इथे गूढ अंधार दाटून येता, तिथे तारकांचे दिवे लागले
मिटताच डोळे हे होतील जागे, पुन्हा आठवांचे थवे मागले
जुनी तीच ओढ, जुनी तीच उर्मी, जुनी तीच ती आर्त व्याकुळता
भरुनी अकस्मात अस्मान येते नि जाते कडाडून विदयुल्लता
दिसेना कुणाला तिच्या अंतरीचे, फुत्कारते जीवघेणे प्रकार
"तिळा तिळा" मी किती घोकतो पण उघडीत नाही का हे कवाड
अस्वस्थ आसू ठिबकतो अबोल, डोळ्यांमध्ये उतरते रक्त का ?
पितांबरात घुसमटे एक काया, ये कंठात बावनकशी हुंदका
मनाच्या तळाशी उदसताच पाणी, त्या वेदनांचा का पूर होतो ?
चातकाप्रमाणे आतुर कोणी, उध्वस्त तेव्हा गझल पीत जातो
-- विशाल
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2414
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
"अस्वस्थ आसू ठिबकतो अबोल,
धन्यवाद
In reply to "अस्वस्थ आसू ठिबकतो अबोल, by अथांग आकाश
खासच
धन्यवाद
In reply to खासच by श्वेता२४