Skip to main content

हिशेब

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 01/09/2016 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
हिशेब मागच्या रविवारी संध्याकाळी बायको बरोबर फिरायला गेलो होतो. (मुळात सगळ्या संध्याकाळी आमच्या दवाखान्यात जात असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.) तेंव्हा आमची एक भाची रुचिरा तिथे फिरताना दिसली. नमस्कार चमत्कार झाल्यावर तिला विचारले एकटी इकडे कुठे फिरते आहेस. त्यावर ती म्हणाली आम्ही इथे जवळच नवीन घर घेतले आहे. आणि आग्रहाने ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली. सगळे घर दाखवले कुठे काय कसे घर सजवले आहे हे बोलणे चालू होते. ऋतुजा ( तिची मुलगी) आता ५ वर्षांची झाली. ती कुठल्या शाळेत जाते. रुचिराच्या घरी तीन बायका कामाला आहेत. एक दोन्ही वेळचा स्वयंपाक करते. एक झाडू मारणे लादी पुसणे, भांडी घासणे इ स्वच्छतेची कामे करते आणि तिसरी वरकामाला . घरी चहापाणी अवांतर गप्पा चालू असताना चालू असताना मी तिला विचारले चिन्मय (तिचा नवरा) कुठे आहे? ती म्हणाली तो ऋतुजाला( तिच्या मुलीला) घेऊन फिरायला गेला आहे. चिन्मय हा एका मुंबईतील मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत चांगल्या पगारावर आहे. मी रुचिराला विचारले मग तुम्ही एकत्र का जात नाही? त्यावर ती म्हणाली कि पाच दिवस मी ऋतुजाला सांभाळते मग शनिवार रविवार चिन्मयने सांभाळायला नको का? ती त्याची ड्युटी आहे. मी विचारले म्हणजे तो काय काय करतो? ती म्हणाली त्या दोघांना सुटीचा असते. मग तो तिला उठवतो ब्रेकफास्ट करवतो अंघोळ घालतो जेवायलाही घालतो. दोन दिवस तिची पूर्ण काळजी त्यानेच घ्यायची.शनिवार रविवार मला पूर्ण फ्री माझ्या तोंडावर आले होते कि मग शनिवार रविवार तू नोकरी करायला जातेस का? पण मी थांबलो. बाहेर पडल्यावर बायको म्हणाली हि घरीच तर असते (गृहिणी) आहे. नवरा बिचारा सालस आहे पाच दिवस मानेवर खडा ठेवून काम करतो भरपूर पैसे मिळवतो. हि इथे राणीसारखी राहते. मग हा कसला हिशेब? पाच दिवस मी सांभाळते तर दोन दिवस नवऱ्याने पूर्ण वेळ सांभाळायचे. घरात कामाला तीन बायका आहेत.चांगले नउ हजार रुपये बायकांवर खर्च करते आहे.(चहा पाण्याच्या वेळेस स्वयंपाकघरात हि माहिती काढून झाली होती). मुलगी चार तास शाळेत जाते. सगळ्या कामाला बायका आहेत. पाच दिवस आरामच तर असतो. मग दोन दिवस मुलीला संपूर्ण नवर्याकडे द्यायचे हा कसला हिशेबीपणा. मी अजून विचार करतो आहे. आपलीच भाची आहे ती बरोबर का बायको म्हणते ते बरोबर? (सत्यकथा नावे बदलून)

वाचने 61435
प्रतिक्रिया 291

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

अहो पण तुम्हाला जर हे बरोबर वाटत नाही तर मुळात धागा काढलाच कशाला? धागा काढुन वर अशी चर्चा करणं चुक आहे असं तुम्हीच कसं काय म्हणताय? आणि त्यात आम्हालाही ओढताय? आणि हे असं करणं चुक आहे हेच सांगायला आम्ही प्रतिसाद देतोय, अर्धवट माहितीवर तिर्‍हाईंताबद्दल चवीचवीनी चर्चा करायला नाही.

In reply to by पिलीयन रायडर

मला वाटते इथून पुढे मिपावर तिऱ्हाईत व्यक्तीबद्दल चर्चा करणाऱ्या धाग्यांना बंदी असावी. कुणाच्या खाजगी आयुष्याबद्दल अशा सार्वजनिक ठिकाणी चर्चा करण्याचा हक्क कुणालाच असू नये.

In reply to by पिलीयन रायडर

लोकांना स्वतःच्या पेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यात जास्त "रस" असतो. यात "तुम्हाला जर हे बरोबर वाटत नाही" हे कुठे आले

In reply to by सुबोध खरे

अच्छा म्हणजे तुम्ही धागा काढुन वर बोकाभाऊंशी "लोकांना दुसर्‍यांच्या भनगडीत नाक खुपसायची आवड असते" ह्याला सहमत होऊन परत वर "तुम्ही आणि मी सुद्धा आलोच लोकांमध्ये" असं म्हणुन आता "मला हे बरोबर वाटत नाही असं कुठे म्हणलो" असं विचारताय.. म्हणजे लोकांच्या भानगडीत नाक खुपसणे चुक नाही असे तुम्हाला वाटते तर... कारण हा धागा त्याचेच उदाहरण आहे.. काका, उगाच खुसपट काढायचे म्हणुन नाही तर वर एका प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे तुम्ही असे धागे काढण्याचं फार आश्चर्य वाटत आहे..

In reply to by पिलीयन रायडर

यात कुणाचीही भानगड नाही की कुणी त्यात नाक खुपसत नाही. आजकालच्या काही मुलींची विचारसरणी कशी असते हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. बरोबर की चूक हे ज्याच्या त्याच्या बुद्धी प्रमाणे ज्याने त्याने ठरवायचे आहे. कुणाचेही नाव न घेता एक जेनेरिक गोष्टसांगितली आहे. गमतीत लिहीले तर त्याचा उलटा अर्थ काढाल असे वाटले नव्हते. आसो.

In reply to by सुबोध खरे

आजकालच्या काही मुलींची विचारसरणी कशी असते हे दाखवण्याचा प्रयत्न आहे.
मला तरी या धाग्यात काही पुरुषांची च मानसिकता दिसतीये, आणि मी ताकाला जाऊन भांडं लपवत नाही त्यामुळे ती मला चुकीची वाटते आहे हे सरळ सांगते.

In reply to by स्रुजा

फक्त पुरषांची मानसिकता दिसते? ती मुलगी हक्काने नवर्‍याकडून काम करवून घेते दे दीसत नाही का? आणि तीचा अविर्भाव असा आहे की "आठवड्यातून दोन दीवस केलेच पाहीजे असा आहे" अशी ऑफीससारखी कामे वाटून घेतल्यावर काय मजा त्या संसारात? काँट्रॅक्ट आहे की काय?

In reply to by खटपट्या

अहो खटपट्या भाऊ, धाग्यात दिसतीये, प्रतिसादांत नाही. आणि सांगते उलगडुन @ खरे काका, थोड्यावेळाने.

In reply to by खटपट्या

अहो पण तुम्हाला / मला हे कुठं माहितिये की तो कुठं आणि कसा कमी पडला म्हणून असं भजं झालय? वर दिसतं त्यापेक्षा वेगळं असू शकेल याची धडधडीत शक्यता दिसतिये ना!

In reply to by खटपट्या

शिवाय तिचा अविर्भाव तसा आहे हे खर्‍यां चं मत आहे. तुम्ही आम्ही नुसतंच वाचलंय. खरं बघता "डुटी" हा शब्द कुणी "काँट्रॅक्ट मध्ये आहे म्हणुन" या अर्थाने वापरणं अतर्क्य वाटतं, हा गमतीचाच भाग असण्याची शक्यता जास्त आहे. त्यात देखील दोघं मिळुन मुलाला फिरवायला नेत नाहीत हा एक चर्चेचा मुद्दा होऊ शकतो पण तिला घरी बसून काय काम आहे की तिने शनिवार रविवार पण आराम करावा हा सूर का बरं ?

In reply to by स्रुजा

स्रुजा ताई तिला घरी बसून काय काम आहे की तिने शनिवार रविवार पण आराम करावा हा सूर का बरं ? हे समजले नाही

In reply to by अभिजीत अवलिया

बऱ्याच वेळा प्रतिसाद चुकीच्या जागी पडतात. + इन्फिनिटी हा प्रतिसाद पिरा ताईंच्या खालील कॉमेंट ला होता. अच्छा म्हणजे तुम्ही धागा काढुन ---- फार आश्चर्य वाटत आहे..

In reply to by पिलीयन रायडर

+१०००!! आम्हाला कोणीतरी पेढे वगैरे बोलले होते मिळणार म्हणून ! म्हणून उगा टेकलो अंमळ! आम्ही नाय बाबा धागा विषयात काही बोललो!

In reply to by अजया

बोलाचे पेढे आणि बोलाचेच सत्कार............ आम्ही एवढी प्रतिसाद मंडळे स्थापन करून बसलोय, मेगाबायटी प्रतिसादांबद्दल कधी एक साखर्फुटाणा दृष्तीला पडला नैय्ये......

बाकी, ते छिद्रांन्वेषी म्हणजे काय ते कोण सांगेल काय? वरवर बघणारे किंवा फाटक्यात बोट घालून आणखी फाडून बघणारे कि अजून तिसराच काही अर्थ आहे?

In reply to by खटपट्या

की पेढे खाऊनच हलायचं इथुन. सगळ्या शतकी धागा निर्मात्यांनी इथली जनता हालेपर्यंत आपले धागे काढु नयेत.

In reply to by स्रुजा

ओके, पण ती भाची बरोबर आहे? का तीचा नवरा बिचारा आहे? मला वाटतंय की त्या तीन मोलकरणी सत्य परीस्थीती सांगू शकतील...

In reply to by रेवती

आणि त्या तिघी बायकाच असल्यामुळे आपण ते देऊच. "येथे पुरुषांवर अन्याय करुन मिळेल - समस्त स्त्री संघटना "

विकांतास नवरोबास या बायकांपासून लांब ठेवायचा असेल , पुरुषाची जात !! काय भरोसा =)) (ह घ्या)

In reply to by बोका-ए-आझम

एवढ्या हळू धागा चालला तर पेढे-बिढे विसरा, आम्ही दिवसपाली वाल्यानी सव्वाशेवर पोचवला, रातपालिवाल्यानं पाऊणशे करेस्तोवर तांबडं फुटल, तर कसं मिळायचं त्ये पेढं?

In reply to by संदीप डांगे

किती मेला तो पेढ्या - प्रतिसादांचा हिशोब कराल. आमची रात्रभर डुटी लावताय स्वतः झोपुन, किती आराम कराल?

खरंच करायचेत का २००? मग तसे मुद्दे काढा की जरा.. पुढच्या हळदी कुंकु विमानाच्या डायवर सोबत पाठवुन द्या आम्चा पुडा. नेवार्कला उतरवुन घेऊ!

चुकून हितेश वाचलं ... वाटलं डॉक्टरकाकांनी हितेशचा हिशेब केला कि काय :) अवांतर - डॉक्टरकाकांकडे नक्कीच शतकी प्रतिसादाचा कळफलक आहे (सुखी माणसाचा सदरा स्टाईलने वाचावे). असा कळफलक द्या मज आणुनी बडवीन मी जो स्वबोटांनीं भेदून टाकीन सारी मिपा दीर्घ त्याच्या त्या 'पिंका'ळीने

In reply to by संदीप डांगे

या आठवड्यातील अनमोल ठेव अजरामर जांभई आणि ही 'दिर्घ पिंकाळी'. कोण म्हणतं मिपा मराठी साहीत्यात भर घालीत नाही,कुंपणापलिकडच्यांनो उघडा डोळे बघा नीट मिपा वाचक नाखु

आम्हा मिपाबायकांना काहीही न करता, हातपाय न हलवता आयता पेढा हवाय, चितळे वा धारवाडी, कंदी मलई साखरी जंबो गुलकंद चालेल.

In reply to by नीलमोहर

खरं सांगतो नीलमोहोर, लै बेक्कार फिस्स्कन हसू आले. . आणि नुसती पेढ्याची अपेक्षा धरणे शोभत नाही हो आजकालच्या जमान्यात.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तेवढे कष्ट तरी कशाला म्हणतो मी.. आम्ही भरवू की प्रेमाने, -बिच्चारानवराकष्टकरीसंघटना.

In reply to by संदीप डांगे

ठरलं तर मग, संध्याकाळी आपापल्या घरी जाऊन आपापल्या बायकांना आपल्याच हाताने पेढा भरवा सगळे, बापूंना पर्याय की ते कुण्णालाही पेढा भरवू शकतात :) ( बाकी घरी सध्या एकही बाई नाही हो, त्यामुळे हात पाय हलवण्याला पर्याय नाही :)

In reply to by अभ्या..

खरं सांगतो नीलमोहोर, लै बेक्कार फिस्स्कन हसू आले. . आणि नुसती पेढ्याची अपेक्षा धरणे शोभत नाही हो आजकालच्या जमान्यात.
वाईट्ट! =))

In reply to by बोका-ए-आझम

साखरी जंबो गुलकंद हे सर्व दवणे आणि कंपनीच्या पेढ्यांचे ब्रॅन्ड्स आहेत. शिवाय शोरुम मधे तुम्ही आणायला गेलात तर तिथे थोडा संख मारुन द्या थोडं सिसीलीया टॉपींग करुन द्या तर आर्डर प्रमाणे चॉकलेट चुराही मारुन मिळतो.

श्री सोन्याबापु आणि श्री संदीप डांगे यांच्या प्रतिसादांनी मोठा आनंद दिला. त्यासाठी धन्यवाद. बाकी पेढ्यात पेढा कुठला पेढा हा ही एक महत्वाचा विषय माहीत झाला कंदी पेढे, घोडके-चितळे-काका-बेळगाव पेढे (पुण्यनगरी) आणि ते कुठलस एक गाव आहे हो तिथला पेढा पण नाव कन्फ्युजलोय कवरुन का काय कर्नाटकाजवळच्या सीमेवरील गावात त्या गावाच्या नावाने चालतो तो पेढा जास्त माहीत नाही धाग्याची एंटरटेनमेंट व्हॅल्यु न्युसन्स व्हॅल्यु पेक्षा जास्त आहे. कुणा बाहेरच्याला पहील्यांदा मिपा वाचणारा हा धागा दाखवला तर त्याला व्हरायटीने प्रतिसाद व पेढ्यांच्या चक्कर येइल.

In reply to by मारवा

ते कुठलस एक गाव आहे हो तिथला पेढा पण नाव कन्फ्युजलोय कवरुन का काय कर्नाटकाजवळच्या सीमेवरील गावात ऐनापुरी पेढा.

In reply to by मोदक

कुंथलगिरी चा पेढा फेमस आहे फार. मला वाटतं तो खवाच मुळात फेमस आहे. खव्याला खोया ही म्हणतात त्यावरुनच खोया खोया चांद हे गाण आलेल आहे. हे म्हणजे भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली अस एका गटासाठी तर दुसरा गट चंद्रातही खव्याचा गोडवा शोधतो. ऐनापुरी ची व्हॅल्यु अ‍ॅडीशन करुन देण्यासाठी अनेक आभार.

In reply to by संदीप डांगे

ते गाव कुठ आहे नेमक तेच आता आठवत नाही नाव युनिक आहे म्हणुन थोड कुंथुन झाल्यावर आठवल फार पुर्वी एकदा या गावावरुन गेलो होतो इतकच आठवतय कुठे आहे हे गाव ?

In reply to by मारवा

थोड कुंथुन झाल्यावर आठवल
ते जैन् साधू कुंथुनाथामुळे कुंथलगिरी म्हणून प्रसिध्द आहे. जवळच उजनी म्हणून एक गाव आहे तेथे सुंदर खवा अन बासुंदी मिळते. एरीयात खूप खवाभट्ट्या आहेत.

तात्पर्य : इथून पुढे कोणी काका मामानी माहिती विचारली की जपून द्या , शकयतो कमीच द्या

In reply to by कपिलमुनी

मी कुणाचा काका, मामा (झालेलो) नाही हे का लिहिले नाहीस हातासरशी... सुचवणी काका नाखु