✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

इंडिपॉप - ९० चे दशक !

म
माम्लेदारचा पन्खा यांनी
Mon, 09/26/2016 - 19:34  ·  लेख
लेख
गोरी तेरी आँखें कहें रातभर सोई नहीं ......... माईरी याद वो आई !..... मेड इन इंडिया ........ आँखों में तेरा ही चेहरा .... तुम्ही विचार करत असाल ना की आज अचानक मला असा काय झालंय आणि मी ही गाणी एकामागून एक का म्हणायला लागलोय....... पण त्याला कारण आहे... ही आणिक अशी कितीतरी गाणी जी अंतर्मनात कुठेतरी ठसली आहेत ती काही केल्या डोक्यातून जात नाहीत ....... आजच्या धांगडधिंगा असणाऱ्या आणि अळवावरच्या पाण्यासारख्या संगीताच्या काळात आवर्जून सतत आठवणीत येणारी गाणी म्हणजे इंडिपॉप संगीत आणि तेही खास ९० च्या दशकातलं ! आशा भोसले, सोनू निगम, शान, पलाश सेन (युफोरिया ), हरिहरन- लेस्ली लेविस (कोलोनिअल कझिन्स ), आर्यन्स , अलिशा चिनाय, लकी अली, सिल्क रूट, दलेर मेहंदी, फाल्गुनी पाठक , बॉम्बे वाईकिंग्स, शुभा मुद्गल, जुनून,अली हैदर....... नावं तरी किती घ्यावीत ? ह्या मंडळींनी गाऊन ठेवलेलं एक एक गाणं स्वतःच एक एक माणिक आणि मोती आहे. प्रत्येक गाण्याला स्वतःचा असा वेगळा बाज, एक वेगळा अर्थ आणि नजाकत आहे. सूर, ताल आणि लय यांचा उत्तम संगम साधलेली गाणी मला आजही आजकालच्या गाण्यापेक्षा शतपटीने आवडतात. एक एक गाण्याशी आपलं असं एक स्वतःचं नातं निर्माण होतं तेव्हाच ते आपल्याला कुठेतरी आवडतं.ती काही कोणाला समजवायची गोष्टच नाही. आवडलं म्हणजे आवडलं बास्स !कोणाला ती गाणी ऐकल्यावर शाळेचे दिवस डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागतात तर कोणाला कॉलेजचे.....कोणाला आपलं पाहिलं प्रमोशन आठवतं तर कोणाला त्याची पहिली भेट ! कारण काहीही असो, आजही ती गाणी कानावर पडली की मन अगदी मेणाहून मऊ होऊन जातं.... आपलं आताचं वय काहीही असो, माणूस त्या गतकाळात अगदी हरवून जातो. मग कोणी स्वतःला मिलिंद सोमण समजायला लागतं तर कोणी लिसा रे ! मुळात मनात इतकी उलथापालथ व्हायला मनाच्या शांत प्रवाहात कुठूनतरी काही लाटा निर्माण व्हाव्या लागतात आणि ह्या इंडिपॉपने ते काम चोख बजावलंय.काही गाणी दुर्लक्ष करण्यासारखी होतीही पण ते असायचंच, उडदामाजी काळे गोरे !संपूर्ण ९० चं दशक इंडिपॉप ने गाजवलं पण काळाच्या ओघात हळूहळू ते मागे पडत गेलं ... अनेक बँड फुटले आणि वेगवेगळे झाले .... वर उल्लेखित काही मंडळी हळूहळू दिसेनाशी झाली आणि ह्या प्रकाराला घरघर लागली ती कायमचीच ! पुढे इंटरनेट आणि इतर गोष्टींमुळे पायरसी वाढली आणि कोणी अल्बम काढेनासे झाले. पण जे मास्टरपीस ह्यातून मिळाले ते अप्रतिम आहेत! हा प्रकार पुढे कधी उदयाला येईल की नाही ते माहीत नाही. हा सांगीतिक ठेवा वेगळा आणि अनमोल आहे आणि कितीही ऐकलं तरी मन भरत नाही हेच खरं ! काय मग, आज एक तरी गाणं नक्की ऐकणार ना ? वेंजॉय !! काही तूनळी लिंका : मेड इन इंडिया - https://www.youtube.com/watch?v=IvloHsmi_vg गोरी 'तेरी आँखें कहें - https://www.youtube.com/watch?v=Wb2E2Nh2Stk तनहा दिल तनहा सफर - https://www.youtube.com/watch?v=__qkzfWhi6g माईरी याद वो आई - https://www.youtube.com/watch?v=KLe3ObP2EL0 आँखों मैं 'तेरा ही चेहरा - https://www.youtube.com/watch?v=roJL3mIueTE डूबा डूबा रहता हूँ - https://www.youtube.com/watch?v=Y5OQAIjjrag
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
44407 वाचन

💬 प्रतिसाद (202)

प्रतिक्रिया

नव्वदीच्या दशकातली एकंदर

आदूबाळ
Mon, 09/26/2016 - 19:38 नवीन
नव्वदीच्या दशकातली एकंदर गाणीच मस्त होती.
  • Log in or register to post comments

याची काही मदत होईल काय ?

सतरंगी_रे
Sat, 10/15/2016 - 04:02 नवीन
https://www.youtube.com/watch?v=IvloHsmi_vg&list=PLCoeQgGNgUAcMdeKWYNXXZuOPy0QKX2nQ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मै इस धागेपर लै म्हणजे लै

अभ्या..
Mon, 09/26/2016 - 19:42 नवीन
मै इस धागेपर लै म्हणजे लै लिखनेवाला हूं. . बादमे. अभी दस्ती डालताय.
  • Log in or register to post comments

आवडले

इरसाल
Mon, 09/26/2016 - 19:44 नवीन
मस्त वाटलं सगळ आठवुन. धन्यवाद !
  • Log in or register to post comments

मस्त धागा. जुन्या आठवणी जाग्या झाल्या

धर्मराजमुटके
Mon, 09/26/2016 - 19:50 नवीन
मस्त धागा. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आमचं देखील एक आवडतं गाण अ‍ॅडवा. ढम ढम ढमक ढोला रे
  • Log in or register to post comments

आहा...मस्तं धागा.

पद्मावति
Mon, 09/26/2016 - 19:55 नवीन
आहा...मस्तं धागा. तनहा दिल....खूप आवडीचं. जाएँगे हम तो बॉलीवुड...नो नो नो...हॉलीवुड.. परी हूं मै.... याद पिया की आने लगी...
  • Log in or register to post comments

खूप छान धागा

मंदार कात्रे
Mon, 09/26/2016 - 19:56 नवीन
खूप छान धागा ९० ची इंडिपॉप सॉंग्स माझीदेखील खूपच आवडती आहेत
  • Log in or register to post comments

आरारा कल्लाच धागा न राव!,

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 09/26/2016 - 20:00 नवीन
आरारा कल्लाच धागा न राव!, गाण्यातील ठेके जर ग्राह्य धरले तर कॉलोनिअल कझीन्सचे "ओ हो काय झालं काय पाहुणे अहो काय झालं" सुद्धा मोजायला हवे यादीत, त्याकाळी एक एक गायक/गट एक एक लेजेन्ड होते राव, लकी अली चे सिफर वगैरे तर अक्षरशः घासून गुळगुळीत केलेले, आम्ही आठवीत असताना आलेला शंकर महादेवनचा "ब्रेथलेस" चा प्रयोग, त्या कॅसेट सोबतीनेच त्याच लयीत ते गाणे म्हणायचे केलेले निष्फळ प्रयत्न, सगळे आठवले, पुढे काहीवर्षे अनिश्चिततेची असलेली हवा, कधी भविष्याच्या विचाराने जीव कातर झाला की हेडफोन लावून अंधाऱ्या खोलीत एकटेच शानचे "तनहा दिल" ऐकणे, 'आखों मे सपने लिये घर से हम चल तो दिये, जाने ये राहे अब ले जायेंगी कहां" ऐकून आलेला एक चोरटा अश्रू , सगळे सगळे आठवले, पौगंडावस्था सुरु होऊन जवानीमध्ये पाऊल ठेवुस्तोवर ह्या अनमोल खजिन्याने मोलाची साथ दिली आहे, त्याची आठवण करून दिल्याबद्दल आपले पुन्हा एकवार आभार मानतो ___/\___
  • Log in or register to post comments

आरारा कल्लाच धागा न राव!

तुषार काळभोर
Mon, 09/26/2016 - 21:13 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

'आखों मे सपने लिये घर से हम

पद्मावति
Mon, 09/26/2016 - 20:04 नवीन
'आखों मे सपने लिये घर से हम चल तो दिये, जाने ये राहे अब ले जायेंगी कहां" ऐकून आलेला एक चोरटा अश्रू +१ मला आजही हे गाणं ऐकलं की डोळ्यात पाणी येतं.
  • Log in or register to post comments

खरंय

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 09/26/2016 - 20:08 नवीन
खरंय त्याच अल्बम मध्ये अजून एक गाणे होते बहुतेक "भूल जा जो हुआ उसे भूल जा है कसम तुझे" ते सुद्धा लैच क्लास वाटत असे गाणे, खासकरून त्यातल्या ड्रम सेट्सच्या उत्तम वापरामुळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

सालं कलोनियल कझिन्सची पहिला

A.N.Bapat
Mon, 09/26/2016 - 20:16 नवीन
सालं कलोनियल कझिन्सची पहिला अल्बम(1996 मध्ये रिलीज आलेला) मॅग्ना साउंड कंपनी बंद झाल्यामुळे दुर्मिळ झालाय. माझा गहाळ झालाय. कोणी माहिती देऊ शकेल का याविषयी ?7
  • Log in or register to post comments

मस्त आठवण .

वरुण मोहिते
Mon, 09/26/2016 - 20:20 नवीन
दहावीच्या आतच होतो तेव्हा त्यामुळे विशेष लक्षात आहेत
  • Log in or register to post comments

वाखु साठवली आहे. कलेक्शन MP3

मोदक
Mon, 09/26/2016 - 20:39 नवीन
वाखु साठवली आहे. कलेक्शन MP3 मध्ये हवे असल्यास भेटल्यावर देतो. ;)
  • Log in or register to post comments

हा माझ्या प्रश्नाला प्रतिसाद

A.N.Bapat
Mon, 09/26/2016 - 20:56 नवीन
हा माझ्या प्रश्नाला प्रतिसाद होतात दिला होतात का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

नाही.

मोदक
Mon, 09/26/2016 - 21:18 नवीन
नाही. मी इंडीपॉपची बरीच गाणी व्हिडीओ साँग + ऑडिओ साँग अशी कलाकारांच्या नावानुसार विभागणी करून साठवली आहेत. मापं त्याचे फॅन असतील हे माहिती नव्हते. म्हणून त्यांना म्हणालो की भेटल्यावर देतो. बादवे - तुम्ही म्हणत आहात ते गाणे माझ्याकडे नाहीये. आता शोधतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: A.N.Bapat

गाणं नाही , अल्बम होता तो ,

A.N.Bapat
Mon, 09/26/2016 - 21:23 नवीन
गाणं नाही , अल्बम होता तो , कलोनियल कॅझिन्स हेच नाव होतं बहुधा. गाणी 6- 7 होती , त्यातली , सानिधपमग रेसा , आणि कृष्णा खूप गाजली. उरलेलीही उत्तमच होती. सापडल्यास कधी कुठे येऊ सांगा , पळत येतो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

ओके..!!

मोदक
Mon, 09/26/2016 - 21:26 नवीन
ओके..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: A.N.Bapat

हे बघा

देश
Mon, 09/26/2016 - 22:23 नवीन
http://gaana.com/artist/colonial-cousins
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: A.N.Bapat

धन्यवाद, डाऊन लोडून बघतो.

A.N.Bapat
Tue, 09/27/2016 - 08:36 नवीन
धन्यवाद, डाऊन लोडून बघतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देश

धुम पिचक धूम राहिलं की.

अनुप ढेरे
Mon, 09/26/2016 - 20:42 नवीन
धुम पिचक धूम राहिलं की. युफोरिआचं!
  • Log in or register to post comments

धुम पिचक...

अनुप ढेरे
Mon, 09/26/2016 - 20:45 नवीन
  • Log in or register to post comments

याशिवाय

अनुप ढेरे
Mon, 09/26/2016 - 20:47 नवीन
मुझे मिल जो जाये थोडा पैसा हे गाणं अनेक दिवस फेवरीट होतं. :)
  • Log in or register to post comments

हाहाहा हे गाणे खल्लासच आगोश

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 09/26/2016 - 21:10 नवीन
हाहाहा हे गाणे खल्लासच आगोश (आनंद गोपाल अन शालीन) चे हे गाणे तुफान आवडे, हम भी होंगे उनके जैसे पर कैसे!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

त्यांचं सनी देओल आणि सुश्मिता सेन यांच्या

बोका-ए-आझम
Mon, 09/26/2016 - 21:17 नवीन
जोर मधलं 'मै कुडी अंजानी हो ' हे हेमा सरदेसाईने गायलेलं गाणं पण मस्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

शुभा मुद्गल - अब के सावन द

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 09/26/2016 - 21:11 नवीन
शुभा मुद्गल - अब के सावन द बेस्ट!
  • Log in or register to post comments

