हिशेब
हिशेब
मागच्या रविवारी संध्याकाळी बायको बरोबर फिरायला गेलो होतो. (मुळात सगळ्या संध्याकाळी आमच्या दवाखान्यात जात असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.) तेंव्हा आमची एक भाची रुचिरा तिथे फिरताना दिसली. नमस्कार चमत्कार झाल्यावर तिला विचारले एकटी इकडे कुठे फिरते आहेस. त्यावर ती म्हणाली आम्ही इथे जवळच नवीन घर घेतले आहे. आणि आग्रहाने ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली.
सगळे घर दाखवले कुठे काय कसे घर सजवले आहे हे बोलणे चालू होते. ऋतुजा ( तिची मुलगी) आता ५ वर्षांची झाली. ती कुठल्या शाळेत जाते. रुचिराच्या घरी तीन बायका कामाला आहेत. एक दोन्ही वेळचा स्वयंपाक करते. एक झाडू मारणे लादी पुसणे, भांडी घासणे इ स्वच्छतेची कामे करते आणि तिसरी वरकामाला .
घरी चहापाणी अवांतर गप्पा चालू असताना चालू असताना मी तिला विचारले चिन्मय (तिचा नवरा) कुठे आहे? ती म्हणाली तो ऋतुजाला( तिच्या मुलीला) घेऊन फिरायला गेला आहे.
चिन्मय हा एका मुंबईतील मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत चांगल्या पगारावर आहे.
मी रुचिराला विचारले मग तुम्ही एकत्र का जात नाही? त्यावर ती म्हणाली कि पाच दिवस मी ऋतुजाला सांभाळते मग शनिवार रविवार चिन्मयने सांभाळायला नको का? ती त्याची ड्युटी आहे. मी विचारले म्हणजे तो काय काय करतो? ती म्हणाली त्या दोघांना सुटीचा असते. मग तो तिला उठवतो ब्रेकफास्ट करवतो अंघोळ घालतो जेवायलाही घालतो. दोन दिवस तिची पूर्ण काळजी त्यानेच घ्यायची.शनिवार रविवार मला पूर्ण फ्री
माझ्या तोंडावर आले होते कि मग शनिवार रविवार तू नोकरी करायला जातेस का? पण मी थांबलो.
बाहेर पडल्यावर बायको म्हणाली हि घरीच तर असते (गृहिणी) आहे. नवरा बिचारा सालस आहे पाच दिवस मानेवर खडा ठेवून काम करतो भरपूर पैसे मिळवतो. हि इथे राणीसारखी राहते. मग हा कसला हिशेब?
पाच दिवस मी सांभाळते तर दोन दिवस नवऱ्याने पूर्ण वेळ सांभाळायचे.
घरात कामाला तीन बायका आहेत.चांगले नउ हजार रुपये बायकांवर खर्च करते आहे.(चहा पाण्याच्या वेळेस स्वयंपाकघरात हि माहिती काढून झाली होती). मुलगी चार तास शाळेत जाते. सगळ्या कामाला बायका आहेत. पाच दिवस आरामच तर असतो. मग दोन दिवस मुलीला संपूर्ण नवर्याकडे द्यायचे हा कसला हिशेबीपणा.
मी अजून विचार करतो आहे. आपलीच भाची आहे ती बरोबर का बायको म्हणते ते बरोबर?
(सत्यकथा नावे बदलून)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
शिवाय तिचा अविर्भाव तसा आहे
स्रुजा ताईतिला घरी बसून काय
spot on
हा प्रतिसाद खटपट्या भाऊंसाठी
मी कधी असं म्हणालो...
+ इन्फिनिटी
बऱ्याच वेळा प्रतिसाद चुकीच्या
+१०००!! आम्हाला कोणीतरी पेढे
पेढे देण्याची 'ड्यूटी'
ड्युटी =))
बोलाचे पेढे आणि बोलाचेच
बाकी, ते छिद्रांन्वेषी म्हणजे
काय ठरलं मग ?
की पेढे खाऊनच हलायचं इथुन.
ओके, पण ती भाची बरोबर आहे? का
मग त्या तिघिंनाही पेढे द्यावे
आणि त्या तिघी बायकाच
आधी त्यांच्या पगाराचे बघा,
मग ! आराम स्वस्त नसतो..
अगदी! काय बात केलीस!
तीन मोलकरणी
छे बुवा! यांचं काहीही ठरत नाहीये.
एवढ्या हळू धागा चालला तर पेढे
किती मेला तो पेढ्या -
खरंच करायचेत का २००?
अहो पण कीती उगाळणार? मुद्दे
हितेश
सुंदर, अतिसुंदर... 'दिर्घ
या आठवड्यातील अनमोल
फारच गंडला धागा.छ्यॅ! ना पेढे
बाकी चालू द्या,
खरं सांगतो नीलमोहोर,
पेढा उचलून तोंडात टाकायला तरी
तेवढे कष्ट तरी कशाला म्हणतो
अय्या, किती गोड !!
खरं सांगतो नीलमोहोर,
अर्रर्रर !!!
तुम्ही असली वाक्ये मुद्दामून
दू दू कोंडके :) :) :) :)
बरं झालं निमो ला जाऊन +१ नाही
नीमोतै
बोकोबा इत्ता भी नै जानता
चेष्टा करता का खरंच विचारता,
चेष्टा नाही, खरंच विचारलं.
आमचेही तसेच हो,
धागा विषयाला योगदान देण्याची पात्रता नाही मात्र
ते कुठलस एक गाव आहे हो तिथला
ते कुठलस एक गाव आहे हो तिथला पेढा पण नाव कन्फ्युजलोय कवरुन का काय कर्नाटकाजवळच्या सीमेवरील गावातऐनापुरी पेढा.अहो आत्ता आठवला
मी कुंथलगिरी सांगणार होतो पण
हो ते कर्नाटक बॉर्डर चा उल्लेख चुकलोच खर म्हणजे