इथे गेले अनेक दिवस देव आहे की नाही, आस्तिक विरुद्ध नास्तिक अश्या बऱ्याच चर्चा सुरु आहेत. तसेही हा विषय काही नवीन नाही. गेली अनेक वर्षे हे सुरु होते आणि पुढेही सुरु राहील. देवावर श्रद्धा असलेले आस्तिक त्यांची आस्था सोडणं अवघड आहे आणि त्यांच्या श्रद्धेवर तुटून पडण्यापासून माघार घेणं हेही नास्तिकांना अवघड आहे. परंतु भारतीय अध्यात्मशास्त्राने यावर सोपे उत्तर आधीच देऊन ठेवलेले आहे. खर म्हणाल तर उत्तर एक्दम सोपे आणि म्हणाल तर अवघडही आहे. ते असे की तुम्ही स्वतःच तपासून पहा की देव आहे कि नाही ते! स्वतः प्रयत्न करा...अनुभव घ्या आणि मगच आपले ठाम मत तयार करा. हे खरे कि येथे ९९.९९९९% लोकांनी मग ते आस्तिक असोत कि नास्तिक, प्रत्यक्ष देव काही पाहिलेला नाही. काहीवेळा आस्तिकांना त्या शक्तीचा कदाचित थोडाफार अनुभव आलेला असावा अथवा काही योगायोगामुळे त्यांचे तसे मत झाले असावे परंतु नक्की कशामुळे अनुभव आला याचा शोध घेण्याचा प्रयत्न काही कोणी करत नाही. त्यापेक्षा सहजपणे श्रद्धा ठेऊन ते मोकळे होतात. त्याचप्रमाणे देवावर विश्वास नसलेले नास्तिक देखील देवाच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न न करता तो नाहीच असे ठामपणे म्हणत असतात. एखाद्या गोष्टीचे अस्तित्व सहजपणे दाखवता किंवा अनुभवता येत नसेल तर ती अस्तित्वातच नाही हे म्हणणे अगदी सोप्पे असते. थोडक्यात काय तर आस्तिक असो व नास्तिक कोणीही देवाचा शोध स्वतःहून घेण्याचा प्रयत्न करत नाही.
आता तुम्ही विचाराल कि शोध घ्यायचे म्हणजे नक्की काय करायचे? आता आपल्यापैकी अनेकजण शाळेमध्ये गणित शिकलेले असालच. आता मी तुम्हाला सांगितले कि १११ गुणिले १११ याचे उत्तर १२३२१ असे आहे तर तुम्ही काय कराल? एकतर तुम्ही उत्तर माहित नसताना देखील मी सांगितलेल्या उत्तरावर विश्वास ठेवाल, किंवा ते उत्तर चुकीचेच आहे असे म्हणाल. दोन्ही मार्ग तसे चुकीचेच. योग्य मार्ग हाच कि शाळेमध्ये जो आपण गुणाकार शिकलेलो आहे त्याचा वापर करून स्वतः उत्तर काढणे आणि पडताळून पाहणे. आता शाळेत शिकताना आपण काय केले तर बाई/सर जे शिकवीत आहेत ते प्रमाण मानून गुणाकार शिकला आणि स्वतः पडताळून पाहिले. देवाच्या शोधाप्रीत्यर्थ इथेही तेच करायचे आहे.
गेल्या हजारो वर्षात अनेकांना स्वतःच्या अस्तित्वाच्या प्रयोजनावर, देव आहे कि नाही यावर अनेक प्रश्न पडले आणि ते शोधताना आजच्या काळातील शास्त्रज्ञांनी जसे प्रयोग केले तसे अनेक प्रयोग या भारतभूमीत झाले. त्यावरून ज्यांना या जगापलीकडील रहस्य गवसले, जो काही शोध लागला तो ज्या पद्धतीमुळे लागला त्या पद्धती नोंदवून ठेवल्या. या पद्धती ज्यांनी वापरल्या त्या अनेक लोकांना मग ते विविध काळातील का असेनात काही अनुभव आले आणि या पद्धती प्रमाण झाल्या. आता वर गणिताचे उत्तर जसे काढले तसे आपल्याला एका समंजस विद्यार्थ्यांप्रमाणे फक्त एवढेच करायचे आहे कि या पद्धती शिकायच्या आहेत आणि त्याचा वापर करून उत्तर स्वतः पडताळून पाहायचे आहे. बस्स काम झाले. बाकी आस्तिक किंवा नास्तिक यापैकी कोणत्याही एकाबद्दल दुराग्रही असण्याची अवशक्यताच काय?
आता आपले दुर्दैव हेच कि ज्या गोष्टींचे उत्तर असंख्य लोकांना ज्या पद्धती वापरून मिळाले आहे ते सर्व आपल्याकडे खूप पूर्वीपासून उपलब्ध असूनही सध्याच्या काळातील असंख्य लोक त्यापासून अनभिज्ञ आहेत. एवढेच काय तर माहित असूनही न उत्तर न शोधता किंवा पद्धती न वापरता त्या कश्या चुकीच्या किंवा खोट्या आहेत किंवा वापरणारे कसे मूर्ख आहेत याचा डंका पिटण्यात आनंद मानणारे हि बरेच आहेत.
भारतीय अध्यात्मशास्त्र थोडेजरी वाचले तरी या वेगवेगळ्या पद्धतींची तुम्हाला ओळख होईल. त्यात प्रामुख्याने उपनिषदे, पातंजल योग, ब्रह्मसुत्रे आणि गीता यांचा समावेश होतो.
उपनिषदे वाचलीत तर लक्षात येईल सर्व प्रमुख उपनिषदे ही संवाद रूपी किंवा प्रश्नोत्तर रुपी आहेत. Fools argue and wise discuss या उक्तीवरच ती आधारित आहेत. उपनिषदे सरळ सरळ सांगत आहेत कि बाबांनो देव आहे कि नाही या वादात न पडता स्वतः पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा आणि ठरवा. त्यामुळे तुम्ही नास्तिक जरी असाल तरी उपनिषदांचा अभ्यास करा आणि त्यात सांगितलेल्या पद्धतींचा वापर करून ठरवा.
पतंजली तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सूत्रात स्पष्टपणे म्हणतात - योगश्चित्तवृत्तिनिरोधः| तदा द्रष्टुः स्वरूपेऽवस्थानम् || अर्थात योग म्हणजेच चित्तवृत्तींचा निरोध थोडक्यात चित्ताला निरनिराळी रूपे धारण करू न देणे अथवा सजगपणे मनातील विचारलाटा पूर्णपणे थांबवणे. असे केले तर द्रष्टा (ईश्वर म्हणा, देव म्हणाला किंवा शक्ती म्हणा) आपल्या स्वरूपात प्रकट होतो. इथे तर पतंजली सरळसरळ असंख्य लोकांना ईश्वर, देव का दिसत नाही अथवा केंव्हा दिसेल याचे स्पष्टपणे उत्तर देत आहेत. आता चित्तवृत्तींचा निरोध कसा करावा त्यासाठी काय मार्ग आहेत हे जाणण्यासाठी पतंजली योगसूत्रे नक्की वाचा. मनोविज्ञानातही झाला नसेल तेवढा मनाचा सूक्ष्म अभ्यास त्यांनी मोजक्या शब्दात मांडला आहे. काहीच मिळाले नाही तरी यात मनाची काही अद्भुत रहस्ये नक्की कळतील. त्यामुळे आस्तिक असाल वा नास्तिक पतंजली ने सांगितलेला अष्टांग योग आचरणात आणण्याचा प्रयत्न करा आणि ठरवा.
जर तुम्ही आस्तिकतेकडे झुकला असाल तर तुमच्यासाठी गीता आहे. देवाचा प्रत्यक्ष प्रमाण अनुभव आला नसेल तर केवळ श्रद्धा असून काय उपयोग? परंतु त्याच श्रद्धेचा उपयोग गीतेत सांगितल्याप्रमाणे भक्ती किंवा कर्मयोगाचा वापर करून देवाचा अनुभव घेण्यासाठी केला तर नक्कीच काहीतरी गवसेल.
थोडक्यात काय तर देव आहे किंवा नाही असे सरधोपटपणे दुराग्रही विधान करण्याऐवजी आपला सांस्कृतिक वारसा असलेल्या अध्यात्मशात्रात लिहिल्याप्रमाणे स्वतः प्रयत्न करून पहा आणि मगच आपले मत ठरवा...बघा पटतंय का?
वाचने
89073
प्रतिक्रिया
127
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म
नास्तिक व देव
ता क.
In reply to नास्तिक व देव by चौकटराजा
सध्याच्या न्यायाच्या निकषांचा
In reply to ता क. by चौकटराजा
जगाचं जे अध्यात्मिक स्ट्रक्चर
In reply to नास्तिक व देव by चौकटराजा
मग
In reply to जगाचं जे अध्यात्मिक स्ट्रक्चर by arunjoshi123
आध्यात्मिक ज्यूडिशिअरी आहे
In reply to मग by चौकटराजा
पण हे सगळं नाही अभ्यासलं तरी
'देवाच्या अस्तित्वाचा पुरावा
In reply to पण हे सगळं नाही अभ्यासलं तरी by मराठी कथालेखक
वाद करण्यात अर्थ नाही.
In reply to 'देवाच्या अस्तित्वाचा पुरावा by arunjoshi123
देव माना किंवा मानू नका, पण..
त्यासाठीच
In reply to देव माना किंवा मानू नका, पण.. by डॉ सुहास म्हात्रे
जितक्या निरर्थकपणे आपण
In reply to त्यासाठीच by चौकटराजा
तुमच्याच सारखा प्रश्न
In reply to जितक्या निरर्थकपणे आपण by arunjoshi123
जगात प्रत्येकाला अर्थ असलाच
In reply to तुमच्याच सारखा प्रश्न by चौकटराजा
मग तिचा आनंद घ्या....
In reply to जगात प्रत्येकाला अर्थ असलाच by arunjoshi123
मग कडवे नास्तिक तुम्हाला
In reply to त्यासाठीच by चौकटराजा
हा प्रतिसाद कट्टर नास्तिक
In reply to देव माना किंवा मानू नका, पण.. by डॉ सुहास म्हात्रे
सामान्यपणे सश्रद्ध लोक
In reply to हा प्रतिसाद कट्टर नास्तिक by सतिश गावडे
सामान्यपणे सश्रद्ध लोक
In reply to सामान्यपणे सश्रद्ध लोक by आनन्दा
रस्त्यावर साज-या होणा-या सर्व
In reply to सामान्यपणे सश्रद्ध लोक by सतिश गावडे
खरच घालावी. पण तुम्ही जाणता
In reply to रस्त्यावर साज-या होणा-या सर्व by श्रीगुरुजी
धर्म ही एक सार्वजनिक गोष्ट
In reply to रस्त्यावर साज-या होणा-या सर्व by श्रीगुरुजी
श्रद्धा आणि परंपरा या वेगळ्या
In reply to सामान्यपणे सश्रद्ध लोक by सतिश गावडे
सही पकडे हो. आणि हे सगळं
In reply to सामान्यपणे सश्रद्ध लोक by आनन्दा
घरीच काय सार्वजनिक स्थळी
In reply to हा प्रतिसाद कट्टर नास्तिक by सतिश गावडे
कुणी घरात भक्तिभावाने गणपतीची
In reply to हा प्रतिसाद कट्टर नास्तिक by सतिश गावडे
परंतू त्याचरोबर घरातील
In reply to कुणी घरात भक्तिभावाने गणपतीची by मार्मिक गोडसे
राष्ट्रगीताबाबत तसं काही बंधन
In reply to परंतू त्याचरोबर घरातील by arunjoshi123
+१
In reply to कुणी घरात भक्तिभावाने गणपतीची by मार्मिक गोडसे
सुहासराव,अगदी मनासारखं बोललात।
In reply to देव माना किंवा मानू नका, पण.. by डॉ सुहास म्हात्रे
देव कसा आहे याबद्दल विविध
त्यासाठी एखाद्या सत्पुरूषाचे
In reply to देव कसा आहे याबद्दल विविध by सतिश गावडे
माझा प्रश्न पुन्हा वाचा. हवं
In reply to त्यासाठी एखाद्या सत्पुरूषाचे by श्रीगुरुजी
माझे उत्तर पुरेसे स्पष्ट आहे.
In reply to माझा प्रश्न पुन्हा वाचा. हवं by सतिश गावडे
बरे. :)
In reply to माझे उत्तर पुरेसे स्पष्ट आहे. by श्रीगुरुजी
विविध धर्मामध्ये एकवाक्यता
In reply to देव कसा आहे याबद्दल विविध by सतिश गावडे
नास्तिकांचे प्रकार
In reply to विविध धर्मामध्ये एकवाक्यता by क्रिप्ट
सतिशजी,
In reply to देव कसा आहे याबद्दल विविध by सतिश गावडे
गौतम..
In reply to देव कसा आहे याबद्दल विविध by सतिश गावडे
गौतम बुद्धाला देव, दानव, भूते
In reply to गौतम.. by चौकटराजा
हे कुठे आहे ?
In reply to गौतम बुद्धाला देव, दानव, भूते by arunjoshi123
कै देव बिव...
आयुष्य हे शेअर मार्केटसारखे
In reply to कै देव बिव... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुन्हा चांगले दिवस येणारच
In reply to आयुष्य हे शेअर मार्केटसारखे by सतिश गावडे
लय भारी पेटून उठता राव तुम्ही
In reply to पुन्हा चांगले दिवस येणारच by arunjoshi123
----देव बीव काय नसतं. देवा
In reply to कै देव बिव... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'जब अच्छे दिन रुक नही सकते तो
In reply to कै देव बिव... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'जब अच्छे दिन रुक नही सकते तो बुरे दिनों की क्या औकात है''मास्तर अच्छे दिन कधी येणार आहेत ते तरी सांगाअच्छे दिन .....
In reply to 'जब अच्छे दिन रुक नही सकते तो by विजुभाऊ
६ कोटी लोक मारणार्या माओला
In reply to अच्छे दिन ..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माओला पूजणारे पु ल
In reply to ६ कोटी लोक मारणार्या माओला by arunjoshi123
सध्याला आनंदी दिवस चालू असतील
In reply to कै देव बिव... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
देव बीव काय नसतं. वास्तवात
In reply to कै देव बिव... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कण्ट्रोल ठेवा काका !
In reply to देव बीव काय नसतं. वास्तवात by arunjoshi123
बहुतेक तुम्हाला माजू नका असं
In reply to कण्ट्रोल ठेवा काका ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणि असेल ना देव तर अगोदर
In reply to कण्ट्रोल ठेवा काका ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म्हणेल जग आम्हास ..
In reply to कै देव बिव... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मार्गदर्शन हवे
माझा स्वतःचा उपनिषदांचा
In reply to मार्गदर्शन हवे by शरद
शरदजी, उपनिषदे १०८ आहेत परंतु
In reply to मार्गदर्शन हवे by शरद
संबंधित माहिती
In reply to शरदजी, उपनिषदे १०८ आहेत परंतु by क्रिप्ट
"मी आपणास उपनिषदांची संख्या
In reply to संबंधित माहिती by शरद
आत्मदेव
या सगळ्यांचे मार्गदर्शन
In reply to आत्मदेव by राही
राम राम अवघे जन..
In reply to आत्मदेव by राही
काव्यातील काही व अध्यात्म
In reply to राम राम अवघे जन.. by चौकटराजा
उत्कृष्ट प्रतिसाद
In reply to काव्यातील काही व अध्यात्म by चौकटराजा
क्या बात है...!
In reply to काव्यातील काही व अध्यात्म by चौकटराजा
सद्वर्तन व अहंकाराचा त्याग ही
In reply to काव्यातील काही व अध्यात्म by चौकटराजा
नास्तिक माणसाविषयी
In reply to सद्वर्तन व अहंकाराचा त्याग ही by arunjoshi123