Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शिव कन्या on गुरुवार, 04/05/2018 - 14:17
देहाचे भाषांतर ..... उठता बसता बोलता हसता होतच राहते भाषांतर देहाचे, त्यावरील छिद्रांचे.... स्पर्शाने स्पर्शाचे भाषांतर वाचावे, ब्रेल लिपीसारखे आंधळे होऊन... कि, स्पर्शाने अनुभवावे शिलालेखाचे भाषांतर काळापलीकडे गेलेले ..... कि स्पर्शाने उलगडावी अगम्य देहलिपी हजारदा अनुवादीत करूनही अर्थ न लागणारी.... जरा व्याकरण चुकले तरी निर्धास्त असावे देहाचे भाषांतर असते एका संपूर्ण काळाचे अर्थांतर ..... -शिवकन्या

Submitted by एस on Fri, 04/06/2018 - 23:17

Permalink

अरुंधती रॉय यांच्या 'द गॉड ऑफ

अरुंधती रॉय यांच्या 'द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स' या कादंबरीत एक वाक्य आहे. 'बायोलॉजी डिझाइण्ड द डान्स.' त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sat, 04/07/2018 - 08:38

Permalink

उत्कृष्ट

उत्कृष्ट
  • Log in or register to post comments

Submitted by सत्यजित... on Sat, 04/14/2018 - 04:27

Permalink

क्लास! अभिनंदन!

अतिशय सुंदर,सुरेख,गहन भाषांतर! खरंतर रसग्रहणच लिहावसं वाटलं वाचता-वाचता! अजून लिहा... लिहीत रहा!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sat, 04/14/2018 - 18:20

Permalink

सुरेख कविता

सुरेख कविता
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 1893 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com