Skip to main content

आभाळानं वाजिवलाय ढोल

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 13/04/2016 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळानं वाजिवलाय ढोल हानम्या सुतार लुना घीऊन झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसलाय तंबाखूची पिशवी घिऊन धुरपी कॉकटेल सर्व्ह करायला निघालीय विमान १८० मैल वेगानं आभाळात झेपावलयं माकडांनी भक्तीसंगिताचा खिस काढत बानूबयावर ठेका धरलाय गोलमेज परिषदेत मारुतीनं शनवारचा उपास सोडलाय एक डोळा झाकून पारध्यानं चिमणीवर निशाना साधलाय बेबेवाडीच्या धरणात वाळूचा उपसा चाललाय डांबरीवर घसरुन संत्याचा पायजमा फाटलाय आरं हाय कारं मंडळी हितं कोण? आज एंडरेल पिऊन आभाळानंच ढोल बडवलाय
लेखनविषय:

वाचने 2528
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

यावर कोणी तरी इलस्ट्रेशन करायला पाहिजे :)

In reply to by हर_हुन्नरी

गोलमेज परिषदेत मारुतीनं शनवारचा उपास सोडलाय
एवढ्या एका ओळीचे इल्स्ट्रेशन करणार्‍याला माझ्यातर्फे एक कॉर्डलेस माऊस बक्षीस.

बदलत्या जगाचे छान वर्णन जमलय..पण हानम्या सुताराचे कशाबद्दल सांगायचेय.... कळाले नाही

जव्हेरभौ आवडली कविता. यातील चमत्कृती मनाला भावते अगदी आणि ती चमत्कृती हेच कवितेचे बलस्थान आहे.