना मित्र होता.

.....कसला कन्सेण्ट घेऊन बसलात ? .....

आपण तनुश्री दत्तांच्या सर्व मुलाखती नीटपणे पाहिल्यात का ? ती स्वतःपण कंसेंट बद्दलच बोलते आहे. तिच्या पहिल्याच चित्रपटात इम्रान हश्मी हिरो होता. त्याच्या सोबतच्या शुटींग बद्दल तिचे काही आक्षेप दिसत नाहीत म्हणजे प्रोड्यूसर दिग्दर्शकाने करारात व्यवस्था केलेली असेल किंवा करार कंसेंटने बदलला असेल. या चित्रपटाच्या करारात पूर्व प्रावधान कंसेंट नव्हती एवढाच विषय आहे. (चॉकलेट हिरो नसल्याने नाना पाटेकरांना तिने कंसेंट व्यावसायिक दृष्टीने कंसेंट देण्याचे तिला टाळावयाचे असू शकते.

दिग्दर्शक आणि नाना इरेला पडण्यात आणि तिने नाकारण्यात बहुधा इगो क्लॅश आणि व्यायसायिक गणित अधिक असावे. म्हणजे दिग्दर्शकाच्या अथवा नानाच्या काही चुका झाल्या असतील तर नाकारायच्या असे नव्हे.

भारतीय लोक परंपरेने शुचितेच्या अंगाने विचार करत असावेत आणि स्वतः तनुश्रीची गणिते कंसेंट, व्यावसायिक गणित अधिक महत्वाचे असासोब, शुचितेचा मुद्दा बॅक ऑफ माइंड नसेलच असे नाही कारण त्या संबंधाने तिचे सिने सृष्टी बद्दल पूर्वग्रह असावेत आणि इम्रान हश्मी वगैरे तरुण स्मार्ट अ‍ॅक्सेप्टेबल हिरोंबाबत बाबत शुटींग करताना शुचितेचे मुद्दे करारात (कंसेंट) असेल तर तिने डायल्यूट होऊ दिले असावेत. असे तनुश्रीच्या निवड स्वातंत्र्याचा आदर ठेऊनही म्हणावेसे वाटते.

तिला आधीच सिनेसृष्टीबाबत पुर्वग्रह होते त्यात आयटम साँगबद्दल अधिक पूर्वग्रह होते, असे तिच्या मुलाखतींवरुन जाणवते. त्यामुळे नाना पाटेकर किंवा इतर कुणाच्या अ‍ॅक्टींग कौशल्याने प्रभावित होणे झाले नसावे . ह्यामुळेच नानांसोबतच्या आता पर्यंतच्या इतर हिरॉईन स्त्री सहकलाकारांच्या तक्रारी आल्या नसाव्यात पण तनुश्री नानाच्या अभिनय कौशल्याने प्रभावित होण्या एवजी पुर्वसाशंकीत किंवा पुर्वग्रहीत असण्याची शक्यता असावी असे वाटते.

...पण तो सारंग नानाचा जुना मित्र होता....

दिग्दर्शक महोदयांना इतर पण मित्र असतील ना पण प्रत्येक मित्राचा आग्रह दिग्दर्शक पूर्ण करतो का ? चित्रपट आणि मालिका लीड कलाकारांवर अवलंबून असतात एकदा चित्रपटाच्या शुटींगचा मोठा भाग झाला की लीड कलाकार बदलणे छोट्या निर्माता दिग्दर्शकांना महागाचे असू शकते हा घटक मित्र असण्यापेक्षा अधिक प्रभावी असावा.

दिग्दर्शक हा ही कलाकार असतो, चित्रपट निर्मिती ते नृत्य दिग्दर्शन एक कला निर्मिती प्रक्रीया आहे. कला निर्मिती प्रक्रीयेत एखाद्या दृश्य ते नृत्य यात बदल करण्याचा प्रिरॉगेटीव्ह दिग्दर्शकाचा असणे स्वाभाविक असते. - शक्य आहे कि नाना पाटेकरांना खूश ठेवण्यासाठीही बदल करण्याचा प्रयत्न असेल - पण कलाकार हे माझ्या करारार नाही किंवा करारत असुनही करार मोडू इच्छिते हे म्हणण्यस तनुश्री किंवा इतर कलाकार स्वतंत्र असू शकतात. पण करार बदलण्याची चर्चा करण्याचा नव्या स्टेप कलेच्या गरजेच्या दृष्टीने जोडण्याचा आधिकार दिग्दर्शकासही आहे. स्टेप्स बदलण्याची चर्चाच का केली हे म्हणणे सयुक्तिक नाही . करारात नसलेल्या स्टेप्स आहेत क्षमा करा मी निघाले एवढे तनुश्रीस करता येते. म्हणून इथे मतांतर होते.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 Oct 2018 - 6:05 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"करारात नसलेल्या स्टेप्स आहेत क्षमा करा मी निघाले एवढे तनुश्रीस करता येते. म्हणून इथे मतांतर होते. "
तिने तेच तर केले आणी ती गाडीत जाउन बसली. त्या आधी नाच कसा करयचा हे नाना तिला शिकवू पाहात होता. नानाने जास्तच जवळीक करयचा प्रयत्न केल्यावर ती साहजीकच चिडली. आणी ईथेच नानाचा व दिग्दर्शकाचा ईगो दुखावला.
मुख्य मुद्दा म्हणजे नृत्यदिग्दर्शक असताना नानाला तिला नाच शिकवायची काय गरज? कारण एकच "मी शहाणा" . नवतारका हे एकवेळ सहन करतील पण मिस. ईंडिया वगैरे जिंकलेल्या मुली हे सहन करणार नाहीत.

माहितगार's picture

11 Oct 2018 - 7:46 pm | माहितगार

आता एक बघा,

समजा १) अगदी अशाच ( खर्‍या किंवा काल्पनिक) इतिहास कालीन घटनेवर एक दिग्दर्शक चित्रपट बनवतोय , आणि या चित्रपटात नाना पाटेकर आणि तनुश्री सह कलाकार आहेत. आणि दिग्दर्शकाच्या स्टोरी नुसार नाना पाटेकरने तनुश्रीला दंडाला धरुन स्टेजवर वेग वेगळ्या ठिकाणी जाऊन नाचण्यास सांगावयाचे आहे . आता कथा पटच तसा असेल तर तनुश्रीला नाना पाटेकरचा तो अभिनय स्विकारण्या वाचून प्रत्यवाय रहात नाही.

समजा २) पटकथेत विनोदा खातर डान्स न येणारा हिरो नृत्यांगनेस चुकीच्या स्टेप कशा शिकवतो हे दाखवायचे आहे तर सह कलाकार म्हणून तनुश्रीस ते स्विकारावे लागले असते की नाही ?

आता हे तिला ती संपूर्ण चित्रपटासाठी सहकलाकार असती तर स्विकारण्यावाचून पर्याय राहीला नसता कारण चित्रपट कलाकाराच्या कामाचा आणि कराराचा भाग राहीला असता. (त्याच वेळी स्टेजच्या बाहेर ही वर्तने संमती शिवाय झाली तर बे कायदेशीर ठरु शकतात)

नाना पाटेकरांच्या सोबतच्या या केस मध्ये काँट्रॅक्ट अ‍ॅक्ट नुसार तिने केवळ सोलो डान्स साठीचा करार केला म्हणून प्रॉब्लेम झाला. या केस मध्ये मुख्य प्रॉब्लेम दिग्दर्शकाच्या अथवा प्रोड्यूसरच्या बाजूस ब्रीच ऑफ काँट्रॅक्ट आणि अंशतः ब्रीच ऑफ ट्रस्ट असू शकतो.

नाना पाटेकर करार माहित असून तसे वागले अथवा करार महित नसून वागले या मुद्द्यास यामुळेच महत्व प्राप्त होते. कारण सर्वसाधारण परिस्थितीत स्टेजवर कलाकारांना आणि नानासाठी नानाचे वर्तन सामान्य ठरणारे असू शकते. आणि म्हणून ज्यांना तनुश्री ओव्हर रिअ‍ॅक्ट करते आहे असे वाटते त्यातही तथ्य आहे त्याच वेळी करारच्या मर्यादा माहित असून नानाचे वर्तन तसे राहिले असेल तर कायद्याचे बाजूलाही ठेऊन स्पृहणिय ठरेलच असे नाही.

त्यामुळेच आधीच्या प्रतिसादातून मी या इंडस्ट्रीच्या लिबरल आर्टचे स्वरुप समजून घेऊन कोड ऑफ कंडक्ट आणि काँट्रॅक्ट चे अधिक आदर्श नमुन्यांच्या उपलब्धतेची गरज नमुद केलेली आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 Oct 2018 - 8:45 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

कारण सर्वसाधारण परिस्थितीत स्टेजवर कलाकारांना आणि नानासाठी नानाचे वर्तन सामान्य ठरणारे असू शकते

इथे तसे नव्हते. तनुश्रीने जेव्हा प्रथम तकार केली तेव्हा दिग्दर्शक व ईतरानी तिला- " तुझा प्रोब्लेम समजू शकतो पण नाना ज्येष्ठ कलाकार आहे ना" थोडक्यात नानाला कोणी समज दिली तर नाना त्याच्या स्वभावानुसार चित्रपट सोडून गेला तर मोठे नुकसान. म्हणून "तू जरा सहन कर" म्हणजे नानाचे वर्तन त्यानाही मान्य नव्हते ते नाईलाजाने सहन करत होते.

अभ्या..'s picture

11 Oct 2018 - 9:41 pm | अभ्या..

तनु आणि नानु अनुक्रमे माई आणि मागा आहेत असे उगीच वाटून गेले.
.
असतील ही, काही सांगता येत नाही.

माहितगार's picture

11 Oct 2018 - 9:48 pm | माहितगार

आमच्याकडे ज्येष्ठता आणि कला दोन्ही नाही , तो मक्ता आपणास सप्रेम भेट ;)

माहितगार's picture

11 Oct 2018 - 10:15 pm | माहितगार

...नाना त्याच्या स्वभावानुसार चित्रपट सोडून गेला तर...

चित्रपट सोडून गेलातर ची भिती असू शकते , मान्यय. 'स्वभावानुसार' या बिरुदवली साठी काही आधार आहेत का ? मिडिया ट्रायल नाही ना ? ( चित्रपटांमध्ये माझी विशेष रुची नसते म्हणून विचारतोय )

...म्हणजे नानाचे वर्तन त्यानाही मान्य नव्हते ते नाईलाजाने सहन करत होते....

तसे असेल तर प्रोड्युसर आणि दिग्दर्शक दहा वर्षांनंतर कशाला सपोर्ट करत बसले असते ? असा एक प्रश्न शिल्लक रहातो .

एका पाठोपाठ एका पेक्षा अधिक स्त्री कलाकार / पत्रकार अलोकनाथ आणि एम जे अकबर बद्दल बोलू लागले तेवढी संख्या आज या घटके पर्यंत तरी नाना पाटेकरांच्या वाटेला आलेली दिसत नाही. अर्थात इतर स्त्री सहकलाकारांचे उघड समर्थनही अद्याप नानांना मिळालेले दिसत नाही हे पण मान्य करावे लागेल.

माहितगार's picture

11 Oct 2018 - 10:18 pm | माहितगार

स्त्री आणि पुरुष दोन्ही तारे तारकांच्या एवढ्या एक्सेंट्रीसिटीजना निर्माता दिग्दर्शकांना नेहमीच तोंड द्यावे लागत असणार. अर्थात इंडस्ट्रीत कामाला सुरवात होतानाच कोड ऑफ कंडक्टच्या क्लचरची सवय लावणे हाच यावर अधिक सुयोग्य उपाय असावा असे वाटते.

ट्रेड मार्क's picture

13 Oct 2018 - 2:58 am | ट्रेड मार्क

करारात काय कुठल्या स्टेप्स कुठल्या गाण्यात करणार इतक्या डिटेल मध्ये लिहिलेले असते का? काय काम असेल याची साधारण रूपरेषा, सर्वसाधारण कामाच्या वेळा याचबरोबर दिग्दर्शक सांगेल त्याप्रमाणे काम करावे असे पण एक कलम असेल ना? स्त्री कलाकारांच्या साठी अंगप्रदर्शन करणार नाही, आयटम सॉंग करणार नाही वगैरे अधिकची कलमे असतील. पण पूर्ण सिनेमातले सगळे सीन व गाणी आणि त्यात कोण काय करणार असं कॉन्ट्रॅक्ट करणं अवघड आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे मानसिक दृष्ट्या सामान्य माणूस आपल्या रोजच्या जीवनात आपण काही चला आज आता कोणाला तरी त्रास देऊ किंवा आज कोणाला तरी छेडू किंवा आज मारामारी करू अश्या उद्देशाने घराबाहेर पडत नाही. उद्या जर ऑफिसमध्ये एक स्त्री आणि पुरुष एकत्र काम करत असतील आणि त्या दोघांना मिळून आज एक काम पूर्ण करायचं आहे. त्या स्त्रीला जर एक काम जमत नाहीये म्हणून तो पुरुष सहकारी तिला समजावून सांगतो आहे. १० वेळा सांगून झालं तरी काम नीट होत नाही म्हणून वैतागून त्या पुरुष सहकाऱ्याने नुसतं तिला सहज खांद्याला हात लावून बाजूला केलं आणि स्वतः ते काम करायला बसला. यावर ती स्त्री नाराज झाली व त्यातून मला जमत नाही हे लपवायला आणि "हा कोण मला शिकवणारा" या भावनेने त्या मुलीने तक्रार केली की याने मला नको तिथे स्पर्श केला. मग बाकी सगळं राहिलं बाजूला आणि सगळे त्या पुरुषाच्या मागे लागतील.

माझ्या वरच्या एका प्रतिसादात मी सर्वजीतची केस सांगितली आहे. तो काय आज एका मुलीला छेडू म्हणून घराबाहेर पडला असेल का? थोडक्यात सांगायचा उद्देश काय तर परिस्थिती तशी तयार होत जाते आणि मग प्रतिक्रिया म्हणून आपण काही तरी कृती करतो जी समोरच्याला काही कारणाने ऑफेन्सिव्ह वाटू शकते. इंटेन्शन काय आहे हे महत्वाचं. माझा एक म्यानेजर होता तो मुद्दामून मुलींना हात लावायचा, डेस्कवर अगदी चिकटून उभं राहायचा. त्याचा उद्देश उघड होता.

मुख्य मुद्दा म्हणजे नृत्यदिग्दर्शक असताना नानाला तिला नाच शिकवायची काय गरज? कारण एकच "मी शहाणा"

माई तुम्ही मी टाकलेला व्हिडीओ नीट बघितला का? ही बातमी पण वाचा. नृत्य दिग्दर्शकाने पण तिला बरेच वेळा स्टेप्स दाखवल्या. त्यात तिने Sexual Harassment सारखा गंभीर आरोप लावला आहे. समजा असं समजू की नाना सेट वर गेला आणि तिचा हात धरून तिला नाच शिकवू लागला. हे एकवेळ अशिष्ट वर्तन म्हणता येईल. नानाने काही अश्लील चाळे केले किंवा अश्लील बोलला असं काही दिसत नाही किंवा तनुश्री सुद्धा तसं काही म्हणत नाहीये. इथे मी शहाणा चा प्रश्नच येत नाहीये कारण नृत्य दिग्दर्शक, सिनेमा दिग्दर्शक आणि इतर सहाय्यकांनी पण तिला स्टेप्स दाखवायचा तसेच चेहऱ्यावर हावभाव आणावे म्हणून प्रयत्न केला.

मी कोणाची बाजू घेतोय असं नाही पण प्रश्न हा आहे की १० वर्षांपूर्वीची गोष्ट सिद्ध कशी करणार? सहकलाकाराचा हात धरून नाचणे हा #मीटू इतका गंभीर गुन्हा कधीपासून झाला? तिने जरी १० वर्षांपूर्वी पण तक्रार केली होती तरी त्यातून काही सिद्ध झालं होतं का? त्याहून महत्वाचा प्रश्न म्हणजे तक्रार केली म्हणजे समोरचा दोषीच असणार हा दृष्टिकोन का? तुम्ही एखादा व्यवसाय स्वीकारता तेव्हा त्यातील लिखित व अलिखित नियम तुम्हाला माहित पाहिजेत. सिनेमा क्षेत्रात असूनही अंगप्रदर्शन करणार नाही किंवा उत्तेजक दृश्य करणार नाही असे सांगून निभावणाऱ्या पण नट्या आहेतच.

अर्धवटराव's picture

10 Oct 2018 - 7:47 pm | अर्धवटराव

तनुश्री आणि नाना, दोघांपैकी कुणीच बोलत असल्याचं खोटं वाटत मला. (नानाच्या अभिनयाबद्दल तनुश्रीने उद्गार थोडे बाजुला ठेऊया)

अवांतरः "मीपण" चे लोण माननीय मोदिजींपर्यंत कधि पोचतेय याची वाट बघतोय.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

10 Oct 2018 - 7:51 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मानसी सोनी ह्या नावाने आंतर्जालावर शोध घेतलात तर बरेच काही सापडेल. अमितभाई शहा जिच्यावर पाळत ठेऊन होते ती हीच तरूणी. तू-नळीवर अमित शहा व तत्कालिन गुप्तचर अधिकारी जी.एल.सिण्घल ह्यांचे संभाषण उपलब्ध आहे.

माहितगार's picture

10 Oct 2018 - 8:36 pm | माहितगार

तनुश्रीची अर्णव गोस्वामीला दिलेली अलिकडची मुलाखत , आणि नाना पाटेकरांची २००८ मधली पत्रकार परिषद दोघेही खरेच बोलत आहेत असे गृहीत धरुन दोन दोनदा पुन्हा पहा काय झाले असेल याचा अदमास येण्यास मदत व्हावी असे वाटते.

अर्धवटराव's picture

10 Oct 2018 - 8:42 pm | अर्धवटराव

पण वाक्यरचनेकडे थोडं लक्ष्य द्या अर्धवटराव. मिपाकर उदार मनाने अर्थ समजुन घेतात हे त्यांचं मोठेपण.

माहितगार's picture

10 Oct 2018 - 8:46 pm | माहितगार

नेमकं कुठे आणि काय बिघडलय ?

अर्धवटराव's picture

10 Oct 2018 - 9:44 pm | अर्धवटराव

तनुश्री आणि नाना, दोघांपैकी कुणीच बोलत असल्याचं खोटं वाटत मला.

मुक्त विहारि's picture

11 Oct 2018 - 3:48 pm | मुक्त विहारि

ज्यांनी फिल्लम लाईन फार जवळून बघीतली आहे, त्यांनीच लिहिलेला खालील लेख, फिल्लम लाईन बद्दल बरेच काही सांगून जाईल.

https://www.loksatta.com/yeh-hai-mumbai-meri-jaan-news/article-about-yeh...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 Oct 2018 - 4:15 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"पण कपूर चांगले आहेत" हे वाक्य वाचले व लेख वाचयचा थांबवला. राज कपूर्/शम्मी कपूर/आपले राजा गोसावी! सध्या हिरो असते तर 'मी टू' मध्ये त्यांच्याविरुद्ध डझनावारी तक्रारी आल्या असत्या.

प्रकाश घाटपांडे's picture

11 Oct 2018 - 4:21 pm | प्रकाश घाटपांडे

माईसाहेब तुमच्या काळात हि या गोश्टी घडत होत्या. ओझरते उल्लेख त्या काळच्या साहित्यात दिसतात म्हणे

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 Oct 2018 - 4:45 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

चित्रपटान्,नाटकात काम करयची ईच्छा आहे असे कोणी घरात साण्गितले की घरातले लोक बदडून काढायचे.. ह्याचे कारण हेच.

विश्वामित्रांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातल्या काहींनी तर माफीसुद्धा मागितली. यातल्या कुणाकुणाला क्लीन चीट देणार आता इथले काही आयडी?

तनुश्री दत्ताने सुरुवात केल्यामुळे निदान बर्‍याचजणी पुढे तरी आल्या आहेत. सिनेमा क्षेत्रात हे होणं अनपेक्षित नसले तरी बर्‍याच बातम्या धक्कादायक आहेत. आलोक नाथ आणि विकास बहलबद्दलच्या तर बातम्या वाचून त्या प्रसंगांतून जाणार्‍या स्त्रियांची मानसिक स्थिती काय असेल याचा विचार केला तरी अंगावर काटा येतो! आणि सगळ्याच जणी आताच, खूप वर्षांनंतर हे आरोप करत आहेत असंही नाहीये. अगदी सोशल मिडिया नसेल वापरलं तरी निदान काहींनी कुणाकडे तक्रार केलीच होती, पण त्याची दखल घेतली गेली नाही किंवा त्यांना गप्प राहण्याचा सल्ला दिला गेला.

"स्वतःच्या फायद्या साठी काही जणी पुरुषांना मोहात पाडण्याचा प्रयत्न करतात , आणि समस्त स्त्री वर्ग बदनाम होतो .", " देव आणि ऋषींना तो मोह सोडता आला नाही तिथे नाना काय करणार ?" असला डिफेन्स बघून तर काय बोलावे हेच कळत नाही!

बायका गप्प राहिल्या तर "इतकी वर्षे गप्प का होत्या?" , आणि बोलल्या तर "आता कायदा त्यांच्या बाजूने आहे, बिचार्‍या पुरुषांनी काय करायचे?" असे प्रश्न!
तसे तर विकास बहल बद्दल बॉलिवूडमध्ये सगळ्यांनाच माहीत होतं म्हणे, तरी आता या बायका बोलल्यावर इम्रान खान आणि अर्जुन कपूर पुढे आलेतच ना ते कबूल करायला.

मुळात सेक्शुअल हॅरॅसमेंटकडे लोक "स्त्री विरुद्ध पुरुष" या अँगलमधूनच बघायचे टाळले तरी बरे होईल. बाकी ते "बॉलीवूड विरुद्ध मराठी चित्रपट सृष्टी" तर कैच्याकैच आहे!

माहितगार's picture

12 Oct 2018 - 9:09 am | माहितगार

मिपा सदस्य ट्रम्प यांचा हा प्रतिसाद उपहासात्मक असावा असे प्रथमदर्शनी वाटते.

माहितगार's picture

12 Oct 2018 - 10:24 am | माहितगार

'सिनेमा क्षेत्रात हे होणं अनपेक्षित नसले तरी ...' हे उपरोक्त प्रतिसादातील वाक्य. आणि मिपा आयडी सामान्य नागरिक यांच्या प्रतिसादातील क्रमांक २ चे वाक्य दोन्ही चित्रपट सृष्टीबद्दल पुर्वग्रह दर्शवत नाहीत का ? मिडियातील वृत्तांच्या प्रभावाने तात्कालिककाळाची उबळ व्यक्त करणे ठिक आहे. पण एकुण सामाजिक संस्कृतीत जे असते तेच कमी अधिक प्रमाणात सर्वच क्षेत्रात असणार नाही का ?

मुळात सेक्शुअल हॅरॅसमेंटकडे लोक "स्त्री विरुद्ध पुरुष" या अँगलमधूनच बघायचे टाळले तरी बरे होईल. याच्याशी सहमत. निवड स्वातंत्र्य आणि कंसेंट या बाबत स्त्रीयांच्याही कल्पना अद्यापी पुरेश्या क्लिअर नसतात, कायद्यांचे बारकावे आणि न्यायव्यवस्थे विषयक अज्ञान आणि अनास्था आहे. त्याच वेळी वाढत्या संधींसोबत प्रत्येक क्षेत्रात पुरुषांसोबत काम करण्यास मिळत आहे. निवड स्वातंत्र्य आणि कंसेंट कायदे याचा अवेरनेसचा अभाव सोबत सामाजिक संस्कार कमी पडलेल्या मुल्ये पायदळी तुडवणार्‍यांशी पाला पडणे याचा रिझल्ट अंशतः असा नकारात्मक वृत्तांनी वेगवेगळ्या क्षेत्रातून पुढे येत राहील. याचा अर्थ सर्वच लोक सर्वच क्षेत्रे वाईट आहेत असा नसावा. चित्रपट सृष्टीतील अनेक परिवारातील दुसर्‍या पिढीतील स्त्रिया चित्रपट सृष्टीत काम करतच आहेत म्हणजे सगळेच काही परफेक्ट नसले तरी सगळेच वाईटही नसावे. सध्याच्या बातम्यांच्या लगोलग फिल्म फेडरेशनने स्त्री कलाकार सुरक्षेच्या दृस्।तीने काही महत्वपूर्ण पाऊलांची घोषणाही केली आहे.

विश्वामित्रांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातल्या काहींनी तर माफीसुद्धा मागितली. यातल्या कुणाकुणाला क्लीन चीट देणार आता इथले काही आयडी?

विश्वामित्रांची संख्या जी असावयाची तिच असते, ते आता बातम्यात आले आहेत एवढेच. आरोपांची खरी निश्चिती आणि खर्‍या क्लिन चिट या केवळ न्यायसंस्थे कडून येत असाव्यात. प्रबोधनाच्या दृष्टीने तात्कालीक उत्साह ठिक पण व्यक्तिचरीत्रांच्या लिंचींग साठी मिडिया सोशलमिडीयाचा उपयोग आदर्शवतच असेल असेही नसावे.

.."इतकी वर्षे गप्प का होत्या?" , आणि बोलल्या तर "आता कायदा त्यांच्या बाजूने आहे, बिचार्‍या पुरुषांनी काय करायचे?"

हे दोन्ही प्रश्नांचे स्वरुप स्वतंत्र, एकमेकांची पालुपदे नसणारे असू शकावे. ज्या पिडीतांच्या उपयोगासाठी कायदे असतात त्यांना त्याचे ज्ञान आणि आस्थाही नसते, आणि कायद्याम्चा गैरफायदा घेणारे गैर फायदा घेऊन मोकळे होतात तेव्हा आता कायदा त्यांच्या बाजूने आहे, बिचार्‍या पुरुषांनी काय करायचे?" अशा प्रकारची भावना आणि दुसर्‍या दिशेची अनास्था (कि तिरस्कार?) रुजण्याचा धोका असतो.

"इतकी वर्षे गप्प का होत्या?" हा प्रश्न पूर्णतः वाजवी नसला तरी, एक पिडितांच्या स्वतःच्याच न्याय्य आधिकारासाठी कमी महत्वाचा नाही. दुसरे पिडितांचे कायदे विषयक स्वतःचे अज्ञान आणि न्यायसंस्थे विषयक अनास्था याचे निदर्शक आहे. बर्‍याच केसेस मध्ये पिडितांचा परिवारातील संवादाचा ते मानसशास्त्रीय समुपदेशनाचा ते सामाजिक जागृतीचा अभावाचे निदर्शक ही असावे.

http://indiankanoon.org सारखे संस्थळावरील कोर्ट केसेस चे निकाल शोधले तर एकीकडे अशिक्षीत स्त्रीया कायदा आणि न्याय व्यवस्थेचा लाभ घेताना दिसतात तर दुसरीकडे इन्व्हेटीगेटीव्ह जर्नलीझम , स्टिंग ऑपरेशन हि ज्यांची जबाबदारी त्या स्त्री पत्रकार मुकपणे सहन करताना दिसतात. असे का होत असावे ? एन.डि. तिवारी विरुद्ध स्टिंग ऑपरेशन करुन राज्यपालपाअवरुन घालवता येते. एम.जे. अकबर विरुद्ध एकही स्टिंग ऑपरेशन का नाही झाले ? तो चक्क हॉटेल रुमचे दरवाजे सत्ताड उघडे ठेऊन .. कमाल आहे. एक जर्नलीस्ट गप्प राहीली त्या नंतर दुसरी त्या नंतर तिसरी आता पर्यंतचा मीटू आकडा डझनच्या वरुन गेला आहे म्हणे. पहिल्यातल्याच काही गप्प राहील्या नसत्या स्टींग ऑपरेशन केले असते तर नंतरच्या सुटल्या नसत्या का ? गप्प रहाण्या मागील अडचणी अंशतः समजता येतात , गप्प रहाण्याचे पूर्ण समर्थन अनाकलनीय ठरत नाही ना ?

एम.जे. अकबर प्रकरणातील कंसेंट , व्यावसायिक अनैतिकता आणि कायदेशीर काय बे कायदेशीर काय ह्यातील बारकावे समजून घेण्याची गरज असावी. आली ना बातमीत नावे तर सर्व काही सारखेच या भूमिकेने या सोशल मिडिया चर्चांचा कायदे विषयक बारकाव्यां बद्दल जागरुकतेत काय मदत होणार . केवळ नव्या दुसर्‍या गंभीर बातमीने मिडिया भरुन जात नाही तो पर्यंतचेच मीटू मीटू आणि त्या नंतर काय पहिले पाढे पंचाव्वन्न ?

पुष्करिणी's picture

11 Oct 2018 - 11:23 pm | पुष्करिणी

खाली दिलेल्या लिंक वर वाचून प्रकरण बरंच गुंतागुंतीचं वाटतंय
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1861554973897898&id=10000130...

अभिजित - १'s picture

12 Oct 2018 - 4:05 pm | अभिजित - १

http://www.kractivist.org/tanushree-duttas-fir-against-nana-patekar-what...
गाण्या मध्ये नसतानाही नानाची घुसखोरी , ४ थ्या दिवशी गाण्यात बदल. तनुश्री ची exit . तिला दिली धमकी . हे आज लोकसत्ता मध्ये पण आले आहे. पण त्याची लिंक मिळत नाही. कि गायब करण्यात आली , माहित नाही. मिळाली तर देईन .

Tanushree says the film shoot began on March 23 and Nana Patekar stayed on the sets during a song shooting even though his part was long over.

The alleged harassment took place on the fourth day of the shoot on March 26, she says.

“In between the shots, there were around 100 supporting staff including junior artists, dancers and others and Nana Patekar, against my will and consent, started grabbing me by the arms and pushing me around on the pretext of teaching me how to dance, even though he is not the choreographer… he was touching (me) indecently and unnecessary in front of everybody, but nobody objected and all were complicit in this behavior by being silent spectators,” she alleges.
Nana Patekar allegedly told the choreographer and other artists to back away so he could teach her steps.
नाना डान्स एक्स्पर्ट कधी झाला ? रावडी / कोंबडी डान्स वेगळा. हे सेक्सी आयटम सॉन्ग वेगळं. कि नाना मोठा नट म्हणुन त्याला सगळं येतं असं समजून माफ ?

In 2008, Tanushree’s father Tapan Kumar Dutta had filed an FIR when she allegedly underwent the ordeal and her car was attacked while exiting the sets of ‘Horn Ok Pleasss

अभिजित - १'s picture

12 Oct 2018 - 4:26 pm | अभिजित - १

https://www.thenewsminute.com/article/everyone-knew-said-nothing-tanushr...
Tanushree alleged that Nana Patekar got the makers to add an "intimate step" in what would have been her solo song in 'Horn Ok Pleassss', just so he could touch her.
“He had no business being on set, it was my solo sequence. But there he was… pulling me my arms, teaching me the dance,”
“His antics started from day one. I complained to director and producer that I was facing a lot of problems because of him and they should tell him to stay away from me. He had no business being on set, it was my solo sequence. But there he was… pulling me with my arms, teaching me the dance,”
Then Nana Patekar wanted an “intimate step” to be added to the song
Tanushree refused to do the "intimate step" with Nana Patekar. Her parents came on set to pick her up.

"My father told them, let's shoot with a calm mind tomorrow, go and think over the solution in the night. My daughter will not do an intimate step with this man (Nana Patekar)

https://www.facebook.com/janice.sequeira.9/posts/10156557889786000

I got hold of #NanaPatekar to get a sense of what was happening. All he said was, “Meri beti jaisi hai, mere beti jays hai”, which didn’t really make sense at that point.

Eventually, Tanushree’s parents arrived to pick her up. Her car was attacked, the windshield broken. I tried to get in touch with Tanushree to get her version of events. Around midnight, she asked me to come to her place. In tears, she narrated what happened.

गांधी घराण्याला रिटायर करुन तनुश्रीला काँग्रेसचे आध्यक्ष आणि काँग्रेसची पंतप्रधानपदाची उमेदवार बनवता आले तर बर होईल. कमीत कमी भारतीय लोकशाही वंशपरंपरागतेतून बाहेर पडण्यास मदत होईल आणि काँग्रेसी राजकारणाला जरा नवा चेहरा मिळेल.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

12 Oct 2018 - 5:49 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

हे काय आता नविन? नाना मराठी आहे, शेतकर्याना मदत करतो वगैरे सगळे मान्य. पण येथे नाना चुकलाच .. वेड पांघरून पुरावे द्या, कन्सेट वगैरे कशाला ते?
ती तनुश्री देशपांडे असती व तो नाना खान किंवा नाना कपूर असता तर हीच भूमिका घेतली असती का?

...कन्सेट वगैरे कशाला ते?...

याचे उत्तर कुणि तनुश्री समर्थक महिला सांगू शकेल का ?

....ती तनुश्री देशपांडे असती व तो नाना खान किंवा नाना कपूर असता तर हीच भूमिका घेतली असती का?...

माई, काही मुलींची स्थिती या मुळे अवघड असते की आया भयंकर जावई शोध लावतात. :) (ह. घ्या.) तनुश्री देशपांडे असती व तो नाना खान जोडी साठी आमचे विश्लेषण तसेच राहील बदलणार नाही.

आजच या धाग्यात अस्मादिकांनी हिंदूत्व वाद्यांवर टिका केली आहे . प्रश्न एकतर्फी चष्मे लावणार्‍यांचा आहे.

तनुश्री खान असली काय देशपांडे असली काय किंवा अजून कुणा जाती धर्माची, तनुश्री गांधी घराण्याला रिटायर करुन तनुश्रीला काँग्रेसचे आध्यक्ष आणि काँग्रेसची पंतप्रधानपदाची उमेदवार झाली पाहिजे यावर सकारात्मक समर्थक भूमिका घेऊन दाखवा. विषय बदलू नका. :)

आणि ते पुराव्यांचे राहीलेच की, गांधी घराण्याच्या वंशवादाच्या ग्रहणातून भारतीय लोकशाही मुक्त होणार असेल तर आपण म्हणता तसे तनुश्रीला अगदी खान करुन, काँग्रेस अध्यक्ष व पंतप्रधानापदाचे उमेदवार करुन नाना पाटेकरांसोबत न्यायालयीन निकाल आणि पुराव्यांशिवाय समस्त वंशपरंपरागत राजकीय घराण्यांची जेलभरो करण्यास आमची ना नाही. नाना पाटेकरांनीही वंशवादातून भारतीय लोकशाही मुक्त होण्यासाठी त्याग अवश्य करावा.

अजून एक महत्वाचे आम्ही हिंदी-मराठी चित्रपट रसिक अथवा नानांचे फ्यानपण नाही हे आपल्या सामान्यज्ञानाच्या मदतीसाठी.

कुठे त्या सिनेमावाल्यांच्या नादाला लागून वेळ खर्च करता सगळं पैसे आणि प्रसिद्धी साठी कायपण करतील

ट्रम्प's picture

12 Oct 2018 - 10:03 pm | ट्रम्प

You tube वर तनुश्री च्या fir च्या कॉपी उपलब्ध आहेत . त्यात ते मीडिया चॅनेल , कॅमेऱ्याची मोडतोड चां उल्लेख आहे असं कळलं .
या वादाची सुरवात करताना दोन दिवस मनसे च्या नावाने बोंबलत होती मग तनुश्री ने आता पुन्हा नाना च्या विरोधात तक्रार दिली पण मनसे च्या विरोधात का नाही दिली ?
एक नक्की आहे आता जर कलर्स ने तिला बिगबॉस मध्ये घेतलं तर बिगबॉस चा सेट तुटणार आणि #me too चा विश्वास उडणार .

माहितगार's picture

12 Oct 2018 - 10:37 pm | माहितगार

बीग बॉस बहुतेक मागे पडलय पण गूगल ट्रेंड्स चेक केले तर तनुश्री दत्तांची गुगल शोध प्रीयता या महिन्यात भारतात राहुल गांधीपेक्षा वाढली आहे म्हणून मी तनुश्रीला नेहरु-गांधी घराण्याला रिटायर करायला जमेल म्हणालो. सोबतच आमेरीकेत सुद्धा तिची शोधप्रीयता वाढताना दिसते आहे. आमेरीकेत तिला कुणि ओळखत नव्हते पहाता पहाता आमेरीकेत तिची गिगल शोध प्रियता प्रियांका चोप्रा सोबत मॅच करु लागली आहे. तिला या विवादातील प्रसिद्धीने आमेरीकेतच काम मिळण्याच्या संधी वाढण्याची शक्यता दिसते. भारताच्या वाट्याला नोबेल सुद्धा येऊ शकते तेव्हा तिला राहुल गांधींची जागा घेऊ द्यावे आणि भारताला या निमीत्ताने एखादे नोबेल मिळू द्यावे असे वाटते. तेवढेच परकीय चलन भारताला या निमीत्ताने लाभले तर हरकत नसावी.

अर्धवटराव's picture

12 Oct 2018 - 10:46 pm | अर्धवटराव

आता तर असं वाटतय कि बॉलीवुड (किंवा कुठलंही प्रसिद्धी विश्व म्हणुया) एका ठिणगेचीच वाट बघत होतं. रोज नवीन बातम्या येताहेत राव. यातुन काहितरी चांगलं घडावं हिच अपेक्षा. नाहितर याचाही 'आप' व्हायचा.

माहितगार's picture

12 Oct 2018 - 11:32 pm | माहितगार

मला चित्रपट सृष्टीतील नावे नीटशी माहित नाहीत, पण उदाहरनार्थ एक बातमी विकास बहल नामक व्यक्तिच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने विकास बहल यांची बाजू घेऊन स्टेटमेंट दिलेले दिसते त्यात त्या , विकास बहल जर चांगली व्यक्ती नाही तर त्याच्या सोबत फ्रेंडली संवाद नाचाचे कार्यक्रम इत्यादी कसे चालू रहाते ? असे ९ एक प्रश्न विचारताना दिसतात. र्‍हितीक रोशनच्या बाबतीतही पूर्व पत्नीने त्याची बाजू घेतली होती असे आठवते. अशा पद्धतीने काही फसव्या केसेस जरी पुढे आल्यातर सर्व गाजावाजाची क्रेडीबिलीटी संपुष्टात यावयास लागते.

संस्थात्मक पातळीवर फिल्म फेडरेशन, एडीटर्स गिल्ड आणि मनेका गांधीचे खाते काही महत्वपुर्व पाऊले उचलताना दिसते. अशा सकारात्म्क बाबीही होतील नाही असे नाही.

मोठी स्टार मंडळी आरोपी कलाकार, दिग्दर्शकांसोबत काम न करण्याचा निर्णाय घेताहेत. हे लोक्स आपल्या सहयोग्यांच्या कृष्णकृत्याबद्दल अनभिज्ञ खचीतच नसतील आतापर्यंत. आगोदरच अशा कलंकीत मंडळींसोबत काम न करण्याचं धाडस दाखवलं नाहि यांनी. आता मिडीया ट्रायलला प्रतिसाद देत आपापली कामं थांबवताहेत. नॉन्सेन्स.

......अनभिज्ञ खचीतच नसतील आतापर्यंत.

असेही असू शकेल.

कदाचित, "मी मारल्यासारखे करतो, तू रडल्या सारखे कर." असे पण असू शकेल.