✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

BS - III गाड्यांवर भरपूर सवलती!

श
शब्दबम्बाळ यांनी
गुरुवार, 03/30/2017 - 18:52  ·  लेख
लेख
आत्तापर्यंत सगळ्यांना माहिती झालंच असेल कि BS - III असणाऱ्या सगळ्या गाड्यांच्या विक्रीवर आणि नोंदणीवर सर्वोच्च न्यायालयाने १ एप्रिल पासून बंदी घातली आहे. त्यामुळे वाहन क्षेत्राला भरपूर तोटा होण्याचे दिसत आहे पण हा तोटा सामान्य ग्राहकाला फायदा मिळवून देऊ शकतो. आता बऱ्याच वाहन विक्रेत्यांनी आपल्या गाड्या लवकरात लवकर विकल्या जाव्यात म्हणून अगदी १५ हजारांपासून ते २५ हजारांपर्यंत सवलत दिलेली आहे!! होंडा नवी सारखी गाडी जिचा खप आधीच कमी आहे तिच्यावर २५हजारापर्यंत सूट आहे! म्हणजे जवळपास अर्ध्या किमतीला गाडी मिळू शकते. पण अशा गाड्या घेतल्याने भविष्यात काही तोटा आहे का? तसेच कुठे किती सवलत आहे हे पण इथे सांगावे म्हणजे खरेदी करणाऱ्याला फायदा उठवता येईल. होंडाकडून ‘बंपर’ ऑफर; BS-III प्रकारातील वाहनांवरील बंदीनंतर मोठी सवलत
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
बातमी

प्रतिक्रिया द्या
22743 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

मिपावर राहायचं असेल तर मिपावर

मोदक
Tue, 04/04/2017 - 11:18 नवीन
मिपावर राहायचं असेल तर मिपावर जेष्ठ झालेल्या, अभ्यासू, भाजप समर्थक आणि संपादकांच्या धोतरास हात घालायचा नाही, असा अलिखित नियम वगैरे आणला आहे का? हा नियम मिपावर आहे असे का वाटले म्हणे..? अशी हवेतली विधाने / आरोप करून सुशिक्षीत (पण अडाणी) युवकांची डोकी फिरवणे सोपे असते. झालेच तर इतिहासाची आणि पुतळ्यांची तोडफोड करवून घेता येते. पण मिपासारख्या फोरमवर बोलायचे असेल तर पुरावे / लिंका हाती असूद्यात. नाहीतर तुमचा पण ट्रक पंक्चर होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

ज्यांना प्रतिवाद केला आहे

विशुमित
Tue, 04/04/2017 - 12:07 नवीन
ज्यांना प्रतिवाद केला आहे त्यांनी प्रति उत्तर द्याच्या अगोदर तुम्ही यिमान घेऊन धावत का आलात? <<<अशी हवेतली विधाने / आरोप करून सुशिक्षीत (पण अडाणी) युवकांची डोकी फिरवणे सोपे असते.>>> ==>> कोणी ही बोळ्याने दूध पीत नाही. ठराविक कंपूत न राहता शिकवलेल्या पोपटासारखे बोलायला न येणे याला अडाणीपणा म्हणत असतील तर अडाणीच असलेले बरं. <<<झालेच तर इतिहासाची आणि पुतळ्यांची तोडफोड करवून घेता येते.>>> ==>> पुण्यातला तो पुतळा बसला का परत? एक कुतूहल. <<<पण मिपासारख्या फोरमवर बोलायचे असेल तर पुरावे / लिंका हाती असूद्यात>>> ==>> ""कंपूबाजी करून टाळ्या वाजवायला लोक आणले"" याला तुमच्याकडे आणि सन्मानीय सदस्याकडे विदा आहे का? नसेल तर दोघांनी माघार घ्या. (ते नाही जमणार बहुतेक कारण ७ महिने सदस्येत्व असणाऱ्या समोर माघार, शक्यच नाही.) <<<नाहीतर तुमचा पण ट्रक पंक्चर होईल.>> ==> ट्रक ची पंचर निघते बरका. नाहीतर टायर पण बदलू. काळजी नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

=)) =)) =))

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 04/03/2017 - 18:57 नवीन
=)) =)) =)) त्यावेळेस स्वनिर्णयाने रांगेत उभे राहिलेली सर्वसामान्य जनता हवामानाचा परिणाम, कष्ट, इत्यादीबद्दल तेव्हाही बोलत नव्हतीच आणि आजही बोलत नाही ! सर्वसामान्य जनतेच्या मनात नाराजी नव्हती हे तिने नोटाबंदीपासून आतापर्यंत झालेल्या अनेक निवडणूकांत स्पष्टपणे दाखवून दिले आहे. पण, काही लोक कधीच शिकू शकत नाहीत, हे पण एक सत्य आहेच म्हणा ! त्यावेळेस, ज्यांना, आपण भूतकालात जमा केलेली माया आणि भविष्यात तेच उपाय वापरून माया जमा करण्यासाठी होणारा त्रास यांची काळजी वाटत होती, त्यांचा स्वतः एसी खोलीत बसून माध्यमातल्या आपल्या पित्त्यांतर्फे "मोले घातले रडाया"चा तोच जुना अयशस्वी प्रयोग चालला होता. आज तसा स्वार्थ नसल्याने त्यावेळेस बोंबा मारणार्‍यांना आज तिकडे ढुंकूनही पहावेसे वाटत नाही, इतकेच ! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

एक्काकाका आता लोकं तुम्हाला

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 04/03/2017 - 19:55 नवीन
एक्काकाका आता लोकं तुम्हाला भक्तं म्हणणार बरं का ;) ;) ;)!!!! असं एकदम फटकन लॉगिकल पोस्टं टाकुन धाग्यातली हवा काढुन घेतल्याबद्दल णीषेद ;) ;) ;)!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

स्वनिर्णयाने..... व्हाट्टा

संदीप डांगे
Mon, 04/03/2017 - 20:09 नवीन
स्वनिर्णयाने..... व्हाट्टा जोक! अ‍ॅज इफ पीपल हॅड चॉइस नॉट टू चेंज द नोट्स... =)) =)) बाकी काय म्हणता...? झाला की नाही अजून नोटाबंदीचा हिशोब...? फक्त शब्दजंबाल गाजरगफ्फा आणि केविलवाणे व्हॉट्सॅप मेसेजेस मिळत आहेत आजकाल म्हणून विचारलं... निवडणुकांमध्ये विजय बघायचा आणि पराजय गुपचूप कारपेटखाली ढकलायचे अशी तर राजकारण्यांची रीत असते... बहुतेक पंजाबात नोटाबंदीचा फार त्रास झाला असेल जनतेला, म्हणून सत्ताधारी असून भाजप सपाटून आपटले.. गोव्यातही.. हेच तुम्ही उत्तरप्रदेशबद्दलही उलट्या बाजूने म्हणू शकताच. त्यामुळे मतदान हे नोटाबंदीवरचा जनतेचा मॅन्डेट समजायचा तर अडचण होते दोन्हीकडच्यांची... पण हे जे समतोल आणि तटस्थ असतात त्यांनाच दिसते बरे! आणि तसेही नोटाबंदीचे फायदे हा मुद्दा प्रचारात घेतलाच नाही प्रधानसेवकांनी, इतका फायदेशीर(?) होता तरी. ३१ डिसेंबरपासून तर बोलणेच बंद केले सगळ्यांनी... नोटाबंदीवर. असो. अजून वर्ष होऊ देत... बघू काय होते ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अजून वर्ष होऊ देत... बघू काय

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 04/03/2017 - 20:39 नवीन
अजून वर्ष होऊ देत... बघू काय होते. ते +१०० असेच* सरकार आणि नोटाबंदीच्या बाजूने बोलणारे लोक बोलत होते, असे माध्यमे व मिपावरचाही संवाद चाळल्यास दिसेल. पण, विरोधकांचा फक्त "मला आत्ताच आईस्क्रीम पायजे, ऑsss ऑsss" टाईप धोशा चालू होता ना ! ;) असो, देर आये, दुरुस्त आये ! ही फक्त आठवण करून दिली आहे. बाकी त्या विषयावर इथे चर्चा करण्यात रस नाही. ======================== * : नोटाबंदीचे व तिच्या मागच्या-पुढच्या संबंधीत कारवायांचे स्पष्ट परिणाम दिसून यायला १ वर्ष किंवा ३-४ तिमाह्या लागतील असे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

सर्वसामान्य जनतेच्या मनात

अभिजीत अवलिया
Tue, 04/04/2017 - 09:04 नवीन
सर्वसामान्य जनतेच्या मनात नाराजी नव्हती हे तिने नोटाबंदीपासून आतापर्यंत झालेल्या अनेक निवडणूकांत स्पष्टपणे दाखवून दिले आहे --- निवडणुका ह्या नोटाबंदी ह्या एकमेव मुद्द्यावर लढल्या गेल्या नाहीत. निवडणुकीत बरेच मुद्दे असतात. विकासाचा मुद्दा, भ्रष्टाचार, पाणी, वीज ह्यासारख्या पायाभूत सुविधा, विद्यमान सत्तेत असलेल्या लोकांची कामगिरी, रोजगार बरेच मुद्दे असतात. त्यामुळे नोटाबंदीमुळे जनतेच्या मनात नाराजी नव्हती आणी त्यामुळे भाजपने अनेक निवडणुका जिंकल्या हा घाऊक निष्कर्ष फारच हास्यास्पद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अहो त्यांनी सांगितलं ना कि

शब्दबम्बाळ
Tue, 04/04/2017 - 09:54 नवीन
अहो त्यांनी सांगितलं ना कि "स्वनिर्णयाने रांगेत उभे राहिलेली सर्वसामान्य जनता हवामानाचा परिणाम, कष्ट, इत्यादीबद्दल तेव्हाही बोलत नव्हतीच आणि आजही बोलत नाही" हे सगळे डायरेक्त्त निष्कर्ष असतात मग! म्हणजे अप्रत्यक्षपणे असे म्हणायचे की जर कोणी नोटबंदीबद्दल तक्रार वगैरे करत असेल तर ते सामान्य जनतेत येत नाहीतच! असामान्य असावेत ते... दुसर्याने अशी बेछूट विधान केली कि त्याला विदा संदर्भ यासाठी तगादा लावून आपण कसे बरोबर हे दाखवले जाते! पण काही सन्माननीय सदस्यांना हल्ली हे नियम लागू पडत नाहीत! दुसऱ्याच्या विचाराला कोणी अनुमोदन दिले कि तो कंपू असतो (टाळ्या वाजवायला आणलेला ना?) पण आपल्याला मिळालेले "इल्लोजिकल" अनुमोदन मात्र अभ्यासू आणि सर्वसामान्य जनतेचे असते बहुतेक! =)) बाकी स्कोर सेटलिंग किती जोमात चालते मिपावर याची प्रचिती काही धागे पाहून येतच आहे, त्यामुळे कोणाच्या कंपूवर कोणाचे ओझे हे मिपावरच्या सर्वसामान्य, अभ्यासू इ इ जनतेला कळत आहेच! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

बाकी एक शंका आहे-

अभिजीत अवलिया
Tue, 04/04/2017 - 08:54 नवीन
बाकी एक शंका आहे- डीलर लोकांनी त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून रात्री १२ वाजेपर्यंत जागून वाहने विकली हे एकवेळ ठीक आहे. पण आर.टी.ओ. (जो की शासकीय विभाग आहे आणी १०-५:३० ह्या वेळेत काम करत असावा) तो रात्री १२ वाजेपर्यंत चालू ठेवून वाहनांची एंट्री करण्याचे कारण काय? ते पण सर्वोच्च न्यायालयाने विक्रीस बंदी घातलेल्या गाड्यांची नोंदणी व्हावी म्हणून. ऑफिस रात्री १२ पर्यंत चालू ठेवण्याचा अधिकार आर.टी.ओ.ला आहे का?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा