नमस्कार , मिसळपाव वर ही माझी पहिलीच पोस्ट आहे . तसं इथे खातं सुरु करून एक वर्ष तीन महिने झाले असले तरी सुरुवातीचं वर्ष मी इथे जवळजवळ कधीच फिरकले नव्हते . तेव्हा सगळा वेळ फेसबुकवर जायचा , तिथे सचिन परांजपे , स्मिता जोगळेकर , राज जैन , संजीव पालेकर , सर्जेराव जाधव , रुचिरा कुळकर्णी आणि अशा कितीतरी उत्तम लेखकांचं लिखाण वाचताना दिवस कधी सरायचा तेच समजायचं नाही . सकाळी ब्रश करायच्याही आधी , रात्री अंथरुणात पडून २- ३ वाजेपर्यंत आणि दिवसभरातले बरेच तास फेसबुकवरच जाऊ लागले जेव्हा आपण प्रचंड फेसबुक अॅडिक्ट झालो आहोत हा साक्षात्कार झाला आणि मनावर मोठ्ठा दगड ठेवून फेसबुक खातं डिलीट केलं . पण काहीतरी दर्जेदार वाचायची भूक स्वस्थ बसू देत नव्हती तेव्हा मिपाकडे वळणं झालं . साधारण गेल्या ३ महिन्यांपासून मी मिपावर सक्रिय आहे . इथे फेसबुकएवढा वेळ जात नाही आणि उत्कृष्ट पोस्ट्सही वाचायला मिळतात . इथल्या पोस्ट्स वाचत आहे . फक्त १० - १२ पोस्ट्सवर प्रतिसाद दिला आहे . इथल्या २-३ रेसिपीज ट्राय केल्या आहेत :) . स्वतःचं काही लिहिण्याएवढी प्रतिभा / उत्साह माझ्यात बहुधा नसावा , निदान सध्यातरी .
तर ही पोस्ट लिहिण्याचा प्रपंच करण्याचं कारण म्हणजे काल एका व्यक्तीने मला विचारणा केली की तुझा ब्लॉग आहे का ? मी नाही असं सांगितलं . त्यानंतर बऱ्याच वेळाने मला आठवलं कि अरेच्चा ! आपलाही एक ब्लॉग आहे की ! मिपावरच्या ज्या सदस्यांचे स्वतंत्र ब्लॉग्ज आहेत त्या ब्लॉग्जवर ते त्यांच्या मनातले विचार , सुचलेलं साहित्य - कथा / कविता , स्फुट / ललित असं काही काही लिहित असतात ... त्यामुळे बहुधा ब्लॉग आहे का या प्रश्नावर अशाच प्रकारचा ब्लॉग अशी विचारणाऱ्या व्यक्तीची कल्पना असावी असं वाटलं . आणि माझ्या ब्लॉगवर यातलं काही नाही म्हणून माझा ब्लॉग चटकन आठवला नसावा. शिवाय त्या ब्लॉगकडेही मी बरेच महिने फिरकलेले नव्हते . सुरुवातीला मोठ्या उत्साहात ब्लॉग सुरु केला खरा पण मग तो कंटीन्यू करायचा कंटाळा केला न काम स्टॉप केलं . ( गोष्टी अर्धवट सोडून देणं ही एक वाईट सवय मला आहे , एक दोन कथाही सुरुवात करून मग बंद केल्यात . सुधारण्याचा प्रयत्न चालू आहे ) तर या ब्लॉगची काल आठवण आली . ब्लॉगची प्रसिद्धी कशी वाढवायची याचं काडीइतकंही ज्ञान मला नसल्याने :( या ब्लॉगला फार कोणी भेटीही दिलेल्या नाहीत . स्वप्नील बांदोडकर या गायकाच्या ६५ गाण्यांचे लिरिक्स - शब्द आणि उपलब्ध असलेल्या गाण्यांच्या युट्युब व्हिडिओची लिंक आणि प्रत्येक गाण्याच्या ऑडिओची लिंक गाण्यासोबत दिली आहे .
http://swapnilsongs.blogspot.in/
मिपाकरांना नम्र विनंती कि एकदा या ब्लॉगला भेट द्या . कदाचित एखादं छानसं गाणं तुम्हाला आवडेलही .
वाचने
8166
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
णवीण अणाहिटा !
झैरात!
In reply to णवीण अणाहिटा ! by माम्लेदारचा पन्खा
काय हे? झैरात कसली?
In reply to झैरात! by चांदणे संदीप
धन्यवाद :) .
In reply to णवीण अणाहिटा ! by माम्लेदारचा पन्खा
नमस्कार व मिपावर पहिल्या
धन्यवाद . ही गाणी गेली ३ -
In reply to नमस्कार व मिपावर पहिल्या by एस
मिपावर स्वागत!
दुसरं काय शीर्षक द्यावं हे न
In reply to मिपावर स्वागत! by इनू
"सोन्याच्या आरतीचे ताट ठेवते
तीन महिने मिपावर राहूनसुद्धा
In reply to "सोन्याच्या आरतीचे ताट ठेवते by अभ्या..
तीन महीने? फ़क्त?
In reply to तीन महिने मिपावर राहूनसुद्धा by nishapari
आपण आलात, आनंद झाला, धन्यवाद.
धन्यवाद :)
In reply to आपण आलात, आनंद झाला, धन्यवाद. by उडन खटोला
मिपावर स्वागत !
मनापासून आभार .
In reply to मिपावर स्वागत ! by डॉ सुहास म्हात्रे
मनापासून आभार .
In reply to मिपावर स्वागत ! by डॉ सुहास म्हात्रे
पोचले हो त्यांना.. परत परत
In reply to मनापासून आभार . by nishapari
मिसाइल अस्त्राची पोहोच जशी
असा सगळा एकुण प्रकार झाला तर
मिपावर स्वागत....
धन्यवाद मुविकाका :) :)
In reply to मिपावर स्वागत.... by मुक्त विहारि
मुविकाका
In reply to मिपावर स्वागत.... by मुक्त विहारि
स्वागत आहे
"मिपाकर आहेत पाठीशी , मागुन
In reply to स्वागत आहे by संत घोडेकर
प्यारेकाकाआपलं ते हे घोडॅकाका तुम्हाला कसं कळले की मिपाकर पाठीशी असतात ते. तुमचं मिपावय तर हॅ हॅ हॅ...You nailed it Pramod ji
In reply to "मिपाकर आहेत पाठीशी , मागुन by प्रमोद देर्देकर
पम्या, संत घोडेकर जेन्युइन
In reply to "मिपाकर आहेत पाठीशी , मागुन by प्रमोद देर्देकर
धन्या, नव्या जेन्यूईन आयडींना
In reply to पम्या, संत घोडेकर जेन्युइन by सतिश गावडे
ओह!
In reply to धन्या, नव्या जेन्यूईन आयडींना by किसन शिंदे
मला पण खूप त्रास झाला होता
In reply to धन्या, नव्या जेन्यूईन आयडींना by किसन शिंदे
मग
In reply to मला पण खूप त्रास झाला होता by वाल्मिक
नुसते वय बघू नका हो,प्रमोद
In reply to "मिपाकर आहेत पाठीशी , मागुन by प्रमोद देर्देकर
हरकत नाही
In reply to नुसते वय बघू नका हो,प्रमोद by संत घोडेकर
तुम्ही तर कुटे कुटे पोचलात
In reply to हरकत नाही by नाखु
मैं तेजा हूँ, मार्क इधर है ;)
In reply to "मिपाकर आहेत पाठीशी , मागुन by प्रमोद देर्देकर
धन्यवाद :)
In reply to स्वागत आहे by संत घोडेकर
माझ्या पहिल्या पदार्पणात (
आप्ल्याला पहिल्या धाग्यात
In reply to माझ्या पहिल्या पदार्पणात ( by कंजूस
अभ्या.. गम्मत केली रे.तो
In reply to आप्ल्याला पहिल्या धाग्यात by अभ्या..
तुमच्या ब्लॉगमधील लेखन इथेही
आगच्छाम:
नमस्कार!
धन्यवाद
In reply to नमस्कार! by जव्हेरगंज
मिपावर स्वागत !
धन्यवाद
In reply to मिपावर स्वागत ! by साधा मुलगा
या!
धन्यवाद
In reply to या! by संदीप डांगे
रच्याकने
In reply to या! by संदीप डांगे
धन्यवाद
जेव्हा आपण प्रचंड फेसबुक अॅडिक्ट झालो आहोत हा साक्षात्कार झाला
In reply to धन्यवाद by तुषार काळभोर
तुमचं लिखाण इथे प्रकाशित करत
मिपावरचे प्रतिसाद वाचताना
हम्म