नमस्कार , मिसळपाव वर ही माझी पहिलीच पोस्ट आहे . तसं इथे खातं सुरु करून एक वर्ष तीन महिने झाले असले तरी सुरुवातीचं वर्ष मी इथे जवळजवळ कधीच फिरकले नव्हते . तेव्हा सगळा वेळ फेसबुकवर जायचा , तिथे सचिन परांजपे , स्मिता जोगळेकर , राज जैन , संजीव पालेकर , सर्जेराव जाधव , रुचिरा कुळकर्णी आणि अशा कितीतरी उत्तम लेखकांचं लिखाण वाचताना दिवस कधी सरायचा तेच समजायचं नाही . सकाळी ब्रश करायच्याही आधी , रात्री अंथरुणात पडून २- ३ वाजेपर्यंत आणि दिवसभरातले बरेच तास फेसबुकवरच जाऊ लागले जेव्हा आपण प्रचंड फेसबुक अॅडिक्ट झालो आहोत हा साक्षात्कार झाला आणि मनावर मोठ्ठा दगड ठेवून फेसबुक खातं डिलीट केलं . पण काहीतरी दर्जेदार वाचायची भूक स्वस्थ बसू देत नव्हती तेव्हा मिपाकडे वळणं झालं . साधारण गेल्या ३ महिन्यांपासून मी मिपावर सक्रिय आहे . इथे फेसबुकएवढा वेळ जात नाही आणि उत्कृष्ट पोस्ट्सही वाचायला मिळतात . इथल्या पोस्ट्स वाचत आहे . फक्त १० - १२ पोस्ट्सवर प्रतिसाद दिला आहे . इथल्या २-३ रेसिपीज ट्राय केल्या आहेत :) . स्वतःचं काही लिहिण्याएवढी प्रतिभा / उत्साह माझ्यात बहुधा नसावा , निदान सध्यातरी .
तर ही पोस्ट लिहिण्याचा प्रपंच करण्याचं कारण म्हणजे काल एका व्यक्तीने मला विचारणा केली की तुझा ब्लॉग आहे का ? मी नाही असं सांगितलं . त्यानंतर बऱ्याच वेळाने मला आठवलं कि अरेच्चा ! आपलाही एक ब्लॉग आहे की ! मिपावरच्या ज्या सदस्यांचे स्वतंत्र ब्लॉग्ज आहेत त्या ब्लॉग्जवर ते त्यांच्या मनातले विचार , सुचलेलं साहित्य - कथा / कविता , स्फुट / ललित असं काही काही लिहित असतात ... त्यामुळे बहुधा ब्लॉग आहे का या प्रश्नावर अशाच प्रकारचा ब्लॉग अशी विचारणाऱ्या व्यक्तीची कल्पना असावी असं वाटलं . आणि माझ्या ब्लॉगवर यातलं काही नाही म्हणून माझा ब्लॉग चटकन आठवला नसावा. शिवाय त्या ब्लॉगकडेही मी बरेच महिने फिरकलेले नव्हते . सुरुवातीला मोठ्या उत्साहात ब्लॉग सुरु केला खरा पण मग तो कंटीन्यू करायचा कंटाळा केला न काम स्टॉप केलं . ( गोष्टी अर्धवट सोडून देणं ही एक वाईट सवय मला आहे , एक दोन कथाही सुरुवात करून मग बंद केल्यात . सुधारण्याचा प्रयत्न चालू आहे ) तर या ब्लॉगची काल आठवण आली . ब्लॉगची प्रसिद्धी कशी वाढवायची याचं काडीइतकंही ज्ञान मला नसल्याने :( या ब्लॉगला फार कोणी भेटीही दिलेल्या नाहीत . स्वप्नील बांदोडकर या गायकाच्या ६५ गाण्यांचे लिरिक्स - शब्द आणि उपलब्ध असलेल्या गाण्यांच्या युट्युब व्हिडिओची लिंक आणि प्रत्येक गाण्याच्या ऑडिओची लिंक गाण्यासोबत दिली आहे .
http://swapnilsongs.blogspot.in/
मिपाकरांना नम्र विनंती कि एकदा या ब्लॉगला भेट द्या . कदाचित एखादं छानसं गाणं तुम्हाला आवडेलही .
प्रतिक्रिया
26 Jul 2016 - 10:35 pm | माम्लेदारचा पन्खा
या या....!स्वागत !
26 Jul 2016 - 11:08 pm | चांदणे संदीप
वाशिंग पावडत निर्मा..... आसलं कैतरी घेऊन आल्यात त्या!
तरीबी या, ,मिपा आपलेच आसा! :)
Sandy
26 Jul 2016 - 11:23 pm | रुपी
काय हे? झैरात कसली?
ब्लॉगची प्रसिद्धी कशी वाढवायची याचं काडीइतकंही ज्ञान नाही असं लिहिलंय ना त्यांनी.. ;)
27 Jul 2016 - 12:57 am | nishapari
धन्यवाद :) .
26 Jul 2016 - 11:19 pm | एस
नमस्कार व मिपावर पहिल्या धाग्याच्या निमित्ताने स्वागत. तुमच्या ब्लॉगवर तुम्ही एकतर गाण्यांचे संपूर्ण बोल दिले आहेत. त्याशिवाय ऑडिओ डाउनलोड लिंकही दिल्या आहेत. या दोन्ही कॉपीराइट भंग करणाऱ्या आहेत. तेव्हा असे काही लिहिण्याऐवजी काही तुमचे स्वतःचे लिखाण करा असा एक सल्ला देऊ इच्छितो.
पुलेशु.
27 Jul 2016 - 1:02 am | nishapari
धन्यवाद . ही गाणी गेली ३ - ४ वर्षं आंतरजालावर आहेतच . मी फक्त त्यांच्या लिंक्स संकलित केल्या आहेत . आणि गाण्यांचे बोल देण्याने गीतकारांना तो कॉपीराईटचा भंग वाटेल असं मला वाटत नाही .
27 Jul 2016 - 12:07 am | इनू
काय हो, पहिल्यांदाच पोस्ट करतेय असं शीर्षक ठेवल्याने टीआरपी वाढतो काय?
- इनू (गंभीर विचारात पडलेला मिपाकर)
27 Jul 2016 - 12:58 am | nishapari
दुसरं काय शीर्षक द्यावं हे न सुचल्याने हे शीर्षक दिलं आहे .
27 Jul 2016 - 12:11 am | अभ्या..
"सोन्याच्या आरतीचे ताट ठेवते स्टीलच्या पिपावर
राया तुमचे नाव घेऊन पोस्ट करते मिपावर"
.
असा काहीतरी उखाणा घेऊन पोस्ट टाकावी. बघा बरं कसा फरक पडतो.
27 Jul 2016 - 1:04 am | nishapari
तीन महिने मिपावर राहूनसुद्धा या पोस्टवर सारकॅस्टिक प्रतिसाद येतील याचा मला पोस्ट करताना अंदाज नव्हता . आता आला आहे .
27 Jul 2016 - 2:03 am | उडन खटोला
तीन महीने? फ़क्त?
अहो मग धागा टाकायची घाई केलीत तुम्ही.
अजून पिच ओलं आहे, वारा जोरात आणि चेंडू स्विंग होतोय. सांभाळुन खेळा.
(हे कबड्डी खेळण्यासाठी आवश्यक असतंय पायजे तर शि बी आय ला विचारा)
27 Jul 2016 - 12:21 am | उडन खटोला
आपण आलात, आनंद झाला, धन्यवाद.
27 Jul 2016 - 12:59 am | nishapari
धन्यवाद :)
27 Jul 2016 - 5:38 am | डॉ सुहास म्हात्रे
मिपावर स्वागत !
लिहिते झालात हे महत्वाचे. आता यापुढे कथा, कविता, माहिती, चर्चा असे काही धागे काढण्याचा प्रयत्न करा. बरेवाईट प्रतिसाद आले तरी त्यातून पुढील लेखन सुधारण्यासाठी मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न केलात तर फायदाच होईल.
इतरांच्या लेखांवर प्रतिसाद देणे आणी त्यावर उपप्रतिसाद देणे हा तर मिपाकरांचा जन्मसिद्ध आणि आवडता हक्कच आहे. :)
माहिती योग्य असली, लेखन समतोल असले आणि साहित्यिक मूल्य सुसह्य असले तर मिपाकर कौतूक व प्रोत्साहनपर प्रतिसाद देऊन लेखकाचा उत्साह वाढवतात असा सर्वसाधारण अनुभव आहे.
27 Jul 2016 - 10:19 am | nishapari
मनापासून आभार .
27 Jul 2016 - 10:19 am | nishapari
मनापासून आभार .
27 Jul 2016 - 10:54 am | आनन्दा
पोचले हो त्यांना.. परत परत कशाला.
ह. घ्या.
27 Jul 2016 - 7:03 am | कंजूस
मिसाइल अस्त्राची पोहोच जशी वेगळी असते तसं असतं ब्लॅागस्पॅाट,फेबु आणि संस्थळांचं.पहिल्या दोनातली काळाच्या आड गडप होतात ही वाइट गोष्ट आहे.
27 Jul 2016 - 7:22 am | स्पा
असा सगळा एकुण प्रकार झाला तर निशा परी ताई माई अक्का
27 Jul 2016 - 8:25 am | मुक्त विहारि
मिपाकर होणे फार सोपे पण मिपाकर निभावणे फार कठीण.
इथे सगळ्या प्रकारची माणसे असल्याने, पुण्यातील खवचटपणा, नागपुरी खाक्या, गोव्यातील खाद्यसंस्कृती आणि मुंबईतील आपण बरे आणि आपले काम बरे, ही जीवनशैली, अशी सगळी अंगतपंगत आहे.
परदेशी मिपाकर पण आपापल्या गावाशी नाते जोडून असल्याने, इथे अजिबात परकेपणा नसतो.
"माहिती योग्य असली, लेखन समतोल असले आणि साहित्यिक मूल्य सुसह्य असले तर मिपाकर कौतूक व प्रोत्साहनपर प्रतिसाद देऊन लेखकाचा उत्साह वाढवतात असा सर्वसाधारण अनुभव आहे." हे वाक्य सदैव लक्षांत ठेवून लिखाण केलेत तर मिपाकर भरभरून दाद देतात.
27 Jul 2016 - 10:20 am | nishapari
धन्यवाद मुविकाका :) :)
27 Jul 2016 - 6:34 pm | गणेश उमाजी पाजवे
कोकणी माणसाला विसरलात कि वो तुमी ;)
27 Jul 2016 - 8:55 am | संत घोडेकर
काळजी करू नका, बिनधास्त लेखन करा आणि प्रतिसाद देत जा. बाकी सर्व मिपाकर आहेत पाठीशी.
27 Jul 2016 - 9:10 am | प्रमोद देर्देकर
"मिपाकर आहेत पाठीशी , मागुन धक्का दिला की पडला तुम्ही तोंडघशी !
पण काय हो प्यारेकाका आपलं ते हे घोडॅकाका तुम्हाला कसं कळले की मिपाकर पाठीशी असतात ते. तुमचं मिपावय तर हॅ हॅ हॅ...
27 Jul 2016 - 9:26 am | महासंग्राम
You nailed it Pramod ji
27 Jul 2016 - 9:31 am | सतिश गावडे
पम्या, संत घोडेकर जेन्युइन आयडी असून एका सुप्रसिद्ध मिपाकराचे नातेवाईक आहेत ते. :)
27 Jul 2016 - 11:14 am | किसन शिंदे
धन्या, नव्या जेन्यूईन आयडींना डूआयडी समजायची पूर्वापार चालत आलेली मिपापरंपरा आहे ही. :)
27 Jul 2016 - 11:29 am | संत घोडेकर
ओह!
असे आहे तर. म्हणजे मी रॅगिंगचा बळी आहे असे समजायला हरकत नाही.
27 Jul 2016 - 4:40 pm | वाल्मिक
मला पण खूप त्रास झाला होता
29 Jul 2016 - 10:11 am | मी-सौरभ
एवढी प्यायची कशाला??
27 Jul 2016 - 9:32 am | संत घोडेकर
नुसते वय बघू नका हो,प्रमोद काका.आम्ही जन्मदाखला उशिरा काढला एवढेच.
27 Jul 2016 - 10:22 am | नाखु
नाहीतरी मिपा वयावरून समज सगळ्यांना वेळेत येतेच असे थोडीच आहे....
संदर्भ गेल्या आठवड्यातील रणधुमाळी धागे.
27 Jul 2016 - 10:56 am | आनन्दा
तुम्ही तर कुटे कुटे पोचलात राव.
27 Jul 2016 - 10:59 am | उडन खटोला
मैं तेजा हूँ, मार्क इधर है ;)
27 Jul 2016 - 10:25 am | nishapari
धन्यवाद :)
27 Jul 2016 - 4:22 pm | कंजूस
माझ्या पहिल्या पदार्पणात ( मिपालेखन)मला जाम हाणला होता त्यावेळच्या कंपूने त्याची आठवण झाली."त्या वल्लीचे धागे वाचा ,शिका वगैरे."(आताची पिंचिं ग्यान्ग हे ओळखलेच असेल)एक चांगली गोष्ट म्हणजे त्यावेळेला संपादन असल्याने तो धागा उडवता आला.
27 Jul 2016 - 4:28 pm | अभ्या..
आप्ल्याला पहिल्या धाग्यात हाणले बिणले काय नव्हते. प्रतिसाद जरा कमी मिळाले होते. रॅगिंग न व्हायचे कारण म्हणजे तत्कालीन संपादक किसनदेव पाठीशी उभे होते.
27 Jul 2016 - 6:42 pm | कंजूस
अभ्या.. गम्मत केली रे.तो प्रकार असा झाला होता की मी नोकियाच्या फोनमधून त्रोटक टंकलेले फारच केविलवाणे झाले होते.कारण हजार कॅरिक्टर्सचाच टेक्स्ट बॅाक्स असतो त्यात.दहा बारा ओळीतच लेखन आवरावं लागायचं.मग त्याला उपाय काढला तुकड्यातुकड्यात प्रतिसादात लिहिले आणि मला "आत घेतला."आता खरं म्हणजे ते स्मार्टफोनातून संपादनचे बटण वापरून जोडू शकतो परंतू ते मधले प्रतिसाद लटकतील म्हणून तसेच ठेवले.
27 Jul 2016 - 4:28 pm | जागु
तुमच्या ब्लॉगमधील लेखन इथेही शेयर करा.
27 Jul 2016 - 4:30 pm | अत्रुप्त आत्मा
आगच्छाम:
27 Jul 2016 - 6:05 pm | जव्हेरगंज
नमस्कार!
28 Jul 2016 - 6:28 am | तुषार काळभोर
धन्यवाद
27 Jul 2016 - 9:47 pm | साधा मुलगा
मिपावर स्वागत !
28 Jul 2016 - 6:28 am | तुषार काळभोर
धन्यवाद
28 Jul 2016 - 3:37 am | संदीप डांगे
या!
ए बारक्या... दोन चहा घेरे.. वन बाय टू.. स्पेशल!
28 Jul 2016 - 6:29 am | तुषार काळभोर
धन्यवाद
28 Jul 2016 - 6:30 am | तुषार काळभोर
चहा व तत्सम उत्तेजक पेयांपासून मी स्वतःला दूर ठेवले आहे.
28 Jul 2016 - 6:31 am | तुषार काळभोर
धन्यवाद
28 Jul 2016 - 6:32 am | तुषार काळभोर
ते प्रतिसादांत पण दिसतंय.
28 Jul 2016 - 11:29 pm | इनू
तुमचं लिखाण इथे प्रकाशित करत चला. मिपा आपलंच आहे, काळजी करू नका.
29 Jul 2016 - 5:18 pm | Anand More
मिपावरचे प्रतिसाद वाचताना जेव्हा प्रचंड हसायला येतं, त्यातला हा धागा आहे... अॉफ पिरीयडला वर्गाचा मॉनिटरच जर टवाळ असेल तर येणारी धमाल अशावेळी पुन्हा अनुभवायला मिळते.
29 Jul 2016 - 6:02 pm | तिमा
असाही एक प्रतिसाद असतो. पण तरीही, सुस्वागतम किंवा सासुगम्मत.(वार्यावरची वरात)