कवचकुंडले!
"अर्जुना उचल ते गांडीव! लाव तो बाण! भेद हे कवच!"
अर्जुनाचा डोळ्यावर विश्वासच बसेना!
सूर्यपुत्र परत आला होता!
'नाही बंधु, नाही! बंधुहत्येचे पाप पुनश्च माझ्या माथी मारू नकोस!"
"माझं मरण अर्जुना तु नाही तर मी स्वतः लिहिलं होतं. असशील तु योद्धा, असशील तु जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर, तर स्वीकार आव्हान!"
"बंधु तूच माझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ होतास!"
"सर्वश्रेष्ठत्वाची भीक नकोय मला.आयुष्यभर भीकच मागत आलोय मी. मरणानंतरतरी अधिकाराचा हक्क दे!"
अर्जुनाने मोठ्या कष्टाने बाण उचलला.
"तो बाण नव्हे, तुझं सर्वश्रेष्ठ अस्त्र काढ. सोड ब्रम्हास्त्र माझ्यावर!'
अर्जुनाने मोठ्या कष्टाने ब्रम्हास्त्र कर्णाच्या दिशेने सोडले.
"बंधु माफ कर मला!" अर्जुन उच्चारला!
ब्रम्हास्त्र कर्णाच्या दिशेने झेपावले!
क्षणार्धात आसमंत उजळून निघाले!
ब्रम्हास्त्र भेदुन कर्ण डौलाने उभा होता.
'कसं शक्य आहे? मग युद्धात कर्ण कसा हरला?'
कर्ण अर्जुनाकडे बघून निराशेने हसला!
"नात्याची कवचकुंडले सर्वात अभेद्य असतात बाळा! ती जर आडवी आलीत तर कुठलाही बाण ती भेदु शकत नाहीत!"
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जाऊ द्या ओ विजुभौ!
मी हे वाचलं पण तरी माझा गोंधळ
ही कथा फक्त एक रूपक म्हणून
अंजलिका नाही. अंजलिक.
कंट्रोल अभ्याभौ कंट्रोल!
:) :) :)
सर्व वाचक व प्रतिसादकांचे
नाही आवडली. :-( सॉरी !
इट्स ओके उका!
कथा आवडली.
बिलकुल ! दाजी पणशीकर यांचं
बबनभाऊ न्याय शेवटी जेत्यांचाच
मस्त ...
सध्यातरी ते नाही लिहू शकत.