देहाचे भाषांतर
देहाचे भाषांतर
.....
उठता बसता
बोलता हसता
होतच राहते भाषांतर
देहाचे, त्यावरील छिद्रांचे....
स्पर्शाने स्पर्शाचे भाषांतर
वाचावे, ब्रेल लिपीसारखे
आंधळे होऊन...
कि, स्पर्शाने अनुभवावे
शिलालेखाचे भाषांतर
काळापलीकडे गेलेले .....
कि स्पर्शाने उलगडावी
अगम्य देहलिपी
हजारदा अनुवादीत करूनही
अर्थ न लागणारी....
जरा व्याकरण चुकले तरी
निर्धास्त असावे
देहाचे भाषांतर
असते एका संपूर्ण
काळाचे अर्थांतर .....
-शिवकन्या
अरुंधती रॉय यांच्या 'द गॉड ऑफ
उत्कृष्ट
क्लास! अभिनंदन!
सुरेख कविता