आख्खा अल्बम म्हणत आहात की ते

मोदक
Mon, 09/26/2016 - 21:19 नवीन
आख्खा अल्बम म्हणत आहात की ते एकच गाणे..? सीखो ना, डेरे डेरे, अब के सावन वगैरे भन्नाट गाणी होती त्या अल्बम मध्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

एकदम मस्त अल्बम . शुभा

A.N.Bapat
Mon, 09/26/2016 - 21:25 नवीन
एकदम मस्त अल्बम . शुभा मुद्गलांचा title ट्रॅक चा सॉफ्ट रॉक न रोल ऐकायला तुफान धमाल येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

युफोरियाच्या एका गाण्यात शुभा

मोदक
Mon, 09/26/2016 - 21:28 नवीन
युफोरियाच्या एका गाण्यात शुभा मुद्गल यांनी खड्या आवाजात एक सुरावट गायली आहे ती माहिती आहे का..? मला माहिती आहे.. मुद्दाम सांगत नाहीये. माहिती नसल्यास जरूर शोधा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: A.N.Bapat

हो....मला माहीत आहे

माम्लेदारचा पन्खा
Mon, 09/26/2016 - 21:37 नवीन
लय भारी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

धुम पिचक ना?

अनुप ढेरे
Mon, 09/26/2016 - 21:51 नवीन
धुम पिचक ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

येस्स..!!!!

मोदक
Tue, 09/27/2016 - 16:14 नवीन
येस्स..!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

अरे वा! मस्तच!

बोका-ए-आझम
Mon, 09/26/2016 - 21:15 नवीन
माझी आवडती इंडीपाॅप गाणी - १. छुईमुई सी तुम लगती हो - मिलिंद इंगळे आणि पडद्यावर अब्बास आणि प्रीती जांगियानी. प्रीती अप्रतिम दिसते आणि हे गाणं तर अजूनही चिरतरुण आहे. २. परी हूं मै - सुनीता राव. याचा ठेका निव्वळ वेड लावणारा. ३. तू - सोनू निगम - सोनू आणि बिपाशा बासू असलं वीअर्ड काँबिनेशन असलेलं हे गाणं सोनूने मस्त गायलंय. ४. बिजुरिया - सोनू निगम - हे धमाल विनोदी भुताटकी गाणं आहे. ५. चांदनी राते - कोण गायक आहे आठवत नाही. बहुतेक इन्स्टंट कर्मा. सब जग सोये,हम जागे; तारों से करे बाते,चांदनी रातें - हे इतकं सुंदर शब्द असलेलं गाणं! ६. अबके सावन ऐसे बरसे - शुभा मुद्गल - शुभा मुद्गलचा बुलंद आवाज आणि पहिला पाऊस! ७. ढगाला लागली कळ - गायक माहीत नाही - दादा कोंडकेंच्या मूळ गाण्याचं रिमिक्सही भन्नाट होतं. ८. पिया बसंती रे - सुलतान खान आणि चित्रा - खांसाहेबांचा खानदानी खर्ज आणि चित्राजींचा थोडा चढा आणि शार्प आवाज यांचं हे काँबिनेशन सुसाट होतं. ९. अाफरीन - नुसरत फतेह अली खान - जावेद अख्तर आणि नुसरत फतेह अली खान ही जोडी अजोड! या गाण्याचं चित्रीकरणही छान आहे. जैसलमेर, लिसा रे, नुसरतजींचा आवाज आणि जावेदजींचे शब्द! १०. याद पियाकी आने लगी - फाल्गुनी पाठक - या गाण्याच्या चित्रीकरणासाठी आणि संकलनासाठी मी स्वतः काम केलेलं असल्यामुळे याचं स्थान माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, गाणं एवढं खास नसलं तरीही!
  • Log in or register to post comments

परी हूं मै चा ठेका लेस्ली

अभ्या..
Mon, 09/26/2016 - 23:15 नवीन
परी हूं मै चा ठेका लेस्ली लुईस चा होता. त्याच बीटस त्याने नंतर "भीगी भीगी रातोंमे, ऐसी बरसातोमें" रिमिक्सला अ‍ॅज ईट ईज वापरल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

याद पियाकी आने लगी - फाल्गुनी

पद्मावति
Mon, 09/26/2016 - 21:32 नवीन
याद पियाकी आने लगी - फाल्गुनी पाठक - या गाण्याच्या चित्रीकरणासाठी आणि संकलनासाठी मी स्वतः काम केलेलं असल्यामुळे याचं स्थान माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, गाणं एवढं खास नसलं तरीही!......वाह, काय मस्तं. क्या बात है बोका- ए आझम....क्लास!!!!!! माझ्या अत्यंत आवडीचं गाणं. चित्रीकरण अप्रतिम. हे गाणं ऐकण्यापेक्षा पाहाणे जास्ती सुखद आहे.
  • Log in or register to post comments

फाल्गुनी पाठक स्वतः टॉम बॉईश

अभ्या..
Mon, 09/26/2016 - 23:09 नवीन
फाल्गुनी पाठक स्वतः टॉम बॉईश लुक असला तरी आवाज अत्यंत पातळ अन गोड वाटे. तिच्या व्हिडिओतल्या पोरी मात्र भारी भारी असायच्या.(ईंधना मेरवा ह्यातली ती मंद सोडून) याद पियाकी ला बहुतेक रिया सेन होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

फाल्गुनी पाठकचं "ओ पिया ओ

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 09/27/2016 - 06:20 नवीन
फाल्गुनी पाठकचं "ओ पिया ओ पिया लेके डोली आ" हे त्या पातळ आवाजाचा अजून एक नमुना ठरावं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

रिया सेन, रिचा पल्लोड

बोका-ए-आझम
Tue, 09/27/2016 - 14:18 नवीन
आणि अजून दोघी होत्या. त्या माझ्याशी गप्पा मारायच्या नाहीत त्यामुळे त्यांची नावं लक्षात नाहीत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

रिया सेन किती गोड दिसायची

पद्मावति
Tue, 09/27/2016 - 14:22 नवीन
रिया सेन किती गोड दिसायची तेव्हा. पण तरीही तिच्या आईची सर नाहीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

रिया सेनने गप्पा मारल्या तरी

अभ्या..
Tue, 09/27/2016 - 14:24 नवीन
रिया सेनने गप्पा मारल्या तरी समजायला पाहिजेत ना आप्ल्याला. तिचे हिंदी ऐकून फाडफाड मारावे वाटते. देव हुशार आहे. सगळेच कसे देणार म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

=)) खरंय अभ्या..

पद्मावति
Tue, 09/27/2016 - 14:39 नवीन
=)) खरंय अभ्या.. रिया सेन सुरेख आहे पण थोडीशी डंब वाटते. तिची बहीण एकदम गोड आणि तरतरीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

जे दिलेय ते भरपूर आहे की ;)

टवाळ कार्टा
Tue, 09/27/2016 - 14:40 नवीन
जे दिलेय ते भरपूर आहे की ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

जे दिलेय ते भरपूर आहे की ;)

मदनबाण
Tue, 09/27/2016 - 15:41 नवीन
जे दिलेय ते भरपूर आहे की ;) अस्मित पटेल ने तर "टेस्ट" करुन पाहिले आहे... ;) असो... हो गयी है मोहब्बत तुमसे... हे गाणं पहा, मस्त आहे ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- KALI (electron accelerator)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ती डम्ब दिसते, प्रत्यक्षात अजिबात नाहीये.

बोका-ए-आझम
Tue, 09/27/2016 - 14:42 नवीन
रिचा पल्लोडला दुर्दैवाने चांगली दिसत असून आणि अभिनयही ठीकठाक असूनपण चान्स नाही मिळाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

याद पिया की आने लगी

बोका-ए-आझम
Tue, 09/27/2016 - 14:49 नवीन
http://youtu.be/Xna3I11v9Vs
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

बूम बूम!

एस
Mon, 09/26/2016 - 22:04 नवीन
बूम बूम!
  • Log in or register to post comments

भारतात चित्रपटसंगीताने बाकीचे

एस
Mon, 09/26/2016 - 22:07 नवीन
भारतात चित्रपटसंगीताने बाकीचे सगळे गाणे खाऊन टाकले! 'मेड इन इंडिया' नंतर आलिशा चिनॉयला तशाच हिटसाठी 'कजरारे कजरारे' पर्यंत वाट पहावी लागली.
  • Log in or register to post comments

आलिशाचे करम मधले 'तिनका तिनका

अभ्या..
Mon, 09/26/2016 - 23:10 नवीन
आलिशाचे करम मधले 'तिनका तिनका' छान होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

हो गयी है मोहब्बत तुमसे...वन ऑफ माय फेवरेट साँग

शिद
Mon, 09/26/2016 - 22:28 नवीन
  • Log in or register to post comments

लिफ्ट करा दे वाल्या अदनान

किसन शिंदे
Mon, 09/26/2016 - 22:29 नवीन
लिफ्ट करा दे वाल्या अदनान सामीला विसरलात काय? तुफान हिट झालेले गाणे होते ते.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा