✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

इंडिपॉप - ९० चे दशक !

म
माम्लेदारचा पन्खा यांनी
Mon, 09/26/2016 - 19:34  ·  लेख
लेख
गोरी तेरी आँखें कहें रातभर सोई नहीं ......... माईरी याद वो आई !..... मेड इन इंडिया ........ आँखों में तेरा ही चेहरा .... तुम्ही विचार करत असाल ना की आज अचानक मला असा काय झालंय आणि मी ही गाणी एकामागून एक का म्हणायला लागलोय....... पण त्याला कारण आहे... ही आणिक अशी कितीतरी गाणी जी अंतर्मनात कुठेतरी ठसली आहेत ती काही केल्या डोक्यातून जात नाहीत ....... आजच्या धांगडधिंगा असणाऱ्या आणि अळवावरच्या पाण्यासारख्या संगीताच्या काळात आवर्जून सतत आठवणीत येणारी गाणी म्हणजे इंडिपॉप संगीत आणि तेही खास ९० च्या दशकातलं ! आशा भोसले, सोनू निगम, शान, पलाश सेन (युफोरिया ), हरिहरन- लेस्ली लेविस (कोलोनिअल कझिन्स ), आर्यन्स , अलिशा चिनाय, लकी अली, सिल्क रूट, दलेर मेहंदी, फाल्गुनी पाठक , बॉम्बे वाईकिंग्स, शुभा मुद्गल, जुनून,अली हैदर....... नावं तरी किती घ्यावीत ? ह्या मंडळींनी गाऊन ठेवलेलं एक एक गाणं स्वतःच एक एक माणिक आणि मोती आहे. प्रत्येक गाण्याला स्वतःचा असा वेगळा बाज, एक वेगळा अर्थ आणि नजाकत आहे. सूर, ताल आणि लय यांचा उत्तम संगम साधलेली गाणी मला आजही आजकालच्या गाण्यापेक्षा शतपटीने आवडतात. एक एक गाण्याशी आपलं असं एक स्वतःचं नातं निर्माण होतं तेव्हाच ते आपल्याला कुठेतरी आवडतं.ती काही कोणाला समजवायची गोष्टच नाही. आवडलं म्हणजे आवडलं बास्स !कोणाला ती गाणी ऐकल्यावर शाळेचे दिवस डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागतात तर कोणाला कॉलेजचे.....कोणाला आपलं पाहिलं प्रमोशन आठवतं तर कोणाला त्याची पहिली भेट ! कारण काहीही असो, आजही ती गाणी कानावर पडली की मन अगदी मेणाहून मऊ होऊन जातं.... आपलं आताचं वय काहीही असो, माणूस त्या गतकाळात अगदी हरवून जातो. मग कोणी स्वतःला मिलिंद सोमण समजायला लागतं तर कोणी लिसा रे ! मुळात मनात इतकी उलथापालथ व्हायला मनाच्या शांत प्रवाहात कुठूनतरी काही लाटा निर्माण व्हाव्या लागतात आणि ह्या इंडिपॉपने ते काम चोख बजावलंय.काही गाणी दुर्लक्ष करण्यासारखी होतीही पण ते असायचंच, उडदामाजी काळे गोरे !संपूर्ण ९० चं दशक इंडिपॉप ने गाजवलं पण काळाच्या ओघात हळूहळू ते मागे पडत गेलं ... अनेक बँड फुटले आणि वेगवेगळे झाले .... वर उल्लेखित काही मंडळी हळूहळू दिसेनाशी झाली आणि ह्या प्रकाराला घरघर लागली ती कायमचीच ! पुढे इंटरनेट आणि इतर गोष्टींमुळे पायरसी वाढली आणि कोणी अल्बम काढेनासे झाले. पण जे मास्टरपीस ह्यातून मिळाले ते अप्रतिम आहेत! हा प्रकार पुढे कधी उदयाला येईल की नाही ते माहीत नाही. हा सांगीतिक ठेवा वेगळा आणि अनमोल आहे आणि कितीही ऐकलं तरी मन भरत नाही हेच खरं ! काय मग, आज एक तरी गाणं नक्की ऐकणार ना ? वेंजॉय !! काही तूनळी लिंका : मेड इन इंडिया - https://www.youtube.com/watch?v=IvloHsmi_vg गोरी 'तेरी आँखें कहें - https://www.youtube.com/watch?v=Wb2E2Nh2Stk तनहा दिल तनहा सफर - https://www.youtube.com/watch?v=__qkzfWhi6g माईरी याद वो आई - https://www.youtube.com/watch?v=KLe3ObP2EL0 आँखों मैं 'तेरा ही चेहरा - https://www.youtube.com/watch?v=roJL3mIueTE डूबा डूबा रहता हूँ - https://www.youtube.com/watch?v=Y5OQAIjjrag
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
44407 वाचन

💬 प्रतिसाद (202)

प्रतिक्रिया

धन्यवाद शिद.

बोका-ए-आझम
Sun, 10/16/2016 - 10:27 नवीन
हा व्हिडिओ दिल्याबद्दल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

झकास...

मी_आहे_ना
Tue, 10/18/2016 - 06:38 नवीन
बर्याच दिवसान्नी मिपाला भेट द्यावी आणि असा धागा मिळावा म्हणजे क्या कहने!! १९९० चे दशक म्हणजे नुकतेच सगळीकडे कलर टीव्ही/ केबल टीव्ही आलेले, सोनी / झी इ. वाहिन्या आपले पाय रोवत होत्या आणि आपल्यासारखे १९८०च्या आसपास जन्मलेले 'टीन एजर' बनत होते ते सोनेरी दिवस मोरपिसान्सारखे जपून ठेवण्यासाठी. 'हवा हवा ए हवा' सारखं उडत्या चालीचं गाणं ओझरतं ऐकायला मिळालं होतं पण ती पुढे बदलणार्या हवेची चाहूलच होती. दलेर मेहंदी, बाबा सेहगल, शुभा मुदगल, उषा उथप, लेस्ली लुविस ह्यांनी ठेका धरायला शिकवलं आणि त्यात भर पडली ती सोनू निगम, फाल्गुनी पाठक, जगजीत सिंग, आशा - लता आणि आपल्या मराठ मोळ्या मिलिंद इंगळे ची. डबल कॅसेट प्लेअर वर गाणी कॉपी करायची आणि मित्रांमधे शेअर करायची. कॅसेट टेप तुटली किंवा गुंडाळली की अलगदपणे काढून जोडून पेन्सिलिनी परत गुंडाळणे आणि काही डेटा लॉस न होता गाणी ऐकायला मिळणे म्हणजे एखादा किल्ला काबीज झाल्याचा आनंद होई. आधीच इतकी कमलपुष्पे उमललेली पाहून आनंद झाला आणि अर्थातच उजळणीही झाली. काही पुष्पे मझ्याकडून - चन्ना वे घर (कुणाल गांजावाला), पुरानी जीन्स, निगोडी कैसी जवानी (इला अरूण), यारोन (के के), गुर नालो इश्क मिठा, चुपके चुपके (पंकज उदास) ......
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा