✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दमा (Bronchial Asthma ) - चला समजावून घेऊ (भाग - १)

ड
डॉ श्रीहास यांनी
Tue, 08/29/2017 - 20:07  ·  लेख
लेख
प्रास्तविक : माझे वडील गेल्या ३७ वर्षांपासून श्वसनविकार व ॲलर्जीतज्ञ म्हणुन प्रॅक्टीस करत आहेत, सुरवातीच्या ८-९ वर्षांनतर त्यांना रुग्ण प्रशिक्षण कार्यक्रमाची कल्पना सुचली तेव्हापासून आमच्या दवाखान्यात दमा ,COPD आणि टिबी या आजारांसाठी रुग्ण प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जातो .... ह्या कार्यक्रमाची २००९ साली लिमका बुक आॅफ रेकाॅर्डस् मध्ये नोंद घेतली गेली (१०,००० पेक्षा जास्त रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना प्रशिक्षीत केलं गेलं) आणि इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड मध्ये देखिल दखल घेतली गेली आहे. मी internship दरम्यान काहीकाळ ह्या उपक्रमात असायचो , गेल्या ७ वर्षांपासून श्वसनविकार विषयात पदव्युत्तर झाल्यापासून नियमीतपणे (१ला व ३रा शनिवार) रुग्ण प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी आहे... स्वत:ची जास्त जाहिरात न करता त्याच कार्यक्रमात दिली जाणारी माहिती इथे लेखमालेद्वारे देण्याचा प्रयत्न करतो आहे.. तर मित्रमंडळींनो ह्या भागात दमा किंवा अस्थमाची लक्षणं जाणून घेऊयात १.खोकला : दम्याबद्दल बोलतांना पहिलं लक्षण दम लागणे हे असलं पाहीजे असं बऱ्याच जणांना वाटत असेल पण तसं नाहीये ; तर रात्री झोपतांना येणारा ,हसल्यावर येणारा, मोठ्यानी बोलल्यावर येणारा , लहान मुलांमध्ये जोरात रडल्यावर येणारा खोकला ..... सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे (पण सर्वच रुग्णांना खोकला असेलच असं नाही ).बहूतांशी कोरडाच खोकला असतो , पण कफ/बेडका म्हणजे ओला खोकला सुध्दा दम्याचं लक्षण आहेच. २.दम लागणे किंवा धाप लागणे : वेगानी चालतांना , जिना चढतांना , सामान घेऊन किंवा छोट्या बाळाला घेऊन चालतांना नेहमीपेक्षा जास्त दम/धाप लागत असेल तर ; वातावरण बदलानंतर काहीना दम लागतो (बऱ्याच ढगाळ वातावरणात श्वासाचा त्रास होतो , पण सर्वच दमा असणाऱ्यांना त्रास होईल असं अजिबात नाही)... घरात साफसफाई केल्यानंतर , जुनं सामान/कपडे यांच्या सफाईनंतर (जुनी धुळ आणि त्यातील जंतू /house dust mites) यांचा संपर्क आल्यानंतर दम लागत असल्यास हा देखील दमा... ३.श्वासाचा आवाज : शिट्टी सारखा सू-सू आवाज येतो, बरेचदा झोपेत असा आवाज येतो त्यामुळे पेशंटचे नातेवाईक ह्या लक्षणाबद्दल जास्त सांगतात.. छातीतून घरघर आवाज येतो (जणु काही कफ अडकलेला असावा असा )... ह्याचं कारण असं की श्वासनलिका आकसलेल्या असल्या कारणानी त्यातून बाहेर पडणाऱ्या हवेचा असा आवाज येतो. ४.छातीवर येणारा दबाव किंवा आवळ्ल्यासारखं वाटणं - हे एक common लक्षण, बरेचदा रुग्ण सांगतात की काहीतरी वजनदार वस्तू छातीवर ठेवल्यागत भार जाणवतो म्हणून. ५.सर्दी: दमा असणाऱ्या ६०-७०% रुग्णांमध्ये सर्दी त्रास जाणवत असतो , केवळ सर्दी म्हणून येणारे बरेचसे रुग्ण मुळात दमा असलेलेच असतात , one airway one disease ह्या थिअरी प्रमाणे वारंवार सर्दी होणाऱ्या रुग्णांमध्ये दमा होणाच्यं प्रमाण वाढतं... खास करून ज्यांना ऋतुबदल होतांना सर्दी होते ती अॅलर्जीची सर्दी .... seasonal allergies; पण जे वर्षभर सर्दीमुळे ग्रस्त असतात ते perennial allergy वर्गात मोडणारे ... ६.पोटातले येणे: तान्ह्या मुलांमध्ये आढळणारं लक्षण !! लहान मुलांमध्ये श्वसानाचे स्नायू पूर्णपणे विकसीत न झाल्यामुळे पोटाचे स्नायू श्वास घेण्यासाठी मदत करतात आणि ती आत-बाहेर होणारी हालचाल (हापसल्यासारखं ) पोटातलं आलं असं म्हटल्या जातं आणि खेडेगावातून किंवा छोट्या गावांमधून असा गैरसमज आहे की पोटातलं आलं म्हणजे करणी/भानामती , काळा जादू वगैरे... आणि मग अघोरी उपचार सुरू होतात... तान्ह्या बाळांना पोटाला डागण्या दिल्या गेलेल्या पाहील्या आहेत.... पण ह्या रुग्णांचा योग्य उपचार झाला तर पोटातलं येणं पूर्ण थांबतं !! ह्या शिवाय दुध पिता न येणं, श्वासाचा आवाज येणं, छातीवर हात ठेवला तरी घरघर जाणवते , बाळाचं वजन योग्यरीतीने वाढत नाही अशी साधीच पण महत्वाची लक्षणे दमा निदान करण्यास उपयुक्त ठरतात... ७.ॲसिडीटी किंवा आम्लपित्त : दमा असणाऱ्या रुग्णांनध्ये ॲसिडीटी चा त्रास खुपच common आहे ... ॲसिडीटी वाढली की दमा वाढतो आणि vice versa... हे लक्षण महत्वाचं आहे कारण दमा असणाऱ्या रुग्णांमध्ये ॲसिडीटी च्या औषधाची मात्रा दुप्पट द्यावी लागू शकते ... पुढील भागात बघूया ... दम्याची कारणं
  • दमा (Bronchial Asthma ) - चला समजावून घेऊ (भाग - २)

Book traversal links for दमा (Bronchial Asthma ) - चला समजावून घेऊ (भाग - १)

  • दमा (Bronchial Asthma ) - चला समजावून घेऊ (भाग - २) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
आरोग्य
औषधोपचार
विज्ञान
शिक्षण

प्रतिक्रिया द्या
49053 वाचन

💬 प्रतिसाद (63)

प्रतिक्रिया

आणि allergic rhinitis पण

प्रीत-मोहर
Wed, 08/30/2017 - 16:44 नवीन
आणि allergic rhinitis पण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

Allergic Rhinitis,eczema &

डॉ श्रीहास
Wed, 08/30/2017 - 17:29 नवीन
Allergic Rhinitis,eczema & asthma ... एकत्र आढळू शकतात , अश्या वेळेस spirometry & Allergy test दोन्ही द्वारे निदान करणं उत्तम ... Allergic Rhinitis, eczema (त्वचेच्या अॅलर्जीचा प्रकार )आई-वडील किंवा आजी-आजोबांमध्ये असल्यास पुढच्या पिढीत दमा येण्याची शक्यता वाढते .... ॲलर्जी अनुवंशीकतेने येताना वेगळ्या स्वरूपात येऊ शकते त्याचं हे उदाहरण !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

या लेखमालिकेचा उपयोग नक्की

रेवती
Wed, 08/30/2017 - 18:03 नवीन
या लेखमालिकेचा उपयोग नक्की होणार. माझ्या मुलाला बालदमा होता. तो ७ वर्षे चालला. अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद असे दोन्ही उपचार चालू होते. आता पूर्णपणे बरा झालाय. तुम्ही सांगितलेल्या लक्षणांपैकी क्र. १, ३, ५, ६ ही लक्षणे होती. अजूनही स्प्रिंग सिझन आला की महिनाभर आधी विशिष्ठ आयुर्वेदिक गोळ्या चालू करतो. गरज भासत नाही पण खबरदारी म्हणून.
  • Log in or register to post comments

फार मोलाचा प्रतिसाद आहे तुमचा _/\_

डॉ श्रीहास
Wed, 08/30/2017 - 18:16 नवीन
Spirometry नावाची तपासणी करून घ्या वर्षातून एकदा (स्प्रिंग मध्येच करा हवी तर) नाॅर्मलच आली तर औषधं देऊच नका ..... खबरदारीच घ्यायची असेल तर दर वर्षी swine flu ची लस द्या (flu shot)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

स्पायरोमेट्री सल्ल्याबद्दल

रेवती
Wed, 08/30/2017 - 21:16 नवीन
स्पायरोमेट्री सल्ल्याबद्दल धन्यवाद. फ्लू शॉटबद्दल एक सागायचे आहे. एकेकाळी आम्ही सगळेजण फ्लू शॉटस वर्षातून एकदा घ्यायचो आणि हमखास आजारी पडायचो. मग जेंव्हापासून घेणे बंद केले एकदाही आजारी पडलो नाही. आणि हे फक्त आमच्या बाबतीत नव्हे तर बर्‍याच भारतीय कुटुंबांच्याबाबतीत घडले आहे. सगळ्यांनी फ्लू शॉटस घेणे बंद केले. हे बरोबर आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ श्रीहास

...

धडपड्या
Wed, 08/30/2017 - 21:02 नवीन
उत्तम लेखन... (विषय आणि रचना, दोन्ही...)
  • Log in or register to post comments

वाचतोय . . . . .

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 08/31/2017 - 00:35 नवीन
खूप प्रश्न आहेत . . . . . . विचारतो हळूहळू . . . . .
  • Log in or register to post comments

उपयुक्त विषय ..

चौकटराजा
गुरुवार, 08/31/2017 - 08:09 नवीन
रक्ताभिसरण जेवढे चर्चिले जाते तसे रक्ताचे प्राणवायुकरण चर्चिले जात नाही. प्राधान्याने पेशीला प्राणवायू हा महत्वाचाच. म्हणून या विषयाचे महत्व. दमावाला माणूस घरात असणे हे एक परीक्षा देण्यासारखेच असते. ज्याना बालदमा होता त्याना पुन्हा वय ५५ नंतर दमा उदभवतो असे काही " को रिलेशन " आहे का ?
  • Log in or register to post comments

उत्तम

सुमीत भातखंडे
गुरुवार, 08/31/2017 - 10:27 नवीन
उत्तम लेखमालेची सुरुवात. भरपूर उपयुक्त माहिती मिळेल.
  • Log in or register to post comments

मी दम्याचा पेशंट असुन मागील

डायवर
गुरुवार, 08/31/2017 - 17:36 नवीन
मी दम्याचा पेशंट असुन मागील दहा वर्षांपासुन तुमचे वडील डॉ. सुहास सरांची नियमित ट्रिटमेंट घेतोय आणि नियमित औषधे घेतल्यास मला दम्याचा त्रास होत नाही, हे सहर्ष सांगतो.
  • Log in or register to post comments

अत्यंत उपयुक्त विषय आणि लेखमाला

स्वच्छंदी_मनोज
Fri, 09/01/2017 - 13:18 नवीन
अत्यंत उपयुक्त विषय आणि लेखमाला. डॉक, ह्या थोड्याश्या दुर्लक्षीत विषयावरची लेखमाला सुरु केल्या बद्दल अनेक धन्यवाद. ह्या लेखमालेमुळे इथे बर्‍याच जणाना फायदा तर होईलच पण आमच्यासारख्या सामान्य माणसांचे बरेच गैरसमज दुर होण्यास मदत होईल. पुढचा भाग सवडीने आलातरी चालेल पण डीटेल येऊदे.
  • Log in or register to post comments

पुढचे लेख येऊ द्या दमा दमानं

चामुंडराय
Sat, 09/02/2017 - 07:46 नवीन
छान लेखमाला डॉक्टर पुढचे लेख येऊ द्या दमा दमानं
  • Log in or register to post comments

खूपच

गुल्लू दादा
Sat, 09/02/2017 - 14:46 नवीन
खूपच उपयुक्त अशी मालिका आहे सर.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा