✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

ट
ट्रेड मार्क यांनी
Tue, 11/08/2016 - 21:38  ·  लेख
लेख
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे. काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे. असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल. मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय? हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे. http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-1000-notes/ कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल. धन्यवाद.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मत

प्रतिक्रिया द्या
307018 वाचन

💬 प्रतिसाद (1112)

प्रतिक्रिया

ट्रेकर असो वा नसो, नोटा

वगिश
Tue, 11/08/2016 - 21:55 नवीन
ट्रेकर असो वा नसो, नोटा बदलण्याच्या प्रक्रियेत सर्व काळा पैसा बाहेर पडेल. मास्टर स्ट्रोक.

दिवसाला ४००० रुपयाची मर्यादा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 11/08/2016 - 21:56 नवीन
दिवसाला ४००० रुपयाची मर्यादा असल्याने आणि त्यासाठी पॅन/ आधार वगैरे लागत असल्याने काळा पैसावाल्यांना शिस्तीत बुच बसलेलं आहे =))!!
↩ प्रतिसाद: वगिश

दिवसाला ४००० रुपयाची मर्यादा

टवाळ कार्टा
Wed, 11/09/2016 - 14:45 नवीन
दिवसाला ४००० रुपयाची मर्यादा असल्याने
हे नक्की आहे का?
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

Exchange la survatila kahi

वगिश
Wed, 11/09/2016 - 20:09 नवीन
Exchange la survatila kahi diwas (24 Oct) 4000 limit aahe, per day.
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

निर्णयाचं स्वागत करायला हवं.

खेडूत
Tue, 11/08/2016 - 21:56 नवीन
निर्णयाचं स्वागत करायला हवं. तीसेक वर्षं ही मागणी होती, पण राजकीय इच्छा नसावी. आता परिणामांबाबत विश्लेषणाच्या प्रतिक्षेत! (शीर्षक दुरूस्त करायला हवं. बंदी नाहीय ती.)

शीर्षक दुरुस्ती सुचवा

ट्रेड मार्क
Tue, 11/08/2016 - 22:03 नवीन
मला Abolish ला योग्य शब्द सुचला नाही. कृपया योग्य शब्द सुचवा.
↩ प्रतिसाद: खेडूत

रद्द करणे

शाम भागवत
Tue, 11/08/2016 - 22:10 नवीन
रद्द करणे
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

गरीबांना आनंद आणि श्रीमंतांना

वगिश
Tue, 11/08/2016 - 21:59 नवीन
गरीबांना आनंद आणि श्रीमंतांना घाम. आता पळवाट शोधने औघड आहे.

श्रीमंत खोडून काळा पैसा वाले

वगिश
Tue, 11/08/2016 - 22:01 नवीन
श्रीमंत खोडून काळा पैसा वाले असे म्हणायचे होते.
↩ प्रतिसाद: वगिश

हेच म्हणतो..

पुंबा
Tue, 11/08/2016 - 22:24 नवीन
हेच म्हणतो..
↩ प्रतिसाद: वगिश

अजून एक फायदा

ट्रेड मार्क
Tue, 11/08/2016 - 22:00 नवीन
नुसता काळा पैसाच नाही तर आपल्या सख्ख्या शेजाऱ्यांकडून ज्या फेक नोटा चलनात होत्या त्या पण आता बाद होणार. म्हणजे त्याबाजूने पण आपला फायदा होईल आणि शेजाऱ्यांनी यासाठी इतके वर्ष जे कष्ट घेतले जे एका फटक्यात निरुपयोगी झाले. खरंच मास्टर स्ट्रोक. मजा आ गया.

शेजाऱ्यांनी यासाठी इतके वर्ष

असंका
गुरुवार, 11/10/2016 - 10:19 नवीन
शेजाऱ्यांनी यासाठी इतके वर्ष जे कष्ट घेतले जे एका फटक्यात निरुपयोगी झाले.
सर्क्युलेशनमध्ये असणार्‍या खर्‍या नोटांवर भारताने घेतलेल्या कष्टांपेक्षा सर्क्युलेशनमध्ये असलेल्या खोट्या नोटांवर पाकिस्तानने घेतलेले कष्ट जास्त होते म्हणता?
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

हा तर षटकार् मारलाय.....!!!!

विनोद१८
Tue, 11/08/2016 - 22:01 नवीन
माझ्या मनातलेच लिहिले आहे आपण. आता खरी मजा येइल खेळाला, सुरवातीला बरीच व्यावहारीक गैरसोय होइल सगळ्यांची पण अतिंमतः हा एक देशहिताचा सर्वात मोठ्ठा निर्णय या सरकारने घेतला आहे, यावर कुणाचे दुमत नसावे.

कृपया धाग्यावर राजकारण न आणता

साधा मुलगा
Tue, 11/08/2016 - 22:03 नवीन
कृपया धाग्यावर राजकारण न आणता, प्रॅक्टिकल सल्ले आणि संपूर्ण व्यवहार कसे करावेत यासाठीचे मार्गदर्शन यावर धागा असावा एवढीच अपेक्षा आहे.

रद्दीचा भाव काय आहे सध्या?

जव्हेरगंज
Tue, 11/08/2016 - 22:06 नवीन
रद्दीचा भाव काय आहे सध्या? -१२मतीकर ;)

12-मतीकर फक्त एकाच माणसाला

विशुमित
Wed, 11/09/2016 - 15:56 नवीन
12-मतीकर फक्त एकाच माणसाला (घराण्याला) उद्देशून असेल तर- जरा हे पण जरा वाचत चला...!! http://www.loksatta.com/desh-videsh-news/welcomes-the-decision-to-demonetise-currency-notes-says-sharad-pawar-1335490/ तुमचा मी खूप आदर करतो पण असली वाचाळगिरी तुमच्याकडून अपेक्षित नव्हती. आणि जर तुम्ही सकल 12-मतीकरांबद्दल बोलत असाल तर कृपया परिघाबाहेर येऊन उघड्या डोळ्यांनी तेथील सामाजिक आणि आर्थिक प्रगती पहा.
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

12-मतीकर फक्त एकाच माणसाला

श्रीगुरुजी
Wed, 11/09/2016 - 23:38 नवीन
12-मतीकर फक्त एकाच माणसाला (घराण्याला) उद्देशून असेल तर- जरा हे पण जरा वाचत चला...!! http://www.loksatta.com/desh-videsh-news/welcomes-the-decision-to-demone...
पवारांची कृती त्यांच्या उक्तीच्या बरोब्बर विरूद्ध असते. त्यामुळे ते वर जे काही म्हणतात त्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. १९९८ मध्ये सोनिया गांधींची पालखी उचलण्यात तेच आघाडीवर होते. सोनिया भारताच्या सूनबाई आहेत, त्यांनी भारतीय संस्कृती आत्मसात केली आहे असे सांगण्यात ते थकत नव्हते. त्याच सोनिया गांधी परकीय असल्याचा साक्षात्कार पवारांना वर्षभरातच झाला होता व त्यामुळे त्यांनी मे १९९९ मध्ये त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक केला होता. १८ जुलै २०१६ ला सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय संदर्भात निर्णय देऊन लोढा समितीचा सर्व शिफारशी ६ महिन्यांच्या आत लागू करण्याचा आदेश दिल्यावर ३-४ दिवसात पवारांनी पत्रकार परीषद घेऊन सांगितले होते की मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद सोडण्यास माझी अजिबात हरकत नाही व पुढील ३ महिन्यांच्या आतच मी अध्यक्षपदाचा राजीनामा देईन. आता जवळपास पावणेचार महिने होत आले तरी ते अजून अध्यक्षपद सोडायचे नावही घेत नाहीत. याउलट अध्यक्षपदावर टिकून राहण्यासाठी त्यांची व इतर सर्वांची धडपड सुरू आहे. एकंदरीत बीसीसीयची गुळाची ढेप त्यांना सोडवत नाहीय्ये.
↩ प्रतिसाद: विशुमित

दुसरा उपाय काय बारामतीकरांकडे

मृत्युन्जय
Sat, 11/12/2016 - 23:37 नवीन
दुसरा उपाय काय बारामतीकरांकडे? उलट्ञा बोंबा मारायला त्यांच्याकडे माणासे ठेवलेली आहेत की.
↩ प्रतिसाद: विशुमित

मृत्युन्जय सर----

विशुमित
Mon, 11/14/2016 - 10:51 नवीन
म्हणजे इथे बरेच लोक बऱ्याच लोकांसाठी ठेवलेली आहेत, असा अर्थ धुनीत होतो...!! काल बारामतीकरांच्या बोटाला धरूनच प्रधानसेवक झालो आहे असे कोणी तरी निसंकोचपणे छाती ठोकून सांगत होते.. कृपया फक्त वागण्यातला सुसंस्कृतपणा ठेवा. इथे कोणी बोंबा मारायला येत नाही, हे सभ्य लोकांचं संकेत स्थळ आहे.
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

देशातील इतर नेत्यांकडून

श्रीगुरुजी
Mon, 11/14/2016 - 15:43 नवीन
देशातील इतर नेत्यांकडून स्वतःवर स्तुतीसुमने उधळून घेणे साहेबांना आवडते. १९९० च्या दशकात चंद्रशेखर व इतर समाजवादी नेत्यांना बारामतीला बोलावून त्यांच्या पाहुणचार केल्यावर त्यांनी पवारांचे कौतुक केले होते. नंतर प्रणव मुखर्जी, मोदी व जेटली इ. ना वेगवेगळ्या वेळी बारामतीला बोलावून त्यांचा पाहुणचार करून साहेबांनी त्यांच्याकडून स्वत:बद्दल कौतुकाचे चार शब्द ऐकले होते (याच मोदींवर "उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग" अशी टीका अनेकवेळा साहेबांनी केलेली आहे). एखाद्या घरी कोणी पाहुणा म्हणून गेला की तो यजमानांबद्दल चार बरे शब्द बोलतो त्यातलाच हा प्रकार. त्याने बोललेले सर्व काही खरे असते अशातला भाग नाही. २००१ मध्ये आपल्या ६१ व्या वाढदिवसाला व २०१५ मध्ये आपल्या ७५ व्या वाढदिवसाला साहेबांनी सर्व पक्षांचे नेते बोलावून स्वतःचा सत्कार करवून घेतला होता व उपस्थितांनी त्यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव करून त्यांना हरबर्‍याच्या झाडावर चढविले होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणी चार शब्द बरे बोलत असतील तर त्याला त्या प्रसंगापुरतेचे महत्त्व असते. जे काही बोलले गेले ते सत्य असते अशातला भाग नाही. त्यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नसते कारण त्यात कोणताही वेगळा अर्थ नसतो.
↩ प्रतिसाद: विशुमित

श्री गुरुजींना.._/\_

विशुमित
Mon, 11/14/2016 - 17:25 नवीन
<<<<जे काही बोलले गेले ते सत्य असते अशातला भाग नाही. त्यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नसते कारण त्यात कोणताही वेगळा अर्थ नसतो.>>>> -- म्हणजे अनेक जुम्ल्या मधला हा एक जुमला म्हणायचा. आम्ही उगाच खुश होतोय...पुन्हा अशी गल्ती नाही करणार. पण---- एवढी स्तुती करायची खरंच काही गरज नव्हती. ""त्यांना आदर्श मानणाऱ्या अनेक लोकांपैकी मी एक आहे ही गोष्ट जाहीरपणे मान्य करताना मला अभिमान वाटतो, असे मोदी यांनी सांगितले. "" त्यावर हाईक म्हणजे भारताच्या पंतप्रधानांनी बाळबोध होऊन एवढ्या खाली जायला नको होते-- "सार्वजनिक जीवन कसे जगायचे याचे उत्तम उदाहरण शरद पवार यांनी घालून दिले आहे. माझ्या सुरवातीच्या काळात मला बोटाला धरून त्यांनी चालायला शिकवले.." http://www.esakal.com/Tiny.aspx?K=bBKWIt
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हसून मेलो आम्ही

पैसा
Mon, 11/14/2016 - 17:30 नवीन
गेल्या काही दिवसातल्या मोदी-फडणवीस यांच्या उद्योगांमुळे पवारसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे प्रचंड नुकसान झालेले असणार आहे. त्यानंतर "मी हे तुमच्याकडून शिकलो" असे मोदींनी म्हटल्यावर पवारसाहेब जाम खुश झाले असतील असं वाटतंय का तुम्हा लोकांना? =))
↩ प्रतिसाद: विशुमित

+ १००

मृत्युन्जय
Mon, 11/14/2016 - 18:15 नवीन
+ १०० मोदींचे चुकलेच. याबाबत तिळमात्र शंका नाही
↩ प्रतिसाद: विशुमित

मोदींचे चुकलेच. याबाबत

मोदक
Wed, 11/16/2016 - 18:25 नवीन
मोदींचे चुकलेच. याबाबत तिळमात्र शंका नाही +१११
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

त्यात जुमलाबिमला असं काही

श्रीगुरुजी
Mon, 11/14/2016 - 20:53 नवीन
त्यात जुमलाबिमला असं काही नाही हो. एखाद्याने आमंत्रण देऊन त्याच्याकडे गेल्यावर शिष्टाचार म्हणून आपण त्या व्यक्तीबद्दल चार बरे शब्द बोलतो. त्यात काही फारसा अर्थ नसतो. त्यातून मोदी तर एखाद्याला हरबर्‍याच्या झाडावर चढविण्यात पटाईत आहेत. पवारांच्या ६१ व्या व ७५ व्या वाढदिवसाला सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांचं तोंड भरून कौतुक केलं होतं. त्यात प्रणव मुखर्जी, मोदी, सोनिया गांधी, डाव्या पक्षांचे नेते इ. सर्वजण होते. त्यातून अर्थ काढायचा झाला तर प्रत्येक पक्षाला पवारांच्या पक्षाशी युती करायची आहे असा अर्थ काढता येईल. परंतु तो शिष्टाचाराचा भाग होता. त्यापेक्षा त्यात काहीही कमीजास्त नव्हते. मी आधीच्या प्रतिसादात अनेक उदाहरणे दिली आहेत. इतर पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण देऊन त्यांच्याकडून आपली आरती ओवाळून घेणे हे पवारांचे जुने तंत्र आहे. आपण राजकारणात अजून संपलेलो नाही व अजून रिलिव्हंट आहोत हे दाखविण्याचा ते सतत प्रयत्न करीत असतात. अगदी १९८३ मध्ये सुद्धा सर्वत्र कॉंग्रेसची सत्ता असताना पवारांनी पुण्यात विरोधी पक्षनेत्यांचे संमेलन बोलावून आपण राजकारणातून अजून संपलेलो नाही हेच दाखविण्याचा प्रयत्न केला होता. मोदी जे काही बोलले त्याने साहेबांनी हुरळून जाण्यासारखं काहीही नाही व त्यातून राजकीय पंडितांनी कोणताही अर्थ काढण्याची गरज नाही.
↩ प्रतिसाद: विशुमित

श्री गुरुजी...

विशुमित
Tue, 11/15/2016 - 12:00 नवीन
पण हे आरती ओवाळायला का जात आहेत, बापुडे..!! बऱ्याच लोकांना नसेल आवडत त्यांची आरती ओवाळलेली पण आमच्या जीवाला बरं वाटतं कोणीतरी आपल्या महाराष्ट्रातल्या माणसाची स्तुती करतंय ते. शरद पवारांवर आपले मतभेद अखंड राहतील, यावर मात्र एकमत आहे. धन्यवाद..!!
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

त्यांना साहेब आमंत्रण देऊन

श्रीगुरुजी
Tue, 11/15/2016 - 14:51 नवीन
त्यांना साहेब आमंत्रण देऊन बोलावितात म्हणून जातात ते. स्वतःहून ते तिथे जात नाहीत. गेल्यावर शिष्टाचार म्हणून यजमानाबद्दल चार बरे शब्द बोलतात. इतरांनी तिथे जाणे ही साहेबांची गरज आहे, इतरांची नाही कारण साहेबांनाच अजून आपण राजकारणात रिलिव्हंट आहोत हे वारंवार दाखवावे लागते.
↩ प्रतिसाद: विशुमित

<<<<त्यांना साहेब आमंत्रण

विशुमित
Tue, 11/15/2016 - 15:42 नवीन
<<<<त्यांना साहेब आमंत्रण देऊन बोलावितात म्हणून जातात ते. स्वतःहून ते तिथे जात नाहीत. गेल्यावर शिष्टाचार म्हणून यजमानाबद्दल चार बरे शब्द बोलतात.>>> --सहमत <<<< साहेबांनाच अजून आपण राजकारणात रिलिव्हंट आहोत हे वारंवार दाखवावे लागते.>>> --थोडं वाक्य बदलतो "साहेबांना अजूनही आपणच राजकारणात रिलिव्हंट आहोत हे वारंवार दाखवावे लागते"
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

असु द्या.

अर्धवटराव
Tue, 11/15/2016 - 23:45 नवीन
गुर्जींना साहेबांची महती नाहिच पटणार कधि.
↩ प्रतिसाद: विशुमित

अडवाणी, कल्याणसिंह, यशवंत

श्रीगुरुजी
गुरुवार, 11/17/2016 - 20:42 नवीन
अडवाणी, कल्याणसिंह, यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, मुरली मनोहर जोशी, मनोहर जोशी, जसवंत सिंह, अरूण शौरी, देवेगौडा, शरद यादव इ. प्रमाणे साहेबही भारतीय व महाराष्ट्रीय राजकारणात कालबाह्य झालेले आहेत. त्यांनी कितीही धडपड केली तरी आता उपयोग नाही.
↩ प्रतिसाद: विशुमित

इथे कोणी बोंबा मारत आहेत असे

मृत्युन्जय
Mon, 11/14/2016 - 18:14 नवीन
इथे कोणी बोंबा मारत आहेत असे मी म्हणालो का? इथे कुणी त्यांचा ठेवलेला आहे असे मी म्हणालो का? मी कुणावरही वैयक्तिक आरोप केलेले नाहित. तुम्हाला ध्वनीत झालेला अर्थ चुकीचा आहे असे स्पष्टपणे सांगु इच्छितो. बाकी सभ्य आम्ही आहोतच. धन्यवाद.
↩ प्रतिसाद: विशुमित

<<<<<दुसरा उपाय काय

विशुमित
Tue, 11/15/2016 - 11:46 नवीन
<<<<<दुसरा उपाय काय बारामतीकरांकडे? उलट्ञा बोंबा मारायला त्यांच्याकडे माणासे ठेवलेली आहेत की.>>>> --- बारामती मध्ये फक्त पवारच राहत नाहीत. बारामतीकर म्हण्यापेक्षा थेट शरद पवारांचे नाव घ्या की. पण मी म्हणतो कारण नसताना, पुरावा नसताना स्व कंड जिरवण्यासाठी लोकांनी पवारांचं नावाने का म्हणून पिंका टाकाव्यात? ते पण मिपा वरती? --- उलट्या बोंबा मारायला माणसे ठेवली आहेत हे तुम्ही माझ्या जव्हेरगंज यांच्या प्रतिसादाच्या प्रतिवादालाच उत्तर दिले आहे, मग ते मलाच ध्वनित होतात ना. --- दुसऱ्याच्या प्रतिसादाला कव्हर करण्यासाठी धावून येऊन एका विशिष्ट क्षेत्राची बदनामी करण्याची असलेली प्रवृत्ती कोणत्या सभ्येतेमध्ये बसते हे जरा कळू शकेल काय? -- राहायला प्रश्न ५०० आणि १००० च्या नोटांचा, सकल बारामतीकरांनी नक्कीच स्वागत केलं आहे नोट बंदीचे. लोक उत्स्फुरतेने नोटा बदलून घेत आहेत. काही समस्या होत्या/आहेत त्या हळूहळू कमी होतील ही अशा आहे.
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

बारामती मध्ये फक्त पवारच राहत

मृत्युन्जय
Tue, 11/15/2016 - 13:59 नवीन
बारामती मध्ये फक्त पवारच राहत नाहीत. बारामतीकर म्हण्यापेक्षा थेट शरद पवारांचे नाव घ्या की. बारामतीकर म्हटल्यावद बरोबर बसतात दगड. थेट नाव घ्यायची गरज नाही. घ्यायला घाबरतही नाही. मी कश्याप्रकारे लिहिणार हे मी ठरवायचे. जोपर्यंत मी इथल्या कुणाबद्द्दलही अपशब्द वापरत नाही तोवर मी बारामतीकर म्हणावे, शरद पवार म्हणावे काका म्हणावे की अजुन काही म्हणावे हे मीच ठरवेन. पण मी म्हणतो कारण नसताना, पुरावा नसताना स्व कंड जिरवण्यासाठी लोकांनी पवारांचं नावाने का म्हणून पिंका टाकाव्यात? ते पण मिपा वरती? कसले कारण, कसला पुरावा? --- उलट्या बोंबा मारायला माणसे ठेवली आहेत हे तुम्ही माझ्या जव्हेरगंज यांच्या प्रतिसादाच्या प्रतिवादालाच उत्तर दिले आहे, मग ते मलाच ध्वनित होतात ना. तुम्ही आ बैल मुझे मार करुन घ्यायला लागलात तर मी काय करु शकतो. मी काय लिहिले आहे ते पुरेसे स्पष्ट आहे. तुम्हाला ठेवले आहे किंवा नाही याबद्दल मी एक अवाक्षरही काढलेले नाही. --- दुसऱ्याच्या प्रतिसादाला कव्हर करण्यासाठी धावून येऊन एका विशिष्ट क्षेत्राची बदनामी करण्याची असलेली प्रवृत्ती कोणत्या सभ्येतेमध्ये बसते हे जरा कळू शकेल काय? -- मी कुणाला कव्हर करायला आलोय असे तुम्ही म्हणणे म्हणजे आश्चर्यच आहे, बारामती, पवार, रा ष्ट्रावादी वगैरे विषय निघाले की तुम्ही धावुन येता, भाजपा / मोदीची बदनामी करता , उगाच टीका करता आणी दुसर्‍याला काय विचारता. सभ्यतेचे निकष तुम्ही पाळले तरी खुप झाले की. राहायला प्रश्न ५०० आणि १००० च्या नोटांचा, सकल बारामतीकरांनी नक्कीच स्वागत केलं आहे नोट बंदीचे. लोक उत्स्फुरतेने नोटा बदलून घेत आहेत. काही समस्या होत्या/आहेत त्या हळूहळू कमी होतील ही अशा आहे. उत्तम
↩ प्रतिसाद: विशुमित

<<<<बारामतीकर म्हटल्यावद

विशुमित
Tue, 11/15/2016 - 15:09 नवीन
<<<<बारामतीकर म्हटल्यावद बरोबर बसतात दगड>>>> -- कृपया विनाकारण दगड नका मारू. विनाकारण दगड मरणाऱ्यांना लोक वेड्यात काढतात. <<<कसले कारण, कसला पुरावा?>>> -- विनाकारण दगड मारणारे नंतर असे प्रश्न विचारातच असतात. त्यांना शॉकची गरज असते पण आता पर्यंत दुर्लक्ष केलं आहे. असो. <<<तुम्ही आ बैल मुझे मार करुन घ्यायला लागलात तर मी काय करु शकतो>>> -- मी उगाच जास्त महत्व दिले या प्रतिसादाला, विनाकारण दगड मारणार्यांना दुर्लक्षच करायला पाहिजे होते. <<<<बारामती, पवार, रा ष्ट्रावादी वगैरे विषय निघाले की तुम्ही धावुन येता>>> -- धावून येणारच ... कारण काही कारण नसताना एका प्रगत क्षेत्राचे आणि सुसंस्कृत लोकनेत्याची कुत्सितपणे बदनामी कोणी दगड मारणारे करत असतील तर नक्कीच धावून येणार. <<<<<भाजपा / मोदीची बदनामी करता >>> -- प्रश्न उपस्थित केले म्हणजे बदनामी केली का? (सूचना: हा प्रतिसाद फक्त विनाकारण दगड मारणाऱ्यांसाठी आहे, कृपया स्वतःच्या अंगावर ओढून घेऊ नये )
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

शरद पवारांची थट्टा एवढी का

अनुप ढेरे
Tue, 11/15/2016 - 15:20 नवीन
शरद पवारांची थट्टा एवढी का लाऊन घेता तुम्ही मनाला? जोक आहे समजून सोडून द्या. लोक तसही मोदी, रा.गा इत्यादींची यथेच्छ थट्टा करतातच की.
↩ प्रतिसाद: विशुमित

ओके... सबुरीने घेतो मी फक्त

विशुमित
Tue, 11/15/2016 - 15:34 नवीन
ओके... सबुरीने घेतो मी फक्त विनाकारण दगड मारणाऱ्यांमुळे थोडा त्रास होतो. त्यांना पण आवरा असे मी तुम्हाला नाही सांगणार. इथून पुढे इग्नोर मारेल.. धन्यवाद..
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

एका प्रगत क्षेत्राचे आणि

मृत्युन्जय
गुरुवार, 11/17/2016 - 15:36 नवीन
एका प्रगत क्षेत्राचे आणि सुसंस्कृत लोकनेत्याची साष्टांग नमस्कार स्वीकारावा इतकेच लिहुन आपली रजा घेतो.
↩ प्रतिसाद: विशुमित

ठीक आहे.... निघू शकता...!!

विशुमित
गुरुवार, 11/17/2016 - 15:46 नवीन
ठीक आहे.... निघू शकता...!!
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

ओ सॉरी ... इग्नोर...

विशुमित
गुरुवार, 11/17/2016 - 15:53 नवीन
ओ सॉरी ... इग्नोर...
↩ प्रतिसाद: विशुमित

काही कारण नसताना एका प्रगत

श्रीगुरुजी
गुरुवार, 11/17/2016 - 20:44 नवीन
काही कारण नसताना एका प्रगत क्षेत्राचे आणि सुसंस्कृत लोकनेत्याची कुत्सितपणे बदनामी
हहपुवा
↩ प्रतिसाद: विशुमित

हलके होऊन या....

विशुमित
Mon, 11/21/2016 - 09:27 नवीन
हलके होऊन या....
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अयो सॉरी...

विशुमित
Mon, 11/21/2016 - 09:32 नवीन
अयो सॉरी... विनाकारण हसणाऱ्यांपासून लांबच राहिले पाहिजे नाहीतर विनाकारण कधी दगड मारतील सांगता येणार नाही..!!
↩ प्रतिसाद: विशुमित

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन

श्रीगुरुजी
Mon, 11/21/2016 - 15:16 नवीन
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था या संस्थेवर सकारण दगड मारले होते का?
↩ प्रतिसाद: विशुमित

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन

विशुमित
Mon, 11/21/2016 - 16:17 नवीन
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था या संस्थेवर दगड राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मारले होते का?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

संभाजी ब्रिगेड कोणाची

श्रीगुरुजी
Mon, 11/21/2016 - 17:31 नवीन
संभाजी ब्रिगेड कोणाची पिल्लावळ आहे?
↩ प्रतिसाद: विशुमित

आता विषय निघालाच आहे तर http:

एमी
Sun, 11/27/2016 - 11:14 नवीन
आता विषय निघालाच आहे तर http://www.misalpav.com/node/13219 इथले आळश्यांचा राजाचे प्रतिसाद मस्ट रिड आहेत. वरवर पाहता संयत वाटणारा लेख कसा अजेंडायुक्त असू शकतो किंवा पार्श्वभूमीला राहून कोण कसे काड्या करते ते कळेल. === बाकी धागा आणि प्रतिसादांबद्दल "भक्त नेव्हर सीज़ टू अमेझ मी"खेरीज बोलण्यासारखे काही नाही.
↩ प्रतिसाद: विशुमित

जाऊ द्या वो अॅमी जी..

विशुमित
Tue, 11/29/2016 - 12:14 नवीन
जाऊ द्या वो अॅमी जी.. ४८ आणि ७८ चे भय अजून ही काही लोकांना उगाच च वाटत नाही. पुला खालून बरेच पाणी वाहून गेले असताना सुद्दा संभाजी ब्रिगेड आणि तत्सम संघनतेचे बदरामायण गाण्यातच लोक मुशगुल आहेत. याने तेढ वाढतच जाईल, हे त्यांच्या ध्यानात येत नाही.
↩ प्रतिसाद: एमी

४८ चे भय नव्हे तर ४८ च्या

मृत्युन्जय
Tue, 11/29/2016 - 12:23 नवीन
४८ चे भय नव्हे तर ४८ च्या जळीताची लाज वाटली पाहिजे. पण निलाजर्‍या लोकांकडु याहुन जास्त अपेक्षा नाही. निलाजरे लोक सुद्धा आत्तापावेतो नरकात गेले. मानसिकता मागे ठेउन गेले याचे दु:ख आहे.
↩ प्रतिसाद: विशुमित

विशुमित, सदर प्रतिसादात जो

संदीप डांगे
Tue, 11/29/2016 - 13:56 नवीन
विशुमित, सदर प्रतिसादात जो आशय व्यक्त झालाय त्याचा स्पष्ट शब्दात निषेध व्यक्त करतो, इथे संकुचित व कुजकट मानसिकता व्यक्त झाली आहे आपल्याकडून!
↩ प्रतिसाद: विशुमित

ही

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 11/29/2016 - 13:58 नवीन
गर्भीत धमकी आहे का?
↩ प्रतिसाद: विशुमित
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा