✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भारत बायकांसाठी अवघड देश आहे ...

म
माहितगार यांनी
Mon, 04/16/2018 - 09:40  ·  लेख
लेख
भारत बायकांसाठी अवघड देश आहे ..... आणि ह्याचं मूळ आपल्या विचारसरणीत आहे.
हि दोन विधाने पिलीयन रायडर यांच्या दुसर्‍या एका धागा प्रतिसादातून घेतली आहेत . शीर्षकात पहिले वाक्य वापरले तरी चर्चेचा मुद्दा दुसरे वाक्य आहे. तिकडे त्यांनी एलॅबोरेट केलेले नाही तरी दुसरे विधान मला अंशतः मान्य आहे पण सरसकट मान्य नाही परस्त्री कडे आदराने पहाण्या बद्दलचे सुसंस्कारही ह्याच भारतीय भूमीत केले जातात. पण एनी वे १) विचारसरणीत कोणते बदल व्हावेत असे तुम्हाला वाटते ? २) स्त्री अत्यचारांवर रिअ‍ॅक्ट करणारे अनेक , स्त्री स्वातंत्र्य आणि संबांधीत स्त्रीयांच्या स्वाभीमानापलिकडे जाऊन , शुचिता आणि कौटूंबीक , समुह, जात, धर्म, भाषा इत्यादी ओळखींच्या स्वाभीमानावरुन रिअ‍ॅक्ट होत नाहीत ना अशी साशंका वाटते असे असणे स्त्री स्वातंत्र्य आणि स्वाभीमान विषयक सकारात्मक विचार सरणीस कितपत पोषक आहे ? ३) प्रत्येक घटना घडल्या नंतर शीक्षा वाढवा शीक्षा बदला किंवा विना चौकशी शिक्षा द्या अशा मागण्या होताना दिसतात , कायदा व्यवस्थे पलिकडे जाऊन पुरुषांवरील सामाजिक संस्कार हा विषय चर्चेत कमी येतो , शिक्षा स्वरुप बदलत जाणे पुरेसे आणि स्त्री स्वातंत्र्यास खरेच पोषक असते का ? पुरुषांवरील सामाजिक संस्कार यात काय बदल व्हावेत ? ४) ह्या विषयावर सामाजिक राजकीय दबाव निर्माण करण्या एवढ्या चर्चा निश्चतच गरजेच्या आहेत , पण अती चर्चांनी तेही स्वातंत्र्यास बाधा न आणता सुरक्षा कशी वाढवावी या वर फोकस नसणार्‍या पोकळ चर्चांनी स्त्रीयांमध्ये भितीचे वातावरण निर्मिती होत नाही ना ? भिती चे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून चर्चांचे स्वरुप कसे असावे ? * आता वरचे धागा शीर्षक आहे , ते कमतरतांकडे लक्ष्य वेधण्यास यशस्वी होते पण ते सुरक्षेची भावना निर्माण करते का ? किंवा भिती च्या वातावरणाची निर्मिती करणारी जोड देणार नाही हे कसे पहायचे ? * माझी एक धागा चर्चा स्त्री पोषाख, स्त्री-पुरुष संबंध आणि (अ)सुरक्षिततेचा सांभाळ दुवा ज्यात चर्चेसाठी काही प्रश्नही दिले आहेत त्यांचा येथील चर्चेत काही उपयोग होत असल्यास पहावे . किंवा त्या धाग्यावर लिहायचे असल्यास हरकत नाही. * या चर्चेत सहभागी अत्याचारांची निखालस निंदाकरतात असे गृहीत धरले आहे . त्यामुळे इमोशनल बाजू पेक्षा वैचारीक बाजूने चर्चा या धाग्यात अभिप्रेत आहे. * दुसर्‍या देशांशी तुलना अभिप्रेत नाही , आपल्या देशात काय सुधारण्णा असाव्यात यावर फोकस असावा .
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
47442 वाचन

💬 प्रतिसाद (144)

प्रतिक्रिया

संशयित व गुन्हेगार

गामा पैलवान
गुरुवार, 04/19/2018 - 20:20 नवीन
मार्कस,
आणि भाजपा वाले तरी काय करत आहेत ? असल्यांना बलात्कार प्रकरणात संशयित असालेल्यांना बचावायचा प्रयत्न?
इथे संशयित हाच गुन्हेगार आहे हे गृहीतक आहे. हे चुकीचं असू शकतं. ज्या मुलाकडे बोट दाखवलं आहे तो हजार किमी दूर परीक्षा देत होता. त्याचा बाप सांझीराम या संशयिताची मागणी सीबीआय चौकशीची आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

गा.पै.,

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 04/19/2018 - 21:19 नवीन
गा.पै., माझे काहीही गृहीतक नाही. संशयित हा संशयित च आहे आणि कोर्टात पुराव्याने शाबित होत नाही तोवर निर्दोषही आहे . पण तोवर त्याला न्यायालयीन प्रक्रियेपासुन वाचवण्याचा प्रयत्न करणे , मोर्चा बिर्चा काढणे हे योग्य नाही. सीबीआय ने तपासणी जरुर करु दे पण तोवर सदर व्यक्ती संशयित गुन्हेगार असल्याने तुरुंगात (लॉक अप ) असावी . न्यायालयीन प्रक्रियेला अडथळा आणणे हेच ह्या प्रकरणात संशय निर्माण करणारे आहे . दुर्दैवाने भाजपाशी आणि हिंदु समता मंच की काय शी निगडीत लोकं ते करतन दिसले आहेत म्हणुन उगाच सुज्ञ आणि सुजाण हिंदु बदनाम होत आहेत. सदर संशयित आरोपी निर्दोष असेल तर नक्की सुटेल , पण तो आरोपी सिध्द झाला तर तुम्ही त्याच्या बचावार्थ इथे प्रतिसाद लिहिलेला होता हे लोकांच्या कायम लक्षात राहील ! बाकी ह्या सार्‍या प्रकरणात बहुतांश हिंदुत्ववादी नेतेलोकांनी घेतलेला स्टॅन्ड अत्यंत निराशाजन्क आहे . एक तर न्यायालयीन प्रक्रियेला अडथळा आणणे चुकीचे , त्यानंतर व्हॉटअबाऊटरी करणे त्याहुन चुकीचे ! मीडीयाचा हिंदुद्वेषी बायस मी जाणतो, बॉलीवुडमधल्या उपटसुंभांचे सिलेक्टीव्ह अरण्यरुदनही मला माहीत आहे पण म्हणुन हिंदुंनी व्हॉटाअबाऊटरी करणे समर्थनीय नाही ! आपले हिंदुत्व शिवरायांचा आदर्श ठेवणारे आहे , अत्याचारी व्यक्तीला , त्याचा गुन्हा पुराव्याने शाबित झाल्यावर , त्याची जात पात पक्ष बिक्ष न पहाता चौरंगा करण्यात आलं पाहिजे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

काही सायलेंट गृहीतके नको

बिटाकाका
गुरुवार, 04/19/2018 - 21:47 नवीन
काही सायलेंट गृहीतके नको म्हणून - १. भाजप नेते आणि हिंदू एकता मंच यांच्या मोर्चाची मागणी सगळ्या आरोपींच्या सुटकेसाठी नव्हती, फक्त दीपक खजुरीया (पोलीस अधिकारी) याच्या सुटकेसाठी होती. त्याला ओळखणाऱ्या समाजातील लोकांचे म्हणणे तो असे कधीच करणार नाही असे असल्याने बराच पाठिंबा होता. २. इतर बहुतेक सगळ्या मोर्चांची मागणी प्रकरण सीबीआय कडे सोपवावे अशी होती. या मागणीत काही गैर वाटते काय? ************************** यातील किंवा यापुढील कुठलीही असंवैधानिक कृती नक्कीच ठोकून काढली जावी (वकिलांवर गुन्हे दाखल जझाले आहेत). पण त्याबरोबरच संवैधानिक गोष्टींबद्दल फक्त भावनेच्या भरात असहिष्णुता दाखवली जाऊ नये ही अपेक्षा रास्त नाहीये का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

प्रथमदर्शी पुरावे

गामा पैलवान
गुरुवार, 04/19/2018 - 22:18 नवीन
मार्कस, तुम्ही शिवाजीने केलेला चौरंगा उल्लेखलात. त्यात उघड पुरावा होता. पण या प्रसंगी प्रथमदर्शी पुरावा संबंधित संशयिताकडे अणुमात्रही निर्देश करीत नाही. खून झाला दिवसांपूर्वी आणि प्रेत आज सापडलं. कुठे? तर हिंदू मंदिरात. हा सरळसरळ सत्याचा अपलाप नव्हे काय? मग काश्मीर पोलिसांवर विश्वास बसेल काय कोणाचाही? बकरवाल समाजाची मुलगी होती. तिच्या समाजातले लोकंही सीबीआय चौकशीची मागणी करताहेत. त्यांचाही काश्मिरी पोलिसांवर विश्वास नाही. कृपया हे चलचित्र पाहणे : https://www.facebook.com/tgtpost/videos/2122302284655399/ वरील चलचित्रात १ मिनिट २० सेकंदांनी बकरवाल माणूस स्पष्टपणे सीबीआय चौकशीची मागणी करतांना दिसतो आहे. मग हिंदुत्ववादी नेतेलोकांनी तशीच मागणी केली तर काय बिघडलं? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

शिवराय न्यायकर्तेही होते आणि

अभ्या..
गुरुवार, 04/19/2018 - 22:47 नवीन
शिवराय न्यायकर्तेही होते आणि दंडकर्तेही. इथे कुठला पुरावा कुणाकडे निर्देश करतो हे ठरवायचे काम न्यायालय असताना दुसर्‍याने का करायचे? सत्य काय आहे ते ठरवायचा अधिकार एखाद्या व्यक्तीने/जमावाने घेतला तर हीच पध्दत प्रत्येक जण अनुसरेल. नुसती डोकी जमवून मोर्चे काढले तर कायदेशीर रित्या त्याला मज्जाव करता येत नाही (प्रॉपर परवान्ग्या घेऊन वगैरे) पण मोर्चाचा उद्देश काय? फिर्यादीच्या नातेवाईकांनी ठरवायचे का कुणी तपास करायचा ते? मग आरोपीच्या नातेवाईकांनी अजुन कुणाकडे तपास द्या म्हनले तर? कश्मीर पुलीस इतकीच हरामखोर आहे, कुणाचाच त्यांच्यावर विश्वास नाही तर तर कुठेतरी उघडी पडेलच ना? इतकी हरामखोरी कुणाच्या जीवावर करताहेत ते? कश्मीरमधली न्याव्यवस्था पण तशीच आहे का? कुठेतरी पुलीस उत्तरदायी असेलच ना? भारतातले कुठलेच कोर्ट त्यांना बोलावू शकणार नाही काय? त्यांना प्रश्न विचारु शकणार नाही काय? मला जास्त माहीत नाही पण कश्मीर कायदा आणि न्यायव्यवस्थेसाठी पण भारतापासून इतके तुटलेले आहे काय? आणि इतकी गचाळ पध्दतीने सारीच व्यवस्था किडलेली असेल फक्त विचाराने अन चर्चा करुन मार्ग निघेल असे तरी वाटत नाही. सरळ आमच्या सन्नी पाजींच्या सिनेमांतून प्रेरणा घ्यावी हे उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

बरोब्बर

ट्रेड मार्क
Fri, 04/20/2018 - 03:31 नवीन
इथे कुठला पुरावा कुणाकडे निर्देश करतो हे ठरवायचे काम न्यायालय असताना दुसर्‍याने का करायचे? आता कसं बरोब्बर बोललात. सध्या हे काम आधीच काही ठराविक लोक करून टाकत आहेत ना? परत आपल्याला पाहिजे तास निकाल नाही लागला तर न्यायालयाच्या विश्वासार्हतेवर पण प्रश्न विचारला जातो. सत्य काय आहे ते ठरवायचा अधिकार एखाद्या व्यक्तीने/जमावाने घेतला तर हीच पध्दत प्रत्येक जण अनुसरेल. आपली वृत्तपत्रे, न्यूज चॅनेल्स, पुरोगामी विचारवंत आणि कलाकार हाच तर अधिकार हातात घेत आहेत आणि त्यालाच तर आमचा आक्षेप आहे. त्यावर ते फक्त त्यांच्या अजेंड्याला पुष्टी मिळेल एवढंच सत्य म्हणून ठासून सांगतात. इथे तर संपूर्ण देश आणि धर्माला वाईट ठरवलं जातंय. फिर्यादीच्या नातेवाईकांनी ठरवायचे का कुणी तपास करायचा ते? मग आरोपीच्या नातेवाईकांनी अजुन कुणाकडे तपास द्या म्हनले तर? कठुआच्या या घटनेत सगळेच गावकरी सीबीआय कडे तपास द्या म्हणत आहेत. फिर्यादी (पीडित) कुटुंब आणि त्या जमातीतले इतर लोक सुद्धा तीच मागणी करत आहेत. मग फक्त काही न्यूज चॅनेल्स, काही राजकारणी आणि पुरोगाम्यांना फक्त त्या पुजाऱ्यालाच आधीच गुन्हेगार का ठरवायचंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

भारतीय आणि हिंदू

arunjoshi123
गुरुवार, 04/19/2018 - 18:38 नवीन
जम्मूच्या घटनेने अनेक लोकांना आपण हिंदू असल्याची लाज वाटली आहे. ============================ अगोदर कोणी असला हिडीसपणा केला तर त्यास धर्मबाहेर काढत. आता केला धर्म त्याला अर्पण करून स्वतः धर्माबाहेर होत आहेत. खूप आधुनिक प्रकार दिसतो हा. आता कोण्या भारतीयाने दुश्कृत्य केले तर देश त्याला अर्पण करून लोक श्रिलंकेत जाणार वाटतं.
  • Log in or register to post comments

आणि विशेष म्हणजे इंडिया किंवा

बिटाकाका
गुरुवार, 04/19/2018 - 19:34 नवीन
आणि विशेष म्हणजे इंडिया किंवा जास्तीत भारत पर्यंत पोहीचणार्यांना अचानक "हिंदुस्थान"ची लाज वाटायला लागणे जर विस्मयकारकच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

नागा संस्कृती प्लस आणि मायनस

माहितगार
गुरुवार, 04/19/2018 - 21:57 नवीन
अ जो नी वर एका प्रतिसादात नागालॅण्ड मध्ये स्त्री विरोधी गुन्ह्यांचे प्रमाण कमी होते आणि आता ते वाढते आहे याचा उल्लेख केला आहे . या नाण्याच्या दोन्ही बाजू बघणे गरजेचे आहे . जी सकारात्मक बाजू होती ती आधी बघू . ब्रिटिशकृत ख्रिश्चनीकरणाआधी ; नागा लॅण्ड मध्ये प्रत्येक खेड्यात सायंकालीन अथवा रात्रकालीन वास्तव्य आणि सांस्कृतिक संवर्धन आणि मनोरंजनासाठी ; वयात आलेल्या तरुणांसाठी सामायिक तरुण गृह आणि वयात आलेल्या तरुणींसाठी सामायिक तरुणी गृह वसती गृह असते या वसतिगृहांना मोरुंग आणि इतर अनेक स्थानिक नावे असत विवाह होईपर्यंत रोज या वसतिगृहांतच रात्र घालवली जाई दिवस आपापल्या कुटुंब आणि जमाती सोबत शेतकी शिकारी त घालवला जात असे . (तरुणींना तरुणांच्या वसती गृहास जाण्याची आणि मुलांना मुलींच्या वसतिगृहास एक ट्याने जाण्याची अनुमती नसे ) गाणी नृत्ये स्थानिक सांस्कृतिक धार्मिक कर्मकांडे आणि काही जमातीय मूल्यांचे मार्गदर्शन केले जात असे . पण बाकी सांस्कृतिकते पलीकडे जाऊन तरुण मुले गटाने मुलींच्या वसती गृहात जा ऊन एकमेकांच्या प्रति गीतांच्या माध्यमातून व्यक्तिगत प्रेम स्पष्ट आणि मोकळेपणे व्यक्त केले जाई . वसतिगृहातील मुले मुली लग्न ठरलेल्याना संसार उभा करण्यात त्यांच्या परीने मदत करत अर्थात प्रॉपर्टी राईट वडिलांकडून मुलांकडे जात . कुटुंब आणि समाजाच्या हस्तक्षेपा शिवाय जोडीदाराने प्रोपोज करण्याचे आणि जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य वसतिगृहातून होणाऱ्या मैत्रीतून मिळणारे संरक्षण या सकारात्मक बाजू झाल्या . म्हणजे कुणी आवडले आणि व्यक्तच करता आले नाही असे बरेच कमी होत असेल . (यात पुरुषांच्या पुर्नविवाह विषयक काय व्यवस्था होत्या ते अधिक अभ्यासावे लागेल पण स्त्रियांना घटस्फोट घेता येत असे , विधवा घटस्फोटित तरुणी वसतीगृहाचा आसरा घेत . ) अर्थात या वसतिगृहातून ख्रिश्चनेतर संस्कृती टिकूनये म्हणून नव्याने धर्मान्तरित होणाऱ्या नागांना चर्च प्रचारक धर्ममार्तंडांनी ह्या वसतिगृहातील सहभाग बंद पाडला आणि तरुण - तरुणींसाठी योग्य मोकळीक उपलब्ध करणारी एका संस्कृती लयास गेली . या नागा संस्कृतीची दुसऱ्या बाजूस काही महत्वपूर्ण मर्यादाही होत्या , जमाती आणि खेडे यांची आपापसात शतकोशतके चालत आलेली वैर आणि सातत्याची अतिहिंसक संघर्ष ज्यात जो शत्रूंचे जास्तीत जास्त शिरकापुन जमा करत असे तो पुरुष शूर समाजाला जाई . प्रॉपर्टी आजही वडिलांकडून मुलांना जाते स्त्रियांना प्रॉपर्टी आणि न्याय - स्थानिक जमात पंचायत यंत्रणा आणि राजकारणात मुंगी एवढा स्वतः:साठी न्याय मागण्यासाठीही पाय ठेवण्याची २१व्याशतकातही अनुमती नाही. बाकी भारताची न्याय व्यवस्था लागू ना होऊ देण्यासाठी प्रॉपर्टीचे हितसंबंध चर्च यांचे हितसंबंध तयार होऊन बसले आहेत . एकदा जमात पंचायतीने माघारी दिलेला जोकाही निवाडा असेल तो नैसर्गिक न्यायाच्या तत्वांवर उत्तराला नाही तरीही स्त्रियांना निमूटपणे स्वीकारावा लागतो . जिथे तुम्हाला पंचायती समोर केसाच नेता येत नाही , भारतीय न्याय यंत्रणेत केसच नेता येत नाही तिथे गुन्हे झाल्याची नोंद दिसेलच कशी . ठीक आहे शिरा कापले जाण्याच्या भीतीने सर्वसामान्या पुरुषांकडून स्त्रियांनां हात लावला जाताही नसेल पण जे स्वतः: शिरकापण्यात एक्सपर्ट असत आणि पंचायतीचा न्याय फिरवान्या एवढी प्रॉपर्टी असेल त्यातील काहींनी स्वतः: स्त्रियांचे शोषण केले तारा त्याची नोंद सुनावणीस या नागा संस्कृतीत जागा नव्हती हेही लक्षात घेतले पाहिजे . अर्थात मोरुन्ग वसतीगृह संस्कृतीतील पहिला भाग सकारात्मक निवड स्वातंत्र्याचा आजही विचार करण्यासारखा म्हणवता येईल .
  • Log in or register to post comments

परस्त्री कडे आदराने पहाण्या बद्दलचे सुसंस्कारही ह्याच भारतीय...

समीरसूर
गुरुवार, 04/19/2018 - 22:46 नवीन
परस्त्री कडे आदराने पहाण्या बद्दलचे सुसंस्कारही ह्याच भारतीय भूमीत केले जातात. हाच प्रॉब्लेम आहे. परस्त्री मातेसमान मानण्याचे ढोंगी संस्कार करत राहणे, शाळांमधून सक्तीने मुलांना मुलींकडून राखी बांधून घ्यायला लावणे, मानलेला/ली भाऊ/बहीण असली तद्दन फालतू नाती ग्लोरिफाय करत राहणे, स्त्री ही शक्ती, देवी आहे वगैरे तद्दन निरर्थक संकल्पनांना खतपाणी घालत राहणे....असल्या कुचकामी संस्कारांमुळे आपल्या देशात "स्त्री" म्हणजे एक फिल्मी, काव्यात्म, अध्यात्मिक वगैरे ऊर्जा-बिर्जा आहे असे चित्र निर्माण झाले आहे. हे सगळे मानवी स्वभावाच्या विरुद्ध आहे. परस्त्री मातेसमान मानणे यासारखा भिकार आणि ढोंगी संस्कार फक्त भारतातच असू शकतो. साहजिकच अशा संस्कारांमुळे बंधने आली, बांध आले आणि स्त्री म्हणजे एक दुष्प्राप्य स्वप्न आहे असा समज सगळीकडे पसरला. सामाजिक, शारिरिक, मानसिक कुचंबणा वाढली. मूळ मानवी स्वभाव उसळ्या मारत राहिला. त्यातूनच वखवख वाढली आणि बलात्कारासारखे क्रूर गुन्हेदेखील वाढले. आपण स्त्रीला स्त्रीच राहू दिले असते तर कदाचित चित्र वेगळे असले असते. असो. दांभिकपणा आणि ढोंगीपणा हा भारताइतका प्रचलित आणि शिष्टसंमत इतरत्र कुठेच नसेल.
  • Log in or register to post comments

ढोंगी संस्कार?

गामा पैलवान
Fri, 04/20/2018 - 01:11 नवीन
समीरसूर, मुलीकडे बहिणीसारखं बघायला लावणारे शाळेतले संस्कार ढोंगी आहेत का? तसं असेल तर मग महाराष्ट्र टाईम्स मध्ये येणारी अनावृत्त स्त्रीचित्रे सुसंस्कार करणारी म्हणायला हवीत. तुम्ही म्हणताय ती वखवख अशा नागड्या स्त्रीदेहांमुळे वाढलीये. तिचा संस्कारांशी कसलाही संबंध नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

मुलीकडे बहिणीसारखं बघायला लावणारे शाळेतले संस्कार

समीरसूर
Fri, 04/20/2018 - 15:41 नवीन
असं कसं कुठल्याही मुलीकडे बहिणीसारखं बघता येईल हा मोठा प्रश्न आहे. ज्या वयात मुले शाळेतल्या शिक्षिकेकडेदेखील कुतुहलमिश्रित नजरेने बघतात त्या वयात कुठलीही परकी मुलगी बहिणीसमान असते हे कसं पटेल? असं परस्त्रीकडे इतक्या पवित्र नजरेने बघणं कितपत शक्य आहे मला माहित नाही. परस्परांविषयी आकर्षण हा निसर्गधर्म आहे. तो दाबून मानलेली बहिण वगैरे नाती बनवणं हा तद्दन मूर्खपणा आहे. कित्येक अशा 'मानलेल्या' नात्यात असं नातं फक्त सोय म्हणून असतं; समाजाने नावे ठेवू नयेत म्हणून. आकर्षण असणारच; आपल्या शिक्षणाचा, विचारशक्तीचा, भाव-भावनांचा, माणूसपणाचा सदुपयोग करून माणूस म्हणून जगायचं हा यावरचा खरा उपाय आहे. हे शिक्षण झालं पाहिजे. दुर्दैवाने भारतात खरं शिक्षण बाजूला पडतं आणि फिल्मी संस्कारांचं स्तोम माजवलं जातं. आजकाल शाळांमधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम हद्दपार झाला आहे ते हे सत्य उमगल्यामुळेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

असं कसं कुठल्याही मुलीकडे

arunjoshi123
Fri, 04/20/2018 - 15:52 नवीन
असं कसं कुठल्याही मुलीकडे बहिणीसारखं बघता येईल हा मोठा प्रश्न आहे.
का? का? काय प्रॉब्लेम आहे? ============================== यना जसं "सारे भारतीय माझे बांधव आहेत" असं म्हणतात मात्र प्रॉपर्टी कोणाशीच वाटत नाहीत तसं असतं. इतकं लिटरली घेत नसतात. बादवे, हिंदूंत आते, मामे मुसलमानांत चुलत आणि पारश्यांत सख्ख्या बहीणिशी लग्न करतात. अशा शंभर गोश्टी असल्या तरी मनात, समाजात जनरली भगीनीभाव असणंच बरं. आमच्याकडे बायकांना ताई म्हणणे, गुजरातमधे बेन म्हणणे (तसेच बंधुवाचक शब्द) ही भारतीय परंपरा चांगली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

हा ढोंगीपणा आहे

समीरसूर
Fri, 04/20/2018 - 16:13 नवीन
जे नैसर्गिक नाही ते मुद्दाम आटापिटा करून कसं आणता येईल? अहो, माणसाचं मन हे एक निबिड अरण्य असतं. असं ठरवून सगळं करता आलं असतं तर प्रत्येक जण सुखी, आनंदीच राहिला असता. :-) नर आणि मादी या दोघांमध्ये आकर्षण असणारच. ते टाळणं विश्वामित्राला, इंद्राला नाही जमलं; तुमची-आमची काय कथा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

@ समीरसूर , उत्तराची प्रतिक्षा

माहितगार
Fri, 04/20/2018 - 16:21 नवीन
@ समीरसूर मला हि किंवा ती एकांगी भूमिका घ्याय्ची नाही . सध्याची भूमिका समाजाने बदलावी वाटत असेल तर १) आपले तर्क सध्याचा समाज व्यवस्थीत तपासून मागेल २) आपल्या पर्यायी मांडणीचीही चिकित्सा होईल. १ संदर्भाने काही प्रश्न मला ही आपणापूढे उपस्थित करावयाचे आहेत पण तत्पुर्वी मुद्दा २ साठी पर्यायी सांस्कृतीक व्यवस्था काय असावी असे तुम्हाला वाटते ? याच्या आपल्या उत्तराची प्रतिक्षा प्राधान्याने आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

माणूस म्हणून जगायचं!

समीरसूर
Fri, 04/20/2018 - 16:27 नवीन
आपल्या शिक्षणाचा, विचारशक्तीचा, भाव-भावनांचा, माणूसपणाचा सदुपयोग करून माणूस म्हणून जगायचं हा यावरचा खरा उपाय आहे. हे शिक्षण झालं पाहिजे. दुर्दैवाने भारतात खरं शिक्षण बाजूला पडतं आणि फिल्मी संस्कारांचं स्तोम माजवलं जातं. आजकाल शाळांमधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम हद्दपार झाला आहे ते हे सत्य उमगल्यामुळेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

म्हणजे नेमके काय ?

माहितगार
Fri, 04/20/2018 - 17:04 नवीन
"माणूस म्हणून जगायचं' म्हणजे नेमके काय ? समजा तुम्हाला तुमच्या मुलांना मार्गदर्शन करायचे आहे तुम्ही नेमके कसे कराल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

सहमत.

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 04/20/2018 - 16:27 नवीन
सहमत. सगळ्या स्त्रीजातीची आई अथवा बहिण अशी अनैसर्गिक विभागणी करण्यापेक्षा, "इतर कोणत्याही जवळीक नसलेल्या व्यक्तीशी आदराने, सौहार्दाने आणि त्या व्यक्तीच्या स्वत्वाला धक्का न लावणारी एक मर्यादा ठेवून कसे वागावे याचे (पक्षी : समाजात जबाबदार नागरिक म्हणून कसे वागावे याचे) शिक्षण देणे जरुरीचे आहे". ही शिकवण देणे केवळ कोणत्या शिक्षणसंस्थेची जबाबदारी नसून, एक आवश्यक कौटुंबिक संस्कार आहे, अशी जाणीव समाजात निर्माण करणे जरूरीचे आहे. कोणाचा जबरदस्तीने मुलगा अथवा भाऊ बनण्याऐवजी, "आपल्या आई-बहिणींशी इतरांनी जसे वागावे असे वाटते, तसेच आपण इतरांच्या आई-बहिणींशी वागले पाहिजे" इतका किमान समजूतदारपणा व्यवहारात आला तरी खूप झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

आदराने, सौहार्दाने आणि त्या

बिटाकाका
Fri, 04/20/2018 - 16:52 नवीन
आदराने, सौहार्दाने आणि त्या व्यक्तीच्या स्वत्वाला धक्का न लावणारी एक मर्यादा ठेवून
म्हणजेच आपण आपल्या आई बहिणीसोबत जसे वागतो तसे ना? ****************************************** बहिणीसामान मानावे म्हणजे लैंगिक दृष्टीने बघू नये हा एकमेव अर्थ का चिकटवावा? बहिणीसामान म्हणजे आपण म्हणता तसे वागावे असा अर्थ अभिप्रेत नाहीये का? ******************************************
समाजात जबाबदार नागरिक म्हणून कसे वागावे याचे
आई बहीण मानणे ह्याच प्रोसेसचा एक भाग नाहीये का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

सगळ्या प्रयत्नांचा उद्येश काय

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 04/20/2018 - 20:55 नवीन
सगळ्या प्रयत्नांचा उद्येश काय असावा याचा सारांश वर दिला आहेच. कोणाचा जबरदस्तीने मुलगा अथवा भाऊ बनण्याऐवजी, "आपल्या आई-बहिणींशी इतरांनी जसे वागावे असे वाटते, तसेच आपण इतरांच्या आई-बहिणींशी वागले पाहिजे" इतका किमान समजूतदारपणा व्यवहारात आला तरी खूप झाले. "नातेवाईक नसलेल्यांना नातेवाईक समजा" असा वरवरचा अशक्य उपदेश यात नाही. केवळ, "एकमेकांच्या नातेवाईकांशी सभ्यपणे वागण्यात सर्वांचाच फायदा (common good) आहे " हे पटण्यासारखे प्रोत्साहन आहे. मला वाटते, घरच्यांचे वागणे-बोलणे, समाजातली समज-मान्यता आणि कायदा यांच्या एकत्रित दबावाने अशी सामाजिक जाणीव निर्माण झाली तरी खूप फरक पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका

मुख्य म्हणजे, "एखाद्याशी

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 04/20/2018 - 21:00 नवीन
मुख्य म्हणजे, "एखाद्याशी सभ्यपणे वागायला तो आपला नातेवाईकच असायला हवा", ही कल्पना मनात रुजवणे हे सभ्य व्यवहाराला मारक ठरू शकते... कारण त्या वाक्याचा व्यत्यास, "नातेवाईक नसलेल्या व्यक्तिशी 'सभ्यपणे वागू नये' किंवा 'सभ्यपणे वागले नाही' तरी हरकत नाही" असा होतो, नाही का ? त्याऐवजी, "नाते, जात, धर्म, देश, इत्यादींच्या पलिकडे जाऊन प्रत्येक सभ्य व्यक्तीला माणूस म्हणून सभ्यतेची वागणूक देणे, ही माणूस म्हणून आपली जबाबदारी आहे" हा विचार जास्त योग्य आहे. सभ्य व्यवहारासाठी, कोणत्याही असलेल्या/नसलेल्या/मानलेल्या नातेसंबंधांच्या भावनांची किंवा भावनिक ब्लॅकमेलिंगची गरज नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

नातेवाईक बनवा हा त्यातला

बिटाकाका
Fri, 04/20/2018 - 21:42 नवीन
नातेवाईक बनवा हा त्यातला एस्सेन्स आहे असे मला अजिबात वाटत नाही. माझ्यामते, आपल्या बहिणीला, आईला जो आदर देता तोच तुम्ही इतर स्त्रियांना द्या असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. बहीण बनवा म्हणजे लगेच सगळ्यांकडून राख्या बांधून घ्या, किंवा भाऊबीजेला ओवाळून घ्या असा त्याच अर्थ खचितच नाही. *************************** तुम्ही म्हणता तो सभ्यतेचा विचार योग्यच आहे पण तोच बेस्ट आहे म्हणणे योग्य नाही. तो जर रुजने सोपे असते तर दुसरा विचार आला नसता. *************************** बहीण माना याला टवाळकीगिरी करणाऱ्यांमुळे एक वेगळा लौकिक अर्थ प्राप्त झाला आहे असे वाटते. पण मूळ विचार हा आदराशी निगडित आहे असे नमूद करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

तर मग उपमा-उत्प्रेक्षा वापरून

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 04/20/2018 - 22:05 नवीन
नातेवाईक बनवा हा त्यातला एस्सेन्स आहे असे मला अजिबात वाटत नाही. तर मग, उपमा-उत्प्रेक्षा वापरून जबरदस्तीने/आडवळणाने नात्याचा उल्लेख आणून मानसिक गोंधळ करण्याची गरजच काय ? आदराला आदर म्हणावे, त्याला नात्याचा आधार हवाच कशाला ? दुरान्वयाने नात्याचा संबंध वापरणारी पद्धत वापरल्यास मग, मोठ्या माणसांना आई-काकू-मामी-इत्यादी किंवा वडिल-काका-मामा-इत्यादी समजून सभ्य व्यवहार करावा अशी न संपणारी यादी बनत जाईल ! त्यापेक्षा, "सभ्य व्यक्तीचा, इतर सभ्य व्यक्तींशी, सभ्य व्यवहार असावा कारण तसे वागणे आपल्यासकट सर्व समाजाला फायद्याचे आहे. (त्यासाठी त्या व्यक्तीचा आपल्याशी प्रत्यक्ष, मानलेला किंवा इतर कोणत्याही प्रकारचा संबंध असण्याची गरज नाही)" हे सरळ, सोपे, सर्वसमावेशक व व्यावहारीक सत्य समजून सभ्यपणा अंगवळणी पडणे जास्त प्रभावी व दूरगामी असेल, असे मला वाटते. असो. तेच ते म्हणणे मी वेगवेगळ्या प्रकारे मांडून झाले आहे. तेव्हा, इत्यलम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका

तुमची व्याख्या मुळात सभ्य आणि

बिटाकाका
Fri, 04/20/2018 - 22:19 नवीन
तुमची व्याख्या मुळात सभ्य आणि तेवढी समज असणाऱ्या लोकांना लागू होईल . जमिनी सत्यता बहिणीला देता तसा आदर द्या म्हणण्यात आहे असे मला वाटते. ******************** नात्यांनी गोंधळ उडून जातो वगैरे उगाच आपल्यासारखे (म्हणजे मी आणि तुमच्यासारखे इतर) आशा गिष्टींचं इतका किस पाडणारे यांना वाटते. सर्वसामान्य लोकांना मतितार्थ सहज कळत असेल. माझ्या लहानपणी मला तरी साधारण हाच अर्थ पटला असेल असे वाटते. ******************* तुम्ही म्हणता ती ना संपणारी यादी आपल्या संस्कृतीने विचारपूर्वक "वडीलधारे" या एका शब्दात उरकली आहे. ******************* बादवे, तुम्ही म्हणता तो विचारही आपले संस्कार आणि संस्कृती शिकवतेच ना? ******************* या मुद्द्यावर एकमवकांचे विचार खूपच वेगळे आणि पक्के असल्याने, असहमतीवर सहमती दर्शवण्यास माझी हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

याला नेमकी हरकत काय आहे ?

माहितगार
Fri, 04/20/2018 - 16:16 नवीन
....कित्येक अशा 'मानलेल्या' नात्यात असं नातं फक्त सोय म्हणून असतं; समाजाने नावे ठेवू नयेत म्हणून.
याला नेमकी हरकत काय आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

हरकत काहीच नाही पण मग असा

समीरसूर
Fri, 04/20/2018 - 16:26 नवीन
हरकत काहीच नाही पण मग असा बुरखा तरी का पांघरायचा? काय गरज असावी? आणि अशा कित्येक नात्यांमध्ये बर्‍याच इतर 'सोयी' देखील भागवल्या जातात हे जगजाहिर आहेच. थोडक्यात हे नातं ढोंगच ठरतं...सोय ठरतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

@ समीरसूर , पर्यायी सांस्कृतीक व्यवस्था काय असावी ?

माहितगार
Fri, 04/20/2018 - 07:34 नवीन
@ समीरसूर निवडस्वातंत्र्य अधिक विकसीत व्हावयास हवे हे मान्य आहे. पण ज्या पुरुषांनी या पारंपारीक संस्कृतीस अंगी बाणून पर स्त्रीयांचा मान राखला त्यांची त्यांच्या तत्वावरची पाळलेली सकारात्मक निषपूर्ण, आणि अशा निष्ठेने ज्या स्त्रीयांना संरक्षण आणि आदर मिळाला असेल त्याचे क्रेडीट पूर्ण नाकारयचे का ? एनीवे पर्यायी सांस्कृतीक व्यवस्था काय असावी असे तुम्हाला वाटते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

असल्या कुचकामी संस्कारांमुळे

arunjoshi123
Fri, 04/20/2018 - 10:58 नवीन
असल्या कुचकामी संस्कारांमुळे आपल्या देशात "स्त्री" म्हणजे एक फिल्मी, काव्यात्म, अध्यात्मिक वगैरे ऊर्जा-बिर्जा आहे असे चित्र निर्माण झाले आहे.
हे सगळे संस्कार कुचकामी आहेत असं वाटणारांची एक मोठी फौज निर्माण झाली आहे आणि ती भारतीय स्त्रीला स्त्री म्हणून अप्रोच करत आहे. त्यातूनच सगळ्या नात्यांचं पावित्र्य नष्ट झालं आहे. शिवाय मधे मधे कठूआ वैगेरे होत आहे. आहात कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

संस्कार कुचकामी

समीरसूर
Fri, 04/20/2018 - 15:59 नवीन
आपले संस्कार पोथीनिष्ठ, फिल्मी, अतिआदर्श असतात. आपण स्त्रीला देवी मानतो आणि मुलगी होणार असेल तर गर्भाचा क्रूर खूनही करतो आपणच! परवा एकाने थेरगावला (पुणे) गरोदर बायकोच्या पोटात लाथा मारल्या. का? त्याला असं वाटलं की ती मुलीला जन्म देणार आहे. हे सुशिक्षित कुटुंब होतं. गेल्या ७-८ दिवसात भयानक बलात्काराच्या बातम्या वाचून दर वेळेस अंगावर काटा आला. एका घटनेत बापानेच मुलीवर बलात्कार केला आणि स्वतःच्या मित्रांना तिच्यावर बलात्कार करण्यासाठी बोलावलं. अक्षरशः ६-७-८ वर्षांच्या मुलींवर राजरोस, दररोज, भयानक पद्धतीने बलात्कार होतात. आपले शेकडो वर्षे जुने असलेले संस्कार गेले कुठे? ते जर खरोखर सशक्त असते तर भारतात मुलींची-महिलांची इतकी वाईट परिस्थिती असली असती का? मी वर सांगीतलेल्या उदाहरणात त्या माणसाच्या गरोदर बायकोला त्याच्या दोन बहिणींनी घट्ट धरले आणि मग त्याने तिला पोटात लाथांनी मारलं. बाईच बाईच्या जीवावर उठते. कुठे जातं बाईचं तथाकथित देवीपण? आपले संस्कार आणि त्यातला फोलपणा तपासून बघण्याची गरज आहे. आणि बदलण्याची तर नितांत गरज आहे. तरच आपली मानसिकता बदलेल. नाहीतर हे असंच चालू राहिल....नुसतं भारतीय संस्कार, भारतीय संस्कृती वगैरे पोपटपंची करून काही उपयोग नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

ओके ओके

arunjoshi123
Fri, 04/20/2018 - 16:16 नवीन
ओके ओके
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

गृहीतक चुकीचे नाहीये का? जो

बिटाकाका
Fri, 04/20/2018 - 17:22 नवीन
गृहीतक चुकीचे नाहीये का? जो "अमुक एक" स्त्रिला देवी मानतो तोच "अमुक एक" गर्भाचा क्रूर खून करतो असे आहे का ते? कि मुच्युअली एक्सकलूजीव आहे ते? जो देव मानत होता त्यानेच पोटात लाथा मारल्या असा अर्थ काढला जाऊ शकतो का? ----------------------------------------------------------
आपले शेकडो वर्षे जुने असलेले संस्कार गेले कुठे? ते जर खरोखर सशक्त असते
ते सशक्त राहिले नाहीयेत म्हणूनच या घटना घडतात असे मत बऱ्याच जणांनी वर मांडले आहे तेव्हा... ---------------------------------------------------------- याबाबतीतील/अशा घटनांच्या विरोधातील भावनेची धार बोथट होऊ नये म्हणून प्रयत्न करणे आवश्यकच आहे पण चुकीचे संदर्भ, बातम्या, तथ्य पुरविले जाऊ नयेत हि अपेक्षा रास्त नाहीये का? एका घटनेत बापानेच मुलीवर बलात्कार केला आणि स्वतःच्या मित्रांना तिच्यावर बलात्कार करण्यासाठी बोलावलं. - ती बातमी बाप आणि मुलीचे (सोळा वर्षांपूर्वी लग्न झाल्यावर दोन वर्षात वेगळे झाल्यावर) संबंध होते असं गावकर्यांचं म्हणणं आहे असेही सांगते. गावकऱ्यांच्या तक्रारीने त्याला अटक झाल्यावर दोन महिन्यापूर्वी जमीन मिळाला होता. कृपया माझ्या मुद्द्याचा विपर्यास ना करता फक्त डेटा कडे लक्ष द्यावे हि विनंती. अक्षरशः ६-७-८ वर्षांच्या मुलींवर राजरोस, दररोज, भयानक पद्धतीने बलात्कार होतात. - दररोज? हि अतिशयोक्ती नाहीये का? कुठे जातं बाईचं तथाकथित देवीपण? - त्या प्रकारात हे दिवीपण तिला देण्यात आलं होतं? तसे संस्कार देऊन हे घडले आहे? याबद्दल काही माहिती असल्यास पुरवावी. --------------------------------------------------------- आपण आपल्यात बदल जरूर घडवावेत, पण अंधपणाने नाही. या वाढत्या घटनांमुळे आणि त्यांच्या ऍग्ग्रेसिव्ह रिपोर्टींगमुळे आपण बलात्कार करणार्यांना संस्कार देण्यात आले होते पण तरीही ते तसे वागले हे हळूहळू गृहीत धरायला लागलो आहोत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

नैसर्गिक अवस्थेत फिरणाऱ्या

मार्मिक गोडसे
Fri, 04/20/2018 - 16:38 नवीन
नैसर्गिक अवस्थेत फिरणाऱ्या अंदमानातील जारवा जमातींमध्ये बलात्कार होतात का?
  • Log in or register to post comments

बलात्कार माकडात पण होतात.

अभ्या..
Fri, 04/20/2018 - 16:44 नवीन
बलात्कार माकडात पण होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

नेमके काय म्हणायचे आहे ?

माहितगार
Fri, 04/20/2018 - 17:12 नवीन
तुम्हा दोघांनाही नेमके काय म्हणायचे आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

शेकडो वर्ष जारवा जमाती

मार्मिक गोडसे
Fri, 04/20/2018 - 19:57 नवीन
शेकडो वर्ष जारवा जमाती नैसर्गिक अवस्थेत वाढत असताना monogamy पाळतात, की इतर प्राण्यांसारखी polyagamy ही आढळते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

monogamy , अर्थात

माहितगार
Fri, 04/20/2018 - 20:24 नवीन
monogamy , अर्थात वैधव्यानण्तर पुर्नविवाह होतात असे दिसते. संदर्भ पिडीएफ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

मर्यादित लोकसंख्येमुळे समजा

मार्मिक गोडसे
Fri, 04/20/2018 - 20:37 नवीन
मर्यादित लोकसंख्येमुळे समजा जोडीदार उपलब्ध नसेल तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

मूलभूत मानवी वर्तनाचे आकलन

चित्रगुप्त
Fri, 04/20/2018 - 17:44 नवीन
तुम्हा दोघांनाही नेमके काय म्हणायचे आहे ?
सहमत. दोन्ही प्रतिसादकर्त्यांनी कृपया खुलासा केल्यास या विषयाचा आवाका समजण्यास मदत होईल. या दोन्ही प्रतिसादातून सूचित होणारी दिशा मूलभूत मानवी वर्तनाचे आकलन करून घेण्याच्या दृष्टीने महत्वाची आहे. डेस्मंड मॉरिस यांनी The Naked Ape आणि The Human Zoo या महत्वाच्या पुस्तकांमधे याबद्दल उहापोह केलेला आहे. Image removed..Image removed.
  • Log in or register to post comments

सशक्त व अशक्त संस्कार

गामा पैलवान
Fri, 04/20/2018 - 18:17 नवीन
समीरसूर, आपले शेकडो वर्षे जुने असलेले संस्कार गेले कुठे? ते जर खरोखर सशक्त असते तर भारतात मुलींची-महिलांची इतकी वाईट परिस्थिती असली असती का? तुमचं वरचं विधान रोचक आहे. तुम्ही सशक्त हा शब्द वापरला आहे. सशक्त म्हणजे शक्ती धारण केलेला किंवा शक्ती धारण करू शकणारा. साहजिकंच एखादा बलदंड माणूस नजरेसमोर येतो. आता असं बघा की त्या बलदंड माणसाला आपलं बल टिकवून धरण्यासाठी खायला पौष्टिक अन्न व यथोचित व्यायाम हवाच ना? तोच न्याय संस्कारांनाही लावला पाहिजे. शाळेत झालेले संस्कार जर दृढ ठेवले नाहीत तर ते गंजून जाणारंच ना? म.टा. मधली उघडीनागडी सनी लियोन शालेय संस्कार बळकट करतेय का? वखवख संस्कारांमुळे होत नसून सनी लियोनमुळे वाढतेय. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी तर होत नाहीये ना? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

म.टा. मधली उघडीनागडी सनी

मार्मिक गोडसे
Fri, 04/20/2018 - 20:17 नवीन
म.टा. मधली उघडीनागडी सनी लियोन शालेय संस्कार बळकट करतेय का? वखवख संस्कारांमुळे होत नसून सनी लियोनमुळे वाढतेय. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी तर होत नाहीये शाळेत नेमके कोणते संस्कार केले जातात ? माझ्या दिवसाची सुरवात सनी दर्शनाने होते, परंतु वखवख नाही वाढत. तुमच्या बंबानी कधी आग विझवली आहे का?
  • Log in or register to post comments

सनी लियोन, वखवख व आगीचे बंब

गामा पैलवान
Sat, 04/21/2018 - 01:24 नवीन
मा.गो., १.
शाळेत नेमके कोणते संस्कार केले जातात ?
ते समीरसूर यांना विचारायला हवं. त्यांनी शालेय संस्कारांना चर्चेत आणलं. २.
माझ्या दिवसाची सुरवात सनी दर्शनाने होते, परंतु वखवख नाही वाढत.
अभिनंदन. सनीला पाहिल्याचं नव्हे तर वखवख न वाढल्याबद्दल अभिनंदन. मात्र सगळे तुमच्यासारखे सोज्वळ नसतात. सनीदर्शनाने बऱ्याच लोकांची वखवख वाढू शकते. ३.
तुमच्या बंबानी कधी आग विझवली आहे का?
मी आग विझवायच्या धंद्यात नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

वखवख वाढणार तरी कशी आणि कुणाची

चित्रगुप्त
Sat, 04/21/2018 - 03:51 नवीन
माझ्या दिवसाची सुरवात सनी दर्शनाने होते, परंतु वखवख नाही वाढत.
Image removed. बाबौ.... या सनीला बघून वखवख वाढणार तरी कशी आणि कुणाची ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

प्रथेप्रमाणे याही धाग्याचे

टवाळ कार्टा
Sat, 04/21/2018 - 05:07 नवीन
प्रथेप्रमाणे याही धाग्याचे काश्मीर होण्याचे दिसत आहे
  • Log in or register to post comments

टकादा

नाखु
Sat, 04/21/2018 - 20:40 नवीन
यालाच म्हणतात हरिदासाची कथा मूळ पदावर!! गुलाल बुक्का यांपासून दूर असलेला नाखु वाचकांची पत्रेवाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा