शिवसेना..... ???

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
11 Jul 2017 - 8:03 pm
गाभा: 

शिवसेना हा तसा पहायला गेले तर एक छोटा राजकीय पक्ष.
छोटा म्हणायचे कारण की या पक्षाने मुंबई , नाशीक, ठाणे या पलीकडे कुठे काही फारसे केल्याचे वाचल्याचे आठवत नाही.
सेनेने महारष्ट्रातील लोकाम्साठी नक्की काय केले ते खरेच अभ्यासायला हवे. एके काळी मराठी चा जयघोष करणारी सेना घुमजाव करत एकाएकी हिंदुत्ववादी कशी झाली याची कारणे कधीच बाहेर आली नाहीत. तरीही लोकाना खास करुन तरुणाना; सेनेचे आकर्षण होते कारण बाळासाहेबांची भाषण करण्याची हातोटी.
मुंबईत एकेकाळी गिरणी कामगारांच्या बळावर वाढलेल्या सेनेने दत्ता सामंतांच्या संपाच्या वेळेस काय भुमीका घेतली होती हे कोणाला आठवणार नाही.
पुण्यात गाजलेल्या टेल्को सम्पाच्या वेळेस देखील सेना कुठेही चर्चेतही नव्हती.
सेना खरी चर्चेत आली ती सेनेकडे मुंबईचे महपौर पद आल्या नंतर.
बाबरी मशीद प्रकरणात कोणतीही जबाबदारी न घेणार्‍या भाजप पेक्शा बाळासाहेबानी " हो शिवसेनैकीनी हे केले असल्यास मला त्याचा अभिमान आहे" अशी घोषणा केली त्या घोषणेला लोक त्यांचा खरेपणा समजले. नंतर सेनेच्या या रोखठोकपणाचे लोकाना अधीकच आकर्षण वाटू लागले.
त्यातूनच सेना विधानसभेत सत्ताधारी झाली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक अपेक्षीत पण वेगळा प्रवाह सुरू झाला.
सेने बद्दल बरीच चर्चा होते. त्यानी ग्रामीण भागात शाळा, पतसंस्था , कॉलेज , रोजगार या साठी काहीच केले नाही.
याबद्दलही काही विचारायचे नाही.
लखोबा लोखंडे , नारोबा , खंडोजी खोपडा वगैरे घणाघाती दुषणांवर जनता त्यातील मनोरंजकतेमुळे खुष असायची.
सध्याच्या फडणवीस सरकारात सेनेची काय भुमीका आहे ते जगजाहीर आहे.
शिवसेनेबद्दल समर्थनार्थ एक गोष्ट मात्र वारंवार सांगितली जाते की १९९२ च्या मुंबई दंगलीच्या वेळेस सेना नसती तर मुंबई वाचली नसती.
शिवसेना होती म्हणून आपण आज मुंबईत आहोत.
हे ऐकल्यावर एक विचार मनात येतो की त्या वेळेस मुंबईत मुंबै पोलीस , निमलश्करी दले, काही भागात लक्शर तैनात केले होते. हे सगळे असतानाही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती आणि शिवसेना या सर्वांपेक्शा प्रबळ होती,
राज्य राखीव पोलीस दल ही त्यावेळेस तैनात होते. मग त्यांचे जवान हे त्यावेळेस काय केळी खात बसले होती की काय अशी शंका येते.
या वेळेस शिवसेने ने नक्की असे काय केले की जे पोलीस दल , निमलष्करी दले आणि भारतीय सेना याना जमत नव्हते?
एखादा राजकीय पक्ष हा राज्य पोलीसदल , सैन्य दल यांच्या पेक्षाही प्रबळ ठरतो याला कोणते लक्षण मानायचे.
मला यात कोणत्याही राजकीय पक्षाची भलामण करायची नाही मात्र केवळ जाणून घ्यायचे आहे.
१९९२ च्या दंगलीत सेनेने असे काय केले की त्यामुळे मुंबई जे पोलीस दले, निमलक्षरी दले , राज्य राखीव सुरक्शा दले याना त्यांच्या हत्यारांसहीतही वाचवणे जमत नव्हते आणि सेनेने ते करुन दाखवले
( हे उघडपणे मुंबईत कोणाला विचारायचे माझे धाडस नाही. म्हणुन इथे विचारतोय )

प्रतिक्रिया

एकुलता एक डॉन's picture

11 Jul 2017 - 8:17 pm | एकुलता एक डॉन

मला एवढे पटत कि लोक मते द्याल वेडे नाहीत
बाळासाहेबांच्या निधन नंतर जी गर्दी जमली होती विसरलात ?

श्रीगुरुजी's picture

12 Jul 2017 - 1:45 pm | श्रीगुरुजी

तशी गर्दी अनेकांच्या अंत्ययात्रेला जमते. त्यात काहीही विशेष नाही. गर्दी जमली म्हणजे गर्दीतले सर्वजण मत देतात असे नसते.

हतोळकरांचा प्रसाद's picture

12 Jul 2017 - 2:33 pm | हतोळकरांचा प्रसाद

कैच्या कै! म्हणजे विरोध वगैरे ठीक असतं पण कशालाही विरोध हास्यास्पद होतो असे मला आपले उगाच वाटून गेले!

एकुलता एक डॉन's picture

12 Jul 2017 - 3:09 pm | एकुलता एक डॉन

मोदी लाट असून पण एवढी मते मिळवळीतही काय कमी आहे ?

आणि एवढी गर्दी बाकी कधी बघतलीत ?

श्रीगुरुजी's picture

12 Jul 2017 - 4:53 pm | श्रीगुरुजी
श्रीगुरुजी's picture

12 Jul 2017 - 4:55 pm | श्रीगुरुजी

अनेकवेळा अशी गर्दी दिसते. उदाहरणार्थ बुर्‍हान वाणीची अंत्ययात्रा.

गर्दी झाली म्हणजे मते मिळतात आणि नसली तर मते मिळत नाहीत हा भाबडेपणा झाला. तसे असते तर वाजपेयींच्या काळातच भाजप/जनसंघाला बहुमत मिळाले असते किंवा अगदी अलिकडचें उदाहरण म्हणजे पुणे महापालिका निवडणुकीच्या वेळी फडणविसांच्या न्यू इंग्लिश स्कूल मैदानावर झालेल्या सभेला जेमतेम १०० टाळकी उपस्थित असूनसुद्धा त्या भागातील चारही प्रभागांमध्ये भाजपचे नगरसेवक मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते.

जेम्स वांड's picture

11 Jul 2017 - 8:20 pm | जेम्स वांड

अहो शुकशुक विजुभाऊ,

तुमची सेनेबद्दलची मते पक्की असल्याचे ह्या लेखावरून (?) भासते, ती परिस्थितीजन्य काही बोलल्यास तुम्ही बदलणार असलात तर चारशब्द बोलण्यात पॉईंट ए, नाहीतर फुकट काथ्याकुट करत बसण्यात काय मिळणार आहे हो...

नाही हो. पक्की मते वगैरे काही नाही. खरेच जाणुन घ्यायची इच्छा आहे.
मी पण बाळासाहेबांच्या भाषणांचा फॅन आहे.
वसंत्राव नाईकाम्च्या वेळची सेना/ सीमाप्रश्नावर भुजबळांनी गाजवलेले आम्दोलन, १९९२ ची शिवसेना, भाजप सोबत असतानाची असतानाची शिवसेना आणि आत्ताची शिवसेना या त वेळोवेळी जाणवण्या इतका फरक झालेला आहे.
सेने बद्दल एक सूप्त आकर्षण आहे. तेच मनसे बद्दल ही आहे.

विजुभाऊ's picture

11 Jul 2017 - 11:33 pm | विजुभाऊ

आणि अशी कोणती गोष्ट होती की जी सेनादला ला जमली नाही आणि शिवसेनेला जमली

या वेळेस शिवसेने ने नक्की असे काय केले की जे पोलीस दल , निमलष्करी दले आणि भारतीय सेना याना जमत नव्हते?

श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल वाचा, विजुभाऊ. (तो शासनाने 'मान्य' केलेला नसल्याने कधी औपचारिकरीत्या प्रसिद्ध झाला नाही. जालावर काही विशिष्ट ठिकाणी मिळू शकेल.)

श्रीगुरुजी's picture

12 Jul 2017 - 1:48 pm | श्रीगुरुजी

श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल तर 'पक्षपाती' म्हणून शिवसेनेने नाकारला होता. मग तो खरा कसा मानायचा?

खरा माना असं म्हणालो का? वाचा असं म्हणालो. आणि मत बनवा.

श्रीगुरुजी's picture

12 Jul 2017 - 2:39 pm | श्रीगुरुजी

तो अहवाल अत्यंत पक्षपाती व एकतर्फी आहे असे माझे मत आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Jul 2017 - 11:50 pm | अमरेंद्र बाहुबली

त्या "आतल्या" गोष्टी आहेत. आणी अश्या सार्वजनिक ठिकाणी विचारून तुम्हाला वाटत असेल की माहिती होईल. तर हा तुम्हचा सर्वांत मोठा गैर समज आहे. उगाच काहीही उगाळून अर्थ नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Jul 2017 - 11:50 pm | अमरेंद्र बाहुबली

त्या "आतल्या" गोष्टी आहेत. आणी अश्या सार्वजनिक ठिकाणी विचारून तुम्हाला वाटत असेल की माहिती होईल. तर हा तुम्हचा सर्वांत मोठा गैर समज आहे. उगाच काहीही उगाळून अर्थ नाही.

कानडाऊ योगेशु's picture

12 Jul 2017 - 8:57 am | कानडाऊ योगेशु

माझ्यामते पोलिस,निमल्ष्करी दले व ल्ष्करी दले हा सरकारी उपचार झाला आणि गोष्टी टोकाला गेल्यानंतरच व त्या स्थितीपर्यंत आल्यानंतरच वरील गोष्टींना पाचारण करण्यात येते. बहुदा शिवसेनेमुळे तुमच्यासाठी तुमच्याच गल्लीबोळातुन तत्कालीक मदत उपलब्ध आहे हा मुद्दा लोकांच्या लक्षात आला असावा.

श्रीगुरुजी's picture

12 Jul 2017 - 2:27 pm | श्रीगुरुजी

१९९२-९३ ची दंगल दोन भागात झाली. ६ डिसेंबरला श्रीराम जन्मस्थानावरील मंदीर उद्ध्वस्त करून बांधलेली मशीद पाडल्यावर मुंबईत दंगल सुरू झाली. ही दंगल ४-५ दिवसांत आटोक्यात आली त्याला कारण होते मुंबईचे तत्कालीन पोलिस महासंचालक श्रीकांत बापट. बापट यांनी अत्यंत कठोरतेने दंगल हाताळली. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी पोलिसांना दंगल शमविण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घातण्याचा बापट यांचा आदेश होता. दंगलीच्या या पहिल्या भागात अंदाजे २०० जणांचा मृत्यु झाला. त्यात बहुसंख्य दंगलखोर मुस्लिम होते. परंतु दंगल लगेच आटोक्यात आली होती. त्याचे श्रेय अर्थातच बापट व सुधारकराव नाईकांना दिले गेले.

पोलिस गोळीबारात मरण पावलेले बहुसंख्य मुस्लीम असल्याने बापटांविरूद्ध प्रचंड आरडाओरडा सुरू झाला. त्यांनी मुस्लिमांना टिपून मारले अशी देशभर निधर्मांधांनी टीका सुरू केली. मशीद पडल्यामुळे मुस्लीम आधीच नरसिंहराव सरकारवर भयंकर संतापले होते. त्यात ही भर पडल्याने काँग्रेसची पंचाईत झाली. शेवटी दबावाखाली बापट यांची मुंबईतून बदली करण्यात आली.

त्याचवेळी राजकारणाचा एक वेगळाच अंक सुरू होता. जून १९९१ मध्ये केंद्रात संरक्षणमंत्री पदावर नेमणूक झाल्यानंतर पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सोडून आपल्याजागी सुधारकरराव नाईकांना आणले. नाईक आपल्या मुठीत राहून राज्य चालवितील असा पवारांचा विश्वास होता. परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर नाईकांनी पवारांना झुगारून देऊन स्वतः स्वतंत्रपणे निर्णय घेऊन कारभार सुरू केला. नाईकांना अर्थातच नरसिंहरावांचे पाठबळ होते. नाईकांनी आपल्याच पक्षाच्या पप्पू कलानी, हितेंद्र ठाकूर, सूर्यराव (हा भिवंडीचा काँग्रेसचा नगराध्यक्ष होता. याचे आडनाव आठवत नाही.) यांच्यावर माफिया असल्याचा आरोप करून त्यांना टाडाखाली तुरूंगात टाकले. पवारांनीच स्वतः आग्रह धरून यांना तिकिटे दिली होती असे प्रसिद्ध झाल्याने पवारांची मानहानी झाली. नंतर काही काळाने पवारांच्या आशिर्वादाने आपल्याविरूद्ध काही आमदार बंड करण्याच्या तयारीत आहेत असे सांगून त्यांनी अजित पवार, बापूसाहेब थिटे इ. १२ जणांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी केली. हा पवारांसाठी प्रचंड मोठा धक्का होता. त्यावेळी कॉंग्रेसचे १४१ आमदार होते. काही आमदारांनी बंड केले तर आपले सरकार पडू शकते हे ओळखून सुधाकरराव नाईकांनी गुपचूप भुजबळांशी संधान बांधून शिवसेनेत फूट पाडली. भुजबळांसह एकूण १८ आमदार शिवसेनेतून फुटुन निघून काँग्रेसमध्ये सामील झाले. एकाच दगडात नाईकांनी पवार व बाळ ठाकरे असे दोन पक्षी मारले. शिवसेनेत गुप्तपणे फूट कशी पाडली असे विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले होते की "मी जातिवंत शिकारी आहे. सावज नजरेच्या टप्प्यात आल्याशिवाय मी बार टाकत नाही.". एकंदरीत त्यांनी पवारांची व पवार पाठिराख्यांची पूर्ण नाकेबंदी करून आपली मांड भक्कम केली होती.

त्यामुळे काहीही करून नाईकांना घालवून त्यांच्या जागी आपला माणूस आणायचा यासाठी पवारांची कारस्थाने सुरू होती. ६ जानेवारीला मुंबईत दंगलीचा दुसरा अंक सुरू झाला. मुंबईची दंगल ही त्यांच्यासाठी सुवर्णसंधी ठरली. जानेवारीत दुसर्‍यांदा दंगल सुरू झाल्यानंतर ती आटोक्यात यायला अनेक दिवस लागले कारण बापटांना घालविण्यात आले होते आणि दंगलखोरांवर सबुरीने कारवाई करा असे केंद्राचे आदेश होते. त्याबरोबरीने पवार स्वतः मुंबईत येऊन पोलिसांना व सैन्याला आदेश देत होते. त्यामुळे नाईकांना दंगल आटोक्यात आणता आली नाही व पवारांनीच ती आटोक्यात आणली असे पसरविले गेले. डिसेंबरच्या दंगलीत २०० जणांचा मृत्यु झाला होता. तोच आकडा जानेवारीत ८०० वर पोहोचला.

यात शिवसेनेने नक्की काय केले? दंगल आटोक्यात आणली ती सैन्याने व पोलिसांनी. नाईकांनी कठोरपणे परिस्थिती हाताळल्याने डिसेंबरमध्ये दंगल लगेच आटोक्यात आली. पण जानेवारीत जास्त दिवस दंगला का चालली असावी? त्यावेळी बाळ ठाकरे 'सामना'तून अत्यंत प्रक्षोभक अग्रलेख लिहीत होते. शिवसेनेचे शौर्य (!) 'सामना'पुरतेच मर्यादीत होते. त्यामुळे दंगल अजून भडकायला मदत झाली. महाराष्ट्रातील अंतर्गत राजकारणामुळे दंगल भडकून त्याचे खापर नाईकांवर फुटुन त्यांची गच्छंती व्हावी अशी एका गटाची इच्छा होती. त्यामुळे सुद्धा दंगल बराच काळ सुरू राहिली. शेवटी मार्चमध्ये नाईकांना हटविण्यात आले. त्यांच्याजागी आपला पित्त्या बसवावा व आपण दिल्लीत राहून दंगलीचे व बाबरी मशीद पाडण्याचे खापर नरसिंहरावांवर फोडून त्यांना हटविण्यासाठी कारस्थाने करावीत ही पवारांची इच्छा मात्र अपूर्ण राहिली. कारण नरसिंहरावांनी अत्यंत धूर्तपणे पवारांनाच महाराष्ट्रात परत पाठवून देऊन त्यांचे पंख कापले व आपला केंद्रातील एक अडथळा दूर केला आणि स्वतःचे स्थान कायम राखले.

आदूबाळ's picture

12 Jul 2017 - 2:33 pm | आदूबाळ

सूर्यराव (हा भिवंडीचा काँग्रेसचा नगराध्यक्ष होता. याचे आडनाव आठवत नाही.)

जयवंत सूर्यराव?

श्रीगुरुजी's picture

12 Jul 2017 - 2:52 pm | श्रीगुरुजी

बहुतेक हेच नाव होते.

गॅरी ट्रुमन's picture

12 Jul 2017 - 5:02 pm | गॅरी ट्रुमन

या सर्व घटनाक्रमाच्या टाईमलाईन्स थोड्या वेगळ्या आहेत.

जून १९९१: पवार केंद्रात रवाना. महाराष्ट्रात सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री

नोव्हेंबर १९९१: सुधाकरराव नाईकांनी जनता दलात फूट पाडली. जनता दलाचे २५ आमदार होते. त्यापैकी ९ आमदार काँग्रेसमध्ये सामील झाले. बबनराव पाचपुते आणि अन्य एक मंत्रीमंडळात समाविष्ट

डिसेंबर १९९१: शिवसेनेतून छगन भुजबळ आणि इतर ११ आमदार काँग्रेसमध्ये सामील. छगन भुजबळ मंत्री तर राजेंद्र गोडे राज्यमंत्री.

सप्टेंबर १९९२: भिवंडीचा नगराध्यक्ष जयवंत सूर्यरावला जे.जे.हॉस्पिटल गोळीबार प्रकरणी अटक
ऑक्टोबर १९९२: ठाण्यातील काँग्रेस नगरसेवक गणेश सावंत उर्फ गण्यादादा (बी.केबिनमधला) याला टाडाखाली अटक
नोव्हेंबर १९९२: सुधाकरराव नाईकांनी पवार समर्थक १२ मंत्र्यांचे राजीनामे घेतले. त्यात बापूसाहेब थिटे होते. पण अजित पवार नव्हते. साधारण त्याचदरम्यान पप्पू कलानीला अटक

डिसेंबर १९९२: ६ डिसेंबरच्या घटनेनंतर मुंबईत दंगली. डिसेंबरच्या दंगली ३-४ दिवसात शमल्या.

जानेवारी १९९३: ६ जानेवारीपासून परत दंगली सुरू झाल्या. यावेळी दंगली १०-१२ दिवस चालल्या. त्याचवेळी सुरत आणि अहमदाबादमध्येही परत दंगली झाल्या होत्या. जानेवारी १९९३ च्या दंगलींच्या वेळीही श्रीकांत बापटच मुंबईचे पोलिस आयुक्त होते. दंगलींच्या काळात शरद पवार मुंबईत हजर राहून राज्य सरकारच्या कामात हस्तक्षेप करत होते असा आरोप झाला.

३१ जानेवारी १९९३: श्रीकांत बापट यांची पोलिस आयुक्तपदावरून उचलबांगडी. त्यांच्या जागी ठाण्याचे पोलिस आयुक्त अमरजीतसिंग सामरा यांची नियुक्ती.

जानेवारीतल्या दंगलीनंतर पवार गटाने सुधाकरराव नाईकांना लक्ष्य करायला सुरवात केली. कहर झाला ६ फेब्रुवारी १९९३ रोजीच्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीत. या बैठकीत सुधाकररावांना पवार गटाच्या आमदारांनी अपमानास्पद वागणुक दिली. त्यांच्याबरोबर धक्काबुक्की करायचाही प्रयत्न झाला असे वाचल्याचे आठवते. त्यानंतर सुधाकरराव नाईकांनी अजित पवार आणि अन्य ४ मंत्र्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकायची शिफारस राज्यपालांकडे केली. त्याप्रमाणे या मंत्र्यांना मंत्रीमंडळातून काढण्यात आले. त्यानंतर सुधाकररावांच्या राजीनाम्याची मागणी जोरदारपणे होऊ लागली. सुधाकररावांनी राजीनाम्यास नकार दिला. पण २३ फेब्रुवारी १९९३ रोजी दिल्लीमध्ये त्यांनी नरसिंह रावांची भेट घेतली त्यावेळी स्वतः नरसिंह रावांनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितले. त्यानंतर सुधाकररावांनी दुसर्‍या दिवशी मुंबईत राज्यपालांकडे राजीनामा दिला.

सुधाकररावांचा उत्तराधिकारी नेमण्याच्या आमदारांच्या बैठकीत एकमत होऊ शकले नाही. त्यावेळी हा निर्णय दिल्लीवर सोडायचे ठरविले. माझ्या आठवणीप्रमाणे ही बैठक २६ फेब्रुवारीला झाली होती. त्यानंतर ४-५ दिवस सुशीलकुमार शिंदे, पद्मसिंग पाटील अशा नावांची चर्चा होत राहिली. पण ३ की ४ मार्चला नरसिंह रावांनी शरद पवारांना मुख्यमंत्री म्हणून परत पाठवायचा निर्णय जाहिर केला. ६ मार्च १९९३ रोजी शरद पवारांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.

तुमच्या मेंदूची रॅम किती आहे..?

इतक्या पटकन इतके जुने डिटेल्स आठवून लिहिणे कसे काय जमते राव..?? __/\__

रश्मिन's picture

13 Jul 2017 - 9:49 am | रश्मिन

माहितीचा आवाका बघून अचंबित झालो आहे ! आणि केवळ माहिती च नाही तर वेळोवेळी तुमचे राजकीय विश्लेषण ही वाचनीय असते

(ट्रुमन पंखा )

श्रीगुरुजी's picture

12 Jul 2017 - 5:29 pm | श्रीगुरुजी

धन्यवाद! जेवढे आठविले तेव्हढे लिहिले. फेब्रुवारी १९९१ ते जानेवारी १९९३ या २ वर्षातील जवळपास १६-१७ महिने परदेशात असल्याने तिथे मिळालेल्या बातम्यांनुसार व जेव्हा जेव्हा भारतात येत असे तेव्हा तेव्हा जुनी वर्तमानपत्रे वाचून मी मागील माहिती मिळवित होतो. त्यामुळे काही घटनाक्रम चुकला असावा.

उपाशी बोका's picture

12 Jul 2017 - 7:21 pm | उपाशी बोका

धन्यवाद! जेवढे आठविले तेव्हढे लिहिले.

गॅरी ट्रूमन आणि श्रीगुरुजी एकच आहेत काय?

सुपारी द्यायची आहे काय? ;)

श्रीगुरुजी's picture

18 Jul 2017 - 2:51 pm | श्रीगुरुजी

गॅरी ट्रूमन आणि श्रीगुरुजी एकच आहेत काय?

नाही.

श्रीगुरुजी's picture

12 Jul 2017 - 8:26 pm | श्रीगुरुजी

सुधाकररावांचा उत्तराधिकारी नेमण्याच्या आमदारांच्या बैठकीत एकमत होऊ शकले नाही. त्यावेळी हा निर्णय दिल्लीवर सोडायचे ठरविले. माझ्या आठवणीप्रमाणे ही बैठक २६ फेब्रुवारीला झाली होती. त्यानंतर ४-५ दिवस सुशीलकुमार शिंदे, पद्मसिंग पाटील अशा नावांची चर्चा होत राहिली. पण ३ की ४ मार्चला नरसिंह रावांनी शरद पवारांना मुख्यमंत्री म्हणून परत पाठवायचा निर्णय जाहिर केला. ६ मार्च १९९३ रोजी शरद पवारांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.

नाईकांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याजागी नवीन मुख्यमंत्री नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या. काँग्रेसमध्ये एक पवारांचा गट होता, तर दुसरा गट पवार विरोधकांचा होता ज्यात शंकाराव चव्हाण, विलासराव देशमुख, पुण्यातील प्रकाश ढेरे, विठ्ठलराव गाडगीळ, सुशीलकुमार शिंदे इ. चा समावेश होता. परंतु पवार समर्थकांची संख्या जास्त होती. पवार मुंबईत येऊन जातीने सूत्रे हलवित होते. त्यांना आपल्या समर्थकाला मुख्यमंत्री करायचे होते. एकंदरीत बहुसंख्य आमदार पद्मसिंह पाटलांच्या बाजूने दिसत होते.

दुसरीकडे दिल्लीत नरसिंहराव दिल्लीतून अत्यंत धूर्तपणे सूत्रे हलवित होते. बाबरी मशीद प्रकरण त्यांच्या अंगावर शेकू पहात होते. त्यांना हटविण्याची कारस्थाने सुरू झाली होती. परंतु त्यांच्या विरोधात अर्जुनसिंग व पवार असे दोन तगडे नेते होते व या दोघांमध्ये काँग्रेस समर्थक विभागले गेले होते. अर्जुनसिंगांची सुरवातीपासूनच १० जनपथशी जवळीक होती. अशा वेळी दोघांपैकी निदान एक विरोधक तरी संपवावा अशा चाली नरसिंहराव रचत होते.

मुंबईत मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत पद्मसिंह पाटील पुढे होते तरी त्यांच्या नावावर एकमत होत नाही असे कारण दाखवून नरसिंहरावांनी केंद्रीय निरीक्षक मुंबईत पाठविले. निरीक्षक मुंबई विमानतळावर उतरल्या उतरल्या त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारायला सुरूवात केली. "आम्ही इथे डोकी मोजायला आलेलो नाही" असे निरीक्षकांनी सांगताच पद्मसिंह पवारांचा पत्ता कट झाल्याचे व नरसिंहरावांनी नक्की केलेले नाव आमदारांना सांगण्यासाठी निरीक्षक मुंबईत आल्याचे पत्रकारांनी ओळखले. नरसिंहरावांनी धूर्तपणे मुख्यमंत्रीपदासाठी पवारांचे नाव नक्की करून त्यांना बोलावून या निर्णयाची माहिती दिली. अपेक्षेप्रमाणे पवारांनी मुंबईत परत जाण्यास नाखुषी दर्शविली कारण त्यांना नरसिंहरावांच्या जागी बसायचे होते. नंतर नरसिंहरावांनी धूर्तपणे पवारांना सांगितले की महाराष्ट्र अतिशय गंभीर परिस्थितीतून जात आहे व अशा वेळी तुमच्यासारख्या अनुभवी नेत्याची महाराष्ट्राला गरज आहे. समजा तुम्हाला मुंबईत परत जायचे नसेल तर मग मी आमदारांमधून वेगळ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करीन. हे ऐकल्यावर पवारांचे धाबे दणाणले. आधीच नाईकांनी पवारांना व त्यांच्या समर्थकांना बरेच त्रस्त करून सोडून त्यांच्या साम्राज्याला हादरे दिले होते. आता नाईकांच्या जागी आपल्या विरोधातला एखादा नवीन माणूस आला तर आपला महाराष्ट्रातील उरलासुरला प्रभावही कमी होईल हे ओळखून पवारांनी अत्यंत नाईलाजाने केंद्रातील मंत्रीपद सोडून राज्यात परत जायचे कबूल केले व अशा तर्‍हेने नरसिंहरावांनी आपला एक प्रबळ प्रतिस्पर्धी विनासायास दूर केला.

प्रसाद_१९८२'s picture

12 Jul 2017 - 8:41 pm | प्रसाद_१९८२

इतकी खडांखडा राजकिय माहिती,
तुम्हाला कशी काय लक्षात राहते ?

गॅरी ट्रुमन's picture

12 Jul 2017 - 9:09 pm | गॅरी ट्रुमन

मुंबईत मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत पद्मसिंह पाटील पुढे होते तरी त्यांच्या नावावर एकमत होत नाही असे कारण दाखवून नरसिंहरावांनी केंद्रीय निरीक्षक मुंबईत पाठविले.

हो. माझ्या आठवणीप्रमाणे हे केंद्रिय निरीक्षक जी.के.मूपनार होते .

विशुमित's picture

13 Jul 2017 - 11:35 am | विशुमित

विद्यापीठ नामकरणाला पाठिंबा ह्या मुद्द्याने सुद्धा पवारांना पंतप्रधान होण्यास अडथळा निर्माण झाला होता.
चव्हाण, देशमुख, पाटील यांना कुणब्या पवारांच्या नेतृत्वात राहायचं नव्हतं, हे पण सत्य आहे. मला जातीय टिपणी करायची नाही पण अजून ही लोक खाजगीत असंच बोलतात... असो..
(मराठा स्ट्रॉंग मन ही कुठल्या बहाद्दराने पवारांना उपाधी दिली काय माहित?)

श्रीगुरुजी's picture

13 Jul 2017 - 2:36 pm | श्रीगुरुजी

विद्यापीठ नामकरणाला पाठिंबा ह्या मुद्द्याने सुद्धा पवारांना पंतप्रधान होण्यास अडथळा निर्माण झाला होता.

नामांतराचा अजिबात संबंध नाही. पवारांना पंतप्रधान होण्याची एकमेव संधी १९९१ मध्ये होती. नामांतर १९९४ मध्ये झाले. पवारांनी १९७८ पासून अनेकांचा विश्वासघात केला होता. १९७८ मध्ये त्यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला. १९८६ मध्ये काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश केल्यानंतर ते तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांना घालविण्याच्या प्रयत्नात होते. दरम्यानच्या काळात पुण्यात नाक खुपसून कलमाडीच्या माध्यमातून विठ्ठलराव गाडगीळांना शह देण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यांनीच गाडगीळांना १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत पाडले. १९७८ ते १९८६ या काळात काँग्रेसबाहेर असताना ते काँग्रेसला व इंदिरा गांधींना सपाटून शिव्या घालायचे. त्यामुळे गांधी घराण्याचा त्यांच्यावर फारसा विश्वास कधीच नव्हता. एकंदरीत त्यांनी महाराष्ट्रात व काँग्रेसमध्ये अनेक शत्रू निर्माण करून ठेवले होते. त्यामुळेच १९९१ पंतप्रधान होण्यासाठी त्यांना महाराष्ट्रातूनसुद्धा पुरेसा पाठिंबा मिळाला नव्हता.

चव्हाण, देशमुख, पाटील यांना कुणब्या पवारांच्या नेतृत्वात राहायचं नव्हतं, हे पण सत्य आहे. मला जातीय टिपणी करायची नाही पण अजून ही लोक खाजगीत असंच बोलतात... असो..

कारणे वरीलप्रमाणेच. अर्थात पवार हे ९६ कुळी मराठाकिंवा श्रेष्ठ मराठा समजले जात नव्हते हे सुद्धा सत्य आहे.

(मराठा स्ट्रॉंग मन ही कुठल्या बहाद्दराने पवारांना उपाधी दिली काय माहित?)

इंग्लिश माध्यमांनी हा शद्ब शोधला.

परंतु पवार समर्थकांची संख्या जास्त होती. पवार मुंबईत येऊन जातीने सूत्रे हलवित होते. त्यांना आपल्या समर्थकाला मुख्यमंत्री करायचे होते. एकंदरीत बहुसंख्य आमदार पद्मसिंह पाटलांच्या बाजूने दिसत होते.

असं असताना नरसिम्हराव यांच्याशी बोलताना पवारांचे धाबे का दणाणले होते? स्वत: दिल्लीत बसून पवार त्यांच्या पसंतीचा मुख्यमंत्री निवडून आणू शकत होते ना?
आणि पद्मसिंम्ह पाटील कोणत्या गटाचे होते?
माफ करा..जरा कन्फ्युजन होतंय म्हणून विचारलं..

श्रीगुरुजी's picture

13 Jul 2017 - 2:43 pm | श्रीगुरुजी

वर याचे स्पष्टीकरण दिले आहे. महाराष्ट्रातील आमदारात पवार समर्थक आमदार जास्त संख्येने होते. परंतु आमदारातून मतदान घेऊन निवड करणे हे काँग्रेस संस्कृतीत चालत नाही. सर्व आमदारांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री पद निवडीचे सर्वाधिकार पक्षश्रेष्ठींकडे देण्याचा ठराव मंजूर करायचा व नंतर पक्षाध्यक्षाने आपल्या पसंतीचा उमेदवार लादायचा ही काँग्रेसची संस्कृती आहे. त्यामुळे पवार समर्थकांनी कितीही प्रयत्न केले असते तरी शेवटी नरसिंहरावांनीच मुख्यमंत्री निवडला असता. आधीच नाईकांनी पवार समर्थकांना त्रस्त करून सोडले होते. आता त्यांच्या जागी तसाच दुसरा कोणीतरी आला तर आपला महाराष्ट्रातील पाया अजून खचेल अशी पवारांना भीति होती. दिल्लीत बसून पवारांना त्यांच्या पसंतीचा मुख्यमंत्री बसविणे अशक्य होते. म्हणून ते मुंबईत येऊन जातीने प्रयत्न करीत होते.

पद्मसिंह पाटील पवारांचे सख्खे मेव्हणे आहेत. कारगिल युद्धाच्या निमित्ताने जमा केलेला ५३ लाखांचा निधी लाटूनसुद्धा, अण्णा हजारेंच्या खुनाची सुपारी देऊनसुद्धा, पवनराजे निंबाळकर व त्यांच्या चालकाचा सुपारी देऊन खून करूनसुद्धा महाराष्ट्रात ते निवांत कसे हिंडतात याचे रहस्य त्यांच्या या नातेसंबधात आहे.

विशुमित's picture

14 Jul 2017 - 11:24 am | विशुमित

<<<<पद्मसिंह पाटील पवारांचे सख्खे मेव्हणे आहेत.>>>

==>> पद्मसिंह पाटील अजित पवारांचे मेव्हणे आहेत.

सौन्दर्य's picture

12 Jul 2017 - 9:30 am | सौन्दर्य

१९९२ (की १९९३ ?) सालच्या दंगलीच्या वेळी शिवसेनेची काय भूमिका होती किंवा शिवसेनेचा असा काय धाक होता ह्या विषयी ठामपणे सांगू शकणार नाही. मात्र १९८४ साली इंदिरा गांधी हत्येनंतर ज्या दंगली उसळल्या होत्या त्यावेळी मी मुंबईत होतो. त्यावेळी बाळासाहेबांनी मुंबईतील शीख समाजाला अभय दिले होते आणि माझ्या माहितीप्रमाणे दिल्लीत जे शीख हत्याकांड झाले त्याची झळ मुंबईपर्यंत पोहोचू शकली नव्हती.

पण १९८०च्या दशकात सेनेनी 'स्थानीय लोकाधिकार समिती'च्या द्वारे हजारों तरुण मराठी युवकांसाठी जे कार्य केले आहे त्याला तोड नाही. त्यावेळी बँका, विमा कंपन्या, तेल कंपन्या, रेल्वे, राज्य आणि राष्ट्रीय कंपन्या ह्यात स्थानिक मराठी युवकांना नोकऱ्या मिळवून देण्यात 'स्थानीय लोकाधिकार समितीने' सिंहाचा वाटा उचलला होता. कित्येक मोठमोठ्या कंपन्यात स्थानिक मराठी तरुणाला डावलून इतरांना नोकऱ्या दिल्या जात होत्या त्या ठिकाणी मराठी युवकांना नोकऱ्या मिळू लागल्या, आणि त्या देखील ८०% जागांवर.

शिवसेनेनी मुंबईतील मराठी माणसाला एक अभिमान मिळवून दिला होता पण कालांतराने 'हिंदुत्वाचा' झेंडा खांद्यावर घेतल्याने शिवसेनेचे स्थानिक मराठी माणसाकडे दुर्लक्ष झाले. हा हिंदुत्वाचा झेंडा देखील मराठी माणसाने अभिमानाने मिरवला पण त्यांनतर मात्र मराठी माणसाची शिवसेनेकडून अपेक्षा पूर्ती झाली नाही हे सत्य नाकारता येणार नाही.

मी राजकीय अभ्यासक नाही मात्र जे काही पाहिले, अनुभवले त्याच्या आधारवर हे मत मांडत आहे. काही चूक होत असल्यास मिपावरील जाणकारांकडून चूक दुरस्त करून घ्यायला आवडेल.

मराठी_माणूस's picture

12 Jul 2017 - 11:09 am | मराठी_माणूस

त्यावेळी बाळासाहेबांनी मुंबईतील शीख समाजाला अभय दिले होते

का?

मोदक's picture

12 Jul 2017 - 1:19 pm | मोदक

द्यायला नको होते?

श्रीगुरुजी's picture

12 Jul 2017 - 1:43 pm | श्रीगुरुजी

खंडणीच्या बदल्यात

जेम्स वांड's picture

12 Jul 2017 - 3:40 pm | जेम्स वांड

हे काहीतरी नवीनच ऐकतोय मी, ह्यावर अजून ऐकायला आवडेल.

जेम्स वांड's picture

13 Jul 2017 - 4:39 pm | जेम्स वांड

बाळासाहेब/शिवसेनेने खंडणी घेऊन मुंबईकर शिखांना अभयदान दिले होते, ह्या आरोपमागे असणारे अस्सल पुरावे द्या, ही नम्र विनंती करतो, हा आरोप फार मोठा आहे, मला वाटतं ह्याची तुमच्यासारख्या अभ्यासू अन प्रगल्भ सदस्याला कल्पना असावी.

कपिलमुनी's picture

13 Jul 2017 - 8:39 pm | कपिलमुनी

वाट बघत बसा !
पुरावे दिले की आभार प्रदर्शन धागा काढा .

कपिलमुनी's picture

14 Jul 2017 - 10:15 pm | कपिलमुनी

" खंडणीच्या बदल्यात अभय "

विधानाचे पुरावे मागितल्यावर पळ काढलेला आहे.
यानंतर या धाग्यावर बरेच प्रतिसाद दिले आहेत पण इकडे नाही कारण बोलाची कढी आणि बोलाचा भात

सतिश पाटील's picture

12 Jul 2017 - 10:44 am | सतिश पाटील

शिवसेनेचे एकुण ६४ आमदार आणि २० खासदार आहेत. आणि ह्यातले ६४ आमदार हे या पक्षाने एकटे लढून आलेत. केवळ मुंबई ठाणे अणि नाशिक एवढ्याच भागातून नाही


शिवसेना हा तसा पहायला गेले तर एक छोटा राजकीय पक्ष.
छोटा म्हणायचे कारण की या पक्षाने मुंबई , नाशीक, ठाणे या पलीकडे कुठे काही फारसे केल्याचे वाचल्याचे आठवत नाही.

पहिल्याच दोन वाक्यानंतर पुढे वाचायची इच्छा झाली नाही. जरा अभ्यास वाढवा अणि मगच बोला.

श्रीगुरुजी's picture

12 Jul 2017 - 11:17 am | श्रीगुरुजी

शिवसेनेने मागील ५१ वर्षात महाराष्ट्रासाठी नक्की काय व किती भरीव काम केले?

हतोळकरांचा प्रसाद's picture

12 Jul 2017 - 2:30 pm | हतोळकरांचा प्रसाद

अत्यंत पोकळ प्रश्न आहे. वरील वाक्यात कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव ठेवा आणि तुम्हाला हवे ते उत्तर मिळते का बघा!

श्रीगुरुजी's picture

12 Jul 2017 - 2:38 pm | श्रीगुरुजी

उत्तर मिळाले. धन्यवाद! शिवसेनेने ५१ वर्षात महाराष्ट्रासाठी काहीही केलेले नाही हेच माझे म्हणणे होते व त्याला आता तुमच्याकडून सुद्धा दुजोरा मिळाला.

हतोळकरांचा प्रसाद's picture

12 Jul 2017 - 2:42 pm | हतोळकरांचा प्रसाद

चला हे एक बरे झाले! आता लगेहाथ त्याच प्रश्नात दुसऱ्या पक्षाचं नाव ठेऊन तुम्हाला काय वाटते सांगून टाका बरे! तुमचं भाजपवर विशेष प्रेम आहे असे बऱ्याचवेळेस दिसते तर भाजप चे नाव घालून बघा.

श्रीगुरुजी's picture

12 Jul 2017 - 2:50 pm | श्रीगुरुजी

भाजपचे नाव घातले तर पुष्कळ गोष्टी सांगता येतील. उदाहरणार्थ जलयुक्त शिवार योजना किंवा मागील वर्षी प्रखर पाणीटंचाईच्या काळात लातूरला केलेला पाणीपुरवठा किंवा भुजबळ कुटुंबीय, रमेश कदम इ. भ्रष्टाचार्‍यांविरूद्ध केलेली कारवाई.

हतोळकरांचा प्रसाद's picture

12 Jul 2017 - 3:05 pm | हतोळकरांचा प्रसाद

पहा बरे किती सिलेक्टिव्ह असतो आपण! आपल्याला जलयुक्त शिवार दिसते पण शिवजलक्रांती दिसत नाही! शिवसेना भाजपचे संयुक्त सरकार म्हणून केलेली कामे भाजपला अर्पण केल्याने भाजपचा मोठेपणा सिद्ध होतो का? मग त्याच हिशेबाने सार्वजनिक बांधकाम मंत्री/परिवहन मंत्री/उद्योग मंत्री आणि इतरही काही मंत्र्यांचे गेल्या अडीच वर्षातील कांमं पाहून घेऊन ते कोणाला अर्पण करायचे तेही ठरवून घ्यावे. शिवसेनेच्या आमदारांनी त्या त्या भागात केलेली कामे कोणाला अर्पण करायची?

श्रीगुरुजी's picture

12 Jul 2017 - 4:57 pm | श्रीगुरुजी

तेच विचारतोय मी. शिवसेनेने शिवसेनेच्या आमदारांनी नक्की कोणती भरीव कामे केलीत ते सांगता का जरा.

हतोळकरांचा प्रसाद's picture

12 Jul 2017 - 5:41 pm | हतोळकरांचा प्रसाद

हाहा! तेच तेच परत परत विचारताय! शिवसेनेच्या आमदारांनी काहीच कामं केली नाहीत हे वक्तव्य करताना तुम्ही सांगा ना काय अभ्यास केला? जलयुक्त शिवार सारखीच (जिला तुम्ही चान्गल्या कामामध्ये गणत आहात) शिवजलक्रांती योजना होती हे मान्य करायला अडचण कसली? आधी सरसकट वक्तव्य केलं आहे तर ते नीट विस्कटून सांगा तरी? बहुधा मागे एकदा कधीतरी विचारलं होतं पण तरीही अजून एकदा, तुमच्या भागाच्या आमदाराने किंवा खासदाराने काय चांगलं कामं केलं हे कसं ठरवता?

जलयुक्त शिवार यशस्वी नाही आहे. अशास्त्रीय पद्धतीने खड्डे खणून त्यात पाणी साठवणे आणि खड्ड्यातील पाण्यावरून गावात रणकंदन माजवणे एवढेच त्याचे फलित. रणकंदन च्या बातम्या पेप्रात येत नाहीत, हे आधी नमूद करू इच्छितो.

श्रीगुरुजी's picture

12 Jul 2017 - 6:15 pm | श्रीगुरुजी

>>> शिवजलक्रांती योजना होती हे मान्य करायला अडचण कसली? आधी सरसकट वक्तव्य केलं आहे तर ते नीट विस्कटून सांगा तरी? बहुधा मागे एकदा कधीतरी विचारलं होतं पण तरीही अजून एकदा, तुमच्या भागाच्या आमदाराने किंवा खासदाराने काय चांगलं कामं केलं हे कसं ठरवता?

ही शिवजलक्रांती योजना म्हणजे शिववडापाव सारखं काही आहे का? या योजनेमुळे नक्की काय फायदा झाला? ही योजना नक्की किती ठिकाणी सुरू आहे? शिवसेनेने मागील ५१ वर्षात नक्की काय काम केले हे सांगता का जरा.

हतोळकरांचा प्रसाद's picture

12 Jul 2017 - 10:39 pm | हतोळकरांचा प्रसाद

प्रश्नावर प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही केलेल्या सरसकट वक्तव्यावर काय अभ्यास होता तेवढे सांगितलेत तर चर्चा मुद्देसूद होऊ शकते, कसे?

आणि राहता राहिला प्रश्न शिवजलक्रांतीचा तर जलयुक्त शिवाराचे फायदे शोधलेच असतील (त्याशिवाय ती योजना म्हणजे चांगले काम होते असे कसे म्हणणार?) ते लागू करा. अजून माहिती मिळवण्यासाठी गूगल करायला हरकत नसावी. आतापूरता हा सदा दुष्काळी असणाऱ्या तालुक्याचा रिपोर्ट बघितला तरी हरकत नाही.

https://youtu.be/yXzTOs17DW0

श्रीगुरुजी's picture

12 Jul 2017 - 10:54 pm | श्रीगुरुजी

मी याचे उत्तर आधीच दिले आहे. सेनेने ५१ वर्षात केलेले कोणतेही भरीव काम अनेकदा शोधून सुद्धा सापडत नाही. मात्र सेनेची इतर फालतूगिरी सुरवातीपासूनच दिसते. मी अनेक वेळा विचारूनसुद्धा सेना समर्थकांना सेनेने केलेले एकही भरीव काम सांगता येत नाही यावरून काय ते समजा.

हतोळकरांचा प्रसाद's picture

12 Jul 2017 - 11:09 pm | हतोळकरांचा प्रसाद

बरं मग ते शिवजलक्रांतीचं झालं का मग सेटल?

तुम्हाला माहिती काढयाचीच नाही हे स्पष्ट दिसत आहे. बरं शिवसेनेचं सोडा भाजपच्या कोणत्या कामांना तुम्ही चांगले म्हणता असे विचारले तर तुम्ही संयुक्त सरकारचे जलयुक्त शिवार आणि गृहखातं भाजप कडेच असताना दोन चार नेत्यांवर झालेल्या कारवाईंचे उदाहरण देता. तरीही शिवसेनेला क्रेडिट देता येतील अशी मी काही उदाहरणे टाकायचा प्रयत्न मी करेन. तुम्ही अजून भाजपची (भाजपचीच) काही उल्लेखनीय कामे शोधायचा प्रयत्न करा!

काही वाचाळ नेत्यांच्या वायफळ बडबडीमुळे आणि संयुक्त सरकारमधील अडेलतट्टू धोरणामुळे सद्यस्थितीतील शिवसेना नक्कीच टिकेस पात्र होत आहे पण वरील मुद्दे हे इतर पक्षांनाही तितकेच लागू होतात.

श्रीगुरुजी's picture

12 Jul 2017 - 11:11 pm | श्रीगुरुजी

>>> आतापूरता हा सदा दुष्काळी असणाऱ्या तालुक्याचा रिपोर्ट बघितला तरी हरकत नाही.

ते काम जलयुक्त शिवार योजनेचंच आहे. चित्रफितीत एके ठिकाणी तसा उल्लेख सुद्धा आहे. सेना फक्त श्रेय ढापायचा प्रयत्न करीत आहे. कर्जमाफी आमच्या मुळेच झाली (ती सुद्धा लंडनमध्ये बसून) असे सेनावाले श्रेय घेतात किंवा २००८ च्या कर्जमाफीचे श्रेय राष्ट्रवादीवाले पवारांना देतात, तसाच हा श्रेय ढापण्याचा प्रकार आहे. यापुढे जाऊन जलयुक्त शिवार ही खरी आमचीच योजना असेही सेनावाले सांगताना दिसतात. जर सेनेची खरोखरच अशी योजना होती, तर ६३ आमदार असूनही इतरत्र कोठेही या योजनेचे नामोनिशाण का नाही?

हतोळकरांचा प्रसाद's picture

12 Jul 2017 - 11:28 pm | हतोळकरांचा प्रसाद

दंडवत घ्या गुरुजी! तरी बरं हामी टिकडलेच हाव! तुम्हाला बातम्या हव्या तशा समजून घेता येतात याचा आधीही अनुभव आलाय म्हणा! महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या जलसंवर्धनांपैकी एका उदाहरणाची आपल्याला माहिती नाहीये तेव्हा जलयुक्त शिवार आणि शिवजलक्रांती दोन्हीचाही अभ्यास वाढवा!! भाजपला भाजपने केलेल्या कामाचं क्रेडिट द्या आणि इतर पक्षांना त्यांच्या कामाचं! शिवजलक्रांती शिवसेनेने स्वखर्चातून मराठवाड्यामध्ये केलेला उपक्रम आहे तर जलयुक्त शिवार हि भाजप शिवसेना संयुक्त सरकारची योजना आहे हे एवढे समजले तरी पुरे!

श्रीगुरुजी's picture

13 Jul 2017 - 3:26 pm | श्रीगुरुजी

जलयुक्त शिवार ही योजना महाराष्ट्र सरकारने जून २०१५ मध्ये अधिकृतरित्या सुरू केली. सुरवातीपासूनच या योजनेत बर्‍यापैकी काम सुरू झाले होते. या योजनेमुळे फडणविसांचे कौतुक होऊ लागल्याने शिवसेनेची जळजळ सुरू झाली. या कामाचे श्रेय एकट्या भाजपला मिळणार हे सहन होत नसल्याने सप्टेंबर २०१५ मध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची शिवजलक्रांती ही योजना जाहीर केली. एकाच सरकारमध्ये असलेल्या दोन पक्षांनी एकाच कामासाठी दोन वेगवेगळ्या योजना जाहीर करणे हा वेडेपणा होता. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बराच निधी जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आला. या योजनेची फळे २०१६ मध्ये दिसायला लागली. पावसासाठी तहानलेल्या लातूरमध्ये जून २०१६ मधील पहिल्या २-३ पावसातच भरपूर पाणी साठले.

शिवजलक्रांती हा जलयुक्त शिवार योजनेचाच भाग आहे. वरील चित्रफितीत एका ठिकाणी तसा उल्लेखसुद्धा आहे. दुर्दैवाने शिवसेनेला दुसर्‍याने केलेल्या कामाचे श्रेय स्वतःकडे ओढून घ्यायची घाण सवय आहे. त्यामुळे आम्हीच हे केले अशी प्रौढी मिरविणे सुरू आहे. वरील चित्रफितीत सेना नेते असे सांगताना दिसतात की जलयुक्त शिवार ही मुळात त्यांचीच योजना आहे व ही योजना त्यांनी २०१२ मध्येच सुरू केली होती. असे असेल तर सप्टेंबर २०१५ मध्ये उद्धव ठाकरेंनी या योजनेच्या उद्घाटनाचा समारंभ का केला? जर ही त्यांचीच योजना होती तर सेनेच्या ६३ आमदारांपैकी फक्त एकच आमदार कसा काय यो योजनेवर काम करतो? इतर ६२ जण काय करीत आहेत?

नुकत्याच झालेल्या शेतकरी संपाच्या वेळी उधोजी व आदूबाळ महिनाभर लंडनमध्ये मजा मारत होते. फडणविसांनी पुढाकार घेऊन शेतकरी संघटनेच्या नेत्यांशी अनेकदा चर्चा करून कर्जमाफीचा निर्णय जाहीर केल्यावर, आमच्यामुळेच ही कर्जमाफी झाली, आम्हीच यांच्या कंबरड्यात लाथा घालून कर्जमाफी करायला लावली अशा फुशारक्या सेना नेते मारत होते. 'कर्जमाफी केल्याबद्दल उधोजींना धन्यवाद' असे लिहिलेले फ्लेक्स रस्त्यांवर लावले गेले होते. उधोजी लंडनमध्ये राहून कशी काय कर्जमाफी करीत होते खुदा जाने! आमच्या संघर्ष यात्रेमुळेच कर्जमाफी झाली अशा फुशारक्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीनेही मारल्या. पूर्वी अनेकदा असे दिसून आले आहे की जेव्हा जेव्हा एखादा उड्डाणपूल किंवा मोठा रस्ता तयार होतो, तेव्हा तेव्हा शिवसैनिक उद्घाटन होण्यापूर्वीच स्वतःच समारंभ करून आम्हीच हे काम केले असे सांगून स्वतःचीच पाठ थोपटून घेतात. मागील वर्षी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर "पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करा असे उद्धवजी अनेकदा सांगत होते. शेवटी मोदींना त्यांचेच ऐकावे लागले." अशा फुशारक्या सेना नेते मारत होते.

अगदी अलिकडचं उदाहरण म्हणजे अमरनाथ यात्रेवरील हल्ला. तो हल्ला झाल्यानंतर सेना नेत्यांची मुक्ताफळे पहा. "पूर्वी २००३ मध्ये एकदा असाच हल्ला झाला होता, तेव्हा म्हणे बाळ ठाकर्‍यांनी सांगितले होते की परत हल्ला झाला तर मुंबईतून हाजसाठी एकही विमान उडू देणार नाही. त्यांच्या इशार्‍यामुळे आजवर कधीही हल्ला झालेला नव्हता. " असे सेना नेते सांगत आहेत. म्हणजे मातोश्रीवर सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात बसून वातानुकुलीत खोलीत पाईप चाखत वाईन पिता पिता बाळ ठाकर्‍यांनी 'सामना'त काही तरी खरडले. ते पाकिस्तानमधील अतिरेक्यांनी वाचल्यावर त्यांची तंतरली आणि म्हणून नंतर बरीच वर्षे अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याचे त्यांचे धाडस झाले नाही, असा सेना नेत्यांचा दावा दिसतो. म्हणजे भारतीय लष्कर, पोलिस, निमलष्करी दल इ. मुळे हल्ले थांबलेले नव्हते, तर बाळ ठाकर्‍यांच्या 'सामना'तील धमकीमुळे ते थांबले होते.

स्वतः काही न करता दुसर्‍याने केलेल्या कामाचे श्रेय ढापण्यापेक्षा सेनेने अगदी थोडे असले तरी स्वतः काहीतरी करून दाखवावे. मुंबईत सलग २० वर्षे सत्तेत असून ज्यांना अजून खड्डे बुजविता आले नाहीत किंवा नाले साफ करता आले नाहीत, ते आयुष्यात दुसरे काही करणे अशक्य आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

13 Jul 2017 - 3:42 pm | हतोळकरांचा प्रसाद

दंडवत वर घातला आहेच! चत्रफितीत जलयुक्त शिवार चा उल्लेख करणारे कोण आहेत, भाजपचे किती आमदार जलयुक्त शिवार मध्ये सहभागी होते, शिवसेनेच्या किती आमदारांनी जलयुक्त शिवार योजनेचा फायदा घेतला आणि किती जणांनी स्वखर्चाने शिवजलक्रांती योजना राबवली याची काही माहिती असेल तर सरसकट विधान करणे अभयासाला धरून असेल, असो!

सरकारी योजनेला स्वतःची योजना म्हणून प्रोजेक्ट करण्याची जळजळ शिवसेनेला सहन न होऊन त्यांनी स्वतःची योजना सुरु केली असे म्हणून तुम्ही भाजप या सरकारी योजनेचे श्रेय स्वतःकडे ओढत होता हे साधारणपणे मान्य केलेले दिसते. मला वैयक्तिकरित्या त्या चित्रफितीतील शीर्षक महत्वाचे वाटते, "दोघांच्या चुरशीत महाराष्ट्राचा पाण्याच्या प्रश्न सुटणार" असेल तर त्यात वाईट वाटण्याचे काय कारण असावे बुवा?

बाकी त्या शेतकरी संपाच्या आणि अमरनाथ यात्रेच्या मुद्द्याचं प्रयोजन कळलं नाही! त्यांच्या आजकालच्या अडेलतट्टू भूमिका आणि वायफळ वक्तव्यांमध्ये हे आहेच यात शंका आहे का काही?

मुंबईतील भाजप नगरसेवकांच्या प्रभागातील रस्ते गुळगुळीत असतात काय असा प्रश्न मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी विचारला गेला होता, त्याचे उत्तर नाही ते एक असो!

श्रीगुरुजी's picture

13 Jul 2017 - 3:53 pm | श्रीगुरुजी

मूळ योजना जून २०१५ मध्ये सुरू झालेली असताना मुद्दाम सप्टेंबर २०१५ मध्ये त्या योजनेचे स्वतःपुरते नाव बदलण्याचे काय कारण होते? आम्हीच हे करत आहोत हे दाखविण्यासाठीच हे केले होते ना? अशी खरोखरच भरभक्कम योजना सेनेकडे होती, तर सेनेच्या ६३ पैकी किती आमदारांनी जलयुक्त शिवार ऐवजी शिवजलक्रांती ही योजना आपल्या मतदारसंघात यशस्वीपणे राबविली आहे? मुळात दोन वेगवेगळी नावे असलेल्या या दोन योजनांमध्ये काही फरक आहे का?

शेतकरी संप व अमरनाथ यात्रेचा संदर्भ एवढ्यासाठीच दिला की सेना अशी काही कामे आपण स्वतःच केली आहेत अशी स्वतःचीच पाठ कशी थोपटून घेते (प्रत्यक्षात स्वतःचा सहभाग शून्य असला तरी) हे दाखवायचे होते. हा शिवजलक्रांती प्रकार हा तसाच श्रेय ढापण्याचा प्रकार आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

13 Jul 2017 - 4:17 pm | हतोळकरांचा प्रसाद

वरील प्रतिसाद नीट वाचा! भाजपने श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्यामुळेच वेगळी योजना काढावी लागली असे आपल्याच वक्तव्यातून ध्वनित झाले आहे. जर शिवसेनेने या भावनेतून योजना काढली आणि तीही स्वखर्चातून तर यात वावगे ते काय? सरकार जलयुक्त शिवार या योजनेवर काही मुक्त हस्ताने पैसे उधळणार नव्हतेच, त्याला शिवसेनेच्या योजनेने मदत झाली तर यात दुःख ते काय? एकाच प्रकल्पावर दोन्ही लोकांनी काम केले आणि मग श्रेयवाद झाला तर गोष्ट वेगळी आहे.

संपुआसारख्याच योजना रालोआने आणल्या तर त्यांनी श्रेय ढापले असे म्हणणे जेवढे अविचारी आहे तेवढेच हेही आहे. शेवटी योजना राबवली कशी आणि यश मिळाले कि नाही यावर काही अवलंबून असू नये का?

lakhu risbud's picture

13 Jul 2017 - 10:31 pm | lakhu risbud

उस्मानाबाद मधील या कथित शिवजलक्रांती शी उधोजींचा तेवढाच संबंध जेवढा एखादा क्रिकेटचा सामना जिंकण्यात १२ व्या खेळाडूचा असतो. सावंतांना राजकारणात प्रवेश करायचा होता,त्याची पार्श्वभूमी म्हणून आधी काहीतरी भरीव काम दाखवणे गरजेचे होते. उस्मानाबाद मधील य शिवजलक्रांतीचा पूर्ण खर्च त्यांनी स्वतःच्या खिशातून केलेला आहे. त्याच्याशी सेनेचा बादरायण संबंध नाही. राजकारणात प्रवेशासाठी launchapad म्हणून या योजनेचा सावंतांनी वापर केला आहे. त्यांना या नंतरच विधानपरिषदेची उमेदवारी शिवसेने तर्फे यवतमाळ मधून देण्यात आली . win win situation दोंघांसाठी आहे. पण त्याची फुकाची बढाई सेना आत्ता मारत आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

13 Jul 2017 - 11:00 pm | हतोळकरांचा प्रसाद

प्रत्येकाचा आपापला दृष्टिकोन असतो. सावंतांनी राजकारणात यायचं म्हणून केलं आणि इतर पक्षांचे नेते काय पक्षासाठी करत असतात का? त्यांनी अधिकृतरित्या शिवसेनेच्या बॅनरखाली आणि शिवजलक्रांती उपक्रमांतर्गत हे काम केलं हे दुर्लक्षून त्यांनी हे कशासाठी केलं हे चर्चिण्यात काय अर्थ? आणि तसे पाहता विधानपरिषदेची उमेदवारी देतो तेवढं जलसंधारणाचं काम तुमच्या खिशातून करा असं कुठल्या पक्षाने म्हटले तर ते स्तुत्यच नाहीका?

नुकत्याच झालेल्या शेतकरी संपाच्या वेळी उधोजी व आदूबाळ महिनाभर लंडनमध्ये मजा मारत होते.

गोष्ट खरी आहे, पण उधोजी नव्हते.

आनंदयात्री's picture

15 Jul 2017 - 1:55 am | आनंदयात्री

=)) =)). उधोजींचे लंडनच्या विकासात काही काही म्हणून योगदान नाही!

अनुप ढेरे's picture

12 Jul 2017 - 2:02 pm | अनुप ढेरे

मराठवाड्याच्या विकासात शिवसेनेचे भरीव योगदान आहे.

श्रीगुरुजी's picture

12 Jul 2017 - 2:29 pm | श्रीगुरुजी

नक्की काय योगदान आहे?

अनुप ढेरे's picture

12 Jul 2017 - 4:38 pm | अनुप ढेरे

सरकॅझम समजैना का काय गुर्जी तुम्हाला.

श्रीगुरुजी's picture

12 Jul 2017 - 4:58 pm | श्रीगुरुजी

फिदी फिदी फिदी . . . लोल

श्रीगुरुजी's picture

12 Jul 2017 - 2:58 pm | श्रीगुरुजी

शिवसेनेचे एकुण ६४ आमदार आणि २० खासदार आहेत. आणि ह्यातले ६४ आमदार हे या पक्षाने एकटे लढून आलेत. केवळ मुंबई ठाणे अणि नाशिक एवढ्याच भागातून नाही

२०१४ मध्ये सर्वच पक्ष एकटे लढले होते. शिवसेना एकटी लढली त्यात विशेष काहीही नाही. त्यावेळी महाराष्ट्रात कॉंग्रेसविरोधी प्रचंड लाट होती. त्या लाटेचाच फायदा शिवसेनेला झाला. त्यानंतर झालेल्या बहुसंख्य निवडणुकांमध्ये शिवसेनेला फारसे यश मिळालेले नाही (उदा. अलिकडेच झालेल्या निवडणुकीत १६ महापालिकांमध्ये फक्त २ महापालिकात शिवसेनेचा महापौर झाला आहे. ११ महापालिकांमध्ये भाजपचा तर ३ मध्ये कॉंग्रेस आहे). २०१९ मधील निवडणुकीत शिवसेनेची अवस्था अत्यंत दारूण होणार आहे. जर त्यांनी वस्तुस्थिती मान्य करून भाजपबरोबर युती करून स्वतःच्या ताकदीएवढ्याच जागा मान्य केल्या (म्हणजे विधानसभेत ९० च्या आसपास व लोकसभेत १०-१२) तरच शिवसेना जिवंत राहू शकेल. अन्यथा मनसेसारखीच शिवसेना संपुष्टात येईल.

एकुलता एक डॉन's picture

12 Jul 2017 - 3:10 pm | एकुलता एक डॉन

कॉंग्रेसविरोधी लाट असती तर राष्ट्रवादी आणि इतर पक्षांना पण फायदा झाला असता ,का नाही झाला ?

श्रीगुरुजी's picture

12 Jul 2017 - 4:58 pm | श्रीगुरुजी

अज्ञानमूलक प्रश्न

विशुमित's picture

12 Jul 2017 - 5:01 pm | विशुमित

मीच लिहणार होतो हे पण शब्द सुचत नव्हता.

IT hamal's picture

12 Jul 2017 - 4:39 pm | IT hamal

जाऊ द्या हो.. २०१९ ला पूर्ण बहुमत मिळेल भाजपाला .... महाराष्ट्रातले सगळे " Election Managers " म्हणजे कॉंट्रॅक्टर्स , बिल्डर्स , गावोगावचे एकगठ्ठा नोटा वाटून थप्पीने मते विकत घेणारे किव्वा थप्पीने नोटा वाटून एकगठ्ठा मते विकत घेणारे टगे लोक सगळे आता वाल्मिकी झालेत.. सगळे आता घड्याळा ऐवजी कमळाच्या पाट्या लावून फिरतात स्कॉर्पिओ आणि तत्सम गाड्यांवर ... हाच वर्ग महाराष्ट्राचे सत्ताधारी कोण हे ठरवत असतो...बाकी मतदान वगैरे जस्ट एक फॉर्मॅलिटी असते... सत्ता मिळाली कि त्या पक्षाची असे मांडवली किंग विकत घ्यायची ताकद वाढते आणि त्यातून परत परत सत्ता मिळवता येते.....तुम्ही आम्ही कळफलक बडवून काही होत नाही.. जस्ट चिल !!!!

स्कॉर्पिओ जुनी झाली हो आता ....कार्यकर्तेसुद्धा वापरत नाही..
आता फॉटनर वापरतात (हे Fortuner चं नामकरण आहे)

साहेबांच्या दहीहंडीत सर्वात खालच्या थरात उभे राहणारे ही आजकाल स्कॉर्पिओ त बसायला लाजतात....पुण्यातल्या दुबईत तर आजकाल चार बांगड्यावाली गाडी ही outdated झालीय.. कमळाच्या आश्रयाला गेलेले सगळे घड्याळवाले तर फक्त जग्वार आणि तत्सम चारचाक्यात बसतात ....pcmc ची एवढी ५ वर्षाची मुदत संपत येईतो ४/५ तरी हमर येतील आमच्या पुणेरी दुबईत ...हाय काय न नाय का !!! अन लोकांना वाटतेय कि नोटबंदी आणि GST मुले सगळे ब्लॅक वाले सरळ होणार !!!!

साहेबांच्या दहीहंडीत सर्वात खालच्या थरात उभे राहणारे ही आजकाल स्कॉर्पिओ त बसायला लाजतात....पुण्यातल्या दुबईत तर आजकाल चार बांगड्यावाली गाडी ही outdated झालीय.. कमळाच्या आश्रयाला गेलेले सगळे घड्याळवाले तर फक्त जग्वार आणि तत्सम चारचाक्यात बसतात ....pcmc ची एवढी ५ वर्षाची मुदत संपत येईतो ४/५ तरी हमर येतील आमच्या पुणेरी दुबईत ...हाय काय न नाय का !!! अन लोकांना वाटतेय कि नोटबंदी आणि GST मुले सगळे ब्लॅक वाले सरळ होणार !!!!

इरसाल कार्टं's picture

13 Jul 2017 - 4:40 pm | इरसाल कार्टं

+1

प्रसाद_१९८२'s picture

12 Jul 2017 - 1:30 pm | प्रसाद_१९८२

सध्याच्या शिवसेनेची हालात, सतत काहितरी बडबडत राहणार्‍या वेड्यासारखी झाली आहे. एकिकडे समृद्धी महामार्गासाठी यांचेच मंत्री एकनाथ शिंदे, ह्या प्रकल्पात जमीनी जाणार्‍या शेतकर्‍यांना भेटून 'हा महामार्ग शेतकर्‍यांच्यासाठी कसा हिताचा आहे' हे पटवून देत आहेत तर दुसरीकडे सेनेचे कार्यध्यक्ष ह्या प्रकल्पाला जोरदार विरोध करा, असा आदेश शिवसैनिकांना देत आहेत.

श्रीगुरुजी's picture

12 Jul 2017 - 2:47 pm | श्रीगुरुजी

+१

उद्धव, राऊत, कदम इ. शिवसेनेचे नेते जे रोज बोलतात त्याचे बेताल बरळणे या दोन शब्दातच वर्णन करता येईल. युती सरकारमध्ये आपल्याला दुय्यम भूमिका स्वीकारावी लागली आहे व सत्तेची हाव असल्याने सर्व अपमान गिळून आपल्याला सत्तेत रहावे लागत आहे हे शिवसेनेला इतके झोंबत आहे ही त्यांना आता जळीस्थळीकाष्ठीपाषाणी फक्त मोदी आणि भाजपच दिसतो. मोंगलांच्या सैनिकांच्या घोड्यांना संताजीधनाजी पाण्यात दिसायचे असे म्हणतात. तसेच शिवसेनेला सर्वत्र मोदी आणि भाजपच दिसतात. केंद्राच्या व राज्याचा प्रत्येक निर्णयाला कडाडून विरोध (आणि ते सुद्धा स्वतः दोन्हीकडे सत्तेत राहून), अत्यंत अभद्र भाषेत टीका, पोकळ बढाया इ. मुळे उद्धव, राऊत व सेनानेते हे लाफिंग स्टॉक बनले आहेत. आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरत आहोत, पुढील महिन्यात आम्ही भूकंप करणार आहोत, आम्हीच यांच्या कंबरड्यात लाथा घालून कर्जमाफी करायला लावली इ. बेताल बडबड ऐकून फक्त करमणूक होते.

पुढील निवडणुकीत सेनेला फार मोठा फटका बसणार आहे. शिवसेना सत्तेत असल्याने त्यांना जनता विरोधक मानत नाही आणि शिवसेना सत्तेत असून सुद्धा सातत्याने सरकारवर टीका करीत असल्याने सरकारच्या चांगल्या कामाचे श्रेय त्यांना मिळत नाही. अशा तर्‍हेने दोन्ही बाजूने मते मिळणार नाहीत.

श्रीगुरुजी's picture

12 Jul 2017 - 2:36 pm | श्रीगुरुजी

बाबरी मशीद प्रकरणात कोणतीही जबाबदारी न घेणार्‍या भाजप पेक्शा बाळासाहेबानी " हो शिवसेनैकीनी हे केले असल्यास मला त्याचा अभिमान आहे" अशी घोषणा केली त्या घोषणेला लोक त्यांचा खरेपणा समजले. नंतर सेनेच्या या रोखठोकपणाचे लोकाना अधीकच आकर्षण वाटू लागले.

बाळ ठाकर्‍यांचे ते वाक्य हे जबाबदारी स्वीकारणे नसून उलट आम्ही हे केलेले नाही असेच सांगणारे होते. जेव्हा जेव्हा एखाद्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात तेव्हा तो नेता "मी जर भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले तर मला जाहीर फाशी द्या" किंवा "मी जर भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले तर मी राजकारणातून कायमचा निवृत्त होईन" असे जेव्हा सांगतो तेव्हा तो नेता केलेल्या भ्रष्टाचाराची जबाबदारी घेत नसून "मी भ्रष्टाचार केलेलाच नाही" असे ठासून सांगत असतो.

बाळ ठाकर्‍यांचे जर-तरच्या स्वरूपातील वरील वाक्य मशीद शिवसैनिकांनी पाडली याची जबाबदारी स्वीकारणारे नसून ती जबाबदारी नाकारणारे आहे.

जर बाळ ठाकरे केलेल्या कृत्याची जबाबदारी घेण्याइतके निर्भीड होते तर श्रीकृष्ण अहवालात त्यांच्यावर जोरदार ठपका ठेवल्यानंतर दंगलीची जबाबदारी न स्वीकारता त्यांनी तो अहवाल फेटाळून का लावला होता?

विजुभाऊ's picture

12 Jul 2017 - 9:41 pm | विजुभाऊ

मला ही तेच म्हणायचे होते. बाळासाहेबानी ते वाक्य म्हंटले की जर केलेले असेल तर.... या नरोवा कुंजरोवाचा अर्थ लोकांनी वेगळाच घेतला.
दुर्दैवाने भाजपने त्यावेळेस नेहमीसारखीच अत्यंत सोयीस्कर म्हणजे" हे आम्ही केलेले नाही. कोणी केले ते आम्हाला माहीत नाही. विश्व हिंदू परिषदे ने केले असेल तर विश्व हिंदु परिषद म्हणजे संघ नव्हे . संघ म्हणजे भाजप नव्हे " अशी भूमीका घेतली होती

कारसेवक (?) कोणाच्या हाकेला आले?
घर घरसें इट! ही घोषणा, किंवा सर्वधर्म परिषद मध्ये कोणी एकमताने निर्णय घेतला की राम मंदिर वही बनेगा! याची उत्तरे मिळाले तर धनी कोण सहज समजेल.

सुज्ञ's picture

12 Jul 2017 - 4:30 pm | सुज्ञ

सोडा गुर्जी कशाला नादाला लागताय . आपलेआपण खड्डयात जाणारा पक्ष आहे तो . केजरीच्या आप सारखा .

विकासाची कुठलीही कामे नाहीत, कोणतीही दिशा नाही , कोणत्याही नावे घेण्यासारख्या ठोस योजना यांनी कधीही दिल्या नाहीत. (ज्या किमान इतर पक्षांनी नक्कीच दिल्या) .
केवळ भावनिक/ भाषिक राजकारण आणि महत्तम कर्तृत्व दंगलीत लोकांना वाचवलं हे . ते ही का कसे ते नक्की नाही .
बास झाल्या या असल्या गोष्टी .

द्या सोडून . राऊत आणि उधोजीराव लावतीलच वाट

श्रीगुरुजी's picture

12 Jul 2017 - 5:23 pm | श्रीगुरुजी

+१

अर्थव्यवस्था, परराष्ट्र व्यवहार व राजकारण, संरक्षण क्षेत्र इ. क्षेत्रात ज्ञानी असलेला एकतरी माणूस आहे का शिवसेनेत? यातल्या कोणाला जागतिक राजकारण, अर्थव्यवस्था, प्रशासन इ. विषयातील काही समजते? रोज एका नवीन विषयावर आंदोलन करणे, दगडफेक, तोडफोड, जाता येता शिवाजी महाराजांचे नाव घेणे, प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीला शिवाजी महाराजांचे नाव देणे (उदा. शिववडापाव, शिवजलक्रांती, छत्रपती शिवाजी टर्मिनस इ.)., दर दोन मिनिटांनी आम्ही वाघ आहोत अशा फुशारक्या मारणे, स्वतःकडे कोणतेही ज्ञान व माहिती नसताना जगातील यच्चयावर प्रत्येक गोष्टीवर आपली अक्कल पाजळणे, आपल्याला विरोध करणार्‍या प्रत्येकावर अत्यंत खालच्या थरावर जाऊन शिवराळ व असभ्य भाषेत टीका करून त्यांचा उपहास करणे इ. पलिकडे शिवसेनेने आजवर काही केले आहे का? शिवसेनेने आजवर एकतरी शिक्षणसंस्था, सहकारी संस्था, एखादा कारखाना इ. गोष्टी निर्माण केल्या आहेत का?

पूर्वी बाळ ठाकरे सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात 'मातोश्री'त वातानुकुलीत खोलीत बसून पाईप ओढत आणि श्वेत वाईनचे घुटके घेत 'मला फक्त एक दिवस पंतप्रधान करा. २४ तासांच्या आत काश्मिर प्रश्न सोडवितो.' असल्या गफ्फा 'सामना'तून हाणायचे. राणेला शिवसेनेतून काढल्यानंतर बाळ ठाकर्‍यांनी त्याच्याबद्दल जी घाण भाषा वापरली ती लाज वाटण्यासारखी होती. उद्धव व राजकडे त्यांचाच वारसा आला आहे. उद्धवची भाषणे म्हणजे 'वाघनखे खुपसू, कोथळा बाहेर काढू, मुसक्या बांधू, तुटुन पडू, भाला, बरची, तलवारीने गर्दन मारू, हात कलम करू, बोटे तोडू, कबर बांधू, थडग्यात गाडू, शाहिस्तेखान, अफझलखान, आदिलशहा . . . ' या पलिकडे काहीही नसतं.

ज्याप्रमाणे राहुल दिग्विजय, सिब्बल, खुर्शीद इ. चांडाळचौकडीसहाय्याने काँग्रेसला संपविण्याच्या मार्गावर आहे, त्याचप्रमाणे उद्धवसुद्धा राऊत, कदम इ. चांडाळचौकडीच्या सहाय्याने शिवसेनेला संपविणार आहे.

प्रविन ९'s picture

12 Jul 2017 - 4:36 pm | प्रविन ९

हे उघडपणे मुंबईत कोणाला विचारायचे माझे धाडस नाही........... मुंबईत मिसल पाव कोनि वाचत नहि अस कि काय ???

प्रविन ९'s picture

12 Jul 2017 - 4:38 pm | प्रविन ९

तशी गर्दी अनेकांच्या अंत्ययात्रेला जमते. त्यात काहीही विशेष नाही.......... उदाहरन ???

श्रीगुरुजी's picture

12 Jul 2017 - 4:49 pm | श्रीगुरुजी

बुर्‍हान वाणी

हतोळकरांचा प्रसाद's picture

12 Jul 2017 - 5:44 pm | हतोळकरांचा प्रसाद

अज्ञानमूलक उत्तर!

जयन्त बा शिम्पि's picture

12 Jul 2017 - 4:45 pm | जयन्त बा शिम्पि

सुज्ञ यांच्या मताशी १०० % सहमत.

यातच खरेतर सर्वकाही आले. निव्वळ गुंड/ झुंडगिरी च्या जोरावर हा पक्ष टिकला/ वाढला. छत्रपतींसारख्या दाढ्या वाढवून फिरणारे यांचे सैनिक पाहिले की वाटत जग कुठे चालले आणि हे कुठे चाललेत .

तुम्ही शिवसैनिक आहात, शिवसैनिक डरत नाही वाघासारखा धाऊन जातो वगैरे बाष्कळ बडबड आणि डोकी भडकवणारी टाळ्याखाऊ वाक्ये पूर्वी चालायची. किंबहुना यावरच यांच्या प्रमुखांनी स्वतःची घरे पोसली पण हास्यास्पद झालंय आता सगळं . .

असो . यांच्या करकीर्दीस शुभेच्छा

विशुमित's picture

12 Jul 2017 - 5:19 pm | विशुमित

हीच झुंडगिरी आता कळफलक बडवणाऱ्या भाजपच्या समर्थकांनी सुरु केली आहे. गुंडगिरी करू शकत नाहीत कारण त्यासाठी मनगटात रग असावी लागते.

बाष्कळ बोलण्यात आणि टाळ्याखाऊ भाषणाची शिवसैनिकांची जागा आता भाजप वाल्यानी घेतली आहे.

आमचं चांगलं चालाय शाहू-फुले-आंबेडकर विचारधारा. हीच विचारधारा शाश्वत लोकशाहीला मजबूत ठेवील हा विश्वास आहे.

शाश्वत लोकशाहीची तुमची व्याख्या काय आहे..?

जेम्स वांड's picture

12 Jul 2017 - 6:30 pm | जेम्स वांड

नका ताणू दादा,

लोकशाहीत शाश्वत फक्त मतपेटी अन ईव्हीएम असते अन बाकी सगळे मोहमाया ;)

प्रत्येकाला आपण 'शाश्वत लोकशाही देऊ' अशी स्वप्ने विकायची असतात, मग महापुरुष वेठीस धरले जातात. :D

विशुमित's picture

13 Jul 2017 - 11:48 am | विशुमित

शाश्वत लोकशाही ची माझी व्याख्या "न्याय, स्वतंत्र, समता आणि बंधुता" ही आहे.

श्रीगुरुजी's picture

12 Jul 2017 - 8:28 pm | श्रीगुरुजी

आमचं चांगलं चालाय शाहू-फुले-आंबेडकर विचारधारा. हीच विचारधारा शाश्वत लोकशाहीला मजबूत ठेवील हा विश्वास आहे.

जातीयवादी काड्या, मनसोक्त भ्रष्टाचार हीच शाहू-फुले-आंबेडकर विचारधारा आहे का?

श्रीगुरुजी's picture

12 Jul 2017 - 8:40 pm | श्रीगुरुजी

तुम्ही शिवसैनिक आहात, शिवसैनिक डरत नाही वाघासारखा धाऊन जातो वगैरे बाष्कळ बडबड आणि डोकी भडकवणारी टाळ्याखाऊ वाक्ये पूर्वी चालायची. किंबहुना यावरच यांच्या प्रमुखांनी स्वतःची घरे पोसली पण हास्यास्पद झालंय आता सगळं . .

शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी आहे आणि त्यांचा मराठी बाणा सुद्धा एक शुद्ध फसवणूक आहे. एकीकडे मराठी, मराठी करताना दुसरीकडे यांनी प्रितिश नंदी चंद्रिका केनिया, मुकेश पटेल, संजय निरूपम, राम जेठमलानी यांना राज्यसभेच्या खासदारकीची तिकिटे विकली. उत्तर भारतीय, बिहारींना विरोध करताना 'दोपहरका सामना' हे हिंदी वृत्तपत्र काढून संजय निरूपम या बिहारीला त्याचा संपादक केले. यांची मुले कॉन्व्हेंट मध्ये शिकली. मुंबईत येणार्‍या अमराठींना शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र, आधार पत्र, निवासी दाखला, रिक्षा चालक परवाना, टॅक्सी चालक परवाना इ. मिळवून देण्यात इतर पक्षांप्रमाणे यांचे नगरसेवक सुद्धा होते. मुंबई महापालिकेची बहुसंख्य कंत्राटे अमराठींना देण्यात हेच पुढे होते.

वाघाचा पंजा, डरकाळी असले हास्यास्पद शब्द वापरून हे स्वतःचेच हसे करून घेतात. आता तर २० कोटींचा ६ मजली 'मातोश्री २' हा नवीन बंगला बांधत आहेत. हे शेतकर्‍यांच्या नावाने सारखा हंबरडा फोडत असतात. आत्महत्या केलेल्या प्रत्येक शेतकर्‍याच्या कुटुंबाला यांनी या २० कोटीतून प्रत्येकी १ लाख रूपये दिले असते, तर २००० कुटुंबांना आधार मिळाला असता. पण स्वतः खिशातून १ रूपया सुद्धा द्यायचा नाही, लंडनमध्ये जाऊन महिनाभर मजा मारायची आणि आम्हीच शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळवून दिली अशा गफ्फा हाणायच्या यात हे वाकगबार आहेत.

बाळ ठाकरे गेल्यानंतर त्यांचे अंतिम संस्कार शिवाजी पार्क मैदानावर केले. त्यानंतर यांनी हे संपूर्ण मैदानच स्मारकासाठी बळकावण्याचा प्रयत्न केला होता. अंतिम संस्कारानंतर जवळपास महिनाभर दहनासाठी उभारलेला चौथरा तसाच ठेवून रोज त्यावर हार, फुले वाहून त्या चौथर्‍याचे समाधीस्थळ करण्याचा यांचा प्रयत्न होता. महापालिकेने किंवा अतिक्रमण विभागाने चौथरा काढू नये यासाठी शिवसैनिक २४ तास पहारा देत होते. शिवाजी पार्क स्मारकासाठी देऊन टाका अशाही मागण्या होत होत्या. शेवटी केतन तिरोडकर व इतर काही जण याविरूद्ध न्यायालयात गेल्यानंतर चौथरा काढून टाकून मैदान फक्त खेळासाठी वापरण्याचा आदेश न्यायालयाने दिल्यानंतर शेवटी पोलिस बंदोबस्तात तो चौथरा हटविण्यात आला. तसे झाले नसते तर ते मोठे मैदान यांनी गिळंकृत केले असते.

कुंदन's picture

14 Jul 2017 - 10:37 pm | कुंदन

मग 'मातोश्री १' मध्ये स्व. बाळा साहेबांचे स्मारक होणार तर.

सुज्ञ's picture

12 Jul 2017 - 6:30 pm | सुज्ञ

"गुंडगिरी करू शकत नाहीत कारण त्यासाठी मनगटात रग असावी लागते."

या एकाच वाक्यातून भाजप सोडून सर्वजण गुंडगिरी करतात हे तुम्ही मान्य केले ते बरे झाले . बाकी कळफलक बडवून शाब्दिक बोलणे किंवा चर्चा करणे ( ज्यास आपण गुंडगिरी असे म्हटले आहे) आणि खरीच गुंडगिरी एखाद्याला झोडपणे यातील फरक आपल्याला कळणार नाहीच कारण त्यासाठी काहीतरी कुठेतरी असावे लागले असे असावे .

विशुमित's picture

13 Jul 2017 - 10:59 am | विशुमित

<<<या एकाच वाक्यातून भाजप सोडून सर्वजण गुंडगिरी करतात हे तुम्ही मान्य केले ते बरे झाले>>>
==> मला हे मान्य नाही. सबसे बडा गुंडा तर जुमला पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे.

<<<<बाकी कळफलक बडवून शाब्दिक बोलणे किंवा चर्चा करणे ( ज्यास आपण गुंडगिरी असे म्हटले आहे)>>>

==> त्याला मी झुंडगिरी म्हंटले आहे. गुंडगिरी करायला मनगटात दम लागतो (नुसत्या काठ्या आपटून चालत नाही). हे मी कुठे चुकीचे बोललो.

<<<<यातील फरक आपल्याला कळणार नाहीच कारण त्यासाठी काहीतरी कुठेतरी असावे लागले असे असावे .>>>
==> "काहीतरी कुठेतरी" कुठे मिळेल हो.

सुज्ञ's picture

13 Jul 2017 - 11:21 am | सुज्ञ

करा अजून गुंडगिरी

तेजस आठवले's picture

12 Jul 2017 - 6:44 pm | तेजस आठवले

गुंडगिरी करू शकत नाहीत कारण त्यासाठी मनगटात रग असावी लागते.

आणि त्याबरोबर १०.१० मि. वेळ दाखवणारे घड्याळ किंवा ढाण्या वाघाचे छायाचित्र.

बाकी शिवसेना संपेल असे अजिबात वाटत नाही. आपल्याकडे बापजाद्यांच्या पूर्वपुण्याईवर पुढच्या बऱ्याच पिढ्या तगवण्याची भावनिक परंपरा आहे. असो, दुसऱ्यांसाठी खणलेल्या खड्ड्यात उडी मारण्याची सुप्त इच्छा असू शकते खणणाऱ्याला!

- २०१४ निवडणुकीत भाजपने स्वतंत्र उमेदवार उभा न केल्याने नाईलाजाने शिवसेनेला मत द्यावे लागलेला बालेकिल्ल्यातील एक नागरिक.

विशुमित's picture

13 Jul 2017 - 11:06 am | विशुमित

<<<<आणि त्याबरोबर १०.१० मि. वेळ दाखवणारे घड्याळ किंवा ढाण्या वाघाचे छायाचित्र.>>>

==> नाही हो. आता ते कमळाचा स्टिकर लावतात. पुणे- पिंपरी चिंचवड मध्ये फॉर्च्युनर गाड्या मला तर खूप दिसतात.

<<<<बाकी शिवसेना संपेल असे अजिबात वाटत नाही. आपल्याकडे बापजाद्यांच्या पूर्वपुण्याईवर पुढच्या बऱ्याच पिढ्या तगवण्याची भावनिक परंपरा आहे. >>
==>> सहमत

<<<२०१४ निवडणुकीत भाजपने स्वतंत्र उमेदवार उभा न केल्याने नाईलाजाने शिवसेनेला मत द्यावे लागलेला बालेकिल्ल्यातील एक नागरिक.>>
==> तुम्ही नाटो वापरायला पाहिजे होता.

हतोळकरांचा प्रसाद's picture

13 Jul 2017 - 11:47 am | हतोळकरांचा प्रसाद

तुम्हाला नोटा म्हणायचे असेल बहुतेक! (भाजपने उमेदवार दिला नाही म्हणून नाटोला बोलावयाचे कि काय असे एक क्षण उगाच वाटून गेले :D :D ).

विशुमित's picture

13 Jul 2017 - 11:56 am | विशुमित

मात्रा चुकला वाटतं. नोटा च म्हणायचं होते.

अनुप ढेरे's picture

13 Jul 2017 - 3:06 pm | अनुप ढेरे

आता ते कमळाचा स्टिकर लावतात. पुणे- पिंपरी चिंचवड मध्ये फॉर्च्युनर गाड्या मला तर खूप दिसतात.

आधी अशी चिन्ह हि घड्याळ किंवा वाघ ही असायची. पंजा वाल्या गाड्या देखील फार कमी दिसतात. गाड्यांवर कमळं दिसणं हे पक्षाचं गुंडगिरीकरण सुरू असल्याचं चिन्ह आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Jul 2017 - 7:52 pm | अमरेंद्र बाहुबली
कपिलमुनी's picture

12 Jul 2017 - 8:40 pm | कपिलमुनी

या धाग्याचा वापर मुख्य मुद्द्यावर चर्चा ना करता शिवसेनेवर ओकाऱ्या काढण्यात काही आयडी करणार .
आणि त्यांचा अजेंडा राबवणार
चिखलात डुकरासोबत मस्ती/कुस्ती करू नये अशी इंग्रजी म्हण आहे

गुगलुन पाहिल्यावर सरपोतदारानी ५००० चा जमाव घेवून वांद्र्यात फेरी काढली वगैरे माहिती मिळाली पण तीही अत्यंत तोकडी आणि व्हेग आहे.
खरे काय झाले होते किंवा झालेच नव्हते ते समजतच नाही
बाकी मुद्दे बोलायचे तर कोंग्रेसच्या अगदी छोट्या नेत्यानीही गावोगावी स्वतःच्या फायद्यासाठी का होईना शाळा इंजीनिअरिंग कॉलेजे, सहकारीसाखरकारखाने. सूतगिरण्या, सहकारी दूध संघ, पतसंस्था वगैरे सुरू केलेले आहे
शिवसेनेच्या आमदार खासदारानी अशी काही कामे केलेली ऐकिवात नाही. त्यांच्या ग्रामीण भागात काम करु शकतील असे कोणतेच नेतृत्व नाही.
नको तेथे विरोध करत बसल्यामुळे सेनेने सुरेश प्रभुं सारखा मोहरा अलगद भाजपाच्या हातात सोपवून टाकला.

( अवांतरः वाजपेयी सरकार चा एकाच मताने पराभव झाला होता त्यावेळेस सेनेचे एक खासदार आजारी असल्या मुळे संसदेत पोहोचले नव्हते त्यांचे नाव आठवत नाही. बहुतेक रमेश प्रभू असावेत)

श्रीगुरुजी's picture

12 Jul 2017 - 10:47 pm | श्रीगुरुजी

>>> ( अवांतरः वाजपेयी सरकार चा एकाच मताने पराभव झाला होता त्यावेळेस सेनेचे एक खासदार आजारी असल्या मुळे संसदेत पोहोचले नव्हते त्यांचे नाव आठवत नाही. बहुतेक रमेश प्रभू असावेत)

हे १९९३ मध्ये नरसिंहराव सरकार विरूद्ध असलेल्या अविश्वास ठरावावरील मतदानाच्या वेळी घडले होते. तो ठराव रावांनी जेमतेम १४ मतांनी जिंकला होता (२५९ वि. २४५). त्यावेळी सेनेचे मोहन रावळे अनुपस्थित होते. झामुमच्या ५ खासदारांनी प्रत्येकी १ कोटी लाच घेऊन रावांच्या बाजूने मत दिल्याचे नंतर सिद्ध झाले. जनता दलाच्या २० पैकी ७ खासदारांनी सुद्धा रावांच्या बाजूने मत दिले होते. त्यावेळी राव सरकार फोडाफोडीमुळे थोडक्यात वाचले होते.

गॅरी ट्रुमन's picture

13 Jul 2017 - 10:49 am | गॅरी ट्रुमन

हो ते मोहन रावलेच. नरसिंह राव सरकारवरील जुलै १९९३ मधील अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार होते त्याच्या आदल्या दिवशी रावलेंनी दिल्लीत मित्र आणि इतर काहींबरोबर चिकन पार्टी केली आणि त्यामुळे त्यांचे पोट बिघडले असा त्यांनी दावा केला होता. या ठरावावर मतदान रात्री झाले होते पण रावले दिवसभर अनुपस्थित होते. त्यानंतर मोहन रावले बाळासाहेबांच्या मर्जीतून उतरले. चिकन पार्टी आणि त्यामुळे पोट बिघडणे हा दावा बाळासाहेबांना मान्य नव्हता. त्या कारणावरून रावलेंना शिवसेनेतून काढण्यात आले नाही पण त्यानंतरचे जवळपास दोन-अडिच वर्षे ते सेना नेतृत्वापासून दूर गेले होते. १९९५ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळीही त्यांना कोणी विचारले नव्हते. पण राज्यात युतीचे सरकार आल्यावर काही महिन्यात मोहन रावले आणि शिवसेना नेतृत्वात समेट झाला. त्यानंतर रावले १९९६, १९९८, १९९९ आणि २००४ मध्येही दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभेवर निवडून गेले होते.

वाजपेयी सरकारवरच्या एप्रिल १९९९ मधील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी (या मतदानात वाजपेयींचे सरकार एका मताने पडले होते) असा गोंधळ झालेले खासदार शिवसेनेचे नव्हते तर ते होते अण्णा द्रमुकचे सेदापत्ती आर. मुथय्या. या ठरावावर सुरवातीला आवाजी मतदान झाले आणि त्या मतदानात सरकारचा विजय झाला असे अध्यक्ष जी.एम.सी बालयोगी यांनी जाहिर केले. पण अशावेळी एका तरी लोकसभा सदस्याने मागणी केल्यास ठरावावर मतदान घ्यावे लागते. त्याप्रमाणे या ठरावावर मतदान घेतले गेले. सुरवातीला इलेक्ट्रॉनिक पध्दतीने मतदान घेतले गेले पण त्यात काही खासदारांनी आपली मते नोंदली गेली नाहीत अशी तक्रार केल्यावर चिठ्ठ्या टाकून पेपरवर मतदान घेण्यात आले. मुथय्यांनी चिठ्ठीवर सरकारविरोधी मत नोंदवले. या चिठ्ठ्या सभागृहातील नोकरांकरवी लोकसभा अध्यक्षांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. ५४५ सदस्यांच्या चिठ्ठ्या गोळा करायला अर्थातच वेळ लागला. मधल्या काळात मुथय्यांनी आपली चिठ्ठी खिशात ठेवली आणि ते ती द्यायला विसरलेच. मधल्या काळात ते इतर खासदारांशी बोलायला म्हणून आपल्या आसनापासून दूर गेले होते आणि म्हणून ते चिठ्ठी द्यायला विसरले हे समजत नाही. इतक्या महत्वाच्या वेळी खासदार या महत्वाच्या पदावरील व्यक्ती 'विसरते' हे विश्वास ठेवायला तसे कठिणच आहे. अर्थातच जयललितांनी त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवला नाही. मुथय्यांनी वाजपेयी सरकारबरोबर 'डिल' करून मुद्दामून मतदानात भाग घेतला नाही असा ग्रह जयललितांनी केला आणि मुथय्यांना पक्षातून काढले. त्यानंतर काही वर्ष मुथय्या राजकारणातून बाहेर फेकले गेले होते. २००८ मध्ये त्यांनी द्रमुकमध्ये प्रवेश केला आणि अजूनही ते द्रमुकमध्येच आहेत. पण अर्थातच अण्णा द्रमुकमध्ये असताना त्यांना महत्वाचे स्थान होते ते काही द्रमुकमध्ये मिळालेले नाही.

दशानन's picture

12 Jul 2017 - 11:12 pm | दशानन

बर, ते बेळगावचे काय झाले?

श्रीगुरुजी's picture

12 Jul 2017 - 11:23 pm | श्रीगुरुजी

जे खिशात ठेवलेल्या राजीनाम्यांचं आणि भूकंपाचं झालं तेच.

हतोळकरांचा प्रसाद's picture

12 Jul 2017 - 11:33 pm | हतोळकरांचा प्रसाद

का बुआ शेवटचा मराठी माणूस जिवंत असेपर्यंत बेळगावचा लढा सुरु राहील असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा नाही का ठेवायच्या?

विशुमित's picture

13 Jul 2017 - 10:42 am | विशुमित

मुख्यमंत्री कुठे महाराष्ट्राचे आहेत. ते तर विदर्भाचे, हे विसरून चालेल.

श्रीगुरुजी's picture

13 Jul 2017 - 2:56 pm | श्रीगुरुजी

बेळगाव आता परत महाराष्ट्रात येणे अशक्य आहे. मागील ५७ वर्षांपासून तो कर्नाटकचा भाग आहे. बेळगाव परत आणण्यासाठी अधूनमधून आंदोलने करण्यापलिकडे महाराष्ट्रातून फारसे काही झालेले नाही. नेहरूंनी ज्या असंख्य गंभीर घोडचुका केल्या त्यात मराठीबहुल बेळगाव व आजूबाजूचा भाग बळजबरीने कर्नाटकात समावेश करणे ही पण एक चूक होती. दस्तुरखुद्द नेहरूंच्या निर्णयाविरूद्ध जाण्याची महाराष्ट्रातील नेत्यांची हिम्मतच नव्हती. त्यांनी तो निर्णय निमूटपणे मान्य केला. 'महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत' हे तर यशवंतराव चव्हाणांनी जाहीर सांगितले होते.

बेळगाव कर्नाटकात अधिकृतरित्या गेल्यानंतर महाराष्ट्राने जवळपास ५० वर्षांनी त्याविरूद्ध न्यायालयात दाद मागितली. परंतु तेव्हा खूपच उशीर झालेला होता. हा खटला सर्वोच्च न्यायालयात अजूनही प्रलंबित आहे व नजीकच्या किंवा दूरच्या भविष्यकाळात न्यायालय निर्णय देण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे आहे हीच परिस्थिती अजून बरीच वर्षे कायम राहील. न्यायालयाने निकाल द्यायचे ठरविले तरी १९६० ची परिस्थिती आता ५७ वर्षांनंतर बदलली असल्याने न्यायालय जुना निर्णय फिरविण्याची शक्यता अत्यल्प आहे. न्यायालय जैसे थे परिस्थितीच चालू ठेवावी असाच निर्णय देण्याची दाट शक्यता आहे. फारतर न्यायालय स्वतः निर्णय न घेता निर्णयाचा चेंडू केंद्र सरकारच्या हातात टोलवून केंद्रालाच अंतिम निर्णय घ्यायला सांगतील. कोणतेही केंद्र सरकार आहे ती घडी विस्कटण्याची किंवा बेळगाव महाराष्ट्राला देण्याचा निर्णय घेऊन कानडी नागरिकांचा रोष ओढवून घेण्याची तसेच प्रशासकीय गोंधळ निर्माण करण्याची सुतराम शक्यता नाही. अगदी मराठी माणूस पंतप्रधान झाला तरी बेळगाव महाराष्ट्रात परत येणे अशक्य आहे.

बेळगाव कर्नाटकात असल्याने महाराष्ट्रातील इतर नागरिकांना फारसा फरक पडलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु बेळगाव कर्नाटकातून गेले तर कानडी नागरिकांचा रोष होईल व त्यावेळी जे सरकार राज्यात/केंद्रात असेल त्यांना त्याचा फटका बसेल. म्हणूनच कोणत्याही पक्षाचे सरकार महाराष्ट्रात/केंद्रात आले व अगदी मराठी, मराठी म्हणून नाचणार्‍या शिवसेनेचा पंतप्रधान व मुख्यमंत्री झाला तरी आहे त्या परिस्थितीत बदल होणार नाही.

हतोळकरांचा प्रसाद's picture

13 Jul 2017 - 3:49 pm | हतोळकरांचा प्रसाद

हे माहित असताना उगाच मोठी वक्तव्ये करून लोकांना आशा लावायच्या कशाला हा मुद्दा आहे आणि त्यात सगळे एका माळेचे मणी आहेत!

श्रीगुरुजी's picture

13 Jul 2017 - 8:54 pm | श्रीगुरुजी

कदाचित त्यांनाही वास्तविकता समजत नसेल किंवा समजून घ्यायची नसेल किंवा मराठी माणसांनी हा मुद्दा इतका भावनिक बनवून ठेवला आहे की बेळगाव आता परत महाराष्ट्रात येणे अशक्य आहे हे समजून घ्यायची इच्छा नसेल. म्हणून अशी वक्तव्ये येत असावीत.

अद्द्या's picture

13 Jul 2017 - 10:44 am | अद्द्या

एकुणात महाराष्ट्राची हालत बघता नकोच ते . त्यापेक्षा केंद्रशासित करा ..

विजुभाऊ's picture

13 Jul 2017 - 12:12 am | विजुभाऊ

शेवटचा मराठी माणूस जिवंत असेपर्यंत बेळगावचा लढा सुरु राहील

म्हणजे तोपर्यन्त प्रश्न सुटणारच नाही याची खात्री आहे म्हणा की

रश्मिन's picture

13 Jul 2017 - 10:01 am | रश्मिन

विजुभौंनी एक वास्तव अधोरेखित केले आहे. आपल्या देशात एका मोठ्या राज्याचे दोन भाग झालेले आहेत (बहुतेक भाजप प्रणित राज्यांमध्ये) मात्र एखाद्या राज्याचा भाग विलग होऊन दुसऱ्या राज्याला जोडला जाणे हे अशक्यप्राय आहे असे वाटते.जाणकारांनी प्रकाश टाकावा ( किंवा उजेड पाडावा ! )

सुज्ञ's picture

13 Jul 2017 - 9:56 am | सुज्ञ

प्रसाद सर . आपणच खरे शिवसैनिक.

स्वगत : च्यायला जमाना सारक्याजम चा आहे तर

हतोळकरांचा प्रसाद's picture

13 Jul 2017 - 12:01 pm | हतोळकरांचा प्रसाद

मी शिवसैनिक नाही भक्त नाही कि खांग्रेसी नाही (सारक्याजम का काय)! जे आहे ते बोलावं ना! उगीच काहींच्या काही गोष्टींचं क्रेडिट भाजपला देण्याच्या उपद्वव्यापामुळे भाजपने केलेल्या खऱ्या चान्गल्या गोष्टींवर सुद्धा पाणी फिरायला लागते बऱ्याच वेळेस! शिवसेनेच्या सद्याच्या बऱ्याच गोष्टी न पटण्याजोग्या आणि आडमुठ्या भूमिकेतून असल्याचं दिसत राहतं आणि ते स्पष्ट आहे. पण म्हणून लगेच शिवसेनेने ५१ वर्षात काय केले असा प्रश्न मला तरी पडत नाही. प्रत्येक पक्षाने त्यांच्या राजकारणाची एक दिशा आणि धोरण ठरवलेले आहे आणि हे गेले कित्येक वर्षांपासून आहे. सगळ्याच पक्षांची धोरणे आणि राजकारण शेवटी फोडाफोडी ह्या एकमेव तत्वावर आधारलेले बऱ्याच वेळेस दिसते. म्हणून तो एक धागा पकडून एखाद्याच पक्षाला बडवणे मला पटत नाही. बाकी आपण सुज्ञ आहातच!

हतोळकरांचा प्रसाद's picture

13 Jul 2017 - 12:01 pm | हतोळकरांचा प्रसाद

मी शिवसैनिक नाही भक्त नाही कि खांग्रेसी नाही (सारक्याजम का काय)! जे आहे ते बोलावं ना! उगीच काहींच्या काही गोष्टींचं क्रेडिट भाजपला देण्याच्या उपद्वव्यापामुळे भाजपने केलेल्या खऱ्या चान्गल्या गोष्टींवर सुद्धा पाणी फिरायला लागते बऱ्याच वेळेस! शिवसेनेच्या सद्याच्या बऱ्याच गोष्टी न पटण्याजोग्या आणि आडमुठ्या भूमिकेतून असल्याचं दिसत राहतं आणि ते स्पष्ट आहे. पण म्हणून लगेच शिवसेनेने ५१ वर्षात काय केले असा प्रश्न मला तरी पडत नाही. प्रत्येक पक्षाने त्यांच्या राजकारणाची एक दिशा आणि धोरण ठरवलेले आहे आणि हे गेले कित्येक वर्षांपासून आहे. सगळ्याच पक्षांची धोरणे आणि राजकारण शेवटी फोडाफोडी ह्या एकमेव तत्वावर आधारलेले बऱ्याच वेळेस दिसते. म्हणून तो एक धागा पकडून एखाद्याच पक्षाला बडवणे मला पटत नाही. बाकी आपण सुज्ञ आहातच!

सुज्ञ's picture

13 Jul 2017 - 12:45 pm | सुज्ञ

"सगळ्याच पक्षांची धोरणे आणि राजकारण शेवटी फोडाफोडी ह्या एकमेव तत्वावर आधारलेले बऱ्याच वेळेस दिसते."

फोडाफोडी म्हणजे ?

हतोळकरांचा प्रसाद's picture

13 Jul 2017 - 1:45 pm | हतोळकरांचा प्रसाद

विभागणे या अर्थाने, किंवा लौकिकार्थाने "पोलरायझेशन".

प्रत्येक पक्षाने त्यांच्या राजकारणाची एक दिशा आणि धोरण ठरवलेले आहे

सेनेची आनि भाजपची दिशा आणि धोरणे बरेच वेळा बदलली आहेत. ती ही १८० अंशातून उदा : गांधीविरोधापासून ते गांधीवादी समाजवादापर्यन्त आणि त्या नंतर स्वदेशी पासून ग्लोबल इंडिया पर्यन्त.
सेनेची दिशा आणि धोरणे गुप्त ठेवलेली आसावीत ती नक्की काय आहेत हे मिलिंद आणि उधोजीच जाणोत. सेनेने वसंत सेना या पासुन सुरू करून लुंगी हटाव पुंगी बजाव , मराठी माणसाचा आवाज पासून मी मुंबईकर . हिंदुत्व हे नाणे अचानक कधीतरीच काढत असतात.
रच्याकने सेनेची दिशा आणि धोरणे नक्की काय आहेत हे इथे सांगाल का प्रसाद भाऊ/ताई?

हतोळकरांचा प्रसाद's picture

14 Jul 2017 - 12:02 pm | हतोळकरांचा प्रसाद

तुम्ही धोरणे आणि विषय यात गल्लत करत आहात असे मला वाटते. अशा काही विषयांवर १८० अंशात वळणे हि सर्व राजकीय पक्षांची खोड आहे. भाजप शिवसेनेने हिंदुत्व सोडून सेकुलर धोरण घेतले नाही किंवा विरुधार्थने काँग्रेसने नसे काही केले नाही या अर्थाने माझे म्हणणे होते.

रामदास२९'s picture

13 Jul 2017 - 12:28 pm | रामदास२९

शिवसेना आणि भाजपा आपापसात भान्डत बसून ऑवैसी साठी महाराष्ट खुला करत आहेत असा वाटत नाही का?

सतीश कुडतरकर's picture

13 Jul 2017 - 1:02 pm | सतीश कुडतरकर

शिवसेना आणि भाजप ला हिंदू मतांच्या ध्रुवीकरणासाठी ओवेसीची गरज आहे आणि ओवेसीला मुस्लिम मतांसाठी.
आधी हेच काम अबू आझमी करायचा. आणि त्याच अबू आझमीला शिवसेना-भाजपच्या संयुक्त सत्तेने मुंबई महानगरपालिकेत मांडीवर बसवून भागीदार करून घेतला होता.

श्रीगुरुजी's picture

13 Jul 2017 - 2:59 pm | श्रीगुरुजी

ओवैसी आणि अबू आझमी हे दोघेही नगण्य आहेत. महाराष्ट्रात किंवा इतरत्रही त्यांच्यामुळे अत्यल्प फरक पडेल.

सतीश कुडतरकर's picture

13 Jul 2017 - 12:59 pm | सतीश कुडतरकर

अडवाणी आणि चेले आग लाऊन स्वतः कडीकुलुप घालून घरात लपून बसले आणि आता विचारतायत कोणी काय केले.

मराठी_माणूस's picture

13 Jul 2017 - 2:30 pm | मराठी_माणूस

कोणाचही सरकार असेना , अतिशय पारदर्शी (?) व्यवहार असलेला टोल मात्र बिनबोभाट चालु रहातो.

धर्मराजमुटके's picture

13 Jul 2017 - 2:57 pm | धर्मराजमुटके

खुप छान धागा ! अतिशय मौलिक माहिती मिळाली. अगदी मिपाच्या (हल्लीच्या) परंपरेस साजेशी. साहित्य प्रकाराच्या टॅब अंतर्गत चिखलफेक / धुळवड / लठ्ठालठ्ठी यासारख्या एखाद्या नावाने एखादे सदर चालु करावे अशी संपादकांना नम्र विनंती !

વિજુભાઈ, નાટક, સિનેમા પર કાંઈ લખો ! આ શું લઈને બેઠા છો ?

विजुभाऊ's picture

13 Jul 2017 - 6:13 pm | विजुभाऊ

नक्की

वरुण मोहिते's picture

13 Jul 2017 - 3:10 pm | वरुण मोहिते

ह्याशिवाय ह्या धाग्याला काडीमात्र महत्व नाही .

अभ्या..'s picture

13 Jul 2017 - 3:21 pm | अभ्या..

त्यात नवल काय?
कधी पंढरीची वारी, कधी शिवसेना असले विषय घेऊन काड्या टाकायच्या, अशी ना तशी भाजप्यांना असलेली सेनेची गरज संपलीय, मग ऑटोमेटीक सेनाद्वेषाच्या ओकार्‍या सुरु होतात. ह्या माहीतीतून धागालेखक काय दिवे लावणारेत तेही माहीते अन प्रतिसादक काय लिहिणारेत तेही पाठ झालेय अगदी.
.
तिळगुळ घ्या, गोड बोला अन तुमची* तिकडेच घाला.
.
.
.
*पुचाट करमणूक

दिवे लावणे वगैरे लिहून कृपया वैयक्तीक पातळीवर घसरू नये ही विनंती.
सेनेने काय केले हे कोणीच सांगितले नाही. अर्थात जिथे मुद्दलातच काही नाही तेथे काही सांगण्यासाअरखे मिळेल असे असणार नाही हे सिद्धच झाले.
तुम्ही सुसंस्कृत आहात. तुमच्या प्रतिसादातील गलीच्छ भाषेबद्दल काही बोलावे इतकीही त्याची दखल घ्यावी असे वाटत नाही. दुर्लक्श्य हाच एकमेव प्रतिसाद.

श्रीगुरुजी's picture

13 Jul 2017 - 6:27 pm | श्रीगुरुजी

>>> सेनेने काय केले हे कोणीच सांगितले नाही. अर्थात जिथे मुद्दलातच काही नाही तेथे काही सांगण्यासाअरखे मिळेल असे असणार नाही हे सिद्धच झाले.

+ १

सौन्दर्य's picture

14 Jul 2017 - 12:16 am | सौन्दर्य

मी वर लिहिल्याप्रमाणे पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो की १९८० च्या दशकात शिवसेनेने 'स्थानीय लोकाधिकार समिती'द्वारे हजारो स्थानीय तरुणांना रोजगार मिळवून दिला होता. बहुसंख्य सरकारी आस्थापनांना स्थानीय तरुणांना नोकरी देण्यास भाग पाडले होते. ८०% नोकऱ्या स्थानीय लोकांना मिळाल्या पाहिजेत हा आग्रह शिवसेनेने धरला होता आणि तो पूर्ण पण केला.

त्या काळातील सेनेच्या शक्तीमुळे मुंबईतील पर प्रांतीय, स्थानिक लोकांना थोडे वचकूनच होते. मराठी माणसाला (घाबरून का होईना) थोडाफार मान मिळायला लागला होता.

'स्थानिक मराठी माणूसाचे भले' ह्या तत्वापासून त्यांनी हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला तरी मराठी माणूस शिवसेनेला धरून होता. मात्र ज्या क्षणी शिवसेनेने मराठी माणूस सोडून इतर लोकांना जवळ करायला सुरवात केली त्याच वेळी शिवसेनेची विश्वासहर्तता उतरणीस लागली. शिवसेनेची झुणका-भाकर केंद्रे, वडापावाच्या गाड्या, एस टी डी/पिसिओ बुथ्स , हे साउथ इंडियन, उत्तर प्रदेशीय मंडळी चालवायला लागली आणि लोकांचा शिवसेनेवरचा विश्वास कमी होऊ लागला.

श्रीगुरुजी's picture

14 Jul 2017 - 2:52 pm | श्रीगुरुजी

स्थानीय लोकाधिकार समिती किंवा १९९३ च्या दंगलीत काही लोकांना सेनेने बदडून काढलं ही मोठी कामे आहेत हे क्षणभर गृहीत धरलं तरी या व्यतिरिक्त ५१ वर्षात त्यांनी अजून काही केलं आहे का? या दोन तथाकथित 'मोठ्या' कामांचा त्यांना कामाच्या तुलनेत कितीतरी प्रचंड मोबदला मिळालेला आहे. १९९३ नंतर मागील २४ वर्षात त्यांनी काही केले आहे का?

कोणत्याही पक्षाचे भवितव्य तो पक्ष सध्या काय करतो व भविष्यासाठी त्याच्या काय योजना आहेत यावर अवलंबून असते. कॉंग्रेस २०१७ सालातही दांडी यात्रा, चलेजाव चळवळ इ. पुढे जातच नाही. सेनेकडे वर्तमानकाळासाठी व भविष्यासाठी कोणत्या योजना आहेत? सेनेची आर्थिक धोरणे काय आहेत? शेती, उद्योगधंदे इ. च्या विकासासाठी त्यांच्याकडे काही योजना आहेत का? सेनेकडे स्वत:चे आर्थिक, सामाजिक, राजकीय, उद्योग, शिक्षण इ. साठी धोरण असल्याचे आजवर दिसलेले नाही. कोथळा, तलवार, खंजीर, भाला, थडगं, आदिलशहा, शाहिस्तेखान इ. व्यतिरिक्त त्यांच्याकडे सांगण्यासारखे काय आहे? यांचे शेती धोरण म्हणजे कर्जमाफी. त्यापलिकडे यांना काहीही माहिती नाही. १९८५ पूर्वी सेनेला मुंबई-ठाण्याच्या बाहेर सेनेला फारसे कोणी ओळखत नव्हते. भाजपशी युती झाल्यामुळे सेना मुंबई-ठाण्याच्या बाहेर लोकांना माहिती झाली. भाजपने तळागाळात आपला विस्तार केला, परंतु त्याचा सर्वाधिक फायदा सेनेला झाला. युतीचे यश हे आपल्यामुळेच आहे या भ्रमात सेना अजूनही वावरत आहे. सेना कोणत्या विकासकामांमुळे, नवीन विचारांमुळे किंवा एखादे मोठे काम केल्यामुळे ओळखली जात नसून राडा, तोडफोड, कोणाच्यातरी प्रतिमेला चपलेने बडवणे, कोणाचे तरी पुतळे जाळणे, ह्याला झापडला, त्याला सटकावला, ठाकरी भाषा या पलिकडे सेनेची ओळख नाही. सेना हे नाव काढल्यावर पोकळ फुशारक्या, अर्वाच्य भाषा, उर्मटपणा, मूर्खपणा याशिवाय दुसरे काही डोळ्यांसमोर येतच नाही.

<<<<कोणत्याही पक्षाचे भवितव्य तो पक्ष सध्या काय करतो व भविष्यासाठी त्याच्या काय योजना आहेत यावर अवलंबून असते.>>>

==> प्रचंड सहमत.
अशा काही योजना शिवसेनेकडे असाव्यात याबद्दल शंका आहे. शाखा पातळीवर सामान्य जनतेची चुटुरफुटूर कामे करण्यात शिवसैनिक सगळ्यांपेक्षा आघाडीवर असतात तेवढीच काही जमेची बाजू.

<<<कॉंग्रेस २०१७ सालातही दांडी यात्रा, चलेजाव चळवळ इ. पुढे जातच नाही.>>>
==>> ये थोडा लंबा फेका. हजम नही हुआ.
दुसऱ्याच्या (काँग्रेसच्या) योजना ढापण्यात भाजपचा हात कोणताच पक्ष धरू शकत नाही. भाजप वाले अजून गोरक्षा/गोप्रेम (गाय रडली आणि परत आली नाही), योगिक शेती, पूर्वज विमान उडवत होते, वगैरे वगैरे च्या पुढे गेले नाहीत.

बाकी बहुतांश प्रतिसादाशी सहमत.

राजाभाऊ's picture

13 Jul 2017 - 7:15 pm | राजाभाऊ

>>सेनेने काय केले हे कोणीच सांगितले नाही.

सांगायला कशाला हवं? तुम्ही मुंबईतच रहाता ना? गेल्या दोन वर्षांमध्ये तुमच्या चष्म्यावर चढलेली सेना द्वेशाची पुटं/जळमटं झटकलीत तर चित्र स्पष्ट दिसेल. नव्वदिच्या दशकात सत्तेवर असुनहि सेनेने काहिच केलं नाहि हे तुमचं मत असेल तर समजुन घेण्याच्या मनःस्थितीत तुम्ही नाहि आहात असं गृहित धरायला वाव आहे.

बाळासाहेब गेल्यावर सेना नेतृत्वात पोकळी निर्माण झालेली आहे याबद्दल शंका नाहि. पण याचा अर्थ असा निघत नाहि कि सेनेने गेली ५० वर्ष काहिच केलं नाहि. शेवटी काय, तर वक्त वक्त कि बात है. आज मंत्री झालेले बिजेपीचे आमदार काल पर्यंत शाखाप्रमुखांचे पाय चाटतानाचे चित्र अजुन लक्षात आहे. आणि इथे एका बाजुने भक्त सेनेवरची भडास काढत असताना तिकडे शहा/मोदिंना अजुनहि मातोश्रीला भेट द्याविशी वाटते यातच सर्व काहि आलं... ;)

बाय्दवे, शिवसैनिक ९३ च्या बाँब्स्फोट साखळी (मार्च '९३) नंतर ताकदिनिशी रस्त्यावर उतरला होता. भेंडिबाजार जवळच्या एका पोलिस इमारतीतल्या रहिवाश्यांच्या सुटके व्यतिरिक्त समाजकंटकांना जबरदस्त चोप देण्याचं काम त्यांनी केलं होतं. गंमतीची बाब म्हणजे एरव्हि आपत्कालात मदतीसाठी धाउन जाणारे हाफ चड्डीवाले त्यादिवशी नेमके कुठल्याशा बिळात घाबरुन दडले होते. मेहता मेहल, चर्नी रोडवर माझं ऑफिस त्यावेळी अस्ल्याने हा सगळा आँखोदेखा हाल आहे, गुगल करुन सिलेक्टीव माहिती दिलेली नाहि... :)

श्रीगुरुजी's picture

13 Jul 2017 - 8:51 pm | श्रीगुरुजी

भेंडिबाजार जवळच्या एका पोलिस इमारतीतल्या रहिवाश्यांच्या सुटके व्यतिरिक्त समाजकंटकांना जबरदस्त चोप देण्याचं काम त्यांनी केलं होतं.

चला, सेनेने ५१ वर्षात केलेले १ काम सापडलं. अजून अशी काही कामे आहेत का?

एकुलता एक डॉन's picture

13 Jul 2017 - 9:13 pm | एकुलता एक डॉन

हि २ कामे होतात

श्रीगुरुजी's picture

13 Jul 2017 - 10:30 pm | श्रीगुरुजी

LOL

विशुमित's picture

14 Jul 2017 - 1:49 pm | विशुमित

शिवसेनेचे हे तिसरं काम--

http://www.loksatta.com/maharashtra-news/sewer-cleaning-by-shiv-sena-cor...

स्वच्छ भारत सेस घेऊन काय स्वच्छतेची काम करतात हे कोणत्या वर्षा पासून जनतेला समजणार?

सुसंस्कृत तर आहोतच पण आमची संस्कृती हिच सर्वश्रेष्ठ आणि बाकी चिल्लर असला नीचपणा नाहीये अंगात.
राहता राहिला वैयक्तिक पातळीचा भाग तर काय गरज आहे सेनेने आजपर्यंत काय केले ह्याचा आढावा असा सार्वजनिक संस्थळावर घ्यायचा? वैयक्तिक मत बनवणार असाल तर आजपर्यंत इतके धागे आलेले आहेत, इतकी आगपाखड झालेली आहे, सेनेचे नाव घेताच फसफसणारे आकडेमोडतज्ञ मिपावर आहेत ही वस्तुस्थिती आपणासारख्या ज्येष्ठ्श्रेष्ठ सदस्याला माहीत नसावी ह्याचे नवल आहे. बरं ह्यापेक्षा आपण काही विषयाचा अभ्यास केलेला किंवा रस असावा/ दिसावा म्हणले तर तेथेही दिवाच आहे. आता हे पाहा
शिवसेना हा तसा पहायला गेले तर एक छोटा राजकीय पक्ष.
राष्ट्रीय पातळीवर छोटाच आहे पण राज्यपातळीवर सत्तेत बसलेला, प्रथम क्रमांकाच्या पक्षापेक्षा थोडीशी कमी मते मिळालेला, कित्येक वर्षे सत्ताधारी पक्षाशी लढणारा पक्ष आहे. टोटल संसदेत नगण्य असला तरी इतर प्रादेशिक पक्षांपेक्षा बरीचसे सातत्य ठेवून लोकप्रतिनिधी निवडून आणण्याची ताकद असलेला पक्ष आहे.
छोटा म्हणायचे कारण की या पक्षाने मुंबई , नाशीक, ठाणे या पलीकडे कुठे काही फारसे केल्याचे वाचल्याचे आठवत नाही.
दुसरे अज्ञानी विधान, जरा आमदारांची लिस्ट काढून पहा, कोकण, मराठवाडा, विदर्भ प. महाराष्ट्रात देखील सेनेचे आमदार आहेत आणि कित्येक जण १५ वर्षाहूनही अधिक वर्षे कट्टरपणे सेनेशी एकनिष्ठ आहेत.
सेनेने महारष्ट्रातील लोकाम्साठी नक्की काय केले ते खरेच अभ्यासायला हवे.
अवश्य. पण चष्मा चढवून आणि आधीच वर्तूळ काढून बाण मारणे नको.
एके काळी मराठी चा जयघोष करणारी सेना घुमजाव करत एकाएकी हिंदुत्ववादी कशी झाली याची कारणे कधीच बाहेर आली नाहीत.
इतके वर्षे हिंदुत्वाचा जयघोष करुन वेळोवेळी प्रातःस्मरणीयांची यादी अपडेट करुन आता विकासाचा अजेंडा मिरवण्यामागील कारणे तशीच बाहेर येत नसतात.
तरीही लोकाना खास करुन तरुणाना; सेनेचे आकर्षण होते कारण बाळासाहेबांची भाषण करण्याची हातोटी.
असणारच.
मुंबईत एकेकाळी गिरणी कामगारांच्या बळावर वाढलेल्या सेनेने दत्ता सामंतांच्या संपाच्या वेळेस काय भुमीका घेतली होती हे कोणाला आठवणार नाही.पुण्यात गाजलेल्या टेल्को सम्पाच्या वेळेस देखील सेना कुठेही चर्चेतही नव्हती.
संबंधही नाही, नुसती पुणे मुंबई आणि गिरण्या म्हणजे आक्खा महाराष्ट्र नव्हे.
सेना खरी चर्चेत आली ती सेनेकडे मुंबईचे महपौर पद आल्या नंतर.
अर्थात. स्थानिक राजकारणात जनतेची काय अपेक्षा असते ते जनतेने दाखवून दिले.
बाबरी मशीद प्रकरणात कोणतीही जबाबदारी न घेणार्‍या भाजप पेक्शा बाळासाहेबानी " हो शिवसेनैकीनी हे केले असल्यास मला त्याचा अभिमान आहे" अशी घोषणा केली त्या घोषणेला लोक त्यांचा खरेपणा समजले. नंतर सेनेच्या या रोखठोकपणाचे लोकाना अधीकच आकर्षण वाटू लागले.
असतेच. विटा आणि कमंडलूसाठी कोण हिंडले हो आधी? प्रस्तावित रामंदिराची चित्रे हेडगेवारांची जन्मशताब्दीचे मुहूर्त साधून कोणी पोहोचवली? राम ह्या विषयावरील बहुतांशी हिंदूची जुळलेली नाळ कोणी राजकारणात एनकॅश केली?
त्यातूनच सेना विधानसभेत सत्ताधारी झाली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक अपेक्षीत पण वेगळा प्रवाह सुरू झाला.
त्याच्या आधीपासून सेनेचे बोर्ड अगदी गावोगावी होते, शाखाही अन कार्यकर्तेही.
सेने बद्दल बरीच चर्चा होते. त्यानी ग्रामीण भागात शाळा, पतसंस्था , कॉलेज , रोजगार या साठी काहीच केले नाही.
याबद्दलही काही विचारायचे नाही.

अंदाजपंचे विधान, आपणास इंटरेस्ट असेल तर या एक्दा मराठवाड्यात अथवा प. महाराष्ट्रात. दाखवेन कित्येक संस्था. आता वेबवरील बातम्या अन लिंका ह्यावरच विश्वास ठेवून पूर्वग्रहाला मुंबईत बसून कुरवाळयाचे असेल तर नाईलाज आहे.
लखोबा लोखंडे , नारोबा , खंडोजी खोपडा वगैरे घणाघाती दुषणांवर जनता त्यातील मनोरंजकतेमुळे खुष असायची.
प्रोब्लेम काये? ह्यापेक्षा जहाल उपमा वापरल्या गेल्या आहेत.
सध्याच्या फडणवीस सरकारात सेनेची काय भुमीका आहे ते जगजाहीर आहे.
शिवसेनेबद्दल समर्थनार्थ एक गोष्ट मात्र वारंवार सांगितली जाते की १९९२ च्या मुंबई दंगलीच्या वेळेस सेना नसती तर मुंबई वाचली नसती.
शिवसेना होती म्हणून आपण आज मुंबईत आहोत.

जे सांगतात त्यांना विचारायचे. इथे दंगलीत सापडलेले कुणी आहेत का?
हे ऐकल्यावर एक विचार मनात येतो की त्या वेळेस मुंबईत मुंबै पोलीस , निमलश्करी दले, काही भागात लक्शर तैनात केले होते. हे सगळे असतानाही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती आणि शिवसेना या सर्वांपेक्शा प्रबळ होती,
राज्य राखीव पोलीस दल ही त्यावेळेस तैनात होते. मग त्यांचे जवान हे त्यावेळेस काय केळी खात बसले होती की काय अशी शंका येते.या वेळेस शिवसेने ने नक्की असे काय केले की जे पोलीस दल , निमलष्करी दले आणि भारतीय सेना याना जमत नव्हते?
एखादा राजकीय पक्ष हा राज्य पोलीसदल , सैन्य दल यांच्या पेक्षाही प्रबळ ठरतो याला कोणते लक्षण मानायचे.

तत्कालीन राज्यकर्त्यांचे धोरण आणि अशा इमर्जन्सीत घडलेल्या तो घटनांचा परिपाक आहे. सेना अथवा पुलीस हे हुकुमाचे ताबेदार असतात. सेनेच्या कार्यकर्त्यांचा लोकल लेव्हलवर चांगला जनसंपर्क असल्याने त्यांनी काय भुमिका घेतली होती, त्याकाळात अ‍ॅक्चुअली काय घडले ह्याचे बरेचसे अहवाल वगैरे प्रकाशित आहेत, त्याची लिंक पण दिलेली आहे त्याचा अभ्यास करावा अथवा स्वतः एखादा अहवाल बनवावा.
मला यात कोणत्याही राजकीय पक्षाची भलामण करायची नाही मात्र केवळ जाणून घ्यायचे आहे.
१९९२ च्या दंगलीत सेनेने असे काय केले की त्यामुळे मुंबई जे पोलीस दले, निमलक्षरी दले , राज्य राखीव सुरक्शा दले याना त्यांच्या हत्यारांसहीतही वाचवणे जमत नव्हते आणि सेनेने ते करुन दाखवले

वरील सेम उत्तर.
( हे उघडपणे मुंबईत कोणाला विचारायचे माझे धाडस नाही. म्हणुन इथे विचारतोय )
का हो? सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर दाखल गुन्ह्याची जितकी सरासरी असते तितकीच सेनेच्या नावावर पण असणार आहे.
केवळ गुंडाचा पक्ष हिच टिका असेल तर महाराष्ट्रातील जनतेने आजपर्यंत इतके आमदार खासदार निवडूनच दिले नसते. त्यामुळे मुंबईत जाऊन उघडपणे बिनधास्त विचारा. जास्तीत जास्त काय होईल? वेडा म्हणतील. ह्यापेक्षा काही नाही. उंच ग्यालरीत बसून कुत्र्यांना छू करुन भुंकवून वैचारीक श्रीमंती दाखवणार्‍यानी असल्यांची पत्रास कशाला बाळगायची?
.
...............
आता बघा पटते का ते.
केवळ पुणे मुंबई ठाणे इतकेच राजकारण माहीत असणार्‍यांनी सेनेच्या नावाने खडे फोडू नयेत. गिरणी कामगारांची आता कदाचित दुसरी तिसरी पिढी तरुण असेल. त्याकाळच्या राजकारणांचे संदर्भ आता उगाळून शिळ्या कढीला उत आणणे आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचे लेबल लावणे चूक आहे. अगदी माझ्या गावात सुद्घा वर्षानुवर्षे शिवसेनेचे राजकारण करणारे आमदार खासदार मी पाहतोय ते गिरणीकामगारांवर नव्हे तर लोकल प्रश्नांवर वेळोवेळी दिलेला लढा आणि प्रभावी जनसंपर्क ह्यावर निवडून आलेले आहेत. जनता ही स्त्रीसारखी असते म्हणतात. तिला शेपूट घालणारा अन वैचारिक काथ्याकूट करणारा नेता नको असतो. तिच्या प्रॉब्लेम्सना समजून, सामोरे जाऊन, काहीही करुन सोडवणारा नेता हवा असतो. साधे परवाचेच उदाहरण घ्या. गावात डुकरांचा प्रचंड त्रास झाला. लहान मुलांना पण हि डुकरे चावू लागली. निवेदने देऊन, मोर्चे काढूनही प्रशासन ढिम्म. सेनेच्या एकाने उचलले डुकराचे पिलू अन ठेवले आयुक्ताच्या केबिनात. तीन दिवसात जवळपास सर्व डुकरे पक्डली गेली. पिल्लू सोडणार्‍यांनी केसेस घेतल्या अंगावर पण मार्गी तर लागला ना प्रश्न. किती दिवस कागदी घोडे नाचवणार?
आता अशा आंदोलनांचा विषय म्हणाल तर लहानपणापासून माझ्या जिल्ह्यात अन शेजारील चार पाच जिल्ह्यात शहरी जनतेसोबत, शेतकरी, कामगार अशा अनेक आंदोलनात मी सेनेचे नाव ऐकतोय. पाहतोय. आणि आम्ही मुंबईपासून चारपाचशे कीमी तरी दूर आहोत. मग सेनेने मुंबई दंगलीत काय केले हा प्रश्न जितका फिजूल आहे तितकाच मंदीर आंदोलनात इतर पक्षांनी काय केले हा प्रश्न.
अगदी भाजपाचे उदो उदो चालू असले तरी राजकारणात सुरुवात शेटजी भटजींचा पक्ष म्हणूनच हिणवला गेला होता आणि ते संबोधन खरे असावे अशीच वाटचाल होती. मराठवाड्यातील कार्यकर्त्यांचे मोहोळ असणारा मुंडेसाहेब सोडले तर दुसरा नेता सांगा. मुंडेसाहेबांचे राजकारण ही सेनेला जवळपास जाणारेच होते. ग्रामीण पार्श्वभुमीमुळे त्यांना महाराष्ट्रातील शेतकरी अन ग्रामीण जनतेच्या प्रश्नांची जाण होती. स्व. महाजन साहेबांनी व त्यांनी सेनेशी नाळ जोडली. हिंदुत्व ह्या एकाच मुद्द्यावर ही युती झालेली होती. तेंव्हाची जनता ही बहुसंख्य हिंदूंचे प्रश्न व अन्यधर्मीयांचे लांगूलचालन अशा तत्कालीन राजकीय धोरणांना कंटाळून युतीच्या मागे उभी राहीली. त्याकाळातही भाजपाकडे कार्यकर्त्यांची वानवाच असायची, ते पुरवले सेनेने. राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अरेरावीला तसेच उत्तर द्यायची ताकद सेनेकडे होती. नुसता भाजपा कदापिहि ग्रामीण भागात उभा राहू शकला नसता. कित्येक भाग तर असे आहेत की ह्या ५-१० वर्षात भाजपा गावात नसायचा. फक्त माहीत असायचा. अर्थात आपले काम साधले की शिव्या देत देत पध्दतेशीरपणे मदत करणार्‍यांना विसरायचे हा टिपिकल भाजपी खाक्या आता दिसून येतोय. अगदी बलराज मधोकांपासून आडवाणींजीपर्यंत जे झाले ते आता सेनेबाबतीत होतेय. गोध्रा प्रकरणापासून मोदीकार्ड चालू शकेल हा अंदाज आला की बाकी सगळ्या गोष्टी विसरुन राजधर्म पाळता न येणार्‍या मोदींना लॉन्च केले गेले. आता विकास अन आक्रमक धोरणांचे जनता स्वागत करतीय ते केवळ हा माणूस आपले प्रश्न सोडवू शकेल, आपली प्रगती घडवू शकेल ह्या विश्वासाने. ह्यात भाजपाच्या धोरणांचा अन पक्षाचा विजय आहे असे समजण्यात गल्लत करु नये. इंदिरा इज इंडीयाला कसे प्रजेने शिस्तीत रस्ते दाखवले हेही विसरु नये.
आता विचारसरणीबाबत म्हणले तर मी शिवसैनिक नाही की दुसर्‍या कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता. पण युजअ‍ॅन्डथ्रोची जी पॉलीसी अत्यंत गलिच्छ पणे राबवली जातीय अन ती कशी योग्यच आहे याचा उदोउदो करुन विरोधी विचारसरणी नसतानाही एकेकाळी गळ्यात गळे घालणार्‍या मित्रपक्षांना आता गरज संपली की असे झोडपले जाते त्याचा राग येतो. ह्या पॉलीसीला सपोर्टिंग ही जी सामूहिक हननाची मोहीम राबवली जातीय ती अत्यंत गलिच्छ आहे. स्वतं:ला माहीत असलेले तेवढे पूर्णसत्य असे मानणार्‍या विद्वानांकडून जी एकतर्फी आकडेवारी सादर करुन ह्या विचारसरणीला आंतरजालावर पसरवण्याच्या पध्दतीला गोबेल्सनीतीशिवाय दुसरी उपमा नाही. इतका द्वेष अन त्रास असेल तर सरळ सरळ काडीमोड घेऊन मोकळे व्हावे. सेना काय जबरदस्ती घुसणार नाहीये. पण एका घरात राहून संसाराचे वाटोळे गावभर करणार्‍याला गावाकडे काय म्हणतात ते वेगळे सांगणे नको.