हिशेब
हिशेब
मागच्या रविवारी संध्याकाळी बायको बरोबर फिरायला गेलो होतो. (मुळात सगळ्या संध्याकाळी आमच्या दवाखान्यात जात असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.) तेंव्हा आमची एक भाची रुचिरा तिथे फिरताना दिसली. नमस्कार चमत्कार झाल्यावर तिला विचारले एकटी इकडे कुठे फिरते आहेस. त्यावर ती म्हणाली आम्ही इथे जवळच नवीन घर घेतले आहे. आणि आग्रहाने ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली.
सगळे घर दाखवले कुठे काय कसे घर सजवले आहे हे बोलणे चालू होते. ऋतुजा ( तिची मुलगी) आता ५ वर्षांची झाली. ती कुठल्या शाळेत जाते. रुचिराच्या घरी तीन बायका कामाला आहेत. एक दोन्ही वेळचा स्वयंपाक करते. एक झाडू मारणे लादी पुसणे, भांडी घासणे इ स्वच्छतेची कामे करते आणि तिसरी वरकामाला .
घरी चहापाणी अवांतर गप्पा चालू असताना चालू असताना मी तिला विचारले चिन्मय (तिचा नवरा) कुठे आहे? ती म्हणाली तो ऋतुजाला( तिच्या मुलीला) घेऊन फिरायला गेला आहे.
चिन्मय हा एका मुंबईतील मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत चांगल्या पगारावर आहे.
मी रुचिराला विचारले मग तुम्ही एकत्र का जात नाही? त्यावर ती म्हणाली कि पाच दिवस मी ऋतुजाला सांभाळते मग शनिवार रविवार चिन्मयने सांभाळायला नको का? ती त्याची ड्युटी आहे. मी विचारले म्हणजे तो काय काय करतो? ती म्हणाली त्या दोघांना सुटीचा असते. मग तो तिला उठवतो ब्रेकफास्ट करवतो अंघोळ घालतो जेवायलाही घालतो. दोन दिवस तिची पूर्ण काळजी त्यानेच घ्यायची.शनिवार रविवार मला पूर्ण फ्री
माझ्या तोंडावर आले होते कि मग शनिवार रविवार तू नोकरी करायला जातेस का? पण मी थांबलो.
बाहेर पडल्यावर बायको म्हणाली हि घरीच तर असते (गृहिणी) आहे. नवरा बिचारा सालस आहे पाच दिवस मानेवर खडा ठेवून काम करतो भरपूर पैसे मिळवतो. हि इथे राणीसारखी राहते. मग हा कसला हिशेब?
पाच दिवस मी सांभाळते तर दोन दिवस नवऱ्याने पूर्ण वेळ सांभाळायचे.
घरात कामाला तीन बायका आहेत.चांगले नउ हजार रुपये बायकांवर खर्च करते आहे.(चहा पाण्याच्या वेळेस स्वयंपाकघरात हि माहिती काढून झाली होती). मुलगी चार तास शाळेत जाते. सगळ्या कामाला बायका आहेत. पाच दिवस आरामच तर असतो. मग दोन दिवस मुलीला संपूर्ण नवर्याकडे द्यायचे हा कसला हिशेबीपणा.
मी अजून विचार करतो आहे. आपलीच भाची आहे ती बरोबर का बायको म्हणते ते बरोबर?
(सत्यकथा नावे बदलून)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बीड ते बार्शी च्या मधोमध आहे.
..आणि ते बॉर्डरला वगैरे
थोड कुंथुन झाल्यावर आठवल
कुंथुनाथ?
नको बोकेशा. इस्टॉप इथेच.
तात्पर्य
ते ठाण्याचे एक मिपाकर साहेब
अगागागागा......
काका मामा नाही
आणि
किंवा सरळ म्हणा, "तुम्हाला
जनरेशन गॅप?
बाकी पेढ्यांच म्हणाल तर
हाय की नाही.. मंग म्हंता मले
गुळपट्टी!
आवं कोन्या जमान्यात रायता
त्या बाकीच्या गंजाले आग लावा
अहो ते लय जुनी बात हाय बाप्पू
चला, पुण्यात आता कापशीचे
हे पाहून घ्या आता..मंग म्हंता
कापशीचे पेढे!!!! गांधीग्राम
खुरासनी मिर्ची?
म्हणजे बहुतेक तेलात तळलेल्या
लवंगी मिर्चीला खुरासनी
ती मिर्ची खाण्याचा योग एकदा आला होता.
ती मिर्ची खाण्याचा योग एकदा आला होता.
काय तरी चर्चा चाललीय बै!
बोट
आरा गप की मुडद्या
आरा गप की मुडद्या
गपलो. . . पेढे दे की.
डॉ. तुमच्या भाचीने एवढ्या
अहो सक्खी नाही म्हणून तर
तरीच.....
लोल.. कुणाचं काय तर कुणाचं
आता वाटायचे का पेढे?
कोण का म्हणेना.. मी तुला पेढे
तू? "पेढे" देणारेस?? आँ????!!
तू? "पेढे" देणारेस?? आँ????!!
201 झाले.
झाले एकदाचे २००, धागा फॉलो
अरे आता खरी ग्रीप पकडली
२०१४ ला अडवाणींनी हाच विचार
=)) लैच खंग्री कॉमेंट सुचली
टाका की इथे बापू.. टाईमपासच
नगं नंतर पहाय यिल
झालं का...!? तेवढंच राहिले
दोनहजारचौदामे हमने खाया खस्ता
कुछ मीठा हो जाए,
सर्वांनी लायनीत या पोरींची