भारत बायकांसाठी अवघड देश आहे ...
भारत बायकांसाठी अवघड देश आहे ..... आणि ह्याचं मूळ आपल्या विचारसरणीत आहे.हि दोन विधाने पिलीयन रायडर यांच्या दुसर्या एका धागा प्रतिसादातून घेतली आहेत . शीर्षकात पहिले वाक्य वापरले तरी चर्चेचा मुद्दा दुसरे वाक्य आहे. तिकडे त्यांनी एलॅबोरेट केलेले नाही तरी दुसरे विधान मला अंशतः मान्य आहे पण सरसकट मान्य नाही परस्त्री कडे आदराने पहाण्या बद्दलचे सुसंस्कारही ह्याच भारतीय भूमीत केले जातात. पण एनी वे १) विचारसरणीत कोणते बदल व्हावेत असे तुम्हाला वाटते ? २) स्त्री अत्यचारांवर रिअॅक्ट करणारे अनेक , स्त्री स्वातंत्र्य आणि संबांधीत स्त्रीयांच्या स्वाभीमानापलिकडे जाऊन , शुचिता आणि कौटूंबीक , समुह, जात, धर्म, भाषा इत्यादी ओळखींच्या स्वाभीमानावरुन रिअॅक्ट होत नाहीत ना अशी साशंका वाटते असे असणे स्त्री स्वातंत्र्य आणि स्वाभीमान विषयक सकारात्मक विचार सरणीस कितपत पोषक आहे ? ३) प्रत्येक घटना घडल्या नंतर शीक्षा वाढवा शीक्षा बदला किंवा विना चौकशी शिक्षा द्या अशा मागण्या होताना दिसतात , कायदा व्यवस्थे पलिकडे जाऊन पुरुषांवरील सामाजिक संस्कार हा विषय चर्चेत कमी येतो , शिक्षा स्वरुप बदलत जाणे पुरेसे आणि स्त्री स्वातंत्र्यास खरेच पोषक असते का ? पुरुषांवरील सामाजिक संस्कार यात काय बदल व्हावेत ? ४) ह्या विषयावर सामाजिक राजकीय दबाव निर्माण करण्या एवढ्या चर्चा निश्चतच गरजेच्या आहेत , पण अती चर्चांनी तेही स्वातंत्र्यास बाधा न आणता सुरक्षा कशी वाढवावी या वर फोकस नसणार्या पोकळ चर्चांनी स्त्रीयांमध्ये भितीचे वातावरण निर्मिती होत नाही ना ? भिती चे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून चर्चांचे स्वरुप कसे असावे ? * आता वरचे धागा शीर्षक आहे , ते कमतरतांकडे लक्ष्य वेधण्यास यशस्वी होते पण ते सुरक्षेची भावना निर्माण करते का ? किंवा भिती च्या वातावरणाची निर्मिती करणारी जोड देणार नाही हे कसे पहायचे ? * माझी एक धागा चर्चा स्त्री पोषाख, स्त्री-पुरुष संबंध आणि (अ)सुरक्षिततेचा सांभाळ दुवा ज्यात चर्चेसाठी काही प्रश्नही दिले आहेत त्यांचा येथील चर्चेत काही उपयोग होत असल्यास पहावे . किंवा त्या धाग्यावर लिहायचे असल्यास हरकत नाही. * या चर्चेत सहभागी अत्याचारांची निखालस निंदाकरतात असे गृहीत धरले आहे . त्यामुळे इमोशनल बाजू पेक्षा वैचारीक बाजूने चर्चा या धाग्यात अभिप्रेत आहे. * दुसर्या देशांशी तुलना अभिप्रेत नाही , आपल्या देशात काय सुधारण्णा असाव्यात यावर फोकस असावा .
वर्गीकरण
प्रतिक्रिया
संशयित व गुन्हेगार
गा.पै.,
काही सायलेंट गृहीतके नको
प्रथमदर्शी पुरावे
शिवराय न्यायकर्तेही होते आणि
बरोब्बर
इथे कुठला पुरावा कुणाकडे निर्देश करतो हे ठरवायचे काम न्यायालय असताना दुसर्याने का करायचे?आता कसं बरोब्बर बोललात. सध्या हे काम आधीच काही ठराविक लोक करून टाकत आहेत ना? परत आपल्याला पाहिजे तास निकाल नाही लागला तर न्यायालयाच्या विश्वासार्हतेवर पण प्रश्न विचारला जातो.सत्य काय आहे ते ठरवायचा अधिकार एखाद्या व्यक्तीने/जमावाने घेतला तर हीच पध्दत प्रत्येक जण अनुसरेल.आपली वृत्तपत्रे, न्यूज चॅनेल्स, पुरोगामी विचारवंत आणि कलाकार हाच तर अधिकार हातात घेत आहेत आणि त्यालाच तर आमचा आक्षेप आहे. त्यावर ते फक्त त्यांच्या अजेंड्याला पुष्टी मिळेल एवढंच सत्य म्हणून ठासून सांगतात. इथे तर संपूर्ण देश आणि धर्माला वाईट ठरवलं जातंय.फिर्यादीच्या नातेवाईकांनी ठरवायचे का कुणी तपास करायचा ते? मग आरोपीच्या नातेवाईकांनी अजुन कुणाकडे तपास द्या म्हनले तर?कठुआच्या या घटनेत सगळेच गावकरी सीबीआय कडे तपास द्या म्हणत आहेत. फिर्यादी (पीडित) कुटुंब आणि त्या जमातीतले इतर लोक सुद्धा तीच मागणी करत आहेत. मग फक्त काही न्यूज चॅनेल्स, काही राजकारणी आणि पुरोगाम्यांना फक्त त्या पुजाऱ्यालाच आधीच गुन्हेगार का ठरवायचंय?भारतीय आणि हिंदू
आणि विशेष म्हणजे इंडिया किंवा
नागा संस्कृती प्लस आणि मायनस
परस्त्री कडे आदराने पहाण्या बद्दलचे सुसंस्कारही ह्याच भारतीय...
ढोंगी संस्कार?
मुलीकडे बहिणीसारखं बघायला लावणारे शाळेतले संस्कार
असं कसं कुठल्याही मुलीकडे
हा ढोंगीपणा आहे
@ समीरसूर , उत्तराची प्रतिक्षा
माणूस म्हणून जगायचं!
म्हणजे नेमके काय ?
सहमत.
आदराने, सौहार्दाने आणि त्या
सगळ्या प्रयत्नांचा उद्येश काय
कोणाचा जबरदस्तीने मुलगा अथवा भाऊ बनण्याऐवजी, "आपल्या आई-बहिणींशी इतरांनी जसे वागावे असे वाटते, तसेच आपण इतरांच्या आई-बहिणींशी वागले पाहिजे" इतका किमान समजूतदारपणा व्यवहारात आला तरी खूप झाले."नातेवाईक नसलेल्यांना नातेवाईक समजा" असा वरवरचा अशक्य उपदेश यात नाही. केवळ, "एकमेकांच्या नातेवाईकांशी सभ्यपणे वागण्यात सर्वांचाच फायदा (common good) आहे " हे पटण्यासारखे प्रोत्साहन आहे. मला वाटते, घरच्यांचे वागणे-बोलणे, समाजातली समज-मान्यता आणि कायदा यांच्या एकत्रित दबावाने अशी सामाजिक जाणीव निर्माण झाली तरी खूप फरक पडेल.मुख्य म्हणजे, "एखाद्याशी
नातेवाईक बनवा हा त्यातला
तर मग उपमा-उत्प्रेक्षा वापरून
नातेवाईक बनवा हा त्यातला एस्सेन्स आहे असे मला अजिबात वाटत नाही.तर मग, उपमा-उत्प्रेक्षा वापरून जबरदस्तीने/आडवळणाने नात्याचा उल्लेख आणून मानसिक गोंधळ करण्याची गरजच काय ? आदराला आदर म्हणावे, त्याला नात्याचा आधार हवाच कशाला ? दुरान्वयाने नात्याचा संबंध वापरणारी पद्धत वापरल्यास मग, मोठ्या माणसांना आई-काकू-मामी-इत्यादी किंवा वडिल-काका-मामा-इत्यादी समजून सभ्य व्यवहार करावा अशी न संपणारी यादी बनत जाईल ! त्यापेक्षा, "सभ्य व्यक्तीचा, इतर सभ्य व्यक्तींशी, सभ्य व्यवहार असावा कारण तसे वागणे आपल्यासकट सर्व समाजाला फायद्याचे आहे. (त्यासाठी त्या व्यक्तीचा आपल्याशी प्रत्यक्ष, मानलेला किंवा इतर कोणत्याही प्रकारचा संबंध असण्याची गरज नाही)" हे सरळ, सोपे, सर्वसमावेशक व व्यावहारीक सत्य समजून सभ्यपणा अंगवळणी पडणे जास्त प्रभावी व दूरगामी असेल, असे मला वाटते. असो. तेच ते म्हणणे मी वेगवेगळ्या प्रकारे मांडून झाले आहे. तेव्हा, इत्यलम.तुमची व्याख्या मुळात सभ्य आणि
याला नेमकी हरकत काय आहे ?
हरकत काहीच नाही पण मग असा
@ समीरसूर , पर्यायी सांस्कृतीक व्यवस्था काय असावी ?
असल्या कुचकामी संस्कारांमुळे
संस्कार कुचकामी
ओके ओके
गृहीतक चुकीचे नाहीये का? जो
नैसर्गिक अवस्थेत फिरणाऱ्या
बलात्कार माकडात पण होतात.
नेमके काय म्हणायचे आहे ?
शेकडो वर्ष जारवा जमाती
monogamy , अर्थात
मर्यादित लोकसंख्येमुळे समजा
मूलभूत मानवी वर्तनाचे आकलन
सशक्त व अशक्त संस्कार
म.टा. मधली उघडीनागडी सनी
सनी लियोन, वखवख व आगीचे बंब
वखवख वाढणार तरी कशी आणि कुणाची
प्रथेप्रमाणे याही धाग्याचे
टकादा