चार बर्नरची गॅस शेगडी घ्यायची आहे. कोणती घ्यावी?

सांश्रय's picture
सांश्रय in काथ्याकूट
7 May 2016 - 9:34 am
गाभा: 

दोन बर्नरच्या गॅस शेगडीवर मुलांचे शाळेचे डबे, सकाळचा चहा, आमचा नाश्ता, एखादे वेळेस अंघोळीचे पाणी तापविणे अशी सगळी कामे एकाच वेळी शक्य होत नाहीत. त्याकरीता चार बर्नर असलेली गॅस शेगडी घ्यायचे ठरविले. वेगवेगळ्या शो-रुम्स मध्ये शोधही घेतला, पण निर्णय घेताना फारच गोंधळायला होते.

मग विचार केला की मिपाकरांना विचारायला हरकत नाही याबद्दल...

कोणती गॅस शेगडी घ्यावी, त्यात कोणते फिचर्स असावेत याबाबत जरा सुचवल्यास बरं होईल.

सर्वाचे अगोदरच आभार मानत आहे.

धन्यवाद.

प्रतिक्रिया

हा धागा गाजणार !! पाचशे नक्की..

-- दोन बर्नरच्या शेगडीवर केलेले पोपकॉर्ण विकायला तयार असलेला चिनार

सांश्रय's picture

7 May 2016 - 10:54 am | सांश्रय

धन्यवाद!

उगा काहितरीच's picture

7 May 2016 - 9:53 am | उगा काहितरीच

तुमच्या आयडीचा नेमका अर्थ काय आहे ?

सांश्रय's picture

7 May 2016 - 12:59 pm | सांश्रय

शोधा म्हणजे .....सापडेल...... (googla हो..)

शिद's picture

7 May 2016 - 8:36 pm | शिद

मग तुम्ही हा धागा काढण्याअगोदर गुगलवर शोधलं की नाही?

तुम्हीपण योग्यरीत्या शोधलं असतं तर तुम्हालापण हवी ती माहीती नक्कीच मिळाली असती नाही का?

सांश्रय's picture

7 May 2016 - 10:43 pm | सांश्रय

माहिती बरीच मिळाली, परंतु प्रत्यक्ष वापरकर्त्यांकडुन किंवा अनुभवी लोकांकडून मिळावी हे अपेक्षित होतं, पण ते न होता धागा भलत्याच विषयांच्या चर्चेत चाललाय याचे वाईट वाटते, तसे पाहता प्रत्येकाच्या घरात शेगड्या असतील, काही ठराविक सोडता बाकी वेळखाऊ गोष्टी चालल्यात.

खटासि खट's picture

7 May 2016 - 9:56 am | खटासि खट

चूल नाही का घरात ?

चुल आहे पण ती गॅसवर चालणारी आहे व दोन बर्नरची आहे. आत्ता चार बर्नरची घ्यायची आहे. त्यावर बोला...

खटासि खट's picture

7 May 2016 - 5:00 pm | खटासि खट

फोटु टाका की. आम्हाला पण बगायची गॅसवरची चूल

जेपी's picture

7 May 2016 - 9:58 am | जेपी

सेकंड हॅंड चालेल का?

पण तीन बर्नर ची आहे..

एक इडंक्शन घ्या.अ र्थात माझ्याकडे आहे.
तीन वर स्वयंपाक करा,इंडक्शन वर पाणी तापवा...
पण इंडक्शन ला सपाट बुडाची पातेली लागते.
एक स्टील चा डबा देतो.
हाकानाक

सपाट बुडाची पातेली नै हो, लोखंडी असावी लागते म्हणे.

लोखंडी नै..स्टीलची सपाट बुडाची भांडी..
प्रयोग करा-
स्टीलचा डब्बा घ्या 5-6 लीटरचा आणी त्यात पाणी घालुन इंडक्शन वर तापवायला ठेवा..

उगा काहितरीच's picture

7 May 2016 - 11:49 am | उगा काहितरीच

स्टीलचे भांडे चालते इंडक्शन वर. ॲल्युमिनीअम नाही चालत . लोखंडी भांडे पण चालू शकते. फक्त अट एकच बूड सपाट पाहिजे .

नाखु's picture

7 May 2016 - 2:59 pm | नाखु

भांड्याचे !!!

खुलासेदार नाखु

प्रचेतस's picture

7 May 2016 - 3:01 pm | प्रचेतस

भांडे लपविले तर?

रेवती's picture

7 May 2016 - 6:40 pm | रेवती

ताक मिळणार नाही.

प्रचेतस's picture

7 May 2016 - 6:50 pm | प्रचेतस

=))

सांश्रय's picture

7 May 2016 - 1:44 pm | सांश्रय

सेकंडहँड नको.
शिवाय इंडक्शन वगैरे पर्यायही नको...

गॅस शेगडी अशी घ्यावी जी बिनागॅसचीपण पेटेल. बास्स्स!

खटासि खट's picture

7 May 2016 - 10:06 am | खटासि खट

नाही तर गॅस कुठला घ्यावा असाही धागा येईल.

तुम्ही शोध लावा. आम्ही तयार आहोत विकत घ्यायला.

हाहाहा! सोपेय. असे धागे घालायचे शेगडीत. चांगली दणकून पेटते. =)) आणि हवा म्हणून प्रतिसाद घालायचे.

नीलमोहर's picture

7 May 2016 - 2:36 pm | नीलमोहर

एका अती उपयुक्त धाग्यावर मदत करणे सोडून आग लावण्याचे पुरेपूर प्रयत्न अनेकांकडून सुरू असलेले पाहून...
एक मिपाकर म्हणून... वगैरे... वगैरे..

चौकटराजा's picture

7 May 2016 - 10:19 am | चौकटराजा

चार बर्नरची शेगडी घ्याचीय ना ? मग प्रथम तिला चार बर्नर आहेत ना हे पाहून घ्या किंवा मग दोन बर्नर व दोन बर्नर फ्री च्या स्कीमची वाट पहा !! पावसाळ्यात खास महिलांसाठी वेगवेगळे सेल लागतात म्हणे !

प्रथम स्वयंपाक घराच्या कडेला असलेला ओटा ( काहीजण त्यास प्लाटफारम का म्हणतात माहीत नाही )काढून मध्यभागी आणा म्हणजे चार चुलींची खरी मजा येईल.वरती एक धुरांडं लागेल.चुलीपेक्षा धुरांडं महाग आणि कटलरीपेक्षा डिशवॅाशर महाग अशी सध्याची परिस्थिती आहे.एक फायदा म्हणजे मध्यभागी पापकार्न कढईत फोडले की चहुकडे छान उडतात.

हे खरं आहे. चार बर्नरची शेगडी घेण्यासाठी किचन मधे आवश्यक ते बदल करावे लागतात. चार बर्नरची शेगडी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे प्रशांत दामले येतो. त्याच्या सोबत टीव्हीचा कॅमेरा पण असतो. त्या कॅमे-यात आपलं किचन चांगलं दिसावं म्हणून काही काहींनी घरातला हॉल सुद्धा किचमधे समाविष्ट करून घेतला आहे. ओटा काढून टाकून तिथे किमान तीन चार लाखांचं किचन युनिट बसवून घ्यावं. सेंटरला कांदा कापण्यासाठी एक टेबल. तेच टेबल शिजलेले पदार्थ ठेवण्यासाठी किंवा कॅमे-यासमोर शिजवण्यासाठी वापरता येतं. हॉल आणि किचनमधली भिंत काढून टाकावी. सोफा काढून तिथे डायनिंग टेबल ठेवावं.

रात्रीच्या वेळी जाऊन रेल्वे स्टेशनला टांगलेला टीव्ही काढून आणावा. हा दोन्ही बाजूंनी दिसतो. तो मधे टांगला की भूतपूर्व हॉल आणि किचन अशा दोन्ही ठिकाणाहून दिसेल. प्रदा येईल तेव्हां तो त्यावर एखादा प्रश्न विचारेलच.

एव्हढी तयारी झाली की मग चार बर्नरची शेगडी आणावी. त्या आधी चिमणी कुठली घ्यावी, किचन युनिट कुठलं घ्यावं हे निश्चित करावं.

सांश्रय's picture

7 May 2016 - 1:46 pm | सांश्रय

तुम्हाला मुख्य विषय सोडून बाकिच्या विषयांची बरीच माहिती दिसते. तुम्हीपण कन्हैय्यासारखी पिएचडी करता काय हो?

संजय पाटिल's picture

7 May 2016 - 3:13 pm | संजय पाटिल

एका ओळीत चार बर्नर असलेली मिळते का बघा.. म्हणजे ओटा मोठा करायला नको. नाय्तर मग दोन बर्नरचीच अजून एक घेऊन टाका..

खटासि खट's picture

7 May 2016 - 5:02 pm | खटासि खट

पीएचडी, कन्हैया ?
विषय भरकटवू नका हो मॅडम.

अत्रन्गि पाउस's picture

7 May 2016 - 10:59 am | अत्रन्गि पाउस

प्रश्नातच उत्तर आहे कि ...

अजया's picture

7 May 2016 - 11:14 am | अजया

=)))
_/\_

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 May 2016 - 11:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सौरउर्जेवर चालणा-या चुली वापरून पाहावे असे वाटते. त्याबद्दल अधिक माहिती नाखु देतील.

-दिलीप बिरुटे

त्यात कोणते फिचर्स असावेत याबाबत जरा सुचवल्यास बरं होईल...

सगळे फिचर्स असलेली बघुन घ्या..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 May 2016 - 12:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मिपावरचे काही लेख चुलीत टाकलेत तर आगही लावायची गरज पडणार नाहीत. त्यावर पाणी तापवुन नंतर महाराष्ट्राला पुरेल एवढी वीजनिर्मीती होईल एवढी जळजळ आहे. शिवाय काही सुज्ञ (???) सदश्य गोल गोल गोवर्‍यांचे प्रतिसाद आणि कच्चा माल टाकत असतातचं. त्याचाही वापर करुन इको फ्रेंडली स्वयपाक व उर्जानिर्मिती साधता येईल.

उगा काहितरीच's picture

7 May 2016 - 12:06 pm | उगा काहितरीच

लोल!

जेपी's picture

7 May 2016 - 12:07 pm | जेपी

=))

ख्या ख्या ख्या! हल्ली महाराष्ट्रात ऊर्जा अतिरिक्त झालीये असे ऊर्जामंत्री म्हणत होते ते बहुधा मिपामुळेच असावे. एक मिपाकर म्हणून वैग्रे वैग्रे!!!

नाखु's picture

7 May 2016 - 3:02 pm | नाखु

(स्वतःच्या) स्वयंपाक बनावायचा अन्नच्छत्र नाही !!

आमच्या पॉपकॉर्नच्या धंद्याला अनुकूल असलेला धागा चुलीत टाकण्याची भाषा केल्याबद्दल चिमणरावांचा जाहीर निषेध !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 May 2016 - 10:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कोण म्हणलं हा धागा चुलीत टाका म्हणुन? मोकलाया नंतर एवढे मिपाकर एकत्र आलेले मी पहिल्यांदाचं पहातोय.
बाकीचे धागे चुलीत टाका आणि पॉपकॉर्न बनवा. हाकानाका =)). बाकी णीषेध मागे घ्या =)०

रेवती's picture

7 May 2016 - 6:42 pm | रेवती

ही ही ही.

स्वयंपाकाला तरुण आणि तडफदार बाई ठेवा. तिच्याकडून सकाळ-संध्याकाळचा स्वयंपाक एकाच वेळी करुन घ्या. तुमचा सगळा वेळ वाचेल.

सगळ्यांना शॉवरखाली गार पाण्यानं अंघोळीची सवय लावा. यानं उर्जा आणि एका शेगडीची बचत तर होईलच शिवाय सगळ्यांचं पटकन आवरेल. कामवाली आली की मिस्टरांना अंघोळीला पाठवा म्हणजे ते चहा वगैरे मागणार नाहीत. आणि पटकन आवरुन बाहेर येतील.

ब्रेकफास्टला सगळ्यांना बाईनं केलेल्या पोळीभाजीचीच सवय लावा म्हणजे ते एक काम कमी होईल.

फावल्या वेळात बाईकडून वेगवेगळ्या कोरड्या चटण्या करुन घ्या आणि इतर वेळी कुणी खायला मागितलं की त्याला चटणीपोळी द्या. यामुळे भरपूर वेळ वाचतो.

चार बर्नरच्या शेगडीचे पैसे वाचल्याबद्दल कामवाल्या बाईलाच थोडे जास्त पैसे देऊन येतांना भाज्या आणण्याची सवय लावा.

आता तुम्हाला `वाचलेल्या वेळाचं काय करावं' हा प्रश्न पडेल. ..... मग इथे त्याविषयी धागा काढा.

चौकटराजा's picture

7 May 2016 - 2:27 pm | चौकटराजा

अरारा .. अहो हे काय भल॑तेच लावलेय ? त्याना चार बर्नर ची चूल वापरण्यात आध्यात्मिक फायदा काय ...? ते सांगायचे सोडून.......
( आता दोनशे नक्की ... मी आपला कसा बाजूला होतो बरं !!!!)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 May 2016 - 2:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तरुण तड़फदार ही कामवाल्या बाइकडून अजुन काय काय कामं करून घेता, मरेल ना बिचारी.

-दिलीप बिरुटे

विवेक ठाकूर's picture

7 May 2016 - 3:05 pm | विवेक ठाकूर

तरुण तड़फदार ही कामवाल्या बाइकडून अजुन काय काय कामं करून घेता

तिला टू विलर शिकवायची (बुलेट नको!). आणि बँकेचं लोनप्रपोजल करुन नवी स्कूटर घेऊन द्यायची. या कामात आपण गॅरेंटर मात्र राहायाचं नाही. तीचा पगार इएमाय म्हणून भरायचा म्हणजे लोन फिटेपर्यंत तरी बाई काम सोडणार नाही. शिवाय तिला कामाला यायला उशीर पण होणार नाही.

जाता येता बँकेच्या कामाची वगैरे पण सवय लावायची म्हणजे तीला ही प्रमोशन झाल्यासारखं वाटेल.

आनंदी गोपाळ's picture

7 May 2016 - 3:12 pm | आनंदी गोपाळ

अहो, आधीच 'मरत असेल' तरच एक्स्ट्राची कामं करायला राजी होईल ना ती? ;)

तर्राट जोकर's picture

7 May 2016 - 2:39 pm | तर्राट जोकर

रोगापेक्षा इलाज भैंकर... =))

सस्नेह's picture

7 May 2016 - 2:53 pm | सस्नेह

बाईचा पत्ता व फोन नंबर व्यनि करावा .

धनंजय माने's picture

7 May 2016 - 2:39 pm | धनंजय माने

सल्ला द्यायचे सत्तर रुपये होतील.

उगा काहितरीच's picture

7 May 2016 - 3:10 pm | उगा काहितरीच

सुरूवातीला ५० रुपये ना ? डायरेक्ट ७० म्हटल्यावर येणारच नाहीत ते धाग्यावर ;-)

धनंजय माने's picture

7 May 2016 - 3:44 pm | धनंजय माने

महागाई! कंबरडं मोडलं हो या महागाईने. आमच्याकडे पार्वती त्या झाडाच्या काटक्या गोळा करुन आणून चूल पेटवतेय सध्या... मिसरी भाजायला.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 May 2016 - 6:18 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

सुर्यचुल वापरली का हो तुमच्या पार्वतीने? आवडेल त्याला एखादवेळेस. ;)

रच्याकने, माने ७० रुपये घेतल्याशिवाय तुम्ही प्रतिसाद कसा दिलात? हा शुद्ध हलकटपणा आहे माने.

श्रीगुरुजी's picture

7 May 2016 - 3:05 pm | श्रीगुरुजी

ज्योति, सूर्या इ. कंपन्यांच्या चार बर्नरच्या शेगड्या चांगल्या आहेत. परंतु त्यासाठी जास्त रूंदीचा ओटा लागतो. ओट्याची रूंदी मोजून मगच ठरवा की चार बर्नरची शेगडी तिथे बसेल का. ओटा कमी रूंदीचा असेल तर चार ऐवजी तीन बर्नरची शेगडी चालेल.

आजकालच्या फ्लॅट मध्ये किचन ओट्याची रुंदी ही जास्तच असते. त्यामुळे रुंदीचा प्रश्न नाही. प्रश्न हा आहे की कोणत्या कंपनीची घ्यावी, घेतली तर ती ग्लासटॉप ची घ्यावी की स्टील ची? ज्योती आणि सुर्या दोन्ही बघीतले पण ग्लासटॉप की स्टीलची हे समजत नाही.

ओट्याची रुंदी पाहून मग शेगडी घेणे मराठी माणसाने थांबविले पाहिजे. (संदर्भः अंथरूण पाहून...)
चार बर्नर्स असलेल्या शेगडीसाठी घरही बदलायची तयारी हवी.
'सहा बर्नर्सची नाही का?' असं दुकान्दाराला विचारायची हिंमत हवी.

असा ओटा असेल तर दोन्ही बाजूंनी चार बर्नर्स सहज वापरता यावेत.

म्हणजे दोन शेगड्यांच्या गॅसवर सुद्धा किती पटकन काम होतं हे कळेल.

अत्रन्गि पाउस's picture

8 May 2016 - 8:00 am | अत्रन्गि पाउस

आमच्याकडे २ वर्ष वापरतोय ...अर्थात ३ बर्नर वाली आहे...

रुस्तम's picture

8 May 2016 - 9:07 am | रुस्तम

ग्लेन लिहायलाच आलो होतो.. आमच्या कडे ४ थे वर्ष चालू आहे.... ३ बर्नर वालीच...

आनंदी गोपाळ's picture

7 May 2016 - 3:07 pm | आनंदी गोपाळ

४ बर्नरचा कुकटॉप वापरायला बर्‍यापैकी बोरिंग व त्रासदायक असतो. त्यातले ४री बर्नर्स एकत्र वापरणे जवळजवळ अशक्य आहे.

उदा. समोरच्या बर्नरवर भाजी फोडणीस टाकली अन त्याच वेळी पाठीमागच्या पातेल्यातलं पाणी उकळल्याने आंघोळीसाठी बादलीत काढायचं आहे. अशा वेळी आधी हाताला चटके तेव्हा होईल आंघोळ अशी नवी कविता पाडावी लागते.

दुसरे, एका वेळी ४ मोठी भांडी ठेवून चारी भांड्यात मोकळेपणी काम करता येईल अशी साईज मी तरी पाहिलेली नाही. बॅकबर्नरवर टाकणे असा वाक्प्रचार का आलाय ते असा पाठीचा बर्नर वापरून पाहिल्यावर लक्षात येईल.

तिसरे, चारी बर्नर्स लहानमोठी ज्योतवाले असतात. एकावेळी दोन मोठ्या ज्योती मिळतात का ते पहावे.

एकावेळी ४ शेगड्या पेटवायची गरज असेल, तर अजून एक २ बर्नरचा नॉर्मल गॅस आणा, अन कनेक्टर लावून शेजारी ठेवा. काम बरंच सोपं होईल, शिवाय अ‍ॅट ए टाईम दोन लोक दोन ठिकाणी, एकमेकांत लुडबूड न करता काम करू शकतील.

पहा बुवा पटतंय का.

पैसा's picture

7 May 2016 - 9:49 pm | पैसा

अगदी अगदी! मी तर म्हणेन एक बर्नरची शेगडी घेऊन आताच्या शेगडीच्या लायनीत जोडून घ्या आणि एक इंडक्शन घ्या. आंघोळीच्या पाण्याला गॅस का वापरता? गीझर बसवून घ्या ना.

बॅटमॅन's picture

10 May 2016 - 1:02 am | बॅटमॅन

एकावेळी ४ शेगड्या पेटवायची गरज असेल, तर अजून एक २ बर्नरचा नॉर्मल गॅस आणा, अन कनेक्टर लावून शेजारी ठेवा. काम बरंच सोपं होईल, शिवाय अ‍ॅट ए टाईम दोन लोक दोन ठिकाणी, एकमेकांत लुडबूड न करता काम करू शकतील.

नेमके हे असेच म्हणतो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 May 2016 - 7:06 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

खाली अण्भवी बॅटमॅन अशी सही राहिली अशी "अंमळ" शंका आहे.

चारही बर्नर्स एकदम निदान माझेतरी वापरले जात नाहीत. एकाचवेळी तीन बरेचदा वापरले जातात.
बर्नर्स हे वेगळाल्या आकाराचे असतात. कुकर कोण्त्या बर्नरवर चांगला होतो, भाजी कुठल्यावर होते हे ठरूनच जाते. ओट्याची रुंदी चांगली आहे म्हणून चार घेण्यास हरकत नाहीसे दिसते अन्यथा नेहमीचे दोन असताना आण्खी तसेच दोन घेतले तर नको असतील तेंव्हा ती शेगडी ओट्यावरून तात्पुरती काढून जागा करता येते. ब्रँडस वगैरे माहिती नाहीत हो.

तर्राट जोकर's picture

7 May 2016 - 7:15 pm | तर्राट जोकर

{मोड ऑन: कुठला तो जाणकार वळखतीलच}

कशाला प्रतिसाद दिला मग ब्र्याण्ड्स माहित नहीत तर, तुम्ही स्वतःला फार हुशार समजता काय फार? माहित आहे तुमच्याकडे चार बर्नर्सचा स्टोव्ह आहे तेची जाहिरात करताय. त्यतले तीनच वापरता आणि इथे आम्हाला शिकवता. कळली तुमची .... इत्यादी इत्यादी.

{/मोड ऑन}

गॅरी ट्रुमन's picture

7 May 2016 - 9:06 pm | गॅरी ट्रुमन

तुम्ही एक बर्नरच्या चार शेगड्या का घेत नाही? किंवा आठ बर्नरची अर्धी शेगडी?

उगा काहितरीच's picture

7 May 2016 - 9:27 pm | उगा काहितरीच

आता स्पिरीट लॕम्प घ्यायला सांगा. प्रयोगशाळेत वापरतात तसा ;-)

लालगरूड's picture

7 May 2016 - 10:53 pm | लालगरूड

मला चार रेगुलेटर असलेला सिलेंडर पाहिजे brand Rajnikant

मिपा वर ठरलेले सभासद ठरलेली उत्तरे देतायत.

लालगरूड's picture

7 May 2016 - 11:48 pm | लालगरूड

surya घ्या glass top .

सांश्रय's picture

9 May 2016 - 6:05 pm | सांश्रय

आपण सुर्या ग्लास टॉप का म्हणताय?
त्याची काही वैशिष्ट्ये असल्यास सांगा.

टवाळ कार्टा's picture

9 May 2016 - 6:11 pm | टवाळ कार्टा

त्यासाठी दुसरा धागा काढा ना :)

सांश्रय's picture

9 May 2016 - 6:22 pm | सांश्रय

धन्यवाद! सल्ला चांगला आहे.

अभ्या..'s picture

9 May 2016 - 6:12 pm | अभ्या..

काचेचा आहे,
खूप रंगात मिळतो,
नाव अगदी भारतीय वाटते,
सोनाली बेंद्रे जाहीरात करते,(कधीकधी)
सूर्या फौन्डेशन बर्‍याच प्रकल्पात मदत करते,

पुणेकर भामटा's picture

7 May 2016 - 11:36 pm | पुणेकर भामटा

तुम्ही पाणी तापवायला बंब का घेत नाही?

पुणेकर भामटा's picture

7 May 2016 - 11:36 pm | पुणेकर भामटा

तुम्ही पाणी तापवायला बंब का घेत नाही?

चांदणे संदीप's picture

8 May 2016 - 2:26 am | चांदणे संदीप

इतके बर्नर्स का पेटलेत!
मला यातल काही कळत नाही पण वर चिनार यांचे बोलणे खरे व्हावे या नेक हेतूपायी हा अजून एक प्रतिसाद! :)

Sandy

टवाळ कार्टा's picture

8 May 2016 - 10:04 pm | टवाळ कार्टा

दोन बर्नरच्या गॅस शेगडीवर मुलांचे शाळेचे डबे, सकाळचा चहा, आमचा नाश्ता, एखादे वेळेस अंघोळीचे पाणी तापविणे अशी सगळी कामे एकाच वेळी शक्य होत नाहीत. त्याकरीता चार बर्नर असलेली गॅस शेगडी घ्यायचे ठरविले.

हि सगळी कामे तुम्ही एकाच वेळी करणार आहात का? म्हणजे बाथरूममध्ये आंघोळीचे गरम पाणी घेउन चहा पिता पिता नाश्टा खाताना मुलांचे डबे तयार करणे....कस्सं काय जम्तं हो तुम्हाला

हा धागा काढण्याचा एकच उद्देश होता की, मिपा वरील सुज्ञ सदस्य / मंडऴी अनुभवलेली किंवा माहीतीत असलेली गॅस शेगडी संदर्भातील माहीती येथे लिहीतील जेणेकरुन ही माहीती मर्यादितच न राहता इतरांपर्यंतही पोहचु शकेल...........
इथले प्रतिसाद धाग्याविषयी असते तर खुप चांगली चर्चा झाली असती, माहिती मिळाली असती. माझ्या प्रश्नासंदर्भात बरीचशी गंभीरही माहिती मिळतेय व त्याचा अभ्यासही सुरु आहे. मुंबई ग्राहक पंचायतीलाही संपर्क केलेला आहे.

आपलं संस्थळ चुकलं असं वाटतंय. ;)

पुणे मुंग्रापं's picture

12 May 2016 - 12:17 pm | पुणे मुंग्रापं

असं वाटायला लागलय खरं!

कपिलमुनी's picture

12 May 2016 - 10:44 pm | कपिलमुनी

प्रतिसाद द्यायचा आयडी चुकला वाटतं

श्री गावसेना प्रमुख's picture

9 May 2016 - 7:28 pm | श्री गावसेना प्रमुख

एक गहन प्रश्न पडलाय
घराचे बांधकाम चालू आहे ,संडासीचे भांडे कोणते वापरावे,इंडियन की इंग्लिश कोणते सोईस्कर राहील।
जाणकारांनि आपला बहुमोल सल्ला द्यावा।

टवाळ कार्टा's picture

9 May 2016 - 8:09 pm | टवाळ कार्टा

=))

टवाळ कार्टा's picture

9 May 2016 - 8:41 pm | टवाळ कार्टा

या विषयातले जाणकारपण मिपावर आहेत???

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 May 2016 - 8:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कोण्रे कोण्रे?

कुं...असो...!!! त्या म्हाराजकी जय =))

श्री गावसेना प्रमुख's picture

10 May 2016 - 6:29 am | श्री गावसेना प्रमुख

आता कोणी घराच्या कामाचे रेट विचारतो कुणी शेगड़ी कोणती घ्यायची हे विचारतो कुणी डिश टीवी बद्दल चवकशी करतो त्यांना सल्ला मिळू शकतो त्या अर्थी मिसळपाव वर बऱ्याच विषयांचे जाणकार उपस्थित असावेत म्हणून माझाही एक गहन प्रश्न।

वैभव जाधव's picture

9 May 2016 - 8:35 pm | वैभव जाधव

प्रत्येकाच्या क्षमतेवर अवलंबून आहे.

आपल्याला कसं व्यवस्थित 'जमतं'? बाकी कुठून आणायचं, किती खर्च नंतर चा विषय. आधी 'सोय' बघावी. ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 May 2016 - 8:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रश्ण गहन आहे का थोडी अक्षरात अदलाबदल आहे असा एक प्रश्ण आहे माझा.

चिगो's picture

12 May 2016 - 5:47 pm | चिगो

प्रश्ण गहन आहे का थोडी अक्षरात अदलाबदल आहे असा एक प्रश्ण आहे माझा.

=)) मेलो..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 May 2016 - 7:02 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

रच्याकने गॅसचही कनेक्शन बसल्या जागी मिळुन जैल हा मुद्दा तेव्हा डोक्यात आला नव्हता. प्रेशर वाईट. ;)

ते इंग्लिश+इंडीयन कमोड असतं ना? ते घ्या.. अनुभव नसला तरी चार-दोन फायदे सांगतो..

१. मुडप्रमाणे/ तब्येतीप्रमाणे वापरता येईल.. काँस्टीपेशन असेल तर इंडीयन स्टाईल, नेहमीच्या वेळी चॉईस आणि डिसेंट्री झाल्यास इंग्लिश..

२. एक के दाम में दो-दो संडास.. भारतीयत्वाचा आणि आधुनिकतेचा समन्वय देखील..

३. पाहुणे, मग ते मॉडर्न असोत वा गावरान, देशी असो वा विदेशी, त्यांच्या मनाजोगा कार्यक्रम करु शकतात.

४. कमोडवर भारतीय पद्धतीत बसल्यास जगाकडे 'वेगळ्या' उंचीवरून बघायला मिळेल. संडास हे अनेक कल्पनांचे जन्मस्थान असल्याने हाईटचा फायदा मिळून आपल्या कल्पनांना एक आगळी खोली लाभेल..

आयडीया पटते का सांगा..

वैभव जाधव's picture

12 May 2016 - 7:11 pm | वैभव जाधव

हे सगळे विचार नेमके 'कुठे' सुचले???
लेका बालिस्टर का झाला नाहीस ;)

मी तर म्हणते शेगडी वगैरे काही घेऊ नका. जेवणाच्या गोळ्या मिळाल्या तर किती बरं!

कंजूस's picture

10 May 2016 - 6:13 am | कंजूस

वैल चूल घ्या.
( चुलीच्या कडेने बोगदा काढून बाजुला एक खोटी चूल असते.इकडच्या जळणाची थोडी धग तिकडे जाऊन तिकडे भात ,गरम पाणी होते. उष्णता वाया जात नाही.)