✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आज मिपावर पहिल्यांदाच पोस्ट करत आहे .

N
nishapari यांनी
Tue, 07/26/2016 - 22:25  ·  लेख
लेख
नमस्कार , मिसळपाव वर ही माझी पहिलीच पोस्ट आहे . तसं इथे खातं सुरु करून एक वर्ष तीन महिने झाले असले तरी सुरुवातीचं वर्ष मी इथे जवळजवळ कधीच फिरकले नव्हते . तेव्हा सगळा वेळ फेसबुकवर जायचा , तिथे सचिन परांजपे , स्मिता जोगळेकर , राज जैन , संजीव पालेकर , सर्जेराव जाधव , रुचिरा कुळकर्णी आणि अशा कितीतरी उत्तम लेखकांचं लिखाण वाचताना दिवस कधी सरायचा तेच समजायचं नाही . सकाळी ब्रश करायच्याही आधी , रात्री अंथरुणात पडून २- ३ वाजेपर्यंत आणि दिवसभरातले बरेच तास फेसबुकवरच जाऊ लागले जेव्हा आपण प्रचंड फेसबुक अॅडिक्ट झालो आहोत हा साक्षात्कार झाला आणि मनावर मोठ्ठा दगड ठेवून फेसबुक खातं डिलीट केलं . पण काहीतरी दर्जेदार वाचायची भूक स्वस्थ बसू देत नव्हती तेव्हा मिपाकडे वळणं झालं . साधारण गेल्या ३ महिन्यांपासून मी मिपावर सक्रिय आहे . इथे फेसबुकएवढा वेळ जात नाही आणि उत्कृष्ट पोस्ट्सही वाचायला मिळतात . इथल्या पोस्ट्स वाचत आहे . फक्त १० - १२ पोस्ट्सवर प्रतिसाद दिला आहे . इथल्या २-३ रेसिपीज ट्राय केल्या आहेत :) . स्वतःचं काही लिहिण्याएवढी प्रतिभा / उत्साह माझ्यात बहुधा नसावा , निदान सध्यातरी . तर ही पोस्ट लिहिण्याचा प्रपंच करण्याचं कारण म्हणजे काल एका व्यक्तीने मला विचारणा केली की तुझा ब्लॉग आहे का ? मी नाही असं सांगितलं . त्यानंतर बऱ्याच वेळाने मला आठवलं कि अरेच्चा ! आपलाही एक ब्लॉग आहे की ! मिपावरच्या ज्या सदस्यांचे स्वतंत्र ब्लॉग्ज आहेत त्या ब्लॉग्जवर ते त्यांच्या मनातले विचार , सुचलेलं साहित्य - कथा / कविता , स्फुट / ललित असं काही काही लिहित असतात ... त्यामुळे बहुधा ब्लॉग आहे का या प्रश्नावर अशाच प्रकारचा ब्लॉग अशी विचारणाऱ्या व्यक्तीची कल्पना असावी असं वाटलं . आणि माझ्या ब्लॉगवर यातलं काही नाही म्हणून माझा ब्लॉग चटकन आठवला नसावा. शिवाय त्या ब्लॉगकडेही मी बरेच महिने फिरकलेले नव्हते . सुरुवातीला मोठ्या उत्साहात ब्लॉग सुरु केला खरा पण मग तो कंटीन्यू करायचा कंटाळा केला न काम स्टॉप केलं . ( गोष्टी अर्धवट सोडून देणं ही एक वाईट सवय मला आहे , एक दोन कथाही सुरुवात करून मग बंद केल्यात . सुधारण्याचा प्रयत्न चालू आहे ) तर या ब्लॉगची काल आठवण आली . ब्लॉगची प्रसिद्धी कशी वाढवायची याचं काडीइतकंही ज्ञान मला नसल्याने :( या ब्लॉगला फार कोणी भेटीही दिलेल्या नाहीत . स्वप्नील बांदोडकर या गायकाच्या ६५ गाण्यांचे लिरिक्स - शब्द आणि उपलब्ध असलेल्या गाण्यांच्या युट्युब व्हिडिओची लिंक आणि प्रत्येक गाण्याच्या ऑडिओची लिंक गाण्यासोबत दिली आहे . http://swapnilsongs.blogspot.in/ मिपाकरांना नम्र विनंती कि एकदा या ब्लॉगला भेट द्या . कदाचित एखादं छानसं गाणं तुम्हाला आवडेलही .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
8119 वाचन

💬 प्रतिसाद (52)

प्रतिक्रिया

णवीण अणाहिटा !

माम्लेदारचा पन्खा
Tue, 07/26/2016 - 22:35 नवीन
या या....!स्वागत !
  • Log in or register to post comments

झैरात!

चांदणे संदीप
Tue, 07/26/2016 - 23:08 नवीन
मिपाकरांना नम्र विनंती कि एकदा या ब्लॉगला भेट द्या . कदाचित एखादं छानसं गाणं तुम्हाला आवडेलही .
वाशिंग पावडत निर्मा..... आसलं कैतरी घेऊन आल्यात त्या! तरीबी या, ,मिपा आपलेच आसा! :) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

काय हे? झैरात कसली?

रुपी
Tue, 07/26/2016 - 23:23 नवीन
काय हे? झैरात कसली? ब्लॉगची प्रसिद्धी कशी वाढवायची याचं काडीइतकंही ज्ञान नाही असं लिहिलंय ना त्यांनी.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

धन्यवाद :) .

nishapari
Wed, 07/27/2016 - 00:57 नवीन
धन्यवाद :) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

नमस्कार व मिपावर पहिल्या

एस
Tue, 07/26/2016 - 23:19 नवीन
नमस्कार व मिपावर पहिल्या धाग्याच्या निमित्ताने स्वागत. तुमच्या ब्लॉगवर तुम्ही एकतर गाण्यांचे संपूर्ण बोल दिले आहेत. त्याशिवाय ऑडिओ डाउनलोड लिंकही दिल्या आहेत. या दोन्ही कॉपीराइट भंग करणाऱ्या आहेत. तेव्हा असे काही लिहिण्याऐवजी काही तुमचे स्वतःचे लिखाण करा असा एक सल्ला देऊ इच्छितो. पुलेशु.
  • Log in or register to post comments

धन्यवाद . ही गाणी गेली ३ -

nishapari
Wed, 07/27/2016 - 01:02 नवीन
धन्यवाद . ही गाणी गेली ३ - ४ वर्षं आंतरजालावर आहेतच . मी फक्त त्यांच्या लिंक्स संकलित केल्या आहेत . आणि गाण्यांचे बोल देण्याने गीतकारांना तो कॉपीराईटचा भंग वाटेल असं मला वाटत नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मिपावर स्वागत!

इनू
Wed, 07/27/2016 - 00:07 नवीन
काय हो, पहिल्यांदाच पोस्ट करतेय असं शीर्षक ठेवल्याने टीआरपी वाढतो काय? - इनू (गंभीर विचारात पडलेला मिपाकर)
  • Log in or register to post comments

दुसरं काय शीर्षक द्यावं हे न

nishapari
Wed, 07/27/2016 - 00:58 नवीन
दुसरं काय शीर्षक द्यावं हे न सुचल्याने हे शीर्षक दिलं आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनू

"सोन्याच्या आरतीचे ताट ठेवते

अभ्या..
Wed, 07/27/2016 - 00:11 नवीन
"सोन्याच्या आरतीचे ताट ठेवते स्टीलच्या पिपावर राया तुमचे नाव घेऊन पोस्ट करते मिपावर" . असा काहीतरी उखाणा घेऊन पोस्ट टाकावी. बघा बरं कसा फरक पडतो.
  • Log in or register to post comments

तीन महिने मिपावर राहूनसुद्धा

nishapari
Wed, 07/27/2016 - 01:04 नवीन
तीन महिने मिपावर राहूनसुद्धा या पोस्टवर सारकॅस्टिक प्रतिसाद येतील याचा मला पोस्ट करताना अंदाज नव्हता . आता आला आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

तीन महीने? फ़क्त?

उडन खटोला
Wed, 07/27/2016 - 02:03 नवीन
तीन महीने? फ़क्त? अहो मग धागा टाकायची घाई केलीत तुम्ही. अजून पिच ओलं आहे, वारा जोरात आणि चेंडू स्विंग होतोय. सांभाळुन खेळा. (हे कबड्डी खेळण्यासाठी आवश्यक असतंय पायजे तर शि बी आय ला विचारा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nishapari

आपण आलात, आनंद झाला, धन्यवाद.

उडन खटोला
Wed, 07/27/2016 - 00:21 नवीन
आपण आलात, आनंद झाला, धन्यवाद.
  • Log in or register to post comments

धन्यवाद :)

nishapari
Wed, 07/27/2016 - 00:59 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला

मिपावर स्वागत !

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 07/27/2016 - 05:38 नवीन
मिपावर स्वागत ! लिहिते झालात हे महत्वाचे. आता यापुढे कथा, कविता, माहिती, चर्चा असे काही धागे काढण्याचा प्रयत्न करा. बरेवाईट प्रतिसाद आले तरी त्यातून पुढील लेखन सुधारण्यासाठी मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न केलात तर फायदाच होईल. इतरांच्या लेखांवर प्रतिसाद देणे आणी त्यावर उपप्रतिसाद देणे हा तर मिपाकरांचा जन्मसिद्ध आणि आवडता हक्कच आहे. :) माहिती योग्य असली, लेखन समतोल असले आणि साहित्यिक मूल्य सुसह्य असले तर मिपाकर कौतूक व प्रोत्साहनपर प्रतिसाद देऊन लेखकाचा उत्साह वाढवतात असा सर्वसाधारण अनुभव आहे.
  • Log in or register to post comments

मनापासून आभार .

nishapari
Wed, 07/27/2016 - 10:19 नवीन
मनापासून आभार .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मनापासून आभार .

nishapari
Wed, 07/27/2016 - 10:19 नवीन
मनापासून आभार .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

पोचले हो त्यांना.. परत परत

आनन्दा
Wed, 07/27/2016 - 10:54 नवीन
पोचले हो त्यांना.. परत परत कशाला. ह. घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nishapari

मिसाइल अस्त्राची पोहोच जशी

कंजूस
Wed, 07/27/2016 - 07:03 नवीन
मिसाइल अस्त्राची पोहोच जशी वेगळी असते तसं असतं ब्लॅागस्पॅाट,फेबु आणि संस्थळांचं.पहिल्या दोनातली काळाच्या आड गडप होतात ही वाइट गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments

असा सगळा एकुण प्रकार झाला तर

स्पा
Wed, 07/27/2016 - 07:22 नवीन
असा सगळा एकुण प्रकार झाला तर निशा परी ताई माई अक्का
  • Log in or register to post comments

मिपावर स्वागत....

मुक्त विहारि
Wed, 07/27/2016 - 08:25 नवीन
मिपाकर होणे फार सोपे पण मिपाकर निभावणे फार कठीण. इथे सगळ्या प्रकारची माणसे असल्याने, पुण्यातील खवचटपणा, नागपुरी खाक्या, गोव्यातील खाद्यसंस्कृती आणि मुंबईतील आपण बरे आणि आपले काम बरे, ही जीवनशैली, अशी सगळी अंगतपंगत आहे. परदेशी मिपाकर पण आपापल्या गावाशी नाते जोडून असल्याने, इथे अजिबात परकेपणा नसतो. "माहिती योग्य असली, लेखन समतोल असले आणि साहित्यिक मूल्य सुसह्य असले तर मिपाकर कौतूक व प्रोत्साहनपर प्रतिसाद देऊन लेखकाचा उत्साह वाढवतात असा सर्वसाधारण अनुभव आहे." हे वाक्य सदैव लक्षांत ठेवून लिखाण केलेत तर मिपाकर भरभरून दाद देतात.
  • Log in or register to post comments

धन्यवाद मुविकाका :) :)

nishapari
Wed, 07/27/2016 - 10:20 नवीन
धन्यवाद मुविकाका :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मुविकाका

गणेश उमाजी पाजवे
Wed, 07/27/2016 - 18:34 नवीन
कोकणी माणसाला विसरलात कि वो तुमी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

स्वागत आहे

संत घोडेकर
Wed, 07/27/2016 - 08:55 नवीन
काळजी करू नका, बिनधास्त लेखन करा आणि प्रतिसाद देत जा. बाकी सर्व मिपाकर आहेत पाठीशी.
  • Log in or register to post comments

"मिपाकर आहेत पाठीशी , मागुन

प्रमोद देर्देकर
Wed, 07/27/2016 - 09:10 नवीन
"मिपाकर आहेत पाठीशी , मागुन धक्का दिला की पडला तुम्ही तोंडघशी ! पण काय हो प्यारेकाका आपलं ते हे घोडॅकाका तुम्हाला कसं कळले की मिपाकर पाठीशी असतात ते. तुमचं मिपावय तर हॅ हॅ हॅ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संत घोडेकर

You nailed it Pramod ji

महासंग्राम
Wed, 07/27/2016 - 09:26 नवीन
You nailed it Pramod ji
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

पम्या, संत घोडेकर जेन्युइन

सतिश गावडे
Wed, 07/27/2016 - 09:31 नवीन
पम्या, संत घोडेकर जेन्युइन आयडी असून एका सुप्रसिद्ध मिपाकराचे नातेवाईक आहेत ते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

धन्या, नव्या जेन्यूईन आयडींना

किसन शिंदे
Wed, 07/27/2016 - 11:14 नवीन
धन्या, नव्या जेन्यूईन आयडींना डूआयडी समजायची पूर्वापार चालत आलेली मिपापरंपरा आहे ही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

ओह!

संत घोडेकर
Wed, 07/27/2016 - 11:29 नवीन
ओह! असे आहे तर. म्हणजे मी रॅगिंगचा बळी आहे असे समजायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

मला पण खूप त्रास झाला होता

वाल्मिक
Wed, 07/27/2016 - 16:40 नवीन
मला पण खूप त्रास झाला होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

मग

मी-सौरभ
Fri, 07/29/2016 - 10:11 नवीन
एवढी प्यायची कशाला??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

नुसते वय बघू नका हो,प्रमोद

संत घोडेकर
Wed, 07/27/2016 - 09:32 नवीन
नुसते वय बघू नका हो,प्रमोद काका.आम्ही जन्मदाखला उशिरा काढला एवढेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

हरकत नाही

नाखु
Wed, 07/27/2016 - 10:22 नवीन
नाहीतरी मिपा वयावरून समज सगळ्यांना वेळेत येतेच असे थोडीच आहे.... संदर्भ गेल्या आठवड्यातील रणधुमाळी धागे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संत घोडेकर

तुम्ही तर कुटे कुटे पोचलात

आनन्दा
Wed, 07/27/2016 - 10:56 नवीन
तुम्ही तर कुटे कुटे पोचलात राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

मैं तेजा हूँ, मार्क इधर है ;)

उडन खटोला
Wed, 07/27/2016 - 10:59 नवीन
मैं तेजा हूँ, मार्क इधर है ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

धन्यवाद :)

nishapari
Wed, 07/27/2016 - 10:25 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संत घोडेकर

माझ्या पहिल्या पदार्पणात (

कंजूस
Wed, 07/27/2016 - 16:22 नवीन
माझ्या पहिल्या पदार्पणात ( मिपालेखन)मला जाम हाणला होता त्यावेळच्या कंपूने त्याची आठवण झाली."त्या वल्लीचे धागे वाचा ,शिका वगैरे."(आताची पिंचिं ग्यान्ग हे ओळखलेच असेल)एक चांगली गोष्ट म्हणजे त्यावेळेला संपादन असल्याने तो धागा उडवता आला.
  • Log in or register to post comments

आप्ल्याला पहिल्या धाग्यात

अभ्या..
Wed, 07/27/2016 - 16:28 नवीन
आप्ल्याला पहिल्या धाग्यात हाणले बिणले काय नव्हते. प्रतिसाद जरा कमी मिळाले होते. रॅगिंग न व्हायचे कारण म्हणजे तत्कालीन संपादक किसनदेव पाठीशी उभे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अभ्या.. गम्मत केली रे.तो

कंजूस
Wed, 07/27/2016 - 18:42 नवीन
अभ्या.. गम्मत केली रे.तो प्रकार असा झाला होता की मी नोकियाच्या फोनमधून त्रोटक टंकलेले फारच केविलवाणे झाले होते.कारण हजार कॅरिक्टर्सचाच टेक्स्ट बॅाक्स असतो त्यात.दहा बारा ओळीतच लेखन आवरावं लागायचं.मग त्याला उपाय काढला तुकड्यातुकड्यात प्रतिसादात लिहिले आणि मला "आत घेतला."आता खरं म्हणजे ते स्मार्टफोनातून संपादनचे बटण वापरून जोडू शकतो परंतू ते मधले प्रतिसाद लटकतील म्हणून तसेच ठेवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

तुमच्या ब्लॉगमधील लेखन इथेही

जागु
Wed, 07/27/2016 - 16:28 नवीन
तुमच्या ब्लॉगमधील लेखन इथेही शेयर करा.
  • Log in or register to post comments

आगच्छाम:

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/27/2016 - 16:30 नवीन
आगच्छाम:
  • Log in or register to post comments

नमस्कार!

जव्हेरगंज
Wed, 07/27/2016 - 18:05 नवीन
नमस्कार!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

तुषार काळभोर
गुरुवार, 07/28/2016 - 06:28 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

मिपावर स्वागत !

साधा मुलगा
Wed, 07/27/2016 - 21:47 नवीन
मिपावर स्वागत !
  • Log in or register to post comments

धन्यवाद

तुषार काळभोर
गुरुवार, 07/28/2016 - 06:28 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साधा मुलगा

या!

संदीप डांगे
गुरुवार, 07/28/2016 - 03:37 नवीन
या! ए बारक्या... दोन चहा घेरे.. वन बाय टू.. स्पेशल!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

तुषार काळभोर
गुरुवार, 07/28/2016 - 06:29 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

रच्याकने

तुषार काळभोर
गुरुवार, 07/28/2016 - 06:30 नवीन
चहा व तत्सम उत्तेजक पेयांपासून मी स्वतःला दूर ठेवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

धन्यवाद

तुषार काळभोर
गुरुवार, 07/28/2016 - 06:31 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

जेव्हा आपण प्रचंड फेसबुक अॅडिक्ट झालो आहोत हा साक्षात्कार झाला

तुषार काळभोर
गुरुवार, 07/28/2016 - 06:32 नवीन
ते प्रतिसादांत पण दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

तुमचं लिखाण इथे प्रकाशित करत

इनू
गुरुवार, 07/28/2016 - 23:29 नवीन
तुमचं लिखाण इथे प्रकाशित करत चला. मिपा आपलंच आहे, काळजी करू नका.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा