✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

फिफा वर्ल्ड कप २०१८

क
कपिलमुनी यांनी
Tue, 05/29/2018 - 14:34  ·  लेख
लेख
fifa यंदाचा फिफा वर्ल्ड कप रशिया मध्ये खेळवला जाणार आहे. भारत या खेळात मागे असला तरी भारतामध्ये या खेळाचे चाहते खूप संख्येने आहेत. यंदा निवडणूकांमुळे या वर्ल्ड कपची वातावरण निर्मिती म्हणावी तशी झाली नाही. यंदाचा वर्ल्ड कप रशिया मध्ये १४ जून पासून सुरू होणार आहे. त्याची माहिती आणि चर्चा करण्यासाठी हा धागाप्रपंच या वर्षी एकूण ३२ टीम भाग घेणार आहेत . ( रशिया ही यजमान टीम आहे त्यामुळे त्यांना क्वालिफाय ना खेळता सहभाग मिळतो असे विकिने सांगितले , भारताला या प्रकारे आयोजन करून सहभागी व्हावे लागेल :) ) Groups इटली , नेदरलँड आणि चिलि या बलाढ्य टीम यंदा नसतील . या खेळात कोणतेही भाकीत करणे अवघड आहे . यंदाच्या स्ट्राँग टीम जर्मनी , फ्रान्स आणि पोर्तुगाल आहेत ब्राझील , पोर्तुगाल आणि अर्जेंटीना या एकाद्या दुसर्‍या खेळाडू वर अवलंबून आहेत . ते ब्लॉक झाले तर यांचा परफॉर्मन्स ढासळतो पण ते ( नेमार , रोनाल्डो , मेस्सी) चालले तर मात्र टीम जोशात येतात. डार्क हॉर्स : पोलंड , उरुग्वे , कोस्टा रीका यांचे भाकीत करता येणे अवघड आहे ह्या टीम धक्का देत सेमि फायनल पर्यंत पोचू शकतात प्रत्येक देशाचे खेळाडू , व्यूहरचना , गोलकीपर , प्रशिक्षक यावर प्रतिसादात अपडेट करेन आणि सर्वांनी त्यात भर घालावी ! यंदाच्या फिफा वर्ल्ड कपचा शुभंकर mascot
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
49335 वाचन

💬 प्रतिसाद (161)

प्रतिक्रिया

दर चार वर्षांनी ( लीप यिअर)

कंजूस
Tue, 05/29/2018 - 15:31 नवीन
दर चार वर्षांनी ( लीप यिअर) येणारा कप कोणता?
  • Log in or register to post comments

इजिप्त आणि मोहम्मद सलाह

डॉ.नितीन अण्णा
Tue, 05/29/2018 - 16:25 नवीन
हा वर्ल्ड कप इजिप्त आणि मोहम्मद सलाह चा असेल
  • Log in or register to post comments

पण

अभिदेश
Tue, 05/29/2018 - 18:26 नवीन
तो खेळू शकला तर. रविवारच्या फायनल मध्ये जखमी झालाय (की मुद्दाम केलाय) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.नितीन अण्णा

कालच्या रशिया विरुद्ध

sagarpdy
Wed, 06/20/2018 - 08:29 नवीन
कालच्या रशिया विरुद्ध पराभवाने इजिप्त स्पर्धेबाहेर जाणार हे जवळपास नक्की झालंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.नितीन अण्णा

वा ! मज्जा . पर्वणी आली

दुर्गविहारी
Tue, 05/29/2018 - 17:46 नवीन
वा ! मज्जा . पर्वणी आली म्हणायची. बाकी शुभंकर कोणता प्राणी आहे हे समजले नाही?
  • Log in or register to post comments

झाबिवाका वोल्फ आहे. झाबिवाका

अभ्या..
Tue, 05/29/2018 - 17:54 नवीन
झाबिवाका वोल्फ आहे. झाबिवाका म्हणजे रशिअनमध्ये"द वन हु स्कोअर्स" असे दिसतेय लिंकवर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी

जमल्यास एखादी म्याच बघण्याचा

टवाळ कार्टा
Wed, 05/30/2018 - 01:14 नवीन
जमल्यास एखादी म्याच बघण्याचा प्रयत्न करण्यात येईल
  • Log in or register to post comments

ना कळल्यास

कपिलमुनी
Wed, 05/30/2018 - 01:27 नवीन
काही न कळल्यास मोकळेपणाने शंका विचार हो टका !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

जशी सवड मिळेल तसे या धाग्यात

मदनबाण
Wed, 05/30/2018 - 06:58 नवीन
जशी सवड मिळेल तसे या धाग्यात भर घालण्याचा प्रयत्न करीन... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- The Weeknd, Kendrick Lamar - Pray For Me (Lyric Video)
  • Log in or register to post comments

या वेळी सामन्यांच्या वेळा

sagarpdy
Wed, 05/30/2018 - 10:34 नवीन
या वेळी सामन्यांच्या वेळा देखील सोईस्कर आहेत. बहुतांश सामने संध्याकाळी आहेत. मागच्या वेळी रात्री उशिरा होते. https://www.indiancrux.info/2017/06/2018-fifa-world-cup-complete-match-schedule-india-time.html बेल्जीयम देखील चांगला संघ आहे. कदाचित इंग्रजांना चेपून ग्रुप G मध्ये पहिले येऊ शकतात आणि उपांत्यपूर्व फेरी नक्की गाठतील, कदाचित उपांत्य देखील.
  • Log in or register to post comments

वेळापत्रक

कपिलमुनी
Wed, 05/30/2018 - 19:01 नवीन
Group Stage : 2018 FIFA World Cup Schedule in IST #noDateTime(IST)Team AScoreTeam BResult 114 June 201808:30pmRussia--Saudi Arabian/a 215 June 201805:30pmEgypt--Uruguayn/a 315 June 201808:30pmMorocco--Irann/a 415 June 201811:30pmPortugal--Spainn/a 516 June 201803:30pmFrance--Australian/a 616 June 201809:30pmArgentina--Icelandn/a 716 June 201806:30pmPeru--Denmarkn/a 817 June 201812:30amCroatia--Nigerian/a 917 June 201805:30pmCosta Rica--Serbian/a 1017 June 201808:30pmGermany--Mexicon/a 1117 June 201811:30pmBrazil--Switzerlandn/a 1218 June 201805:30pmSweden--South Korean/a 1318 June 201808:30pmBelgium--Panaman/a 1418 June 201811:30pmTunisia--Englandn/a 1519 June 201805:30pmColombia--Japann/a 1619 June 201808:30pmPoland--Senegaln/a 1719 June 201811:30pmRussia--Egyptn/a 1820 June 201805:30pmPortugal--Moroccon/a 1920 June 201808:30pmUruguay--Saudi Arabian/a 2020 June 201811:30pmIran--Spainn/a 2121 June 201805:30pmDenmark--Australian/a 2221 June 201808:30pmFrance--Perun/a 2321 June 201811:30pmArgentina--Croatian/a 2422 June 201805:30pmBrazil--Costa Rican/a 2522 June 201808:30pmNigeria--Icelandn/a 2622 June 201811:30pmSerbia--Switzerlandn/a 2723 June 201805:30pmBelgium--Tunisian/a 2823 June 201808:30pmSouth Korea--Mexicon/a 2923 June 201811:30pmGermany--Swedenn/a 3024 June 201805:30pmEngland--Panaman/a 3124 June 201808:30pmJapan--Senegaln/a 3224 June 201811:30pmPoland--Colombian/a 3325 June 201807:30pmUruguay--Russian/a 3425 June 201807:30pmSaudi Arabia--Egyptn/a 3525 June 201811:30pmIran--Portugaln/a 3625 June 201811:30pmSpain--Moroccon/a 3726 June 201807:30pmDenmark--Francen/a 3826 June 201807:30pmAustralia--Perun/a 3926 June 201811:30pmNigeria--Argentinan/a 4026 June 201811:30pmIceland--Croatian/a 4127 June 201805:30pmMexico--Swedenn/a 4227 June 201807:30pmSouth Korea--Germanyn/a 4327 June 201811:30pmSerbia--Braziln/a 4427 June 201811:30pmSwitzerland--Costa Rican/a 4528 June 201807:30pmJapan--Polandn/a 4628 June 201807:30pmSenegal--Colombian/a 4728 June 201810:30pmPanama--Tunisian/a 4828 June 201811:30pmEngland--Belgiumn/a
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

ही एक्सेल शीट कशी एम्बेड केली

यशोधरा
Fri, 06/01/2018 - 11:59 नवीन
ही एक्सेल शीट कशी एम्बेड केली? म्हणजे केली असल्यास..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

HTML

कपिलमुनी
Sat, 06/02/2018 - 01:33 नवीन
हा HTML टेबल आहे. कोड कॉपी पेस्ट आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

फिफा मॅच टेबल ट्रायल - excel

कंजूस
Fri, 06/15/2018 - 22:11 नवीन
फिफा मॅच टेबल ट्रायल - excel Link:https://jumpshare.com/v/z1XEwLqLvxq7QGrLuUwS आलेला फाइल डेटा कॅापी करून नवीन excel sheet मध्ये पेस्ट केल्यास excel तयार होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

इटली आणि नेदरलॅंड!!!!

असंका
Wed, 05/30/2018 - 15:59 नवीन
इटली आणि नेदरलॅंड!!!!
  • Log in or register to post comments

Drone captures

मदनबाण
Wed, 05/30/2018 - 20:05 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- The Weeknd, Kendrick Lamar - Pray For Me (Lyric Video)
  • Log in or register to post comments

हे असं गाणं, नाय का ह्यावेळी?

जेम्स वांड
Wed, 05/30/2018 - 20:44 नवीन
हे २०१० चं ऑफिशियल गाणं नव्हतं पण ऑफिशियल गाणे (शकीराचं वाक्का वाक्का) पेक्षा लैच जास्त हिट झालं होतं.
  • Log in or register to post comments

LIVE IT UP!

नावातकायआहे
गुरुवार, 05/31/2018 - 09:14 नवीन
(Official Song 2018 FIFA World Cup Russia) https://www.youtube.com/watch?v=kFMZUxX6K6o
  • Log in or register to post comments

बेल्जियम????

वाचूका
गुरुवार, 05/31/2018 - 09:41 नवीन
या कपमधे फ्रान्स , बेल्जियम्मय, पोलंड यासारख्या डार्क होर्स टीम पाहन्यात मजा येईल.
  • Log in or register to post comments

फिफा चे स्टार

कपिलमुनी
Mon, 06/11/2018 - 15:10 नवीन
लिओनेल मेस्सी Image removed. मागच्या फायनल मध्ये जर्मनी कडून अर्जेंटीनाला पराभव पत्करावा लागला होता . मेस्सीला मॅरेडोनाच्या पंगतीत बसायचे असेल तर हा कप जिंकणे महत्वाचे असनार आहे. शिवाय पुढच्या वर्ल्ड कप पर्यंत तो असेल याचि खात्री नाही. ख्रिस्तियानो रोनाल्डो Image removed. २०१६ च्या युरो कप विजेतेपदानंतर पोर्तुगालला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे . UEFA कप जिंकल्यावर रोनाल्डोचा आत्मविश्वास वाढला असेल . सध्याच्या घडीचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून रोनाल्डो चे नाव घेतात , पण टीम वर्क मध्ये पोर्तुगाल कमी पडते. मोहम्मद सलाह Image removed. इजिप्शियन किंग म्हणून ओ ळखल्या जाणार्‍या मोहम्मद सलाह वर इजिप्त ची मदार असेल . यंदा लिव्हरपूलला फायनल पर्यंत पोचवण्यात याचा मोठा वाटा होता. सलाह राईट फॉरवर्ड पोझिशनला खेळतो . मागच्या ३-४ वर्षापासून सलाह चा पर्फोर्मन्स उत्तम आहे. UEFA च्या फायनल मध्ये दुखापतग्रस्त झाल्याने याच्या खेळण्याविषयी शंका आहे . अजून सलाह ने सराव सामन्यात भाग घेतला नाही आणि इजिप्तने बदली खेळाडू जाहीर केला नाहि. सलाह ने यंदा खेळून प्रेक्षकांना आनंद द्यावा हीच इच्छा . नेमार , सुआरेझ , ओझिल , पोग्बा, मुलर , कोस्टा याबद्दल पुढच्या प्रतिसादात !
  • Log in or register to post comments

मागच्या फायनल मध्ये जर्मनी

एस
गुरुवार, 06/14/2018 - 22:35 नवीन
मागच्या फायनल मध्ये जर्मनी कडून अर्जेंटीनाला पराभव पत्करावा लागला होता .
मागच्या जागतिक फुटबॉल चषकाच्या अंतिम सामन्यात जर्मनीने ब्राझीलला ४-० असे पराभूत केले होते ना? की माझी माहिती चुकीची आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

अच्छा, ब्राझील उपांत्य फेरीत

एस
गुरुवार, 06/14/2018 - 22:41 नवीन
अच्छा, ब्राझील उपांत्य फेरीत हरलं होतं ७-१ ने. अंतिम सामन्यात जर्मनीने अर्जेंटिनाला १-० ने हरवलं होतं. माझी माहिती चुकीची निघाली! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

पोच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/11/2018 - 19:53 नवीन
फुटबॉलचा चाहता म्हणून धाग्यावर लक्ष असेल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

फीफा २०१४ ची आठवण

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/11/2018 - 19:59 नवीन
मिपावर फीफा २०१४ चा आम्ही चालवलेल्या धाग्याची आठवण. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वावा काय तो धागा काय त्याचा

कंजूस
गुरुवार, 06/14/2018 - 19:03 नवीन
वावा काय तो धागा काय त्याचा पीळ!!
  • Log in or register to post comments

गो....ल

Ranapratap
गुरुवार, 06/14/2018 - 20:52 नवीन
पहिला गोल
  • Log in or register to post comments

रशिया

कपिलमुनी
Fri, 06/15/2018 - 01:13 नवीन
रशियाने पहिला सामना सौदी अरेबिया विरुद्ध 5-0 असा जिंकला आहे. चुरस होईल असे वाटत असताना घरच्या प्रेक्षकांच्या पाठिंब्यावर रशियाने वर्चस्व राखले . उद्या इजिप्त आणि उरुग्वे यांच्यात सामना आहे . मोहम्मद सलाह च्या फिटनेस बद्दल अजून शंका आहे. उद्या उरूग्वेचे पारडे जड आहे. उद्या आक्रमक खेळ पाहायला मिळेल अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments

आजचा सामना इराण-मोरोक्को

Ranapratap
Fri, 06/15/2018 - 22:37 नवीन
सुरवातीला दबकत खेळणारी इराणी टीम 30 मिनिटं नंतर जोरदार खेळायला लागली व जिंकली सुद्धा, पहिला स्वयं गोल मोरोक्को कडून
  • Log in or register to post comments

पोर्तुगाल विरुद्ध स्पेन -

एस
Sat, 06/16/2018 - 00:26 नवीन
पोर्तुगाल विरुद्ध स्पेन - पोर्तुगाल २-१ ने पुढे.
  • Log in or register to post comments

बरोबरी! रोनाल्डोच्या तुलनेत

एस
Sat, 06/16/2018 - 00:46 नवीन
बरोबरी! रोनाल्डोच्या तुलनेत कोस्टाचे दोन्ही गोल जास्त आवडले. हा प्रतिसाद लिहीपर्यंत स्पेन ने तिसरा गोल केला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

३-३.

एस
Sat, 06/16/2018 - 01:16 नवीन
३-३.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

रोनाल्डोचा equaliser

विअर्ड विक्स
Sat, 06/16/2018 - 12:53 नवीन
फ्री किक अप्रतिम . रोनाल्डिन्हो च्या फ्री किकची आठवण आली. गोल किपर स्तब्ध !!!
  • Log in or register to post comments

क्रोएशिया २-० ने विजयी.

निशाचर
Sun, 06/17/2018 - 02:26 नवीन
क्रोएशिया २-० ने विजयी. नायजेरियाचा एक सेल्फ गोल :(
  • Log in or register to post comments

अर्जेंटिना

Ranapratap
Sun, 06/17/2018 - 11:01 नवीन
यामध्ये मेसीचा खराब परफॉर्मन्स, पेनलटी किक मिस केली, ज्या प्रकारे आईसलँड ने लढत दिली ते पाहुन तो संघ दुबळा असेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

बाइसिकल किक पाहायची आहे.

कंजूस
Sun, 06/17/2018 - 18:53 नवीन
बाइसिकल किक पाहायची आहे.
  • Log in or register to post comments

जर्मनी-मेक्सिको

Ranapratap
Sun, 06/17/2018 - 22:25 नवीन
माजी विजेत्या सारख जर्मनी खेळली नाही, मेक्सिको 1-0ने विजयी, संपूर्ण सामान्य मध्ये जर्मनीला सूर गवसला नाही, तसेच त्यांच्या आघाडी फळी मध्ये समन्वयाचा आभाव आढळला.
  • Log in or register to post comments

भ्रमनिरास ......

II श्रीमंत पेशवे II
Tue, 06/19/2018 - 11:25 नवीन
ज्या प्रमाणे जर्मन टीम बद्दल बोलले जात होते त्याप्रमाणे त्यांचा प्र्फोर्मंस दिसला नाही ....... मी माझ्या मुलाजवळ जर्मनी टीम बद्दल भरभरून बोललो होतो .....तो पाचवीला आहे ....या वेळेस माझ्या बरोबर पहिल्यांदा फुटबॉल ची म्याच पहात होता ..... पण त्याच्या अगोदर च्या ( १४ तारखेपासून ) २-३ सामन्यानच्या अनुभवावरून त्याला जे काही कळले , त्यावर त्यानि माज्याशी पैज लावली १०० रुपयाची मला म्हणाला बाबा तुम्ही एव्हढ कौतुक केलं टीम च ....पण मला तर बकवास प्रदर्शन पहायला मिळाल ....मला नाही वाटत ते जिंकतील .....आणि आम्ही म्याच पाहता पाहता त्याला म्हणालो अरे तुला अजून माहित नाही ति टीम अशी आहे तशी आहे ,,,हा प्लेअर असा आहे ....वगैरे..... १२ - १५ मिनिटात त्यांनी माझ्याशी पैज लावली आणि अखेर तो जिंकला सांगायचा मुद्दा असा कि जरी जर्मन टीम पाहिला सामना हरली आहे .....तरीही त्यामागे त्यांचे काहीतरी प्लान असेल ........असणार ते कधी कसे मुसंडी मारतील याचा काही नेम नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ranapratap

खेळाच्या सुरुवातीपासूनच चेंडू

कंजूस
Mon, 06/18/2018 - 05:18 नवीन
खेळाच्या सुरुवातीपासूनच चेंडू मेक्सिकोकडे,जर्मनी गोलपोस्टवर,आजुबाजूला,जर्मनीची वाचवण्याची धडपड पाहून समजलं हरणार.
  • Log in or register to post comments

अनपेक्षित

कपिलमुनी
Mon, 06/18/2018 - 13:37 नवीन
अर्जेंटिना , जर्मनी , ब्राझिल यांच्या मॅच बघून हा वर्ल्ड कप सोपा नाही हे बलाढ्य सांघांना कळले असेल.
  • Log in or register to post comments

36 वर्षांनी पेरू पाहिला ......

II श्रीमंत पेशवे II
Tue, 06/19/2018 - 11:34 नवीन
पेरू ची टीम आणि त्याचं प्रदर्शन पाहून खूप छान वाटले ...... आता जे टीम मध्ये आहेत ते जन्माला आल्यापासून पेरू ची टीम क्वालिफाय होत नव्हती .......त्यांनी पूर्वजांच्या गोष्टी ऐकत उराशी एक स्वप्न बाळगत प्रचंड तयारी करून टीम मैदानात उतरली .....नुसती उतरली नाही तर मस्त परफोरमन्स हि दिला .....ज्या पद्धतीने डिफेन्स आणि शोट डिलिवरी केली ते खरच कौतुकास्पद आहे. पेरू टीम कडून खूप काही अपेक्षा आहेत
  • Log in or register to post comments

ट्युनिसियाचा गोलकीपर का गेला

कंजूस
Tue, 06/19/2018 - 12:38 नवीन
ट्युनिसियाचा गोलकीपर का गेला बाहेर ते कळलं का?
  • Log in or register to post comments

‘व्हीएआर’

महासंग्राम
गुरुवार, 06/21/2018 - 13:51 नवीन
‘व्हीएआर’ यंदा पासून स्पर्धेत VAR चा वापर सुरु झाला आहे, इतिहासात ही स्पर्धा ‘व्हीएआर’ तंत्रज्ञानाच्या उगमासाठी ओळखली जाईल. लोझका रशियात सुरू असलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे लोझका हे अधिकृत वाद्य आहे. रशियन चमच्यांच्या साहाय्याने बनवण्यात आलेले हे वाद्य रशियातील अनेक चित्रपट तसेच गाण्यांसाठीही वापरण्यात आलेले आहे. रशियन संस्कृतीचे प्रतीक म्हणून लोझका ओळखले जाते. दोन लाकडी चमचे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने बांधून निर्माण होणाऱ्या आवाजावर सध्या संपूर्ण रशिया ताल धरत आहे. या वाद्याचे शिल्पकार रुस्तोम नुगमनोव्ह यांना ट्रेशचोटका, श्ॉकर आणि लोझका या तीन वाद्यांपैकी एकावर मेहनत घेण्यास रशियन सरकारने सांगितले होते. त्यापैकी लोझकाची निवड करून बनवण्यात आलेल्या गाण्याला ‘स्पून्स ऑफ व्हिक्टरी’ असे नाव देण्यात आले.
  • Log in or register to post comments

आज अर्जेंटिना विरुद्ध

महासंग्राम
गुरुवार, 06/21/2018 - 17:24 नवीन
आज अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया लढत आहे, मेस्सीची जादू चाललीच पाहिजे कारण आज अर्जेंटिना जिंकले तरच त्यांना पुढच्या फेरीत जाता येईल
  • Log in or register to post comments

अर्जेटिना बाहेर, क्रोएशिया ३

राघवेंद्र
Fri, 06/22/2018 - 01:47 नवीन
अर्जेटिना बाहेर, क्रोएशिया ३-० असे हरविले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

बाहेर नाही हो, अजूनही संधी

sagarpdy
Fri, 06/22/2018 - 09:08 नवीन
बाहेर नाही हो, अजूनही संधी आहे. नायजेरिया आणि आईसलँड संघांच्या कामगिरी वर अवलंबून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

नायजेरिया आणि आइसलँड ची मॅच

महासंग्राम
Fri, 06/22/2018 - 09:46 नवीन
नायजेरिया आणि आइसलँड ची मॅच आहे, त्यामुळे पुढील शक्यता आहेत आइसलँड जिंकल्यास अर्जेंटिना बाहेर. जर नायजेरिया जिंकल्यास आइसलँड, अर्जेंटिना आणि नायजेरिया यांचे समान गुण होतील तेव्हा सरासरी ( गोल पोस्ट वर शॉट्स, बॉल हँडलिंग इ.) लक्षात घेवून पुढच्या फेरीत कोण जाईल हे ठरवल्या जाईल बहुदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

कोणता खेळाडु किती किमि पळतोय

कंजूस
गुरुवार, 06/21/2018 - 19:47 नवीन
कोणता खेळाडु किती किमि पळतोय हे समजतय ते कशामुळे?
  • Log in or register to post comments

मॅट्रिक्स

महासंग्राम
Fri, 06/22/2018 - 09:55 नवीन
फिफा एका इटालियन कंपनी ने बनवलेली मॅट्रिक्स नावाच्या व्हिजुअल ट्रॅकिंग टेक्नोलॉजी वापरते. ज्यात पोर्टेबल ऑप्टिकल ट्रॅकिंग कॅमेराचा वापर केला जातो. त्यांची वेबसाईट . http://www.deltatre.com/onstage-solutions/matrics/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

क्रोशियाचा खेळ भयानक होता.

कंजूस
Fri, 06/22/2018 - 14:21 नवीन
क्रोशियाचा खेळ भयानक होता. अर्जेंनिचाचा चेंडू काढून घेत होते. मेस्सीला गुंडाळण्याचा विचार न करता उत्तम हल्ले केले. अर्जेंटिनावाले फक्त आss!!???
  • Log in or register to post comments

ब्राझीलचा अप्रतिम खेळ

Ranapratap
Fri, 06/22/2018 - 19:33 नवीन
80 व्या मिनिटा पर्यंत शांत खेळणारे ब्राझिलचे खेळाडू अचानक वेगवान चाली करायला लागले,90 व्या मिनिटाला कुटीन्हो व भरपाई वेळेत नेमार ने गोल केला, फार दिवसातून नेमारचा गोल पाहिला. एकूणच काय तर ब्राझील विजेतेपदाचा प्रबळ दावेदार.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा