✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

घराच्या किंमतीत ३०% घट ? मदत हवी आहे

म
मीउमेश यांनी
Fri, 11/25/2016 - 11:37  ·  लेख
लेख
मी महिन्या पूर्वी ठाण्यात हायलँड हेवन या ठिकाणी वन बीचके बुक केलाय, आता अश्या बातम्या येऊ लागल्यात कि घराच्या किंमती कमी होणार आहेत म्हणून काय करावे सुचत नाही. कृपया तज्ञ मंडळी कडून या विषयावर मदत हवी आहे. . घराची किंमत ५३ लाख + पार्किंग + २ वर्षाचा मेंटेनन्स + क्लब आणि इतर धरून ७४ लाखाला पडलाय. अजून रजिस्ट्रेशन झालेलं नाही, बुकिंग ८०-२० स्कीम मध्ये केलेले आहे. आता १४ लाख सुरुवातीला भरले आहेत. बाकी ६० लाख घर ताब्यात मिळाल्यावर २०१९. अजून बिल्डिंग चे काम सुरु झालेल नाही. काय करणे योग्य ठरेल; कृपया तज्ज्ञ मिपाकरानी आपले बहुमोल मार्गदर्शन करावे. धन्यवाद
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
19871 वाचन

💬 प्रतिसाद (56)

प्रतिक्रिया

प्रत्यक्ष अनुभव-- गेली दीड

सुबोध खरे
Fri, 11/25/2016 - 18:15 नवीन
प्रत्यक्ष अनुभव-- गेली दीड वर्षे मी माझे घर भाड्याने देऊन मोठे घर भाड्याने घेऊन राहत आहे. माझे मुलुंड पूर्व येथील १ १/२ बेडरूमचे घर भाड्याने देऊन( भाडे २२०००/-) दीड वर्षांपूर्वी मी ३ बेडरूमच्या घरात भाड्याने राहायला गेलो. दोन्ही मुले मोठी झाली आहेत तेंव्हा त्यांना वेगळी बेडरूम मिळावी या हेतूने. त्या घरासाठी तीन वर्षाचा भाडेकरार केला होता(भाडे ३३,०००/-). भाड्यात दर एक वर्षाने १० % वाढ. परंतु त्या घराचा मालक दुबई येथे राहत होता त्याची नोकरी गेली आणि तेथील व्हिसा नोकरी असेल तरच असतो म्हणून त्याने मला एक वर्षातच घर करण्यास सांगितले. आता मी तेथे जवळच दुसरे घर भाड्याने घेऊन राहत आहे. हिशेब साधा सरळ आहे. माझ्या मूळ घराचा पुनर्विकास होणार आहे त्याचे घोंगडे ५ वर्षे भिजत आहे. शेवटी मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. माझ्या घराची किंमत १,४०,००,०००/-( एक कोटी चाळीस लाख) २५ हजार रुपये चौ. फुटाला ५६० चौ फूट कार्पेट. भाड्याने घेतलेले घर ८५० चौ. फूट त्याची किंमत होत होती २,१२,००,०००/- (दोन कोटी बारा लाख) यात ५% रजिस्ट्रेशन, मुद्रांक शुल्क चे धरले तर किंमत २ कोटी ३५ लाख होतात. मुलांचे वय २२ आणि १९. माझी गरज पाच वर्षाची आहे. यानंतर मुले कुठे असतील माहित नाही. म्हणून ५० व्हायला कर्ज घेण्यापेक्षा एक कोटी रुपयांचे ६ टक्क्याने सरळ व्याज ५०,०००/- होते. म्हणजे हे ११,०००/- अधिकचे देऊन मी शांतपणे ३ बेडरूंमच्या घराचा आनंद मिळवत आहे. किंवा व्याज इ. न गृहीत धरता. दर वर्षी सव्वा लाख रुपये जास्त टाकून मी आरामात राहत आहे. साधा हिशेब केला तर ५६० चौ फुटाचे माझे घर भाड्याने घेऊन राहिला तर २२,०००/० रुपये येतात आणि १ कोटी चाळीस लाखाचे ६ % व्याजच ७०,०००/- येते. तेंव्हा घर विकत घेणे हा तसा आतबट्ट्याचा व्यवहार आहे. परंतु स्वतःचे हक्काचे घर असणे हि एक फार मोठी मानसिक शांतता आहे. भाड्याच्या घरातून बाहेर काढले तर परत घर शोधणे आणि तिथे घर हलवणे हि कटकटीची गोष्ट आहे. नवीन घरे चकाचक रंगवलेली होती हा एक फायदा. जुने बरेचसे सामान टाकून देता आले. नवीन घरात काही नव्या (अनावश्यक) गोष्टी "हौस" या खातर घेतल्या गेल्या. अर्थात माझे घर आणि दोन्ही भाड्याची घरे हि एकमेकांपासून ३००-४०० मीटर एवढी जवळ आहेत त्यामुळे बाकी कशातच फरक पडला नाही. अगदी मोलकरणी सुद्धा नव्या घरात आल्या. (स्वैपाकीण कटकट करणारी होती तिला काढून टाकणे सोपे गेले. केवळ घर बदलले म्हणून तिने पगार वाढवून मागितला. झाडणे, पुसणे याचा पगार वाढवणे मान्य आहे पण स्वयंपाकाचा पगार वाढवणे अति झाले. एकंदर घराच्या भांड्यातून येणारे उत्पन्न याचा आणि घराच्या किमतीचा अजिबात ताळमेळ बसत नाही कधीही बसणार नाही. कारण मासिक हप्ता जर घराच्या भाड्याच्या निम्म्याच्या वर होणार असेल तर प्रत्येक माणूस स्वतःचे घर घेणे पसंत करतो. घर कितीही मोठे घ्या. काही वर्षांनी बायकांना ते कमी पडू लागते असा सर्वसामान्य अनुभव आहे. लिहिण्यासारखे बरेच आहे पण मूळ धाग्याशी संबंधित नाही म्हणून थांबतो.
  • Log in or register to post comments

विकासकाचा फायदा

नमकिन
Fri, 11/25/2016 - 18:22 नवीन
जमीन - आज घेतली व उद्या बांधायला इमारत घेतली असे होत नाहीं, तिथे फायदा होतंच रहातो प्रकल्प संपेस्तोवर. लोखंड - ४०% स्वस्त झालेय, (२-५ वर्ष पाहिलित तर अर्धी झाली किंमत आज. तर पुन्हा फायदाच. तांबे- इथे पण स्वस्ताई अवतरली आहे ३ वर्ष मागील भावात प्लास्टिक - अर्ध्याहुन अधिक उतरलेत भाव (पेट्रोलियम पदार्थ) गृह कर्ज- व्याजदर उतरतायत, चांगले चिन्ह. सातवा वेतन आयोग - उत्पन्न वाढले, म्हणून सरकारी कर्मचारी करिता खास योजना असतात विकासकातर्फे. पतपुरवठा- जोमाने होणार गृहनिर्मान मंत्री - स्वयं एक विकासक आहे विद्यमान सरकारी महाराष्ट्रात. संपूर्ण। CC एकदम मिळणार, मुंबई महापालिकेचा निर्णय. छळणारे राजकारणी- गजाआड होते बरेच दिवस (परमार प्रकरण) असे चहूबाजूंनी हे विकासक फायदा उपटत असताना देखील प्रकल्प लांबवून ग्राहकाला उशीरा ताबा देतात , म्हणजे यांची वृत्ती आहे ओरपण्याची त्याला मोफा पण तोकडा पडलाय. तर विकासक काही बुडत नाहीं, तेव्हा क्षणिक निर्णय न घेता सवरुन घ्या.
  • Log in or register to post comments

डॉक यांच्याशी सहमत

वरुण मोहिते
Fri, 11/25/2016 - 21:01 नवीन
बाकी खूप मोठा फरक पडणार नाहीये . पण तुमच्या बिल्डर चा नाव इतकं चांगल नाहीये. ठाण्यात कॉसमॉस ला पण माझा फ्लॅट आहे परमार प्रकरणानंतर थोडा वैताग झाला होता . पण त्यांची होल्डिंग कपॅसिटी होती त्यामुळे प्रॉब्लेम झाला नाही . राहत आताच मुलुंड चा घर @२.५ सी.आर . च्या आसपास आहे मुलुंड मध्ये . आता इतके पैसे नवीन लोक का टाकतील माझ्या बऱ्याच मित्रांमध्ये जे आय टी मध्ये आहेत त्यांचा मोठा घर भाड्याने घेऊन राहण्याचा कल आहे सध्या .
  • Log in or register to post comments

मुंबई x पुणे

कपिलमुनी
Sat, 11/26/2016 - 00:46 नवीन
मुंबईचा हिशोब आणि पुण्याचा हिशोब यात फरक आहे. माझा 2bhk ४७ लाखाला मिळाला. त्याचा ३५,००० हप्ता जातो. आणि इथे १०००० -१२००० भाडे आहे .पण बुकिंग ते आजवर किंमत वाढली आहे. अजुन १० वर्षात माझा हप्ता कमी होउन भाडे वाढेल.
  • Log in or register to post comments

उत्तम चर्चा. गुंतवणूक म्हणून

नगरीनिरंजन
Sat, 11/26/2016 - 08:09 नवीन
उत्तम चर्चा. गुंतवणूक म्हणून घर घेण्यातला मला मुद्दाच कळत नाही. आता हीच केस घ्या. ७४ लाखाचा फ्लॅट घेऊन त्यावर मजिना वीस हजार जरी भाडे धरले तरी वर्षाला फक्त ३.२४% परतावा मिळतो. तेवढे व्याज तर बँजेत नुसते ठेवले तरी मिळते व शिवाय लिक्विडिटी राहते. म्हणजे मग एकच मार्ग उरतो आणि ते म्हणजे प्रॉपर्टीच्या किंमती वाढणे. त्या नेहमीच वाढत राहतात असा लोकांचा समज दिसतो आणि तो भूतकाळावरुन तसा होणे स्वाभाविकच आहे. परंतु भविष्यकाळ भूतकाळासारखाच आएल ह्याची नक्की इतकी खात्री आहे का? मुळात घरांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे ही जाणीव पूर्वीपेक्षा खूप वाढली आहे त्याचे प्रतिबिंब किंमतींमध्ये पडते. म्हणजे भविष्यातली कल्पित वाढती मागणी आधीच किंमतीत अंतर्भूत आहे असे वाटते. दुसरे म्हणजे १९९१ च्या आर्थिक उदारीकरणानंतर आऊटसोर्सिंग सुरु झाल्याने उत्पन्नात अचानक व कमालिचा फरक पडला व त्यामुळे घरांच्या किंमती झपाट्याने खूप वाढल्या. पुढेही ह्याच वेगाने उत्पन्न वाढत राहिल ह्याची शक्यता आहे काय? इंग्लंड-अमेरिकेत वाहणारे प्रोटेक्शनिझमचे वारे पाहता परदेशी पैशाचा प्रवाह वाढता राहिल असे वाटते का? गेल्या दोन वर्षात रोजगार निर्मिती खूप मंदावली आहे. आयटी वगैरे क्षेत्रातही अगदी सुगीचा काळ आहे असे नाही. नुसती लोकसंख्या भरमसाठ वाढली म्हणून घरांच्या किंमती वाढत राहतील?
  • Log in or register to post comments

Even if property prices are

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 11/26/2016 - 08:20 नवीन
Even if property prices are dropped by 30%, I don't think it will benefit large masses of people with budget restrictions. This will benefit upper class with white money who already has good amount of white money. This again will create purchases of property as investment trend. Gradually property prices will rise.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा