देव आहे का नाही...वाद कशाला? स्वतःच पडताळून पाहा आणि ठरवा
इथे गेले अनेक दिवस देव आहे की नाही, आस्तिक विरुद्ध नास्तिक अश्या बऱ्याच चर्चा सुरु आहेत. तसेही हा विषय काही नवीन नाही. गेली अनेक वर्षे हे सुरु होते आणि पुढेही सुरु राहील. देवावर श्रद्धा असलेले आस्तिक त्यांची आस्था सोडणं अवघड आहे आणि त्यांच्या श्रद्धेवर तुटून पडण्यापासून माघार घेणं हेही नास्तिकांना अवघड आहे. परंतु भारतीय अध्यात्मशास्त्राने यावर सोपे उत्तर आधीच देऊन ठेवलेले आहे. खर म्हणाल तर उत्तर एक्दम सोपे आणि म्हणाल तर अवघडही आहे. ते असे की तुम्ही स्वतःच तपासून पहा की देव आहे कि नाही ते! स्वतः प्रयत्न करा...अनुभव घ्या आणि मगच आपले ठाम मत तयार करा. हे खरे कि येथे ९९.९९९९% लोकांनी मग ते आस्तिक असोत कि नास्तिक, प्रत्यक्ष देव काही पाहिलेला नाही. काहीवेळा आस्तिकांना त्या शक्तीचा कदाचित थोडाफार अनुभव आलेला असावा अथवा काही योगायोगामुळे त्यांचे तसे मत झाले असावे परंतु नक्की कशामुळे अनुभव आला याचा शोध घेण्याचा प्रयत्न काही कोणी करत नाही. त्यापेक्षा सहजपणे श्रद्धा ठेऊन ते मोकळे होतात. त्याचप्रमाणे देवावर विश्वास नसलेले नास्तिक देखील देवाच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न न करता तो नाहीच असे ठामपणे म्हणत असतात. एखाद्या गोष्टीचे अस्तित्व सहजपणे दाखवता किंवा अनुभवता येत नसेल तर ती अस्तित्वातच नाही हे म्हणणे अगदी सोप्पे असते. थोडक्यात काय तर आस्तिक असो व नास्तिक कोणीही देवाचा शोध स्वतःहून घेण्याचा प्रयत्न करत नाही.
आता तुम्ही विचाराल कि शोध घ्यायचे म्हणजे नक्की काय करायचे? आता आपल्यापैकी अनेकजण शाळेमध्ये गणित शिकलेले असालच. आता मी तुम्हाला सांगितले कि १११ गुणिले १११ याचे उत्तर १२३२१ असे आहे तर तुम्ही काय कराल? एकतर तुम्ही उत्तर माहित नसताना देखील मी सांगितलेल्या उत्तरावर विश्वास ठेवाल, किंवा ते उत्तर चुकीचेच आहे असे म्हणाल. दोन्ही मार्ग तसे चुकीचेच. योग्य मार्ग हाच कि शाळेमध्ये जो आपण गुणाकार शिकलेलो आहे त्याचा वापर करून स्वतः उत्तर काढणे आणि पडताळून पाहणे. आता शाळेत शिकताना आपण काय केले तर बाई/सर जे शिकवीत आहेत ते प्रमाण मानून गुणाकार शिकला आणि स्वतः पडताळून पाहिले. देवाच्या शोधाप्रीत्यर्थ इथेही तेच करायचे आहे.
गेल्या हजारो वर्षात अनेकांना स्वतःच्या अस्तित्वाच्या प्रयोजनावर, देव आहे कि नाही यावर अनेक प्रश्न पडले आणि ते शोधताना आजच्या काळातील शास्त्रज्ञांनी जसे प्रयोग केले तसे अनेक प्रयोग या भारतभूमीत झाले. त्यावरून ज्यांना या जगापलीकडील रहस्य गवसले, जो काही शोध लागला तो ज्या पद्धतीमुळे लागला त्या पद्धती नोंदवून ठेवल्या. या पद्धती ज्यांनी वापरल्या त्या अनेक लोकांना मग ते विविध काळातील का असेनात काही अनुभव आले आणि या पद्धती प्रमाण झाल्या. आता वर गणिताचे उत्तर जसे काढले तसे आपल्याला एका समंजस विद्यार्थ्यांप्रमाणे फक्त एवढेच करायचे आहे कि या पद्धती शिकायच्या आहेत आणि त्याचा वापर करून उत्तर स्वतः पडताळून पाहायचे आहे. बस्स काम झाले. बाकी आस्तिक किंवा नास्तिक यापैकी कोणत्याही एकाबद्दल दुराग्रही असण्याची अवशक्यताच काय?
आता आपले दुर्दैव हेच कि ज्या गोष्टींचे उत्तर असंख्य लोकांना ज्या पद्धती वापरून मिळाले आहे ते सर्व आपल्याकडे खूप पूर्वीपासून उपलब्ध असूनही सध्याच्या काळातील असंख्य लोक त्यापासून अनभिज्ञ आहेत. एवढेच काय तर माहित असूनही न उत्तर न शोधता किंवा पद्धती न वापरता त्या कश्या चुकीच्या किंवा खोट्या आहेत किंवा वापरणारे कसे मूर्ख आहेत याचा डंका पिटण्यात आनंद मानणारे हि बरेच आहेत.
भारतीय अध्यात्मशास्त्र थोडेजरी वाचले तरी या वेगवेगळ्या पद्धतींची तुम्हाला ओळख होईल. त्यात प्रामुख्याने उपनिषदे, पातंजल योग, ब्रह्मसुत्रे आणि गीता यांचा समावेश होतो.
उपनिषदे वाचलीत तर लक्षात येईल सर्व प्रमुख उपनिषदे ही संवाद रूपी किंवा प्रश्नोत्तर रुपी आहेत. Fools argue and wise discuss या उक्तीवरच ती आधारित आहेत. उपनिषदे सरळ सरळ सांगत आहेत कि बाबांनो देव आहे कि नाही या वादात न पडता स्वतः पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा आणि ठरवा. त्यामुळे तुम्ही नास्तिक जरी असाल तरी उपनिषदांचा अभ्यास करा आणि त्यात सांगितलेल्या पद्धतींचा वापर करून ठरवा.
पतंजली तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सूत्रात स्पष्टपणे म्हणतात - योगश्चित्तवृत्तिनिरोधः| तदा द्रष्टुः स्वरूपेऽवस्थानम् || अर्थात योग म्हणजेच चित्तवृत्तींचा निरोध थोडक्यात चित्ताला निरनिराळी रूपे धारण करू न देणे अथवा सजगपणे मनातील विचारलाटा पूर्णपणे थांबवणे. असे केले तर द्रष्टा (ईश्वर म्हणा, देव म्हणाला किंवा शक्ती म्हणा) आपल्या स्वरूपात प्रकट होतो. इथे तर पतंजली सरळसरळ असंख्य लोकांना ईश्वर, देव का दिसत नाही अथवा केंव्हा दिसेल याचे स्पष्टपणे उत्तर देत आहेत. आता चित्तवृत्तींचा निरोध कसा करावा त्यासाठी काय मार्ग आहेत हे जाणण्यासाठी पतंजली योगसूत्रे नक्की वाचा. मनोविज्ञानातही झाला नसेल तेवढा मनाचा सूक्ष्म अभ्यास त्यांनी मोजक्या शब्दात मांडला आहे. काहीच मिळाले नाही तरी यात मनाची काही अद्भुत रहस्ये नक्की कळतील. त्यामुळे आस्तिक असाल वा नास्तिक पतंजली ने सांगितलेला अष्टांग योग आचरणात आणण्याचा प्रयत्न करा आणि ठरवा.
जर तुम्ही आस्तिकतेकडे झुकला असाल तर तुमच्यासाठी गीता आहे. देवाचा प्रत्यक्ष प्रमाण अनुभव आला नसेल तर केवळ श्रद्धा असून काय उपयोग? परंतु त्याच श्रद्धेचा उपयोग गीतेत सांगितल्याप्रमाणे भक्ती किंवा कर्मयोगाचा वापर करून देवाचा अनुभव घेण्यासाठी केला तर नक्कीच काहीतरी गवसेल.
थोडक्यात काय तर देव आहे किंवा नाही असे सरधोपटपणे दुराग्रही विधान करण्याऐवजी आपला सांस्कृतिक वारसा असलेल्या अध्यात्मशात्रात लिहिल्याप्रमाणे स्वतः प्रयत्न करून पहा आणि मगच आपले मत ठरवा...बघा पटतंय का?
हम्म
नास्तिक व देव
In reply to नास्तिक व देव by चौकटराजा
ता क.
In reply to ता क. by चौकटराजा
सध्याच्या न्यायाच्या निकषांचा
In reply to नास्तिक व देव by चौकटराजा
जगाचं जे अध्यात्मिक स्ट्रक्चर
In reply to जगाचं जे अध्यात्मिक स्ट्रक्चर by arunjoshi123
मग
In reply to मग by चौकटराजा
आध्यात्मिक ज्यूडिशिअरी आहे
पण हे सगळं नाही अभ्यासलं तरी
In reply to पण हे सगळं नाही अभ्यासलं तरी by मराठी कथालेखक
'देवाच्या अस्तित्वाचा पुरावा
In reply to 'देवाच्या अस्तित्वाचा पुरावा by arunjoshi123
वाद करण्यात अर्थ नाही.
देव माना किंवा मानू नका, पण..
In reply to देव माना किंवा मानू नका, पण.. by डॉ सुहास म्हात्रे
त्यासाठीच
In reply to त्यासाठीच by चौकटराजा
जितक्या निरर्थकपणे आपण
In reply to जितक्या निरर्थकपणे आपण by arunjoshi123
तुमच्याच सारखा प्रश्न
In reply to तुमच्याच सारखा प्रश्न by चौकटराजा
जगात प्रत्येकाला अर्थ असलाच
In reply to जगात प्रत्येकाला अर्थ असलाच by arunjoshi123
मग तिचा आनंद घ्या....
In reply to त्यासाठीच by चौकटराजा
मग कडवे नास्तिक तुम्हाला
In reply to देव माना किंवा मानू नका, पण.. by डॉ सुहास म्हात्रे
हा प्रतिसाद कट्टर नास्तिक
In reply to हा प्रतिसाद कट्टर नास्तिक by सतिश गावडे
सामान्यपणे सश्रद्ध लोक
In reply to सामान्यपणे सश्रद्ध लोक by आनन्दा
सामान्यपणे सश्रद्ध लोक
In reply to सामान्यपणे सश्रद्ध लोक by सतिश गावडे
रस्त्यावर साज-या होणा-या सर्व
In reply to रस्त्यावर साज-या होणा-या सर्व by श्रीगुरुजी
खरच घालावी. पण तुम्ही जाणता
In reply to रस्त्यावर साज-या होणा-या सर्व by श्रीगुरुजी
धर्म ही एक सार्वजनिक गोष्ट
In reply to सामान्यपणे सश्रद्ध लोक by सतिश गावडे
श्रद्धा आणि परंपरा या वेगळ्या
In reply to सामान्यपणे सश्रद्ध लोक by आनन्दा
सही पकडे हो. आणि हे सगळं
In reply to हा प्रतिसाद कट्टर नास्तिक by सतिश गावडे
घरीच काय सार्वजनिक स्थळी
In reply to हा प्रतिसाद कट्टर नास्तिक by सतिश गावडे
कुणी घरात भक्तिभावाने गणपतीची
In reply to कुणी घरात भक्तिभावाने गणपतीची by मार्मिक गोडसे
परंतू त्याचरोबर घरातील
In reply to परंतू त्याचरोबर घरातील by arunjoshi123
राष्ट्रगीताबाबत तसं काही बंधन
In reply to कुणी घरात भक्तिभावाने गणपतीची by मार्मिक गोडसे
+१
In reply to देव माना किंवा मानू नका, पण.. by डॉ सुहास म्हात्रे
सुहासराव,अगदी मनासारखं बोललात।
देव कसा आहे याबद्दल विविध
In reply to देव कसा आहे याबद्दल विविध by सतिश गावडे
त्यासाठी एखाद्या सत्पुरूषाचे
In reply to त्यासाठी एखाद्या सत्पुरूषाचे by श्रीगुरुजी
माझा प्रश्न पुन्हा वाचा. हवं
In reply to माझा प्रश्न पुन्हा वाचा. हवं by सतिश गावडे
माझे उत्तर पुरेसे स्पष्ट आहे.
In reply to माझे उत्तर पुरेसे स्पष्ट आहे. by श्रीगुरुजी
बरे. :)
In reply to देव कसा आहे याबद्दल विविध by सतिश गावडे
विविध धर्मामध्ये एकवाक्यता
In reply to विविध धर्मामध्ये एकवाक्यता by क्रिप्ट
नास्तिकांचे प्रकार
In reply to देव कसा आहे याबद्दल विविध by सतिश गावडे
सतिशजी,
In reply to देव कसा आहे याबद्दल विविध by सतिश गावडे
गौतम..
In reply to गौतम.. by चौकटराजा
गौतम बुद्धाला देव, दानव, भूते
In reply to गौतम बुद्धाला देव, दानव, भूते by arunjoshi123
हे कुठे आहे ?
कै देव बिव...
In reply to कै देव बिव... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आयुष्य हे शेअर मार्केटसारखे
In reply to आयुष्य हे शेअर मार्केटसारखे by सतिश गावडे
पुन्हा चांगले दिवस येणारच
In reply to पुन्हा चांगले दिवस येणारच by arunjoshi123
लय भारी पेटून उठता राव तुम्ही
In reply to कै देव बिव... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
----देव बीव काय नसतं. देवा
In reply to कै देव बिव... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'जब अच्छे दिन रुक नही सकते तो
'जब अच्छे दिन रुक नही सकते तो बुरे दिनों की क्या औकात है''मास्तर अच्छे दिन कधी येणार आहेत ते तरी सांगाIn reply to 'जब अच्छे दिन रुक नही सकते तो by विजुभाऊ
अच्छे दिन .....
In reply to अच्छे दिन ..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
६ कोटी लोक मारणार्या माओला
In reply to ६ कोटी लोक मारणार्या माओला by arunjoshi123
माओला पूजणारे पु ल
In reply to कै देव बिव... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सध्याला आनंदी दिवस चालू असतील
In reply to कै देव बिव... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
देव बीव काय नसतं. वास्तवात
In reply to देव बीव काय नसतं. वास्तवात by arunjoshi123
कण्ट्रोल ठेवा काका !
In reply to कण्ट्रोल ठेवा काका ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बहुतेक तुम्हाला माजू नका असं
In reply to कण्ट्रोल ठेवा काका ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणि असेल ना देव तर अगोदर
In reply to कै देव बिव... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म्हणेल जग आम्हास ..
मार्गदर्शन हवे
In reply to मार्गदर्शन हवे by शरद
माझा स्वतःचा उपनिषदांचा
In reply to मार्गदर्शन हवे by शरद
शरदजी, उपनिषदे १०८ आहेत परंतु
In reply to शरदजी, उपनिषदे १०८ आहेत परंतु by क्रिप्ट
संबंधित माहिती
In reply to संबंधित माहिती by शरद
"मी आपणास उपनिषदांची संख्या
आत्मदेव
In reply to आत्मदेव by राही
या सगळ्यांचे मार्गदर्शन
In reply to आत्मदेव by राही
राम राम अवघे जन..
In reply to राम राम अवघे जन.. by चौकटराजा
काव्यातील काही व अध्यात्म
In reply to काव्यातील काही व अध्यात्म by चौकटराजा
उत्कृष्ट प्रतिसाद
In reply to काव्यातील काही व अध्यात्म by चौकटराजा
क्या बात है...!
In reply to काव्यातील काही व अध्यात्म by चौकटराजा
सद्वर्तन व अहंकाराचा त्याग ही
In reply to सद्वर्तन व अहंकाराचा त्याग ही by arunjoshi123
नास्तिक माणसाविषयी
In reply to सद्वर्तन व अहंकाराचा त्याग ही by arunjoshi123
नास्तिक असाल तर आत्मशोध कशाला
In reply to आत्मदेव by राही
असा स्थिरबुद्धि मनुष्य
देव ही एक संकल्पनाच आहे.----
In reply to देव ही एक संकल्पनाच आहे.---- by क्रिप्ट
असहमत
In reply to असहमत by राही
हा हा हा
ऑफिसला जाताना ओळीने तीन सिग्नल हिरवे मिळाले तरी ते त्याला अनुभूती मानतात.हे फार भारी हे अजुन एक लगेच आठवलेला किस्सा एका कल्ट चा गुरुजींचा कोर्स सुरु होता. जीवनाची कला वगैरे तेव्हा लाईट गेली. आणि हॉलच्या खिडक्या उघड्या होत्या. सभोवताली झाडे होती. वार्याची एक छानशी झुळुक आली काय नी लगेच.. "देखो गुरुजीने आपके लिए हबा भेजी है " बोलो जय गुरुदेव म्हणज सांगायच तात्पर्य की कुठल्याही पातळीवर श्रद्धा जाऊ शकते. मुळात गुरुजींनी लाइन जाऊच का दिली ? अस विचारायच नसत ( आणि तुम्ही जरी विचारलच तरी मग तुम्हाला गुरु शक्तीची प्रचिती कशी आली असती ? च्या प्रतिप्रश्नावर डोक फोडुन घ्यायची तयारी हवी )In reply to हा हा हा by मारवा
भारीच
In reply to हा हा हा by मारवा
मुळात गुरुजींनी लाइन जाऊच का
In reply to असहमत by राही
जे आणि जिथे जीवन व्यतीत
In reply to जे आणि जिथे जीवन व्यतीत by arunjoshi123
+१. हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे
In reply to +१. हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे by क्रिप्ट
भगवद्गीता प्रक्षिप्त आहे ना?
In reply to असहमत by राही
ईश्वराचा साक्षात्कार
In reply to असहमत by राही
-१
In reply to असहमत by राही
-१
In reply to देव ही एक संकल्पनाच आहे.---- by क्रिप्ट
काय म्हणता ?
In reply to काय म्हणता ? by चौकटराजा
जाऊ द्या हो, देव आहे म्हणणारे
In reply to जाऊ द्या हो, देव आहे म्हणणारे by सतिश गावडे
तुम्ही मोघम प्रश्न विचारू नका
In reply to तुम्ही मोघम प्रश्न विचारू नका by arunjoshi123
आंबा कसा आहे ते सांगितलंत
In reply to जाऊ द्या हो, देव आहे म्हणणारे by सतिश गावडे
आम्ही सांगून पटत नाही म्हणून
In reply to आम्ही सांगून पटत नाही म्हणून by श्रीगुरुजी
असूदया...
In reply to काय म्हणता ? by चौकटराजा
मी तरी असे म्हणू शकतो की मी
In reply to काय म्हणता ? by चौकटराजा
असं पहा - जरा मी मोटारसायकल
In reply to काय म्हणता ? by चौकटराजा
"" देव नाही " याचा शोध
In reply to काय म्हणता ? by चौकटराजा
"" देव नाही " याचा शोध
अतिशय मुद्देसूद
In reply to अतिशय मुद्देसूद by सस्नेह
"तस्मात मिपावर लेख पाडत
In reply to अतिशय मुद्देसूद by सस्नेह
+१
मस्त.. फुल्ल टाईमपास आहेत
In reply to मस्त.. फुल्ल टाईमपास आहेत by अभ्या..
वेळ असेल तर बाहेरुन मजा न
उत्सवप्रियत्व व शास्त्र
In reply to उत्सवप्रियत्व व शास्त्र by गामा पैलवान
विसर्जन
In reply to विसर्जन by राही
अर्धविसर्जन
In reply to अर्धविसर्जन by गामा पैलवान
शास्त्र
In reply to शास्त्र by राही
शास्त्राचं म्हणाल तर, एकदा
In reply to शास्त्राचं म्हणाल तर, एकदा by बिटाकाका
उत्तम
In reply to शास्त्राचं म्हणाल तर, एकदा by बिटाकाका
शास्त्राला अपेक्षित
In reply to शास्त्राला अपेक्षित by राही
तुम्ही लिहिले आहेत ते साईड
In reply to तुम्ही लिहिले आहेत ते साईड by बिटाकाका
शास्त्र वाहत्या पाण्यात
In reply to शास्त्र वाहत्या पाण्यात by अभिजीत अवलिया
दोन मुद्दे -
In reply to दोन मुद्दे - by बिटाकाका
शास्त्र बदलण्यास तयार नसते हे
In reply to तुम्ही लिहिले आहेत ते साईड by बिटाकाका
शास्त्रानुसार प्राणप्रतिष्ठा
In reply to शास्त्रानुसार प्राणप्रतिष्ठा by शाम भागवत
अगदी अगदी
In reply to तुम्ही लिहिले आहेत ते साईड by बिटाकाका
छे हो.
In reply to छे हो. by राही
तुम्ही दोन वेगवेगळ्या
कोणे एके काळी मी प्रचंड
In reply to कोणे एके काळी मी प्रचंड by अभिजीत अवलिया
देव आणि विज्ञान
अगदी अगदी
In reply to अगदी अगदी by राही
याबद्दलही आपल्याकडे काय
In reply to याबद्दलही आपल्याकडे काय by बिटाकाका
अतार्किक?
In reply to अतार्किक? by राही
शहरातल्या उत्तरदायित्व
In reply to शहरातल्या उत्तरदायित्व by बिटाकाका
तेच तेच कितीदा लिहू?
In reply to तेच तेच कितीदा लिहू? by राही
तुम्ही पुनर्विसर्जनाचा आणि
" देव आहे का नाही...वाद कशाला
अध्यात्म आणि प्रांजळपणा
अनुभूती
In reply to अनुभूती by arunjoshi123
अनुभूती
देव आहे
मना सज्जना भक्ति पन्थेचि जावे