Skip to main content

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुक-२०१७ मतमोजणी

लेखक गॅरी ट्रुमन यांनी शनिवार, 16/12/2017 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सोमवार १८ डिसेंबर रोजी होईल. मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होईल. नेहमीप्रमाणे त्या दिवशी मी मिपावर ऑनलाईन असणारच आहे. जसेजसे कल आणि निकाल येतील तसेतसे ते इथे पोस्ट करणार आहे. त्यासाठी हा नवा धागा उघडत आहे. या धाग्यावर विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि त्याअनुषंगाने संबंधित विषयांवर चर्चा व्हावी ही अपेक्षा. धन्यवाद.

वाचने 44229
प्रतिक्रिया 249

प्रतिक्रिया

गुजरातमध्ये सीसॉ चालले आहे ! भाजप/काँग्रेस्/इतर : ९०/८०/२ मध्ये एकदा भाजपला हार्ट अ‍ॅटॅक येण्यासारखी परिस्थिती झाली होती ! :) हिमाचलमध्ये भाजपचा विजय जवळजवळ नक्की आहे : ३८/२६/२

आता १७४ जागांवरील कल हाती आले आहेत. भाजप ९० तर काँग्रेस ८१ जागांवर पुढे आहे.

कलांचे रिव्हर्सल होत आहे. आता भाजप ९६ आणि काँग्रेस ८२ जागांवर पुढे आहे.

भाजप ९६ काँग्रेस ८२ इतर ३ आलेसुद्धा असतील काही जणांना हार्ट अ‍ॅटॅक :)

छत्तिसगड विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप-काँग्रेस यात तीन वेळा कलांचे वरखाली झाले होते त्याची आठवण झाली.

In reply to by रंगीला रतन

काहीतरी गडबड झालेली दिसत आहे. एक आकडा लिहून दुसरा वाचायला जावे तर तो बदललेला दिसतोय ! :) आता ९५/८४/३

सौराष्ट्रमध्ये भाजपने पिछाडी कमी केली आहे. १५ मिनिटांपूर्वी काँग्रेस ३५ जागांवर पुढे होती आता २९ जागांवर पुढे आहे. आता भाजप-- ९८ आणि काँग्रेस ८० जागांवर पुढे

काँग्रेसने पाटीदार भागात मोठे यश मिळवलेले दिसत आहे. पण भाजपने वनवासी भागात मोठे यश मिळवलेले दिसत आहे. आता भाजप ९७ आणि काँग्रेस ८१

पाटीदारांची मते मिळवायच्या मागे काँग्रेस गेली पण त्यांनी त्यांचे स्वतःचे निष्ठावान मतदार गमावलेले दिसत आहेत. जर काँग्रेसने आपले हक्काचे मतदार राखले असते आणि वर पाटीदार मते घेतली असती तर काँग्रेसला मोठा विजय मिळाला असता असे म्हटले जात आहे. मणीशंकर अय्यर यांचे विधान भावले का? भाजप--- ९४ आणि काँग्रेस-८४ आता नितीन पटेल मागे.

In reply to by गॅरी ट्रुमन

मणीशंकर अय्यर यांचे विधान भावले का?
भावले नाही भोवले :) इतक्या रोलरकोस्टर निवडणुका चालू असताना अशा चुका व्हायच्याच :)

टाईम्स नाऊवर एका भूतपूर्व इसींनी मोठी चपखल व अर्थपूर्ण टिप्पणी केली: गुजरात निवडणूकीत इव्हिएमची जीत झाली ! (पक्षी : अटीतटीची लढत झाल्याने इव्हिएमबद्दलच आरोप निकालात निघाले आहेत !)

आता उत्तर गुजरातमध्ये भाजप १७ तर कोंग्रेस १४ जागांवर पुढे दिसत आहे. हे लिहिता लिहिता भाजप ९८ आणि काँग्रेस ८२. पूर्ण निकाल येईपर्यंत मला जागेवरून उठू द्यायचे नाही असे गुजरातच्या मतदारांनी ठरवलेले दिसते :) :)

गुजरात - भाजप १०६, काँग्रेस - ७४ (एबीपी) हिमाचल - भाजप ४०, काँग्रेस २४ दोन्ही राज्यात भाजपला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

दोन्ही राज्यात भाजपला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. गुजरात च्या बाबतित अंशतः मान्य. हिमाचल मध्ये नसलेलि सत्ता मिळणे हे मोठे यशच म्हणावे लागेल.

आता ए.सी.निल्सनने भाजपला १०७ आणि काँग्रेस्ला ७१ जागांवर आघाडी आहे असे सांगितले आहे.

गुजरात - भाजप १०६, काँग्रेस - ७३ (एबीपी) हिमाचल - भाजप ३९, काँग्रेस २५

आता भाजप १०३ आणि काँग्रेस ७५ जागांवर पुढे. हिमाचलमध्ये भाजप ३९ आणि काँग्रेस २५ जागांवर पुढे

गुजरात - भाजप १०३, काँग्रेस - ७६ (एन्डीटीव्ही) हिमाचल - भाजप ४१, काँग्रेस २२ एन्डीटीव्हीच्या दाव्यानुसार आतापर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार काँग्रेसला ४९% व भाजपला ४४% मते मिळाली आहेत. काँगेसला तब्बल ५% जास्त मते मिळूनसुद्धा मागे कशी हे गूढच आहे.

सध्या कॉंग्रेसला ज्या काही ७३ जागा मिळताना दिसत आहेत त्याचे श्रेय राहुल गांधींना द्यायला टिव्हीवरच्या चर्चेत बसलेल्या काही तथाकथित पुरोगामी वक्त्यांनी सुरु केलेय. मात्र त्यांच्या हे लक्षात येत नाही की, २०१२ पेक्षा ज्या काही वाढीव जागा कॉंग्रेसला मिळत आहेत त्या हार्दीक, अल्पेश व जिग्नेश या तिकडींने पाटीदार व इतर लोकांना भाजपा पासून फोडलेय त्याचा तो परिणाम आहे.

निवडणूक आयोगाच्या वेब साईट वर आता (१०. ३०) जाहीर झालेले निकाल १६७ आहेत त्यात भाजप ९७ आणि काँग्रेस ६४ दाखवत आहेत. याचा अर्थ आता भाजपचे सरकार आले आहे असे म्हणता येईल बाकी सर्व मोह माया आहे

आता गुजरातमध्ये भाजप १०७, काँग्रेस ७३ तर हिमाचलमध्ये भाजप ४० आणि काँग्रेस २२ जागांवर पुढे

भांडवली बाजार सकाळी जवळपास ७०० अंकांनी (अडीच टक्क्यांनी) कोसळला होता. आता बाजार १७१ अंकांनी वर आहे.

In reply to by श्रीगुरुजी

अरे अरे डे- ट्रेडिंग मध्ये इंडेक्समधले शेअर्स घ्यायला हवे होते सकाळी :) माझी बस चुकली म्हणायची.

गुजरातमधील दोन निकाल आले आहेत. जमालपूर-खाडियामधून काँग्रेसचा तर एलीसब्रीजमधून भाजपचा विजय झाला आहे. हे दोन्ही मतदारसंघ अहमदाबाद शहरात आहेत. जमालपूर-खाडियाविषयी मी मतमोजणीपूर्व धाग्यात लिहिले होते.

विजय रूपाणी आणि नितीन पटेल दोघेही आघाडीवर. आता गुजरातमध्ये भाजप १०५ आणि काँग्रेस ७५. तर हिमाचलमध्ये भाजप ४२ आणि काँग्रेस २२.

या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील १९८५ मधील विधानसभा निवडणुकीची आठवण झाली. डिसेंबर १९८४ मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने देशात तब्बल ४१४ जागा जिंकल्या होत्या. त्यात महाराष्ट्रातील ४८ पैकी तब्बल ४३ जागांचा समावेश होता. त्यानंतर जेमतेम ३ महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेची निवडणुक झाली. लोकसभा निवडणुकीतील अपयशाचा धडा घेऊन पवारांनी विरोधी पक्षांची मोट बांधली. पवारांच्या अध्यक्षतेखालील तत्कालीन समाजवादी काँग्रेस, जनता पक्ष, भाजप व शेकाप यांनी एकत्र येऊन पुलोद स्थापन करून काँग्रेसविरूद्ध एकत्रित निवडणुक लढवून मतांची फाटाफूट टाळायचा प्रयत्न केला. त्या निवडणुकीचे निकाल यायला सुरूवात झाल्यानंतर सुरवातीस पुलोदचे उमेदवार आघाडीवर होते. नाशिकमधील सर्व १४ जागांवर पुलोद उमेदवारांनी विजय मिळविला. निकालांचा कल बघून काँग्रेसच्या गोटात घबराट पसरली होती. शेवटी संध्याकाळी मतमोजणी संपल्यानंतर २८८ पैकी काँग्रेसला १६२ जागा मिळून बहुमत मिळाले. पुलोद गटाला १०४ जागा मिळाल्या होत्या (समाजवादी काँग्रेस ५६, जनता पक्ष २०, भाजप १६ आणि शेकाप १२). लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिले तर काँग्रेसला कमीतकमी २२५ जागा मिळायला हव्या होत्या. परंतु त्यांना १६२ जागांवर समाधान मानावे लागले. आताची स्थिती - गुजरात - भाजप १०७, काँग्रेस - ७४ (एबीपी) हिमाचल - भाजप ४२, काँग्रेस २३

गुजरातमध्ये आता भाजप १०६ आणि काँग्रेस ७४ . हिमाचलमध्ये भाजप ४२ आणि काँग्रेस २३. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी विजयी. हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर यांचे घर असलेल्या विरमगाममधून भाजपच्या डॉ. तेजश्री पटेल पुढे.

एलिस ब्रिज मधून भाजपचे उमेदवार राकेश शाह तब्बल ९२,४४८ मतांनी विजयी. हिमाचल प्रदेश: भाजप ४०, काँग्रेस २५

In reply to by श्रीगुरुजी

एलीसब्रिज मतदारसंघ अहमदाबाद शहरात आहे. किंबहुना साबरमती नदीवर ५-६ पूल आहेत त्यापैकी एक एलिसब्रिज आहे. त्या पूलाच्या नावावरून या मतदारसंघाचे नाव आहे. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. १९९३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे हरेन पंड्या पहिल्यांदा निवडून गेले होते. त्यानंतर अनेक निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून भाजपने ७५% पेक्षा जास्त मते घेतली आहेत. एलिसब्रिजबरोबरच भाजपचे घाटलोडिया, नारणपुरा (पूर्वीचा सरखेज), मणीनगर हे अहमदाबाद आणि परिसरामधील इतर बालेकिल्ले आहेत.

या निवडणुकांची मतमोजणी बघता गुजरातमधील २००७ च्या निवडणुकांच्या मतमोजणीचीही आठवण झाली. हिरव्या देशातून बघितलेली मी ती शेवटची मतमोजणी होती आणि पूर्ण रात्र जागून निकाल बघितले होते हे लक्षात आहे. त्यावेळीही काही काळ काँग्रेस भाजपच्या पुढे होती पण मार्जिन यावेळेइतके नव्हते. यावेळी एक वेळ अशी आली होती की काँग्रेस भाजपपेक्षा १२ जागांनी पुढे होती. २००७ मध्ये हा फरक ५ पेक्षा जास्त कधीच नव्हता. काँग्रेस ८६ आणि भाजप ७४ जागांवर पुढे बघून माझ्याही काळजाचा ठोका चुकला होता :) :) अजूनही मतमोजणी पूर्ण झालेली नाही. नक्की निकाल काय लागतात हे बघायचे. मी अंदाज व्यक्त केला होता १३० ते १३५. बर्‍याचदा निकालांचे अंदाज व्यक्त करताना मला काय होईल असे वाटते त्याबरोबरच काय व्हावे असे वाटते याचाही प्रभाव नकळत पडतोच. पुढच्या वेळी ती काळजी घ्यायला हवी. मलाही हा धडा मिळालाच आहे.

रिपब्लिक चॅनेलवर म्हटले जात आहे की भाजपने २०१२ पेक्षा जास्त (४७.८५% पेक्षा जास्त) मते मिळवली आहेत. तसे असेल तर हे बर्‍यापैकी इन्क्रेडिबल (मराठी शब्द?) आहे. २००२ मध्ये भाजपने ४९.८५%, २००७ मध्ये ४९.१२% तर २०१२ मध्ये ४७.८५% मते मिळवली होती. जर १५ वर्षांपर्यंत भाजप ४८-४९% मते राखत असेल तर ते नक्कीच काहीतरी वेगळे आहे हे नक्कीच. हे लिहितालिहिता भाजप १०७ आणि काँग्रेस ७२.

In reply to by गॅरी ट्रुमन

भाजपाला गुजरातमध्ये ४९.३% तर हिमाचलमध्ये ४८.५% वोट शेअर दिसत आहे.